क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे असे म्हणायचे आहे का की उद्या उरलेले फलंदाज १५ धावात बाद होतील, फॉलो ऑन मिळेल, नि पुनः सगळे दहा जण दीडशे धावात बाद होऊन श्री लंकेला १ डाव नि शंभरच्या वर धावांनी विजय मिळेल!
ती शक्यता लिहीली नव्हती कुणी!

तुम्ही तसे म्हणत असाल तर मी म्हणेन की उरलेले सगळे बेसबॉलचे गेम्स बॉस्टन हरेल नि शिवाय पॅट्रियट्स सुद्धा या वर्षी ०-१६ जातील!!! आणि पुढल्या वर्षी सेल्टिक्स सुद्धा सगळे गेम्स हरतील!:फिदी:
Light 1

<<वरच्या सगळया पोस्टमधले काहीच न झाले तर काय फरक पडेल ? >> काहीही फरक पडणार नाही. चर्चा सुरूच राहील !!:हहगलो:

तुम्ही तसे म्हणत असाल तर मी म्हणेन की उरलेले सगळे बेसबॉलचे गेम्स बॉस्टन हरेल नि शिवाय पॅट्रियट्स सुद्धा या वर्षी ०-१६ जातील!!! आणि पुढल्या वर्षी सेल्टिक्स सुद्धा सगळे गेम्स हरतील >> वरच्या पोस्टमधले काहीच न झाले नि नाही झाले तर काय फरक पडेल ? Lol

मुद्दा हा कि अमक्यने तमके करावे इत्यादी मधे फारसा राम नाही. अमके झाले असते तर मधेही काहि फारसा अर्थ नाही. जे काही झाले त्यावर बोलले तर त्याचा उपयोग.

अरे ते प्रिडिक्शन - अ‍ॅनॅलिटिकल सिनॉप्सिस काय ते असतं हे सर्व. सर्वबाजूने विचार कोचला करावा लागतो तसे. अर्थात तसे होईलच असे नसते.

जे झाले त्यावर उद्या बोलूच की. पण तोवर आपल चर्चाकुंड धगधगत ठेवावं. Happy

<<जे काही झाले त्यावर बोलले तर त्याचा उपयोग.>> ज्याना खेळात रस आहे, ते असे आडाखे बांधणारच; कारण त्यातही "जे झाले" त्यावर आधारित एक बौद्धीक कसरत असते व ती खेळाच्या आनंदाचा अविभाज्य भाग असते.[ आणि तसंच पाहिलं तर कोणत्याही क्षेत्रातील बर्‍याचशा पर्यायविषयक चर्चाना " वरच्या सगळया पोस्टमधले काहीच न झाले तर काय फरक पडेल ? " हा तात्विक प्रश्न उधळून लावू शकतो !]

>>वरच्या सगळया पोस्टमधले काहीच न झाले तर काय फरक पडेल ?
लोकांनी ईथे पोस्टच टाकली नाही तरी काय फरक पडेल?
(किमान पोस्ट टाकायच्या तर काहीतरी चर्चेशी सुसंगत टाकाव्यात ईतकीच अपेक्षा..).
ईथे (मा.बो. वरील ईतर बा.फ. वरही) कुणीही लिहून काही फरक पडला असता तर? फारच भयावह विचार आहे! Happy

ज्याना खेळात रस आहे, ते असे आडाखे बांधणारच; कारण त्यातही "जे झाले" त्यावर आधारित एक बौद्धीक कसरत असते व ती खेळाच्या आनंदाचा अविभाज्य भाग असते.>>बरोबर. जे झाले त्यावर बोलू शकतो पण उद्या अमक्याने तेवहढ्या धावा काढून मग एव्हढे बळी घेतले तर आपण मॅच जिंकू अशा टाईप्सच्या पोस्टमधे कसली हो बौद्धिक कसरत ? आज ओझाने समरवीराला कशी बॉलिंग केली, त्याने कसे हँडल केले नि सेहवागने SL च्या wide outside off strategy ला कसे हाताळले ह्याबद्दल बोलण्यामधे अधिक आनंद आहे.

मॅच गणिक सेहवाग त्याची strategy ज्या तर्‍हेने बदलतोय ते बघायला मजा येतेय. सेहवागला बोअर करून impatience मधे त्याला उचलायचा हा डावपेच त्याच्या सारख्या street smart खेळाडूसमोर किती दिवस चालेल ? आज संगा bad light साठी फारच उत्सुक दिसला. सेहवागला नव्वदीमधे ठेवायचा हा भाग असावा का ?

ऊद्या ऊपाहारापर्यंत विरू अन साहेब खेळले तर ३० षटकात अजून १५०+ धावा, एकूण ३३०
चहापानापर्यंत मग आपली धावसंख्या ४५०+ होवू शकते.
धोनी अन रैना तोपर्यंत शिल्लक असले तर ऊद्या दिवसाखेर १५०+ ची आघाडी घेता येईल.
चौथ्या दिवशी सकाळी ऊपाहारापर्यंत पुन्हा ३५०+ पर्यंत आघाडी वाढवून (अर्थातच आक्रमक खेळ करून)
लंकेला खेळायला दिले तर भारताच्या जिंकण्याची शक्यता अधिक आहे. पुढील दोन दिवसात खेळपट्टी चांगलीच वळेल, करामत दाखवेल यात शंका नाही. अगदी २००+ ची आघाडी मिळाली तरी हा सामना आपण जिंकू शकतो.
>>एव्हढे लागते का लिहायला relevant ? तीन दिवसांमधे लंकेचे दहा गडी बाद करून त्यानी काढलेले surplus रन्स काढले कि आपण सामना जिंकू शकतो. Is that relevant enough योग ?

साहेब पहिल्याच ओव्हर मधे आउट झाले आहेत. सेहवाग ही शतक मारून तंबूत. लक्ष्मण आणि रैना किती लढतात ते बघू. एकंदरीत मॅच वाचवण अवघड दिसते.

शेवटी देवाचे पाय मातीचे. काल दिवसभर ईतके ऊत्कृष्ट खेळून आज सचिन अन सेहवाग दोघांनीही चक्क विकेट फेकल्या. खेळपट्टी काही अगदीच खेळता न येण्याएव्हडी वाईट नाहीये, किंबहुना playing to the merit of the ball seems to be working, as always!
लक्षमण कमबॅक करणार काय? रैना पुन्हा चमकणार काय?
एकंदरीत लंकेची धावसंख्या गाठून आता आघाडी घेणे थोडे अवघड दिसते आहे पण अशक्य नाही.
असो.

लक्ष्मण आणि रैना अजून तरी टिकून आहेत.. मॅच मधली पहिली शतकी भागदारी पण झाली त्यांची... असेच खेळत राहू दे. आणि रैनाची आणि लक्ष्मणची शतके होऊ दे रे महाराजा...

गेला लक्ष्मण.... आधी वाचला होता.. आता गेला. तसाच.... आता धोणी महाशय काय करतात ते बघायचे.. उजव्या हाताच्या मधल्या बोटाला लागलय आधीच...

महाराजा काही नाही करू शकत.
खेळपट्टीत आता भूत संचारलय.. मोडतीये, धुरळतीये, वळतीये.
रैना बाद व्हायच्या आधी एक चेंडू चार हात वळला.
रैना बाद झालेला चेंडू अचानक जोरात ऊसळून आला.
लक्षमण मात्र पठ्ठ्ञा ईतका अनुभव असून पुन्हा मेंडीस ला मागे खेळला तेही विठोबागत दोन्ही पाय जागेवर रोवून! काय म्हणावे?
रैनाच्या फलंदाजीतून ईतर सर्वांन्ना बरेच काही शिकण्यासारखे आहे.

आता मिथून फलंदाजी करू शकतो हा बोनस आहे अन्यथा ३७५ च्या आत आपला डाव संपू शकतो. धोनी कडून या खेळपट्टीवर विशेष अपेक्षा नाहीत. हातात बॅट असून नुसताच पाय पुढे करत बसला तर लवकरच परतेल तंबूत.

चिवटपणे झुंज देवून दिवसाखेर्पर्यंत ऊभे राहिले तरी ५०+ ची आघाडी मिळेल? या खेळपट्टीवर ती आघाडी देखिल खूप आहे.
**************************************************
सचिन, सेहवाग अक्षम्य गुन्हा केलायत, नको त्या वेळी. Sad

.

करेक्ट! तेच तर मी म्हणत होतो की मोठ्या खेळाडूंनी आयत्या वेळी वाट लावली... अन्यथा आज दिवसभर सहज खेळून आघाडी घेता आली असती. असो. पुढील दोन दिवस भन्नाट क्रिकेट पहायला मिळेल अशी आशा करूया.

अजून दोन विकेटा बाकी आणि ८ धावांचा लीड.... किमान आजचा दिवस तरी पूर्ण खेळला पाहिजे... मग मज्जा येईल...

शेवटी ४३६ सर्व बाद,
मिश्रा अन मिथून ला सलाम, त्यांन्नी लाज राखली.
आजच्या खेळाचा रिपोर्ट्/विश्लेषण लिहायला आव्डेल, नव्हेन लिहीनच कारण अनेक गमतीशीर अन अनाकलनीय गोष्टी घडल्या.. thats why game of cricket is so interesting, i would say indians "made it" interesting. Happy
आता साधारण १०+ षटके गोलंदाजी आपली होईल.. एक दोन गडी बाद झाले तर मजा येईल. धोणी काय डावपेच करतो ते पहायचे.

बॅटिंग में क्या है जी... सेहवाग पॉवरSSSS
बॉलिंग मे क्या है जी... सेहवाग ऑफस्पिनSSSS
क्रिकेट में क्या है जी... अजब सी हलचलSSSS चल...

इंद्रा,
आवडलं...

मी आधिही म्हटलं होतं की आजच्या घडीला आपला बेस्ट ऑफ स्पिनर विरू आहे. Happy

आता आजच्या खेळाविषयी. क्रिकेट हा गमतीशीर गेम आहे असं म्हटलं जातं. ते २००% खरे आहे. आजचा खेळ बघता ऊद्या अजून काय गमती जमती बघायला मिळतील हे सांगता येत नाही. पण काही गोष्टी गमतीशीर किंव्वा अनकलनीय वाटल्या. आपल्या डावात ज्या प्रकारे फलंदाज बाद झाले ते पहाता लक्षात येईल की रैना ची विकेट वगळता बाकी सर्व विकेट या अतीसामान्य चेंडूवर गेल्या.
विजयः बॉडी वेट नेमके चेंडूवर बरोबर ट्रानसफर न करता आल्याने चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला.
सचिनः सकाळी चेंडू ओवर्कास्ट कंडीशन्स मूळे थोडा मूव्ह होत होता हे खरं असलं तरी मलिंगा च्या आठव्या यष्टिवरच्या त्या चेंडूला सचिन बाद झाला कारण त्यावेळी त्याचा विठोबा झाला होत- दोन्ही पाय जागी घट्ट रोवले होते परिणामी फक्त बॅटचा हलका वारा/कड लागून यष्टीपाठी झेल गेला.
सेहवागः सेहवाग ज्या चेंडूवर बाद झाला त्यावर तो एरवी चौकार्/षटकार मारतोच. मुद्दा तो नाही, त्यावेळी ऊगाच असा आत्मघात करायची गरज नव्हती कारण शॉट चुकलाच तर मुद्दाम लाँग ऑफ ला क्षेत्ररक्षक ऊभा होताच. मान्य आहे गड हाती आला नव्हता, पण आत्मघात करायला बाकी बुरूज ढासळले नव्हते. असो विरू चं सर्वच अजब असतं Happy
द्रविडः खरं तर द्रविड पायचित-बाद झालेला चेंडू अगदी अ‍ॅव्हरेज कॅटॅगरीतला होता पण कुठेतरी माशी शिंकलीच.
लक्षमणः पुन्हा एकदा विठोबा झाल्याने यष्टीमागे हातात झेल दिला.
रैना: अचानक ऊसळून थोडा थांबून पण वेगात आलेल्या चेंडूने घात केला.- पण ही करामत खेळपट्टीची होती.
धोणी: काय बोलायचं? हनीमून इफ्केट Happy
ईशांतः लाटला त्याला.
मिश्रा अन मिथून निव्वळ सकारात्मक खेळताना बाद झाले. चेंडू विकेट घेणारा नव्हता.

थोडक्यात, एक दोन अपवाद वगळता बाकी सर्व विकेट आपण "बहाल केल्या" असे म्हणता येईल. मिश्रा मिथून ने बाजी/तानाजी ची भूमिका बजावली नसती तर लंकेने निश्चीतच खींडीत आपला गेम केला होता. मी आधीही लिहीले होते की या खेळपट्टीवर अगदी ५०+ ची आघाडी देखिल मोलाची ठरू शकते.
लंका दुसर्‍या डावात ४५/२ आहे-यावरून त्याला दुजोरा मिळतो.

आता स्टेटींग द ऑबव्हियसः ऊद्या पहिल्या सत्रातील त्यातही पहिल्या एक तासाचा खेळ अत्यंत निर्णायक ठरू शकतो. सकाळी हवामान ढगाळ असेल तर चेंडू पुन्हा चांगला मूव्ह होईल, शिवाय खेळपट्टीत थोडासा ओलावा असल्याने फिरकीलाही धार असते. पण त्या एका तासानंतर तीच खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल ठरते. (आज सचिन सेहवाग बाद झाल्यावर नंतर साधारण अर्धा तास रैना अन लक्षमण ने खेळून काढल्यावर अचानक खेळपट्टी पुन्हा निर्धोक झाली होती.) गम्मत म्हणजे हा काळ - म्हणजे सकाळच्या १५ षटकांनंतर ते दुपारच्या साधारण ५० व्या षटकापर्यंत खेळपट्टीत विशेष धोका नसतो, ती कोरडी होत जाते.
पण पुन्हा ५० व्या षटकानंतर (ऊपाहार ते चहापान चा काळ) चेंडू जुना होत जातो तसे पुन्हा अचानक उसळणे, चेंडू अतीशय वळणे, खेळपट्टीवरील खराब स्पॉट्स या सर्व गोष्टि चालू होतात. हाच तो काळ ज्यात आपण लक्षमण, रैना, अन धोणी गमावले.
जर ऊद्या सकाळी संगा अन महेला यांच्या विकेट मिळाल्या तर सामना बराचसा आपल्या बाजूने झुकेल. पण संगा अन माहेला टिकले तर नेमके ऊलटे चित्र पहायला मिळेल. मग लंका आरामात दिवसाखेर ३५०+ पर्यंत धावा करून पुन्हा पाचव्या दिवशी आपल्याला खेळायला देईल. या खेळपट्टीवर चौथ्या डावात २५० करणे सुध्धा कठीण आहे- ईती विरू. (या खेळपट्टीवरील चौथ्या डावात सर्वोच्च धावसंख्या २००+ आहे).

तेव्हा ऊद्या सकाळी निकराचा आक्रमक हल्ला करून दबाव निर्माण करून गडी बाद करणे हे आपल्याला करायचे आहे. तर लंकेला खेळून काढायचे आहे. अर्थातच advantage India the way I see it.

विरू ला पाच विकेट मिळाल्या तर आश्चर्य वाटायला नको- कारण त्याच्या गोलंदाजी शैलीला ही खेळपट्टी पोषक आहे. पण ओझा वर मुख्ख्य ओझे असेल. मिश्रा ने थोडा सखोल विचार करून गोलंदाजी केली तर तोही यशस्वी होवू शकतो. सचिन ने गोलंदाजी करायला हरकत नाही, त्याचे ऑफ ब्रेक्स या खेळपट्टीवर फलंदाजासाठी डोकेदुखी ठरू शकतात. या सामन्यानंतर त्याच्या खांद्याला विश्रांतीच आहे. Happy

संगा, माहेला च्या फलंदाजीतील कमकुवत दुवा (माहेला- ऊसळता चेंडू, संगा- सेहवागप्रमाणे मोठे फटके खेळायची सवय Happy ) हेरून त्या अनुशंगाने सापळा रचला तर ऊद्या गड आपला आहे. सचिन, द्रविड, सेहवाग, लक्षमण कं. त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावतील यात शंका नाही. तसे झाल्यास सचिन अन सेहवाग ने केलेल्या गुन्ह्याला (मोक्याच्या वेळी विकेट फेकणे) अन द्रविड च्या बॅड पॅच ला सर्व माफ! Happy
*****************************************************
क्रिकेट मधिळ सर्व शक्य, अशक्यता, भाकीते, किंवा अगदी सुसंगत तर्कानुसार केलेले भाष्य हे देखिल खोटे ठरू शकते. तर काही वेळा अगदी अनाकलनीय रीत्या एखादा विजय वा पराभव अनुभवास येतो, ओढवून घेतला जातो. पण म्हणून जसे खेळाडू खेळायचे थांबत नाहीत तसेच आपण लिहायचे ही थांबू शकत नाही. "जे घडले" निव्वळ त्यावरच चर्चा करणे कधी सयुक्तीक वाटते तर "काय घडू शकते" यावरही चर्चा करणे सयुक्तीक किंव्वा फार रोचक वाटते. कारण game is not over until the last ball is bowled or the last man is out....... यातच सर्व काही आलं.
जेव्हा "काय घडू शकते" कींव्वा "नेमके काय करता येईल" यावर केलेले भाष्य (ज्यात बर्‍याच वस्तूस्थिती, तर्क, अनुभव याचा आधार घेतला गेलेला असतो) हे बर्‍याच अंशी खरे ठरते तेव्हा भाष्य करणार्‍याला मिळणारे वैयतीक समाधान खचितच खुद्द खेळाईतकेच रंजक अन रोचक असते असे मला वाटते. मी यातलाच आहे- कारण घडून गेलेले आपण बदलू शकत नाही- कितीही चर्चा केली तरिही पण काय घडू शकते या शक्य्-अशक्यतेतला गूढपणा, अदभूत, मला जास्त आकर्षित करते.
पसंद अपनी अपनी. Happy

योग.. एकदम जबरी पोस्ट....

तुझ्या म्हणण्याप्रमाणे उद्याचा पहिला १ तास फारच महत्त्वाचा ठरेल आणि तेव्हा जर नीट बॉलिंग झाली तर देवा महाराजा काय सांगता... कल्ला होणार.. पण शेवटी cricket is a game of Uncertainty.... तेव्हा काय होईल ते उद्याच बघावे...

सकाळीं मिथुन व शर्मा परिणामकारक होताहेत असं वाटलं तरच जलदगती गोलंदाजी थोडा वेळ ठेवावी; खेळपट्टीची हालत पहाता, ह्या सामन्याचा निर्णय आता निश्चितपणे दोनही संघांच्या फिरकी गोलंदाजांच्या व "क्लोज-इन" क्षेत्ररक्षकांच्या हातात आहे, असं वाटतंय. योगजीनी सुचवल्याप्रमणे सचिनलाही अधून-मधून गोलंदाजी देणं [व त्याने ती घेणं ] खूप महत्वाचं ठरूं शकतं. भारतासाठी खरी कसोटी आहे ती धोनीचीही ; तो सहकार्‍यांत किती जिगर चेतवतो याला खूपच महत्व आहे. निदान आज तरी मला धोनी खास प्रेरणादायी वाटला नाही.
<<कितीही चर्चा केली तरिही पण काय घडू शकते या शक्य्-अशक्यतेतला गूढपणा, अदभूत, मला जास्त आकर्षित करते.>> योगजी, हे स्वाभाविक आहे कारण क्रिकेट हा फक्त शारिरीक नव्हे तर मानसिक खेळ पण आहे व त्यात डावपेचाना प्रचंड वाव आहे.

Pages