मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

पाककृती विभागात पूर्ण पाककृती लिहून अधीक माहितीसाठी ब्लॉगचा दुवा दिला तर चालेल. त्या विभागात फक्त दुवा देणे अपेक्षीत नाही.

बिझीनेसबद्दल तुमच्या रंगीबेरंगीवर मार्केटींग केले तर चालेल. कींवा छोट्या जाहिरातीत लिहिले तर चालेल. त्याशिवाय काही पर्याय हवे असतील तर मला संपर्क करा.

मला पण अजून वाचायचंय हा दुवाच दिसत नाहिये Sad

आणि नवीन लेखन या ईथे हि दिसत नाहिये...काय करावे म्हणजे ते दिसु शकेल?

http://www.maayboli.com/node/12284/edit
या दुव्यावरचं माझं (बिच्चारं) लेखन) गोष्टी हेमलकशाच्या भाग १) दिसत नाहीय. म्हणजे ‘संपादन’ मोडमध्ये माझं मला दिसतं, पण प्रकाशित केल्यावर गायब! कृपया मदत करा.
गंमत म्हणजे हे पहिल्यांदा प्रकाशित केलं तेव्हा दिसत होतं.

जुन्या हितगुजवरील बरेचसे देवनागरीत असलेले लेखन निट दिसतच नाहीये.
ते देवनागरीत न दिसता इंग्रजीमधे दिसते आहे. काय केल्यास जसेच्या तसे दिसेल ?
(नविन हितगुजला असे होत नाहीये.)

महेश
नक्की कुठे असे दिसतय त्याचा दुवा देणार का? ते जर मुळातच इंग्रजीत लिहीलेले असेल तर मराठीत दिसणार नाही, पण आधी मराठी दिसत होते आणि आता इंग्रजीत असे असेल तर - ते जर dev{} मध्ये लिहून जर मराठी वाचता येणे शक्य असेल तर एखादे पोस्ट तसे लिहून मराठीत वाचता येईल पण संपूर्ण पान तसे वाचणे शक्य होणार नाही. जुन्या मायबोलीत जसा dev टॅग होता तो नवीन मायबोलीत वापरण्यासाठी प्रतिसादाच्या चौकटीवर निळ्या रंगाचे सफरचंदाचे चित्र आहे ते वापरा.

उदा. खालील लिंकवर पाहिल्यास
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=644&post=709890#POST...

अशा प्रकारचे लिखाण दिसत आहे.

samaIrÊgaMQaar.. HHPV ²
baharo mastI maukMd barstI phaDI ihjaDa baocaara idla hO²
AajahI [tkM Bayaanak gaaNaM kahI kLt naahI bauvaa²

अनेक ठिकाणी जुन्या हितगुजवरील देवनागरी लिखाण वरीलप्रमाणे दिसत आहे.

मायबोलीवर अजून काही शब्द लिहिता येत नाही..

उदा. नैऋत्य.. या ऋवर रफार आहे. तो कसा द्यायचा?
शिवाय महिनोन् महिने असा सुटा शब्द लिहिणं अयोग्य आहे. तो एकच शब्द आहे. तेही लिहिता येत नाही.

महेश
तू दिलेल्या लिंकवर मला तरी सगळे मराठीत दिसत आहे. कुठेच रोमन मध्ये लिहीलेले दिसत नाहीये, तू वापरत असलेल्या ब्राऊझर मध्ये बहुदा तसे दिसतय.

चिनूक्स हो तसे लिहीता येत नाही, यासाठी बहुदा वेबमास्टरांना कळवावे लागेल. मायबोलीच्या डेव्हलपमेंटचे काम ते बघतात.

नूतन
तुम्ही दुवाच दिलेला नाहीये कुठे बदलायच तो.

महेश, आयई, मध्ये ते दिसते आहे, फायरफॉक्स मध्ये नाही दिसत. कोणते फॉंट्स लागतात ते पाहिलं पाहिजे.

रूनी, मिलिंदा
मी गुगल क्रोम वापरत आहे. नविन हितगुजला काहीच problem नाही.
पण जुन्या हितगुजला मी मेसेज मधे दिल्याप्रमाणे दिसत आहे.
फॉन्ट सेटीन्ग चा काही उपाय आहे का ?

नवीन मायबोलीवरील सर्व मजकूर युनिकोडवर आधारीत असल्याने तुम्हाला तो निट दिसतो. जुन्या हितगुजवर काही मजकूर शिवाजी फाँट्मध्ये तर काही DEV Tagमध्ये असल्याने तो निट दिसत नाही.

शिवाजी / देव टॅग मधला मजकुर निळ्या सफरचंदामधे जाऊन पाहिला तरी खुप चांगला दिसत नाहीये.
उदा. मी वर दिलेल्या ओळी खालील प्रमाणे दिसत आहेत.

समईरÊगंQआर.. ःःPV ²
बहरो मस्ती मौकMद बर्स्ती फडी इह्जड बओcआर इद्ल हॉ²
आअजही [त्कM Bअयानक गाणं कही क्ळ्त नाही बौवा²

निरिक्षण : Mozilla Firefox आणि Google Chrome मधे जुन्या हितगुजवरील मजकुर निट दिसत नाही. Admin ने लिहिल्याप्रमाणे शिवाजी / देव टॅग हे कारण असु शकेल. IE मधे हा problem येत नाही, व्यवस्थित दिसते.
अनुमान : जुन्या हितगुजवरील मजकुर IE मधे पहावा.

problem is solved Happy

मायबोलीची पुस्तक खरेदी विभागावर कसे जायचे. मला तिथे रुचिरा १ व २ विकत मिळेल का?(एकून एकून विकतच घ्यायचेय.. नाहीतर एकही मराठी स्वयंपाकाचे पुस्तक नाहीये.)

नमस्कार मीनु,
तुम्ही हा प्रश्न गाण्याचे शब्द हवे आहेत... या पानावर विचारलात तर तुम्हाला तिथे उत्तर मिळू शकेल. हे पान 'मराठी गाणी - आद्याक्षराप्रमाणे' या ग्रूपमध्ये आहे.

याशिवाय, इतर अनेक गाण्यांच्या शब्दांसाठी आधी मराठी गाण्यांचा संग्रह देखील पहा.

धन्यवाद.

नमस्कार आगाऊ,
तुमच्या वैयक्तिक माहितीमध्ये प्रकाशचित्र देण्यासाठी खालील उपाय करा -
पानाच्या उजवीकडे असलेल्या "माझे सदस्यत्व" या दुव्यावर जा.
तिथे "संपादन" या विभागात जाऊन "Upload Picture" या उपविभागात तुम्हाला कोणतेही चित्र चढवता येईल.
ते झाले की त्या पानावर सर्वात खाली असलेले "Save" हे बटन वापरून केलेले बदल साठवून ठेवा.

आता तुम्ही चढवलेले चित्र तुमच्या विचारपूस या पानावरती दिसेल.

धन्यवाद.

Me navin sabhasad ahe. Mala please Marathi kase type karayache ya baddal mahiti dya.

मंजुषा
हे बघा - देवनागरीत कसे लिहावे.
लिहीतांना एखादा शब्द अडल्यास प्रतिसादाच्या चौकटीच्या वर निळ्या रंगाचे प्रश्नचिन्ह आहे त्यावर टिचकी मारा.

सर्व ग्रुप मधिल मी अजुन न वाचलेले लिखाण एकत्र पहायची सोय आता कुठे ईतरत्र हलविलि आहे का? कारण नविन लेखन किंवा माझे सदस्यत्व यातुन गेले तर प्रत्येक ग्रुप वर वेगवेगळे शोधावे लागते..पुर्वि जसे अजुन वाचायचे हा पर्याय होता तसा आता नाहि का? Sad

नमस्कार मृनिश,
अजून वाचायचंय हा पर्याय वापरण्यासाठी आधी "नवीन लेखन" या दुव्यावर जा. त्या पानावर गेल्यानंतर "संपूर्ण मायबोलीवरचं नवीन लेखन" या मथळ्याखाली असलेला "माझ्यासाठी नवीन" हा पर्याय निवडा.

धन्यवाद.

मी मागोवा सदरात एक प्रतिक्रीया टाईप केली व सेव्ह केली. पण ती तेथे दिसतच नाही. कृपया मदत कराल का?

मंजुषा
तुम्ही एखाद्या लेखाला जर नुसता प्रतिसाद लिहीला असेल आणि त्याखाली असलेले सेव्ह चे बटन दाबले असेल तर तो प्रतिसाद प्रसिद्ध होतो.
तुम्हाला जर तुमचे स्वतःचे सगळे लेखन शोधायचे असेल (पूर्ण आणि अपूर्ण) तर "माझे सदस्यत्व" >> "पाऊलखुणा" येथे बघता येईल.

Pages