क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारताचा आजचा विजय हा भारताने २००८ पासून आजपर्यंत ऑस्ट्रेलियाविरूध्द खेळलेल्या ८ कसोटीत मिळविलेला ५ वा विजय असेल. उरलेले ३ सामने अनिर्णित राहिले. ८ पैकी ६ भारतात खेळले (४ विजय) व २ ऑस्ट्रेलियात खेळले (१ विजय).

आता अगदी एका षटकात अर्धी धाव काढली तरी जिंकायलाच पहिजे अशी परिस्थिती आलेली आहे.. फक्त टीचा ब्रेक झाल्याने परत आल्यावर काही तरी वाकडे तिकडे घडू नये...

विक्रमा अगदी अगदी. या विकांताला जाऊन घेऊन यावे वाईचे पेढे. Happy त्या टिपा आम्हालापण उपयोगी पडतील. भेळ का वा वा. १० घेतले तरी भेळेची गाडी विकत घेता येइल. जमली तर फक्कड नाही तर चुरमुरे. Proud

जय हो!!

भारत एका सणसणीत, दणदणीत, प्रचंड, अफलातून, तूफानी, जबरदस्त, कौशल्यपूर्ण, शैलीदार, सुंदर, अप्रतीम, शानदार, उच्च, वादातीत, आक्रमक, उत्साहवर्धक, संस्मरणीय, गौरवशाली विजयाच्या मार्गावर.

जमली तर फक्कड नाही तर चुरमुरे >> Lol

विक्रम तुम्ही इतके मराठी विशेषनं एकत्र आणि एकदम चपखल वापरल्याबद्दल झक्की तुम्हाला शाबासकी देणार. Happy

आज द्रविड पण खुलून खेळतोय ! भिंतीसाठी खास दोन स्लीप, दोन गली !! अरे, एक दोनदा तसा आऊट
झाला,म्हणजे काय मामा समजता कीं काय आमच्या या दिग्गजाला !!
<<तरी वाकडे तिकडे घडू नये...>> आतां वाकडे तिकडे म्हणजे चौके अन छक्केच !
"India is clearly making a statement that we are number one test team and deservingly so !"
इति "नीओ क्रिकेट"वरील ऑस्ट्रेलियन एक्स्पर्ट !

आता साहेबांची हाफ पूर्ण होतेय की नाही याची चिन्ता.
घाबरू नका बाद होण्याबद्दल नाही काळजी, तेवढे चेन्डू वाट्याला येतील की नाही याची हो...

विक्रम तुम्ही इतके मराठी विशेषनं एकत्र आणि एकदम चपखल वापरल्याबद्दल झक्की तुम्हाला शाबासकी देणार.>> सर्वांना समजावे म्हणूनच मी आज कालच्या मुलांचे अशक्य, भयंकर, चाबूक असे शब्द मुद्दाम वापरले नाहीत. ते पण एकदम चपखल बसले असते. Happy

भाउ तुम्ही म्हणताय तसंच होतय.. साहेब चिडलेत आज.. मॅच काही झाले तरी जिंकायचीच ह्याच इराद्याने धोपटायेत..

झाली रे भो , सायबांची हाफ......

द्रविड मध्ये घुसला नाही म्हणून. मागे एकदा धोनीने मध्ये घुसून स्कोअर सम्पवून सेन्च्युरी होऊ दिली नव्हती...

साहेबांनीच मॅच संपवावी अशी ऑसीजची पण इच्छा दिसतीये.. आणि द्रवीडची पण... २च धावा हव्या असूनही मेडन ओव्हर...

जोरदार!! ११ बॉल घेतले २ रन काढायला. आवडलाच मला हा पेशन्स. Happy साहेब भारी आहेत.

जिंकलो रे!! हिप हिप हुर्रे!!! Happy जय हो. केदार ट्रकला स्टार्टर मारला रे.

ये ये ये ये ये

धत्तड तत्तड... धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...धत्तड तत्तड...

साहेबच... त्यांनीच विजयी फटका मारला आणि मॅन ऑफ मॅच च्या पुरस्कारात अजून एक भर .

Pages