७०-८० च्या दशकातील सिनेमे आणि मला आलेले हसु

Submitted by सुनिल जोग on 10 October, 2010 - 02:36

परवा नुकतेच टीव्हीवर राजेश खन्नाचे गाणे पहात होतो. आणि माझी कन्या ई.... करून किंचाळली. मी दचकून तिच्याकडे पाहीले तर म्हणाली काय बाबा काय पहाताय? हा काय हिरो आहे? मी खरं तर चिडलो होतो. अरे एके काळी 'आराधना' पहाण्यासाठी आम्ही ब्लॅक ची तिकिटे काढली होती. शर्मिलेच्या जागी गल्लीतील लोकल शर्मिलाला पाहत गाणी गुणगुणली होती त्याचा असा हा उपमर्द?? पण नव्या पिढीला काय सांगणार...
.... नाही. मी अशी प्रतिक्रिया अजिबात दिली नाही. खरं तर कन्येच्या प्रतिक्रीयेवर मी अंतर्मुख झालो. आणि विचार करू लागलो.
आजच्या काळातील ते पिक्चर्स खरोखर आता अगदी बेंगरूळ वाटतात्.विशविशीत कथा --- बेतलेल्या, ४०-४२ मधील हिरोइन्स (बल्जिंग अ‍ॅन्ड बल्की पण) यांना आपण कसं सोसलं याचे आच्शर्य वाटले
त्यानंतर अमर,अकबर,अ‍ॅन्थनी मधील ब्लड ट्रान्स्फर सीन तिघांचे रक्तगट एकच.. अगदी कॉर्पोरशन च्या नळाप्रमाणे रक्त देतात यावेळी आपली सायन्टीफिक साइट कुठे होती हा प्रश पडला.
केवळ माँकी कसम म्हणुन ऐनवेळी मध्यंतरापुर्वी ठोकरणारा विशविशीत नायक आणि तिच्या लग्नानंतर फकाफका सिगारेटी ओढून किंवा नशा करून विरह गीते गाणारे हिरो याना आपण मानले याचीच कीव आली.
तर कघी कधी आर्ट फिल्म पहाताना पुढचा डायलॉग आपणच बोलावा अशी ऊबळ येण्याएवढे स्लो डायलॉग्ज.. आठवा... 'अनुभव' संजीवकुमार...
कधीही धूर न येणारा पाईप तोंडात ठेवून, गाउन मधील बाप ... पुढे त्याचा डायलॉग काय असणार हे तुम्ही ओळखला असणारच... हो तोच तो... खानदानकी.....
आणखी एक ... त्याकाळी राज ठाकरे असता तर.....????
मॉ मुझे तेरे हातका गाजर का हलवा .. पराठे.. राजने त्याना नक्किच हिंदी वाल्याना वडा पाव आणि पाव भाजी खायला लावली असती. राज तू पहले आना था.
आणखी एक मोठा जोक.. राजेंद्रकुमार नावाचा एक महा बोर 'नट" २५ सिल्व्हर ज्युबिल्या करुन गेला आणि जॉय मुखर्जी नावाचा एक जोकर हिरो म्हणून कार्यरत होता आणि त्याला सार्‍या छान छान नायिका होत्या. जल् गये उस्ताद..
काही असो या पिक्चर्सनी आमच्या पिढीला स्वप्ने दिलीत आणि मनोरंजन देखील... अजुनही ती गाणी... ते शब्द आठवतात हे त्या कवींचे आणि संगीतकारांचे काँट्रीब्यूशन ...
दिलने फिर याद किया....

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९७६ चा रीना रॉय, जितेन्द्र या इच्छाधारी सापांनी सजलेला नागिन !! Biggrin
प्रत्येक सूडरुपी खूना नंतर ' तेरे संग प्यार मै' वर जितेन्द्रं रीना रॉय चं सरपटत, झाडावर लटकत, सापा सारखी जीभ बाहेर काढत अत्यंत कमी कपड्यत नाचणं, नागाच्या हवेत उड्या , जितकं सांगावं तितकं कमी आहे आहे .
श्रध्दानी लिहिलय बहुदा अचाट आणि अतर्क्य मुव्हीज च्याबीबी वर नागिन बद्दल !
ऑल टाइम ह.ह.पु.वा Proud
मी टेप करून ठेवलाय नागिन, जेंव्हा अशक्य विनोदी काही बघायची इच्छा झाली कि नागिन नं १ !

लोकल शर्मिला >>>> Proud Proud Proud

जॉय मुखर्जी नावाचा एक जोकर हिरो म्हणून कार्यरत >>>>>>>>>>> Rofl

त्यावेळच्या सिनेमानी छान गाणी दिली.... ऐकणेबल आणि बघणेबल गाणी..

त्यामुळे ये अदालत उनके सारे गुनाह माफ करके सबको बाइज्जत बरी करती है|

:THE END:

पिढी दर पिढी असंच होत राहणार. आमच्या पिढीतले हीट सिनेमे म्हणजे डीडीएलजे , केकेएचएच वगैरे आम्च्या पुढच्या पिढीसाठी हास्यास्पद असणार! Wink

ह्म्म्म्म्म्..ट्रू ट्रू.. ट्रू ट्रू
राजेश ला पाहून माझी पोरगी ही आश्चर्याने कोलमडली होती,'मॉम... डिन्ट यू स्पॉट हिज पाँच???????
Angry
Proud
भाभु,राजेन्द्र ,जॉय इ. तर फक्त संगीत आणी गाण्यांच्या बळावर चालले असतील .. हेवा वाटावी अशी गाणी या तिघांना पडद्यावर साकारायला मिळाली होती..
माझ्या मताप्रमाणे ८० ते ९० चा काळ .हिन्दी सिनेमाचा काळ बनून आला होता..
अमिताभ चे मर्द,अल्लारक्खा ,कुली सारखे पूर्ण सिनेमेच हास्यास्पद होते

एक सिनेमा आठवतोय नाव आठवत नाही. त्याच्यात मिथुनची आई आणि बहिण बोलत उब्ह्या असतात तेव्हड्यात मिथुन दुसर्या मजल्यावरुन त्यांच्या बाजुला उडी मारतो आणि त्यांना दचकवतो.
मिथुनः कुछ नही मा युही मजाक कर रहा था.
मा: इतना बडा हो गया है और अभितक बचपना गया नही.
(हा dialog हिरोइन्स ना खुप असायचा.)

मी किमान अभिताभच्या सिनेमांचा अद्यापही फॅन आहे.

और एक कुली पैसा देने से इनकार करेगा.

डॉन को पकडना मुश्कील ही नही नामुम्किन है.

प्यारेलालजी तुम पुछ्के आओ हम चलते है.

इ. डायलॉग अजुनही ओठावर आहेत.

मी किमान अभिताभच्या सिनेमांचा अद्यापही फॅन आहे.

और एक कुली पैसा देने से इनकार करेगा.

डॉन को पकडना मुश्कील ही नही नामुम्किन है.

प्यारेलालजी तुम पुछ्के आओ हम चलते है.

इ. डायलॉग अजुनही ओठावर आहेत.

<<< मै आज भी फेके हुए पैसे नही लेता' Happy
हा पण आणि असे अनेक :).

मी किमान अभिताभच्या सिनेमांचा अद्यापही फॅन आहे.>>
अजुन काही
- हम जहा खडे होते है लाइन उधरसे शुरु(?) होती है.
- कान्चासेठ टोपी सम्भालो हवा तेज चलती है.

सुनिल, तुम्ही लहानपणी राजेश खन्ना वगैरेंचे चित्रपट पाहिले असतील तर आता त्याबद्दल वाचायला आवडेल. Happy

मायबोलीवर अशा चित्रपटांबद्दल एक आख्खे सेक्शन आहे. येथे पाहा.
http://www.maayboli.com/node/2205

मी अजुनही अमिताभ चा फॅन आहे. त्याच्या 'त्रिशूल' वरुन माझ्या जीवनात खूप बदल झाला. तुमच्या प्रतिक्रिया वरुन एक नवा विषय सुचला.. 'हिंदी सिनेमातून मोटीव्हेशन' खरंच त्यावेळी मॅनेजमेंट वगैरे नव्हते त्यावेळी आम्ही हे नकळत शिकलो. खरंच लिहू का ..?? तुमचे प्रोत्साहन असेल तर लिहीनच..
आज केवळ अमिताभ साठी कौन बनेगा अगदी.. लहान मुलाच्या उत्सुकतेने बघणार आहे

अजुन एक किडा वळवळतोय.... त्यावेळी गाजलेले हिंदी पिक्चर्स मधले डायलॉग्ज... कसं वाटतंय??

लहानपणी, राजेश खन्ना, हेमामालिनी खुप आवडायचे. अमिताभच्या चित्रपटांची तर अजुनही फॅन आहे. जितेंद्र, रिना रॉयचा नागिन२ व्हिडीयो वर बघितलेला...! काय क्रेझ होती तेव्हा त्या गाण्यांची!! Proud

सुनिलजी, गाजलेल्या डायलॉग्जवर आधीच एक बीबी सूरु झाला आहे.
http://www.maayboli.com/node/12304 Happy

धन्यवाद आर्या . हेमाची हातात टेनीस रॅकेट घेतलेली छबी अजुनही आहे हो पाकिटात तर राजेश काका आणि आशा पारेख यांचा एक ब्लॅक व्हाइट फोटू - कटी पतंग मधील जवळ बाळगायचे दिवस होते ते आमचे. तुम्ही सुचवलेल्या बीबी वर भेट देतो

अहो नुसतेच ७०-८० च्या दशकातलेच सिनेमे हास्यास्पद होते असं नाही, अलिकडे ही असे काही सिनेमे येतायंतच की.

जुन्या जमान्यातले सगळेच काही आजच्या मुलांना आवडत नाही असे माही. मी शम्मीची गाणी पाहात असताना माझ्याबरोबर पाहात पाहात माझी लेकही कधी शम्मीची चाहती झाली तिलाच कळले नाही. तिने पाहिलेले त्याचे पहिले गाणे 'ये चांद सा रोशन चेहरा' आणि तिला तो धम्माल करणारा शम्मी खुप आवडला. मी तिला मुद्दाम 'तिसरी मंझिल' दाखवला आणि मग तिने तिच्या शाळेत सगळ्यांना 'थर्ड फ्लोअर' पाहा म्हणुन सुचवले. Happy यादोंकी बारातमधला झिनत-विजय अरोराचा सगळा भाग आम्ही मस्त एंजॉय केला. जे चांगले आहे ते सदासर्वकाळ सगळ्यांना आवडते असे मला तरी वाटते.

बाकी त्यावेळच्या वेशकेशभूषेबद्दल सहमत. अमिताभ/जितेंद्र/धर्मेंद्र चे चित्रपट पाहताना प्रिंटेड शर्ट आणि बेलबॉटम पँट घातलेले हे लोक पाहताना जरा डोळ्यांना त्रास होतो Happy तेच डोळ्यात येणा-या बटा संभाळत लाजणा-या सुलक्षणासारख्या गोलमटोल हिरविनीचे. त्यांना आपण सहन करत होतो कारण आपल्या आजुबाजुलाही तसेच लोक होते. आजच्यासारखी जीम संस्कृती तेव्हा फोफावली नव्हती Happy

पण तुम्हाला माहिती आहे का सुनिल...... सध्याच्या डायरेक्टर्स ना या ७०-८० च्या दशकाने पुन्हा मोह घातलाय असं वाटतंय... ओम शांती ओम असूदे, नाहीतर आता येऊ घातलेला 'अ‍ॅक्शन रिप्ले' असुदे, नाहीतर 'once upon a time in mumbai' असूदे, त्या काळच्या वेषभूषा, केशरचना परत एकदा नव्याने ट्राय करतायत लोकं.. आणि आत्ताच्या ऑलमोस्ट नसलेल्या कपड्यांपेक्षा तेव्हाच्या नट्यांचे अंगभर कपडे परवडले तरी हो!

शर्मिला अल्टिमेट होती.. तिला त्या घरट्याशिवाय मी कधी पाहिलेच नाही.. कसे बाळगायची देव जाणे. आणि ते मागे फुलपाखरुसारखे असलेले तिचे ब्लाउज...... आणि मुमताज तिच्या त्या टाईट कुर्त्यांमध्ये कशी चालायची तिलाच ठाऊक...

७० ते ८० पेक्षा ८० ते ९० हे दशक अधिक बेक्कार होते....
७०ते ८० मध्ये गाणी तरी बरी होती.... पुढच्या दशकात त्याचा ही उजेड होता!

६०-७० दशकातील नायक नायकिणी, त्यांचे दिसणे आणि फ्याशन सगळे बेंगरूळ असले तरी दोन गोष्टीत ते सिनेमे आजच्यापेक्षा सरस होते
१. संगीत. लता मंगेशकर, महम्मद रफी, किशोरकुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर आणि एकाहून एक संगीतकार. गीतकारही जीव ओतून लिहायचे. चाल बनली आहे आता ठाकून ठोकून कसेही शब्द बसवा असे सहसा होत नसावे. ३०- ४०-५० वर्षे जुनी गाणी आजही ताजी वाटतात. ऐकाविशी वाटतात. त्याच्या तुलनेत ९० च्या दशकातील गाणी ऐकून बघा.

२. तमाम कलावंतांचे हिंदीवरील प्रभुत्व. फारच थोडे लोक शिकवणी लावून हिंदी शिकत असतील. बहुतेकांच्या रक्तात हिंदी होते. संवाद लिहिणारे हिंदी/उर्दू भाषेचे उस्ताद होते. भाषेच्या समृद्धीचा वापर करुन डायलॉग लिहायचे. कलाकाराच्या तोकड्या हिंदीमुळे हात आखडता घेत नव्हते. आजचे तारे विशेषतः जे कालच्या सितार्‍यांची अपत्ये आहेत त्यांचे हिंदी दयनीय असते. प्रत्यक्ष बोलताना हे लोक कधी चुकूनही हिंदी बोलत नाहीत. हे लोक भाषेला काय खेळवणार? हेमामालिनी, वैजयंती माला, वहिदा रेहमान यासारख्या दक्षिणेत वाढलेल्या अभिनेत्र्याही हिंदी उच्चार व्यवस्थित करायच्या.

अजूनही काही मुद्दे आहेत. सहकुटुंब बघताना अवघडल्यासारखे होत नाही. जुना काळ बघून आपण पुन्हा लहान झाल्याचा आनंद मिळतो. जुन्या काळातील निवांत मुंबई बघितल्यावर खूप बरे वाटते. आता अशी मुंबई सिनेमातच दिसणार. असो.

अहो सुनिलजी, वाईट वाटून घेवु नका. आजच्या काळातही तितकेच अतर्क्य अचाट मूवीज येतातच. माबो ह्याचा बाफ आहे तो बघा. Happy

एक नवीन लव ७० स्टाईल असा मूवी येतोय वाटते(अ‍ॅड पाहिली). तो बघाच मग.

मला नाही वाटतं हेमामालीनीचे हिंदी इतके चांगले होते. मी तिचे मूवीज कमीच पाहिले आहेत. पण राखीचे हिंदी भयानक होते.

हेमामालिनीचे दिसणे सोडले तर सगळेच बेकार होते. दिसायला अतिसुंदर.. टिका करताच येणार नाही. पण बोलायला तोंड उघडले की आत्ताच मॅरॅथॉन धावून आल्यासारखा दम टाकत टाकत संवाद टाकायची... :). अभिनयाची गरज पडलीच नाही कधी. नाचायची पण ठिकच, वैजयंतीसारखा जीव तोडुन नाच केल्याचे काही दिसले नाही कधी. अगदी किनारासारख्या चित्रपटातही, ती अगदी शांतपणे नाचते. तिच्या चेह-यावरुन नजर कधी हलु शकत नसल्याने हे सगळे दोष झाकले गेले Happy (रच्याकने किनारा सिडी कुठे उपलब्ध असेल तर मला सांगा. मी नेटवर खुप शोधला. रिदम हाऊसमध्ये शोधायला पाहिजे आता)

शेंडेनक्षत्र ला १००% अनुमोदन.

मॅरॅथॉन धावून आल्यासारखा दम टाकत टाकत संवाद टाकायची>>>>>>> साधना Lol अगदी अगदी. अपवाद फक्त शोले चा.

बेबे मी किनारा साडी वाचलं... Lol
म्हणलं इथे कुठे ही साड्यांची चौकशी करायलिये? Uhoh
नीट वाचल्यावर कळलं सीडी Proud

बर्‍याच गोष्टीत फरक पडलाय सुनीलजी.
बेंगरुळ दिसलेल्या हिरो हिरोइन्सची जागा देखण्या, शरीरसौष्ठव सांभाळणार्‍या हिरो हिरोइन्सनी घेतलीय.

केवळ डोळ्यातील धगधगत्या अंगाराच्या जोरावर सिनेमा आपल्या नावावर करणार्‍या हिरोची जागा चित्रपटभर भावहिन डोळे घेवून निव्वळ मारामार्‍या करत वावरणार्‍या बलदंड पैलवानानी घेतलीय.

कॅबरे करणारी हेलनही कधी अश्लील वाटायची नाही आजच्या नट्या घरातल्या घरात आपल्या आईसमोर ज्या कपड्यात वावरताना दिसतात त्यात आपण आपल्याला मुलीला कधीच पाहू शकणार नाही.

आधी प्रसंगाला अनुसरून गाणी असायची, आता गाण्यांचा त्या चित्रपटाच्या कथानकाशी फारसा संबंधच नसतो.

एकंदरीत काय तर काही चांगले आणि काही वाईट असे दोन्ही बदल घडलेत. कुठलीही गोष्ट मुलतः कालसापेक्ष असते. आपली आवड-निवडही....! बदलत्या काळाप्रमाणे सगळेच बदलत जाते. त्या काळातला राजेश खन्ना आजच्या पिढीला आवडत नाही. (मलापण नाही) तसेच आजच्या पिढीतला सुनील शेट्टी त्या पिढीला आवडत नाही.

आजची पिढी खुप सुज्ञ आणि हुशार आहे. तिला त्या काळातील संगीत आजही आवडते, मधल्या काळातील विविध विषयांवर बनलेले चित्रपट पाहणारी संख्याही खुप मोठी आहे, जुन्न्यातील सोन्याबरोबर नव्या चित्रपटातील विविधता आवडणारेही खुप आहेत.

जे तुम्ही म्हणताय ते म्हणणारे त्या काळातही होतेच की. सैगलचे चित्रपट बघणार्‍यांना राजा हरिश्चंद्र कसा वाटला असेल? दिलीप कुमार, देव आनंद , राज कपुर, अशोक कुमार बघणार्‍यांना सैगल, मास्टर विठ्ठल, जयराज कसे वाटत असतील? मिनी शॉर्ट घालून मम्मी म्हणत आईच्या गळ्यात पडणारी नटी पाहणार्‍या आजच्या पिढीला बिकीनीतली जयश्री कशी वाटत असेल? and vice versa ........

तेव्हा just take it eazy policy Proud

ऑफ कोर्स विशाल ! हे सगळं लाइट मूड मधेच लिहिले आहे. शिवाय माझ्या मुलीच्या द्रुष्टिकोनातुन पाहिल्यावर मलासुद्धा हे पट्लं म्हणूनच हा लेखन प्रपंच.

Pages