७०-८० च्या दशकातील सिनेमे आणि मला आलेले हसु

Submitted by सुनिल जोग on 10 October, 2010 - 02:36

परवा नुकतेच टीव्हीवर राजेश खन्नाचे गाणे पहात होतो. आणि माझी कन्या ई.... करून किंचाळली. मी दचकून तिच्याकडे पाहीले तर म्हणाली काय बाबा काय पहाताय? हा काय हिरो आहे? मी खरं तर चिडलो होतो. अरे एके काळी 'आराधना' पहाण्यासाठी आम्ही ब्लॅक ची तिकिटे काढली होती. शर्मिलेच्या जागी गल्लीतील लोकल शर्मिलाला पाहत गाणी गुणगुणली होती त्याचा असा हा उपमर्द?? पण नव्या पिढीला काय सांगणार...
.... नाही. मी अशी प्रतिक्रिया अजिबात दिली नाही. खरं तर कन्येच्या प्रतिक्रीयेवर मी अंतर्मुख झालो. आणि विचार करू लागलो.
आजच्या काळातील ते पिक्चर्स खरोखर आता अगदी बेंगरूळ वाटतात्.विशविशीत कथा --- बेतलेल्या, ४०-४२ मधील हिरोइन्स (बल्जिंग अ‍ॅन्ड बल्की पण) यांना आपण कसं सोसलं याचे आच्शर्य वाटले
त्यानंतर अमर,अकबर,अ‍ॅन्थनी मधील ब्लड ट्रान्स्फर सीन तिघांचे रक्तगट एकच.. अगदी कॉर्पोरशन च्या नळाप्रमाणे रक्त देतात यावेळी आपली सायन्टीफिक साइट कुठे होती हा प्रश पडला.
केवळ माँकी कसम म्हणुन ऐनवेळी मध्यंतरापुर्वी ठोकरणारा विशविशीत नायक आणि तिच्या लग्नानंतर फकाफका सिगारेटी ओढून किंवा नशा करून विरह गीते गाणारे हिरो याना आपण मानले याचीच कीव आली.
तर कघी कधी आर्ट फिल्म पहाताना पुढचा डायलॉग आपणच बोलावा अशी ऊबळ येण्याएवढे स्लो डायलॉग्ज.. आठवा... 'अनुभव' संजीवकुमार...
कधीही धूर न येणारा पाईप तोंडात ठेवून, गाउन मधील बाप ... पुढे त्याचा डायलॉग काय असणार हे तुम्ही ओळखला असणारच... हो तोच तो... खानदानकी.....
आणखी एक ... त्याकाळी राज ठाकरे असता तर.....????
मॉ मुझे तेरे हातका गाजर का हलवा .. पराठे.. राजने त्याना नक्किच हिंदी वाल्याना वडा पाव आणि पाव भाजी खायला लावली असती. राज तू पहले आना था.
आणखी एक मोठा जोक.. राजेंद्रकुमार नावाचा एक महा बोर 'नट" २५ सिल्व्हर ज्युबिल्या करुन गेला आणि जॉय मुखर्जी नावाचा एक जोकर हिरो म्हणून कार्यरत होता आणि त्याला सार्‍या छान छान नायिका होत्या. जल् गये उस्ताद..
काही असो या पिक्चर्सनी आमच्या पिढीला स्वप्ने दिलीत आणि मनोरंजन देखील... अजुनही ती गाणी... ते शब्द आठवतात हे त्या कवींचे आणि संगीतकारांचे काँट्रीब्यूशन ...
दिलने फिर याद किया....

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंपलच्या अभिनयाबाबत काही बोलत नाही, पण ती उत्कृष्ट ड्रेस डिझायनर होती. मला वाटतं 'सोचा न था' हा तिचा ड्रेस डिझायनिंग केलेला शेवटचा मूव्ही. 'रुदाली' साठी तिला राष्ट्रीय पुरस्कारपण मिळाला होता.

पद्मिनी कोल्हापुरे मस्तच होती मामी... मला ती आवडली नाही असे एकदाही झाली नाहिये. हसरे डोळे होते तिचे म्हणुन असेल नेहमीच प्रसन्न वाटायची.

अमा.त्या शीतलचे ग्रह बेमिसाल किंवा जुर्माना यापैकी एका सिनेमात भलतेच उच्च होते.
चक्क अमिताभसमोर एका पुर्ण गाण्यात शीतल.

मला वाटतं किशोरकुमारच्या आवाजातलं 'मै तेरा नाम लुंगा' हेच ते गाणं. अर्थात पुर्ण गाण्यात शीतलबाई साडीत असल्यामुळे (तिला स्वतःला ते जरा ऑड वाटलं असलं) तरी चालुन गेलं.

btw रीना रॉयच्या सु (?) प्रसिद्ध ' नागिन " मधे विनोद मेहेराची नायिका झालेली ती विशालिनी कोण आहे ?

काल पुन्हा एकदा ३ इडियटस पाहिला आणि त्यातील अमिरच्या युक्त्या आणि अमोल पालेकर च्या एका (बहुदा रजनीगंधा- चु.भु.दे.घे.) चित्रपटातील युक्त्या यांच्यातील कथा साम्यस्थले यांची नकळत तुलना झाली. आणि मला एक नविनच साक्षात्कार झाला. अहो हा अमिर चक्क मॅनेजमेंट्च्या युक्त्या वापरतो की ... उदा शिव खेरा चे थिंक डिफरंटली = ३ इडियट्स ( अँम्ब्युल्न्स ऐवजी स्कूटी वापरणे) तर लगान मधे 'टीम वर्क " चा कुशल उपयोग. खरंतर तो यशस्वी मॅनेजर आहे. 'ही कोऑर्डीनेट्स नाईसली.' कधी डायरेक्शन आउट्सोर्स करतो तर कधि अ‍ॅक्टींग आउटसोर्स करतो.गुड.!!!

@ अस्मानी: ती विशालिनी म्हणजे योगिता बाली - किशोरकुमारची तिसरी पत्नी, मिथुन चक्रवर्तीची प्रथम पत्नी.

अमी

योगिता बाली अगदी पहिल्या चित्रपटापासून 'गुटगुटीत' होती. बिन दाढीचा कबीर बेदी पाहिलाय का कोणी? म्या बघिटलाय . या बालीबाई सोबत तो हिरो होता त्यामुळे त्याला कुंथत का होईना अभिनयाचा प्रयत्न करावा लागला आहे.

ती होय योगिता बाली !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! माझा इतके दिवस उगिचंच समज होता की योगिता बाली ही कुणीतरी ३० - ४० च्या दशकातली जुनाट अभिनेत्री असावी !

सारख्या दिसणार्‍या जोड्यांमधे भर !
" हम दिल दे चुके सनम " च्या काळातला अजय देवगण बर्‍यापैकी तरुणपणच्या ( "मेरा साया " काळातल्या) सुनिल दत्त सारखा दिसतो. आणि हो ! रणबीर कपूर हसतांना सनी देओल सारखा दिसतो.

शिल्पा शेट्टीच्या बहिणीला पाहून मला सिम्पल कपाडियाची आठवण येते. शीतल नायिका होती का खलनायिका? "एक रोज मै तडपकर इस दिलको थाम लुंगा" मध्ये अमिताभबरोबर होती तीच ना?

>> उड्शील नाहीतर काय
>>देख कबीरा रोया १९५७ चा त्यात शुभा खोटे होती.
>>'जबान संभालके' १९९५ ची सिरियल त्यात भावना बलसावर होती.

भावना बलसावर म्हणजे शुभा खोटेची मुलगी होतीच पण शुभा खोटेही होती त्यात. त्या सेन्टरची प्रमुख असते. त्या रशियन माणसावर खुश असते ती.

>>च्या काळातला अजय देवगण बर्‍यापैकी तरुणपणच्या ( "मेरा साया " काळातल्या) सुनिल दत्त सारखा दिसतो

देवगण स्वतःला सुनील दत्त समजायचा. पण कहा राजा भोज.....

या बाफचे शिर्षक पूर्णपणे सार्थ करणारा एक नरपुंगव म्हणजे 'राजेंद्रनाथ'. शम्मी कपूरच्या बहुतेक सिनेमात हा असायचाच आणि अत्यंत आचरट चाळे करून ही साईड हिरॉईनला पटवायचाच. झबलेच काय घालेल, गाढवावर उलटेच काय बसेल... काय नि काय. त्याचे सगळे विनोदही एकदम निर्भेळ असायचे आणि तो दिलाचा ही सच्चा असायचा. एक कॉमेडी अ‍ॅक्टर म्हणून मला हा खूप आवडायचा. (मला मेहमूद कधीच आवडला नाही.... )

एकदा मी आणि माझी मैत्रिण कॉलेजला जात असताना ट्रेनमध्ये आदल्या दिवशी झालेल्या शम्मी कपूरच्या सिनेमातल्या राजेंद्रनाथच्या चाळ्यांच्या आठवणी काढकाढून डोळ्यात पाणी येईपर्यंत हसलो होतो. चित्रपटाचे नाव आठवत नाही. पण त्यात राजेंद्रनाथ एका हॉस्पिटलात जातो आणि सारखा एका कोणा बिचार्‍याच्या पायाला प्लॅस्टर घातलेलं असतं त्याच्या पायावर पाय देऊन जात असतो. धमाल होती नुसती! Lol Lol Lol

विकेन्डला "ये पर्बतोंके दायरे, ये शामका धुआ" हे गाणं पाहिलं. एका कडव्याच्या सुरुवातीला नायिका क्षणभर कुठल्यातरी हिलस्टेशनवर बागडताना दाखवली आहे. तेव्हढं सोडून अख्ख्या गाण्यात पर्वत आणि ते धुआ औषधाला सुध्दा नाही Proud

अजून काही नायिका आठवल्या - शकिला, कुमकुम आणि इन्द्राणी मुकर्जी (हा मात्र इन्द्राचा ऐरावत होता!)

लहानपणी ते बघून मला नेहेमी वाटत रहायचं की ही बया तो जरा वर का खेचत नाही?

त्याकाळच्या सगळ्याच बायांचे पदर तसेच असायचे.. त्याकाळी तसे प्रदर्शन करायचे. राखीचा पदर तर बघायलाच नको, मला अगदी जीवावर यायचे तिच्याकडे पाहायला. आता मात्र एका साडीतुन जवळजवळ ५० मस्त अत्याधुनिक ड्रेसेस डिजाईन करतात आणि हिरोइनला देतात घालायला...आताचे प्रदर्शन.... Happy

तिने म्हणे एक सिनेमा पूर्ण पणे प्रोड्यूस केला होता सबकुछ तीच.

हाच तो अमिताभवाला, इस दिल को थाम लेना वाला चित्रपट. ह्याची सबकुछ तीच होती. पैसे भरपुर असावेत बाईकडे. अगदी अमिताभबरोबर चमकायची हौस भागवुन घेतली.

अजय देवगणचा पहिला चित्रपट झळकला (फुल और कांटे की पत्थर असे काहीतरी नाव होते) तेव्हा मला तो सुनिल दत्तचा मुलगाच आहे असे वाटले. खरे तर साम्य इतके होते की तो सुनिल दत्तच वाटायचा पण केवळ वयातील फरकामुळे मी त्याला मुलगा समजले. अगदी केसांसकट सुनिल दत्त. आता मात्र अजयचा चेहरा खुप बदललाय. त्याचे दात भयानक घाण आहेत. बहुतेक गुटका खात असणार. पण त्याचे फिजिक मात्र जबरदस्त आहे. ह्रितिक नंतर मला तरी त्याचेच फिजिक अफलातुन वाटते. (सलमान टाईप फिजिकवर ते कमावलेले आहे याचा स्टँप आहे, ते नॅचरल वाटत नाही. पण अजय्/रितिक चे कमावलेले असुनही अगदी नैसर्गिक वाटते. आपण पहिलवानाकडे पाहतोय असा फिल येत नाही Happy )

सुनिल दत्त हा एक असा अ‍ॅक्टर होता जो गावठी/अडाणी रोलमध्ये शोभुन दिसला तसाच आधुनिक सोफिस्टिकेटेड रोल्समध्येही शोभला. शेतकरीही वाटला, माळीही वाटला त्याचबरोबर डॉक्टरही वाटला, कवीही वाटला, गायकही वाटला. तसे देव आनंद, फिरोज खान, संजय खान कायम शहरी वाटले. देव आनंदला कोणी शेतक-याचा रोल दिला असता तर तो कसा दिसला असता देव जाणे... Happy

स्वप्ना, 'ये पर्बतोंके दायरे...' मस्त गाणे आहे गं..

रच्याकने, तुला सुनिल दत्त भारीच आवडतो वाटते..... Wink

>>रच्याकने, तुला सुनिल दत्त भारीच आवडतो वाटते.

आमच्या घरी "मौसीभी तय्यार, बसंतीभी तय्यार" असा मामला आहे ग Proud तो फक्त त्या वहिदा रहमानच्या एका गाण्यात मला आवडला नाही - रातभी है कुछ भिगी भिगी.....त्यात तो डाकू दाखवलाय आणि ह्या गाण्यानंतर तो तिला पळवून नेतो. चेहेर्‍यावर अगदी वाईट भाव आणलेत त्याने. Sad

रच्याकने, एक विसरले - "बंबईका बाबू" मध्ये सुचित्राचं लग्न तू म्हटल्याप्रमाणेच शेवटी दुसर्‍याच कोणाशीतरी होतं. त्यावेळी एक सुरेख गाणं आहे ते आठवत नव्हतं - विकेन्डला कुठल्यातरी एफएम चॅनेलवर लागलं होतं - चल री सजनी अब क्या सोचे, कजरा ना बह जाये रोते रोते. बाकी 'ये पर्बतोंके दायरे...' बद्दल अनुमोदन. पडद्यावर विश्वजित आणि कुमुद छुगानी ह्यांनी माती केली आहे. चित्रिकरणही लिरिक्सशी मेळ खात नाही Sad

इंद्राणी मुखर्जी : आखरी खत-- बहारों मेरा जीवनभी सवारो, कोई आये कहीसे, यू पुकारो.. लता.
तिचा चेहरा खुपसा मीनाकुमारीशी मिळताजुळता होता. राजेश खन्नाच्या एका चित्रपटात (त्यात तो पोष्टमन असतो) तर तिने मीनाकुमारीचाच रोल केला होता. व्हॉइस ऑफ मीनाकुमारी, साधना खोटे चा आवाज वापरुन.

पर्बतोंके दायरे, वरुन मला दुसरे गाणे आठवले
पर्बतोंके पेडोंपर, शाम का बसेरा है
सुरमयी उजाला है, मखमली अंधेरा है

रफि आणि सुमन ने गायलेय. सिनेमा शगुन. यात वहिदा रेहमान आणि तिचा नवरा कमलजीत होते. (तो नंतर कधी कुठल्या सिनेमात दिसलाच नाही.)
खय्यामच्या बायकोने (जगजीत कौर) ने यात, तूम अपना रंजो गम, अपनी परेशानी मुझे दे दो, हे छान गाणे गायले होते. तिने अगदी मोजकीच गाणी गायली. अनेक वर्षांनी सुप्रिया, स्मिता च्या बाजार साठी, तिने देखलो आज जी भरके, के कोई आता नही एक बार मरके, असे आर्त गाणे गायले होते.

पडद्यावर विश्वजित आणि कुमुद छुगानी ह्यांनी माती केली आहे

ही कुमुद छुगानी बया फक्त सिंधी प्रेक्षकमंडळींना आवडायची असे मला एका मैत्रिणीने सांगितलेले. पुढे शिरिष कणेकरांनी, 'ह्या बयेसाठी सिंधी लोक जीवही घ्यायला (द्यायला नव्हे, सिंधी फक्त कमावतील, गमावणार नाही काही) तयार झालेले असे ऐकिवात होते' असे लिहिलेले. मी तरी तिचा हा एकच चित्रपट पाहिलेला. तो पाहतानाच 'ये पर्बतोंके दायरे....' हे अप्रतिम गाणे आहे यात आहे ह्याचा शोध लागला आणि एकाच वेळी चांगले गाणे ऐकल्याचा आनंद आणि चांगल्या गाण्याचा पडद्यावर फालुदा ह्याचे दु:ख अशा संमिश्र भावना मनात दाटुन आल्या.....

अजुन एक बया 'हरे कांच की चुडीया' नावाच्या चित्रपटात होती. मला तिचे नावही आठवत नाही आता. तिने अजुन १-२ चित्रपट केलेत. चित्रपटाचा विषय लग्नाआधीच गरोदर हा त्याकाळी महाभयानक स्फोटक समजला जाणारा असा होता. पण चित्रपटाची हिरोईन इतक्या सहजपणे मख्ख चेहरा ठेऊन वावरत होती की ती सोडुन बाकी सगळ्यांना त्या स्फोटाचा फटका बसलाय पण ती स्वतः मात्र अलगद त्यातुन बाहेर पडली असेच वाटत होते.

तूम अपना रंजो गम, अपनी परेशानी मुझे दे दो,
अतिशय सुंदर गाणे... हे ऐकताना मला नेहमी मुबारक बेगमचे 'कभी तनहाईयोंमे यूं हमारी याद आयेगी' हे गाणे आठवते. देखलो आज हमको जी भरके..... हेही गाणे ऐकायला सुंदर आहे. पाहायला सुंदर म्हणणार नाही. पडद्यावर दुल्हनच्या वेशात प्रियकराला शेवटचे भेटायला आलेली सुप्रिया पाहुन जीव कळवळतो अगदी.

इंद्राणी मुखर्जीने अपराध नावाच्या मराठी चित्रपटातही काम केलेय. मराठीत तिचा हा एकच चित्रपट मला माहित आहे. यात सीमाने तिच्या करियरमधला एकमात्र निगेटिव रोल केलाय. सोबत अर्थातच रमेश देव आहेच. 'सुर तेच छेडिता...' हे अप्रतिम सुंदर गाणेही यात आहे. महेंद्र कपुरला या गाण्यासाठी पुरस्कारही मिळाला होता. यात इंद्राणी आणि रमेश देवचे एक युगलगीतही आहे. मला आत्ता आठवत नाहीये. तेही खुप सुंदर आहे.

>>पण चित्रपटाची हिरोईन इतक्या सहजपणे मख्ख चेहरा ठेऊन वावरत होती की ती सोडुन बाकी सगळ्यांना त्या स्फोटाचा फटका बसलाय पण ती स्वतः मात्र अलगद त्यातुन बाहेर पडली असेच वाटत होते.

Proud

'कभी तनहाईयोंमे यूं हमारी याद आयेगी' हे गाणं असलेल्या चित्रपटात तनुजाबरोबर तो केदार शर्मा आहे ना? मला हे गाणं फार आवडतं.

>>रात भी है.. गाण्यात तुला आवडला नसेल पण चित्रपट मिळाला तर पाहा. अप्रतिम आहे

नक्की.

>>इंद्राणी मुखर्जी : आखरी खत
ह्यात ती राजेश खन्नाच्या आणि तिच्या मुलाला घेऊन शहरात येते आणि मरते. मग ते छोटं मूल बिचारं इथेतिथे फिरतफिरत शेवटी राजेश खन्नाच्याच घरी येऊन पोचतं. इतका गोबरा छोटा आहे तो (बहुतेक पारसी असावा!) ,त्याचे हाल पहावत नाहीत. मी एकदा ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट चॅनेलवर पहायचा यत्न केला होता पण पहावलं नाही माझ्याच्याने. शेवटी तिच्या पत्रावरून त्याला हा आपला मुलगा आहे हे कळतं. माठ कुठला!

संध्याबद्द्ल कोणी कसं लिहिलं नाही?

हरे काँच वाली ती नयना साहू (कुमार साहू ची बायको, स्नेहप्रभा प्रधांनाच्या स्नेहांकित मधे तिचा उल्लेख आहे )
पण यात आशाचे, धानी चुनरी पहन--- हे अप्रतिम गाणे आहे.
तो आखरी खत मधला मुलगा मास्टर बंटी, त्याचा बालक नावाचा एक सिनेमा आला होता. (त्या सिनेमाची रेडीओवरची जाहिरात, माझ्या आवाजात होती. )

यात इंद्राणी आणि रमेश देवचे एक युगलगीतही आहे. मला आत्ता आठवत नाहीये. तेही खुप सुंदर आहे. >>>> i thik, सांग कधी कळ्णार तुला, भाव माझ्या मनातलां...........

निंबुडा, कुठे मिळाला तर देव आनंद आणि दिलीप कुमारचा इन्सानियत नावाचा सिनेमा मिळवून पहा. त्यात आहे देवानंद ग्रामीण भुमिकेत (चक्क धोतर नेसून !!)

स्निग्धा, येस्स्स. हेच गाणे आहे ते..
देवानंद ने एका पोशाखी चित्रपटात राजकुमाराचीही भुमिका केलीय असे ऐकिवात आहे.. असले कास्टिंग करणा-या लोकांना देव माफ करो..

खय्यामच्या बायकोने (जगजीत कौर) ने यात, तूम अपना रंजो गम, अपनी परेशानी मुझे दे दो, हे छान गाणे गायले होते. तिने अगदी मोजकीच गाणी गायली. >>>>> काहे को ब्याही बिदेस..... उमराव जान मधलं हे गाणं पण त्यांच्याच आवाजात आहे.

Pages