क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुजारा चे काही शॉट्स फार अफाट आहेत...>>>>

मग तर फारच उत्तम . चांगला खेळाडू मिळेल.नाहीतरी मधल्या फळीत लवकरच मोठी पोकळी निर्माण होणारच आहे. वरची आणि खालची फळी आधीच पोकळ आहे Happy

पुजाराच्या शॉट्स अफलातून आहेत.

इन्द्रा Happy पेंडसे गुरुजींचा धावा करायचा. ते सात्विक प्रवचन करुन जनमाणसांचे प्रबोधन करतील बाळकोबांना विचार, लै अनुभव आहे. Happy

मजा आयगा. रात्रभर जागावे लागणार असे दिसतेय.

"लेग ट्रॅप"शिवाय ऑसीजकडे दुसरे डावपेंच नाहीतच का ? ६+ च्या सरासरीने हे नवोदित खेळाडू धावा काढताहेत व ऑसीजचं पितळ उघडं पाडताहेत ! भारताच्या क्रिकेटला भविष्य उज्वल दिसतंय . बघूं पुढे काय होतंय, या सामन्यात .

झकास!

विजय अन पुजारा च्या बाबतीत फायदा हा आहे की दोघेही भारतीय संघात स्थान पके करण्याच्या ईराद्याने खेळणार, थोडक्यात डोळ्यापुढे एक मोठे ऊद्दिष्ट आहे- अशावेळी सामना जिंकणे हे एक बायप्रॉडक्ट ठरते. नविन पोरांना संधी देण्याचा हा मोठ्ठा फायदा आहे- they are eager to prove themselves and hungery for the success, its BIGGER motivation than anything else!.
सलामीचा अन मधल्या फळीतील (३-५स्थान) फलंदाज घाडविण्याचे हेच योग्य दिवस आहेत. हे दोघेही तूर्तास अपयशी ठरले तरी त्यांना द. आफ्रिकेविरुध्ध खेळवावे.
(द्रविड ला बसवून त्या जागी एक गोलंदाज घ्यावा असे माझे मत कायम आहे.)
-----------------------------------------------------------------------------------
पुजारा च्या बाबतीत strange infectious liking आहे..he always seems to enjoy his game, fielding or batting.. that brings in lot of positive vibes to the team and as such will help pujara play his natural game all the time. I hope he continues to do that.. very few folks have this instinct and those who had have been all successful- kapil, jimi, sehavag, sachin, lara, gilli to name a few..

विजय अन पुजारा च्या बाबतीत फायदा हा आहे की दोघेही भारतीय संघात स्थान पके करण्याच्या ईराद्याने खेळणार, >>> योग १९९६ची द्रविड आणि गांगुलीची इंग्लड मधिल भागिदारी आठव बघू...

रात्रभर जागावे लागणार असे दिसतेय. >> केदार... रात्र विरांची आहे समजून जाग Happy

पुजाराला वन डाऊन पाठवून धोनीने त्याची नेहमीची ट्रीक केली आहे, ज्या खेळाडूला संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे त्याला मोठी संधी देणे, म्हणजे तो जीव तोडून प्रयत्न करतो.
पुजाराने संधीचे सोने केले, पण तो अजूनही मोठी इनिंग्ज खेळू शकतो.

पुढे एकही विकेट न टाकता सामना जिंकून द्यावा ह्या नवोदित जोडीने... हीच श्रींच्या चरणी प्रार्थना... म्हणजे मग भारत नं.१ ची टेस्ट टीम का आहे ह्यावर वाद घालायला ऑसीजना वेळ मिळणार नाही... आपण ह्या नवोदितांकडून कसे हरलो ह्याच्यातच त्यांचा वेळ जाईल..

केदार/केपी - साखर थोडी इकडे पण पाठवा. आम्ही जरा आधी क्लेम लावलाय.

गुड ट्रान्झिशन हॅपनिंग. पुजारा वन डाउन आला.

पुजाराबद्दल भरपूर ऐकलेलं-वाचलेलं, आज प्रत्यक्ष पाहायला मिळालं. जबरदस्त खेळी.
इकडे द्रविडअण्णा निवांतपणे खेळतायत. ऑसिजना उन्हात तावून्-सुलाखून काढणार असं दिसतयं.

Pages