क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुल द्रविडला १६ त घेऊन ११ त ना घेता बेंचवर बसवणे योग्य आहे का?
लंकेत आपल्या गोलंदाजांनी चकित केलेय, आपल्याला आणि लंकेला.

>>> राहुल द्रविडला १६ त घेऊन ११ त ना घेता बेंचवर बसवणे योग्य आहे का?

अजिबात योग्य नाही. द्रविडचा बचाव भक्कम आहे पण वेळप्रसंगी तो फटकेबाजीही करू शकतो. तो स्लिपमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे तसाच तो पर्यायी यष्टीरक्षकसुद्धा आहे.

राहुल द्रविडला १६ त घेऊन ११ त ना घेता बेंचवर बसवणे योग्य आहे का? >> आजाबात नाही,निदान वर्ल्डकप पर्यंत तरी. पुढे तो खेळेल का नाही ते माहित नाही.

आजच्या सामन्याचा मानकरी - "कुमार धर्मसेना" !

जडेजा, कार्थिक, रोहीत शर्मा यांना काढण्यासाठी त्यांनी अजून किती सामन्यात खराब कामगिरि करणे आवश्यक आहे?

मास्तुरे , बाकी दोघांच माहित नाही , पण जडेजा बद्दल तुम्ही अस कस म्हणू शकता ?

चक्क ९ बॉल खेळला तो . त्याची फलंदाजीची कुवत बघता हे साहेबांनी शतक काढण्यासारख आहे Happy

जडेजा रवि शास्त्रीचा भाऊ शोभतो. अतिसंथ फलंदाजी, अनेक चेंडू वाया घालवून फारच थोड्या धावा करणे, साधारण गोलंदाजी, साधारण क्षेत्ररक्षण व सगळ्यात महत्वाचे म्हणजे संघात अढळ स्थान !

allround.JPG आज कसे टरकले आहेत पाहिलंस हे श्रीलंकावाले ! फक्त ५ वाईड, एकही नोबॉल नाही .... अगदी आपल्या ९९ झाल्या तेव्हाही !!

शेवटी नैतिक विजय आपलाच!!

परंतु,

"They have out-bowled, out-batted, out-fielded, out-thought, out-every-thinged India"

क्रिक इन्फो वरून.

जडेजा, कार्थिक, रोहीत शर्मा यांना काढण्यासाठी त्यांनी अजून किती सामन्यात खराब कामगिरि करणे आवश्यक आहे? >> अहो सध्यातरी पर्याय आहे का त्यांना Happy Lol Biggrin

रोहित शर्मा - २१ बॉलमध्ये ११ रन, मागील २ मॅच (० ,०) बघता द्विशतक मारल्याच्या बरोबर आहे हे.

कोणाला घ्यावं, कोणाला काढावं यापेक्षां महत्वाचा प्रश्न आहे कीं खेळपट्टी किंवा हवामान जराही वेगळं/खराब असलं कीं आपली सबंध फलंदाजीच अशी कां कोलमडते. प्रतिभा असूनही कसला अभाव असावा या फलंदाजीत ? निग्रह ? आत्मविश्वास ? जिगर ? शिस्त ? प्रेरणादायी नेतॄत्व ? कीं तंत्र ? वैफल्यातून उदभवलेला आपला उपरोध बाजूला करून खरंच या प्रश्नाच उत्तर शोधायचा प्रयत्न व्हायला हवा. द्रविड, लक्ष्मण इत्यादीना परत बोलावणं हे मात्र त्यावरचं उत्तर असूं शकत नाही; ती प्रश्नाला दिलेली बगलच होईल.

सामना पाहिला नाही, पण how to build an innings, हे समजुन खेळणारा एकही फलंदाज या संघात नव्हता. सचिन टी-२० मधेही तो विचार करतो, ५० ष्टकात ते करायची १०पट जास्त गरज आहे.

how to build an innings, हे समजुन खेळणारा एकही फलंदाज या संघात नव्हता >> यु सेड इट!!

मागची तिरंगी मालिका आणि आता श्रीलंकेमधील मालिका, दोन्हीत सचिन नव्हता, दोन्हीत बर्‍यापैकी वाट लागली आहे. धोणीच्या नेतृत्वावर शंका अजिबात नाही, पण गेल्या अनेक वनडे मध्ये आपला परफॉर्मन्स (सचिन नसताना) फारच खराब आहे, हे दुर्दैवाने म्हणावे वाटते. कदाचित धोणीवरची "लिडरशीप इन्फ्लुयन्स" ही जबाबदारी सचिन स्वतः कडे घेत असावा व हे धोणीच्या लक्षातही आले नसावे.

>>> कोणाला घ्यावं, कोणाला काढावं यापेक्षां महत्वाचा प्रश्न आहे कीं खेळपट्टी किंवा हवामान जराही वेगळं/खराब असलं कीं आपली सबंध फलंदाजीच अशी कां कोलमडते.

आज धर्मसेनाने ४ जणांना खोटे बाद दिले (सेहवाग, कार्थिक, रैना, युवराज). आजच्या पराभवामध्ये धर्मसेनाचा सिंहाचा वाटा होता.

cricinfo वरील या कॉमेन्ट्स बघा.

Though India comprehensively lost their tri-series match against Sri Lanka here, they were distinctly unlucky to be at the receiving end of at least four dodgy decisions today.

Nuwan Kulasekara is known for his incutters but he kept pushing them away from Karthik's outside edge. Sure enough, he fell to a delivery that straightened outside off, though the replays didn't confirm the edge.

Raina, who's recently been in good form, struggled to get on the front foot and paid the price. He edged one from Mathews, which led to a fierce appeal from all the close-in fielders, but wasn't given out. He poked at a similar delivery from Perera and didn't seem to get an inside edge but was given out this time.

Raina was given out caught-behind four deliveries later by Kumar Dharmasena, with nothing registering on Snicko.

Former India Test player Arun Lal, who was at the commentary box when Raina was given out caught behind, said, "We did not hear any sound and there was none in the snickometer also."

Only Yuvraj Singh looked in any sort of control. He unfurled a couple of gorgeous drives - one was caressed through extra cover and the other sped away between the bowler and mid-off. He hit a stunning six over wide long-off but fell, given out lbw when a Lasith Malinga delivery not only hit him outside the off stump but was also missing it.

Back in India, at least one news channel screamed - "Umpires cheat India".

His co-commentator Ranil Abeynaike, a former Sri Lankan player, also said that the Indians wre unlucky.

"They were unlucky. They have been affected by some bad decisions of the umpires. But what can you do," he said.

मागच्या सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागल्याने व संगकारा, दिलशान व रणदिवची नाचक्की झाल्याने धर्मसेनाची देशभक्ती जागृत झाली असावी.

असो. धर्मसेनाची कामगिरी कितीही वाईट असली तरी त्यामुळे कार्थिक, रोहीत शर्मा व जडेजा खराब खेळ करीत आहेत हे नाकारता येत नाही.

>>> जडेजा, कार्थिक, रोहीत शर्मा यांना काढण्यासाठी त्यांनी अजून किती सामन्यात खराब कामगिरि करणे आवश्यक आहे? >> अहो सध्यातरी पर्याय आहे का त्यांना

अहो, मुनाफ, सौरभ तिवारी अशा बाकावर बसवून ठेवलेल्यांना संधी तर देऊन बघा. गाजराच्या पुंगीसारखे ते चांगले खेळले तर आपल्याला फायदाच आहे आणि खराब खेळले तर अजिबात तोटा नाही.

<<आजच्या पराभवामध्ये धर्मसेनाचा सिंहाचा वाटा होता.>> मान्य. पण बाद झाल्याचे निर्णय संशयास्पद असले तरी फलंदाज ज्या तर्‍हेने खेळत होते त्यावरून बाद होण्याच्याच मार्गावर ते होते हे तीव्रतेने जाणवत होतं. "स्विंग"चा त्याना अंदाजच येत नव्हता [किंवा ते तो घेत नव्हते ] व चिकाटीने खेळण्याची मानसिकताही दिसत नव्हती. उदा. युवराजच्या बाबतीत निर्णय चुकीचा होता असं निश्चितपणे वाटत असलं तरीही डावाच्या त्या नाजुक अवस्थेत ऑफ स्टंपच्या बाहेरचा तो बॉल [तोही मलिंगाचा ] युवराजने बाहेर जावून स्क्वेअर लेगला टोलवण्याचा प्रयत्न करणं, हे कशाचं लक्षण आहे !
<<पण how to build an innings, हे समजुन खेळणारा एकही फलंदाज या संघात नव्हता>> व <<कदाचित धोणीवरची "लिडरशीप इन्फ्लुयन्स" ही जबाबदारी सचिन स्वतः कडे घेत असावा व हे धोणीच्या लक्षातही आले नसावे.>> यातच कुठंतरी प्रश्नाच खरं उत्तर दडलं असावं !

माझ्या मते तरी जोवर आपण (BCCI) UDRS ला विरोध करतोय तोवर आपल्याला अंपायरच्या निर्णयावर बोलण्याचा हक्क (आणि नैतिक अधिकार ही) नाही . आपण आपलच हस करून घेतोय . काल रिव्ह्यू सिस्टीम असती तर कार्तिक , रैना आणि युवराज NotOut असते . (अर्थात रैना आधिच out असता Wink )
पण जर आपल्याला Security Guard नको असतील (कारण खर्च होतो ) तर चोरी झाली म्हणून रडण्यात काय अर्थ आहे ?

<<माझ्या मते तरी जोवर आपण (BCCI) UDRS ला विरोध करतोय तोवर आपल्याला अंपायरच्या निर्णयावर बोलण्याचा हक्क (आणि नैतिक अधिकार ही) नाही .>> केदारजी, रीव्ह्यू सिस्टीमला केवळ बीसीसीआयचाच विरोध आहे असं नाही; त्याबाबत खेळडूंमध्ये व क्रिकेटप्रेमींमध्येही प्रामाणिक मतभेद आहेतच. पण तो एका वेगळ्या चर्चेचाच विषय होईल. अंपायर्सकडून क्वचित चुका होणं हा खेळाचाच अविभाज्य घटक झाला पण त्या परत परत होणं किंवा चुकाना पक्षपातीपणाचा वास येणं, हे मात्र अक्षम्य आहे. धर्मसेनाबद्दल जर कुणी असं वाटूनच उपरोधिकपणे बोललं, तर ते योग्य नसलं तरी फारच वावगंही नाही, असं नाही वाटत?.
आणि हो, बीसीसीआय अनेक आक्षेपार्ह गोष्टी करते [उदा. आयपीएलचं मोदी प्रकरण ] म्हणून काय भारतातल्या सगळ्या क्रिकेटप्रेमीनी स्वतःची मुस्कटदाबी करून घ्यायची ?
[केदारजी, मी असंच काहीतरी लिहीत राहिलो तर आता मला येथून बहुतेक बहिष्कृतच करण्यात येईल !]

भाऊ , एवढ मनावर घेऊ नका , मी तर घेत नाहीच Happy
पण या सगळ्या प्रकारात कायम रडणारे अशी आपली International Level ला प्रतिमा होत चाललीये .
Cricinfo वरच्या पाकड्यांच्या आणी Aussies च्या कॉमेंट्स सहन होत नाहीत . पण ते खर तेच बोलतात त्यामुळॅ काही करताही येत नाही .

पाकिस्तानी व ऑसीजच्या कॉमेंट्स ! केदारजी,एवढ मनावर घेऊ नका , मी तर घेत नाहीच !!:हहगलो:
त्यानी कधी भारताबद्दल कांही चांगलं लिहीलेलं वाचलंत, तर मात्र मला जरूर कळवा !

>>> पण या सगळ्या प्रकारात कायम रडणारे अशी आपली International Level ला प्रतिमा होत चाललीये .

हे बरं आहे. म्हणजे सेहवागचे शतक होऊ नये म्हणून कुजकट मनोवृत्ती दाखवून ४ बाईज द्यायच्या, नोबॉल टाकायचा; पंचांनी बदाबदा पक्षपाती व खोटे निर्णय देऊन यजमान संघाला विजय मिळवून द्यायला हातभार लावायचा आणि आपण त्याविरूद्ध आवाज उठविला की आपण मात्र "कायम रडणारे".

२ वर्षांपूर्वी स्टीव्ह बकनरची अनेक पक्षपाती निर्णय दिल्यामुळे जशी कायमस्वरूपी हकालपट्टी झाली तसेच धर्मसेनाला हाकलायला पाहिजे.

आता उद्या न्यू झीलंडच्या विरुद्ध जिंकलो तर अंतिम फेरीत जाण्याची संधी आहे का भारताला?
संधी असली तरी त्याचा फायदा घेतील का, याबद्दल काही अनुमान.

धर्मसेना विरुद्ध भारताने काही अधिकृत तक्रार नोंदवली आहे का? तशी काही पद्धत आहे का?

पंच निवडायची पद्धत काय? सर्व निर्णय नंतर कुणा मंडळाने तपासून पाहून त्याचा हिशेब ठेवला जातो का? प्रत्येक निर्णय शंभर टक्के बरोबरच असेल अशी अपेक्षा असते का/

धर्मसेना विरुद्ध भारताने काही अधिकृत तक्रार नोंदवली आहे का? तशी काही पद्धत आहे का? >>> हो माझ्या माहितीप्रमाणे कॅप्टन ऑफिशियल कॉमेंट मधे लिहू शकतो. पण एशियन ब्लॉक (भारत, पाक, लंका, बांगलादेश) चे लोक एकमेकांना धरून असल्याने असे व्हायची शक्यता कमी आहे.

धन्यवाद, फारएण्ड.
आता आशियाई लोकांनी एकमेकांना धरून रहायचे तर थोडे पडते घेतलेच पाहिजे. नाहीतर गोरी माकडे, टपून बसलीच आहेत, आणखी बकनर॑सारखे लोक आणायला. तरीपण धर्मसेनाच्या गाडीची चारी चाके एकाच वेळी पंक्चर झाली तर बरे. Wink Proud

२२३ म्हणजे काही अगदीच वाईट नाही. रैना, युवराज, कोहली, कार्थिक अगदीच लवकर बाद झाले, नाहीतर पुनः एकदा ३०० करायची संधी होती.

क्रिक इन्फो वर कुणि लिहीले आहे की आता जडेजा बद्दल बोलूच नका, त्याला फलंदजी येत नाही, गोलंदाजी येत नाही, क्षेत्ररक्षणहि येत नाही! जरा जास्तच कठोर शब्द नाही? मग आता त्याला नक्की काढणार का? पण त्याने जर पैसे दिले निवडणूक समितीला तर? किती द्यावे लागतील?

Batting Power Play म्हणजे काय? फलंदाजी करणार्‍यांना त्याचा फायदा होत असावा. मग सेहवाग व धोणी खेळतानाच का नाही केला Batting Power Play?

असो, इतक्या उशीरा घेतल्याने थोडा फायदा झाला असे म्हणता येईल का?

झक्की बॅटींग पॉवर प्ले म्हणजे ह्या ५ षटकांच्या कालावधीत बॉलिंग करणार्‍या संघातील फक्त ३ खेळाडूच ३० यार्ड परिघाच्या बाहेर क्षेत्ररक्षण करु शकतात.. ह्याचा फायदा म्हणजे सेहवाग सारखे खेळाडू कुठल्याही दबावा खाली न येता चेंडू फटकवू शकतात...

आज बॅटींग पॉवर प्ले ची वेळ नक्कीच चुकली.. सेहवाग आणि धोणी खेळत होते तेव्हाच घेतला असता तर अजून जास्त धावा होऊ शकल्या असत्या.. पण आत्तापर्यंतचा इतिहास बघता. साधारण ३४ षटके झाल्यावरच बॅटींग पॉवर प्ले घेतल्याचे आढळून आले आहे.. कारण.. ३४ व्या षटका नंतर चेंडू बदलला जातो आणि चेंडू नवीन असल्याने तो फटकवायला सोपे जाते..

हिम्या, झक्कींना माहित नाही असे वाटले का? Happy

सेहवाग सोडला तर बाकी सगळे शून्य!! सेहवाग ११० मध्ये १६ फोर आणि १ सिक्स. लै भारी , पण आजही हारणार.

हिम्सकूल, धन्यवाद.
आपल्याकडे गोलंदाज खूप आहेत, कुमार, नेहेरा, शर्मा, पटेल, सेहवाग, रैना, युवराज. जरा क्षेत्ररक्षण मन लावून केले तर चांगली संधी आहे.

सुरुवात तर मस्त झाली आहे. गप्टिल दुसर्‍याच चेंडूवर पायचित!

<झक्कींना माहित नाही असे वाटले का?>
खरेच माहित नाही हो केदार! १९७० पर्यंत असले काही प्रकार नव्हते. (बाबांना विचारा तुमच्या!)
१९७० ते १९९७ पर्यंत क्रिकेट चे स्पेलिंग विसरायची वेळ आली होती.

तर हे, ५०-५०, २०-२०, तिरंगी सामने, आय पी एल हे असले प्रकार कधी आले नि कसे आले, नि डकवर्थ लुईस, नि 'दूसरा' नि नेल्सन असले शब्द क्रिकेटमधे कसे आले, का? हे काहिही माहित नाही!

आणखी एक प्रश्न. Bowling Power play म्हणजे मग फक्त तीन लोक आत नि बाकी बाहेर का? पण मग 'चिकी सिन्गल्स' घेतील फलंदाज (एक जुना शब्द, चेंडू लांब गेला नाही तरी, पटकन घेतलेली धाव.)- हेल्मेट, पॅड, ग्लोव्ह, गार्ड, बॅट (नि कधी कधी पोटपण!)इतका सगळा सरंजाम अंगावर घेऊन धावता आले तर!!

Pages