मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

धन्यवाद मदत_समिती,
गुलमोहरच्या कोणत्याही विभागात प्रतिसाद देताना. खासकरून प्रकाशचित्र विभागात.

एडमिन, 'दे कॉल मी इ.झेड'च्या पहिल्या भागातील बराच भाग गहाळ झालेला दिसतोय. लॅपटॉपमधील त्रुटींमुळे त्यातला बराच भाग माझ्याकडे आता शिल्लक नाही. दुर्दैवाने वेळेअभावी त्याचा प्रिंटही घेतलेला नाही. हा भाग मिळालाच नाही तर पुन्हा लिहावं लागेल अस दिसतय. तुमची काही मदत होईल का यात?

मला गेल्या दोन दिवसांपासून गुलमोहरमध्ये प्रकाशचित्रे दिसत नाहीयेत. मुखपृष्टावर किंवा वाहत्या बाफवर फोटो दिसताहेत पण लेखांमध्ये वैगरे नाही दिसत. कोकणसय, अतुल्य भारत वैगरेंमध्ये एकही प्रकाशचित्र दिसत नाहिये. परवापर्यंत दिसत होती.
हे कश्यामुळे होत असेल सांगु शकाल काय?

मी थोड्या वेळापुर्वी एक विनोदी लेखन माबोवर प्रकाशित केले आहे. पण ते नवीन लेखनमध्ये दिसत नाहीये.:अओ: काय करावे लागेल.?

माझी मायबोलिला एक विनंती आहे की साईट उत्तम आहे हयात काहीच वाद नहीं..परन्तु बहुतांशी संगणकाचा वापर हा इंग्लिश मधून होत असल्याने ..इंग्लिश अणि मराठी दोन्ही मध्ये सर्फिंग करता येइल अशी सुविधा करावी की जेणेकरून इंग्लिश चे आप्शन वाचून मराठीतून सर्फिंग करने सोयीस्कर होईल.. आता हा वाद सुद्धा होऊ शकतो...साईट मायबोली म्हणजे मराठी आहे तर इंग्लिश कशाला..तर कृपया हा वादाचा मुद्दा न बनवाता कृति केली तर खूप आभारी राहू आम्ही सगळे .....

धन्यवाद
yogesh

योगेश, मायबोलीवर आताही तुम्ही वावरताच आहात (इंग्लिश मधले सर्फिंग करता आहात). तुम्ही इथे रोमन किंवा देवनागरी भाषेत लिहू शकता. देवनागरीचा आग्रह जरूर आहे, पण सक्ती नाहीये, तेव्हा तुम्हांला पाहिजे ती भाषा निवडून इथे वावरता येईल

नविन लेखन प्रकाशित केल्यावर पुर्ण लेख न दिसता फक्त थोडाच भाग प्रकाशित होत आहे. (प्रतिसाद तपासाचा ऑप्शन वापरला तेव्हा पुर्ण लेख दिसत होता, प्रकाशित केल्यावर मात्र काही भागच प्रकाशित होतो) हाच प्रकार गृप मधे नविन लेखनाचा धागा चालु करताना होत आहे. हा प्रॉब्लेम आज सकाळ पासुन होतोय.

धन्यवाद.

मदत समिती, सध्या माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. बहुतेक तो फाँट मुळे होत होता.

धन्यवाद Happy

जर कानोकानी मधील एखादे लेखन पहायचे असेल आणि "ग्रूपचे सभासद" नाही म्हणून ते दिसत नसेल तर तो कोणता ग्रूप आहे तसेच त्याचे सभासद कसे व्हायचे हे समजत नाहीये. तसेच "create content" काय आहे ?
थोडक्यात कानोकानी म्हणजे नक्की काय आहे ? आणि त्याचा हितगुजशी संबंध कसा आहे ही माहिती हवी आहे.
धन्यवाद !

कानोकानी मधले सगळे लेखन सगळ्यांना दिसायला हवे.
कानोकानी ही एक पूर्ण वेगळी वेबसाईट आहे. आंतरजालावर मराठी माणसाला आवडेल असे काही दिसले तर ते इतरांना सहज सांगता यावे म्हणून तिचा जन्म झाला आहे. तुम्ही मायबोलीवर आधीच लॉगीन केले असेल तर असे दुवे देणे थोडे सोपे होते कारण तुम्हाला परत वेगळे लॉगीन करावे लागत नाही. कानोकानीवर मूळ मजकूर न देता फक्त दुवे देणे अपेक्षित आहे. मायबोलीवरच्या प्रत्येक पानाच्या खाली जी कानोकानी लिंक आहे त्याचा वापर करून कानोकानी वर त्या पानाची लिंक देता येईल. किंवा अगोदरच लिंक दिली असेल तर त्यावर मतदान करता येईल.

कानोकानी बद्दल एक उदाहरण देत आहे.
http://kanokani.maayboli.com/node/449
वरील लिंक मधे "संपुर्ण मुळ मजकूर इथे पहा" यावर क्लिक केले असता,
लॉग्ड इन असुन देखील "हे पान पहायची परवानगी नाही" असे येत आहे.

एक सुचना...
गेले काही दिवसांपासुन "नविन लेखन" वर प्रवेशिकाच प्रवेशिका दिसत आहेत.
याकरीता वेगळी जागा/लिंक केली तर सर्वांनाच पहाणे सोपे जाईल.
अशा स्वतंत्र लिंकवर नंबरप्रमाणे प्रवेशिका सॉर्ट करून ठेवल्या,
तसेच लेखकांच्या नावाप्रमाणे शोधण्याची सोय करता आली तर सुसुत्रता येईल.

माबोवर एखादा मेंबर डिलीट करता येतो कां? म्हणजे मी पूर्वी वेगळ्या नावाने इथे होते, त्यावर कधीच कोणत्याच प्रतिक्रिया वगैरे दिलेल्या नाहीत. मला ते युजर नेम नकोय, कारण आता याच नावाने मी इथे वावरतेय. पण त्या युजरनेम चा जो इ-मेल आय.डी. आहे तो मला इथे सध्याच्या नावाला वापरायचाय. काही करता येऊ शकतं का?

माझ्या खासगी जागेतील 9.8 MB इतकी जागा आत्तापर्यंत वापरली गेली आहे. त्यामुळे मी आता आणखी प्रकाशचित्रे पाठवू शकत नाही.
त्याकरिता मला काय करावे लागेल ??
आधी पाठवलेली प्रकाशचित्रे डिलिट करावी लागतील काय ??

आधी ज्या पानावर ती प्रकाशचित्रे चिकटवली आहेत (आणि काढून टाकायची आहेत) त्या पानांची यादी support @ maayboli . com ला पाठवा आणि नंतर ती प्रकाशचित्रे काढून टाका. नाहीतर ती पाने कोरी दिसतील.

निवांत चालतय की मॅक - फायरफॉक्स वर मायबोली, साईट उघडून नेव्हीगेट करता येतेय, टाइप करता येते की नाही ते नाही बघीतले. माझ्याकडे Firefox 3.0.17 आहे. मी तरी काही वेगळे सेटींग केले नाहीये.

गुलमोहर मधे 'लेख' हा नविन प्रकार सुरु झाला आहे का? "गुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन" मधे कधी कधी दिसतो. पण वरती जे वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनाचे दुवे आहेत ( कथा | ललित | ... | जुन्या गुलमोहरकडे) त्यात सापडत नाही... त्यामुळे जुने 'लेख' कसे दिसणार?
'लेख' आणि 'ललित' मधे काय फरक?

Pages