७०-८० च्या दशकातील सिनेमे आणि मला आलेले हसु

Submitted by सुनिल जोग on 10 October, 2010 - 02:36

परवा नुकतेच टीव्हीवर राजेश खन्नाचे गाणे पहात होतो. आणि माझी कन्या ई.... करून किंचाळली. मी दचकून तिच्याकडे पाहीले तर म्हणाली काय बाबा काय पहाताय? हा काय हिरो आहे? मी खरं तर चिडलो होतो. अरे एके काळी 'आराधना' पहाण्यासाठी आम्ही ब्लॅक ची तिकिटे काढली होती. शर्मिलेच्या जागी गल्लीतील लोकल शर्मिलाला पाहत गाणी गुणगुणली होती त्याचा असा हा उपमर्द?? पण नव्या पिढीला काय सांगणार...
.... नाही. मी अशी प्रतिक्रिया अजिबात दिली नाही. खरं तर कन्येच्या प्रतिक्रीयेवर मी अंतर्मुख झालो. आणि विचार करू लागलो.
आजच्या काळातील ते पिक्चर्स खरोखर आता अगदी बेंगरूळ वाटतात्.विशविशीत कथा --- बेतलेल्या, ४०-४२ मधील हिरोइन्स (बल्जिंग अ‍ॅन्ड बल्की पण) यांना आपण कसं सोसलं याचे आच्शर्य वाटले
त्यानंतर अमर,अकबर,अ‍ॅन्थनी मधील ब्लड ट्रान्स्फर सीन तिघांचे रक्तगट एकच.. अगदी कॉर्पोरशन च्या नळाप्रमाणे रक्त देतात यावेळी आपली सायन्टीफिक साइट कुठे होती हा प्रश पडला.
केवळ माँकी कसम म्हणुन ऐनवेळी मध्यंतरापुर्वी ठोकरणारा विशविशीत नायक आणि तिच्या लग्नानंतर फकाफका सिगारेटी ओढून किंवा नशा करून विरह गीते गाणारे हिरो याना आपण मानले याचीच कीव आली.
तर कघी कधी आर्ट फिल्म पहाताना पुढचा डायलॉग आपणच बोलावा अशी ऊबळ येण्याएवढे स्लो डायलॉग्ज.. आठवा... 'अनुभव' संजीवकुमार...
कधीही धूर न येणारा पाईप तोंडात ठेवून, गाउन मधील बाप ... पुढे त्याचा डायलॉग काय असणार हे तुम्ही ओळखला असणारच... हो तोच तो... खानदानकी.....
आणखी एक ... त्याकाळी राज ठाकरे असता तर.....????
मॉ मुझे तेरे हातका गाजर का हलवा .. पराठे.. राजने त्याना नक्किच हिंदी वाल्याना वडा पाव आणि पाव भाजी खायला लावली असती. राज तू पहले आना था.
आणखी एक मोठा जोक.. राजेंद्रकुमार नावाचा एक महा बोर 'नट" २५ सिल्व्हर ज्युबिल्या करुन गेला आणि जॉय मुखर्जी नावाचा एक जोकर हिरो म्हणून कार्यरत होता आणि त्याला सार्‍या छान छान नायिका होत्या. जल् गये उस्ताद..
काही असो या पिक्चर्सनी आमच्या पिढीला स्वप्ने दिलीत आणि मनोरंजन देखील... अजुनही ती गाणी... ते शब्द आठवतात हे त्या कवींचे आणि संगीतकारांचे काँट्रीब्यूशन ...
दिलने फिर याद किया....

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन आणखी दाक्षिणात्य नट्या आठवतात - एक रामेश्वरी. 'सुनयना', मला वाटतं तिचा पहिला चित्रपट, त्यात फार छान दिसली आहे केस मोकळे सोडून. नंतर तिच्या डोळ्यांना काहीतरी झालं आणि तिचा चेहेरा बिघडला. Sad

दुसरी नायिका म्हणजे थोड्या आधीच्या काळातल्या चित्रपटातली बी सरोजादेवी. टिपिकल दाक्षिणात्य चेहेरा. हीही मला कधी तरुण वाटली नाही.

अरे जुम्मालिना म्हणजे किमी काटकरच.

जुम्मा चुम्मा गाण्याच्या आधी अनुपम खेर म्हणतो कि आज जुम्मा है छुट्टीका दिन है उधर सिस्टर जुम्मालिना ( अमिताभ च्या क्यारेक्टरचे काय नाव? ) को चुम्मा देताहै. मग लगेच ते गाणे सुरू होते.

दड्स म्हणजे प्रौढ : जाहिदाच समजा.
जुन्या शारदा नाट्कात वड्स नावाचा पण शब्द आहे. डोळ्याचा विकार काहीतरी. म्हातारा नवरा ज्याच्या डोळ्यात वड्स वाढलेला इ.इ. हे आम्हाला शाळेत होते वर सर्व मुली ते वाक्य आले कि वड्स ईईईईईईए म्हणत. तुम्ही पण म्हणू शकता Happy

जुम्मा चुम्मा गाण्याच्या आधी अनुपम खेर म्हणतो कि आज जुम्मा है छुट्टीका दिन है उधर सिस्टर जुम्मालिना ( अमिताभ च्या क्यारेक्टरचे काय नाव? )
<< टायगर :).

>>जुन्या शारदा नाट्कात वड्स नावाचा पण शब्द आहे. डोळ्याचा विकार काहीतरी.

मी पण वाचलाय हा शब्द एका शब्दकोड्यात. बहुतेक डोळ्यांच्या बुबुळावर येणारा पडदा असा काहीतरी अर्थ आहे. आत्ता आपण ज्याला मोतीबिंदू म्हणतो तो असावा कदाचित.

आताची उर्मिला सारखेच फेसिंग असलेली जुन्या काळची अभिनेत्री म्हणजे शम्मी कपूरची प्रथम दिवंगत पत्नी - गीता बाली.
>>>
येस्स. परफेक्ट Happy
नावच आठवत नव्हतं मला त्या नटीचं Happy

---------अवांतर मोड ऑन---------

जाहिरा आणि जाहिरा एकच काय असा प्रश्न विचारल्यावर पेंडसे गुरुजीनी कानामागे शोले भडकावून खेकसले
' मूर्खा,देव आनन्दच्या गॅम्बलरमध्ये दोघीही आहेत !!! '

>>>

मिस्टर बाळू, तुमचे पेंडसे गुरुजी सर्वव्यासंगी आहेत असं दिसतंय. Wink
विचारा आपलं त्यांना काहीही. उत्तर रेडीच त्यांच्याकडे Proud

---------अवांतर मोड ऑफ---------

परवीन बाबी सारखी दिसणारी एक दिपशिखा नावाची टिव्ही अ‍ॅक्ट्रेस आहे. >>>>

रच्याकने, एक टीव्ही वालीच शमा सिकंदर एकदम बिपाशा बसू सारखी दिसते >>>>

मामी, अगदी अगदी
फोटो असतील तर टाका बरे कुणीतरी

कुमार गौरवच्या 'लव्ह स्टोरी' मध्ये कोण हिरोइन होती?

"एक दुजे के लिये" मध्ये रती अग्निहोत्री मस्त दिसलीय. ८० च्या दशकात कुमार गौरव, संजय दत्त यांनी पदार्पण केले. ८०च्या दशकातील गाणी काही विशेष लक्षात नाहीत, आरडी शांत होता, किशोरदा राहिले नव्हते.

विजयेता पंडित ही सुलक्षणा पंडित आणि जतीन-ललित ह्यांची बहिण.

>>बिपाशा इतकी भयानक कधी दिसली नसेल तेवढी या फोटोत दिसतेय

बिपाशाची फक्त फिगरच चांगली आहे असं माझं मत आहे. विदाऊट मेकअप तर भयाणच दिसते म्हणे. माझ्या एका मित्राने तिला एयरपोर्टवर पाहिलं होतं. त्याने तर ओळखलंच नाही. कोणीतरी सांगितलं तेव्हा त्याला कळलं.

जुन्या पिक्चरमधल्या आणखी काही नट्या:

१. कल्पना - प्रोफ्रेसरमधली नकट्या नाकाची गोलमटोल नटी. तीन देविया मध्ये पण होती.
२. अमिता - हिचा चेहेरा फार गोड होता. हिची मुलगी साबिया नंतर पिक्चरमध्ये आली पण चमकली नाही. खिलाडीमध्ये अक्षयकुमार, आयेशा झुल्काच्या ज्या मैत्रिणीचा खून होतो ती साबिया.
३. उषा किरण

तसंच आयटम सॉन्गस करणार्‍या काही नट्याही एक-दोन चित्रपटात हिरॉइन झाल्या आहेतः

१. अरुणा इराणी - बॉम्बे टू गोवा. ही दिसायला छान, अभिनय चांगला करायची, डान्स करू शकायची पण नंतर तिला हिरॉईनचे रोलस का नाही मिळाले काय माहित.
२. हेलन - चाचाचा नावाच्या पिक्चरमध्ये हिरॉईन होती. हिरो होता चंन्द्रशेखर (रामायणातला सुमंत)
३. बिंदू - हिनेही एका पिक्चरमध्ये हिरॉईनचा रोल केलाय. मला वाटतं त्यात 'जिया ले गयो जी मोरा सावरिया" हे गाणं होतं

बिंदू - हिनेही एका पिक्चरमध्ये हिरॉईनचा रोल केलाय. मला वाटतं त्यात 'जिया ले गयो जी मोरा सावरिया" हे गाणं होतं>>>> अनपढ

अरुणा इराणी - बॉम्बे टू गोवा. ही दिसायला छान, अभिनय चांगला करायची, डान्स करू शकायची पण नंतर तिला हिरॉईनचे रोलस का नाही मिळाले काय माहित.>>>बॉम्बे टू गोवा आणि संजोग (दोन्हीत हिरो अमिताभ बच्चन. संजोग मध्ये सोबत माला सिन्हा)

बरोबर . चित्रपटात मालाही आहे आणि तिच्या मुलीच्या भुमिकेत बिंदु. ह्या गाण्यात मात्र बिंदुच आहे. बिंदुचा बहुतेक हा पहिलाच चित्रपट.

अरुणा आणि हेलेन दोघींनी वॅम्पिश रोल्सवर जास्त लक्ष दिले बहुतेक.

हेलनने सुनिल दत्तच्या एका चित्रपटात ( बहुतेक हम हिंदुस्तानी. त्यात ते 'छोडो कलकी बाते... ' गाणे आहे) सोज्वळ मुलीचे काम केले. पण तिला सोज्वळ कामे फारशी शोभली नसती हेच खरे. तिने पुढे जाऊन जे केले ते केले नसते तर त्या सेगमेंटचे खुपच, कधीही भरुन न येणारे नुकसान झाले असते.. Happy

अरुणा इराणी गुजराथी मधे नायिकेच्या भुमिकेत असे. दो फूल मधे पण ती नायिका होती (विनोद मेहरा, मेहमूद, मेहमूद, अंजना आणि रमाप्रभा ) दादा कोंडकेच्या एका मराठी सिनेमात तिने, अहो कारभारी उठलाय रामाच्या पारी, या आशाच्या लावणीवर नाच केला होता.

बिंदू पण गुजराथी सिनेमात असायची. ताना रिरि नावाच्या गुजराथी सिनेमात, ती विद्या सिन्हा बरोबर सहनायिका होती. अभिमान मधेही तिचा महत्वाचा रोल होता. राजेश खन्ना, नंदाच्या इत्तेफाक मधे होती.
दास्तान मधे ती दिलीपकुमारची नायिका होती (शर्मिला पण होती त्यात.)

अमिताला गूंज उठी शहनाई, मेरे मेहबूब, देख कबीरा रोया (चुभुद्याघ्या) सारखे चांगले चित्रपट मिळाले. शम्मी कपुर बरोबर पण तिने (देखो कसमसे कसमसे) काम केले. राज कपूर आणि राजश्रीच्या अराऊंड द वर्ल्ड इन एटी डेज मधे एका फुटकळ भुमिकेत ती होती.

उषा किरण उत्तम नर्तकी होती. मुसाफिर, जूना दाग (दिलीप कुमार), पतिता (देव आनंद) असे महत्वाचे चित्रपट तिला मिळाले होते. पुढे गारंबीच्या बापू नाटकात ती राधाची भुमिका करत असे.

राज कपूर आणि राजश्रीच्या अराऊंड द वर्ल्ड इन एटी डेज >>>>> दिनेशदा तुम्हाला अराऊंड द वर्ल्ड इन ८ डॉलर्स म्हणायचं, बरोबर?

देख कबीरा रोया मधली गाणी खुप सुंदर होती, हमसे आया न गया, मेरी बीना तुम बीन रोए, कौन आया मेरे मनके व्दारे, हम पंछी मस्ताने, लगन तोसे लागी, तुम मेरी राखो लाज हरी, तु प्यार करे या.....

टिना मुनीम दिसायला गोड आणि फ्रेश होती. पण सिनेमात काम करताना अभिनय करण्याची चूक हातून होऊ नये याची भरपूर काळजी घ्यायची. आताच्या जेनेलियाला बघताना मला टिनाची आठवण येते. म्हणजे त्या सारख्या दिसत नाहित पण तसाच गोग्गोड चेहेरा मात्र अभिनयाशी कायमचा काडीमोड!

>>अमिताला गूंज उठी शहनाई, मेरे मेहबूब, देख कबीरा रोया (चुभुद्याघ्या) सारखे चांगले चित्रपट मिळाले.

देख कबीरा रोया मध्ये आपली शुभा खोटेही होती ना? छान दिसायची तेव्हा. मी तिला 'जबान संभालके' ह्या सिरियलमध्ये प्रथम पाहिली होती. देख कबीरा रोया मध्ये तिला पाहून उडालेच.

अनपढ का तो पिक्चर? तोच ना त्यात माला सिन्हा अशिक्षीत असते म्हणून धर्मेन्द्र तिला नाकारतो? अश्याच आशयाचा मला वाटतं "डॉक्टर विद्या" म्हणून एक पिक्चर होता - बहुतेक वैजंयतीमाला. त्यात तर ती बयो एकदम डॉक्टरच होते.

>>उषा किरण उत्तम नर्तकी होती.

काय सांगताय काय दिनेशदा? हा मात्र ४२० व्होल्ट्सचा धक्का आहे. एक गाणं आहे, मला ते गाणंही आठवत नाहिये आणि तो हिरोही कोणीतरी सामान्यच होता (१-२ चित्रपटापुरता). त्यात ते बागेत गात असतात, तो हिरो काहीतरी वाद्य वाजवत असतो. त्यावर उषा किरणने नुस्ते हात हलवलेत नाचायच्या ऐवजी. आजही ते गाणं बघायला नको वाटतं.

देख कबीरा मधे अमिता होती का, मला शंका आहे. ३ अभिनेत्री होत्या.
शुभा कोटे एकेकाळी सायकलपटू होती. नूतनच्या सीमा सिनेमात तिने भरपूर सायकल चालवलीय.

डॉ विद्या मधे ती सुशिक्षित असते तर तो (मनोज कुमार) अशिक्षित असतो. ती कथा नाथमाधवांची. मराठीत शिकलेली बायको (उषाकिरण, सूर्यकांत ) या नावाने आला होता तो सिनेमा. आली हासत पहिली रात गाणे त्यातले. डॉ विद्या मधे पण उत्तम गाणी होती, खनके कंगना बिंदिया हसे वगैरे. हेलन आणि वैजयंतिमाला ची अप्रतिम नृत्य जूगलबंदी होती त्यात. आणि सर्वात सुंदर पवन दिवानी, न मानी उडावे मोरा घुंघटा.

जून्या दाग मधे उषाकिरणचा नाच आहे. शिवाय बावर्ची मधे पण ती थोडीशी नाचलीय (भोर आयी गया आंधियारा )

काल रात्री पुरानी जिन्स थोडं ऐकलं. काल शम्मी कपूरचा वाढदिवस म्हणून त्याची सगळी गाणी लावली होती. आरजे अनमोलने एक आठवण सांगितली. शम्मी कपूर अशोककुमारचे अछूत कन्या सारखे पिक्चर्स पाहून त्याचा सॉलिड फॅन होता पण आपल्या कारकीर्दीत त्याला त्यांच्याबरोबर काम करायची कधी संधीच मिळाली नाही. पुढे पान परागच्या जाहिरातीसाठी शम्मी कपूरला विचारणा झाली आणि केवळ त्यात अशोककुमार आहेत म्हणून त्याने ती स्विकारली. अर्थात पानमसाला/गुटखाच्या अ‍ॅडमध्ये काम केल्याने राज कपूरने नंतर त्याची कानउघाडणी केली Happy

रच्याकने, काल हेलनचाही वाढदिवस होता.

देख कबीरा मधे अमिता होती का, मला शंका आहे.

अमिताच आहे हो. मेरी बिना तुमबीन रोये हे गाणे आहे ना तिच्या वर???? मला पण आता चेक करायला हवे

आनंद मध्ये "ना जिया लागे ना, तेरे बिन मेरा कही जिया लागे ना" गाणारी नटी (बहुतेक सुमिता सन्याल) हि अजुन कुठल्या चित्रपटात होती का?

खामोशी (जुना) मध्ये "हम थे जिनके सहारे, वो हुए ना हमारे" गाणारी नटी कोण? (बहुदा साईट हिर्विन असावी).

"जिने कि राह" मध्ये जितेंद्रची बायको दाखवलेली नटी कोण? ("चंदा को ढुंढने सभी तारे निकल पडे" गाण्यात आहे).

"रातकली एक ख्वाब में आयी और गले का हार हुई " (चित्रपटः बुढ्ढा मिल गया) मधली नायिका कोण?

वरील सगळी गाणी आवडीची आहेत. Happy

@ योगेश२४: सुमिता संन्याल आशीर्वाद ह्या ऋषिकेश मुखर्जीच्या चित्रपटात होती. हीरो संजीवकुमार. दादामुनिचीच भूमिका उत्तम वठलीय यात (अशोककुमार).

खामोशीमधल्या गाण्यातील नटी - स्नेहलता.

जीनेकी राहमधे जीतेन्द्रच्या बायकोच्या भूमिकेत - अंजलि कदम.

बुढ्ढा मिल गयाची हिरोईन - अर्चना (आडनाव बहुतेक जोगळेकर - चुभूद्याघ्या).

अमी

Pages