Submitted by किरण कुमार on 13 June, 2011 - 03:54
आयुष्यात दू:खाने जरी डोळ्यात पूर आला
तू हासताच गाली सारा थकवा दूर झाला
तू जन्मलास अन मी जगलो असा नव्याने
संगीत ऐकले जे सांग कोठूनी सूर आला
उचलूनी हात बाळा दिधला जरी धपाटा
काहूर मनात माझ्या भरुनी उर आला
इवलेस हात मोजती आभाळाच्या कक्षा
लटक्या तूझ्या रागाने चंद्रास खूर आला
तूझी उन्हात पावले ती बघता या मेघांनी
धरणीला भिजवाया पाउस आतूर झाला
तूझी ओढ इतूकी आता कामास दूर सारी
तूज भेटण्या रोजचे हा बाप फितूर झाला
- किरणकुमार
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर !! ह्रदयस्पर्शी !
सुंदर !! ह्रदयस्पर्शी !
.... छान…. कविता आणि आशय
.... छान…. कविता आणि आशय दोन्ही.
“तू जन्मलास अन मी जगलो असा नव्याने”
ही ओळ वाचली आणि एक जुनं गाणं आठवलं.
"बाळा होऊ कशी उतराई
तुझ्यामुळे मी झाले आई"
अर्थात् तुमच्या कवितेतील संकल्पना स्वत:ची आणि स्वतंत्र आहे यात वाद नाही.
----------------------------------------------------------------------------------------
छंदात लिहिली आहे म्हणून सांगावसं वाटतं ----
काही ठिकाणी लय चुकते आहे ... त्याकडे कृपया लक्ष पुरवणे.
धन्यवाद मित्रांनो आपल्या
धन्यवाद मित्रांनो
आपल्या सूचनेचं स्वागत आहे भिडेजी,
छान आहे
छान आहे
छान कविता ...आवडली
छान कविता ...आवडली
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार
फारच सुंदर.....
फारच सुंदर.....