परवा नुकतेच टीव्हीवर राजेश खन्नाचे गाणे पहात होतो. आणि माझी कन्या ई.... करून किंचाळली. मी दचकून तिच्याकडे पाहीले तर म्हणाली काय बाबा काय पहाताय? हा काय हिरो आहे? मी खरं तर चिडलो होतो. अरे एके काळी 'आराधना' पहाण्यासाठी आम्ही ब्लॅक ची तिकिटे काढली होती. शर्मिलेच्या जागी गल्लीतील लोकल शर्मिलाला पाहत गाणी गुणगुणली होती त्याचा असा हा उपमर्द?? पण नव्या पिढीला काय सांगणार...
.... नाही. मी अशी प्रतिक्रिया अजिबात दिली नाही. खरं तर कन्येच्या प्रतिक्रीयेवर मी अंतर्मुख झालो. आणि विचार करू लागलो.
आजच्या काळातील ते पिक्चर्स खरोखर आता अगदी बेंगरूळ वाटतात्.विशविशीत कथा --- बेतलेल्या, ४०-४२ मधील हिरोइन्स (बल्जिंग अॅन्ड बल्की पण) यांना आपण कसं सोसलं याचे आच्शर्य वाटले
त्यानंतर अमर,अकबर,अॅन्थनी मधील ब्लड ट्रान्स्फर सीन तिघांचे रक्तगट एकच.. अगदी कॉर्पोरशन च्या नळाप्रमाणे रक्त देतात यावेळी आपली सायन्टीफिक साइट कुठे होती हा प्रश पडला.
केवळ माँकी कसम म्हणुन ऐनवेळी मध्यंतरापुर्वी ठोकरणारा विशविशीत नायक आणि तिच्या लग्नानंतर फकाफका सिगारेटी ओढून किंवा नशा करून विरह गीते गाणारे हिरो याना आपण मानले याचीच कीव आली.
तर कघी कधी आर्ट फिल्म पहाताना पुढचा डायलॉग आपणच बोलावा अशी ऊबळ येण्याएवढे स्लो डायलॉग्ज.. आठवा... 'अनुभव' संजीवकुमार...
कधीही धूर न येणारा पाईप तोंडात ठेवून, गाउन मधील बाप ... पुढे त्याचा डायलॉग काय असणार हे तुम्ही ओळखला असणारच... हो तोच तो... खानदानकी.....
आणखी एक ... त्याकाळी राज ठाकरे असता तर.....????
मॉ मुझे तेरे हातका गाजर का हलवा .. पराठे.. राजने त्याना नक्किच हिंदी वाल्याना वडा पाव आणि पाव भाजी खायला लावली असती. राज तू पहले आना था.
आणखी एक मोठा जोक.. राजेंद्रकुमार नावाचा एक महा बोर 'नट" २५ सिल्व्हर ज्युबिल्या करुन गेला आणि जॉय मुखर्जी नावाचा एक जोकर हिरो म्हणून कार्यरत होता आणि त्याला सार्या छान छान नायिका होत्या. जल् गये उस्ताद..
काही असो या पिक्चर्सनी आमच्या पिढीला स्वप्ने दिलीत आणि मनोरंजन देखील... अजुनही ती गाणी... ते शब्द आठवतात हे त्या कवींचे आणि संगीतकारांचे काँट्रीब्यूशन ...
दिलने फिर याद किया....
७०-८० च्या दशकातील सिनेमे आणि मला आलेले हसु
Submitted by सुनिल जोग on 10 October, 2010 - 02:36
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे नव-याकडे परत जाणे हा
हे नव-याकडे परत जाणे हा प्रकार मला कधीच पटला नाही. गुमराह, वो सात दिन, सिलसिला.... सगळीकडे तेच.. ज्याच्याशी अजिबात पटत नाही, जिथे मन कधी जुळलेच नाही, तिथे त्याचा/तिचा केवळ एक अपघात झाला म्हणुन लगेच उरलेल्या आयुष्यात पटायला लागणार??? कैच्याकैच.. पण असला शेवट न करण्याचे धाडस कोण दाखवेल?? मला कभी अलविदा... हा बकवास चित्रपट केवळ असला फालतु शेवट केला नाही म्हणुन लक्षात राहिला...
जे कायम झगडत राहिले त्यांचा
जे कायम झगडत राहिले त्यांचा तो झगडा चेह-यावरही उमटला.
>>>
अनुमोदन.
उदा. झीनत अमान. पॅरॅलिसिस झालेल्यांचा चेहरा कसा वाकडा वै. होतो तसा वाटतो मला हल्ली तिचा चेहरा कायम. तिचा नवरा तिला कायम मारहाण वै. करायचा ना म्हणे.
बादवे, साधनाच्या 'काय प्रकारचे आयुष्य मिळालेय यावरही माणसाचे रुप अवलंबुन राहते काय?' या प्रश्नामुळे असे उगीचच वाटून गेले की म्हणूनच कदाचित मधुबालाला देवाने इतके कमी आयुष्य दिले असावे. तिचे सौंदर्य जसे च्या तसे आपल्या सर्वांच्या मनात घर करून आहे. कारण म्हातारी झाल्यानंतर तिचे रुप कदाचित साधना म्हणते तसे गत आयुष्याच्या खुणा वागविणारे झाले असते तर तिची त्या गोड छबीला गालबोट लागले अस्ते.
निंबुडे, अनुमोदन गं..
निंबुडे, अनुमोदन गं.. मधुबालेच्या छबीला देवानेच गालबोट लावायचे टाळले....
अच्छाजी मै हारी चलो मान जाओ ना.. मध्ये काय गोड दिसते ती.. तिच्यावर रागावण्याचे नाटक देव (आनंद) गाण्यात कसा काय करु शकला देवाला (वरच्या) ठाऊक.....
>>काय प्रकारचे आयुष्य मिळालेय
>>काय प्रकारचे आयुष्य मिळालेय यावरही माणसाचे रुप अवलंबुन राहते काय? ज्यांचे आयुष्य ब-यापैकी समाधानी गेले ते लोक कायम ग्रेसफुल दिसत राहिले, कुठल्याही फिल्डमधले... जे कायम झगडत राहिले त्यांचा तो झगडा चेह-यावरही उमटला.
मला असं वाटतं की आयुश्याने काय दिलंय ते माणसाने कसं घेतलं ह्यावर त्याचं ग्रेसफुल दिसणं/असणं ठरतं. आयुष्यात समाधानी असलेल्या लोकांना सगळ्या गोष्टी मिळाल्याच असतील असं नाही. पण जे मिळालं त्यात त्यांनी समाधान मानलं आणि तेच त्यांच्या चेहेर्यावर असेल.
झीनतचं उदाहरण घेतलंत म्हणून सांगते. एका ख्रिसमसला मी आणि माझी एक मैत्रीण ख्रिसमस ट्री शोधायला बांद्र्याला गेलो होतो. एका दुकानात माझं "हे नको, ते नको' चाललं होतं एव्हढयात मैत्रीणीने मला कोपराने ढोसलं. "ती बघ झीनत अमान". "कुठे?" म्हणून मी वळून बघते तर अत्यंत साध्या वेशातली झीनत एका कोपर्यात उभी राहून काही डेकोरेशनचं सामान पहात होती. मैत्रीणिने दाखवलं नसतं तर मी तिला ओळखलं ही नसतं. खरं सांगू? तेव्हा मला ती जाम आवडली. उगाच कधी काळी आपण बिनधास्त नायिका होतो म्हणून त्या इमेजला जपायचा केविलवाणा प्रयत्न न करता अत्यंत साधी राहणी असलेली. मला वाटतं तिच्या एका डोळ्यावर त्या मारहाणीमुळे परिणाम झालाय. पण शरीराचं जाऊ देत. मन ताजं असेल की चेहेरा सुध्दा ताजाच दिसतो, मेकअपचे थर नाही लागत असं आपलं मला वाटतं. पटलं तर बघा, नाहीतर सोडून द्या
पटलं गं... मला समाधानी
पटलं गं... मला समाधानी म्हणताना तेच अभिप्रेत होतं की जे काही मिळाले ते त्यांनी समाधानाने घेतले.
आता हेमाचे लग्न म्हटले तर हिंदु कायद्यानुसार लग्न ठरते का? कायदेशीर कटकट टाळण्यासाठी तिच्या मुलीना जन्मताच धर्मेंद्रने दत्तक घेतले असे मी वाचले कुठेतरी. तिला कुठेतरी या सगळ्याची बोच असेलही, पण आहे त्यातही तिचा चेहरा खुप समाधानी वाटतो.
राजकुमार ह्या प्राण्याबद्दल
राजकुमार ह्या प्राण्याबद्दल कोणी कसं बोललं नाही अजून?
साधना गुणाची बाई माझी दोन्ही
साधना गुणाची बाई माझी दोन्ही पोस्टे अतिशय सुन्दर. व बरोबर. ग्रुहप्रवेश मला पण खूप आवड्तो.
ती नवर्याच्या मैत्रीणीला घरी बोलविते व घर नीट करून घेते. मैत्रीणीला घेओन नवरा येतो व परत जातो मग मात्र तिला रडू येते हा सर्व प्रसंग इतका सुरेख आहे. अगदी पोटात खड्डा पड्तो बघ. शम्मू इज शम्मू. झीनी ला हाय हाय ये मजबूरीत बघीतले आहे का? व मै न भूलूंगा मध्ये? अक्शी ग्वाड.
यादोंकी बारात, हरे रामा? अजनबी. हाय हाय. सो क्वीट.
झीनत मला पडद्यावर कधीच आवडली
झीनत मला पडद्यावर कधीच आवडली नाही. तिला रुपसुंदरी का म्हणायचे तेहि कळले नाही. पण एका कार शोरुम मधे मी तिला प्रत्यक्ष पाहिली. अगदी साधा ड्रेस आणि कडेवर मुलगा अशा अवतारात होती. मेकपही नव्हता. खुप छान वाटली त्यावेळी. माझ्याशीच बोलली ती, अगदी नम्र भाषा होती.
आयूष्याचे चटके ज्या चेहर्यावर उमटले असा एक चेहरा म्हणजे डिंपल. तिच्या डोळ्यात कायम एक उदासी दिसते. पण आपल्या आयूष्याचे प्रतिबिंब चेहर्यावर न उमटू दिलेले अनेक कलाकार आहेत. मराठीमधे रत्नमाला (त्यांनी रेडीओवर जाहिरपणे सांगितले होते, कि वैयक्तीक आयूष्यात सांगण्यासारखे काहीच नाही.) आणि आशा भोसले.
शर्मिला, उत्तम कुमारचा तो दूरियाँ. (याच्या इंग्लीश स्पेलिंगमधे तीन ० वापरत असत.) जिंदगि जिंदगि मेरे घर आना, हे गाणे त्यातलेच.
यादोंकी बारात मधलं "मेरी सोनी
यादोंकी बारात मधलं "मेरी सोनी मेरी तमन्ना" ऑल टाईम फेव्हरिट. त्यातल्या झीनतच्या फिगरचा सॉल्लीड हेवा वाटतो आणि मग आईसक्रीम-चॉकोलेटस न खाण्याची प्रतिज्ञा किमान ३-४ दिवस तरी टिकते
विजय अरोरा त्या एकाच पिक्चरमध्ये बरा दिसलाय. झीनतला तिचे वडिल लाडाने "बबुष्का" म्हणत असं कुठेतरी वाचल्याचं आठवतंय. हा बहुतेक रशियन शब्द असावा. त्या एकात एक एकात एक ५-६ बाहुल्या असतात त्यांना माझ्या माहितीप्रमाणे "बबुष्का" म्हणतात.
आणखी एक वाईट्ट हिरो म्हणजे ज्युलीतला विक्रम
शर्मिला "ऐसी भी बातें होती
शर्मिला "ऐसी भी बातें होती है" या गाण्यात प्रचंड गोड दिसलेय.. हे माझं अगदी आवडतं गाणं.
हसु नका पण "पुकारता चला हुं मै" मधला जॉय मुखर्जी आणि "जरा नजरोंसे कहदो जी निशाना चुक ना जाये" मधला विश्वजीत पण आवडतो मला.
राजेंद्रकुमार् हा अजुन एक ठोकळा.. बरीच चांगली गाणी मिळालीयेत या मख्ख माणसाला
आणखी एक वाईट्ट हिरो म्हणजे ज्युलीतला विक्रम हो आणि हीरवीन पण तसलीच.. ज्युली मध्ये गाणीच उत्तम होती बाकी सगळाच आनंद!
आणि हीरवीन पण तसलीच >> ही
आणि हीरवीन पण तसलीच
>>
ही लक्ष्मी...
नंतर बर्याच वर्षांनी प्रियन् च्या हलचल मधे करीनाची नानी म्हणून दिसली होती..
चिंगी, मला सुध्दा शर्मिलाच
चिंगी, मला सुध्दा शर्मिलाच "ऐसी भी बातें होती है" हे गाणं खुप आवडतं आणि 'इशारों इशारों में दिल लेनेवाले' या गाण्यांतही ती खुप गोड दिसली आहे.
>>शर्मिला "ऐसी भी बातें होती
>>शर्मिला "ऐसी भी बातें होती है" या गाण्यात प्रचंड गोड दिसलेय
अगदी, अगदी, अगदी. गाणं तर काय सही आहे. सुरुवातीचा पक्ष्यांचा किलबिलाट तर सुरेखच. एकदम शांत वाटतं ना हे गाणं ऐकल्यावर?
>>राजेंद्रकुमार् हा अजुन एक ठोकळा.. बरीच चांगली गाणी मिळालीयेत या मख्ख माणसाला
हो, ते एक कुठलं गाणं? त्यात हिरवीण (बहुतेक वैजयंतीमाला!) फुलांच्या झोपाळ्यावर असते आणि मागे एक हत्ती झुलत असतो ते? त्या हत्तीने ह्याच्यापेक्षा चांगला अभिनय केलाय. तो रडका चेहेरा केला की अजून वाईट्ट दिसायचा. एकदा माझी आई म्हणाली होती की तो खूप साधासरळ होता, काही लफडी नाहीत असं तेव्हा म्हटलं जायचं. मी म्हटलं त्याला ढीग लफडी करायची असतील पण त्याच्याबरोबर लफडी करायला तयार झालं पाहिजे ना कोणीतरी
मीनाकुमारीला "दिल एक मंदिर" मधे चॉईस बघा - राजकुमार किंवा राजेन्द्रकुमार!
बहारो फुल बरसाओ.. काय
बहारो फुल बरसाओ.. काय स्वर्गिय गाणे आहे ते.. आणि पडद्यावर तराजुसारखे हात वरखाली करणारा तो मठठ ठोकळाअ....
आणि हीरवीन पण तसलीच >> ही
आणि हीरवीन पण तसलीच
>>
ही लक्ष्मी...
नंतर बर्याच वर्षांनी प्रियन् च्या हलचल मधे करीनाची नानी म्हणून दिसली होती..>>>>>ज्युली नंतर राकेश रोशन बरोबर तिचा "आंगन कि कली" हा चित्रपट होता.
त्यातील लताने गायलेली दोन गाणी अप्रतिम आहेत. संगीत भप्पी लहरी
१. सैंया बिना घर सुना सुना (सोबत भूपेन्द्र)
२. तुम्हे कैसे कहु मै दिल की बात, कहते हुए मैं डरती हु, अखियोंसे फिरभी कहती हु....बोलो समझ गए ना......
सुनिलजी या धाग्याच्या
सुनिलजी या धाग्याच्या शिर्षकातील "आणि मला आलेले हसु" हे काढुन टाका आणि फक्त "७०-८० च्या दशकातील सिनेमे" एव्हढेच ठेवा

अनुपमा मध्ये शर्मिलाला हे
अनुपमा मध्ये शर्मिलाला हे गाणे येईपर्यंत काहीच संवाद नाहीयेत. मला तर ती मुकी वाटलेली आणि मग अचानक गायला लागल्यावर धक्काच बसला. अतिशय सुंदर चित्रपट आहे हा.. आणि शेवटही सुंदर. फार कमी चित्रपटात स्त्रीला काय पाहिजे याचा विचार केला गेलाय, हा चित्रपट त्यापैकी एक आहे. त्यात हिरो शेवटी तिला म्हणतो, तुला स्वातंत्र हवे का याचा निर्णय तु घे आणि जर हो असा निर्णय असेल तर माझ्याबरोबर ये. आजपर्यंत वडिलांच्या सावलीखाली राहिलीस, त्या सावलीतुन निघुन माझ्या सावलीत येऊ नकोस. स्वतःला काय हवे ते ठरव...
तसे मनाविरुद्ध लग्न करण्याचे
तसे मनाविरुद्ध लग्न करण्याचे प्रसंग बर्याच चित्रपटात होते. त्याकाळात तशाच समजुती होत्या.
>>>>>>>>>> अगदि अगदि.
म्हणूनच मला 'सिलसिला' खूपच आवडतो. एक खराखुरा मॅच्युअर्ड सिनेमा आहे तो. (जरी शेवट खूपच फिल्मी केला असला तरी...)
परिस्थितीमुळे दोन वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न झाल्यावर सुध्दा, चांदनी आणि अमित एकमेकांबद्दल असणारे आकर्षण थांबवू शकत नाहीत. दोघांच्या जीवाची घालमेल, तरी चोरून भेटणे, नंतर पळून जाणे ... हिंदी सिनेमाच्या मानाने बराच पुढारलेला होता.
हे नव-याकडे परत जाणे हा
हे नव-याकडे परत जाणे हा प्रकार मला कधीच पटला नाही. गुमराह, वो सात दिन, सिलसिला.... सगळीकडे तेच.. ज्याच्याशी अजिबात पटत नाही, जिथे मन कधी जुळलेच नाही, तिथे त्याचा/तिचा केवळ एक अपघात झाला म्हणुन लगेच उरलेल्या आयुष्यात पटायला लागणार??? कैच्याकैच.. पण असला शेवट न करण्याचे धाडस कोण दाखवेल?? मला कभी अलविदा... हा बकवास चित्रपट केवळ असला फालतु शेवट केला नाही म्हणुन लक्षात राहिला...
>>>>>>> खरय.... पण पब्लिक ला पण झेपायला पाहीजे ना.
रच्याकने, कोणी 'शीशे का घर'
रच्याकने, कोणी 'शीशे का घर' ची गाणी ऐकलीयेत? काय सुंदर गाणी आहेत. ती सुध्दा भप्पी लाहिरी ने दिलेली आणि सलमा आगा नी गायलेली. असलं जहाल कॉम्बिनेशन असूनही गाणी अस्सल आहेत. माझ्याकडे एक जुनी कॅसेट होती ती हरवली ... आता ही गाणी मिळतच नाहीयेत.
@चिंगी - पुकारता चला हूँ मैं
@चिंगी - पुकारता चला हूँ मैं - विश्वजीत आहे पडद्यावर.
अमी
पुकारता चला हु मै... हे रफीचे
पुकारता चला हु मै...
हे रफीचे नंबर १ गाणे आहे.. अगदी तलम मुलायम गायले आहे.... इतके सुंदर गाणे मला तरी दुसरे कुठले दिसत नाहीये... या गाण्यात मी कोणालाही सहन करेन. तशी आशा पारेख छान दिसते याच्यात आणि विश्वजीत अगदी मेणात कोरुन काढलेला सजीव पुतळा. गाणे, गाण्याचे लोकेशन आणि चित्रिकरण सगळेच इतके सुंदर आहे की त्या सुंदर चित्रात विश्वजित असला तरी चालुन जाते....
शर्मिलाचा विषय निघाल्यावर मला
शर्मिलाचा विषय निघाल्यावर मला माझ्या मित्राचे वाक्य आठवते. "ही बया भिंती पलिकडुनही गळ्यात पडते". किती ते नाटकी हावभाव. ह्या धाग्यात "मला आलेले हसू" असे आहे म्हणुन सांगावेसे वाटते-शर्मिलाचा "दाग" मध्ये एक शॉट आहे. राजेश खन्ना तिच्या वडिलांकडे तिला प्रपोज करायला येतो. ती डेंजर केशभुषा करुन बाजुच्या खोलीत दारा आडून ऐकत असते. तिने जो काय नाटकी अभिनय केला आहे त्याला तोड नाही. ईथे पोस्ट करायला मला हा शॉट कुठे मिळाला नाही. मिळाल्यास जरुर बघा.
दुसरा सिनेमा An Evening in Paris. त्यातील ते "जा जा" हे "या या" वाटते. शम्मी हेलीकॉप्टरमध्ये पण ही बया "जा जा" म्हणत जमिनीवरुन त्याच्या गळ्यात पडते.
वाईट वाटते ते एव्हढेच की ज्या करियरची सुरवात सत्यजित रे सारख्या दिग्दर्शकाकडे झाली त्या अभिनेत्रीनी अशी नाटक करावी.
लिला नायडु ही डॉन मोरेस ह्या
लिला नायडु ही डॉन मोरेस ह्या वृत्तपत्रकाराची बायको. ती ऐतशय सुंदर होती असे त्या काळातील कुठल्याश्या मासिकात आले होते. अतिशय सुमार अभिनय. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे हे सिध्द करायला " अनुराधा" आणि "ये रास्ते है प्यार के"(जुना) बघावा. अनुराधात हृषिकेश मुखर्जीने तिला फटकावून अभिनय आणि मुख्य म्हणजे डायलॉग डिलीव्हरी करवून घेतली असावी. "ये रास्ते है प्यार के" पाहिल्यावर हे पटेल.
नादिरा मात्र साडी नेसून
नादिरा मात्र साडी नेसून राजकुमारशेजारी एखादा स्त्रीपार्टी बसवल्यासारखी वाटते.
हहपुवा
अरे हो, माझंच कन्फुजन झालं..
अरे हो, माझंच कन्फुजन झालं.. मला लव्ह इन टोकियो मधला जॉय मुखर्जी म्हणायचं होतं.. "पुकारता चला हुं मै " वाला सिनेमा आणि लव इन टोकियो मध्येपण आशा पारेख होती ना.. मला लहान असताना आशा पारेख पण आवडायची..:अओ: आता बघितलं की सगळ्या सीनमध्ये लालसर दिसणारे तिचे डोळे आणि तिच्या डोक्यावरच्या टोपलं च दिसतं.
रच्याकने विकीपीडीयावर जॉय मुखर्जी चे नातेवाईक दिलेत.. मला जरा धक्काच बसला..
Joy Mukherjee is the son of Sashadhar Mukherjee and Sati Devi. His father was a successful producer and a co-founder of Filmistan Studios. His paternal uncle is director Subodh Mukherjee, whilst his maternal uncles were Ashok Kumar and Kishore Kumar. His brothers are Deb Mukherjee and Shomu Mukherjee who was married to actress Tanuja. Their daughters are actresses Kajol and Tanisha. His niece is Rani Mukerji and nephew is her cousin, director Ayan Mukerji.
अनुपमा खरंच छान सिनेमा आहे.. धर्मेंद्र पण मस्त दिसलाय त्यात.. "या दिल की सुनो दुनियावालो" हे गाणं पण अप्रतिम.
शर्मिला टगोरच्या टोपल्याची
शर्मिला टगोरच्या टोपल्याची बरीच चर्चा वाचली. किती चित्रपटात तिच्या डोक्यावर टोपले आहे? मी पाहिलेल्या बहुतेक मध्ये नाही. सगळ्या चर्चेत मौसमचा उल्लेख दिसला नाही. त्यात टोपले नव्हतेच पण त्यात तिने संजीवकुमारसारख्या कलाकारालाही अभिनयाने आव्हान दिले आहे. शेवटी दिग्दर्शक कोण हे महत्वाचे. टोपल्याचा उल्लेख असलेले चित्रपत अ बॉय मीट्स अ गर्ल या धाटणीचे करमणुकी चित्रपट होते. त्यात नाटकी अभिनयच असणार. जिथे अशी कथानके नव्हती तिथे शर्मिला टागोरने अभिनय उत्तमच केला आहे. अमिताभबरोबरचा विरुद्ध ही उत्तमच होता.शिवाय सम्पूर्ण करीअरमध्ये तिने फिगर उत्तम सांभाळली...
झीनत अमान रुढार्थाने सुन्दर नव्हती पण तिच्यात एक स्मार्ट नेस आणि आकर्षक व्यक्तिमत्व होते. थापलेल्या मेकप मधून आणि अवाढव्य शरीरयष्टीच्या नायिकापासून मुक्ती मिळण्याचे युग तिने सुरू केले असे म्हणावे लागेल.
७०-८० चा विषय असताना त्यात ६०
७०-८० चा विषय असताना त्यात ६० च्या नटनट्यांविषयीही चर्चा सुरू झाली आहे असे दिसते. कारण माला सिन्हा, साधना, मीनाकुमारी ह्या बायका ६० च्या दशकातच गाजल्या. असो. माझी तक्रार नाही.
७० च्या दशकात हेमा मालिनी बरोबर मुमताझ, रेखा, मौसमी चटर्जी, सायराबानू, जया भादुरी, रीना रॉय ह्याही होत्या.
मुमताझ : दिसायला सुंदर आणि अभिनयही ठीक.
रेखा: सुरवातीला अगदीच सुमार अभिनेत्री होती पण नंतर एकदम पॉलिश्ड झाली.
मौसमी: सुंदर. बाकी ठीकच.
जया भादुरी: दिसायला यथातथाच पण अभिनय चांगला करायची. मला तिचे फिजामधले कामही आवडले होते.
रीना रॉय, सायराबानू, परवीन बाबी: फार काही उल्लेखनीय नाही. गाणी चांगली मिळाली, सिनेमेही गाजले म्हणून पुढे आल्या.
जया माझी अगदी नावडती.. का
जया माझी अगदी नावडती.. का माहित नाही. काही लोकांना एकदा पाहिले की नापसंतीच सुक्ष्म आठी कपाळावर उठते, का ते कधी कळत नाही
सायरा आधी काय मस्त शिडशिडीत होती. 'तुम कमसीन हो' मध्ये इतकी कमसीन होती. पण नंतर कुठल्या सायकल मार्ट मध्ये जाऊन हवा भरुन घेतली तिने देव जाणे.
सगळ्याच काळातल्या हिरोइनींना अंगप्रदर्शन करावे लागतेच, तिथे तडजोड नाही. पण काहीजणींचे प्रदर्शन नॅचरल वाटायचे, या आणि बघा माझ्याकडे असा भाव नसायचा - वैजयंती, शर्मिला, मुमताज, आशा पारेख (हिचे अंगच इतके बोजड की लपवणार कुठे??) इ.इ.. ब-याच या कॅटेगरीत यायच्या.. पण सायरा बानु नंतरच्या चित्रपटांमध्ये अगदी डोळ्यावर येईल असे प्रदर्शन करायची. आणि माझ्या मते ते भयानक दिसायचे.
मुमताजचा ड्रेससेन्स त्या काळात सुंदर होता. तिला शोभतील असे पेस्टल शेड्स आणि अंगावरतीच शिवलेत असे वाटणारे कपडे ती वापरायची. (तिही नंतर जाड झाली
)
सुलक्षणा, विद्या ही मंडळी केवळ काही चांगले चित्रपट मिळाले आणि त्यात गाणी सुंदर मिळाली म्हणुन लक्षात राहिली. नाहीतर तश्या ब-याच आल्या आणि गेल्या...
शर्मिलाबाबत बाळू यांच्याशी
शर्मिलाबाबत बाळू यांच्याशी सहमत.
मौसममध्ये तिचा काका तिच्यावर अत्याचार करतो त्यानंतर ती घरी परतते तेव्हाचा तिचा उध्वस्त चेहरा पाहुन काटा येतो अंगावर अगदी.. तिने खरेच संधी मिळाली तेव्हा तिचे सोने केले आहे.
Pages