७०-८० च्या दशकातील सिनेमे आणि मला आलेले हसु

Submitted by सुनिल जोग on 10 October, 2010 - 02:36

परवा नुकतेच टीव्हीवर राजेश खन्नाचे गाणे पहात होतो. आणि माझी कन्या ई.... करून किंचाळली. मी दचकून तिच्याकडे पाहीले तर म्हणाली काय बाबा काय पहाताय? हा काय हिरो आहे? मी खरं तर चिडलो होतो. अरे एके काळी 'आराधना' पहाण्यासाठी आम्ही ब्लॅक ची तिकिटे काढली होती. शर्मिलेच्या जागी गल्लीतील लोकल शर्मिलाला पाहत गाणी गुणगुणली होती त्याचा असा हा उपमर्द?? पण नव्या पिढीला काय सांगणार...
.... नाही. मी अशी प्रतिक्रिया अजिबात दिली नाही. खरं तर कन्येच्या प्रतिक्रीयेवर मी अंतर्मुख झालो. आणि विचार करू लागलो.
आजच्या काळातील ते पिक्चर्स खरोखर आता अगदी बेंगरूळ वाटतात्.विशविशीत कथा --- बेतलेल्या, ४०-४२ मधील हिरोइन्स (बल्जिंग अ‍ॅन्ड बल्की पण) यांना आपण कसं सोसलं याचे आच्शर्य वाटले
त्यानंतर अमर,अकबर,अ‍ॅन्थनी मधील ब्लड ट्रान्स्फर सीन तिघांचे रक्तगट एकच.. अगदी कॉर्पोरशन च्या नळाप्रमाणे रक्त देतात यावेळी आपली सायन्टीफिक साइट कुठे होती हा प्रश पडला.
केवळ माँकी कसम म्हणुन ऐनवेळी मध्यंतरापुर्वी ठोकरणारा विशविशीत नायक आणि तिच्या लग्नानंतर फकाफका सिगारेटी ओढून किंवा नशा करून विरह गीते गाणारे हिरो याना आपण मानले याचीच कीव आली.
तर कघी कधी आर्ट फिल्म पहाताना पुढचा डायलॉग आपणच बोलावा अशी ऊबळ येण्याएवढे स्लो डायलॉग्ज.. आठवा... 'अनुभव' संजीवकुमार...
कधीही धूर न येणारा पाईप तोंडात ठेवून, गाउन मधील बाप ... पुढे त्याचा डायलॉग काय असणार हे तुम्ही ओळखला असणारच... हो तोच तो... खानदानकी.....
आणखी एक ... त्याकाळी राज ठाकरे असता तर.....????
मॉ मुझे तेरे हातका गाजर का हलवा .. पराठे.. राजने त्याना नक्किच हिंदी वाल्याना वडा पाव आणि पाव भाजी खायला लावली असती. राज तू पहले आना था.
आणखी एक मोठा जोक.. राजेंद्रकुमार नावाचा एक महा बोर 'नट" २५ सिल्व्हर ज्युबिल्या करुन गेला आणि जॉय मुखर्जी नावाचा एक जोकर हिरो म्हणून कार्यरत होता आणि त्याला सार्‍या छान छान नायिका होत्या. जल् गये उस्ताद..
काही असो या पिक्चर्सनी आमच्या पिढीला स्वप्ने दिलीत आणि मनोरंजन देखील... अजुनही ती गाणी... ते शब्द आठवतात हे त्या कवींचे आणि संगीतकारांचे काँट्रीब्यूशन ...
दिलने फिर याद किया....

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिव्या भारती सुद्धा कधी कधी श्रीदेवी सारखी दिसली आहे नै
तीची एंट्रीच मुळाअत श्रीदेवीची डुप्लिकेट म्हणुन झाली Happy

जाहिरा त्या काळात पण बोल्ड होती. नेमके सिनेमे आणि गाणी आठवत नाही, पण चेहरा जरा बरा होता.
निंबुडा हे तुझ्यासाठी - जाहिराचा चेहरा पाहिला की मला नेहमी तिच्या नंतर आलेली अनिता राज आठवते. अनिता राज जरा थोराड असती तर सेम जाहिरासारखी दिसली असती.

आणखी एक गाणं आठवतं - अगर मुझसे मोहोबत है.
मला ती आधी विम्मी वाटलेली. पण ती कोणी दुसरीच आहे.

विम्मी ही अजुन एक बथ्थड तोंडाची बाई. ती सुनिल दत्त/राजकुमारच्या हमराज मध्ये होती. बथ्थड चेह-यांची स्पर्धा ठेवली तर पहिले १० नंबर ही एकटीच घेऊन जाईल. किसी पथ्थर की मुरत से.. गाण्यात पथ्थर की मुरत लाजेल असा चेहरा करुन बसलीय ही बया...

ओके. ओके. हमराज मधली ती विम्मी का??? मी तर तिलाच निम्मी समजत होते इतके दिवस. आणि वर निम्मी बद्दल जी चर्चा चाल्लीये ती पण या हमराज मधल्या हिरविणीबद्दल आहे असंच वाटलं मला. मी म्हणणार पण होते की सुनिल दत्त आणि राजकुमारच्या एका सस्पेन्स मूव्हीतही ही होती ना म्हणून, पण मला सिनेमाचे नावच आठवेना.

जाहिराचा चेहरा पाहिला की मला नेहमी तिच्या नंतर आलेली अनिता राज आठवते. अनिता राज जरा थोराड असती तर सेम जाहिरासारखी दिसली असती. >>> परफेक्ट Happy

खरे तर हमराजची कथा गुंतागुंतीची आहे. एकतर त्यात हिरविनीचा एक नवरा मेलाय असे तिला वाटते, त्याच्याशी लग्नाआधीच मुल होऊन तेही मेलेय असे तिला वाटतेय, आणि हा सगळा वाटण्याचा घोळ असताना तीने दुसरे लग्नही केलेय आणि दुस-या नव-याला तिचा हा भुतकाळ अजिबात माहित नाही. आणि मग दुस-या लग्नानंतर सुखात जगत असताना अचानक हा पहिला भुतकाळ नव-या आणि मुलासकट समोर येऊन उभा ठाकल्यावर कुठली बाई मठ्ठ चेहरा करुन वावरु शकेल???? काहीतरी दिसेलच ना चेह-यावर??????????/ पण विमी बाईचा चेहरा पहिल्या स्क्रिनपासुन ती मरेपर्यंत सेमच राहतो. तिच्या चेह-याकडे पाहुन कसलाही अंदाज येत नाही......

टीवीवर हा चित्रपट लागल्याच्या दुस-या दिवशी माझ्या भावाचा मित्र त्याला भेटायला आला होता. बोलताबोलता चित्रपटाचा विषय निघाला. दोघांनी मिळून लाखोली वाहिली या बाईला आणि तिच्या त्या दिव्य चेह-याला... Happy

मला तर या विमी आणि नंदा पण थोड्या आवळ्या जावळ्या वाटतात. फक्त नंदा थोडी टुणटुणीत आहे इतकेच Happy

>>जाहिरा म्हणजे दडस या शब्दाचा वाक्यात उपयोग करा म्हट्ले तर कसे दिसेल तसे.

अश्विनीमामी Proud

>>ण विमी बाईचा चेहरा पहिल्या स्क्रिनपासुन ती मरेपर्यंत सेमच राहतो. तिच्या चेह-याकडे पाहुन कसलाही अंदाज येत नाही

अरे देवा! मरते का शेवटी ह्यात ती? चला, दोन्ही नवरे सुटले. तेव्हढी पिक्चरच्या आधीच मेली असती तर प्रेक्षकही सुटले असते की! मला वाटतं ती आधीच्या नवर्‍याचं मूल दुसरं लग्न झाल्यावर अनाथ आश्रमातून घरी आणते. नक्की आठवत नाही कारण मी पिक्चर पूर्ण पाहिलेला नाहिये. ह्या पिक्चरमध्ये सुनील दत्त काय कातिल दिसलाय. आणि ही ठोंबी त्याची बायको! बहुत नाइन्साफी है!

>>फक्त नंदा थोडी टुणटुणीत आहे इतकेच
थोडी? निंबुडे, 'ये समा समा है ये प्यारका' मधे तिला त्या पांढर्‍या ड्रेसमधे पाहिलंयस ना?

स्वप्ना_राज
मला वाटतं तिला बारीकशी मिशीदेखील आहे. >>>>>>> :हसून हसून खुर्चीतून खाली पडलेली बाहुली:

अश्विनीमामी
जाहिरा म्हणजे दडस या शब्दाचा वाक्यात उपयोग करा म्हट्ले तर कसे दिसेल तसे.
>>>> :(प्रयत्नपुर्वक पुन्हा खुर्चीत बसते नाही तर...) पुन्हा एकदा हसून हसून खुर्चीतून खाली पडलेली बाहुली:

दिनेशदा
जाहिरा आणि जाहिदा दोन वेगळ्या बाया. जाहिदा नर्गिसची भाची का पुतणी होती, अनोखी रात (खुषी खुषी करलो बिदा - लता ) आणि प्रेमपुजारी (वहिदाला स्पर्धा म्हणे ! ) मधे पण होती.
जाहिरा त्या काळात पण बोल्ड होती. नेमके सिनेमे आणि गाणी आठवत नाही, पण चेहरा जरा बरा होता.
>>>>>>>> या जाहिरा सारखीच दिसणारी रेहाना सुलतान. हिचा संजीव कुमार बरोबरचा एक सिनेमा आहे - दस्तक. खूप मागे अर्धवट पाहिला होता. त्यात हे नविन लग्न झालेलं जोडपं एका वेश्या वस्तीतल्या चाळीत राहू लागते. मग नवरा कामावर गेल्यावर ती किती धास्तावलेली असते कारण दरवाज्यावर दस्तक करून कोणकोण येऊन तिला त्रास देतात ...असं काहिसं कथानक आहे. त्यात तिने चांगले काम केलयं आणि अर्थातच काही बोल्ड सीन्स पण आहेत. (म्हणजे त्यावेळच्या मानाने बोल्ड ...) यातील सगळीच्या सगळी गाणी एकसे एक होती. माई री मै कासे कहूं प्रीत अपने जिया की, हम है मता-ए-कूचा बाजार की तरह, बैया ना धरो... अशी.

रच्याकने, मध्यंतरी टाटा थिएटर मध्ये एका इंग्लिश नाटकाला गेलो होतो. नाव आठवत नाहिये. त्यात झीनत अमान ही होती. आदित्य हितकारी होता. दिव्या पलटचं दिग्दर्शन होतं. तर माझा नवरा मला विचारायला लागला, की झीनत अमान ला का बरं घेतलं असेल? त्याचं उत्तर थोड्याच वेळात मिळालं त्या बयेनं स्टेजवर कपडे बदलले. असे २-३ सीन होते. पहिल्या रांगेत मुकेश अंबानी नीता आणि कोकिळाबेन बरोबर बसला होता ... मध्यंतरात सुमडीत आई-बायकोला घेऊन निघून गेला. त्याने विचार केला असेल, हे असे आईबरोबर बघण्यापेक्षा, जाऊन अजून पैसे कमावलेले काय वाईट??? Happy

ह्या पिक्चरमध्ये सुनील दत्त काय कातिल दिसलाय.

त्याची असिस्टंट मुमताज दाखवलीय, तरीही त्याने लग्न मात्र केले ह्या भयाण बाईशी. लग्न करताना त्याचे डोळे आणि डोके कुठे गेलेले देवास ठाऊक..
तुला बरोबर आठवतेय गं. ती स्वत:च्या मुलीला अनाथाश्रमातुन आणते घरी. मग मुलगी गायब होते आणि हिचा खुन..... शेवटी मुमताज मुलीला जवळ घेताना दाखवलीय सो आय होप सुनिल दत्तला स्वतःची चुक कळली असावी

आणखी एक गाणं आठवतं - अगर मुझसे मोहोबत है.
मला ती आधी विम्मी वाटलेली. पण ती कोणी दुसरीच आहे.<<<<<<<<ती सुप्रिया चौधरी.

आपकी परछाईयां सिनेमातील हे गाणं, या सुप्रियाबाई बंगाली सिनेसॄष्टीतील एक यशस्वी अभिनेत्री. उत्तमकुमार बरोबर तिने बर्‍याच बंगाली सिनेमात काम केलं. आप की परछाई या सिनेमात ती धर्मेंद्र बरोबर होती.

@ निंबुडा: आताची उर्मिला सारखेच फेसिंग असलेली जुन्या काळची अभिनेत्री म्हणजे शम्मी कपूरची प्रथम दिवंगत पत्नी - गीता बाली.

अमी

मामी, तो दस्तक त्या काळात फक्त प्रौढांसाठी होता. (आता तो अतिसौज्वळ वाटेल) या गाण्यांशिवाय, तूमसे कहू एक बात परोंसी हल्की हल्की, हे रफीचे फार सेन्सुअल गाणे होते त्यात. मदनमोहनने आणि लताने जान ओतली होती, सर्व गाण्यात.
त्यातला नको तो सीन, वहिदा, धर्मेद्र आणि जया भादुरीच्या फागुन मधे होता.

अगदी अलिकडे, झीनत अमान ने बूम नावाच्या सिनेमात पण उत्तान दृष्ये दिली होती (सोबत बच्चन, जॅकी, कतरिना )

गीता बालीला योग्य ते क्रेडीट दिले पाहिजे, त्या काळात देखील तिचा अभिनय अगदी नैसर्गिक असायचा.
ती खूप लवकर गेली.
किदार शर्मा (बावरे नयन) ला तिच्या सारख्या दिसणार्‍या नट्याच, आपल्या चित्रपटात हव्या असायच्या, झेब रेहमान ते झरिना वहाब मधे तो तिचाच चेहरा शोधत होता.

विम्मी अगदी शेवटी धर्मेंद्रच्या एका सिनेमात दिसली होती (त्यात बहुदा हेमा, मौशुमी आणि झीनत पण होत्या, फूलमती फूलमती असे काहिसे गाणे होते त्यात.)

अश्विनीचे वाक्य मी नीट वाचलेच नव्हते, मला वाटले जाहिरा या शब्दाचा अर्थ दडस, म्हंटलं असेल बॉ, हैद्राबादेत तसं, नाहितरी पानं वाढलीत गिळा एकदाचे ला ते दस्तरखान बिछ गया, असे म्हणतात ना त्यांच्याकडे ?

विम्मी अगदी शेवटी धर्मेंद्रच्या एका सिनेमात दिसली होती (त्यात बहुदा हेमा, मौशुमी आणि झीनत पण होत्या, फूलमती फूलमती असे काहिसे गाणे होते त्यात.)>>>>> "क्रोधी" का?

हो क्रोधीच.
त्या काळात नैसर्गिक अभिनय फारच थोड्या अभिनेत्री करायच्या. रडताना सुद्धा सुंदरच दिसले पाहिजे, असा काहिसा ग्रह होता कि काय नकळे.
हंगल, दिना पाठक, बलराज सहानी, नर्गिस, गीता बाली यांचे स्कूलच वेगळे होते. पुढे मग शबाना, स्मिता वगैरेनी तो वसा पुढे नेला.
मोठे कलाकार पण कधी कधी एखाद्या सिनेमात नैसर्गिक वाटत. उदा राज कपूर, तिसरी कसम, जागते रहो मधे वगैरे.

या जाहिदा आणि जाहिरा प्रकरणाचे माझे फार कन्फ्ञूजन होइ. मला ते चोप्रा आणि चोपडा असा अपभ्रंश वाटे.
जाहिरा आणि जाहिरा एकच काय असा प्रश्न विचारल्यावर पेंडसे गुरुजीनी कानामागे शोले भडकावून खेकसले
' मूर्खा,देव आनन्दच्या गॅम्बलरमध्ये दोघीही आहेत !!! '

मी आधी म्हटलय तसं 'ममता' मध्ये काही काही शॉट्स मध्ये सुचित्रा सेन सेम टू सेम माधुरी दिक्षित सारखी दिसते.

विमी बरीचशी बबितासारखी दिसायची. पण बबिता कोणासारखीच दिसत नसल्याने त्या दोघीही कोणासारख्याच दिसायच्या नाहीत. लवकरच त्या चित्रपटांतूनही दिसेनाश्या झाल्या हे आपलं सुदैव!

'रंगिला' तर उर्मि कितीतरी गीताबाली सारखी दिसते.

परवीन बाबी सारखी दिसणारी एक दिपशिखा नावाची टिव्ही अ‍ॅक्ट्रेस आहे.

(रच्याकने, एक टीव्ही वालीच शमा सिकंदर एकदम बिपाशा बसू सारखी दिसते)

प्रेमपुजारी (वहिदाला स्पर्धा म्हणे ! ) मधे पण होती.>>>>>> जाहिदा ही वहिदा ला स्पर्धा? कुठे ती नाजूक सिंधु आणि कुठे तो सिंधुदुर्ग? Proud

मला तर तो लीला नायडुचा फोटोच माधुरी दिक्षित च्या जुन्या फोटो सारखा वाटतोय, तोच तिचा प्रसिध्द ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट फोटो हातात गुलाबाचं फुल घेतलेला, एकदम उत्तर दक्षिण च्या काळातला बहुदा.

सारिका पण सुंदर होती. ती विम्मी पण लवकर वारली असे ऐकले. हमराज मधे लहान असताना पाहिला होता तेव्हा त्यात दगडी होती तरी सुंदर वाटली होती मला. अभिनय कळण्याचे वय नव्हते तेव्हा (माझे). त्यात पण सारिकाच होती ना बाल, किती सुंदर दिसलीये त्यात पण ती.

लीला नायडु चा वरचा फोटो मी पहिल्यांदा पाहिला आज. अप्रतिम फोटो आहे.
माधुरी कितीही मधुबाला ची कॉपी करत राहिली तरी मधुबाला ती मधुबाला... आहाहाहाहाहाहा!!!!! (मला माधुरी पण आवडते).

आणि ती श्रीदेवी>> एक टुकार सिनेमा आला होता 'आदमी और अप्सरा', त्यात श्री अक्षरश: अप्सरेसारखी सोनसळी अप्रतिम दिसलीये.
गीता बाली पण मस्तच होती (अभिनय, दिसणे दोन्ही बाबतीत).

जुम्मालिनी, दडस - काय समजले नाय वो अ.मामी. समजवा की जरा. Happy

'आदमी और अप्सरा' अम्धे मस्तं दिसते श्री !!
त्यात धकधक चं ओरिजनल गाण 'तुमने इस तरह मारा', त्यात फारच सही दिसते !

<<<<विमी बरीचशी बबितासारखी दिसायची. पण बबिता कोणासारखीच दिसत नसल्याने त्या दोघीही कोणासारख्याच दिसायच्या नाहीत. लवकरच त्या चित्रपटांतूनही दिसेनाश्या झाल्या हे आपलं सुदैव!>>>

खुप हसले, मामी थोर आहात तुम्हि _/\_.

तो काळ वेगळा
त्या काळी स्त्री पात्रा साठी स्त्री कलाकार मिळायची मरामार. ज्या आल्या त्यांना काम मिळायचे
बर्याच केवळ परीस्थीतीमुळे काम करायच्या.

एक मात्र खरे, त्या सगळ्या अंगाने नही तरी वागण्याने १०-१२ वयो गटातल्या वाटायच्या.

तो काळ वेगळा
त्या काळी स्त्री पात्रा साठी स्त्री कलाकार मिळायची मरामार. ज्या आल्या त्यांना काम मिळायचे
बर्याच केवळ परीस्थीतीमुळे काम करायच्या
<<
अवधूत,
कुठल्या काळा बद्दल बोलताय Uhoh
७०-८० च्या काळात कुठे होती अशी मारामार ?

ती विम्मी पण लवकर वारली असे ऐकले
आपण भारी ग्रेट/सुंदर असा तिचा समज होता. लोकांना तो गैर वाटतो हे तिला फार लागले. तिने मग ते दु:ख दारुत बुडवले. ती हॉस्पिटलात असताना तिथल्या लोकाना 'मी विम्मी आहे' हे ओरडुन सांगायची म्हणे. तिथल्या लोकांच्या दृष्टीने ती दारु पिउन लिवर खराब केलेल्या असंख्य लोकांपैकी एक होती Happy शेवटी गेली वर....

मौसम या सिनेमात शर्मिला ला चांगला डबल रोल मिळाला होता, कथा ही दोन्ही रोल ना चांगलीच सपोर्ट करणारी शिवाय बरोबर संजीवकुमार सारखा अभिनेता.

पण शर्मिलाबाईनी त्या सगळ्या सोन्याची व्यवस्थित माती केली Sad पहिली गोष्ट म्हणजे ती दोन्ही रोल्स मध्ये अजिबात शोभलीच नाही. पहिल्या रोलमध्ये डोक्यावरचं घरटं सांभाळत लाडिक आवाजात डायलॉगबाजी करत तिथे वाट लावत्या झाल्या.

दुसर्‍या रोलबद्दल न बोलणंच बरं,मुळात या सिनेमासाठी शर्मिला टागोरची निवड हीच घोडचुक्.कदाचित वहिदा रेहमान ने त्या रोलसचं सोनं केलं असतं, बाकी त्या काळात हेमा,शर्मिला,आशा पारेख सारख्या नायिकांध्ये अभिनयाची अपेक्षा म्हणजे डोक्यावरुन पाणी.

मौसम चं संगीत मात्र सदाबहार. दिल ढुंढता है, छडी रे छडी कैसी आणि रुके रुके से कदम ही गाणी ऑल टाईम फेव्हरिट.

जुम्मालिना हा बहुतेक अमिताभच्या 'हम' चा रेफरन्स आहे. त्यात किमी आणि अमिताभचं 'जुम्मा चुम्मा दे दे' असं गाणं होतं.

कल्पना कार्तिक ही देव आनंदची बायको म्हणून जेव्हा मला आईने एका गाण्यात प्रथम दाखवली तेव्हा मी "ही?" म्हणून वाईट किंचाळले होते. सुरैय्या मिळाली नाही म्हणून जी बाई समोर दिसली तिच्याशी लग्न केलं का काय देवने? देव आणि मधुबाला ही जोडी खर्‍या आयुष्यात मस्त जमली असती असं नेहमी वाटतं. पण ते दोघं शेवटपर्यंत फक्त मित्रच राहिले.

कायम म्हातारीच वाटणारी आणखी एक नटी म्हणजे सिमी गरेवाल. पुन्हा लाडीक लाडीक बोलणं. नंतर तिच्या शोमध्ये पांढरे कपडे घालून वैताग आणायची. परवा टिव्हीवर तिच्या शोचे क्लिप्स दाखवत होते तेव्हा विद्या बालन तिला सांगत होती की मला पण पांढरा रंग आवडतो पण मला लोक "अनदर सिमी इन द मेकिंग" म्हणायला लागले म्हणून मी थांबवलं. तर त्यावर सिमी तिला तू आवडतं ते घालत जा असं म्हणाली. म्हटलं घाला सगळ्यांनी पांढरे कपडे आणि फिरा सेट्वर केस मोकळे सोडून हातात दिवा घेऊन.

Pages