७०-८० च्या दशकातील सिनेमे आणि मला आलेले हसु

Submitted by सुनिल जोग on 10 October, 2010 - 02:36

परवा नुकतेच टीव्हीवर राजेश खन्नाचे गाणे पहात होतो. आणि माझी कन्या ई.... करून किंचाळली. मी दचकून तिच्याकडे पाहीले तर म्हणाली काय बाबा काय पहाताय? हा काय हिरो आहे? मी खरं तर चिडलो होतो. अरे एके काळी 'आराधना' पहाण्यासाठी आम्ही ब्लॅक ची तिकिटे काढली होती. शर्मिलेच्या जागी गल्लीतील लोकल शर्मिलाला पाहत गाणी गुणगुणली होती त्याचा असा हा उपमर्द?? पण नव्या पिढीला काय सांगणार...
.... नाही. मी अशी प्रतिक्रिया अजिबात दिली नाही. खरं तर कन्येच्या प्रतिक्रीयेवर मी अंतर्मुख झालो. आणि विचार करू लागलो.
आजच्या काळातील ते पिक्चर्स खरोखर आता अगदी बेंगरूळ वाटतात्.विशविशीत कथा --- बेतलेल्या, ४०-४२ मधील हिरोइन्स (बल्जिंग अ‍ॅन्ड बल्की पण) यांना आपण कसं सोसलं याचे आच्शर्य वाटले
त्यानंतर अमर,अकबर,अ‍ॅन्थनी मधील ब्लड ट्रान्स्फर सीन तिघांचे रक्तगट एकच.. अगदी कॉर्पोरशन च्या नळाप्रमाणे रक्त देतात यावेळी आपली सायन्टीफिक साइट कुठे होती हा प्रश पडला.
केवळ माँकी कसम म्हणुन ऐनवेळी मध्यंतरापुर्वी ठोकरणारा विशविशीत नायक आणि तिच्या लग्नानंतर फकाफका सिगारेटी ओढून किंवा नशा करून विरह गीते गाणारे हिरो याना आपण मानले याचीच कीव आली.
तर कघी कधी आर्ट फिल्म पहाताना पुढचा डायलॉग आपणच बोलावा अशी ऊबळ येण्याएवढे स्लो डायलॉग्ज.. आठवा... 'अनुभव' संजीवकुमार...
कधीही धूर न येणारा पाईप तोंडात ठेवून, गाउन मधील बाप ... पुढे त्याचा डायलॉग काय असणार हे तुम्ही ओळखला असणारच... हो तोच तो... खानदानकी.....
आणखी एक ... त्याकाळी राज ठाकरे असता तर.....????
मॉ मुझे तेरे हातका गाजर का हलवा .. पराठे.. राजने त्याना नक्किच हिंदी वाल्याना वडा पाव आणि पाव भाजी खायला लावली असती. राज तू पहले आना था.
आणखी एक मोठा जोक.. राजेंद्रकुमार नावाचा एक महा बोर 'नट" २५ सिल्व्हर ज्युबिल्या करुन गेला आणि जॉय मुखर्जी नावाचा एक जोकर हिरो म्हणून कार्यरत होता आणि त्याला सार्‍या छान छान नायिका होत्या. जल् गये उस्ताद..
काही असो या पिक्चर्सनी आमच्या पिढीला स्वप्ने दिलीत आणि मनोरंजन देखील... अजुनही ती गाणी... ते शब्द आठवतात हे त्या कवींचे आणि संगीतकारांचे काँट्रीब्यूशन ...
दिलने फिर याद किया....

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण निदान ही चर्चा तरी करतोय.. पण आजच्या काळातल्या हिरविनी आणि एकुण चित्रपट पाहिले तर आपल्या मुलांना असल्या चर्चा आणि आठवणींचे कढ काढायची संधी मिळणारच नाही असे वाटते. सगळ्या हिरोइनी एका छापाच्या, भुमिकेशी विसंगत असे डिजायनर कपडे आणि मेकप वापरणा-या, सगळ्या रॅंपवर चालल्यासारख्या चालणा-या. दुरून पाहिले तर चटकन कोण कोण आहे ते ओळखताही येणार नाही. सगळ्यांची फिगरही सारखीच.

>>आशा पारेख (हिचे अंगच इतके बोजड की लपवणार कुठे??)

ह्याबाबत खुद्द आशा पारेखने "पुरानी जिन्स" ह्या एफएम चॅनेलवरच्या मुलाखतीत आरजे अनमोलला सांगितलेला किस्सा आठवला. ती लहान असताना एकदा शाळेत नाचाचा प्रोग्राम होता. तेव्हा तिच्या आईने तिला हौसेने नऊवारी नेसवलं होतं. तिला स्टेजवर पाहून लोक म्हणाले की ही मुलगी बिचारी आधीच जाडी आहे आणि वर अशी साडी, नाचणार तरी कशी? तिच्या आईने हे ऐकलं तेव्हा तिला वाईट वाटलं. एक आणखी किस्सा तिने सांगितला. तिच्यावर एक कोणी चायनीज माणूस फिदा झाला होता. करेन तर हिच्याशीच लग्न करेन असा हट्ट धरून तिच्या घराबाहेर दिवसचे दिवस बसला होता. शेवटी घाबरून तिने पोलिसांना सांगून त्याला घेऊन जायला लावलं पण आपलया अटकेमागे आशा पारेखच आहे हे त्याला माहित नसल्याने त्याने कोठडीतून तिला मला सोडव म्हणून पत्रं पाठवली होती. "पुरानी जिन्स" मध्ये असे अनेक किस्से ऐकायला मिळतात. हा प्रोग्राम रेडिओ मिरचीवर रात्री ९ ला असतो. रच्याकने, आशा पारेखची आई मुस्लिम होती हे मला हा प्रोग्राम ऐकेपर्यंत माहित नव्हतं

ताप देणारे आणखी काही लोक:

१. बिंदिया गोस्वामी, ही कधी मुलगी दिसलीच नाही.

२. निम्मी - कायम रडका चेहेरा, ते प्रेमनाथ आणि राज कपूर गाडीत बसून निघून जात असतात त्या गाण्यात तर असला चेहेरा केलाय की वाटतं गाणं संपल्यावर ही मरणार.

३. प्रिया राजबंश - है तेरे साथ मेरी वफा ह्या सोन्यासारख्या गाण्याची हातवारे करून वाट लावलीय. गाणं प्लॅबॅक आहे पण ही बयो नुस्ते ओठ पण प्रेक्षकांवर उपकार केल्यासारखे हलवते. तोंड अधिक उघडलं तर आत झुरळ किंवा कोळी जाईल अशी भिती असावी (ते कीटक पण दहा वेळा विचार करतील हिच्या तोंडात जायच्या आधी!). ह्या ठोकळ्याबरोबर राहणारा देवचा भाऊ धन्य आहे! भरीला ह्या चित्रपटात तिच्या जोडीला राजकुमार आहे. तो विमान चालवताना दाखवलाय म्हणून व्हिज्युअल अत्याचार कमी. हेल्मेट घालून किती वाईट अभिनय करणार?

४. रंजिता - कोई पत्त्थरसे ना मारे मेरे दिवानेको मध्ये वाईट दिसली आहे आणि हिच्याखातर पागल होणारा ऋषी कपूर खरंच वेडा वाटायला लागतो मग.

हिरोंमध्ये:

१. रणधीर कपूर - हिरो कम आणि हिरवीण ज्यादा दिसलाय.
२. फिरोझ खान - कायम दोन मुलांचा बाप वाटलाय.
३. राजकुमार - I rest my case.

साधना परत अनुमोदन जया व मौसम दोन्हीला.
आशा पारेख जिद्दी लव इन टोक्यो मध्ये सुन्दर नाचली आहे. तिला एक मस्त गाणी मिळाली कायम.
जाईये आप कहा जाएंगे मला खूप आवड्ते पण ते बघताना आशाचे केस नाका तोंडात जातात किकॉय असे वाट्ते.

प्रिया राजवंश मेल्यासारखीच दिसते असे मला वाट्ते. कायम पांढरा फट्क साफ चेहरा.

प्रियाबद्दल बोलु तितके कमीच.... Happy इथे आधीच भरपुर चर्चा झालीय तिच्यावर...

आशा पारेख नाचायची खरेच सुरेख. जिद्दीमध्ये 'रात का समा..' गाण्यावर मस्त नाचलीय. पण तिचे नाचायचे कपडे बहुतेक तिची बहिण डिजाइन करायची. (चित्रपट नामावली पाहाताना मी ए टू झेड सगळे वाचायचे.. Happy ) अतिभयानक, अत्यंत विशोभित असे कपडे...., तिचे जाड अंग अजुनच बोजड दिसेल असे भयाण कपडे ती नाचताना वापरायची. बाकी एरवी ब-यापैकी असायचे तिचे कपडे. ( बबिताचे कपडे ती स्वतःच डिजाईन करायची बहुतेक. इतका हॉरिबल ड्रेस सेन्स मी अजुन कुठल्या हिरविनीत पाहिला नाही.)

पुरानी जिन्स मध्येच मला वाटते एकदा साधना आठवणी सांगत होती. वक्त चित्रपटाबद्दल ती सांगत होती. या चित्रपटात हिरोइनीने जरा वेगळे कपडे वापरावेत असे तिला वाटत होते आणि तिने यश चोप्राला हिरोइनीला चुडिदार आणि वर टॉप असा ड्रेस सजेस्ट केला. यशने लगेच चुडिदार तवायफ घालतात, हिरोइनने तसले घातलेले चांगले दिसणार नाही म्हणुन तिची सुचना फेटाळली. तिने मग स्वतः तसे कपडे टेलरकडुन शिवुन घेतले, यश चोप्राला एका संध्याकाळी घरी चहाला बोलावले आणि त्याच्यासमोर तो ड्रेस घालुन आली. चोप्रा पाहातच राहिला आणि मग चुडीदार आणि वर टॉप ही लेटेस्ट फॅशन झाली Happy

रंजिताचा 'अखियोंके झरोखोंसे' हा चित्रपट अतिशय सुंदर.. एरिक सिगलच्या लवस्टोरीची पान्-बाय्-पान कॉपी आहे, मुळ कथेइतकाच हळुवार.... ह्या एका चित्रपटासाठी तिला सगळे माफ. तिचा गवाही हा झिनत, आशुतोष गो. व. बरोबर अजुन एक चित्रपट होता. यात तिचे काम खुप सुंदर होते. पण चित्रपट मात्र साफ झोपला. गाणी तर क्लासच होती यातली.

>>आशा पारेख (हिचे अंगच इतके बोजड की लपवणार कुठे??)

आशा मधल्या 'तू ना आया और होने लगी शाम रे' गाण्यात आशा पारेख काही क्षणांकरता आहे (रखवालदाराच्या वेषात) आणि एकदम स्लीम आहे. बाकी गाणे अण्णा चितळकर, लता आणि वैजयंतीमाला या तिघांनी सुंदरच बनवले आहे.

पडद्यावर तराजुसारखे हात वरखाली करणारा तो मठठ ठोकळा >>>

साधना Biggrin

अगदी डोळ्यासमोर आला सीन माझ्या........... Wink

प्रिया राजवंश ने लता आणी मदन मोहन ची जबरदस्त गाणी पडद्यावर फुकट घालवण्याचं काम ईमाने ईतबारे केलं. Sad त्यामुळे ही गाणी व्हिज्युअल ट्रीट न होता केवळ ऐकणेबलच राहिली.

फक्त एकाच गाण्यात प्रिया राजवंश बरी दिसली, ते म्हणजे हीर रांझा मधलं ' मिलो ना तुम तो हम घबराये' पण ती कसर राजकुमारने भरुन काढली.गाण्यात उड्या मारुन वाट लावली एका सुरेख गाण्याची पडद्यावर.

आशा पारेख,शर्मिला या फक्त केवळ लाडीक आवाजात संवाद बोलायच्या लायकीच्या,अभिनयाच्या बाबतीत बोलणेच नको.

जया माझी अगदी नावडती.. का माहित नाही. काही लोकांना एकदा पाहिले की नापसंतीच सुक्ष्म आठी कपाळावर उठते, का ते कधी कळत नाही

>>>>>>>>> अगदि अगदि.

जया माझी अगदी नावडती.. का माहित नाही. काही लोकांना एकदा पाहिले की नापसंतीच सुक्ष्म आठी कपाळावर उठते, का ते कधी कळत नाही >>> असचं माझं जयाप्रदाबद्दल होतं.. कधीच नाही आवडत ती.

आशा पारेख जिद्दी लव इन टोक्यो मध्ये सुन्दर नाचली आहे.>>>>तुम्हाला "कोई मतवाला आया मोरे द्वारे" म्हणायचयं का? मस्त गाणं.

बिंदीया गोस्वामी म्हणजे गोलमाल मधली ना? "आनेवाला पल" मध्ये छान दिसलेय.. अर्थात त्या सिनेमात तिला त्यापेक्षा जास्त कामही नाही म्हणा.

>>पण ती कसर राजकुमारने भरुन काढली.गाण्यात उड्या मारुन वाट लावली एका सुरेख गाण्याची पडद्यावर.

अगदी,अगदी. त्याला आम्ही 'जय बजरंगबली' स्टाईल नाच म्हणतो. Happy

आणखी एक गाणं आहे - बाजे पायल छुन छुन होके बेकरार. त्यात बिचारी नूतन रहमानच्या गाडीसमोर नाचून त्याला थांबवायचा प्रयत्न करत असते. रहमान हिरो ही कल्पनाच कशीतरी वाटते Sad

जाड हिरवीणीमध्ये 'जिस देशमे गंगा बहती है' मधली पद्मिनी का रागिणी कोण ती सुध्दा आहे. साधारणतः डान्सर्स सडपातळ असतात (उदा, वैजयंतीमाला, वहिदा) पण ही बयो गोलमटोल. मला नलिनी जयवंतसुध्दा आवडत नाही. ते तिचं आणि देव आनंदचं गाणं आहे बैठकीतलं - बहुतेक 'नजर लागी राजा' - त्यात तर भयाण दिसते अगदी. नंदा सुध्दा जाडच. "ये समा है प्यारका" मध्ये तिच्या फिगरला न शोभणारा तो पांढरा गाऊन दिलाय. ती सुध्दा लाडेलाडेच बोलायची.

जिस देश.... मध्ये पद्मिनी. तिकडच्या सगळ्या बाया खात्या पित्या घरातल्या आहेत गं.. आजही सगळ्या सौधिंडियन हिर्विन बाया तशाच असतात. तिकडच्या पब्लिकला म्हणे तशाच हिरविनी आवडतात...

शर्मिलावरून आठवलं. माझ्याकडे फार पूर्वी एका गाण्याच्या कॅसेटमध्ये शर्मिला आणि फिरोज खान ह्यांच्या कुठल्यातरी पिक्चरची गाणी होती. त्यात तो तिच्यावर संशय घेतो आणि मग तिला गाडीत बसवून भरधाव निघतो. त्यावेळी शर्मिलाच्या तोंडी "क्या कर रहे हो, कहा जा रहे हो?" असे काहीतरी संवाद होते. ते तिने इतक्या लाडेलाडे म्हटलेत की कॅन्टीनमध्ये तिला बसवून तो वडापावची डिश आणायला चाललाय असं वाटतं. आम्ही मित्रमंडळी तो संवाद ऐकून खूप हसायचो.

>>आजही सगळ्या सौधिंडियन हिर्विन बाया तशाच असतात

अगदी अगदी ग बाई. नको त्या साऊथ इंडियन पिक्चर्सची नावं काढू. भ या ण! विग लावलेले, जाड ओठांचे,रात्रीही गॉगल लावून फिरणारे, झुपकेदार मिशावाले, लाल डोळ्यांचे नायक आणि जाड्या जाड्या, आधीच मोठे असलेले डोळे आणखी मोठे करून बोलणार्‍या बाया बघितल्या की मला मळमळतं Sad

जाड हिरवीणीमध्ये 'जिस देशमे गंगा बहती है' मधली पद्मिनी का रागिणी कोण ती सुध्दा आहे.>>>>>"इज्जत" चित्रपटात "जागी बदन में ज्वाला सैंया तुने क्या कर डाल" या गाण्यावर नाचणारी जयललिताच आहे ना?
धर्मेंद्रचा डबल रोल असलेला चित्रपट आणि दुसरी हिरवीन तनुजा.
त्यातील "ये दिल तुम बिन कही लगता नही हम क्या करे" हे लता रफीचे अप्रतिम गाणे.

साधना | 19 October, 2010 - 02:43
हे नव-याकडे परत जाणे हा प्रकार मला कधीच पटला नाही. गुमराह, वो सात दिन, सिलसिला.... सगळीकडे तेच.. ज्याच्याशी अजिबात पटत नाही, जिथे मन कधी जुळलेच नाही, तिथे त्याचा/तिचा केवळ एक अ‍पघात झाला म्हणुन लगेच उरलेल्या आयुष्यात पटायला लागणार??? कैच्याकैच..

अनुमोदन .. एकदम मान्य आणि यांचे नवरे पण वाट बघत बसले असायचे (दु:ख्खी गाणी गात) की कधी बायको पश्चाताप होउन परत येते, असे कधी खरे होते का, होतही असेल पण क्वचितच. आणि एवढे बिनसल्यावर हा विषय कधी पुढील आयुष्यात येणार नाही का?

प्रिया राजवंश आणि निम्मी गाताना फारच कमी ओठ हलवायच्या. का ते त्यानाच माहित. निम्मी अतिशय सुम्दर होती असे म्हणतात पण मला ती कायम झोपेतून उठून आल्यासारखी वाटते. "बाई, जरा डोळ्यावर पाणी मारून फ्रेश होऊन ये" असे म्हणावेसे वाटते.

सायराबानू त्यावेळी तरी "थोडासा ठेहरो..." गाण्यात सेक्सी वाटली. तीच कथा शागिर्दची. माझा मित्र अशी "गाँव की गोरी" असेल तर कुठच्याही आडगावात साईटवर जायला तयार होता. सायराबानू नंतर ज्वार भाटा, रेशमी डोरी ...मध्ये अगदी चपटी/ कचकड्याची बाहुली वाटली.

जया भादुरी before and after मध्ये बराच फरक आहे. पहिली कोशिश, अभिमान, परिचय... नुसतीच शोभेची बाहुली असण्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात असलेली आणि ते निभावून नेलेली अभिनेत्री होती. आताची जया अतिशय कृत्रीम वाटते.

>>निम्मी अतिशय सुम्दर होती असे म्हणतात पण मला ती कायम झोपेतून उठून आल्यासारखी वाटते.

प्रचंड अनुमोदन!

कुणी लीना चंदावरकर आणि वहिदा रेहमानविषयी नाही लिहले Uhoh

लीना चंदावरकर, मेहबूब कि मेहंदी, हमजोली, मनचली मध्ये खुपच आवडली. Happy

ती जुनी निम्मी , साधारण किमी काटकर सारखी दिसायची >>>

यावरून आठवलं. बर्‍याचदा जुन्या आणि काही नव्या नट्या यांमध्ये चेहरेपट्टीत साधर्म्य दिसून येते. जसं वर किमी आणि जुनी निम्मी!
माधुरी चे फेसिंग मधुबाला सारखे आहे असे बरेच जण म्हणतात. मला इतकं साम्य नाही वाटत, पण एखाद्या फोटोत ती तशी दिसत असेल तर इथे टाका तो फोटो.

एक जुनी नटी आहे, तिचं नाव नाही माहीत. तिचं आणि उर्मिला चं फेसिंग अगदी डिट्टो मॅच होतं असं वाटतं मला. वर लीला नायडूचा फोटो कुणीतरी टाकलाय त्यात ती कंगना राणावत सारखी दिसतीय.

अजून अशा काही जोड्या आहेत का?? किंवा नटांच्याही अशा काही जोड्या आहेत का?? (पिता-पुत्रांच्या आणि मायलेकींच्या सोडून अर्थातच!)

योगेश, लागी बदन मे ज्वाला वर जयललिताच नाचलीय.

पद्मिनी नंतर सुटली, पण तिचा परदेसी (भारत रशिया संयुक्त निर्मिती ) मधले दोन नाच बघा. सडपातळ आणि सुंदर दिसली आहेच पण अप्रतिम नाचलीय. (यू ट्यूब वर आहेत)

निम्मी चा अभिनय बघायचा तर तो बसंत बहार मधे, बडी देर भयी आणि दुनिया ना भाये मोहे (दोन्ही गाणी रफिची) आणि दाग मधे, दिलीप कुमारची दारु सुटावी, म्हणून तिने दारु प्यायल्याची केलेली बतावणी.
इंतजार और अभी और अभी, रितू आये रितू जाये सखी री हि दोन्ही गाणी तिच्यावर चित्रीत झाली आहेत.(यू ट्यूब वर आहेत)

तशी किमी पण मला आवडायची. तिचे नेहमीच बोल्ड फोटो प्रसिद्ध व्हायचे, पण शंतनू शौरी ने तिचे अप्रतिम क्लोजप्स काढले होते. मला तिचा अभिनय, खोज मधे पण आवडला होता.

लीना चंदावरकर खरंच क्यूट दिसली आहे मनचलीमध्ये.

आणखी एक गाणं आठवतं - अगर मुझसे मोहोबत है. धर्मेन्द्रच्या शेजारी जी नटी बसली आहे तिला हिरवीण म्हणणं निदान माझ्यातरी नेहमी जीवावर येतं Sad मला वाटतं तिला बारीकशी मिशीदेखील आहे. दुसरी ती जाहिरा का जाहिदा - चुडी नही मेरा दिल है ह्या गाण्यात देव आनंद बरोबर होती ती. तिला पाहिलं की ओरडून सांगावंसं वाटतं त्याला - अरे, ती बाई दिसत नाहिये, कशाला बांगड्यात पैसे घालतोयस?

जाहिरा आणि जाहिदा दोन वेगळ्या बाया. जाहिदा नर्गिसची भाची का पुतणी होती, अनोखी रात (खुषी खुषी करलो बिदा - लता ) आणि प्रेमपुजारी (वहिदाला स्पर्धा म्हणे ! ) मधे पण होती.
जाहिरा त्या काळात पण बोल्ड होती. नेमके सिनेमे आणि गाणी आठवत नाही, पण चेहरा जरा बरा होता.

अजून अशा काही जोड्या आहेत का?? >>>
दिव्या भारती सुद्धा कधी कधी श्रीदेवी सारखी दिसली आहे नै??? जुडवा सिनेमाच्या सुरुवातीला साजिद नाडीयादवालाने दिव्या भारतीला श्रद्धांजली वाहिल्याचा मेसेज येतो तेव्हा दिव्याचा एक शॉट दाखवतात. त्यात ती अगदी श्रीदेवीच दिसते डिट्टो.

दुसरी ती जाहिरा का जाहिदा - चुडी नही मेरा दिल है ह्या गाण्यात देव आनंद बरोबर होती ती. तिला पाहिलं की ओरडून सांगावंसं वाटतं त्याला - अरे, ती बाई दिसत नाहिये, कशाला बांगड्यात पैसे घालतोयस?>>>>>> ही जाहिदा म्हनजे देव आनंदच्या प्रेमपुजारी मध्येही होती ना? सगळी गाणी उत्कॄष्ट असलेला सिनेमा.. त्यात तो वहीदा रहमान ला दोडुन परदेशात येतो आणि तिला त्याला शोधायला यायचं असतं तर दुर कुठेतरी असलेल्या तिच्या खेड्यात तिला "मिस इंडिया" स्पर्धेची अ‍ॅड सापडते आणि पुढच्या ५ मि. त ती सगळे सोपस्कार आटपुन (स्पर्धेचा फॉर्म भरणे, सगळ्या राउंड्स मधुन पार होउन विजेतेपद पटकावणे )त्यानंतर टुरवर नेमकं देव आनंद असलेल्याच देशात्/शहरात पोहोचते Uhoh आणि मग एक अप्रतिम गाणं "रंगीला रे" .त्या गाण्यासाठी बाकी सर्व माफ...

Pages