Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42
ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा
पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या लेकाला मला आणावं
माझ्या लेकाला मला आणावं लागणार आहे. (विकु, प्लीज कॅन्सल करु नका तुम्ही
) पण त्याला खाण्यापिण्यात न धरुनही चालेल.
>> (मनातः भाकरी कमी पडणार की
>> (मनातः भाकरी कमी पडणार की काय ? )
किती सांगितल्या आहेस? बुवा पोळ्या आणतायत ना शिवाय. पुरतील.
माझं पोर आहे, पण लहान नाहीये.
अग प्रत्येकी २ अशा हिशेबाने
अग प्रत्येकी २ अशा हिशेबाने सांगितल्यात, सुमा म्हणे चांगला साइझ आहे हो भाकरीचा. पुरतील .
पण १६ लोक धरले होते
फोन करून पहाते त्यांना. अगदी काही जमले नाहीतर एक्स्ट्रा पोळ्या घेऊन ठेवेन.
म्हणजे ३२ भाकर्या ना?! रग्गड
म्हणजे ३२ भाकर्या ना?! रग्गड झाल्या माझ्या मते.
मी अर्धी भाकरी व आणखी भूक
मी अर्धी भाकरी व आणखी भूक असेल तरच अर्धी पोळी खाणार.
अर्र्र्र्र्र्र्र्र्र ... मला
अर्र्र्र्र्र्र्र्र्र ... मला आता लक्षात आलं. अरे मगाशी २ आणि ३ (स्टॉकिंग वाला) नंबर चे काँमेंट "काका" "बाबा" लोकांकरता होते, काकूंकरता नव्हते हां! म्हणुन सिंड्रेला वाह्यात म्हणालीस का?
असो, अजुन जपून लिहायला पाहिजे.
सुमा म्हणे चांगला साइझ आहे हो
सुमा म्हणे चांगला साइझ आहे हो भाकरीचा. पुरतील >>सुमावाले मूळचे कुठले आहेत ?
असामी, बरोब्बर. 'तिथलेच'
असामी, बरोब्बर. 'तिथलेच' आहेत.
कळेलच आता.
पोळ्यांचा साईज अगदी लहान आहे.
पोळ्यांचा साईज अगदी लहान आहे. फुलके म्हंटलं तरी चालेल.
भाकरी आणि चिकन किंवा कुठलीही पाले भाजी मात्र फार मस्त लागते.
अरे काय मेन्यु आहे ! धमाल करा
अरे काय मेन्यु आहे !
धमाल करा सगळे ...
सालाबादाप्रमाणे आम्हा मित्रमंडळींची कँपिंग ट्रिप ह्याच वीकांताला आहे त्यामुळे आज संध्याकाळी इथून निघू.
हे जीटीजी(ही) मिसावं लागणार
पोषाख खरंच भारतीय सणासुदीचा
पोषाख खरंच भारतीय सणासुदीचा करायचा आहे का?
हो तर.. धोतर, कुरते, फेटे,
हो तर.. धोतर, कुरते, फेटे, पैठण्या, नऊवारी, नथ..

खाताना जरा सांभाळुन खाव लागेल एवढच.
भाई.. तुम्ही पण नथ घालणार ??
भाई.. तुम्ही पण नथ घालणार ??
होय मामासाहेब. दिंडीदरवाज्यात
होय मामासाहेब. दिंडीदरवाज्यात पोषाख-नियंत्रक उभे असतील. योग्य पोषाख असला तरच वाड्यात प्रवेश मिळेल, नाहीतर रसद जप्त करून चढे घोड्यानिशी माघारी पाठवण्यात येईल!
हो मामासाहेब. दिंडीदरवाज्यात
हो मामासाहेब. दिंडीदरवाज्यात पोषाख-नियंत्रक उभे असतील. >> पारपत्र असेल त्या देशाच्या त्या पोषाखात प्रवेश मिळण्याची अट असावी
$175 भरलेले वसूल करायचेत ना 
मग पारपत्र आणि शरणपत्र
मग पारपत्र आणि शरणपत्र पुराव्यादाखल आणावं लागेल.
सरप्राइझ पाहुणे कोण, वे.मा
सरप्राइझ पाहुणे कोण, वे.मा का?
सरप्राइझ पाहुणे कोण, वे.मा
सरप्राइझ पाहुणे कोण, वे.मा का? >> मी
किती ती उत्सुकता. तुला टॅटू काढायला देऊ त्यांच्यावर 
स्वाती वेगवेगळे आणायचे कि एकत्रच ? तू वेळा बदलणार नाहीस ना कधी मिळालय त्यावरून
किती ती उत्सुकता. तुला टॅटू
किती ती उत्सुकता. तुला टॅटू काढायला देऊ त्यांच्यावर हाहा
<< म्हणजे मी कि काय सरप्राइझ पाहुणी
विनयला उभं करू कागदपत्रं
विनयला उभं करू कागदपत्रं तपासायला आणि त्यालाच नियम/वेळ ठरवायला सांगू.
विनयला उभं करू कागदपत्रं
विनयला उभं करू कागदपत्रं तपासायला >>>>> बापरे.. म्हणजे देसाई विनोदी (?) वृत्तांत पाडायच्या ऐवजी नियम मोडणार्यांवरची ललितं (?) पाडतील गटगच्या दुसर्यादिवशी..
आमच्या सेनापतींना पोषाखाची
आमच्या सेनापतींना पोषाखाची कल्पना आहे ना? नाहीतर सैन्य सगळं आपादमस्तक कपड्यात आणि सेनापती यायचे शॉर्ट,-टीशर्ट-गॉगल घालून..
पग्या, असू दे. निदान त्यावर
पग्या, असू दे. निदान त्यावर 'तुमच्या अमेरिकेत नाही का असं होत' असं कोणाला म्हणता येणार नाही.
मला दारवान नेमले का? बघतोच
मला दारवान नेमले का? बघतोच सगळे आत कसे येतात ते...
<शॉर्ट,-टीशर्ट-गॉगल
<शॉर्ट,-टीशर्ट-गॉगल >
उद्याच्या हवेला हे जरा जास्तच नाही का? मी म्हणतो चहा सदरा नसला तरी चालेल का? पोहायच्या कपड्यातच यायचे सर्वांनी खरे म्हणजे!!
झक्की,
झक्की,
बाईंकडे पूल नाहीये ना ? नव्या
बाईंकडे पूल नाहीये ना ? नव्या घरात असणारे पूल तेव्हा पुढच्या गटगला या पोहायचा पोषाख घालून.
टब किती मोठा आहे?.
टब किती मोठा आहे?.
पोहायच्या कपड्यातच यायचे
पोहायच्या कपड्यातच यायचे सर्वांनी खरे म्हणजे!!
<<< प्लिज..नको नको.. इथल्या पण जीटीजी चे चिंब भिजलेले फोटो !!
Pages