परवा नुकतेच टीव्हीवर राजेश खन्नाचे गाणे पहात होतो. आणि माझी कन्या ई.... करून किंचाळली. मी दचकून तिच्याकडे पाहीले तर म्हणाली काय बाबा काय पहाताय? हा काय हिरो आहे? मी खरं तर चिडलो होतो. अरे एके काळी 'आराधना' पहाण्यासाठी आम्ही ब्लॅक ची तिकिटे काढली होती. शर्मिलेच्या जागी गल्लीतील लोकल शर्मिलाला पाहत गाणी गुणगुणली होती त्याचा असा हा उपमर्द?? पण नव्या पिढीला काय सांगणार...
.... नाही. मी अशी प्रतिक्रिया अजिबात दिली नाही. खरं तर कन्येच्या प्रतिक्रीयेवर मी अंतर्मुख झालो. आणि विचार करू लागलो.
आजच्या काळातील ते पिक्चर्स खरोखर आता अगदी बेंगरूळ वाटतात्.विशविशीत कथा --- बेतलेल्या, ४०-४२ मधील हिरोइन्स (बल्जिंग अॅन्ड बल्की पण) यांना आपण कसं सोसलं याचे आच्शर्य वाटले
त्यानंतर अमर,अकबर,अॅन्थनी मधील ब्लड ट्रान्स्फर सीन तिघांचे रक्तगट एकच.. अगदी कॉर्पोरशन च्या नळाप्रमाणे रक्त देतात यावेळी आपली सायन्टीफिक साइट कुठे होती हा प्रश पडला.
केवळ माँकी कसम म्हणुन ऐनवेळी मध्यंतरापुर्वी ठोकरणारा विशविशीत नायक आणि तिच्या लग्नानंतर फकाफका सिगारेटी ओढून किंवा नशा करून विरह गीते गाणारे हिरो याना आपण मानले याचीच कीव आली.
तर कघी कधी आर्ट फिल्म पहाताना पुढचा डायलॉग आपणच बोलावा अशी ऊबळ येण्याएवढे स्लो डायलॉग्ज.. आठवा... 'अनुभव' संजीवकुमार...
कधीही धूर न येणारा पाईप तोंडात ठेवून, गाउन मधील बाप ... पुढे त्याचा डायलॉग काय असणार हे तुम्ही ओळखला असणारच... हो तोच तो... खानदानकी.....
आणखी एक ... त्याकाळी राज ठाकरे असता तर.....????
मॉ मुझे तेरे हातका गाजर का हलवा .. पराठे.. राजने त्याना नक्किच हिंदी वाल्याना वडा पाव आणि पाव भाजी खायला लावली असती. राज तू पहले आना था.
आणखी एक मोठा जोक.. राजेंद्रकुमार नावाचा एक महा बोर 'नट" २५ सिल्व्हर ज्युबिल्या करुन गेला आणि जॉय मुखर्जी नावाचा एक जोकर हिरो म्हणून कार्यरत होता आणि त्याला सार्या छान छान नायिका होत्या. जल् गये उस्ताद..
काही असो या पिक्चर्सनी आमच्या पिढीला स्वप्ने दिलीत आणि मनोरंजन देखील... अजुनही ती गाणी... ते शब्द आठवतात हे त्या कवींचे आणि संगीतकारांचे काँट्रीब्यूशन ...
दिलने फिर याद किया....
७०-८० च्या दशकातील सिनेमे आणि मला आलेले हसु
Submitted by सुनिल जोग on 10 October, 2010 - 02:36
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही महिन्यांमागे शिवाजी
काही महिन्यांमागे शिवाजी मंदीरला 'मन उधाण वार्याचे' च्या प्रयोगाला गेले होतो तेव्हा निवेदीताही आली होती. विश्वास बसणार नाही इतकी बारीक दिसते. शिवाय चेहर्यावरही वय दिसून येत नाही इतके. छान मेंटेन केलंय तिने स्वतःला
अशोक सराफ घरचा बराच मालदार
अशोक सराफ घरचा बराच मालदार आहे असं कुठेसं वाचलं होतं.....
अशोक सराफ घरचा बराच मालदार
अशोक सराफ घरचा बराच मालदार आहे असं कुठेसं वाचलं होतं
मला नाही वाटत हे खरे असावे. गेल्या वर्षी कुठल्यातरी चॅनेलवर त्याची मुलाखत पाहिलेली. त्यात आपल्या वैयक्तीक जीवनाचा आढावा घेताना 'निवेदिताबरोबरच माझी पहिली गाडीही घरात आली, लग्न होऊन घरी येताना ती स्वतःची मारुती ८०० घेऊन आली, ती माझी पहिली गाडी' असे उद्गार काढलेले...
निवेदिताने रंगमंचावर परत काम सुरू केलेले असे मला वाटते, नक्की आठवत नाही. वरील कार्यक्रमात नंतर तीही आली, छान दिसत होती. मला तर आधीपेक्षाही आता छान दिसतेय असे वाटले
त्यांचा मुलगा विडिओ कॉन्फरन्सथ्रु कार्यक्रमात सामिल झाला होता. तो मात्र अशोकसारखाच आहे दिसायला 
असेल मग!
असेल मग!
तो मात्र अशोकसारखाच आहे
तो मात्र अशोकसारखाच आहे दिसायला
>>
आणि त्याचा आवाज निवेदिता सारखा...
शी... देवाने कुठल्या जन्मीचा
शी... देवाने कुठल्या जन्मीचा सुड उगवलाय??? त्या विडिओत त्याचा आवाज नीट ऐकायला आला नव्हता मला, खुप खरखर होती..
दिसण्याचं म्हणाल तर किशोरी
दिसण्याचं म्हणाल तर किशोरी शहाणेचा नवराही खास नाही दिसायला. कोणाला कोण आवडेल ह्याचा खरंच काही नियम नाही. रच्याकने, हिंदीतले नट-नट्या संपले की काय? सगळे एकदम मायमराठीवर आले ते.
परवा ब्लॅक अॅन्ड व्हाईट चॅनेलवर एक गाणं पाहिलं - चित्रपट होता 'उमर कैद' , हिरवीण नजमा, गाणं होतं 'ओ पिया जाना ना' आणि हिरो कोण? तर सुधीर - सत्तेपे सत्ता मधल्या अमिताभच्या अनेक भावातला एक होता.
"समा है सुहाना सुहाना, नशेमें
"समा है सुहाना सुहाना, नशेमें जहां है, किसी को किसी की खबर हि कहा है" या (बहुतेक, "घर घर की कहानी" - चुभुद्याघ्या) चित्रपटातील गाण्यात नायिका भारती (चुभुद्याघ्या) हि दाक्षिणात्यच होती ना? (नायकः राकेश रोशन)
मनोजकुमारच्या "पूरब और पश्चिम" मध्ये ती विनोदकुमारबरोबर आहे.
"पुरवा सुहानी आयी रे....पुरवा....." हे गाणे त्या दोघांवर चित्रित झाले आहे.
रच्याकने, मेहमूदच्या "कुवारा बाप" चित्रपटात तीच आहे का?
नर्म होटोंमें दबी बात किसे
नर्म होटोंमें दबी बात किसे पेश करुं >>> गडबडीत नम्र होटोंमें दबी बात किसे पेश करुं वाचल...
अरे ७०-८० नायक नायिका म्हणता
अरे ७०-८० नायक नायिका म्हणता म्हणता ४० मध्ये पोचलेत लोक मध्येच.
७०-८० नायिकांची अँटिंक्ग वर हे गाणे समर्पित(कसे लिहितात हे),
हे गाणे पाहून इतके हसलो ना,
सोनालीने मस्त उचलली स्टाईल शर्मिलाची वगैरे,
http://www.youtube.com/watch?v=hjzlPtsS0R8&feature=related
>>>निवेदिता जोशीनी तरी त्या
>>>निवेदिता जोशीनी तरी त्या म्हसोबाला काय निवडलं काय माहित, आयब्रो पेन्सिल ने मिशी रंगवायचा मधे ९०' च्या काळातल्या चित्रपटां मधे.. कसला हॉरिबल चॉइस ..वयानी पण बराच मोठा असेल >>><<
ह्याच्यावरून मला एक वाक्य आठवले माझ्या मित्राचे . गप्पांमध्ये बर्याच मैत्रीणीच्या अश्या चर्चा सुरु झाल्या की आमचा एक मित्र लगेच हे उत्तर द्यायचा,, अपना अपना चॉइस होत है बाबा, तेरे को क्या है? क्युं दिमाख का दही बनाती है. कलको तेरी और तुम्हरे हसबंड कि जोडी देखकर हमको भी ऐसा लगेका तो किसको जाके कहे?
निवेदिता विषयी आणखी वाईट वाटून घ्यायचे असेल तर, http://ketkarbandhujewellers.com/portfolio.html
योगेश, 'समा है सुहाना...'
योगेश, 'समा है सुहाना...' गाण्याचे दृष्य फारसे आठवत नाही. दुरदर्शनवर एकदाच पाहिलेले, राकेश रोशन आठवतोय, पण हिर्विन आठवत नाही. त्या गाण्यात एडीटींग करण्यासारखे काही आहे असे गाणे ऐकुनतरी वाटत नाही, पण तरीही दुरदर्शनने ते खुपच एडीट केले होते. पडद्यावर सतत दोन बायका दाखवत होते, हिरो हिरविन एवढे काय करत होते देवाला ठावके...
चित्रपट मात्र घर घर की कहानी.
बाकीच्या दोन्ही चित्रपटात भारती आहे. दाक्षिणात्य भारती
मनु, इथे युटुबदिवस नाही, पण दिल चाहता है आहे ना?? मस्त आहे ते गाणे. सोनालीने ६० नी ७० च्या दशकातल्या हिरविनी मस्त केल्यात, पण ८० च्या दशकातली हिर्विन मात्र मला आवडली नाही. सोनाली खुप जाड वाटली त्या गेटपमध्ये.
हसु नका , पण मला निवेदिता
हसु नका , पण मला निवेदिता जोशीच्या चेहेर्यात बरेचदा मधुबालाचा भास होतो.
)
( नोटः मी मधुबालाची फॅन नसलेल्या दुर्मिळ लोकां पैकी एक आहे
माझ्या माहिती प्रमाणे 'समा है
माझ्या माहिती प्रमाणे 'समा है सुहाना सुहाना' या गाण्यात राकेश रोशन बरोबर हेमा मालीनी आहे! चु.भु.द्या.घ्या.
कै च्या कैच.. हेमाने
कै च्या कैच..
हेमाने राकेशबरोबर फक्त पराया धन हा एकच चित्रपट केलाय. त्या दोघांचे 'आवो झुमे गाये...' हे सुंदर गाणे आहे.
समा... मध्ये भारतीच आहे बहुतेक. युटुबवर पाहावे लागेल आता
समा है सुहाना सुहाना.....
समा है सुहाना सुहाना.....
युट्युबवर
सोनाली खुप जाड वाटली त्या
सोनाली खुप जाड वाटली त्या गेटपमध्ये.
>>
सोनाली आणि काजोल दोघि खुप जाड होत्या. काजोल पुढे बारीक झाली सोनाली तशीच राहिली.
ती रब ने बनादी जोडी वाली
ती रब ने बनादी जोडी वाली अनुष्का शर्मा दिव्या भारतीची कॉपी वाटते मला तर.
लहानपणी टिकू तलसानिया आणि सतीश शहा यांना तसेच दीप्ती नवल आणि अनुराधा पटेल यांना ओळखण्यात जाम गफलत व्हायची माझी. ते दोघे आणि या दोघी जाम सेम वाटायच्या मला.
मला तर झीनत अमान आणि परवीन
मला तर झीनत अमान आणि परवीन बाबी सेम वाटायच्या.
अनिता राज आणि अमृता सिंग यांच्यात मला कन्फ्युजन होते.
दिप्ती नवल आणि हेमा मालिनी यांच्यातही मला कन्फ्युजन व्हायचे
दिप्ती नवल आणि हेमा मालिनी
दिप्ती नवल आणि हेमा मालिनी >>> हे अगदी कै च्या कै वाटते. पण असो.
बाकी जोड्या (झीनत अमान आणि परवीन बाबी आणि अनिता राज आणि अमृता सिंग ) यांच्या साधर्म्याबद्दल अनुमोदन
हसु नका , पण मला निवेदिता
हसु नका , पण मला निवेदिता जोशीच्या चेहेर्यात बरेचदा मधुबालाचा भास होतो. >> बर मग ?
मी मधुबालाची फॅन नसलेल्या
मी मधुबालाची फॅन नसलेल्या दुर्मिळ लोकां पैकी एक आहे.
हो मलाही ती कधीच खुप सुंदर वाटली नाही. सुंदर असेल पण खुप सुंदर नाही.
निवेदिता जोशीच्या चेहेर्यात बरेचदा मधुबालाचा भास होतो
चेहेरेपट्टी अग्रिड पण निवेदिता जोशी जास्तच सामान्य वाटते.
धमाल प्रतिसाद आहेत.
धमाल प्रतिसाद आहेत.
दहा वर्ष जुना धागा ... कसले
दहा वर्ष जुना धागा ... कसले थॉट प्रोसेस होती तेंव्हा..
Pages