क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आँ ... सुरु कधी झाले होते? >> Lol

असाम्या असे त्याला वाटते. तंत्रशुद्धते मध्ये तो बाप माणूस होता, पण सचिन त्याचा बाप निघाला. क्रिकइन्फोवर एक लेख ह्याबद्दल वाचला होता. तो शोधून देतो. मांजरेकरला उतरती कळा सचिननंतर लागली, मुंबई डॉक्टरीनबद्दल पेपर मधील टीका आठवते का? त्यामुळे ते वाक्य वापरले आहे.

मला वाटलं पुजारा गोलंदाजी पण करतो>>करतो, जसा गंभीर किंवा रैना करतो तशीच, कामचलाऊ. Can he be forth bowler ? should not be. That would be unfair to him. He is selected for his batting. आधीच आपल्याकडे, ODI performance वरून Test मधे घेणे न घेणे, असे अचाट प्रकार करतात त्यात "फलंदाजाला खराब गोलंदाजीवरून वगळणे" ची भर नको Happy

युवराजच्या दोनशे मुळे तो RSA च्या against येणार का ?

अरे आकडा नाही माझ्याकडे. मला जुने पेपर शोधावे लागतील. आर्काईव्ह मधून. पण मला खरच आश्चर्य वाटतेय तुला मुंबई डॉक्टरीन माहीत नाही त्याची. Happy

युवराज कुठे खेळतोय सध्या? रणजीत? >> I wish. इराणी कप आटोपला ना दोन दिवसांपूर्वी त्यात दोन्हे काढले त्याने. I wish yuvaraaj and harabhajan wil play in Ranji (mind you not in challenger etc) to get it right.

केदार अरे खरच माहित नाही.

अरे माहिती असेल.
आपल्या लहानपणी मुंबईच्या फलंदाजांचा तंत्रशुद्धते बद्दलच चर्चा व्हायच्या. उदा सुनिल, दोन्ही मांजरेकर अन अन्य मुंबईकर फलंदाज. मग अचानक सचिन आउट ऑफ बॉक्स शॉट मारत होता, तेंव्हा मांजरेकर अन सचिनच्या तंत्रशुद्धतेबद्द्ल पब्लीक बोललं वगैरे. हे सगळं माझ्या मेमरी लेन मधून. मग संदिप कसा अपवाद, सचिन कसा अपवाद हे लिहलं गेले. त्या बद्दल बोलतोय मी.

पुजारा फक्त फलंदाजी साठी असेल तर संधी मिळणं अवघडच आहे... आपली डोकेदुखी गोलंदाजी आहे. आणि ती डोकेदुखी कायमच राहील.. आणि त्यात झहीरला दुखापत झाली तर सगळच संपलं मग... (लंकेचा दौरा आठवा).
आपल्याकडे तूफान मेल, राजधानी एक्सप्रेस वगैरे म्हणून शोधलेले गोलंदाज "फाईंड" हे काही काळाने अचानक मुंबई पुणे पॅसेंजर सारखे होतात.. मग काय कुणिही येतो अन सवारी करून जातो.
मुनाफ ला बडोदा एक्सप्रेस म्हणायचे ना- त्याची म्हैसाणा शट्ल झालीये.
अविष्कार साळवी म्हणजे आपला मॅकग्राथ असं काहीतरी पसरवलं होतं... कसलं काय तो मॅकग्राथ ईतका जोरात धावला सुध्धा नाही.
ईरफान पठाण नावाचा ईसम आजकाल युसूफ पठाण चा भाऊ म्हणून ओळखला जातो..
ईशांत चे पाय नाही पण केस कायम फीट असतात..
प्रविण कुमार ला मध्यमगती गोलंदाज म्हणणे म्हणजे अब्दुल कादीर ला तेज गोलंदाज म्हणण्यासारखे आहे.
अजून कीती नग येवून गेले- अ‍ॅबे कुरुविल्ला, तो ओपन चेस्ट अ‍ॅक्शन वाला कोण होता बरं- राझदान का काहितरी.. हरविंदर सिंघ, अजून एक कुणी तरी आसामचा होता...
फिरकीचेही तेच- नरेंद्र हिरवाणी भाऊंपासून, राजेश चौहान, कुलकर्णी (पहिलं नाव काय? पदार्पणात ८ का ९ बळी घेणारा), मिश्रा पर्यंत सगळे आले, बसले, गेले..
च्यामारी- सचिन ने त्याच्या २० वर्षाच्या कारकीर्दीत २०० गोलंदाज तरी संघात येवून गेलेले बघितले असतील..

ब्रेट ली ने एखाद्या बॉलीवूड बेब शी पुन्हा लग्न केल्याशिवाय असा खतरनाक गोलंदाज आपल्याकडे पैदा होण्याची शक्यता मला तरी दिसत नाही. काही गोष्टी रक्तातच असाव्या लागतात-बाकी खरं खोटं देव जाणे.

>>मुनाफ ला बडोदा एक्सप्रेस म्हणायचे ना- त्याची म्हैसाणा शट्ल झालीये.<< Lol

>>ब्रेट ली ने एखाद्या बॉलीवूड बेब शी पुन्हा लग्न केल्याशिवाय असा खतरनाक गोलंदाज आपल्याकडे पैदा होण्याची शक्यता मला तरी दिसत नाही.<< आपल्याकडच्या काही बेब्स तय्यार असतील यासाठी. Happy

बिचारा पॉंटिंग, भारतातील पहिल्या कसोटी विजयासाठी प्रतिक्षा करतोय. त्याच्याकडे कदाचित ही बंगलुरूची कसोटीच शेवटची संधी असेल. आणि त्याची ही पण संधी हुकूदे अशी अपेक्षा मी बाळगतोय. Lol

<<ब्रेट ली ने एखाद्या बॉलीवूड बेब शी पुन्हा लग्न केल्याशिवाय असा खतरनाक गोलंदाज आपल्याकडे पैदा होण्याची शक्यता मला तरी दिसत नाही.>> बर्नार्ड शॉला एका सुंदरीने लग्नाबद्दल सुचवलं, " तुमची बुद्धीमत्ता व माझं सौंदर्य, काय अपत्य होईल ना आपलं !" शॉनी मुद्दा काढला, " पण याच्या नेमकं उलटंच झालं तर !". इथंही, खतरनाक गोलंदाजाऐवजी उगीचच नको असलेल्या अर्थाने एक "ऑल राऊंडर " आपल्या पदरात पडायचीच शक्यता जास्त !! ;);-):डोमा:

बंगालुरू म्हणजे द्रविड अन लक्षमण चं जणू घरचं मैदानच आहे.. (नागपूर अन हैद्राबाद खेरीज) रैनाचही ना?

जम्बो ला बोलवा रे परत आणि ओपन करायला दादा ला आणा.. होवून जावू दे पुन्हा एकदा च्यामारी.

बाकी t20, IPL वगैरे वर बंधन घातल्याशिवाय गोलंदाजांची समस्या सुटेल असे वाटत नाही. लय बेक्कार धुतात त्यांना त्या २०-२० मध्ये, त्यांच्या गोलंदाजीच्या वेगाची, शरीराची, अन आत्म्विश्वासाची पार चुम्बळ करून त्याचा तबला बडवतात राव.. mrf तंबू मधून बाहेर पडले की t20 तंबूत तिथून दुखापतीच्या तंबूत अन नंतर घरच्या तंबूत असा यांचा प्रवास होतो.

मास्तुरे आहेत का आज? तेथे तुम्ही सचिन २००४ ची पूर्ण सिरीज फ्लॉप गेला म्हंटलेत ते पूर्ण खरे नाही. त्या सिरीज मधे तो बंगलोर आणि चेन्नई ला खेळला नाही. फक्त नागपूर आणि मुंबईत खेळला. तो मुंबईतील दुसर्‍या डावात लक्ष्मण बरोबर केलेली भागीदारी आणि स्वतःचे ५० वगळता बाकी तिन्ही डावात चमकला नाही हे मान्य.

२००४ मधे सगळीच गडबड होती. पाक ला पाक मधे हरवल्यावर भारतीय संघ यशाच्या आत्तापर्यंत न पाहिलेल्या एका पायरीवर होता. तेथून पुढे जाण्यासाठी कदाचित वेगळ्या नेतृत्वगुणांची आणि प्रशिक्षकाची गरज होती. राईट-गांगुलीला ते जमले नाही.

सचिन ही तेव्हापासून 'शेल' मधे गेला ते पार विश्वचषकापर्यंत. त्या काळात सचिनची बॅटिंग बघायला फारशी मजा आली नाही.

मांजरेकर ची बरीच वक्तव्ये याच काळातली.

बंगालुरू म्हणजे द्रविड अन लक्षमण चं जणू घरचं मैदानच आहे.. (नागपूर अन हैद्राबाद खेरीज) रैनाचही ना?>.रैना युपीचा रे.

अमोल बरोबर. २००५ मध्य ते फेब २००७ सचिन बॅडपॅच मध्ये होता.त्याचे वर्णन वॉकिंग विकेट असे केले गेले होते.

हो. तरी साहेब खर्‍या फॅन्स ना विसरत नाहीत :P. २००५ च्या डिसेंबर मधे मी देशात पोहोचलो त्याच्या दुसर्‍या दिवशी पासून तेथील ऑफिसमधे जायचे असल्याने तो रविवारचा दिवस "जागून" काढायचा होता, जेट लॅग घालवण्यासाठी. तर दुपारी झोप येत असताना साहेब पेटले आणि ३५ वे टेस्ट शतक मारले Happy

अहो योग, मला क्रिकेटमधले काहीहि कळत नाही. साधे सामान्य ज्ञान सुद्धा नाही. खेळणारे तर नुसते नावाने माहित. जुने जास्त माहित, कारण तेंव्हा बघत होतो. १९७० पर्यंत. अजित वाडेकर नंतर कोण कोण खेळले त्यांच्याबद्दल काहीहि माहित नाही. विनू मंकडची दोन मुले. अशोक व अतुल. त्यांचे अगदी लहानपणचे फोटो येत कधी कधी, तसेच संजयबद्दल पण ऐकून होतो.

द्रवीड , लक्ष्मण, गांगुली, तेंडूलकर, झहीरखान, हे आत्ता आत्ता ऐकले. २००१ मधे ऑस्ट्रेलियाला गेलो होतो तेंव्हा मात्र बहुतेक सगळे सामने मोठ्ठ्या टीव्हीवर पाहिले. तेंव्हा मॅक ग्रॉ होता, वॉ होता, द्रवीड व लक्ष्मण यांनी खूप मोठी पार्टनरशिप केली हे आठवते. हरभजन सिन्ग (हा गायक पण आहे का, मौज्जा हि मौज्जा हे गाणे म्हणणारा) त्याने कुणाला तरी थप्पड मारली म्हणून माहित आहे. शिवाय एकदा त्याने सामना जिंकायचा म्हणून दणादण बॅटिंग केली होती नि धाव घ्यायला कसा सुसाट पळत सुटला होता ते बघून हसू आले होते.

एक दोन वर्षात भारतात जावे लागले, तर बंगलोरला द्रवीडने भेटायचे कबूल केले आहे!! त्याला खरे तर मागल्या वर्षीच म्हंटले होते आता पुरे लहान मुलासारखे खेळणे, लग्न झालंय्, जरा संसारात, बायकोकडे लक्ष द्या. पुढल्या वेळी येईन तेंव्हा मुलाचे/मुलीचे बारसे असेल की नाही?

कालच्या आयसीसी अवॉर्ड सेरिमनीत ऐकलेले हे काही :
ग्रॅमी स्वान सध्याचा सर्वोत्कृष्ट ऑफ स्पिनर (भज्जी ऐकतोय का?)
सचिनने सांगितले की एकदिवसीय सामन्यात २०० केले त्या सकाळी त्याचे शरीर इतके थकलेले होते की आता किमान १० दिवसांचा ब्रेक हवाच आहे असे वाटत होते, पण मैदानात उतरल्यावर काय होते ते कुणीच सांगू शकत नाही.
या विश्वचषकाच्या आधी भारतीय संघ फुशारक्या मारण्यापेक्षा तयारीवर लेक्ष देताहेत असे दिसतेय.

इंडियन एक्सप्रेसचे मुख्य संपादक शेखर गुप्ता यांच्या वॉक द टॉक या मुलाखतीच्या कार्यक्रमात हरभजनने केलेला गौप्यस्फोट : चॅपेलागुरुजींचा दादाबरोबरच सचिनलाही निवृत्त करायचा डाव होता(एक दिवसीय सामन्यात त्याला तेव्हा चौथ्या क्रमांकावर पाठवायचे ना?) राहुल द्रविड दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पितो का?

<<चॅपेल हा क्रिकेट ऑस्ट्रेलिया कडून मिशन वर आला होता...
भारतीय टीम ची कंप्लीट वाट लावायच्या....>> या संदर्भात, आपल्याकडे निखळ क्रिडा संस्कृति खरंच रूजली आहे का, ह्या शंकेची पाल माझ्या मनात बर्‍याच वेळा चुकचूकते. आपण अजूनही नुसत्या खेळाच्या गुणवत्तेवर खेळाडूला नाही जोखू शकत; त्याला शिक्षणाचं, विशेषतः सफाईदार इंग्लिश बोलण्याचं, वलय असावंच लागतं. हॉकीसारख्या खेळातही यामुळेच जग आदराने पहातं असे बुजूर्ग खेळाडू इथं असुनही, आपल्याला बाहेरच्या प्रशिक्षकांचा हव्यास असतो. क्रिकेटमधलं ठळक उदाहरण म्हणजे कपिल देव. ज्याची जागतिक दर्जाची गुणवत्ता, अनुभव व क्रिकेटबद्दलची आत्यंतिक आत्मीयता वादातीत आहे, त्याला जाणीवपूर्वक दूर ठेवलं जातं व चॅपेलसारख्यांची मनधरणी केली जाते. प्रशिक्षण हे एक "स्पेशलायझेशन" आहे हे मान्य करूनही, आपल्या मानसिकतेतील ही त्रुटी समर्थनीय ठरत नाही, असं मला वाटतं.

आत्ताच ढकलपत्रातून आलेले काही ट्विट्स. Happy

Some funny tweets about laxman:
 
#Flash: Home Ministry has issued advisory for all people named Laxman against traveling to Australia

#I wont be surprised if Laxman is made honorary Australian citizen: better to have him on your side than a constant thorn in the flesh...

#I hereby declare that I am starting proceedings to find LaxmanJanmabhoomi so we can build a Laxman temple.

#Last week belonged to Ram. This week belongs to Laxman

#Lets demolish the hospital where Laxman was born n build a bhavya Laxman mandir!

#aussies will have answer for everyone but for vvs laxman(very very special) they crumble and cry like a child .

#Sydney se 50-50 kos door gaon me jab koi cricketer rota hai..toh uski maa kehti hai beta chup hoja nahi toh laxman aa jaega

#Dear Kalmadi, if u have an extra gold medal pls give it to VVS Laxman, he deserves!! And a Silver to Ishant & a Bronze to Raina for running

#Gandhiji's last words were - 'Hey Ram', Ponting's last words would be 'Hey laxman'

#The day VVS LAXMAN retires from Test cricket, it will be a National holiday in Australia

>>> >>ब्रेट ली ने एखाद्या बॉलीवूड बेब शी पुन्हा लग्न केल्याशिवाय असा खतरनाक गोलंदाज आपल्याकडे पैदा होण्याची शक्यता मला तरी दिसत नाही.<< आपल्याकडच्या काही बेब्स तय्यार असतील यासाठी.

आयपीएल च्या दिल्ली टीमची मालकीण प्रिती झिंटा आणि ब्रेट ली यांच काहितरी साटंलोटं सुरू असल्याचे कुठल्यातरी गॉसिप कॉलममध्ये वाचलं होतं. शेन वॉर्न व शमिता शेट्टीची पण गडबड चालू असल्याचे वाचले होते.

>>> तेथे तुम्ही सचिन २००४ ची पूर्ण सिरीज फ्लॉप गेला म्हंटलेत ते पूर्ण खरे नाही. त्या सिरीज मधे तो बंगलोर आणि चेन्नई ला खेळला नाही. फक्त नागपूर आणि मुंबईत खेळला. तो मुंबईतील दुसर्‍या डावात लक्ष्मण बरोबर केलेली भागीदारी आणि स्वतःचे ५० वगळता बाकी तिन्ही डावात चमकला नाही हे मान्य.

तुमचं बरोबर असणार. मला ती २००४-०५ ची मालिका फारशी आठवत नाही. पण त्या मालिकेतले सचिनचे ३-४ डाव व आधीच्या किंवा नंतरच्या मालिकेतले ३-४ डाव असे लागोपाठ ६-७ डाव सचिन पूर्ण अपयशी ठरला होता. लागोपाठ ५ डावात अपयशी ठरण्याची सचिनची ती बहुदा पहिली आणि शेवटचीच वेळ.

२००४ च्या सुमारास टेनिस एल्बोचा त्रास सुरु झाला. २००४ मधे जवळजवळ हजार काढल्या होत्या, २००५-०६ मधे गडी खाली आला होता.

अरेच्चा, दिवसभरात एकही पोस्ट नाही...
लक्षमण नाही म्हणून हिरमुसले काय लोक्स? Happy

असो. मोहाली स्क्रिप्टची पुनरावृत्ती होईल असे वाटते आहे. फक्त तीन मोठे फरक आहेतः
१. ही खेळपट्टी तर पहिल्याच दिवशीपासून फिरते आहे- ४ दिवसात निक्काल लागणार की काय?
२. गंभीर च्या जागी विजय आहे त्यामूळे एकंदर सलामीची जोडी सशक्त वाटते आहे. लक्षमण च्या जागी पुजारा- निर्णय कौतुकास्पद अन धाडसी (काहीही का कारण असेना). ऑसीज नक्की खूश असतील. पुजारा त्याचे स्थान भक्कम करायला उत्सूक असेल.
३. कूणीतरी ६ १/२ फूटी नविन गोलंदाज आहे म्हणे ऑसी संघात पिटर जॉर्ज नामक? तो अननोन फॅक्टर निर्णायक ठरू शकेल काय?

श्री ने चांगली गोलंदाजी केली. एक दोन पायचित चे निर्णय त्याच्या विरुध्ध गेले असे वाटले. बिली ने पुन्हा एकदा चूक भरून काढली अन दिवसाखेर पाँटींग ला लाटले!

धोणी टॉस हरण्याचे नविन विक्रम करत आहे- पुढील खेपेस त्याला बसवावा :).

पुन्हा एकदा ऊद्या पहिल्या सत्राचा खेळ सामन्याची पुढील दीशा ठरवेल असे वाटते.

<<लक्षमण नाही म्हणून हिरमुसले काय लोक्स?>> पाँटींगच्या खेळाची स्तुति करावी लागली असती याची अ‍ॅलर्जी, हे कारण असावं ! ;);-):डोमा:
<<श्री ने चांगली गोलंदाजी केली.>> खरंय; आणि काय शहाण्या मुलासारखा दिसत व वागत होता काल !
<<कूणीतरी ६ १/२ फूटी नविन गोलंदाज आहे म्हणे ऑसी संघात पिटर जॉर्ज नामक>> म्हणजे "स्क्रीन अ‍ॅडजस्टमेंट" व स्क्रीनमागच्या प्रेक्षकाना शिस्त लावण्यात आपल्या फलंदाजांचा वेळ व एकाग्रता जाणार !पाँटींगचा हाच डाव असणार !;);-):डोमा:

आजचा सकाळचा पहिला तास तरी वाट लागलेली आहे.. जवळ जवळ ५ च्या रेट नी बडवतायेत.. पण परत एकदा जहीर इज स्विगींग द चेरी अमेझिंगली...

Pages