कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिरा आणि इतर जरा मांझा वर
प्लीझ कुणी तरी लिहा

मला ति गाडि दिसायल आवाड्ली..मला गाड्यांमधलं फक्त दिसणं कळतं. मान्झा घ्यायची आहे
>>>
निकीता माझ पण तुझ्याएवढच नॉलेज. पण मि कालच गेलेले सफारी बघायला टाटाच्या शोरुम मध्ये. तिथे मन्झा पण होति. मि बसुन वगेरे पाहिल. छान वाटली गाडी. जगा बर्‍यापैकी आहे. सिल्वर कलर मस्त दिसत होता. म्युझिक सिस्ट्म पण छान आहे.

आमच्याकडे (माझ्या दिराकडे) होती सफारी. भरपुर चालवली होती ती गाडी. दिल्ली - औरंगाबाद चकरा पण भरपुर झाल्या होत्या. शेवटचे एक वर्ष इथे दिल्लीला होती गाडी.
कंफर्टेबल असली तरी अगदी पांढरा हत्ती झाली होती शेवटी शेवटी. दरवर्षी ३०-३५ हजाराच्या वर खर्च व्हायला लागला. तरी इंजिन खुप चांगल्या स्थितीत होतं. शेवटी काढून टाकली. ४ लाखाला गेली बहुतेक.

कंफर्टेबल असली तरी अगदी पांढरा हत्ती झाली होती शेवटी शेवटी. दरवर्षी ३०-३५ हजाराच्या वर खर्च व्हायला लागला. तरी इंजिन खुप चांगल्या स्थितीत होतं. शेवटी काढून टाकली. ४ लाखाला गेली बहुतेक.>> अगदी अगदी. माझ्या बॉसकडे होती सफारी. विकता विकली जाईना ती. तुम्ही टाटा गाड्या का घेता. प्लीज दुसर्‍या
ऑप्शन्स चेक करा.

अल्पना किती वर्षा नंतर विकली?
आता माझ्या नवर्‍याकडे मॉडिफाय केलेली जिप्सी आहे. पण आता तो कंटाळला आहे जिप्सीला. फारच काम येत रहात.
आम्हाला SUV च घ्यायची आहे. आता ऑपश्न्स आहेत ते म्हणजे स्कॉर्पियो, इनोव्हा आणी सफारी. आधी स्कॉर्पियो घ्यायचा विचार करत होतो. पण घरातुन अगदि कडाडुन विरोध झाला त्याच्या जिप लुकला. इनोव्हा एक आहे घरात. म्हणुन मग सफारी.

तुम्ही टाटा गाड्या का घेता. प्लीज दुसर्‍या ऑप्शन्स चेक करा. >>> मार्क माय वर्डस मामी, टाटाज विल चेंज द इंडियन कार गेम. अगेन!

ऑफकोर्स तुम्हाला चॅलेंज वगैरे म्हणून लिहत नाहीये. Happy तसा हेतू अजिबात नाही तर फक्त भविष्यातिल घडामोडींचा विचार.

.

जॅगला आणि लॅन्ड रोव्हरला टाटानी दुरदर्शीपणा ठेवून विकत घेतले आहे. इंडिका प्लॅटफॉर्म वर जॅग डिझाईन्सच्या कार भारतात आता धावू लागतील. प्रायमाचे पिक्चर मी इथे पोस्ट केले होते, पण ही फक्त सुरुवात आहे. तसेच १२ ते १५ आणि १५ ते २० लाखाच्या सेगमेंट मध्ये आणखी काहि नविन गाड्या येत आहेत. येत्या ५ वर्षात अनेक नविन मॉडेल्स येतील. सेडान डिझाईन्स साठी जॅग, टाटा आणि एसयुव्ही साठी टाटा, लॅन्ड रोव्हर एकत्र आले आहेत. आरिया हे या SUV सेगमेंट मधिल आणखी एक मॉडेल.

४ लाखाला गेली बहुतेक >> समजा ती गाडी ३ वर्ष वापरली आणि ८ च्या आसपासला घेतली तर माझ्या मते फायद्यातच गेली. ३ पेक्षा जास्त वर्ष वापरली तर उलट तुम्हाला फायदाच झाला असा म्हणावे लागेल.
बिएमडब्लू पण एकदा दुकानाबाहेर आणली की लगेच १५ ते २० टक्यांनी कमी मिळते, २०११ ची ५२८ दुकाता ५२ ते ५५,००० ला मिळते. १५ दिवसांपूर्वी मी व मित्राने, त्याचासाठी फक्त ६८०० माईल चालवलेली ५२८ xi ४१,००० ला घेतली. म्हणजे त्याच इयर मॉडेल मध्ये ६८०० मैल चालवलेली १४००० ने स्वस्त !! अन आम्हि पाहिलेल्या २००८ ची ५२७ मॉडेलची किंमत फक्त ३०,००० च्या आतबाहेर.

लक्झरी गाड्यांना रिसेल व्हॅल्यू मुळातच कमी असते. टाटा सफारी ही भारतात लक्झरी सेगमेंट मध्ये येते.

कुठलिही परदेशी गाडी आली की तेचे प्राईज सेगमेंट भारतीयांना न परवडणारे ठरते. उदा अ‍ॅकॉर्ड, कॅम्री, टियेना (म्हणजे अल्टिमा), पसाट ह्या सर्वसाधारण गाड्या भारतात २० लाखाच्य पुढे आहेत. होन्डा CRV भरपुर खपल्या गेली असती, पण कोणी घेत नाही कारण २२ लाख !!

आता दुसरे उदा बघा. स्कोडा ची येती येत आहे. जर त्यांनी प्राईस सेगमेंट १५ लाख ठेवले तर ती गाडी इतर अनेक गाड्यांसारखी फेल जाईल. विक्रमी विक्री होण्यासाठी त्यांनी ह्या गाडी १० ते ११ लाखात ठेवायला पाहिजे, तसे होईल की नाही हे माहित नाही, निदान त्यांनी त्यांचे १.२ लिटर व्हर्जन तरी १० च्या आसपास ठेवावे. उलट टाटा, महिंद्रा ह्या गाड्या तश्याच सोयी देऊन ९ ते १० लाखात (महिंद्रा तर अजून स्वस्त) मिळतात, मग व्हॅल्यू फॉर मनीचा प्रश्न येतो.

ऑफकोर्स चांगली लक्झरी SUV बाजारात नाही हे खरे आहे, पण उपलब्ध पर्यायात आणि त्याला द्यावे लागणारे पैसे हे पाहिले की डायकॉर २ अगदीच वाईट नाही.

वरच्या थेअरीला अपवाद फोर्ड, फियाट, हुन्डाई च्या लोअर रेंज मधल्या गाड्या. त्या खपतात कारण परत एकदा किंमत परवडते म्हणून. ५ लाखाच्या आसपास लोक खर्च करतात. त्या रेंज मध्ये ज्या विदेशी गाड्या येतात त्या मग घेतात. वरच्या १० ते १५ लाखात स्कोडाच्या गाड्या जातात कारण तिथे कोणी गाड्याच तयार करत नाही, आताश्या सिव्हीक आली, ती स्कोडाचे मार्केट खाणार. पण ती ही तेवढ्या किमतीला फार महाग आहे.

हे सर्व टाटा विचारात घेत आहे, म्हणून लॉस मेकींग ब्रॅन्ड विकत घेतले, कारण टेक्नॉलॉजी महत्वाची होती. वरच्या सेगमेंटमध्ये टाटांना काही तरी चांगले देणे भाग आहे, आणि आता ५ वर्षात ते दिसून येईल. हा फेज जर टाटांनी सोडला तर ते दुर्दैवी ठरले असते. (आणि अजूनही नीट कॅपिटलाईज केले नाही तर दुर्दैवी ठरतील. )

केदार फिकर नॉट. यात कसले चॅलेंज. तुमच्या पोस्ट नेहमी अभ्यासपूर्ण व बॅक्ड बाय एक्स्पीरीअन्स असतात.
you simply know more. हे मराठीत लिहिले होते पण ते नो मोअर आले त्यामुळे चरकून इंग्रजीत टाकले.
माझे खालील आक्षेप आहेत टाटा गाड्यांबद्दल.

१) डिजाइन व लुक्स मध्ये जरा बोजड दिसतात. स्लीकनेस फॅक्टर कमी आहे. ( जी माझी वैयक्तिक आवड आहे.)
२) आत बसल्यावर यू डोन्ट फील १००% ओके. आणि Pampered तर आजिबात वाट्ले नाही. मला फार वेळा इंडिकातून हिंडावे लागते. व एका इंडिगोतून बरेच वेळा गेले आहे. It has a downmarket feel.
३) डिझेल गाड्यांच्या बाबतीत तरी मेंटेनन्स खर्च खूप वाट्तो.
४) नॅनोवर माझा मुळातच विश्वास नाही. त्यापेक्षा आटो घेतलेली बरी.

होंडा सीआरव्हीला माझे मत जाईल.

कार सोड्ल्यास मी टाटा उत्पादनांची लॉयल कस्ट्मर आहे.

नो मोअर >> Lol

हो सध्याच्या गाड्या तश्याच आहेत. पूर्वी मारोती नाही तर टाटा इतकाच गेम होता, आता अनेक कंपन्या आल्या आहेत, त्यामुळे हे सर्व बदलावे लागेल हे टाटांना कळाले. मलाही टाटा किंवा होन्डा ऑप्शन दिसल्यावर मी होन्डाकडेच जाणार. पण २२ लाख द्यायची तयारी नाही हे कारण आहेच. मी सध्याच्या गाड्यांबद्दल बोलता बोलता भविष्यात डोकावून आलो. इतकेच. Happy
नॅनोला मी ही विरोध केला होता माबोवर. Happy

केदार भरपुर इन्फॉरमेशन मिळाली. ममी माहितीसाठी धन्यवाद.

मि वर लिहील्याप्रमाणे आमची गरज/आवड SUVच आहे. बजेट १० ते १२ लाख. आणी त्यात अवेलेबल ऑपशन्स म्हणजे इनोव्हा, स्कॉर्पिओ आणी सफारी.

आणी मला तरी अवडली सफारी. आधी पेक्षा खुप चेंजिस केले आहेत त्यांनी. नो डाउट स्कॉर्पिओ चा र्पफॉर्मन्स सफारी पेक्षा चांगला आहे पण सफारी जास्त कंफर्टेबल वाटली.

मांझा खरेच एक मस्त गाडी आहे. स्विफ्ट डेझायर आणि फियाट लिनिया एवढेच सगळे फिचर्स जवळजवळ लाखभर रुपये कमी देऊन मिळतात. दिझेलला १७ - १८ अ‍ॅव्हरेज मिळतय. बुट स्पेस बेस्ट....
फक्त आजपर्यंत टाटाचे नाव छोट्या गाड्यांमधे एवढे चंगले नाही सेर्व्हिस्च्या बाबतीत.

पण मांझा आणि विस्टा चांगले नाव काढेल........

मि वर लिहील्याप्रमाणे आमची गरज/आवड SUVच आहे. बजेट १० ते १२ लाख. आणी त्यात अवेलेबल ऑपशन्स म्हणजे इनोव्हा, स्कॉर्पिओ आणी सफारी. >> इनोव्हा ही SUV पेक्षा MUV कॅटेगरीमध्ये येते.

बजेट थोडे वाढवता येत असेल तर फोर्ड इंडिव्हर हा एक चांगला पर्याय होउ शकेल.

<<<स्कॉर्पियो, इनोव्हा आणी सफारी>>>

ईनोव्हा घरात असेल तर मग सफारी चांगली...पण काही महिने थांबलात तर टाटाचीच "अरिया" येतेय्....आधी तिचे नाव इन्डिक्रुझ होते, शेवर्लेची क्रुझ आल्यावर नाव बदलले बहुतेक..... ती कार १३ ते १५ लाखात मिळेल्...पुण्यात हिन्जवडी ब्रीज ते चांदणी चौक पाठलाग केला होता त्या गाडीचा मी....मस्त लूक्स आहेत......... ती ट्राय करा...... किंवा नविन फेस लिफ्टेड सफारी पण येतेय्.....महिन्याभरात.....

कलिग च्या फिगो मधे लास्ट वीक ला जरा फिरुन आलो.
गाडी मस्तच आहे. पण फिगो चे GC (ground clearance) खुपच लो जाणवले.
५ जण बसले असतील तर, स्पिड ब्रेक वर सारखे हिट होते.

नो मोअर >> Lol
केदार मस्त पोस्ट. आणि तुझ्या छान पोस्टला अनुमोदन. मिल्या आणि इतर, उशीरा लिहिल्याबद्दल माफी.

इंडिका, इंडिगो या गाड्या फॉर्म-फिट-फिनिशच्या बाबत अत्यंत वाईट होत्या. पण व्हॅल्यु फॉर मनी, इकॉनॉमीच्या जोरावर त्या तुफान चालल्या. 'टुरिस्ट पर्पजसाठी कमी किंमतीतल्या, डिझेलवर चालणार्‍या गाड्या' हा आतापर्यंत रिकामा राहिलेला स्लॉट टाटांनी बरोबर पकडला. जुनी इंडिका मी स्वतः दोन वर्षे वापरली आहे. जास्त दिवस झाल्यावर टाटांच्या इतर सर्व गाड्यांप्र्माणे तिनेही काम काढायला सुरुवात केलीच होती. पण तोपर्यंत गाडीची किंमत वसूल झालेली असते, हा मुद्दा दुर्लक्षिण्याजोगे नक्कीच नव्हता.

पण सदैव तशीच परिस्थिती राहत नाही. आता तर दर वर्ष-सहा महिन्यांनी गृहितके बदलतात. रिसेल व्हॅल्यु आणि इकॉनॉमीला महत्व देणारे लोक हळुहळु गाडीचे दिसणे-असणे आणि ब्रँड इमेजला किंमत देऊ लागतील, हे टाटांना माहिती होतेच. इंडिका-इंडिगो यांची शेवटची सुगी चालू असल्याच्या काळात कॉर्पोरेट लेव्हलला टाटामध्ये बदल होत होते. टीका आणि कुत्सित टिप्पण्या झेलून अविश्वसनीयरीत्या त्यांनी महागड्या परदेशी ब्रँड्सवर मालकी प्रस्थापित केली होती आणि याच काळात फियाटशी सेल्स-सर्व्हिससाठी कोलॅबोरेशनही केले होते. फियाटच्या हातून भारतीय मार्केटची फार पुर्वीपासून असलेली नाडी निसटली आहे हे टाटांना माहिती होते, आणि त्याचप्रमाणे सेल्समध्ये टाटा बाप असले, तरी सर्व्हिसमध्ये अत्यंत वाईट आहेत, हे फियाटला. फियाटला प्रचंड वेगाने विस्तारत असलेल्या भारतीय बाजारात पुन्हा एकदा शिरायचे होते. नव्याने स्वतंत्र सेल्स-सर्व्हिसचे मोठे नेटवर्क उभे करणे हे प्रचंड वेळखाऊ आणि खर्चाचे काम होते म्हणून स्वतःचे प्रोव्हन नेटवर्क असलेल्या टाटामोटर्ससारख्याची त्यांना गरज होती. त्याचप्रमाणे टाटांना आता इमेज बदलणे आवश्यक होते, नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंजिनांची गरज होती. या गरजांसाठी दोघे एकत्र आले, अँड रेस्ट इज त हिस्टरी..!

२००९ मध्ये टाटांनी त्यांच्या शोरूम्समधून भारतातून जवळजवळ नामशेष होऊ लागलेल्या फियाटच्या लिनिया आणि पुंटो या नवीन इंटरनॅशनल मार्केटमध्ये आधीच अस्तित्वात असलेल्या मॉडेल्सची विक्री केली. आणि फियाटला भकम आधार मिळाला. याचवेळी इंडिका, इंडिगो नावांचे गुडविल कॅरी करून अनुक्रमे व्हिस्टा आणि मांझा अशी शेपटे लावून फियाटची इंजिने लावून नव्या अवतारात बाजारात आल्या. या गाड्या बघितल्या, चालवल्या तर टाटांनी काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, हे नक्कीच पटते. लुक्स, फॉर्म, फिट आणि फिनिशबाबत या गाड्या पहिल्यापेक्षा नक्कीच उजव्या आहेत. हुंडाई, होंडा, फोर्ड, शेवर्ले, इतकेच काय पण मारूती यांच्याइतकी सफाई अजून नसेल; पण किंमतीही थोड्या कमी आहेत- हेही बघितले पाहिजे. प्रत्येक कंपनी आपल्यासाठी एखादा 'अनटॅप्ड सेगमेंट' बाजारात शिल्लक आहे का हे बघत असते, त्याचवेळेला ज्या गोष्टींसाठी लोकांनी आपल्याला वर्षानुवर्षे आवडून घेतले त्या गोष्टी अचानक सोडून-टाकून देऊनही चालत नाही.

आता डिझायर, मांझा आणि लिनियाबद्दल.

पहिली मारूतीची, दुसरी टाटाची तर तिसरी फियाटची. पण या तिन्ही गाड्यांना फियाटचे इंजिन आहे आणि तेही एकच- १२४८ सीसीचे. फक्त डिझायर आणि लिनियाला मल्टिजेट आणि मांझाला क्वाड्राजेट. नाव फक्त वेगळे. पण पहिल्या दोघी सात लाखांच्या आसपास तर लिनिया ८.५ ते ९.५ लाखांच्या दरम्यान. (तिन्ही डिझेल व्हर्जन्सबद्दल बोलतो आहे).

मांझा आणि लिनियाच्या पेट्रोल व्हर्जन्सचेही इंजिन एकच आहे- १३६८ सीसीचे. यांच्याही किंमतींत दीड ते दोन लाखांपर्यंतचा फरक आहेच. एकाच शोरूममध्ये एकाच इंजिनाच्या पण वेगवेगळ्या सेगमेंटसाठीच्या गाड्या देण्याचा हा कल्पक प्रयोग आता सार्‍याच कंपन्या करू लागतील, यात शंका नाही.

डिझायरचे लुक्स थोडे 'डिस्प्युटेड' म्हणता येतील असे. त्या तुलनेत मांझा छान दिसते. डिझायर थोडी लहान तर मांझा प्रशस्त आणि मोठी दिसते. टाटांच्या परंपरेनुसार आतली आणि बुटस्पेसही जास्त आहे. इंटेरियरचा विचार केला तर मांझा काकणभर सरसच आहे. 'कमी पैशांत लक्झरी' अशी मांझाची जाहिरात केली जातेच आहे. शिवाय तेवढ्याच किंमतीत डिझायरपेक्षा जास्त फीचर्स- हा भाग नक्कीच महत्वाचा आहे. इंडिया'ज मोस्ट प्रॅक्टिकल सलून' असा जो डिझेल्-डिझायरचा लौकिक होता, त्याला मांझा आता धक्का लावणार यात शंका नाही. डिझायरच्या तुलनेत मोठी आणि वजन जास्त असल्याने मांझाचे मायलेज डिझायरपेक्षा किंचित कमी आहे. व्हीलबेस जास्त असल्याने डिझायरपेक्षा स्टेबिलिटी आणि रोड-ग्रिप जास्त आहे. मात्र ग्राऊंड क्लियरन्स डिझायरपेक्षा कमी आहे. (लिनियाइतका वाईट कमी नाही, हे नशीब).

डिझायर आणि मांझा यांच्या पेट्रोल व्हर्जन्स मात्र त्यांच्या डिझेल व्हर्जन्स इतके मायलेज नाही. (त्याचप्रमाणे पेट्रोल लिनियाबाबतही म्हणायला हवे.) खूप जास्त रनिंग असेल, तर या गाड्या अर्थातच इकॉनॉमिक ठरणार नाहीत.

या सार्‍या पेट्रोल गाड्या मी फार चालवल्या नाहीत. मात्र डिझेल व्हर्जन्स बर्‍यापैकी चालवल्या आहेत. मला स्वतःला घ्यायची असेल, तर माझी निवड 'क्वाड्राजेट (डिझेल) इंडिगो मांझा'.

सर्व्हिसचा भाग हा टाटा मोटर्सचे अवघड दुखणे आहे- हे मात्र लक्षात ठेवायला हवे. माझ्यासारखेच अनेक लोकांचे याबाबत वाईट अनुभव आहेत. वर्ल्डक्लास गाड्या आणि इंजिने द्यायचा घाट घातलेल्या टाटांना याबाबत काहीतरी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. Happy

साजिरा अतिशय उत्तम आणि सविस्तर पोस्ट. खूप धन्यवाद...

सर्व्हिसचा भाग हा टाटा मोटर्सचे अवघड दुखणे आहे >>> मग हेच दुखणे फियाट चे पण असेल ना? Uhoh

आणि रनिंग जास्त नसल्यामुळे पेट्रोल वालीच गाडी घ्यावी का? माझ्या मेहुण्यांचे महिना सरासरी रनिंग फार तर १००० (किंवा कमीच) असेल... मांझा आणि डिझयर पेट्रोल गाड्यांचे रीपोर्टस कसे आहेत?

मग हेच दुखणे फियाट चे पण असेल ना? >> अर्थातच! पण फियाटला सध्या दुसरा पर्याय नाही. आणि मागल्या वर्षी लिनिया लाँच झाल्यापासून काही स्वागतार्ह बदल निश्चित दिसत आहेत- हे माझे निरीक्षण. पण अजूनही थोडा वेळ जावा लागेल, हे नक्कीच.

१००० किमी हे कमी म्हणता येणार नाही. डिझेल गाडी घेण्यासाठी हे जस्टिफाईड रनिंग आहे. डिझेल गाड्या म्हणजे प्रचंड आवाजा, व्हायब्रेशन, मेंटेनन्स- हा समज आता बदलून टाकला पाहिजे. डिझायर, मांझा, लिनिया ही डिझेलवरची व्हरजन्स आहेत, हे नुसते आत बसून कळत नाही, इतकी रिफाइनमेंट यांच्या डिझेल इंजिनांत केली आहे. त्यांचे सर्व्हिस इंट्र्व्हल्सही वर्षातून एकदा असे केले आहेत. त्यामुळे (माझ्या तरी दृष्टिने) हा टॉप प्रॉयॉरिटीचा मुद्दा नाही. त्यापेक्षा अनेक जास्त चांगल्या गोष्टी या गाड्यांत आहेत. (टाटाच्या गाड्यांत. आणि ओव्हरऑल डिझेल गाड्यांत).

यांची (मांझा, डिझायर, लिनिया) पेट्रोल इंजिन्सही अर्थात जागतिक दर्जाची म्हणता येतील, अशी आहेत. पण मिळणारे किंचित कमी मायलेज आणि पेट्रोलची जास्त किंमत, यामुळे त्या गाड्या 'रनिंग कॉस्ट' वाइज थोड्या महागड्या ठरतात.

१००० किमी एका महिन्यात- असा हिशेब करू या.
डिझेल गाडीचे अंदाजे १७-१८ आणि पेट्रोलचे अंदाजे १४-१५ असे मायलेज- असे गृहित धरू या.

डिझेल गाडीसाठी- रु. २२७७ प्रतिमहिना
पेट्रोल गाडीसाठी- रु. ३६६६ प्रतिमहिना

हा फरक बरेच काही बोलून जातो, हे स्पष्टच दिसते आहे. Happy

:-)...म्हणजे मांझा घ्या Happy

मामी बघायला मला खुप गाड्या आवडतात. पण मी ज्या रेंज मध्ये बघते आहे तिथे फक्त ३ गाड्या आहेत. पैकी डिझायर नाही आवडली मला. लिनिआ महाग आहे.

बुट नसलेल्य छोट्या गाड्या नाही आवडत मला. आणी मोठ्या परवडत नाहि Sad

मस्तच पोस्ट आहेत. भरपुर माहिती मिळत आहे.

बजेट थोडे वाढवता येत असेल तर फोर्ड इंडिव्हर हा एक चांगला पर्याय होउ शकेल.>>
मनिश केवढ्याला आहे हि गाडी?

किंवा नविन फेस लिफ्टेड सफारी पण येतेय्.....महिन्याभरात.....>>
काय म्हणता भ्रमर?? नविन सफारी?? काय नविन चेंजिस केले आहेत काही माहिती आहे का?
नाहीतर या विकेंडला गाडी बुक करण्याचा विचार होता. म्हणजे निदान गणपति पर्यंत तरी येइल गाडी.
पण चेंजिस करुन नविन सफरी येणर असेल तर वाट पहायला काहीच हरकत नाही.

१००० किमी एका महिन्यात- असा हिशेब करू या.
डिझेल गाडीचे अंदाजे १७-१८ आणि पेट्रोलचे अंदाजे १४-१५ असे मायलेज- असे गृहित धरू या.

डिझेल गाडीसाठी- रु. २२७७ प्रतिमहिना
पेट्रोल गाडीसाठी- रु. ३६६६ प्रतिमहिना

हा फरक बरेच काही बोलून जातो, हे स्पष्टच दिसते आहे. स्मित>>>>>> साजिरा, पण डीझेल व पेट्रोल गाड्यांच्या किंमतीतही लाखभराचा फरक असतोच + मेंटेनन्स कॉस्ट (हा फॅक्टर तितकासा महत्वाचा राहिला नाही as you say) यामुळे मला वाटते आपण जर ४ वर्षांनी गाडी बदलणार असु तर हे गणित तितकेसे बरोबर नाही. म्हणजे बघ, महिन्याचा पेट्रोलचा एक्स्ट्रा खर्च १.५हजार. पण १लाख आधीच तुम्ही जास्त देताय म्हणजे पुढच्या ६० महिण्याचा डीफ्रंस. म्हणजे मानसिक समाधान हे की २-३रु./किमी म्हणजेच डीझेल गाड्यांची रनिंग कॉस्ट कमी.तुमचे मत काय यावर?
अर्थात महिन्याला जास्त रनिंग करणार्‍या लोकांसाठी डीझेलच योग्य यात मला काही संशय नाही. Happy

मी काही मेजर झोल नाही केलाय ना यात! Uhoh

माझे काही प्रश्नः
पेट्रोल गाड्याना रीसेल वॅल्यु जास्त चांगली मिळते का? मी १० लाखांपेक्षा कमी किंमतीच्या गाड्यांबद्दल बोलतेय.

एसीमुळे अ‍ॅव्हरेज कमी होत असलं तरी हायवे वर खिडकी उघडी ठेवल्याने वार्‍याच्या झोतामुळे गाडीला (किंचीत ?)जास्त शक्ती लागते , परिणामी अ‍ॅव्हरेज कमी होतं हे खरंय का? (मी हे नेटवर वाचलयं!)
अजुन एक, १० मि. च्या अंतराने एसी चालु-बंद केल्याने (म्हणजे थोडं गरम व्हायला लागलं की सुरु करायचा ,परत थोडा वेळ बंद) खरंच काही फरक पडतो का.. मागे एकासोबत वाद घातलेला यावर..

साजिरा परत एकदा धन्यवाद... पण जर असे असेल तर पेट्रोल गाड्या घेण्यात काहीच फायदा दिसत नाही...

पेट्रोल गाडीच फायदा काय ? पिक अप जास्त असतो ना त्यांचा?

निकिता : अगदी अगदी... ह्याच कारणामुळे मी अजूनही माझ्या जुन्या सँट्रोला कवटाळून बसलो आहे Happy

<<काय म्हणता भ्रमर?? नविन सफारी?? काय नविन चेंजिस केले आहेत काही माहिती आहे का?>>

रिमा, शोरुममध्ये जरा चौकशी करा याबद्दल........... आणि या सफारीबद्दल अधिक माहिती www.carwale.com वर बघा. नविन लाँच, रेपोर्ट्स आणि इतरही अत्यंत उपयुक्त माहिती यावर मिळेल.
न्यु लाँच्मध्ये पहा. फेसलिफ्टेड सफारीची माहिती घ्या. अरिआ आणि हि सफारी खरेतर जुनेमध्ये लाँच होणार होती पण अजुन झालेली नाही. सध्या इतर गाद्या घरी असतील तर नव्या सफारीसाठी थांबणे फायदेशिर आहे.

फोर्ड एन्डेवोर अ‍ॅव्हरेजमध्ये मार खाते. अर्थात ती गाडी अ‍ॅव्हरेज्चा विचार करुन घेणार्‍यांसाठी नाही. ती रॉयल कार आहे. पण मेंटेनन्स कॉस्ट खुप जास्त आहे इतर गाड्यांच्या मानाने. किम्मतही जास्त आहे.

नाही चिंगी, झोल काहीच नाही. बरोबर आहे. डिझेल गाड्यांसाठी इनिशियल इन्व्हेस्टमेंत जास्त असते, हे खरेच आहे की. Happy

सर्वसाधारणपणे डिझेल गाड्यांची रिसेल व्हॅल्यु पेट्रोल गाड्यांपेक्षा थोडी कमीच असते. पेट्रोल हा इंधनाचा डिझेलपेक्षा जास्त शुद्ध रुपात असलेला प्रकार. त्यामुळे इंजिन पार्ट्सची झीज कमी होते. त्याचमुळे पेट्रोल इंजिनाचे आयुष्य जास्त- हे ओघाने आलेच.

चिंगी, एसी चालू-बंदचा तसेच खिडक्या उघडल्यामुळे (वार्‍याच्या विरोधामुळे) खूप फरक पडलेला मी पाहिला नाही. मी एसी इंटरमिटंटली चालू ठेवतो. म्हणजे चालू.. बंद.. असे. मी सहसा खिडक्या उघडत नाही. प्रदुषणामुळे इंटेरियर लवकर खराब होते. बाहेर, घाटात, मोकळ्या-शुद्ध हवेत खिडक्या उघडतो.

पेट्रोल गाड्यांचा पिक-अपही थोडा जास्त असतो. (अर्थात वरना किंवा क्रुझ डिझेल सेदान्सना विमानाच्या टेक-ऑफ फील देणारा पिक-अप असतो Happy ) शहरातल्या कटकटीच्या वाहतुकीत 'इझी नॅव्हिगेशन'साठी पेट्रोल गाडी आयडियल. डिझेल गाड्यांना पेट्रोल गाड्यांच्या तुलनेत वारंवार गियर्स बदलावे लागतात. त्यामुळे 'फटिग लेव्हल' चा विचार केला, तर पेट्रोल गाड्या जास्त सोप्या, आरामदायक. शिवाय तुलनेत स्मुथ फील आणि ड्राईव्ह. आवाज आणि व्हायब्रेशन्सही तुलनेने कमी.

मिल्या, नथिंग लाइक सँट्रो. तिचा 'झिप ड्राईव्ह इफेक्ट' फारच कमी गाड्यांत असतो. Happy अ‍ॅव्हरेजची थोडी बोंबही या कारणासाठी खपवून घेण्यासारखी आहे.

फोर्ड एन्डीव्हरची किंमत २२ ते २५ लाखांच्या आसपास आहे. स्पर्धक- शेवर्ले कॅप्टिव्हा, टोयोटा फॉर्च्युनर, होंडा सीआरव्ही इ.

शेवर्ले कॅप्टिवा बेस्ट आहे........... आणि फॉर्चुनर म्हणजे अजिबात २३ लाखाच्या लायकिची गाडी नाहिये..... भारतियाना लुटण्याचे धन्दे आहेत टोयोटचे......

http://www.carwale.com/research/upcoming-33-tata_aria.html

रीमा, अरियाबद्दल डिटेल्स्............आणि कार्वालेच्या महितिनुसार नवी सफारी मिड २०११ मधे लाँच होतेय....... बराच वेळ आहे. पण अरिया आता सप्टेंबर २०१० मधे येतेय. किंमत १२ ते १४ लाख. लूक्स बर्‍यापैकी कॅप्टिवासारखे आहेत (मागुन). फ्रंट मांझासारखा.

पण अरिया आता सप्टेंबर २०१० मधे येतेय. किंमत १२ ते १४ लाख. लूक्स बर्‍यापैकी कॅप्टिवासारखे आहेत (मागुन). फ्रंट मांझासारखा.>>
हो हो अरिया चे फोटो पाहिले आहेत मि नेटवर. शिवाय बेंगलोर हायवे वर पण त्या गाड्यांचि (कंपनिची)टेस्ट ड्राइअव्ह पाहिलि. फारच लांबुडकि वाटते ती. इनोव्हा सारखिच अरेंजमेंट आहे पण त्याच्यापेक्षा पण लांबट आहे.

नॅनो (सीएक्स मॉडेल- समर ब्ल्यु) ५०० किमी चालवून झाली. Happy

आतमध्ये आश्चर्यकारक मोठी जागा. (८०० पेक्षा तर नक्कीच आणि बरीच जास्त). शहरातल्या वाहतुकीत चालवणे आणि पार्किंगसाठी प्रचंड सोपे. ८०-९० च्या स्पीडला मारुती-८०० पेक्षा खूपच स्टेबल आणि कमी व्हायब्रेशन्स. १८च्या आसपास मायलेज. (हायवेला आणि सारखे गियर्स न बदलता स्थिर चालवली, तर २० च्या वरही जाईल बहुतेक). चांगला पिक-अप. लेन चेंजिंग आणि टर्न्स च्या वेळची ग्रिप वाटली होती तितकी वाईट नाही. बुटस्पेसही गाडीच्या आकाराच्या तुलनेत बरी म्हणावी लागेल. एसी पॉवरफुल आहे. शिवाय त्यामुळे गाडीच्या पिकअप/मायलेजमध्ये फार फरक पडल्याचे दिसले नाही.

१०० च्या वर स्पीड अजून नेला नाही. (नेऊच नये बहुतेक). सस्पेंशन्स मात्र चांगले नाहीत. जास्त स्पीड्सच्या वेळी आतमध्ये बर्‍यापैकी आवाज येतो. पुढची आणि मागची टायर साईझ वेगळी- ये बात कुछ हजम नही होती. स्टेपनी फक्त पुढच्या चाकासाठीच आहे. मागचे चाक पंक्चर झाले, तर तात्पुरती (म्हणजे पंक्चरच्या दुकानापर्यंत) तीच स्टेपनी लावा, नंतर लवकरात लवकर बदलून घ्या- हा टाटांचा सल्ला ऐकून गार पडलो.

सिग्नलला, पार्किंगमध्ये, रस्त्यावर लोक कौतुकाने बघतात. शाळकरी पोरं देखील 'नॅनोऽऽऽऽ' म्हणून ओरडतात. इतकेच काय, पण चौकाचौकात मामा लोक देखील कौतुकाने पाहतात. Proud

गाडी आली त्या दिवशी भावाने विचारलं- 'गाडी पार्किंगमध्ये ठेवलीय, की घरात?' Happy

सिग्नलला, पार्किंगमध्ये, रस्त्यावर लोक कौतुकाने बघतात. शाळकरी पोरं देखील 'नॅनोऽऽऽऽ' म्हणून ओरडतात. >> Happy खरंतर या कौतुकापायीच माझी प्रचंड इच्छा होते आहे नॅनो घ्यायची. शिवाय नवशिकी असल्याने, पुण्याबाहेरही घेऊन जाणार नाही हे माहित असल्याने छोटी गाडी बरी असेही वाटते. पण साजिर्‍या, Is it worth buying? म्हणजे नुसती 'पहिली लाख-दोन लाखाची गाडी' माझ्याकडे आहे या क्रेझपायी घेणं व्यावहारिकदृष्ट्या बरोबर नाहीच. तू मागे एका पोस्ट मध्ये लिहीलं होतंस की अजूनही काही कंपन्या या सेगमेंटमध्ये प्रवेश करतायत. मग हे मार्केट स्टेबल होईपर्यंत थांबावं का? नॅनोमध्ये तुला विशेष काही त्रुटी जाणवल्या का? अर्थातच टाटांनी बजेटचं बंधन घालून घेतल्याने बर्‍याच ठिकाणी तडजोडी आढळून येत असतीलच. पण तरीही नवीन नॅनो घेणार्‍यांसाठी काही वैधानिक इशारा?

तर तात्पुरती (म्हणजे पंक्चरच्या दुकानापर्यंत) तीच स्टेपनी लावा, नंतर लवकरात लवकर बदलून घ्या- हा टाटांचा सल्ला ऐकून गार पडलो >>

साजिर्‍या दॅट इज इन्डस्ट्री स्टॅन्डर्ड. भारतात हे बदल आता येत आहेत इतकेच. वेलकम ग्लोबलायझेशन. Happy ते छोटेवाले चाक असतात आणि जवळच्या पंक्चर वाल्याकडे जा असे लिहले तरी ते चाक बर्‍यापैकी दुर वर नेता येतात, अगदी २-४०० किमी सुद्धा. पण नेऊ नयेत.

नवीन नॅनो घेणार्‍यांसाठी काही वैधानिक इशारा? >>> बाईक घ्यावी, हवी तशी पळवावी. कटाही मारता येतात. Happy

नॅनो सेगमेंट मध्ये आता बजाजही उतरत आहे. रेवा, स्मार्टकार हे आधीच आहेत. नॅनो घ्यावी की नाही हा बजेट, आवड, प्रायोरिटिज इ चा प्रश्न आहे, पण आउट ऑफ सिटी वाली कार नाही इतके मात्र मी सांगू इच्छितो. अगदी उद्या वाटले म्हणून मी जर नॅनो घेऊन पुण्याहून चिपळूनला निघालो तर कशेडी घाटात गाडी गरम होऊन थांबूही शकेल असे वाटते. कदाचित तसे नसेलही.

Pages