क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता मला म्हणायला हरकत नाही. आपली टीम माझ्यामुळे जिंकली. स्तॅचू. एका पोझिशन मधे.

पण व्हेरी व्हेरी स्पेशल सिल्की लक्ष्मण. ग्रेट टच. क्लास अपार्ट. हॅटस ऑफ. (मराठीत क्रिकेटर ला चांगल म्हणल की बाळ पंडित झाल्यासारख वाटत.

कृपया युवराज व द्रविड यांची टेस्ट मध्ये तुलना करण्याच पाप करू नये. युवराजांची टेस्ट खेळण्याची लायकी नाही. पार्‍ट्या करायला हरकत नाही. पण सुटलेले पोट घेउन ग्राउंड वर येउ नये.

>>वरती कोणीतरी लिहील्याप्रमाणे द्रविड चा प्रॉब्लेम मानसिक वाटतो.
अरे ते मी म्हटलं होतं ज्या प्रकारे द्रविड बाद होतोय त्या संदर्भात..

>>द्रविडला या संघात उपरेपणाच्या भावनेनं पछाडल्यासारखं मला कां वाटतं ?
मलाही तेच वाटतय विशेषतः या मालिकेत. द्रविड च्या बॉडी लँगवेज वरून तो स्वताची "संघातील" आयडेंटीटी हरवल्यासारखा वाटतो.

>>युवराजने द्रविड ला "बसवण्या" एवढे काहीही केलेले नाही.
फारेंडा,
अरे मला तसं नव्हतं म्हणायचं. द्रविड चा सद्द्य फॉर्म बघता अन एकंदरीत संघाची गरज बघता, शिवाय भविष्याच्या दृष्टीकोनातून विचार करायचा तर युवराज संधी द्यायला योग्य वाटतो. रैना प्रमाणेच तो ही अनेक वर्षे एकदीवसीय संघातील महत्वाचा खेळाडू आहे. सर्व प्रकारच्या संघांविरुध्ध खेळला आहे (एकदिवसीय तरी), आणि मुख्ख्य म्हणजे सद्य्द्य कसोटी संघातील सर्व खेळाडूंशी त्याचे संबंध चांगले आहेत. त्याने शिस्त, तंत्र, सराव यावर भर दिला तर निश्चीतच तो एक चांगला कसोटी खेळाडू ठरू शकेल.
कसोटी मध्ये पूर्वी अपेक्षित तीन क्र. च्या खेळाडूचे परिमाण आता बदलले आहे. "३" क्र. वर खेळायला येणारा खेळाडू आता सामन्याच्या कुठल्या परिस्थितीत खेळायला येतो याला जास्त महत्व आहे. किंबहुना बरेच वेळा १००+/१ अशा वेळी द्रविड येतो तेव्हा त्याला सेट व्हायला वेळ लागत असल्याने अन एकंदर त्याच्या बचावात्मक अ‍ॅप्रोच मूळे संघाच्या धावांच्या वेगावर पवाईट परिणाम होतो. याची अनेक ऊदाहरणे गेल्या वर्षातील कसोटी सामन्यातून मी दाखवून देतो (वेळ मिळाल्यावर). आज कसोटी क्रिकेट मधिल हार्-जीत धावांच्या वेगावर खूप अवलंबून झाली आहे हे दुर्लक्षून चालणार नाही. अशा वेळी द्रविड च्या जागी रैना सुध्दा फलंदाजीला येवू शकतो (त्याच्याकडे तंत्र, मानसिकता आहे). शिवाय युवी डावखुरा फलंदाज अन गोलंदाज आहे जे फायद्याचे ठरू शकते.
लंकेविरुध्ध्द गेल्या दोन सामन्यात फक्त द्रविड वेगाने धावा करताना दिसला.. पण तो त्याचा नैसर्गिक खेळ नाही. मला वाटतं, नेमकी आपली भूमिका काय (वेगाने, सकारात्मक धावा करायच्या की बचावात्मक खेळून एक बाजू लावून धरायची) या गोंधळात द्रविड पडलेला दिसतो.
असो. ऑसी विरुध्ध माझा कसोटीसाठी संघ असा असेल:
गंभीर (१)
विरू (२)
रैना (३)
सचिन (४)
लक्षमण (५)
युवी*
धोणी*
भज्जी (८)
झहीर (९)
ईशांत (१०)
श्रीशांत (११)
*: परिस्थितीनुसार फलंदाजी चा क्रम ठरवावा.
खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल तर झहीर च्या जागी फिरकी गोलंदाज घ्यावा. पुन्हा एकदा श्रीशांत अन झहीर मध्ये वेग, आक्रमकता, भविष्याच्या दृष्टीकोनातून श्री ला मी पसंती देईन.
*****************************************************असाम्या,
रायडू एकदिवसीय मटेरीयल आहे. पुजारा बद्दल मला विशेष माहित नाही. पण ऑसी वि. नवख्याला घेण्याचा धोका पत्करतील असे वाटत नाही.
*****************************************************
फिरकी मध्ये ओझा हा एकच पर्याय दिसतो- आवडो वा न आवडो.
*****************************************************
नोव्ह्/डिसेंबरमधिल अ‍ॅशेस च्या आधी येत्या ऑक्टॉबर मध्ये भारतात जावून पाटा खेळपट्ट्यांवर कसोटी सामन्यात दमणुक करून घ्यायची नाहीये असे काहीसे वक्तव्य पाँटींग ने केले आहे. यावर ऊत्तर म्हणून किमान आपले लोक वेगवान तसेच फिरकी ला साथ देणार्‍या खेळपट्ट्या कसोटी मालिकेसाठी वापरतील अशी आशा करुया. पहिली कसोटी मोहालीत- वेगवान खेळपट्टी. दुसरी बँगलोर- फिरकी.

पिटर रिबक चा या आगामी मालिएकबद्दलचा हा लेख पुरेसा बोलका आहे:
http://www.cricinfo.com/magazine/content/story/469272.html

Yet India has not unearthed a middle-order batsman of substance under 30 years of age. Perhaps they have not tried hard enough, perhaps they have kept faith too long with players able to shine in the shadows. But the day of reckoning is not far off.

Not that the batting is the weakness. India's bowling has become lacklustre. Ishant Sharma has fallen back, but at least he is fit. Neither spinner took a wicket in Murali's farewell Test in Galle. Hardly the stuff of champions. Even so, the selectors keep choosing four bowlers. Unable to find a genuine allrounder - Irfan Pathan was the obvious candidate - they keep bolstering the batting. Presumably they are relying on scoreboard pressure to bring 20 wickets. Winning the toss would also help.

India's problem is clear. The system is discovering a lot of talented boys. The IPL has helped to liberate the villages. But discovery is only part of the challenge. Development is just as important. And that is not yet working satisfactorily.

*असाम्या, रायडू एकदिवसीय मटेरीयल आहे. पुजारा बद्दल मला विशेष माहित नाही >>अरे नाही रे, रायडू ICC stint च्या अगोदर Next Big thing म्हणून ओळखला जायचा Under 17 मधे खेळल्यापासून. मधे एक वर्ष रणजी मधे रखडला आणि त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले आणि ..... You know what happens then ... Anyways, he had good solid technique and ability to adopt the game. आसे मी नाही तेंडल्या म्हणतो.

पुजाराबद्दल पण खूप चांगले ऐकले आहे Test player म्हणून. पांडे, कोहली etc वर माझा फारसा विष्वास नाही Test material म्हणून. at least not until they start playing Ranji or domestic seasons. नुसते IPL हि yardstick उपयोगाची नाहि.

>>Anyways, he had good solid technique and ability to adopt the game. आसे मी नाही तेंडल्या म्हणतो
बरोबर आहे.. पण ते विधान एकदिवसीय सामन्या च्या संदर्भात त्याने केले होते अन त्यानंतर रायडू एकदिवसीय मध्ये खेळला.

असो. I have a strong feeling that if Dravid gets selected to play against Aussi Test seires in October at home, then he might just announce his retirement from Test Cricket at the end of the series. Eevryone wants to end on high note so this might be his chance like Kumble, Ganguly.

रायडू हा नवीन खेळाडूंमधे सर्वात तंत्रशुद्ध मानला जातो. आयसीएल्मुळे अंधारात गेला आणि आयपील३ मुळे उजळला.
"""पुन्हा एकदा श्रीशांत अन झहीर मध्ये वेग, आक्रमकता, भविष्याच्या दृष्टीकोनातून श्री ला मी पसंती """" झहीरपेक्षा श्रीसंतला पसंती? डोक्याने केलेल्या गोलंदाजीचे काय? श्रीसंतचे डोके भडकवायला ऑसीजना किती वेळ लागेल? भारतीय गोलंदाज मॅच्युअर उशिरा होतात, तेव्हा झहीर हाच भविष्यातला मुख्य गोलंदाज.
इशांतला एकदिवसीय सामन्यात न खेळवून त्याचा वेग कायम ठेवण्यावर जोर द्यायला
हवा.

बरोबर आहे.. पण ते विधान एकदिवसीय सामन्या च्या संदर्भात त्याने केले होते अन त्यानंतर रायडू एकदिवसीय मध्ये खेळला.>> अरे हे IPL सुरू असताना म्हणालेला सचिन. त्यानंतर रायडू one day खेळलेला नाहिये. (For that matter अजून भारतासाठी खेळलेला नाहिये). त्याच्यावर वर्षभर International cricket खेळण्याबद्दल ban आहे ICL participation बद्दल.

मयेकर फक्त ICL नाहि तर त्याधी काही administrative problems झाले होते त्यामूळे वैतागून तो ICL मधे गेला होता.

रायडू बाबत असाम्याला अनुमोदन. तो एक चांगला खेळाडू आहे, त्याचाकडे आक्रमक देहबोली नाही पण त्याची बॅट नक्कीच तळपेल हे मलाही वाटते. IPL मध्येही त्याचे शॉट पाहा, ते उधळलेल्या घोड्यासारख्ये मारलेले नव्हते, तर त्यात एक नजाकत होती, ती नजाकत टेस्ट खेळाडू कडे हवी. युवराज पेक्षा रायडू टेस्ट मध्ये जास्त चांगला ठरेल हे त्यामुळेच वाटते.

भारताने रायडूला संधी द्यावी. त्याला देणार नसतील तर दिनेश कार्तिकचा स्पॉट चेंज करुन मिडल ऑर्डर साठी विचार करावा.

मधली फ्ळी घडवने अत्यंत आवश्यक आहे, आता लक्ष्मण, द्रविड काही वर्षात जातील तेंव्हा काय?

<< ऑसी विरुध्ध माझा कसोटीसाठी संघ असा असेल:>>योगजी, भविष्याचाच विचार करायचाच झाला, तर मुरली विजय हा काही अनुभवानंतर एक चांगला ओपनींग फलंदाज होईल असं मला राहून राहून वाटतं. त्याच्यावर आताच काट मारणं योग्य नसावं. तो बराचसा तंत्रशुद्ध खेळतो व त्याला "टेंपरॅमेंट"ही बर्‍यापैकी असावं असं वाटतं. गंभीर व सेहवाग दोघेही मुख्यतः आक्रमक खेळाडू आहेत व म्हणूनच सेहवाग व मुरली ही आदर्श ओपनींग जोडी होईल, असा माझा होरा आहे. गभीर क्र. ३ व युवीऐवजी रैना क्र.६, असा बदल मला सुचवासा वाटतो. [अर्थात, निदान ऑसीज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत तरी रैना ऐवजी द्रविडला खेळवून पहाणं शहाणपणाचं ठरेल, असंही मला वाटतच ]

योग, धन्यवाद.
मी सुनील गावास्करला, प्रत्यक्ष, टेपवर, सिडीवर कुठेहि खेळताना बघितले नाही. थोडेफार वाडेकर, पतौडी यांना खेळताना बघितले. वाडेकरनंतर माझा क्रिकेटचा संबंध सुटला.

१९८३ का १९८५ मधे आमच्या गावात भारताचा एक संघ आला होता. बारा वाजता सामना सुरु होणार होता. बारा वाजता फक्त सुनील गावास्कर, व्हील चेअर मधे बसून, फ्रॅक्चर झालेला पाय लांबवून बसला होता. नमस्कार, चमत्कार, सही घेणे इ. सोपस्कार पार पडल्यावर विचारले बाकीचे कुठे आहेत? तो म्हणाला, काल रात्री बीअर ढोसून मेल्यासारखे पडले आहेत, बारा ला उठतील नि मग येतील सावकाशीने! मग एक टकल्या विकेटकीपर, विश्वनाथ, शास्त्री व कपिलदेव दिसले.
आणखीन एक दोन मराठी लोक पण होते, वाटते. त्यांचा खेळ बघता एकदम निराशा झाली. भारताच्या संघात सात टेस्ट खेळाडू होते व बाकीचे इथले. दुसर्‍या बाजूला सगळे इथले. इथला संघ जिंकला!

त्यानंतर गेल्या एक दोन वर्षात जरा परत क्रिकेटबद्दल बघायला मिळते. गांगुलीला पाहिले खेळताना, नि बाकीचे सगळे यू ट्यूबवर.

योग जी पहिल , द्रविड स्वतः रिटायर होइ पर्यंत त्याला कोणी काढू नये टेस्ट टीम मधून. प्लिज. (आणि त्याच्या ऐवजी युवराज, काही तरीच काय. राम राम राम राम).

भाउ साहेब फक्त मुरली ऐवजी गंभीर म्हणा. रैना माझ्यामते फॅब फोर नंतर भारताला मिळालेला एक उत्क्रुष्ट फलंदाज आहे. रोहीत आहे पण त्याने युवीच्या मार्गाने जायला नको.

दुसर, मायबोलीवर क्रिकेट प्रमाणेच खूप बॉल सोडायचेच असतात. . (हे मी क्रिकेट प्रमाणेच विकेट घालवूनच शिकलोय)/ लाँग हॉफ आणि फुल टॉस मिळताचच. अगदी कसलेल्या मुरली कडून सुद्धा.:(हा कोण?)):)

रायडू प्रतिसचिन होता अस त्याच्या लहानपणी ऐकले होते. नंतर मागे पडलाय. पण आपल्याला लागेल वर्ल्ड कप नंतर. Sad

मग एक टकल्या विकेटकीपर, >> १९८५ म्हणजे सदानंद विश्वनाथ असेल. अप्रतिम किपर होता. वाया गेला Sad

रायडू प्रतिसचिन होता अस त्याच्या लहानपणी ऐकले होते>>अगदी तसेच नाही पण सचिनसारखेच त्याच्याकडे एक shot जास्ती असतो आणि वेळही अधिक. pitch प्रमाणे adopt सहज करतो. IPL च्या matches मधे तो (नि अर्थात सचिन) इतरांपेक्षा वेगळ्या pitches वर खेळत होते असे किती वेळा वाटले. त्याला पुरेशी संधी (जशी विजयला मिळतेय) तशी मिळाली तर एक चांगला reliable middle order batsman नक्की मिळेल.

<सदानंद विश्वनाथ>
हा कोण? एक विश्वनाथ फलंदाज म्हणून प्रसिद्ध होता, शिवाय तो गावास्करचा नातेवाइक पण झाला. त्याने सुनिलच्या बहिणीशी का सुनिलने त्याच्या बहिणीशी लग्न केले म्हणे. तसे सुनील पण आमच्या सासरेबुवांच्या ओळखीचा होता म्हणे. असावा. कारण ते आले होते क्रिकेट पहायला, नि त्यांना पाहून तेंव्हा सुनीलने उठून नमस्कार करायचा प्रयत्न केला नि नंतर ते काहीतरी बोलले पण, हे कसे ते कसे वगैरे. म्हणून तर त्यांनी माझी त्याच्याशी ओळाख करून दिली, नि मला सही मिळाली त्याची, नाहीतर गर्दी केव्हढी होती.

ते सगळे असो!

आता पुढचे सामने केंव्हा नि कुणाशी?

एक विश्वनाथ फलंदाज म्हणून प्रसिद्ध होता, शिवाय तो गावास्करचा नातेवाइक पण झाला. त्याने सुनिलच्या बहिणीशी का सुनिलने त्याच्या बहिणीशी लग्न केले म्हणे.>> तो गुड्डांप्पा

<<फक्त मुरली ऐवजी गंभीर म्हणा>>विक्रमजी, गंभीर, रैनाबद्दल दुमत नाही व मी स्वतःच इथेच तसं म्हटलंय. आता ऑसीज विरुद्ध रैना ऐवजी मुरलीचं नाव सुचवताना मलाही अवघडल्यासारखं झालं होतं. पण सेहवाग, गंभीर, रैना, युवी इ. सर्वच मंडळी आक्रमक फलंदाजी करणारी आहे व सचिन, लक्ष्मण, द्रविड कसोटी संघात नसतील तेंव्हा मुरलीसारखा एखादा फलंदाज संघात असणं अत्यावश्यकच ठरेल. शिवाय, असा एक फलंदाज संघात असला तर सेहवाग,गंभीर, रैना व युवी इ.चा खेळही अधिक मोकळेपणाने होईल. म्हणून, आता पासूनच [ बुजुर्ग मंडळी संघात असेपर्यंत] मुरलीला अनुभवाचे डोस पाजत रहाणं दूरदॄष्टीचं होईल, असं आपलं मला वाटलं. अर्थात, दुसरा कुणी त्या पोझीशनला खेळणारा चांगला नवोदित फलंदाज सध्या दिसत नाही म्हणून !

विश्वनाथने सुनीलच्या बहिणीशी लग्न केले.
सदानंद विश्वनाथ टकलू होता का? किरमाणी पूर्ण गोटा होता. शेवटची कसोटी १९८६ मधे खेळला.

>>> <सदानंद विश्वनाथ> हा कोण?

सदानंद विश्वनाथ १९८५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या बेन्सन अ‍ॅण्ड हेजेस स्पर्धेत भारताचा यष्टीरक्षक होता. त्याने यष्टिरक्षक म्हणून खूपच चांगली कामगिरी केली होती. तो अतिशय आक्रमक यष्टीरक्षक होता. सारखे अपील करून तो फलंदाजांवर दडपण आणत असे. पाकिस्तानविरूद्धच्या एका सामन्यात त्याच्या अपिलामुळे वैतागलेल्या जावेद मियांदादची व त्याची बाचाबाची झाली होती. जावेदने त्याला बेडूक उड्या मारुन खिजविले होते. "चिल्लाओ मत. आदमी खेल रहे है, जानवर नही" असे काहितरी जावेद त्याला म्हणाला होता. गावसकरने त्याच्या "वन डे वंडर्स" या पुस्तकात याचा उल्लेख केलेला आहे.

हा गुणी खेळाडू नंतर मागे पडला. १९८७ मध्ये भारतात पाकिस्तानविरूद्ध झालेल्या १-२ एक दिवसीय सामन्यात त्याला पुन्हा संधी दिली होती. त्यानंतर तो कायमचाच बाहेर गेला.

तो अतिशय आक्रमक यष्टीरक्षक होता. सारखे अपील करून तो फलंदाजांवर दडपण आणत असे. पाकिस्तानविरूद्धच्या एका सामन्यात त्याच्या अपिलामुळे वैतागलेल्या जावेद मियांदादची व त्याची बाचाबाची झाली होती. जावेदने त्याला बेडूक उड्या मारुन खिजविले होते. "चिल्लाओ मत. आदमी खेल रहे है, जानवर नही" असे काहितरी जावेद त्याला म्हणाला होता. गावसकरने त्याच्या "वन डे वंडर्स" या पुस्तकात याचा उल्लेख केलेला आहे

तो किरण मोरे ना? इथे पहा:
http://www.youtube.com/watch?v=JBv5DNxCoBc

माझ्या मते चेतेश्वर पुजाराला टेस्टमधे संधी द्यायला हवी, मोठ्या इनींग्स खेळायचे टेंपरामेंट त्याच्याकडे आहे. पण ऑसीज येणार म्हणून आपले लोक नव्या लोकांना घेणार नाहीत, अशाने सचिन-लक्ष्मण-राहुल यांच्या रिप्लेसमेंट मिळणार कशा?

मुरली येईलच कसोटी संघात कायमचा.. पण रैना अन युवी पेक्षा त्याचं तंत्र थोडं कमी पडतय. हो युवी चं तंत्र निश्चीतच चांगलं आहे. त्याला सध्ध्या चूकीचा कानमंत्र दिला जातोय एव्हडच.
द्रविड ला निव्रुत्त करायच्या मागे मी पडलो नाहीये. तो एक महान फलंदाज, खेळाडू आहे. पण अगदी महान खेळाडूलाही वय, क्षमता, ई. गोष्टी चुकत नाहीत- सचिन अपवाद!
द्रविड ची निवृत्ती ची वेळ जवळ झाली आहे असं मला वाटतं. गेल्या दोन वर्षाचा त्याचा कसोटी चा रेकॉर्ड पहा:
भारताचा लंका दौरा: जुलै/ऑगस्ट २००८ (मेंडीस "मिस्टरी गोलंदाज" होता तेव्हा) :
१४, १० (१)
२, ४४ (२)
१०, ६८ (३)
ऑसी भारतात मालिका ऑक्टोबर २००८:
५१, ५ (१)
३९, - (२)[धोणी , गंगुली द्रविड च्या आधी फलंदाजीला आलेले]
११, ११ (३)
०, ३ (४)
ईग्लंड चा भारत दौरा : डिसेंबर २००८:
३, ४ (१)
१३६, ० (२)
भारताचा न्यूझिंड दौरा: मार्च्/एप्रिल २००९:
६६, ८ (१)
८३, ६२ (२)
३५, ६० (३)
लंकेचा भारत दौरा: नोव्ह. २००९:
१७७, ३८ (१)
१४४, - (२)
७४, - (३)
भारताचा बांगलादेश दौरा: जानेवारी २०१०:
४, २४ (१)
१११, - (२)
भारत वि. लंका नुकतीच झालेली कसोटी मालिका: जुलै/ऑगस्ट २०१०:
१८, ४४ (१)
३, - (२)
२३, ७ (३)
*****************************************************
मी आधिही म्हटल्याप्रमाणे आज कसोटीमध्ये क्र. ३ च्या खेळाडूचं पारंपारीक स्थान्/परिमाण बदललं आहे.
रैना ला क्र. ३ वर खेळवावा- त्या दृष्टिकोनातून तयार करावा.
मुरली विजय अन युवी मधल्या फळीत खेळवावेत. विजय चं नविन चेंडू विरुध्धच तंत्र तितकसं सेफ वाटत नाही. दरम्यान रायडू ला संधी दिली गेली अन तो चमकला तर विजय च्या जागी त्याला घेता येईल.
गोलंदाजीतला आनंदी आनंद पुढील काही वर्षे कायम राहील असं दिसतय.. Sad

म्हणजे २००८ इंग्लंडच्या भारत दौर्‍यानंतर द्रविड फक्त ही आत्ताची सिरीज आऊट ऑफ फॉर्म गेलाय...
केवळ ३ सामन्यांच्या बॅडपॅचवर त्याला बाहेर घालवू नये...

वनडे च्या बाबतीत हेच केलं होतं...

इंग्लंडविरुद्ध शेवटच्या वनडे मधे ९६(६९)* करून नंतर कर्णधारपद सोडल्यावर ऑसी विरुद्ध फक्त ४ सामने तो फ्लॉप गेला होता तर पाचव्यात त्याला बाहेर बसवलं आणि पुढच्या सिरीजच्या वेळी टीममधूनच डच्चू दिला...
नंतर गेल्यावर्षी चँपियन्स ट्रॉफी मधे बर्‍यापैकी परफॉर्मन्स देऊनही ती सिरीज झाल्यावर परत बाहेरचा रस्ता दाखवला...

भाउ, रोहित शर्मा सुद्धा खूप गुणी आहे. पण सद्ध्या युवराज प्रमाणेच बाकी गुण उधळतोय. दोघांनाही कौन्सेलिंगची जरूर आहे.
नाहीतर कांबळी, सदानंद विश्वनाथ आणि शिवा जसे प्रचंड गुणवत्ता असून इतर गोष्टींमुळे वाया गेले तसे हेही जातील.

>>म्हणजे २००८ इंग्लंडच्या भारत दौर्‍यानंतर द्रविड फक्त ही आत्ताची सिरीज आऊट ऑफ फॉर्म गेलाय...
केवळ ३ सामन्यांच्या बॅडपॅचवर त्याला बाहेर घालवू नये...
तितकसं पटत नाही. कारण २००८, २०१० मधिल द्रविड ची कामगीरी सुमारच आहे ज्यात बांगलादेशचा दौरा ही आहे- जान २०१०. फक्त २००९ मध्ये त्याने धावा केल्या आहेत- जेव्हा ईतरही भारतीय खेळाडूंन्नी बदा बदा (विशेषतः गंभीर, सेहवाग, सचिन) धावा केल्या होत्या.
आजच्या घडीला भविष्याचा विचार करता द्रविड ला एखादी कसोटी मालिका बसवून युवी/रायडू/पुजारा पैकी कुणालाही संधी द्यायला हरकत नाही असं मला वाटतं. ऑसी वि. ती संधी आहे, आपली निवड समिती तेव्हडे धाडसी पाऊल ऊचलते का ते पहायचे. मी पुन्हा पुन्हा हेच म्हणेन की द्रविड निव्वळ फलंदाज आहे. "आज" अन "भविष्यात" आपल्याला कसोटी मध्ये गोलंदाजी करू शकणारा फलंदाज त्यातूनही डावखुरा असल्यास (पुजारा गोलंदाज आहे) फायद्याचे ठरेल. लक्षमण ने नेमकी मोक्याच्या वेळी शतक करून त्याचे महत्व पुन्हा सिध्ध केलय- तेव्हा ऑसी विरुध्ध त्याची निवड होईलच.

असो. शेवटी हे सर्व विश्लेषण अन तर्क कागदावर आहे. प्रत्त्यक्षात खेळात अनेक गमती जमती आहेतच. Happy

सदानंद विश्वनाथ टकलू होता का?>>हो तो टक्कल maintain करत असे. का ते माहित नाहि. मियांदादबद्दलचा तो प्रसंग त्याच्या बाबतीमधे घडला होता benson an hedges मधे. मियांदादने त्याच्या टकलावर हात फिरवला होता नि काहितरी बोलला होता. Despite of all his shenanigans he was game of keeper. पुढे मोरे आल्यावर त्याच्यावरचा फोकस पण कमी झाला.

मलाही विजय किंवा रैना किंवा युवराज ह्यातला No ३ candidate वाटत नाही. कोणिहि तेव्हढा तंत्रशुद्ध नाही. temperament मधे पहिले दोघे तिसर्‍यापेक्षा वरचढ आहेत. तिसर्‍याचे काहीच भरवशाचे नसते, माझ्या one -day, T20 list मधे हे नाव डोळे मिटून ठेवीन पण Test मधे I'm not yet convinced in spite of 2 centuries and handful of half centuries. Sad

<<मलाही विजय किंवा रैना किंवा युवराज ह्यातला No ३ candidate वाटत नाही>> मी दिलेल्या कारणांमुळे मला मुरली विजय "ओपनींग बॅटसमन " व गंभीर क्र. ३ असं सुचवायच होतं. एका वेगळ्या दृष्टीकोनातून संघ निवडीकडे पहाण्याचा प्रयत्न एव्हढंच.
<<विजय चं नविन चेंडू विरुध्धच तंत्र तितकसं सेफ वाटत नाही.>> योगजी, सुरवातीला तो ओपनींग बॅटसमन म्हणून बर्‍यापैकी तंत्रशुद्ध खेळला; पण मर्यादित षटकांच्या सामन्यांतही वर्दी लागावी म्हणून त्याचा स्वाभाविक खेळ नसूनही तो आक्रमक खेळायला लागला व नेमकी तिथे गोची झाली असावी. मला नेहमी जाणवतं कीं सेहवागच्या आणि गंभीरच्या स्कोअरमधला फरक वाढत चालला [आणि ते तसं होणारच !] कीं गंभीरचे हात स्वाभाविकपणे शीवशीवतातच. म्हणून सेहवागबरोबर सुरवातीला मुरलीच असणं गंभीरची [क्र.३ वर] फलंदाजी बहरण्यासाठीही बरं असा पर्याय मनात आला.

" इथं फक्त कसोटी सामन्याबद्दल बोला, त्या मर्यादित षटकांच्या फालतूपणाबद्दल बोलाल तर खबरदार", असा तर फतवा नाही ना निघालेला! कीं एकंदरीतच किवीजनी [ कीं आपल्याच हीरोजनी ] बोलतीच बंद केलीय आपली !!
न्यूझीलंड २८८, भारत ७५-७ [२२ षटकं] !!!

Pages