Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
>>त्यांनी आज २०० काढून उद्या
>>त्यांनी आज २०० काढून उद्या लंचच्या आधी एक तास (एक तास खेळून) आपल्याल्या खेळायला दिले तर अवघड जाईल
करेक्ट... मी तेच म्हणतोय मगापासून... अन ते व्हायची शक्यता दाट आहे याचे कारण आपल्याला नव्या चेंडूने गोलंदाजी करायची आहे. नवा चेंडू या खेळपट्टीवर तितकासा धोकादायक नाही. थोडक्यात किमान ४५-६० षटके तरी कांगारू सहज खेळून काढू शकतील. म्हणजे १२०+ धावा आज दिवसाखेर सहज शक्य आहेत. ऊद्या सकाळी ऊपाहारापर्यंत आघाडी २०० पर्यंत नेवून नक्कीच आपल्यावर दबाव आणू शकतात.
असो.. सामना पुन्हा एकदा रंगतदार होवू शकतो. झहीर अन श्री च्या गोलंदाजीवर बरेच काही अवलंबून असेल.
जय साहेब, जय खेळपट्टी!
<<बायदवे धोनीचे शॉट्स कुठे
<<बायदवे धोनीचे शॉट्स कुठे गेले>> धोनी नुसताच चेंडू अडवत बसला आहे कारण "धोनीला औस्ट्रेलियाला फलंदाजीला कमीत कमी वेळ देऊन वैफल्यग्रस्त करायचंय" इति, रवी शास्त्री. हे असलं शेपूट घेऊन ? "एक्सपर्ट" आहे म्हणून आपण आपलं ऐकत रहायचं झालं !
<<ऊद्या सकाळी ऊपाहारापर्यंत
<<ऊद्या सकाळी ऊपाहारापर्यंत आघाडी २०० पर्यंत नेवून नक्कीच आपल्यावर दबाव आणू शकतात. >> भारताच्या बाबतीत असा चान्स घेण्याचा आगाऊपणा करणं पाँटींगसारख्या आगाऊपणाच्या शिरोमणिलाही कठीण आहे ! किमान २५० धावांची आघाडी असल्याशिवाय भारताविरूद्ध कसल्याही खेळपट्टीवर असा चान्स घेणं सध्या तरी कोणत्याही संघाला महाग पडण्याचीच शक्यता अधिक.
पण पावसाने घोळ नाही घातला, तर हा सामना रंगतदार होण्याची शक्यता दाट आहे, असं मात्र वाटतंय.
काल हायलाईटस बघितले. मुरली
काल हायलाईटस बघितले. मुरली छानच खेळतो. पुजाराने बाऊंड्री मस्त मारली पण स्टान्स विचित्र आहे.
शतक झाल्यावर मुरली विजय ज्या भावूकतेने साहेबांशी बोलायला आला तेंव्हा मला सेकंदभर अस वाटल की हा आता साहेबांचे पाय शिवणार. कोणी तरी नवोदित साहेबांचे पाय धरतोय हे दृश्य आपल्याला विकेट वर कधी तरी लवकरच दिसणार याची मला खात्री आहे. पॅव्हिलियन मधे ऑलरेडी तस करत असल्यास नवल नाही.
घाबरू नका. आपल्या पेक्षा ऑस्ट्रेलियाला जास्त धोका आहे. एकतर त्यांना सिरिज लेव्हल करण्याच्या दृष्टीने जास्ती धोका पत्करायला लागणार. सेफ्टी फर्स्ट हा अॅप्रोच आता आपल्याला घेता येईल. त्यांना नाही.
अवांतर माहिती.: टेस्ट मध्ये सिक्स मारून शतक पूर्ण करण्यात सुद्धा साहेब नंबर १. एकंदर ६ वेळा. वीरू फक्त एकदा.
आनंदी आनंद गडे...
आनंदी आनंद गडे... नेहमीप्रमाणे आपल्या शेपटाने वळवळायच्या ऐवजी नांगी टाकलीच. आणि अगदीच छोटी आघाडी मिळाली.... नशीब पहिल्या टेस्ट प्रमाणे झाले नाही... तेव्हा सुद्धा साहेब आऊट झाले आणि बाकीच्यांनी हजेरी लावली पहिल्या डावात..
आज कुबंळे हवा होता टीम मध्ये.. पार दंगा घातला असता त्यानी ह्या पीचवर.. भज्जीला ते करणे अवघड जाणार... पण जहीरची गोलंदाजी निर्णायक ठरेल बहुतेक...
>>कोणी तरी नवोदित साहेबांचे
>>कोणी तरी नवोदित साहेबांचे पाय धरतोय हे दृश्य आपल्याला विकेट वर कधी तरी लवकरच दिसणार याची मला खात्री आहे. पॅव्हिलियन मधे ऑलरेडी तस करत असल्यास नवल नाही.
साहेब या बाबतीत फारच ऊदार आहेत-- कुणालाही स्वताची बॅट दे, विकेट दे, जर्सी दे वगैरे मोफत वाटप चालूच असतं..
>>घाबरू नका. आपल्या पेक्षा ऑस्ट्रेलियाला जास्त धोका आहे. एकतर त्यांना सिरिज लेव्हल करण्याच्या दृष्टीने जास्ती धोका पत्करायला लागणार. सेफ्टी फर्स्ट हा अॅप्रोच आता आपल्याला घेता येईल. त्यांना नाही.
दोघांच्या मानसिकतेत नेमका हाच फरक आहे. ऑसीज तो धोका म्हणून नव्हे तर संधी म्हणून त्याचा वापर करतील/करायचा पुरेपूर प्रयत्न करतील. आपण १-० किंव्वा १-१ वर मालिका जिंकायला खूश असू. २-० चं किलर इंस्टींक्ट बघायला अधिक आवडेल. धोणी क्षेत्ररक्षण बचावात्मक लावतो की आक्रमक यावरून काय ते स्पष्ट होईलच!
>>आज कुबंळे हवा होता टीम मध्ये.. पार दंगा घातला असता त्यानी ह्या पीचवर..
अगदी अगदी... त्यातूनही बेंगालुरू त्याचे फेवरेट मैदान!
साहेब गेल्यावर बाकीच्यानी ८
साहेब गेल्यावर बाकीच्यानी ८ धावा काढल्या फक्त!
ऑसीज ४-५ च्या धावगतीने मारत
ऑसीज ४-५ च्या धावगतीने मारत आहेत.. झक्कास. आवडलं.. त्यांनी तसच खेळावं त्यांना तेच शोभतं.. आपण सावधच खेळावं आपल्याला तेच शोभतं- अपवाद- सेहवाग! या एका व्यक्ती मूळे अगदी २५० धावसंख्या देखिल आपण सहज गाठू शकतो हे ऑसीज ना पुरेपूर माहीत आहे. त्यामूळे शक्यतो ३०० च्या आसपास करून आपल्याला खेळायला देतील (आज अन ऊद्या टिकले तर).
>>साहेब गेल्यावर बाकीच्यानी ८ धावा काढल्या फक्त!
खूप झाल्या..
<<ऑसीज ४-५ च्या धावगतीने मारत
<<ऑसीज ४-५ च्या धावगतीने मारत आहेत.. >> कारण फिरकी गोलंदाज आल्यावर धावा काढणं कठीण होणार हे महिती आहे त्याना.
वा: आत्ता नेमकं तसंच झालं ! दोन विकेट लगोपाठ पडल्या, दोनही फिरकीलाच !! सामना रंगणार, तर !!!
ओझाच्या चेंडूवर क्लार्कला
ओझाच्या चेंडूवर क्लार्कला धोनीनं अफलातून स्टंपींग करून परत धाडलं ! आता भारताचा वरचष्मा !!
६६-३ या स्कोअरवर व ओझा, हरभजन
६६-३ या स्कोअरवर व ओझा, हरभजन प्रभावी ठरत असतानाही पाँटींगने मारलेले तीन सफाईदार चौकार
प्रेक्षणीय तर होतेच शिवाय ऑस्ट्रेलियाच्या जिगरीचं प्रतिक पण!
भाऊ, आपल्याकडे फिरकी गोलंदाज
भाऊ,
आपल्याकडे फिरकी गोलंदाज आहेत म्हणून तसे वाटते.. या खेळपट्टीवर फिरकी वा जलद कुणालाही विकेट मिळू शकते.
पाँटींग ला ऊचलायला हवाय- त्याची खेळी निर्णायक ठरू शकते.
>cricinfo.com: "The highest target chased in Bangalore has been 194 by Australia against India in 1998. India chased 151 against New Zealand in 1995 successfully."
योग.. तुझा जिंक्स फक्त भारतीय
योग.. तुझा जिंक्स फक्त भारतीय खेळाडूंच्या विरुद्धच चालतो काय.. ऑसीज विरुद्ध पण चालायला पाहिजे..
भज्जी आयुष्यातील पहिली विकेट
भज्जी आयुष्यातील पहिली विकेट मिळाल्यासारखा बोंबलतोय... १३१/५
<<"The highest target chased
<<"The highest target chased in Bangalore has been 194 by Australia against India in 1998. India chased 151 against New Zealand in 1995 successfully.">> मी २०१० च्या आपल्या संघाबद्दल बोलतोय ! तो १०० धावात कदाचित बाद होईलही पण किमान २५० ची आघाडी असल्याशिवाय कुणी सेहवाग, सचिन व रैना असलेल्या या संघाविरूद्ध "डिक्लेअरेशन"चं धाडस नाही करूं शकणार, असं मला वाटतं.
भाऊ, तसं पाहिलं तर आजकाल
भाऊ,
तसं पाहिलं तर आजकाल कसोटी सामन्याचे सर्वच संदर्भ बदललेत.. आता दिवसभरात म्हणजे ९० षटकात ३०० धावांचा पाठलाग देखिल केला जातो-अर्थात शेवटच्या दिवशी तुटलेल्या खेळपट्टीवर ते मोठं धाडसच आहे, पण किमान तसा द्रुष्टीकोन ठेवणारे संघ आहेत- ऑसी हे पहिले.
आपल्या याच २०१० च्या संघातील सचिन, सेहवाग, अन काहीच अंशी रैना सोडता सर्वच खेळाडू बेभरवशाचे आहेत असेच म्हणावे लागेल अगदी धोणी सकट.
काहीही असले तरी प्रत्त्येक सामन्याचे डावपेच अन निर्णय या मागे खेळपट्टी, धावा वगैरेंचा संदर्भ असतोच.
वैयक्तील माझ्या मते या खेळपट्टीवर पाचव्या दिवशी २००+ करणे देखिल अवघड ठरू शकते मग संघात सचिन असो वा सेहवाग. काल पुजाराला आलेला चेंडू सचिन सकट कुणालाही पडला असता तरी ९९% बाद होण्याची शक्यता होती. त्या अनुशंगाने वरील ईतिहासिक आकडे मला ईंटरेस्टींग वाटतात.
अन क्रिकेट हा मजेशीर खेळ आहेच.. भलेभले पडतात तिथे ईशांत शर्मा खेळून जातो..
अगदी सन्नीभाय देखिल अंदाज वर्तवू शकतो- तो अंदाज अचूक ठरेल का नाही हे शेवटचा चेंडू टाकेपर्यंत सांगता येत नाही- आपल्या संघाच्या सद्य्द्य स्थितीत तो अंदाज अचूक ठरेल की नाही हे सचिन बाद झाल्याशिवाय सांगता येत नाही असे म्हणुया. तेव्हा २००+ झाले तरी मी ऑसीज ना जिंकायची संधी अधिक आहे असे म्हणेन.
माझा अंदाज चुकला तर मलाच अधिक आनंद होईल!
सेहवाग किंव्वा साहेब हा अंदाज चुकीचा ठरवू शकतात- दोन्ही बाजूंनी. 
योगजी, एकदम मान्य ! सामना
योगजी, एकदम मान्य ! सामना रंगतदार होण्याची लक्षणं दिसताहेत हेही खरं.
पडला रे भो.... पाँटींग नावाचा
पडला रे भो.... पाँटींग नावाचा बुरूज पडला.. अगदी पहिल्या डावाप्रमाणे दिवसाखेर भारताला निर्णायक यश!
आता शेपूट गुंडाळा लवकर.
पाँटींग पायचित झहीर - ७२.
पाँटींग पायचित झहीर - ७२. सामन्याचा निकाल काहीही लागो, पाँटींगला त्रिवार सलाम- फलंदाजी, क्षेत्ररक्षण व जिगर, या करता !
चक्क पेन देखील बाद झाला ७ वी
चक्क पेन देखील बाद झाला ७ वी विकेट .श्रीसन्त. १७० चा लीड. १५ मिनिटे असावीत.
उद्या पुनः एकदा साहेबांना मॅच
उद्या पुनः एकदा साहेबांना मॅच संपवायची संधी.
आपण जिंकणार. द्रविड, धोनी ड्यू फॉर बिग स्कोअर. पुजारा साठी एक चांगली संधी. त्याची जागा लक्ष्मणची आहे हे त्याने लक्षात ठेवावे.
मजा येणार.
व्हेरी व्हेरी गुड टेस्ट क्रिकेट.
काल साहेबांना लेग साईड ट्रॅप लाउन (शॉर्ट लेग, शॉर्ट मिड विकेट, लाँग लेग, डीप मिड विकेट वगैरे लाउन ) थोडा अंगावर मारा करण्यात आला. याला ब्रॅडमन च्या काळात बॉडी लाईन म्हणायचे. आता स्ट्रॅटेजी म्हणतात.
साहेबांनी क्लासिक पुल आणि हुक करून जॉन्सनला दोन चौकार लगावले.
योग तु नि हिम्या उद्या
योग तु नि हिम्या उद्या दिवस्भर इथे येऊ नका रे .. कदाचित जिंकून पण जाऊ मग आपण (साडेतीन बॅटस च्या जोरावर)
असाम्या, त्यांचा डाव संपवायला
असाम्या,

करून गोलंदाजी करायचो, अन हमखास दांड्या मिळायच्या!)
त्यांचा डाव संपवायला तरी येवू ना सकाळी?
हिम्स तू पण जिंक्स मध्ये आलास रे...
-----------------------------------------------------------------------------------
बाकी आता रिव्हर्स स्विंग वगैरे चा भारीच बाऊ करतात. सन्नी भाय , सचिन वगैरे मुद्दामून टेनिस बॉल वर सराव करायचे दोन प्रकारे:
१. काँक्रीट जमिनीवर थोडासा ओलसर असलेला चेंडू खेळणे. यामूळे भयानक वेगात अन ऊसळणारा चेंडू देखिल कसा खेळायचा याचे तंत्र तावून सुलाखून आत्मसात करून घेतले. विंडीज मधील सान्नीभायच्या यशात याचा मोठा वाटा होता असे खुद्द त्यानेच एका मुलाखतीत सांगितले होते. (लहान्पणी त्याची आई त्याला टेनीस बॉल टाकत असे न तो नेहेमी तीच्याचकडे परत मारायचा या गोष्टीचा सराव करताना सन्नीची ट्रेड मार्क- क्लासिक स्ट्रेट ड्राईव्ह तयार झाली)
२. एका बाजूने केस गेलेला म्हणजे तुळ्तुळीत झालेला तर दुसर्या आजूला केस असलेला टेनिस बॉल. या चेंडूवर स्विंग, रिव्हर्स स्विंग, ई. सर्वाची प्रॅक्टीस केली जात असे. असा चेंडू नैसर्गिकरीत्या रिव्हर्स स्विंग होतो. (मला आठवते अगदी गल्ली क्रिकेट मध्ये देखिल, अती तटीच्या वेळी आम्ही मुद्दामून असे mrf tennis ball चे एका बाजूचे केस काढून-थोडक्यात बॉल टँपरींग
साधारण पाच वर्षे मी ऊसगावमध्ये प्रोफेशनल लीग मध्ये ओपनींग बॅट्स्मन म्हणून खेळलो तेव्हा हे असले प्रयोग आम्ही मुद्दामून करून बघितले होते. लय भारी वाटायचं. एकदा वि. संघात सगळे पाकी चे होते. त्यांच्यात टेप लावलेला टेनिस चा बॉल (लाँग टेनिस मध्ये वापरता तो) वापरून खेळायची जुनी पध्धत होती. वसीम, वकार या भाई लोकांन्नी त्याच अनुशंगाने रिव्हर्स स्विंग वगैरे ला जन्म दिला असे ते पाकी पब्लिक म्हणत. मग ते लोक मुद्दामून अशा टेप लावलेल्या चेंडूचे सामने ठेवायचे. तो चेंडू ईतक्या जोरात अंगावर येत असे अन टप्पा पडल्यावर अधिक उस्ळी घेत असे... दोन चार वेळा नाक तोंड फुटल्यावर मग तो बांऊस हाताळण्याचा सराव अन सवय झाली होती. प्रो. लिग मध्ये खेळताना त्याचा खूप ऊपयोग झाला जरी चेंडू नेहेमीचा लेदर बॉल असला तरी. कधी कधी मॅट लावलेल्या खेळपट्ट्या तर कधी व्य्वस्थित बनवलेली खेळपट्टी.
दर शनीवारी ९-४ सामना, अन आठव्ड्यात २ वेळा सराव सेशन.. घामाचा एक थेंब शिल्लक रहात नसे शेवटी. स्टॅमिना वाढवायला शिवाय वेगळे व्यायाम.. अन एक लीग जवळ जवळ तीन महिने चालायची. माझे जितके मित्र मंडळ २५ वर्षात झाले नसेल तितके या लीग च्या निमित्ताने झाले हे माझे सुदैव म्हणावे लागेल. त्यातल्याच एका मित्राने/सचिन वेड्याने खास mrf च्या बॅट्स आणल्या होत्या भारतातून, सचिन ची स्वाक्षरी असलेल्या. त्याकाळी २०००-२००५ सचिन अन mrf बॅट चं जाम फॅड आलं होत. ती महाभयंकर जड बॅट हातात घेवून फटके मारणं किती महाकठीण आहे हे तेव्हा जाणवलं. (मला वाटतं टेनिस एल्बो च. दुखणं जास्त झाल्यानंतर सचिन ने mrf बॅट ला रामराम केला!) केवळ त्या साठी देखिल मी साहेबांना सलाम करतो.
विव रिचर्ड्स ची बॅट सचिन पेक्षा जड होती असं म्हणतात. कुणी तज्ञ सांगू शकेल काय?
कधी कधी ३६+ सचिन चं. महान कौतूक वाटतं. अजूनही तीतकीच जिद्द, सराव, एनर्जी, स्टॅमिना टिकवून आहे... त्रिवार साष्टांग दंडवत घातलं तरी कमी आहे.. तो १० वर बाद होवो किंव्वा १०० वर त्यामागे मेहेनत तेव्हडीच असते. आपण मात्र धावा किती काढल्या याच फुटपट्टीवर कायम मोजतो.
आजकालचे ipl तारे खरच असा सन्नी सचिन सारखा जाणिवपूर्वक सराव करत असतील का? मला तरी शंका आहे..
-----------------------------------------------------------------------------------
उद्या द्रविड ला भिंतीची लाज राखण्याची संधी आहे अन सेहवाग ला काम फत्ते करण्याची. बघुया..
त्यासाठी आधी पहिल्या अर्ध्या
त्यासाठी आधी पहिल्या अर्ध्या तासात ऑस्ट्रेलियाचे शेपूट गुंडाळून ठेवले पाहिजे नि नंतर एक दिवसीय सामन्यांच्या गतीने खेळायला पाहिजे.
कदाचित् मी सुचवलेला फलंदाजीचा क्रम वापरला तर ऑस्ट्रेलिया कदाचित् गोंधळात पडतील नि आपला फायदाच होईल!
मग भारताचा विजय नक्कीच. पाँटिंगला वाटेल कुठून आलो इथे, हात दाखवून अवलक्षण करून घ्यायला!
पण, योग नि हिम्स, तुम्ही जरूर या. घाबरू नका. कारण बुद्धिप्रामाण्यवादी लोकांना असे घाबरणे शोभत नाही. गणू म्हणतात त्याप्र॑माणे sensible आणि rational व्हा!!
ओझाने पण मुलाखतीत तेच सांगितले आहे. त्याला तीन बळी मिळाले आहेत! म्हणून त्याला हे कळले. शिवाय, खेळत नसला तरी, लक्ष्मण तंबूत बसलाच असेल! धोणीने खिशात लक्ष्मणचा, बॅट उगारलेला, फोटो ठेवला आहे म्हणे. जरा ओझा वेडेवाकडे करायला लागला की त्याला तो फोटो दाखवतो!
जसा श्रीसंथला हरभजन, तसा ओझाला लक्ष्मण!
न्यू झीलंड विरुद्ध काही सामने भारतातच खेळणार आहेत म्हणे! न्यू झीलंडचे लोक कॉमनवेल्थ गेम्स ना आले नाहीत. सोय चांगली नाही याच्या निषेधार्थ! मग क्रिकेट खेळायला कशाला येताहेत?
पैसे, दुसरे काय? त्यांना ऑस्ट्रेलिया पेक्षा जोरात हरवा! एक इनिंगनी वगैरे. मग खरे कारण कळेल कॉमनवेल्थ गेम्स ना न येण्याचे - घाबरट!
झक्की आलेत हो न्यूजीलंडचे लोक
झक्की आलेत हो न्यूजीलंडचे लोक कॉमनवेल्थ गेम्सला... काही घाबरट आलेले नाहीत पण बाकीचे आलेत.. आणि पदक पण मिळवतायेत..
असाम्या मला कशाला उगाच त्या जिंक्स मध्ये खेचतो आहेस.. पण सकाळी सकाळी यावेच लागेल.. ऑसीज च्या उरलेल्या विकेटस ला फणस लावायला..
हिम्या आता फणस लाव नाहीतर
हिम्या आता फणस लाव नाहीतर गणपती पाण्यात घाल.
काहीकर पण आपली विकेट पडू देऊ नको. सेहवाग, मुरली टिकले तर सहज जिंकू.
बाकी आता रिव्हर्स स्विंग
बाकी आता रिव्हर्स स्विंग वगैरे चा भारीच बाऊ करता>>नाहि रे, भज्जीला दोन विकेट्स मिळाल्यात म्हणजे पीच मे कुछ बात है जरूर असा फंडा आहे
(jokes apart, भज्जी जर खरच नखेळजोशात असेल तर ४-५ वर सहज जातो, जेंव्हा दुसरा स्पिनर्त्याच्या वरचढ ठरतो तेंव्हा पिचमधे पण काहितरी असते असा जनरल अनुभव
)
काँक्रीट जमिनीवर थोडासा ओलसर असलेला चेंडू खेळणे. यामूळे भयानक वेगात अन ऊसळणारा चेंडू देखिल कसा खेळायचा याचे तंत्र तावून सुलाखून आत्मसात करून घेतले>>मी झक्कींना ह्याविषयी सांगितले होते पण त्यांची काहि तयारी दिसली नाहि
<<त्या अनुशंगाने वरील
<<त्या अनुशंगाने वरील ईतिहासिक आकडे मला ईंटरेस्टींग वाटतात.>> क्रिकेटचे आडाखे पूर्वीच्या आंकडेवारी वरून बांधून मी इतक्या पैजा हरलोय [बेटींग नव्हे, अशाच मित्रांत, खाण्यापिण्याच्या] कीं आता मी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो ! आजच अरुणलालला कुणी आंकडे तज्ञाने म्हणे सांगितलं की साहेबानी यंदा दहा वर्षानंतर भारतात शतक झळकावलं. तसं असलंच, तर आता दहा वर्षांच्या आंकडेवारीवर बांधलेल्या अंदाजांचं काय करायचं ! उद्या आपण इतिहासाकडे पाठ फिरवून मस्तपैकी फुल्ल टेन्शन घेऊन मॅच बघणार; मध्येच, तशी पाळी आलीच तर, देवासमोर उभाही राहीन, नाही असं नाही !
धोणीने आज मात्र अप्रतिम यष्टीरक्षण केलं. कांही झेल व एक स्टंपींग तर अफलातून !
एकंदरीत गेला व हा कसोटी सामना टी-२०च्या थोबाडीत मारणारा !
"झक्कींना ह्याविषयी सांगितले
"झक्कींना ह्याविषयी सांगितले "
त्याचा काही उपयोग नाही हो!
"यामूळे भयानक वेगात अन ऊसळणारा चेंडू" हे नुसते वाचूनच मी भुईसपाट होऊन बसलो आहे. एक फायदा आहे, पुजाराला आला तसा चेंडू आला तर जरा इकडे तिकडे बॅट फिरवून बघीन, टोला लागला तर!
१२०० वी धाव पण माझीच!!
१२०० वी धाव पण माझीच!!
Pages