मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार

मारुती सुझुकी आणि टाटा स्टील बद्दल सांगू शकशील का? मी अनुक्रमे १४६५ आणि ६२९ ला घेतले आहेत. ठेवावेत का काढावेत?

केदार आणि तज्ञ मित्रहो,मला एक दोन वर्षा साठी २ लाख गुन्तवायचे आहेत्.वाढीची अपेक्षा २० टक्क्याच्या आस पास आहे?
कुठे टाकू??माझ्या कडे डी म्याट आहे.

रेव्यू, इथे आमच्या सगळ्यांच्या मते तज्ञ एकच आहे तो म्हणजे केदार आणि ह्या बी.बी. वर मित्रांपेक्षा मैत्रिणीच जास्त येतात. Proud

केदार, रिलायन्स कम्युनिकेशन बद्दल सांगाल का? biggest looser! Angry
७४० वर घेतलाय .. लॉस कमी होण्याचे काही चान्सेस की आताच काढुन टाकु?

आणि Jaiprakash Associates (265),Reliance Petro(173) हे पण असेच बॅड परफोर्मर्स.. लॉस बुक करावा का? प्रोफिट्ची आशा नाहीच आहे पण लॉस कमी करता आला तरी चांगलंच असेल!

'आउटलूक मनी' च्या ताज्या अंकात एअरटेलवर विश्वास व्यक्त केलाय. केदारने सांगितलेले मुद्दे पण विस्ताराने आहेत. त्यात अस लिहीलय की शॉर्ट टर्म मध्ये या शेअरवर दबाव असणार आहे, पण भविष्यात परतावा चांगला मिळेल. त्यामुळे या स्टॉकवर लक्ष ठेवायला पाहिजे Happy

ऑटो सेक्टरचे फेब्रुवारीचे आकडे जबरदस्त आहेत. त्यामुळे या सेक्टरमध्ये मस्त वाढ दिसतीय.
केदार, ऑटो सेक्टर मध्ये काही गुंतवणुक करावी काय? हिरो-होंडा, मारुती यांचे भाव चांगलेच वाढलेत.

केदार.....

आपण देत असलेली माहीती खूप उदबोधक वाटली.

मला शेअरमार्केटमध्ये लाँगटर्म गुंतवणूक करायची आहे ३-५ वर्षांसाठी. सुमारे ५ लाख रुपये.

मिड्कॅपमधील फास्टग्रोईंग कंपन्या सुचवाल का ? थोडी रिस्क घेण्याची तयारी आहे.

धन्यवाद !!

भालचंद्र हो नक्कीच सुचवेल. मागच्या पानावर काही मिडकॅप लिहीले आहे. तुम्हाला कुठले स्पेसिफक सेक्टर हवे असतील तर सांगा, त्याप्रमाणे अजून लिहता येईल.

रेव्यु मागच्या पाणावर काही स्टॉक्स तुम्ही विचारल्याप्रमाणे लिहीले आहेत.

मारुती सुझुकी - २०१० एकंदरीत अ‍ॅटॉ सेक्टरसाठी चांगाले राहिल असा माझा प्राथमिक अंदाज आहे. टाटा मोटर्स, महिन्द्रा व मारुती हे तिन्ही हेविवेट खूप चांगले परफॉर्म करत आहेत. २००८ -९ मध्ये ज्यांनी जॉबच्या भितीने कार घ्यायचे टाळले ते सर्व आता घेत आहेत. जाने व फेब मध्ये कार विक्रीचा मारुतीने उच्चांक प्रस्थापित केला आहे.
पण शॉर्टटर्म मध्ये हा समभाग चॉपीट्रेड मध्ये आहे, भरपुर प्रेशर येत आहे कारण गेल्या ५,६ सेशन्स मध्ये १५०० ब्रेक व्हायला अवघड जात आहे, १४३० च्या आसपास भरपुर सपोर्ट आहे. सप्टे मधला १७०० चा उच्चांक दिर्घकालावधीत (६ महिने) नक्कीच गाठेल असे वाटते. त्यामुळे शॉर्ट न फॉलो करणार्‍यांनी बाय ऑन डिप्स. आणखी एकदा करेक्शन होणार त्यात हा समभाग घ्यायला हरकत नाही.

टाटा स्टिल - शॉर्ट टर्म मध्ये खूपच प्रॉब्लेम. ६४०-४५ च्या लेवलला रेसिस्टन्स. पण ५६० लेवलला फर्म सपोर्ट. लाँग टर्म ठेवणार असशील तर लोअर लेवलला अ‍ॅव्हरेज कर. फ्युचर पोझीशन असेल तर लॉस बुक करुन स्टे अवे. हे वर्षपण इन्फ्राचे आहे, त्यामुळे स्टील डिमांड मध्ये राहणार.

चिंगी, आरकॉम तितका वर नाही जाणार. खरेतर आधी लिहल्याप्रमाणे टेलकॉमचेच भवितव्य फार खास नाही. त्यातल्या त्यात भारती चांगला आहे. आरकॉम तर दिवसेंदिवस नवे लो घेत चालला आहे. रेंज मध्ये परत १७० येऊ शकतो. काढून टाका.

Reliance Petro - चे तर रिलायन्स इंडस्ट्रिज सोबत मर्जर झाले आहे. तो आता ट्रेड होत नाही. तुम्हाला मागच्या नोव्हे मध्ये पेट्रोच्या बदल्यात रिलायन्स मिळाला असेल. डिमॅट बॅलंस चेक करा. तिथे तुम्हाला दिसेल, मग तो पोर्टफोलियोत टाका म्हणजे ट्रेडही करता येईल.

Jaiprakash Associates - १६६ येईल असे वाटते. १०० चा लॉस दिसतोय. थोडा वाढेल, आत्ता नका काढू. रोज लक्ष ठेवा. सलग दोन एक दिवस चांगला वाढला (१६० +) की लॉस बुक करा. २५०+ लेव्हल येणे सध्यातरी शक्य नाहीये.

Indo-tech trfrs - लॉस मेकिंग कंपनी आहे. सध्या तरी २६५ ला सपोर्ट दिसत आहे. अपला फारतर ३२०. एखादी पॉझिटिव्ह बातमी आली तर वर जाऊ शकतो.

केदार... धन्यवाद हा बाफ सुरू केल्या बद्दल... सुमारे वर्षाच्या कालावधी नंतर तुझे विश्लेषण वाचतोय... Happy

शिपिंग - एबिजी शिपयार्ड, मर्केटर लाईन्स >>> MERCAT बद्दल सांगयचे तर सध्या नायजेरीयाचा प्रोजेक्ट हातात आहे... २००७-०८ मधे २००% तर २००८-९ मधे ११०% Div. दिलेला आहे...

JAIPRA Intraday साठी कसा आहे?

२००७-०८ मधे २००% तर २००८-९ मधे ११०% Div. दिलेला आहे...
>>
एवढा डिव्हिडंड दिला? EPS तिप्पट वाढले का २००७-२००८ मध्ये?

इंद्रधनुष्य , माझ्याकडे ५० आहेत Mercator Lines , ६७ ल घेतलेले , तेव्हापासून तो खालीच जात आहे , मी विचारणारच होते की लॉस बूक करू का वाट बघू ?

मर्केटरची रेंज ६० ते ८० आहे. वाट पाहा. तिकडे नक्कीच जाईल, शिवाय खालच्या लेवलला अ‍ॅव्हरेज करा.

NMDC ३०० च्या रेंज मध्ये खूप चांगला आहे, मी लोअर बॅन्डला अप्लाय केले आहे. १ वर्षात तो ४३०-५० पर्यंत जाईल असे वाटते.

इन्द्रा मला रात्रभर जागता येत नाही त्यामुळे इन्ट्राडे करत नाही. पण काही वाटले तर इथे नक्कीच टाकेन.

केदार.......

मला अपेक्षित सेक्टर्स खालीलप्रमाणे:
ऑटो
इन्फ्रा
मेटल
टेक्नॉलॉजी
फार्मा
बँकिंग
आणि या व्यतिरिक्त इतर कोणतेही तेजी दर्शविणारे सेक्टर्स........

यातील......मिड्कॅपमधील फास्टग्रोईंग कंपन्या सुचवाल का?
स्मॉलकॅपमधील चांगल्या कंपन्यादेखील चालतील. थोडी रिस्क घेण्याची तयारी आहे.
फक्त लाँगटर्म गुंतवणूकीसठी...... शेअर्स खरेदी करून ३-५ वर्षांकरिता विसरून जाणार !!

धन्यवाद .

बँकिंग मध्ये आधी लिहील्याप्रमाणे बँक ऑफ बडोदा (पिएसयु मध्ये), ओरियन्टल बँक आणि साउथ इंडियन बर्‍या वाटत आहे.

मी व्हॅल्यू मिडकॅप कंपन्या शोधायला सुरु केले आहे. ( इपिएस १५ +, पिई १० +/-) इथे लिस्ट टाकतो दोन चार दिवसात. Happy

पुणेस्थित पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेडचा आयपीओ आहे. १६ ते १८ मार्च दरम्यान.
मला आयटी क्षेत्रातली फारशी अक्कल नाही. नक्की काय करते ही कंपनी?
केदार, या कंपनीला/शेअरला प्रॉस्पेक्ट्स आहेत का?

>>> पुणेस्थित पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेडचा आयपीओ आहे. १६ ते १८ मार्च दरम्यान.

पर्सिस्टंट ही KPIT, Infosys, Wipro इ. प्रमाणे IT Solutions कंपनी आहे. त्यांचे २ हजार हून अधिक कर्मचारी आहेत.

कंपनीचे पत्रक आधी नीट वाचा. त्यांचा EPS (कमीत कमी १.0 पेक्षा जास्त पाहिजे) व Net Profit Margin (Net Profit After Tax - हे किमान १८ टक्के तरी असावे) किती आहे ते बघा. बर्‍याच Financial Sites वर IPO चे Analysis येते. त्यात IPO ची किंमत व Premium योग्य आहे का नाही याचे विश्लेषण दिलेले असते. ते वाचून ठरवा. तुम्ही जेवढ्या जास्त प्रमाणात IPO ला पैसे भराल तेवढी तुम्हाला शेअर मिळण्याची शक्यता वाढते व शेअर्स सुद्धा जास्त प्रमाणात मिळतात. Individual Investor ना एक लाख रू. पर्यंत IPO ला apply करता येतो. ICICI Direct, HDFC Securities इ. Online Trading Sites वरून IPO ला apply करणे अगदी सोपे आहे. केवळ १-२ मिनिटात apply करता येतो.

सध्या IT Sector फॉर्मात असल्यामुळे पर्सिस्टंटला प्रतिसाद चांगला मिळेल असे वाटते. IT Sector Boom परत सुरू होत असल्यामुळे हा शेअर लगेच वाढेल असे वाटते. पण उगाच अवाच्या सवा किंमत लावली असेल तर IPO ला apply करण्यात नाही.

पर्सिस्टन्ट च्या IPO ची माहिती

Persistent Systems Limited: IPO opens on March 17, 2010
Price Band fixed between Rs. 290 and Rs. 310 per Equity Share
Issue has been graded by CRISIL as 4 on 5

Persistent Systems Limited (the "Company"), a market leader in outsourced software product development services, is tapping the capital market on March 17, 2010 ("Issue Opening Date"), with an Initial Public Offering ("IPO") of 5,419,706 equity shares of Rs. 10 each ("Equity Shares") for cash at a price (including a share premium) to be decided through a 100% book-building process (the "Issue"). The Bid/ Issue will close on March 19, 2010 ("Issue Closing Date").

The Company is, an outsourced product development (OPD) specialty company, offers customers the benefits of offshore delivery. The Company designs, develops and maintains software systems and solutions, create new applications and enhance the functionality of customers' existing software products. The Company delivers services across all stages of the product life-cycle and works with a wide range of customers to develop enhance and deploy customers' software products. The Company has been recognized as one of the leading technology companies in the Deloitte Touche Tohmatsu Technology Fast 500 Asia Pacific 2009.

The Company has depth of experience in the focused areas of telecommunications, life sciences and infrastructure & systems. The Company has invested and plans to continuously invest in new technologies and frameworks in the areas of cloud computing, analytics, enterprise collaboration and enterprise mobility. The Company is a technology innovator and helps customers build software solutions. This was publicly recognized when the Company won the 2008 NASSCOM Innovation Award. Over the past five years, the Company has contributed to more than 3,000 product releases for customers.

As of December 31, 2009, the Company has over 37 customers that have over $1 billion in annual revenue. The Company has long-standing relationships with customers, built on its successful execution of prior engagements. The Company has invested in building a team of more than 3,700 software professionals well-versed in the product development process.

The Price Band has been fixed between Rs. 290 and Rs. 310 per Equity Share. This Issue has been graded by CRISIL Limited as 4 on 5, indicating above average fundamentals.

केदार,
तुम्ही एशियन इलेक्ट्ऑन्किस बद्द्ल लिहिले होते. सध्या २९:९० ला आहे. कसा आहे?

मामी तो स्टॉक स्प्लिट झाला आहे. १:५ मध्ये. १ शेअरचे ५ झाले आहे. (मुळ भाव १० रु आता प्रत्येकी २ रु).

असुद्या तुमच्याकडे. चांगला आहे तो. ते व्हाय ब्रदरला मी व्हाय बॉदर वाचले. Happy

Asian Electronics - बद्दल अजून नक्की काही सांगता येत नाही. थोडा रिसर्च करुन आणखी सांगतो.

लाँग टर्म साठी Airtel घेतला तरी हरकत नाही, थोडा पडल्यावर घ्या. आरकॉम मध्ये फारसा काही दम (व्हॅल्यू बेस्ड) दिसत नाही.

भाऊ
NHPC सध्या अन्डर प्रेशर आहे. त्याला मागच्या वर्षी ३० च्या आसपास सपोर्ट मिळाला होता. विक्रेते रोज त्याला पाडत आहेत. खूपच विक आहे. येते ४-५ सेशन लक्ष ठेवा. तिथे जर सपोर्ट घेऊन एक अपमुव्ह घेतली की लगेच बाय करा. सहा एक महिन्यात तीन ते चार रु वर जाईल तो असे वाटते.

LNT १४५० रेंजला घेतला असता तर मजा आली असती. तुम्ही हा स्टॉक येते ५ वर्ष कधिही घेऊ शकता. निफ्टी सध्या रेंज बाउन्ड आहे. त्यामुळे जेंव्हा जेंव्हा तो पडेल तेंव्हा जास्त घेत चला. उदा. उद्या जर (१६३० च्या आसपास) १००० घेतले, आणि तो १५९० झाला तर परत २००० घ्या.

इनफॅक्ट तुम्ही फ्युचर्स मध्ये काही दिवस ही स्ट्रॅटेजी ठेवा. ( निफ्टी ५२०० च्या आसपास आले की दोन लॉट विकत घ्या, ५३०० च्या आसपास गेले की लगेच पहिले कव्हर करुन शॉर्टिंग करा. ते परत खालच्या लेवलला करा. जर नुकसान झाले तर ते फ्युचर लॉट डिलेव्हरी मध्ये कन्वर्ट करा, कारण तसेही तुम्ही १५००० घ्यायच्या विचार करत आहात. पण ह्यासाठी मार्केट वर वर लार्सन वर रोज लक्ष ठेवावे लागेल.

केदार धन्यवाद मला वाट्ले असेच काहीतरी असेल. पण जास्तीचे शेअर्स अलॉट नाही झाले अजून. बाकी सर्व प्लस मध्ये आहे. हीरो होंडाने जबरी डिविडंड दिला आहे. % वाइज सर्वात जास्त. घ्यावेत काय ते शेअर्स.
अपुन हमेसा लॉन्ग टर्म सोचता है.

घ्या. चांगले आहेत. पण आता लगेच घेउ नका. थोडे खाली आल्यावर १९०० च्या रेंज मध्ये घ्या. निफ्टी प्रेशर मध्ये आहे. कदाचित परत एकदा ५१९० - ५२०५ टेस्ट करेल. तेंव्हा घ्या.

बायदवे लार्सन कन्स्ट्रक्शन डिवीजन कडे ६०००० करोड रु चे ऑर्डर बुक आहे, काल आणखी एक १०१७ करोड रु ची ऑर्डर मिळाली आहे.

Pages