मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

>>मेल पाठवली पण ती त्यांनाही मिळाली नाही.. आणि स्वतःसाठीची प्रत मलाही मिळाली नाही..
>>संपर्कातुन पाठविलेली मेल पोहोचत नाही .हा प्रॉब्लेम बर्‍याच दिवसांपासुन आहे.त्यासाठी काय करावे.

आपण समदु:खी आहोत, आपले हे दु:ख दूर करण्यासाठी तपास चालू आहे. (वर अ‍ॅडमिनचा मेसेज आहे तसा) Happy

आताच लक्षात आलं म्हणून लगेच धन्यवाद द्यायला आले आहे.
'माझ्यासाठी नविन' वगैरे लिस्ट्सची कॉलम अलाईनमेंट नीट केल्याबद्दल धन्यवाद. मागे एकदा खूप मोठे नाव असलेल्या सदस्यामुळे लिस्ट रेंडेरिंग गंडले होते.
कदाचित खूप जुना बदल असेल, पण मला आता साक्षात्कार झाला. Happy

मला अमेरिकेतून माझ्या अनुभवान्बद्दल काही लिहायचे आहे. तसा मेल चार दिवसापूर्वी पाठवला होता. मिळालेला दिसत नाही. आत्ताच्या अन्दाजानुसार साधारण पन्धरा एक लेख होतील-आठ ते दहा दिवसान्नी एक याप्रमाणे.
तसेच गूगल वर छापून इथे पेस्ट करता येते का ?
उत्तराची वाट पहात आहे.

अ‍ॅडमीन / मदत समिती, माझा वैयक्तिक संपर्क सतत डीअ‍ॅक्टिव्हेट होत असतो. आपोआप. असं का होतं कळत नाही.
प्लीज तो सुरू कराल का?

श्रीकान्त जोशी , नमस्कार,

नवीन लेख लिहीण्यासाठी मदतपुस्तिकेतील लेखनासंबंधी प्रश्न हा विभाग व त्यातील मायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे? हा दुवा कृपया बघा. आणि मग येथे गुलमोहर विभागात नवीन साहित्य प्रकाशित करा. हाय काय अन नाय काय ! Happy

सई. , या बाबत कृपया प्रशासकांना कळवणार का ?

छोटीशी सुचनावजा विनंती (प्लीज नोटः विनंतीवजा सुचना नाही) आहे.
'माझ्यासाठी नविन' या टॅबमध्ये युझरच्या ग्रूपमधले(म्हणजे इंक्लुडेड) सगळे नविन/अपडेटेड धागे दिसतात. तसेच 'मायबोलीवर नविन' टॅबमध्ये युझरला मुळीच नको असलेले ग्रूप्स न दाखवणे, शक्य आहे का? युझर हे हे विभाग माझ्यासाठी एक्स्लुडेड आहेत, असे सेटिंग्ज्समध्ये सांगेल, आणि त्यानुसार त्या ग्रूपातले धागे त्याला दिसणारच नाहीत. माझ्यासाठी असे बरेच ग्रूप्स आहेत जे मला कधीच बघायचे नसतात जसे की गुलमोहर - गझल, गुलमोहर - प्रकाशचित्रण, टेक्सास वगैरे, पण उगाच पुढचं पान करत क्लिक करत बसावं लागतं. ज्यांना आताचा युआय हवाय त्यांनी कुठलेही विभाग एक्स्लुड करू नये.

प्रति

मा. संचालक
मायबोली

मी मायबोलीचा जुना चाहता आणि वापरकर्ता आहे. आम्ही ४ वर्षापासून http://www.majhapaper.com/ हे मराठी बातम्यांचे संकेत स्थळ चालवित आहोत. या उपक्रमाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून फेसबुकवर ७६ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. आपल्या समूहातील बातम्यांच्या संकेत स्थळावर 'माझा पेपर' समावेश केल्यास आम्ही अधिक वाचकांपर्यंत पोहोचू शकू. तरी batmyaa.com वर 'माझा पेपर'चा समावेश करावा अथवा त्यासाठी काही प्रक्रिया असल्यास त्याबाबत माहिती मिळावी ही विनंती

आपला;

श्रीकांत टिळक

I want vanshvel book written by dr.malti karwarkar, can you pls help me about where i get this book,
i am staying in MUMBAI(ANDHERI -EAST), INDIA.

अर्जंट मदत हवीय. फायरफॉक्सने मायबोलीवर सुखेनैव बागडत होतो. पण आता एक ड्युआय मिळालाय. Wink तर ओरिजिनल आणि ड्युआय कुठे कुठे लॉगिन आहेत ते लक्ष ठेवायला एका आयडीसाठी इंटरनेट एक्स्प्लोरर वापरतोय. पण इथे क्रोमसारखा प्रॉब्लेम येतोय. बॅकस्पेस वापरल्यावर अक्षरांची गिचमीड होतेय.

बॅकस्पेस + स्पेस केलं तर चालतंय. पण हे असं किती वेळा करणार? शिवाय दोन दोन आयडींचा घोळ.
कोणे एके काळी इ.ए.च. वापरायचो तेव्हा हा प्रॉब्लेम नव्हता. आताचे व्हर्शन ११.०.९६...... असे काहीतरी आहे. यासंबंधी मायबोलीवर प्रशासकाकनी एक धागाही काढलेला आठवतोय. शोधून मिळाला नाही. त्या धाग्याचा मला उपयोग होणार असेल तर त्याचा पत्ता द्या किंवा सोल्युशन सांगा. कोणते व्हर्शन वापरायला हवे?

तेच करतोय. नाहीतर ते काम होणारच नाही. पण कधी कधी दोघांना सारख्याच महत्त्वअसतं किंवा एकच काम करायचं असतं

हे बघा बिघडलं.

मायबोलीवर इतर गावांचे....औरंगाबाद, सोलापूर, मराठवाडा इ. धागे बंद केलेत का ?

मायबोलीची संपर्क सुविधा बंद आहे किंवा काही प्रॉब्लेम्स् आहेत का?

मी गेल्या एक-दोन दिवसांत दोन लोकांशी संपरक करायचा प्रयत्न केला (त्यांनीं संपर्क करायला खुला ठेवला आहे .. :)) आणि स्वतःकरताही प्रत मागवली होती .. स्वतःकरताची प्रत आली नाही तसंच रिस्पॉन्सही .. त्यावरून वाटतंय त्यांच्याशी संपर्क तरी झाला की नाही .. अर्थात हे शक्य आहे की त्यांनीं (अजून) रिस्पॉन्स् पाठवला नसेल Happy .. पण माझ्या स्वतःच्या प्रती तरी मिळायला हव्यात ना?

मायबोली संपर्क सुविधा अजुनही बंद आहे.संपर्कातुन पाठविलेले व माझ्यासाठी आलेले मेल व स्वत:करिता पाठविलेली प्रत मला मिळत नाही.औगस्ट मध्ये हा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला म्हणजे त्याआधीपासून असावा.कृपया योग्य निरसन करावे.

माझ्या संपर्कातुन पाठवलेल्या मेल्सच्या माझ्यासाठीच्या प्रती आल्या आहेत माझ्या इनबॉक्समध्ये.
म्हणजे ज्यांना पाठवल्यात त्यांनाही मिळाल्या असतील का?
कळायचा काहीच मार्ग नाहीये कारण मला अजुन उत्तर आलेलं नाहीये. Sad

एकदा स्पॅममधे जातायेत का ईमेल्स ते चेक करा Happy
मला मागच्या आठवड्यात एक दोघांनी संपर्कातून केलेल्या ईमेल्स स्पॅम मधे सापडल्या Happy

मी स्पॅम ही चेक केलं .. मला काही माझ्या प्रती दिसत नाहीत ..

थोडक्यात सध्या संपर्क मध्ये काहितरी प्रॉब्लेम दिसत आहे .. लोकांचे वेगवेगळे अनुभव बघता ..

हो, आज मला कोणीतरी संपर्कातून इमेल केली आहे ती मिळाली .. Happy

Respected sir,post by udan khatola on 17 oct.2014 is stolen post,which was posted on the 4 groups of FB,post was ready on 15 Aug 2014,sole problem of swati joshi,who has posted it is she could have been happy if person had told her about sharing,
I think Admin must take strong action on such topics,
pl.ask the udan khatola to either withdraw it or give the ref. of orgin.
Regards,
MiG29k

इंग्रजी ब्लॉग :मायबोलीसारखा निघाला तर उत्तमच आहे परंतू ते स्वप्नच ठरेल. विषयाला धरून असलेल्या फोरमची अवस्था पाहा. दोन तीन सोडल्यास {nokia user,holidayiq इ०}इतर ठिकाणी भयानक टिनपाट इंग्रजी अथवा शिव्या देणारे फार असतात.

माझं केलेलं लेखन word आणि pdf फॉर्मॅटमध्ये आहे. word कॉपी - पेस्ट केला तर धाग्यात वाचता येत नाही. pdf फाइलला mediafire मध्ये ठेवून तो address copy करून धाग्यात त्याची link करता येईल का? माझ्या (आमच्या मुलींचे पालक) या लेखाला मी हा address कॉपी करून तो धग्यात ठेवला होता. वाचकांना तो copy करून browser मध्ये paste करावा लागतो. याला link काही म्हणता येणार नाही.
त्याहीपेक्षा मायबोलीच्या स्टोअरेज मध्येच ती फाईल ठेवून त्याची link धाग्यावर देता येणार नाही का?

आ.न.
प्रसाद गोडबोले

मायबोलीवर मी काही आठवड्यापूर्वीच रुजू झालो. आधीपासून एक प्रसाद गोडबोले नावाचे लेखक मौजूद आहेत. माझे मायबोलीवरचे नाव बदलून 'स्वीटटॉकर' असं करू शकाल का?

प्रगो, तुम्हीच तुमचा आयडी/वापरावयाचे नाव बदलू शकता...
>>>> +1

माझे सदस्यत्व मधे जा
बहुदा संपादन ऑप्शन येतो, त्यात वापरायचे नाव बदलून तुम्हाला हवे ते करा

Pages