या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...
सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.
आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.
इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?
याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.
मामी ५,६ आणि ८ नं चे मुद्दे
मामी ५,६ आणि ८ नं चे मुद्दे कळले नाहीत..
शांत हो नंदीनी! दरवेळी मला
शांत हो नंदीनी! दरवेळी मला बोललीच पाहिजे असे होत आहे तुझे. मी इथे चिन्हाबद्दल बोलत आहे. सर्व प्रथांबद्दल मी माझे मत मांडत नाही. स्त्रिया स्त्रियांवर अनेक कारणांसाठी सक्ती करतात हे विधान काही खोटे नाही. आपल्या भारतिय समाजात लग्न झालेल्या स्त्रिला तिची सासू, नंणंद, जावा किती छळतात हे माहिती असेलचं तुला. यानंतर तू माझे पोष्ट वाचले तरी त्यावर उत्तर लिहू नको. लिहिलेच तर मी त्यावर उत्तर लिहिणार नाही.
छान दिसतं..आवडतं म्हणुन
छान दिसतं..आवडतं म्हणुन घाला...
आवडत नसेल तर घालायची गरज नाही.. असं आजकाल सगळीच कडे दिसुन येतं..
माझी आई हे सगळं घालायची..तिचा बांगड्यांनी भरलेला हात, पायातले जोडवे, कपाळावरचं कुंकु..सगळं खुप छान दिसायचं..म्हणुन मला लग्नाआधी पासुनच सगळं घालायची इच्छा होत असे..
ज्याचा त्याचा प्रश्न आहे..
>>>> पण लिंबुदा सारखा व्याही
>>>> पण लिंबुदा सारखा व्याही जर पाय धुतोच असं म्हणाला तर नाही कोण म्हणणार?
अन मी जे बोलतो ते करतोच करतो! 

जरुर
तर स्थळाची माहिती कळवा बर! नाही, तसा अजुन औकाश आहे चार/पाच वर्षे, पण आतापासूनच स्थळे बघितली पाहिजेत ना!
त्या मन्गळसूत्रावरुन आठवल, लिम्बीच सान्गत होती मध्यंतरी
)
लहानपणी पहिली/दुसरीत अस्ताना ती ज्या खेडेगावात रहात होती, त्यान्चे शेजारच्या एका नविन लग्न झालेल्या स्त्रीचे सोन्याचे ठसठशीत मन्गळसूत्र हीच गळ्यात घालून घ्यायची अन दिवसभर गावभर उन्डारायची! लहान होती, काय कळायचे? नाही म्हणले तरी लहान मूल थोडीच ऐकणार आहे? हे इतके नियमित होते की त्या बाईच्या नवर्याने शेवटी त्याच्या बायकोला नविन मन्गळसूत्र करुन दिले!
पुढे बरीच वर्षे गेली, लिम्बी ते गाव सोडून गेली दुसरीकडे! पुढे यथावकाश लग्न झाले!
परत एकदा ती त्याच गावी गेली होती! पन्चक्रोशीतले गाव, अर्थातच लिम्बीच्या नवर्याबद्दल त्यान्नाही माहित होतेच! त्या घरी गेली जिचे मन्गळसूत्र घालायची!
त्या घरच्यान्नी काय म्हणावे? "गाढवे, तेव्हा नको नको म्हणून सान्गुनही कुमारीवस्थेत मन्गळसुत्र घालून गावभवानीसारखी फिरत होतीस ना? मग आला ना आता नशिबी म्हाताराच नवरा? "
(आमच्या वयात ८ वर्षान्चे अन्तर आहे आणि मी विमानतळाचा मालक आहे
रुढी अन त्यामागचे ठोकताळे मलाही सर्वस्वी माहित नाहीत, पण त्यात बरेच तथ्य असते हे देखिल तितकेच खरे! सगळेच झूठ झूठ म्हणून सोडून देता येत नाही, किमान मला तरी!
अजून एक संताप आणणारी गोष्ट,
अजून एक संताप आणणारी गोष्ट, ज्या धार्मिक कार्यात उभयंतांची गरज असते पण जर त्यातील स्त्री हयात नसेल तर पुरूष कनवटीला सुपारी लावून ते कार्य पार पाडू
शकतात. मग विधवा स्त्री बाजूला नारळ ठेवून का नाही करू शकत?
<< मंगळसूत्र = taken हे एक
<< मंगळसूत्र = taken हे एक कारण आहेच पण या कारणात सुध्दा पुन्हा पुरुषाचा मालकी हक्क च आला.
मग (हिन्दू समाजात) पुरुषां साठी काही चिन्ह का नाहीत , ती सोयीस्कर पणे टाळली आहेत आणि वर स्त्रीयांना दिलेली चिन्हं कशी त्यांच्या हिताची आहेत हे नियम करून ठेवलेत त्याला ऑब्जेक्शन !>> अनुमोदन.
मी ही आईचं जुनं मंगळसुत्र
मी ही आईचं जुनं मंगळसुत्र घालुन फिरायची लहानपणी..पण मला नाही मिळाला म्हातारा नवरा
मामी,अनुमोदन!! तसेच
मामी,अनुमोदन!!
तसेच थायलंडमधील एका जमातीतील स्त्रियाना "सुंदर" सिसण्यासाठी गळ्याभोवती किलो किलो वजनाचे ब्रासचे कॉइल्स गुंडाळावे लागतात जेणेकरून त्याची मान खूपच लांब होइल!!
द. आफ्रिकेमधला तो प्रकार देखील तसाच भयानक आहे!! अशीच प्रथा अरब समाजात देखील आहे.
वयात आलेल्या मुलीला साडी नेसून ओटी भरण्याचा विधी माझा केला होता. (पण मला आज्जीने ड्रेस मटेरियल आणले होते) त्यावेळेला जास्त काही समजलं नव्हतं पण आईने आणि आज्जीने "यापुढे कशी काळजी घेशील" (आरोग्य/ हायजिन) या बाबतीत दिलेली माहिती खूप चांगली होती. नंतर कॉलेजात आपल्यासोबत शिकणार्या मुलीना इतके बेसिक हाय्जिन कळत कसे नाही याचे आश्चर्य वाटत रहायचे!! पण तो वेगळ्या बीबीचा विषय आहे!
अजून मला सर्वात जास्त चीड आणणारी प्रथा-- लग्नानंतर स्त्रीचे नाव बदलणे!! (आडनाव सोडूनच द्या!!) मग नाव बदलायच्या विधीच्या आधी त्या स्त्रीचे जुन्या नावाने श्राद्ध घालायची पद्धत पण हवीच होती ना?? म्हणजे मग जुने सारे विसरायला सोपे त्या बाईला.
त्यातही हास्यास्पद प्रथा-- नवर्याच्या नावाला मॅच होणारी नविन नाव ठेवायचे!!
उदा. प्रणाली प्रविण, सुहानी सुरेश, सिमरन राज (या जोडप्याने पळून जाऊन लग्न केलेले आहे हे सांगायला नकोच) गौरी गिरीश. इत्यादि इत्यादि.
मुग्धा, कितीवेळा
मुग्धा, कितीवेळा म्हणण्यापेक्षा किती काळ - वर्ष्-महिने फिरायचीस ते सान्ग!
मंगळसूत्र घालणे , टिकली
मंगळसूत्र घालणे , टिकली लावणे, पैजण घालणे, जाचाचे कसे आहे? हे कोणी समजावुन सांगेल का?
कारण बीबी चा विषय "स्त्रिया आणि खटकणार्या/ जाचक प्रथा" असा आहे..
मंगळसूत्र घालणे , टिकली
मंगळसूत्र घालणे , टिकली लावणे, पैजण घालणे, जाचाचे कसे आहे?>>>>>
हे जाचाचे नाही. पण केवळ लग्न झालय म्हणून /नवरा जिवंत आहे म्हणून / स्त्री आहे म्हणून घालायला लावणे जाचाचे.
माझे दत्तक विधान झाल्याने
माझे दत्तक विधान झाल्याने सहावीतच आड्नाव कायदे शीर रीत्या बदलले होते त्यावर एक सर वर्गात हसून जोक करते झाले होते बघा हिचे आताच आड्नाव बदलले. I could have kicked him where it hurts. so angry I was.
एक वैयक्तिक अनुभव शेअर करत आहे. आइ बाबा दोघे वारल्यावर ही बाबांची अंगठी व आइचे मंगळसूत्र माझ्याकडे खूप दिवस होते. ते दोन्ही हातात घेतले की एक अजब ऊब जाणवत असे. त्यांचे ५० हून जास्त वर्शांचे सहजीवन
आपल्या हातात सामावले आहे असा काहीतरी हॅरी पॉटर टाइप अनुभव येत असे मला. लैच भावनाप्रधाने मी.
मंगळसूत्र घालणे , टिकली
मंगळसूत्र घालणे , टिकली लावणे, पैजण घालणे, जाचाचे कसे आहे?>>>>>
हे जाचाचे नाही. परंतु केवळ नवरा जिवंत असणार्या स्त्रियांनाच हे घालता येते. विधवांना नाही. त
मुळ मुद्दा हा आहे की या सर्व चिन्हांमुळे बायका - बायकात भेदभाव निर्माण केला जातो. जो पुर्णतहा अयोग्य आहे. त्यामुळे हे प्रकार 'जाचक' नसले तरी विधवेच्या द्रुष्टीकोनातुन विचार करता नक्कीच खटकतात.
/नवरा जिवंत आहे म्हणून />>
/नवरा जिवंत आहे म्हणून />> स्टेट्स चेंज खरेच होते. पदोपदी जाणवते. मी उगीच लिहीत नाही. पण भारतात तरी लोकांच्या वागणूकीत जबरदस्त फरक पड्तो.
मला ह्ळदी कुंकू, मंगळागौर, करवाचौथ, वट सावित्री, हरताळका प्रचंड बोअर प्रकार वाट्तात.
गौर सजवायला आवड्ते पण ते बाया नटून एकच ताट्लीत दिवा आणि जय गौरी मंगळागौरी वगैरे म्हणतात तेव्हा
जाम हसू येते. किती तो भाबडेपणा.
Their days of staying married are numbered. It will not extend by doing such foolish self- deceiving things. Personally, I won't feel secure by doing such rituals but by knowing I had the full complete love of my man and by reading my bank statement showing a million bucks.
बोड्ण हा पण एक लो इंटेन्सिटी पीळ आहे. चलता है.
नवरा जिवंत आहे म्हणून />>
नवरा जिवंत आहे म्हणून />> स्टेट्स चेंज खरेच होते. पदोपदी जाणवते. मी उगीच लिहीत नाही. पण भारतात तरी लोकांच्या वागणूकीत जबरदस्त फरक पड्तो. >>>>>>AGREED MAMI
>>>>> नवरा जिवंत आहे म्हणून
>>>>> नवरा जिवंत आहे म्हणून />> स्टेट्स चेंज खरेच होते. पदोपदी जाणवते.<<<<
हे केवळ बायकान्चे बाबतीतच होते व नवरा-बायको या नात्यापुरतेच होते हे कशावरुन?
आई किन्वा बाप, कोणतरी एक वा दोन्ही, लहानपणीच मेला/मेली/मेले तर पोराकडे बघायच्या नजरा वेगळ्या अस्तात, वागणू़क वेगळी अस्ते
बायको मेली तरी पुरुषाकडे वेगळ्ञाच नजरेने/अपेक्षेने बघितले जाते
ब्रह्मचारी पुरुषाच्या अडचणी तर त्याहुन वेगळ्या....! उघड चर्चाही अशक्य वाटावी!
<> स्टेट्स चेंज खरेच होते.
<> स्टेट्स चेंज खरेच होते. पदोपदी जाणवते. मी उगीच लिहीत नाही. पण भारतात तरी लोकांच्या वागणूकीत जबरदस्त फरक पड्तो. >>
ह्याच विषयावर चर्चा अपेक्षित होती मला.
पुरुष अविवाहित , विवाहित , विधुर , घट्स्फोटित इ. काहीही असला तरी त्याला समाजाकडुन सारखीच वागणुक मिळते. परंतु स्रीसाठी marrital status मधिल change पुर्ण आयुष्य बदलणारा ठरतो. आणि ही सर्व चिन्हे आणि लोकांची नजर सतत तिला तिच्या वैवाहिक स्थितीची जाणीव करुन देतात.
उदा. विवाहीत स्त्री , जिचा नवरा जिवंत आहे तिला या सर्व गोष्टिचे काहीच विषेश वाटणार नाही. म्हण्जे मंगळसुत्र घातले किंवा नाही तरी सधवेला काही वाटणार नाही. कारण तिला माहित आहे की मझा नवरा जिवंत आहे.पण विधवेला मात्र सवयीचे मंगळसुत्र गळ्यातुन उतरावयाला लागल्यावर सतत तिच्या 'विधवा'पणाची जाणीव होत रहाणार.
त्यामुळेच विधवा, घट्स्फोटीता किंवा प्रौढ कुमारीका ह्याना समाजाच्या मुख्य प्रवाहतुन बाहेर ढकलण्यात या सर्व प्रथांचा थोडाफार का होइना हात भार लागतोय असे मला वाटते. केवळ म्हणुनच या प्रथांचा विरोध करावासा वाटतो.
ब्रह्मचारी, विधुर पुरूषांना
ब्रह्मचारी, विधुर पुरूषांना अडचणी असतील त्या वैयक्तिक असतील, (म्हणजे नात्याची गरज, कंपॅनियनशिप, शेअरिंग, एकटं वाटणं, मुलांच्या संगोपनात मदत हवी असणं) पण कोणी त्यांना टोमणे मारलेत, घालून्-पाडून बोललंय, किंवा विधुर आहे म्हणून लग्नाला बोलवणं टाळलंय हे निदान मी तरी कधी ऐकलं नाहिये.
हे केवळ बायकान्चे बाबतीतच
हे केवळ बायकान्चे बाबतीतच होते व नवरा-बायको या नात्यापुरतेच होते हे कशावरुन?
आई किन्वा बाप, कोणतरी एक वा दोन्ही, लहानपणीच मेला/मेली/मेले तर पोराकडे बघायच्या नजरा वेगळ्या अस्तात, वागणू़क वेगळी अस्ते
बायको मेली तरी पुरुषाकडे वेगळ्ञाच नजरेने/अपेक्षेने बघितले जाते
ब्रह्मचारी पुरुषाच्या अडचणी तर त्याहुन वेगळ्या....! उघड चर्चाही अशक्य वाटावी!>> अगदी प्रचंड अनुमोदन.
पोरकी मुले, कारे पुरुष फार वाइट परिस्थिती रे. माझी एक्ट्या विधूर/ ब्रह्मचारी पुरुषांना फार साहानुभुती आहे. पण त्यांच्याशी फार बोलले तर आपल्यावरच वाइट संशय येतो. म्हणून मी फार कोणाशीच बोलत नाही. इथे जनसंपर्क आहे तो बास आहे. एकटी बाइ तरी समाजात फिट होते पण एक्टा पुरुष कुठेच फिट होत नाही सर्वच बाबतीत उपासमार होते.
हे तात्विक द्रुष्ट्या ठीक वाट्ले तरीही प्रत्यक्षात मी नवर्याच्या सिंगल मित्रांचे घरी येणे आजिबात बंद केले आहे. तो असताना काही प्रोब्लेम नव्हता पण आता बरोबर वाटत नाही. शेजारी तर असे दिवटे आहेत कि घरी सुतार इलेकट्रीशीअन आला तरीही घरी येऊन बगून जातात काय चालले आहे. आता मला काही वैयक्तिक चॉइस नाही का? इत्की मी वेडी असेन का? उगीच क्यायच्या काय. खूप राग येतो मला. कुरीअरचे पार्सल घ्यायची पण चोरी.
>>तसेच थायलंडमधील एका
>>तसेच थायलंडमधील एका जमातीतील स्त्रियाना "सुंदर" सिसण्यासाठी गळ्याभोवती किलो किलो वजनाचे ब्रासचे कॉइल्स गुंडाळावे लागतात जेणेकरून त्याची मान खूपच लांब होइल!!<<
थायलंड की अफ्रिका? असो..
सौंदर्याच्या तत्कालिन, तद्देशीय कल्पनांपायी शरीराला त्रास करून घेण्याच्या(स्त्रियांच्याच) पद्धती प्रत्येक संस्कृतीत आहेतच.
चिनी मुलींचे पाय बांधणे - पाय छोटे दिसणे हे सौंदर्याचे लक्षण म्हणून.
युरोप आणि पाश्चात्य संस्कृतीतल्या कॉर्सेटस ज्या लहानपणापासून घालाव्या लागत जेणेकरून मुलींचे शरीर वाढताना 'योग्य' किंवा 'सुंदर' त्या आकारात वाढेल. 'योग्य' किंवा 'सुंदर' आकाराची संकल्पना हा काळानुरूप बदलत असे आणि त्याप्रमाणे कॉर्सेटचा आकारसुद्धा. एखाद्या काळात पुरूषाला ज्या प्रकारची स्त्री सुंदर वाटत असेल त्या 'योग्य' किंवा 'सुंदर' आकाराप्रमाणे कॉर्सेटस बदलत असत. ते तसं न वापरणार्या स्त्रीला असभ्य, दासी वर्गाची इत्यादी समजले जाई. या योग्य त्या आकारात शरीर वाढवण्याच्या हट्टामधे बायांचे व्हिसेरल ऑर्गन्स इकडे तिकडे सरकत, पाठीच्या कण्यात शक्ती नसे परिणामी बाळंतपण अती अवघड जाई आणि आयुर्मर्यादा ३५-४० च्या पुढे नसे. पार मध्ययुगीन काळापासून दुसर्या महायुद्धापर्यंत हा कॉर्सेटसचा प्रवास होता. याच कॉर्सेटस मधून स्त्रियांच्या ब्रेसियर्स निर्माण झाल्या. या संदर्भांना धरूनच पुढे १९७० च्या दशकातले स्त्रीमुक्तीसंदर्भातले एक महत्वाचे प्रकरण घडले. अनेक स्त्रियांनी एकत्र येऊन आपल्या ब्रेसियर्स जाळल्या. पुरूषांच्या दृष्टीला भावेल तसे आमचे शरीर घडवण्यासाठी आम्ही आमच्या शरीराची नासाडी करून घेणार नाही हे सांगण्यासाठी म्हणून हे प्रतिकात्मक पाऊल होते. दुर्दैव हे की हा संदर्भ माहीत नसताना फार सहजपणे 'अतिरेकी स्त्री मुक्ती वादी बाया' या अर्थी 'ब्रा बर्निंग फेमिनिस्ट' हा शब्द वापरला जातो.
जरा आज उद्या वेळ झाला तर केवळ आकारांच्यातले बदल दर्शवणारे चित्र टाकते.
पण विधवेला मात्र सवयीचे
पण विधवेला मात्र सवयीचे मंगळसुत्र गळ्यातुन उतरावयाला लागल्यावर सतत तिच्या 'विधवा'पणाची जाणीव होत रहाणार.
त्यामुळेच विधवा, घट्स्फोटीता किंवा प्रौढ कुमारीका ह्याना समाजाच्या मुख्य प्रवाहतुन बाहेर ढकलण्यात या सर्व प्रथांचा थोडाफार का होइना हात भार लागतोय असे मला वाटते. केवळ म्हणुनच या प्रथांचा विरोध करावासा वाटतो.>> तसे नाही ते. जसे ब्राम्हणास जानवे तसे सौभाग्यवतीस मंगळसूत्र. कितीतरी विधवा सोन्याची चेन घालून डिग्निफाइड दिसतात. एकदा आपणच नीट ग्रुहस्थाश्रमातून वानप्रस्थाश्रमात जाण्याची तयारी ठेवली ना कि मग सजलेली तरुण ग्रुहीणी लै ग्वाड दिसते. व शोभून दिसते. एक जीवनातील फेज संपल्याशिवाय दुसरी महत्त्वाची फेज चालू होत नाही. अर्थात हे वैयक्तिक मत आहे. तरूण पणी नवरा गेला तर अतिशय अवघड असणार.
एका प्रवाहातून बाहेर पड्ले की दुसर्या महासागराचा आपण भाग बनूनच जातो. ( फक्त भारतातील अनुभव)
मंदिरात जाताना कोणत्याही प्रकारचे डिस्क्रिमिनेशन नसते. जे लाल कुंकू आपण पतिसाठी लावत होत व आता लावत नाही ते बाजुला ठेवून देवासमोरील हळद कूंकू लावताना फार चांगले सकारात्मक भाव मनात येतात.
अगदी मुलुंडातील अंबाजीधाम चा अनुभव आहे. विधवा म्हणून कोणी ही बाजूला बसा म्हणत नाही. समाज कार्य करताना काहीच प्रशन येत नाहीत. अय्यप्पा स्वामी चे व्रत देखील पुरुष व पोस्ट मेनोपॉजल स्त्रीयांसाठी आहे.
म्हणजे एक प्रकारची समानता आणण्याच प्रयत्न केला आहे. अर्थात या साठी थोडी देवावर विश्वास व आध्यात्मिक बैठक जरुरी आहे.
माझ्या लहानपणी शेजारी काही
माझ्या लहानपणी शेजारी काही मुस्लिम कुटुंबे होती. त्यांना बरीच मुले. लहानपणी मुलांची ती सुन्नी करुन घेणे (की खत्मा हे नाव आहे त्याला?) तो प्रकार पाहून तेव्हां आणि आत्ता आठवहूनही अगदी अंगावर शहारे येतात. भूतकाळात डोकावून पाहिले तर कमीअधिक प्रमाणात स्त्रि-पुरुष दोघांवर निर्बंध - प्रथा होत्या.
माझ्या लहानपणी शेजारी काही
माझ्या लहानपणी शेजारी काही मुस्लिम कुटुंबे होती. त्यांना बरीच मुले. लहानपणी मुलांची ती सुन्नी करुन घेणे (की खत्मा हे नाव आहे त्याला?)>> सुंता. त्याला काही आरोग्यदायक पार्श्वभूमी आहे म्हणतात.
अनुमोदन. पुरुषांवरही खूप निर्बंध होते.
>>आरोग्यदायक पार्श्वभूमी >>
>>आरोग्यदायक पार्श्वभूमी >> मामी, माझी ऐकिव माहीती तर निराळीच आहे.
प्रथम संबंधांच्या वेळी त्रास होऊ नये म्हणून करतात म्हणे... (खखोदेजा):अओ:
या बया मेरेकु शरम आती.
या बया मेरेकु शरम आती.
इथे वर कुणितरी
इथे वर कुणितरी म्हणल्याप्रमाणे, स्त्रियाच कधी कधी स्त्रियन्च्या जाचाला कारणिभुत होतात.
किती सासु (वा आइ) म्हणतात,अमुक एक गोष्ट मला सक्तिने करावे लागली,-
१)तु तुझ्या नणन्देला /भावजयीला असे नको करु देऊ.
२)तु तुझ्या बायकोला नको घालुस अमुक बाबतीत बन्धन.
३)मला नाही सासुबैनी नोकरी करुन दिली,माझ्या सुनेला मि मदत करीन शिक्षणात.(हे अती झाले)
न पेक्षा, आमच्यावेळी नव्हती असली थेर..हच सुर जास्त दिसतो.अथवा आम्ही नाही का केले,त्यानाही
आलेच पाहिजे रिती भाती !!!
सान्गायचे हेच की, एखदी गोष्ट होउसेने करणे वेगळे आणि सक्तिने वेगळे.
कदाचित जनरीत अशी असली, की लग्नाआधी फक्त कुन्कु लावाय्अचे नन्तर नाही,तरिहि बण्ड हे झालेच असते.
जेव्हा स्त्रीच हा विचार करेल आणि आचरणात आणेल की मला जे भोगावे लागले ते मी मुलीला किवा सुनेला
नाही भोगु देणार् (अर्थात प्रसन्गी पाठीशी उभी राहुन),तेव्हाच यात फरक पडेल.
स्त्रीच स्त्रीची शत्रू हे
स्त्रीच स्त्रीची शत्रू हे म्हणणं मला खूपच वरवरचं वाटतं.
स्त्री ही माणूस आहे. समाजाचा घटक आहे. जाचक रूढी परंपरांचा आग्रह ती वैयक्तिक रित्या धरण्यापेक्षा समाजाच्या आग्रहाला बळी पडून धरत असते.
जेव्हा या आग्रहाला घरातला पुरूष विरोध करत नाही त्याचा अर्थ तोही त्याच बाजूने असतो किंवा विरोध न करण्यातली, भूमिका न घेण्यातली जी सोय आहे ती त्याला महत्वाची वाटते. अश्या पुरूषालाही शत्रूपक्षातच टाकलं पाहिजे.
हौस आणि आवड असेल तर दागिने
हौस आणि आवड असेल तर दागिने आणि सौभाग्यचिन्हं वापरणं ठिक हे तर झालंच हो, पण दुसर्याला मुळात त्याचा स्वत:चा "चॉईस" असतो त्याचा आपण "आदर"
करायला हवा हे काहीं लोकांच्या गावी सुद्धा नसतं.. तिथेच घोडं पेंड खातंय..
शत्रू नाही पण खरी मैत्रिणही
शत्रू नाही पण खरी मैत्रिणही नाही होत हेही आहे!!
मी हे खुप वेळा पाहिले आहे आणि अजुनही शहरात सासुसाठी केवळ सुनेला/मुलीला चार दिवस बाजुला बसताना
पाहिलेय.हे सर्सकट सगळीकडे नसेल पण आहे.
निरजा, मला जास्त वाइट या गोष्टीचे वाटते की जर समाजाने सगळी सुत्र पुरुषाच्या हातात दिली असली असे मानले तर का नाही ते पुढाकार घेत् हे मोडुन काढायला?शेवटी कर्वे आणि फुले याना तर स्त्रिया दुवाच देतात की नेहमी!!!
>>जेव्हा या आग्रहाला घरातला पुरूष विरोध करत नाही त्याचा अर्थ तोही त्याच बाजूने असतो किंवा विरोध न >>करण्यातली, भूमिका न घेण्यातली जी सोय आहे ती त्याला महत्वाची वाटते.
---पण इथेही हे तुझे चुकतेय असे ठामपणे (प्रसन्गी वाइट पणा पत्करुन) ज्या दिवशी ती सान्गेल तो सोन्याचा दिवस!!!
सौभाग्यचिन्ह किंवा कुठलाही
सौभाग्यचिन्ह किंवा कुठलाही दागिना प्रत्येकाने आपल्या आवडीने घालावा. लोक काय म्हणतात किंवा म्हणत नाही म्हणुन नाही. मला वाट्त घालावासा घातलं नाही वाटत नाही घातलं. त्याला जास्त मह्त्व देउ नये>>>>>>>> अनुमोदन्, काहिजण जीन्सवर टिकली लावली तर हसतात, का? आधीतर जीन्सवर nosering घालणे पण गावंढळ मानले जायचे,आता सर्रास बायका ते वापरतात.
Pages