Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42
ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा
पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंगे भिजली जलधारानी... ..
अंगे भिजली जलधारानी... .. नको? बरं ..
टब? भाई, अहो आळीपाळीनी जावं
टब? भाई, अहो आळीपाळीनी जावं लागेल टबात डुंबायला.
<आळीपाळीनी जावं लागेल टबात
<आळीपाळीनी जावं लागेल टबात डुंबायला>


का बरं?
दोघे तरी सहज मावतात!
लालूच्या बटाटेवड्यासोबतच
लालूच्या बटाटेवड्यासोबतच उद्या ए वे ए ठिला पाटवड्या पण असतील मिनोतीच्या पद्धतिने केलेल्या.
अरे वा, सही. मी केल्यात त्या
अरे वा, सही. मी केल्यात त्या पाटवड्या. तुम्ही दोघी डेरेदाखल झालात का बारात?
नाही ग उद्या सकाळी निघू आम्ही
नाही ग उद्या सकाळी निघू आम्ही इथुन
वैद्य, आम्ही जिलेबी आणायला
वैद्य, आम्ही जिलेबी आणायला जाणारच आहोत तर पोळ्या पण घेऊ का ? तुमची चक्कर वाचेल.
कोण हाय काय रे? आमच्या
कोण हाय काय रे? आमच्या आत्ताशी गप्पा संपल्या, आता झोपतो.
पोळ्या उद्या सकाळी आणणार असशील तर ठीक आहे, पण मग मला सांग आधीच. ईथे पोस्ट कर.
बुवा, आमच्या म्हणजे कुआच्या?
बुवा, आमच्या म्हणजे कुआच्या? केदार तुमच्याकडे आलाय का? बायकी गॉसिप केलंत का?
निघा निघा आता.. उशीर होईल...
निघा निघा आता.. उशीर होईल...
तुमच्या गुटर्गुला, आय मीन
तुमच्या गुटर्गुला, आय मीन गटगला , खुप सार्या शुभेच्छा !
<निघा निघा आता..
<निघा निघा आता.. >
एव्हढ्यात?
आत्ता तर उठलो! अजून चहा पण नाही प्यायलो. अजून रं पा. तर आणायचेच आहे. त्याशिवाय कसे येणार?
११:३० ला निघालो तरी वेळेवर पोचेन. तेंव्हा बघू, कोण वेळेवर आले नि कोण नाही. हजेरी घेणार आहे, उशीरा आल्यास शिक्षा म्हणून सर्वजण सांगतील ते करावे लागेल, जसे गाणे म्हणा, विनोद सांगा, कोडे सांगा.
तुमच्याकरता पहिल्या दोन्ही
तुमच्याकरता पहिल्या दोन्ही शिक्षा चालतील. तुमचं मौजा ही मौजा ऐकायचं आहेच केव्हापासून.
११ ला पोचायचे आहे ना. चला
११ ला पोचायचे आहे ना. चला निघा लवकर.
छान मजा करा. फळी भगिनींनो
छान मजा करा.
फळी भगिनींनो आणि संयुक्ता सोल्जरांनो, हातातले झेंडे सोडू नका. पाटवड्या, तिरामिस्सु(? :P) आणि बटाटेवडे खाताना माझी आठवण काढा.
१-२ च्या सुमारास फोन करते. वाजणार्या रिंगेचा अनुल्लेख करू नका.
अहो भाई, अकरा कुठे? साडेअकरा
अहो भाई, अकरा कुठे? साडेअकरा ना?
लवकर पोचलात तर आपआपली बोचकी
लवकर पोचलात तर आपआपली बोचकी घेऊन स्वातीच्या अंगणात बसून रहा.
लोकहो, मज्जा करा गटगला आणि
लोकहो, मज्जा करा गटगला आणि भरपूर वृत्तांत येऊ द्यात!
<लवकर पोचलात तर आपआपली बोचकी
<लवकर पोचलात तर आपआपली बोचकी घेऊन स्वातीच्या अंगणात बसून रहा.>
तंबू आणा. उन्हाळा खूप आहे.
बटाटे वडे व इतर जम्मत गंमत आणणार्यांनी फार लवकर येऊ नका. नाहीतर बसल्या बसल्या खाउन टाकाल नि वेळेवर येऊनसुद्धा आम्हाला काही मिळणार नाही! पण म्हणून उशीरा पण येऊ नका. अगदी वेळेत पोचा.
(किती ती हावरट वृत्ति, जणू कधी खाल्लेच नाही!)
सुरू झालं का नाही गटग? खूप
सुरू झालं का नाही गटग? खूप सार्या शुभेच्छा
वृत्तांत लिहा.
गटगला शुभेच्छा... देसाई
गटगला शुभेच्छा... देसाई वृत्तांत लिहा बर्का नक्की..
पग्या तू नाही का जात आहेस
पग्या तू नाही का जात आहेस ह्या वेळी? बाकी, जनता जमली का सगळी?
गटगला शुभेच्छा!!! वृत्तांत
गटगला शुभेच्छा!!! वृत्तांत टाका सगळ्यांनी..
पग्या वात्रट आहे. तो आणि
पग्या वात्रट आहे. तो आणि शिल्पा आणि अबे 'सरप्राईज पाहुणे' होते. नेहमीप्रमाणेच गटग धूमधडाक्यात पार पडलं. बाकी देसाई कुणी वृत्तांत लिहायचा ते ठरवतीलच.
वा वा, छान झालेला दिसतोय गटग
वा वा, छान झालेला दिसतोय गटग

सायो हे मी मागंच सांगितलं होतं
माझ्याशिवाय एकाचीही पोस्ट
माझ्याशिवाय एकाचीही पोस्ट नाही इथे. गेले कुठे सगळे?
गेलाबाजार देसाई,भाई,वैद्यांची तरी यायलाच हवी होती 
आत्ता तर उठतो आहे. तुम्ही
आत्ता तर उठतो आहे. तुम्ही जश्या नवर्याच्या आठवणीने व्याकुळ होऊन लवकर घरी परतलात तसे सगळे नाही लगेच परतले. नंतर खूप वेळ बसलो होतो आम्ही एकमेकांच्या सुखदु:खाची विचारपूस करत. त्यासाठीच तर असते हे संमेलन. नुसतेच जेवून लगेच काय जायचे?
असो, लेखनप्रतिभेचे सूर्यच असे अनेक लोक मायबोलीवर आहेत. त्या पैकी काही जण तर रात्री पण स्वाती यांचेकडे थांबले होते. ते जेंव्हा आपापल्या संगणकाकडे पोचतील, तेंव्हा ते लिहीतीलच वाचण्याजोगा वृत्तांत.
तोपर्यंत काय लिहीणार?
संमेलन अतिशय आनंदात, धूमधडाक्यात पार पडले. सर्व पदार्थ अत्यंत रुचकर झाले होते. सर्व लोकांना भेटून आनंद झाला. सौ. स्वाती यांनी आयत्या वेळी आपल्या घरी संमेलन करायला परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांनी नऊ वारी पैठणी व नाकात नथ घालून सर्वांचे उत्तम आदरातिथ्य केले.
गप्पा चांगल्याच रंगल्या. फळी, किंतू हे शब्द वारंवार ऐकण्यात आले. त्यांचा अर्थ समजण्याआधी कदाचित् श्रीमद्भगवद्गीतेचा अर्थ कळणे सोपे जाईल असे मला वाटते, विशेषतः श्री. केदार यांच्याशी ओळख झाल्याने.
तेंव्हा थोडा वेळ थांबा, येईलच वृत्तांत.
तुम्ही जश्या नवर्याच्या
तुम्ही जश्या नवर्याच्या आठवणीने व्याकुळ होऊन लवकर घरी परतलात तसे सगळे नाही लगेच परतले. नंतर खूप वेळ बसलो होतो आम्ही एकमेकांच्या सुखदु:खाची विचारपूस करत. त्यासाठीच तर असते हे संमेलन. नुसतेच जेवून लगेच काय जायचे?>>>>>> अहो काय झक्की... नवर्याच्या आठवणीने व्याकुळ व्हायला नवरा घरात होताच कुठे? आणि सहा म्हणजे जेवून लगेच नाही हो. पण असो, तुमच्या कमेंटस नेहमीप्रमाणेच हसण्यावारी न्यायच्या असं ठरवलंय.
ए वे ए ठि नेहमीप्रमाणे
ए वे ए ठि नेहमीप्रमाणे दणक्यात पार पडले! यावेळचे हायलाइट्स खास नौ वारी पैठणी, नथ वगैरे खास यावेळच्या 'मेनु' ला शोभेल अशा वेषात यजमनीणबाई! अन विशिष्ट शहरातल्या खानदानी वेषात दरवाज्यात स्वागताला भाई!! (हो पुणेरी पगडी, झिरमिळ्या वाली, उपरणे, धोतर सदरा अशा फुल्ल फॅन्सी ड्रेसात) निम्मे लोक (माझ्यासकट) दारात भाईंना बघूनच 'स्पीचलेस' !!
) , वेदशास्त्रसंपन्न केदारपंत( यांनी भाईंसारखा ड्रेस घालायला हवा होता खर तर!!) आणि पहिल्यांदाच भेटत असलेले असाम्या आणि अबेडेकर.
बाकी सगळे नेहमीचे यशस्वी लोक होतेच, पण उल्लेखनीय हजेरी म्हणजे , पग्या (जोडीने)- शिल्पा त्याच्याच शब्दात: " दिसते भारी गोड .. पण ... " या वाक्याचा उत्तरार्ध खरा खोटा माहित नाही त्यामुळे इथे देत नाही
खाण्याच्या मेनूबद्दल काय बोलणार, लवकरच प्रचि(ती) येईलच!
अन उखाणे, त्यात पण बाईमाणसाने घेतलेला उखाणा हाही एक प्रकारे हायलाइट्च म्हणावा लागेल!!
एकूण धम्माल!
मै, तुला काल मेल टाकलीये, ती
मै, तुला काल मेल टाकलीये, ती पहा नी उत्तर दे म्हणजे मला योग्य ती कारवाई करता येईल.
Pages