Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
मा.सावट्जी, आपण दिलेल्या
मा.सावट्जी,
आपण दिलेल्या उत्तराने माझे समाधान झाले. मी करत असलेल्या मानस पुजे बाबत मी समधानी आहे. आपला लोभ असावा. कधी काळी आपली भेट व्हावी. आपण पुण्यात रहात असाल तर हा आग्रहच आहे.
धन्यवाद
धन्यवाद नितीनजी!
कुसंस्कारीत(सकाम) मनाचे 'ध्यान'...म्हणजे माजलेल्या बोक्यास जबरदस्तीने पोत्यात कोंबल्यासारखे आहे! पोत्याचे तोंड सुटण्याची वाट पहात असणारे..
त्याकरीताच 'साधना' आणि 'उपासना' दोन्हीही एकमेकाच्या हातात हात घालूनच व्हावयास हव्यात.
असो...
आपले 'समाधान' झाले यातच 'सर्व' आले.. असाच आपलाही लोभ असावा!:)
आणि आपणच सांगितल्याप्रमाणे..
स्पर्श शब्द गंध मैफिली अपार झाल्या
भोगुन त्या क्षणांना... "मी"... तृप्तीस महाग झालो
स्पर्श, शब्द, गंध,रस आणि रुप हे 'विषय' अनेक जन्म भोगुनही... 'अतृप्ती' पाठ सोडता-सोडत नाही.. हेच खरे.:)
धन्यवाद!
गौरी,
आपला अति महत्त्वाचा प्रश्न होता...
>>>थोडक्यात नामसंकल्प, स्मरण ह्या गोष्टींसाठी त्याचीच कृपा हवी, ती कशी मिळवावी बरे?
यावर माधवांनी छान सांगितल आहे... ते म्हणजे...
>>>मी कोण मिळवणारा/री तूच कॄपा कर आणि मला पदरात घे अशी मनाची स्थीती झाली की होते त्याची कृपा!
यातून अजून एक प्रश्न निर्माण होतो.. तो म्हणजे..
वरील प्रमाणे 'मनाची' स्थिती कशी होणार? किंवा आपल्या 'मनाची' स्थिती सुरुवातीला शरणागतीची असते का?... 'कृपा' अगोदर की 'शरणागती' अगोदर?
धन्यवाद!
सावट, माधव धन्यवाद!! पण
सावट, माधव
धन्यवाद!!
पण प्रश्नांतुन आणखी प्रश्न निर्माण होतायत
मनाच्या कोणत्याही अवस्थेचे बुध्दी नियंत्रण करते, म्हणुनच आपण नेहमी चांगल्या बुध्दीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
शनिमहात्म्यात काय लिहिले आहे? जेव्हा राजा विक्रमादित्य आपण शनी देवाला का हसलो आता पुढचे परिणाम काय, हा विचार करत बसला होता तेव्हा पंडिताने सांगितले, 'जैसे असेल लिखिताक्षर बुध्दी सुचे तदनुसार'. म्हणजे जैसे लिखित असेल, तशी बुध्दी आणि तसेच कर्म?
जर हे खरे असेल तर मग कोणत्या जन्मात साधकाला कधी बुध्दी होणार आणि त्याचा मोक्षाच्या दिशेने प्रवास सुरु होणार हे ही लिखित मानायचे? कारण त्या अनुषंगाने मनाची पोषक अवस्था, तसे पुरक वातावरण, गुरुची भेट हे ही लिहिलेले असेल?
थोडक्यात, लिखित-बुध्दी-कर्म ह्या तीन गोष्टींनी गोंधळात आणखी भर टाकलीये. जेव्हा वरच्या प्रश्नाची उकल कराल तेव्हा ह्या तीन गोष्टींची सांगड स्पष्ट कराल का? आणि जर ह्यांचा परस्पर संबध आहे, तर ह्या तीन गोष्टी भेदुन भक्ती, उपासना कशी घडावी जी परमात्मा आणि आपल्यातले अंतर कमी करेल?
>>कुसंस्कारीत(सकाम) मनाचे
>>कुसंस्कारीत(सकाम) मनाचे 'ध्यान'...म्हणजे माजलेल्या बोक्यास जबरदस्तीने पोत्यात कोंबल्यासारखे आहे! >>पोत्याचे तोंड सुटण्याची वाट पहात असणारे..
खुप हसू आले हे वाक्य वाचून, पण ते अगदी खरे आहे.
या जन्मातली बुध्दी हा आधीच्या
या जन्मातली बुध्दी हा आधीच्या अनेक जन्मांच्या कर्माचा परिपाक होय. पुर्वजन्मकर्मनुसारेण हा जन्म लाभलेला आहे आणि कोणाचा तिरस्कार न करता, राग न धरता जे प्राप्त आहे त्यात आनंद मानुन जीवन आनंदाने जगावे हे म्हणणे सोपे असते पण असे कर्म हातुन घडणे अत्यंत कठीण.
काही प्रसंगी विवेक हा बुध्दीच्याही वरचा स्तर हरवतो आणि या जन्मात माणसाच्या हातुन अतिशय चुकीची कर्मे घडतात. मन बुध्दी आणि विवेक स्थिर झाल्यावर हे समजत.
प्रार्थना अश्यासाठी करावी की गतजन्माची प्रेरणा बुध्दीला चुकीचे वागण्याची प्रेरणा देईल अश्या वेळी विवेक जागृत रहावा.
प्रार्थना या साठी करावी की किमान या जन्मीतरी हातुन चांगले कर्म घडावे.
गौरी, >>>लिखित-बुध्दी-कर्म
गौरी,
>>>लिखित-बुध्दी-कर्म ह्या तीन गोष्टींनी गोंधळात आणखी भर टाकलीये. आणि जर ह्यांचा परस्पर संबध आहे, तर ह्या तीन गोष्टी भेदुन भक्ती, उपासना कशी घडावी जी परमात्मा आणि आपल्यातले अंतर कमी करेल?
आपला प्रश्न अतिशय सूचक आहे... धन्यवाद!
नितीन,
>>>
पुर्वजन्मकर्मनुसारेण हा जन्म लाभलेला आहे आणि कोणाचा तिरस्कार न करता, राग न धरता जे प्राप्त आहे त्यात आनंद मानुन जीवन आनंदाने जगावे हे म्हणणे सोपे असते पण असे कर्म हातुन घडणे अत्यंत कठीण.
आणि
प्रार्थना अश्यासाठी करावी की गतजन्माची प्रेरणा बुध्दीला चुकीचे वागण्याची प्रेरणा देईल अश्या वेळी विवेक जागृत रहावा.
अतिशय योग्य असे सांगितले आहे.. धन्यवाद!
याच्यामधे अजून थोडी भर घालूयात...
माधव यांनी सुरुवातीला खालील प्रमाणे सांगितले होते...
>>>
१. शरीराने - यात पूजा, उपास, मौखीक जप, इतर व्रते ई. येतात.
२. मनाने - यात तुमचे साध्य नेहमी तुमच्या मनात असते. ह्यात मानस जप ई येतात.
३. बुध्दीने - यात तुमच्या बुध्दीने किंवा विवेकाने अयोग्य ते गाळत तुमच्या साध्यापर्यंत पोचायचे असते.
या तीन प्रकारावरून अनुक्रमे कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग हे तीन मार्ग आहेत.
लिखित-बुध्दी-कर्म आणि वरील प्रमाणे शरीर-मन-बुध्दी यांचा मेळ कसा घालायचा?
अश्विनी,
"एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, परि हरिकृपे त्याचा नाश आहे", असे श्रीसंत एकनाथ महाराजांनी सांगितल्यानुसार.... याचा आणि वरील प्रश्न यांची सांगड कशी घालणार?:)
धन्यवाद!
नितीन, >>>सगुण रुपात पुजा
नितीन,
>>>सगुण रुपात पुजा करायला वेळ होत नाही. सध्या रोज २.५ तास प्रवास करावा लागतो. किमान सकाळी बसायला बस मधे जागा मिळते. अश्यावेळी मानसपुजा करतो.
मानसपुजा, सगुण आहे की निर्गुण?:)
धन्यवाद!
सावट, मानसपुजा सगुण किंवा
सावट,
मानसपुजा सगुण किंवा निर्गुण नसते ना? ती सगुणाची किंवा भक्तीतील अधिकारानुसार निर्गुणाची असते ना?
नितीन, >>>सगुण रुपात पुजा
नितीन,
>>>सगुण रुपात पुजा करायला वेळ होत नाही. सध्या रोज २.५ तास प्रवास करावा लागतो. किमान सकाळी बसायला बस मधे जागा मिळते. अश्यावेळी मानसपुजा करतो.
मानसपुजा, सगुण आहे की निर्गुण?
धन्यवाद!
मी मनाने सर्व उपचार करतो. याला सगुण म्हणावे कि निर्गुण हे मला माहित नाही. माझ्या मते हे सगुण असावी कारण मला माझ्या सद्गुरुंची मुर्ती आठवावी लागते. ज्याला निर्गुण म्हणल जात ते परमेश्वरी शक्तीच अव्यक्त रुप आहे.
ज्ञानेश्वरांच्या "तुझ सगुण म्हणु की निर्गुण रे" या अभंगाचे आपण विवेचन केल्यास मला बोध होईल.
नितीन, अश्विनी.... प.पू.
नितीन, अश्विनी....
प.पू. श्रीगोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातील खालील भाग पहा...आपले शंका निरसन होईल..
श्रीमहाराज म्हणतात..
एक गृहस्थ मला भेटले. ते म्हणाले, "हिंदू धर्मासारखा धर्म नाही; पण देव सगुणात आले हे नाही मला कबूल. म्हणे निरनिराळ्या उपासना सांगितल्या ! देव जर निर्गुण निराकार, तर राम, कृष्ण, शिव, दत्त अशा या एवढ्या निरनिराळ्या उपासना कशाला ?" पुढे एक दिवस त्यांच्याविषयी एका गृहस्थाने त्यांच्या घरी चौकशी केली, तेव्हां प्रत्येकजण निरनिराळे नाव घेऊन सांगू लागले. कोणी 'दादा' घरी नाहीत असे म्हणाले, तर कोणी 'दामोदर' घरी नाही म्हणाले, कोणी 'रावसाहेब' नाहीत म्हणाले. हे सर्व जरी म्हटले तरी त्या योगे भेटणारा मनुष्य ज्याप्रमाणे तो गृहस्थ एकच, त्याप्रमाणे हे भगवंताच्या निर्गुणाचे सगुणात आले. भगवंत सगुणामध्ये आला की, जे नियम आपल्याला लागू असतात तेच नियम त्यालाही लागू होतात. 'सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो', म्हणतो, त्याला त्याचे मर्मच नाही कळले. खरी तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याला नाही ते कळत. आपले वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, आणि त्यावरची भाष्ये यांनी निर्गुण स्वरूपाची रूपरेषा काढून दिली. संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि भगवंताचे सुंदर चित्र तयार केले; ही सगुणभक्ति होय. सगुणोपासनेवाचून मोक्ष मिळणार नाही.
अजून एका प्रवचनात श्रीमहाराज म्हणतात...
समजा आपल्या एका गावाला जायचे आहे. त्या गावाला जाणारी आगगाडी धरून आपण तिची संगती करतो. आपले गाव आले की आपण गाडी सोडतो. हे जसे खरे, त्याचप्रमाणे, निर्गुण हे आपले साध्य असले तरी आज आपल्याला सगुणच खरे मानून त्याची संगती केली पाहिजे. निर्गुणाशिवाय सगुण खरे नाही ही गोष्ट खरी; पण सगुण खरे धरून चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोहोचता येणार नाही हेही तितकेच खरे. सगुणोपासनेत स्वतःचा विसर पडला की, एकीकडे ’ मी ’ नाहीसा होतो आणि दुसरीकडे देव नाहीसा होतो, आणि शेवटी परमात्मा शिल्लक राहतो. म्हणूनच, आपण निर्गुणाची ओळख करून घेऊन सगुणात राहावे. स्वतःचा विसर जर रामाच्या पूजनात पडू लागला, तर निर्गुण आणखी कोणते राहिले ?
परंतु ताप आलेल्या माणसाला ज्याप्रमाणे सर्व कडूच लागते, त्याप्रमाणे आपली वृत्ती विषयाकार झालेली, तिला सगुण, निर्गुण, दोन्ही कुठे गोड लागतात ? ’सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो’ म्हणतो, त्याला त्याचे मर्मच नाही कळले. वस्तुतः तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याचे त्यालाच नाही कळत. स्थलात आणि कालात जे देवाला आणतात, त्यांनी त्याला सगुणात नाही आणले या म्हणण्यात काय अर्थ आहे ?
(आणि आपली प्रत्येक कृती ही 'स्थल आणि काळ' याने बाधीत आहे.. हे आपण कधिही विसरता कामा नये.):)
धन्यवाद!
बरोबर.
नितीन, श्रीसद्गुरु
नितीन,
श्रीसद्गुरु माउलींनी...'मानसपुजेच' वर्णन..."ध्यानचि ध्यानातें प्रसवे", असे केले आणि श्रीसद्गुरु महाराजांनी वर 'पुजेचे' वर्णन ...."स्वतःचा विसर जर 'रामाच्या पूजनात'(सगुण) पडू लागला, तर निर्गुण आणखी कोणते राहिले ?" असे केले.
यातील साम्य पहाता... पहील ध्यान.. आणि त्या ध्यानातून प्रसवणार दुसर ध्यान.. आपल्या लक्षात आल असेलच!:)
धन्यवाद!
माधव, >>>मानसपूजेला सोवळ्याचे
माधव,
>>>मानसपूजेला सोवळ्याचे बन्धन आहे का? खासकरुन स्त्रियांसाठी आणि दत्तगुरुंच्या पुजेसाठी.
>>>माझ्या मते नाही! त्यानंच हे सगळं तयार केलं- त्यालाच विटाळ होतो? नाही वाटत मला. जिथे प्रेम असतं तिथे सोपस्कार महत्त्वाचे नाहित. विटाळ शरीराला होऊ शकतो ('होतो' हे मला पटत नाही तरी) मनाला नाही. तुम्ही मानसपुजा करणार ना?
>>>अहो, मग त्या 'निराकाराला'(आकारहीन असलेल्याला) आणि'निर्गुणाला' (गुणाचा अभाव असलेल्याला),पुजेची (मग ती कशीही असो), जरुरतच का पडावी?
याविषयी आपले मत आता काय आहे? हे जाणून घ्यायला आवडेल!
काही निटसे समजले नाही.
काही निटसे समजले नाही. ध्यानात स्वतःचा विसर पडु लागला तर निर्गुण आणखी कोणते राहिले
घ्यान जसे सगुण स्वरुपातल्या पुजनात लागते तसे ते अनेक कृतीत लागते. उदा. मी कामात व्यस्त असताना मी काम करतोय ही भावना रहात नाही त्याला स्वतःचा विसर पडला असे म्हणायचे का ?
उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, आणि
उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, आणि त्यावरची भाष्ये यांनी निर्गुण स्वरूपाची रूपरेषा काढून दिली. >> आजचे वैज्ञानीक आता असे म्हणू लागले आहेत की या विश्वातला फक्त २०% भागच आपल्याला दिसू (?) शकतो किंवा आपल्याला त्याचे आकलन होऊ शकते. उरलेला ८० टक्के भाग हा डार्क मॅटरने व्यापलेला आहे ज्याचे तसूभरही ज्ञान आपल्याला अजूनपर्यंत झालेले नाही. त्याला नाव डार्क 'मॅटर' दिले असले तरी तो पदार्थ आहे का आणखी काही हेही आपल्याला माहित नाही.
आपल्या बुध्दीला निर्गुण, अमर्याद ह्या संकल्पना तरी झेपतात का? जेंव्हा मी वाचतो की "ते ब्रह्म काळे नाही की गोरे नाही." तेंव्हा मी विचारतो "मग कुठल्या रंगाचे आहे?" जिथे रंगाशिवाय वस्तू बघणे मला शक्य होत नाही तिथे काहीच गुण (attribute) नसलेल्या वस्तूचे मला कसे आकलन होणार?
त्यामुळे उपासना सगुणाचीच होते. पण सावट यांनी म्हटल्याप्रमाणॅ निर्गुणाची ओळख करून घेऊन ती केली पाहिजे म्हणजे साध्य काय ते हळू हळू समजू लागते.
अश्विनी, मागे एकदा, या
अश्विनी,
मागे एकदा, या बीबीवर, तुम्ही जे खाली(भक्ती बीबीवर) लिहल आहे त्यासंबंधात.. त्यावेळी काही प्रश्न होते...
>>>
१)अगं त्यांनी नामस्मरण नाही केलं तरी ते भगवंताचे गुणसंकीर्तन करतात ही गोष्ट ही तेवढ्याच तोडीची आहे बरं!
२)) सगुणाचेनि आधारे | निर्गुण पाविजे निर्धारे ||
श्रीकृष्णांनी भगवदगीतेत सांगितलेल आहे "संत माझ्या सजीव प्रतिमा".
तसेच श्री ज्ञानदेवांनीही ज्ञानेश्वरीत आम्ही भावंडे 'मूर्तीचा मेळावा' करुन अवतरलो आहोत अशी नोंद केली आहे.
सगुण रक्षावे, निर्गुण बोलावे...
३)सगुण भक्ती ते चळे | निर्गुण भक्ती ते न चळे | हे आवघे प्रांजळ कळे | सद्गुरु केलिया ||
हे सांगताना निर्गुण देवाच्या दर्शनाची सातत्यता इथे प्रगट केली गेली आहे. पण त्यासाठी 'सद्गुरु केलिया' ही गोष्ट महत्वाची, हेही स्पष्ट केले आहे.
४)सद्गुरुवचन हृदयी धरी | तोचि मोक्षाचा अधिकारी | श्रवण्-मनन केलेचि करी | अत्यादरे ||
याचा अर्थ 'आता' अजून स्पष्ट कराल काय?:)
सावट, अहो वरील प्रत्येक ओळीचा
सावट, अहो वरील प्रत्येक ओळीचा अर्थ एवढा अफाट आहे की कितीही लिहिलं तरी समाधान होणार नाही. श्रीसाईसच्चरितावरील परिक्षा देताना ह्यावरील प्रश्न आले होते. तेव्हाही एका ओळीवर ४-५ फुल्स्केपची पानं लिहिली तरी अजून काहीतरी उरलंय असंच वाटत होतं.
ती देखिल रात्री सगळं सामसूम झाल्यावर पुर्ण एकाग्रतेने लिहिली होती. काय सांगू तुम्हाला ! सगळं याची देही याची डोळा अनुभवतेय पण शब्दात मांडणं कठीण जातंय.
सावट, पूजा ही फक्त एक रीत
सावट,
पूजा ही फक्त एक रीत झाली उपासनेची त्याशिवायही अनेक मार्ग आहेतच की उपासनेचे.
मार्ग म्हटला की मार्गक्रमणा आली आणि त्याकरता लागणारा वेळही आला. कबीरांनी म्हटल्याप्रमाणे माळ्याने कितीही पाणी घातले तरी झाडाला ऋतू आल्याशिवाय फळ धरत नाही. पण म्हणजे पाणी घालणे निरर्थक आहे का? अजीबातच नाही.
आपण जेंव्हा उपासनेच्या मार्गावरून जात असतो तेंव्हा ह्या अविद्येच्या आवरणाखाली असतो. तिचे सर्व नियम आपल्याला लागू असतात. ते नियम पाळूनच आपल्याला विद्येची आराघना करायची असते. 'ब्रह्मैव सत्यम् जगन्मिथ्या' खरं आहे पण फक्त त्याच्यासाठी जो ब्रह्मपदी पोहचला आहे. माझ्यासाठी हे जग आणि ते ब्रह्म दोनही खरे आणि महत्वाचे आहेत. म्हणजे ह्या क्षणी मला माझे शरीर (जगाचा अंश) आणि आत्मा (ब्रह्माचा अंश) दोन्ही सांभाळायचे आहेत. आता शरीर म्हटले की शरीरधर्म आलेच ते निमूटपणे भोगा पण आत्म्याच्या उन्नत्तीच्या मार्गात त्याचा कसलाच अडथळा नसतो. उगाच त्याचा बाऊ नको.
अश्विनी, हरकत नाही,
अश्विनी,
हरकत नाही, धन्यवाद!:)
माधव,
छान सांगितले आहे.. धन्यवाद!
सर्व पुजा-उपासना 'आत्मपुजेतच' विलीन व्हायला हव्यात.. पण तसे होताना दिसत नाही.
असो..!
माधव खालील प्रश्नाचे 'उत्तर' कृपया विचार करून सांगा....
'अविद्या' नाहीशी झालीकी 'ब्रह्मज्ञान' होते, 'विद्येची' प्राप्ती होते.. हे बरोबर आहे का?
ज्ञान/शुद्धविद्या/परमेश्वरी
ज्ञान/शुद्धविद्या/परमेश्वरी माया असतंच. फक्त ते अविद्येच्या धुळीने झाकले गेलेले असते. अज्ञान्/अविद्या/माया दूर झाली की ते झळकते.
ब्रह्मज्ञान होण्याच्या आड येणारा मोठा अडसर म्हणजे मोह.
नितीन, >>> काही निटसे समजले
नितीन,
>>>
काही निटसे समजले नाही. ध्यानात स्वतःचा विसर पडु लागला तर निर्गुण आणखी कोणते राहिले
घ्यान जसे सगुण स्वरुपातल्या पुजनात लागते तसे ते अनेक कृतीत लागते. उदा. मी कामात व्यस्त असताना मी काम करतोय ही भावना रहात नाही त्याला स्वतःचा विसर पडला असे म्हणायचे का ?
महेश यांना सांगताना खालील संदर्भ आला होता...
ऐशिया गा निरपेक्षता । माझेनि भजनें सप्रेमता ।
तेथ मी जाण स्वभावतां । प्रकटें तत्त्वतां निजरूपें ॥श्री ए.भा.१४.८८॥
श्रीभगवंताचे 'निजरुप' जर प्रकटायचे जर असेल... तर 'ध्यान' ही श्रीभगवंताचच असल पाहीजे अशी अट आहे... आणि त्यात प्रमुख अट आहे.. ध्यान-भजन प्रेमानेच व्हायला हवे.
हे अजून एका उदाहरणाने पहाता येईल...
गाढ झोपेत आपल्याला आपल्या शरीराचा-मीचा विसर पडलेला असतो...यालाच 'समाधी' म्हणायचे का? तर अर्थातच नाही... कारण आपले 'अज्ञान' अजून आहे तसेच असते...किंबहुना आपण जागे झाल्यावर्...'मी' कोणाचा.. कोण-कोण आहे हा 'अहं' डोक्यात ठाण मांडून बसतो..जसा झोपेच्या अधिन होण्याअगोदर होता तसाच.. त्यात काहीच फरक पडलेला नसतो.
अशी अवस्था ... शरीराच्या कोणत्याही अवस्थेत अखंड रहात असेल तरच ती 'समाधी' होय.
श्रीपतंजली महामूनींनी जो 'अष्टांग-योग' सांगितला आहे...त्यात 'यम-नियम-आसन-प्राणायाम' सांगितल्यानंतर जो योग पुढे सांगितला तो मुळातच प्रत्याहारा पासून सुरु होतो... त्यानंतरच धारणा-ध्यान-समाधी... असा क्रम आहे. आपला प्रत्याहार होत असेल तरच... धारणा-ध्यान होईल... अन्यथा नाही होणार.
'मानसपुजा' हा ध्यानाचाच प्रकार आहे ... आणि त्याकरता 'मी' स्वतःला विसलोय म्हणजे माझे 'मन' स्थिर होणे होय.. ही तात्पुरती अवस्था नसून... अखंड अवस्था आहे.
म्हणूनच मानसपुजा ही सुरुवातीला 'सगुणाचे-श्रीभगवंताचे' ध्यान झाल्याने( यात मी वेगळा आणि श्रीभगवंत वेगळे असा भाव असतो) सुरु होते आणि 'मी' चे स्वतंत्र असणारे आस्तित्व संपल्यामूळे.. या जून्या ध्यानातून... नवीन ध्यानाचा जन्म होतो.... हे 'मी-गुण' विरहीत असते.. म्हणूनच निर्गुण.
धन्यवाद!
सावटजी, धन्यवाद, यावेळेला
सावटजी,
धन्यवाद, यावेळेला जास्त समधान झाले. तरी परत आणखी काही नविन प्रश्न आहेत.
सगुण अवस्था संपत नाही पण त्यात आनंद मात्र मिळतो. अश्यावेळेस निर्गुणाकडे जाण्याचे प्रयोजन असावे का ?
साधु संतांनी निर्गुणाकडे जाण्याचा उपदेश का केला आहे ? कोणत्याही मार्गाने ( ज्ञान, योग, भक्ती )जर परमेश्वर प्राप्ती किंवा मोक्ष असा अध्यात्माचा उद्देश आहे तर निर्गुण उपासनेने हा वेग वाढतो का ?
योगसुत्र या ग्रंथात एका सुत्रात
शौचसंतोषतपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमाः ।
तर दुसर्या सुत्रात
तस्य वाचक प्रणवः असा ईश्वराचा उल्लेख आहे.
हा ईश्वर म्हणजेच परमेश्वराचे निर्गुण रुप आहे का ?
थोडक्यात ओमकार साधना म्हणजे निर्गुणाची उपासना आहे का ?
नितिनचंद्र, सावट तुमच्या
नितिनचंद्र, सावट तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतीलच, पण यावर माझे मत सांगतो.
सगुण उपासना ही निर्गुण उपासनेचा एक भाग आहे, किंबहुना ती सुरूवात आहे आणि निर्गुण उपासना ही पुढे आपोआप घडते कारण तीच्या द्वारे मुक्ती मिळते.
कायमचे शाश्वत सुख मिळवायचे असेल (सत चित आनंद) तर ते कोणत्याही वस्तु, व्यक्ती, उपभोग, यामधुन कधीच मिळणार नाही कारण त्याला स्थलकालाची बंधने असतात. म्हणुन निर्गुणाच्या उपासनेत रमल्यावरच हा शाश्वत आनंद मिळू शकतो कारण हीच ती सर्वसमावेशक शक्ती आहे.
सावट, चुकत असेल तर मार्गदर्शन करावे.
धन्यवाद नितीनजी..अश्विनी,महेश
धन्यवाद नितीनजी..अश्विनी,महेश छान सांगितल आहे!
माधव,
खाली अजून काही प्रश्न आहेत... तेही कृपया पहा..!
>>>त्यामुळे उपासना सगुणाचीच होते. पण श्रीमहाराजांनी म्हटल्याप्रमाणॅ निर्गुणाची ओळख करून घेऊन ती केली पाहिजे म्हणजे साध्य काय ते हळू हळू समजू लागते.
साध्य काय आहे?:)
>>>मार्ग म्हटला की मार्गक्रमणा आली आणि त्याकरता लागणारा वेळही आला. कबीरांनी म्हटल्याप्रमाणे माळ्याने कितीही पाणी घातले तरी झाडाला ऋतू आल्याशिवाय फळ धरत नाही. पण म्हणजे पाणी घालणे निरर्थक आहे का? अजीबातच नाही.
माळी- झाड- पाणी- ऋतू - फळ.... यात पाणी योग्य ठिकाणी जातय हे कोण ठरवणार? किंवा कस ठरवणार?जसे झाडाला पाणी योग्यरितीने मिळाल्यावर फळ धरायच्याही अगोदर खोड-पाने-फुले यांची काही लक्षणे दिसतात...ती लक्षणे श्रीसंतकबीर महाराजांच्या ' झाडात ' ही दिसतात का? तसेच हे 'पाणी' कसे मिळवायचे? झाड म्हणजे काय?
>>>म्हणजे ह्या क्षणी मला माझे शरीर (जगाचा अंश) आणि आत्मा (ब्रह्माचा अंश) दोन्ही सांभाळायचे आहेत. आता शरीर म्हटले की शरीरधर्म आलेच ते निमूटपणे भोगा पण आत्म्याच्या उन्नत्तीच्या मार्गात त्याचा कसलाच अडथळा नसतो. उगाच त्याचा बाऊ नको.
"म्हणजे ह्या क्षणी मला माझे शरीर (जगाचा अंश) आणि आत्मा (ब्रह्माचा अंश) दोन्ही सांभाळायचे आहेत",
यात, मला माझे शरीर सांभाळायचे आहे.. म्हणजे मी आणि माझे शरीर वेगळे आहेत..असे सूचीत होते.. तर..मला माझा आत्माही सांभाळायचा आहे... यात मी आणि माझा आत्मा वेगळा आहे असे सूचीत होते. शरीर आणि आत्मा यापेक्षा स्वतःला वेगळा म्हणणारा हा तिसरा 'मी' म्हणजे कोण आहे?:)
हे वरचे प्रश्न म्हणजे... त्यातून आपले..सर्वांचे 'मनन-चिंतन' घडावे हीच अपेक्षा आहे!
धन्यवाद!
नितीनजी, >>शौचसंतोषतपःस्वाध्य
नितीनजी,
>>शौचसंतोषतपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमाः ।
शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान ... हे पाच 'नियम' कशाकरीता सांगितले आहेत? हे पहाणे जरूरी आहे.
>>> तस्य वाचक प्रणवः असा ईश्वराचा उल्लेख आहे.
'वैखरी-मध्यमा-पश्चंती आणि परा' अशा चार वाणी आहेत आणि ईश्वर म्हणजे काय हेही पहाणे जरूरी आहे ..म्हणजे परस्पर संबंधही कळेल.:)
जगत-जीव- ईश्वर-परमेश्वर याचा परस्पर संबंधही पहाणे महत्त्वाचे आहे. हा संबंध पहाताना जे 'ज्ञान'होते.. त्याला शास्त्र, अप्रत्यक्ष ज्ञान किंवा परोक्ष ज्ञान किंवा शब्द ज्ञान किंवा अनुमान(कल्पना) असे म्हणते.... हे बुद्धीने(तर्काने) जाणता येते.... याची ओळख करून घेता येते. (माधव- लक्षात घ्यायचा मुद्दा )
बुद्धीचा जो 'प्रज्ञा' किंवा ' स्फुर्ती' नावाचा गुण जागृत होऊन, अशा बुद्धीने जे जाणणे होते.. त्याला शास्त्र, प्रत्यक्ष ज्ञान किंवा अपरोक्ष ज्ञान किंवा अनुभव असे म्हणते. असा 'अनुभव' फक्त आणि फक्तच श्रीगुरुकृपेनेच येतो.
ओळख करून घेण्यासाठी 'शास्त्रवाचन-श्रवण-मनन-चिंतन' महत्त्वाचे, तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणासाठी श्रीगुरुप्रदत्त 'साधना' महत्वाची!:)
"कृपा अगोदर होते आणि शब्द मागाऊन येतात !" असा शास्त्र सिंध्दांत आहे. अर्थात याचाही अनुभव येण्यासाठी 'साधनाच' कामास येते.:)
धन्यवाद!
नितीनजी, >>>सगुण अवस्था संपत
नितीनजी,
>>>सगुण अवस्था संपत नाही पण त्यात आनंद मात्र मिळतो. अश्यावेळेस निर्गुणाकडे जाण्याचे प्रयोजन असावे का ?
साधु संतांनी निर्गुणाकडे जाण्याचा उपदेश का केला आहे ? कोणत्याही मार्गाने ( ज्ञान, योग, भक्ती )जर परमेश्वर प्राप्ती किंवा मोक्ष असा अध्यात्माचा उद्देश आहे तर निर्गुण उपासनेने हा वेग वाढतो का ?
याकरीता,
सगुणाचेनि आधारे | निर्गुण पाविजे निर्धारे ||
आणि
सगुण भक्ती ते चळे | निर्गुण भक्ती ते न चळे | हे आवघे प्रांजळ कळे | सद्गुरु केलिया ||
या सर्वार्थाने श्रीसमर्थ वचनाचे, मनन-चिंतन होणे महत्त्वाचे आहे.:)
धन्यवाद!
बुद्धीचा जो 'प्रज्ञा' किंवा '
बुद्धीचा जो 'प्रज्ञा' किंवा ' स्फुर्ती' नावाचा गुण जागृत होऊन, अशा बुद्धीने जे जाणणे होते.. त्याला शास्त्र, प्रत्यक्ष ज्ञान किंवा अपरोक्ष ज्ञान किंवा अनुभव असे म्हणते. असा 'अनुभव' फक्त आणि फक्तच श्रीगुरुकृपेनेच येतो. >>> अगदी अगदी.
तसेच, जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते (रावणाची एंट्री) तेव्हा हातून प्रज्ञापराध घडतात व दुष्प्रारब्ध (सीता हरण, आयुष्यातून तृप्तीचे शांतीचे नाहिसे होणे) वाट्याला येते. ह्या संकटातून श्रीगुरु / परमात्माच बाहेर काढू शकतात तेही श्रद्धावानाकडून दुष्प्रारब्धाशी लढा देववून (दीन दयाल बिरुदु संभारी, हरहु नाथ मम संकट भारी - सुंदरकाण्ड). नामस्मरणाचे अनेक सेतू बांधवून घेवून. रक्षणकर्ता दासावतार श्रीहनुमंत आपल्या आधीच दुष्प्रारब्धावर हल्ला करुन लंका दहन करत असतो व आपल्या समोर आपल्या कुवतीनुसार लढा सोपा करुन ठेवत असतो.
तुमच्या वरच्या काही पोस्ट्समधे परोक्ष / अपरोक्षचा अगदी बरोब्बर वापर केलाय. सर्वसाधारणपणे अपरोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष किंवा पाठीमागे असा चुकीचा अर्थ लावला जातो. धन्यवाद.
सर्वांचेच आभार, फारसे समाधान
सर्वांचेच आभार,
फारसे समाधान झाले नाही कारण माझा स्वभाव स्पष्ट आणि तांत्रिक उत्तराची अपेक्षा करतो. सावट्जी मी निराश नाही. मी बी पेरलय. झाड येईल आणि ऋतू नुसार फळे येतील याची खात्री आहे.
मी पाणी नियमीत घालीन. फळे जेव्हा यायची तेव्हा यावीत.
व्वा! धन्यवाद नितीनजी! हरकत
व्वा! धन्यवाद नितीनजी!:)
हरकत नाही! तुम्हाला पाहीजे असलेले उत्तर आपल्या चर्चेत अगोदरच येऊन गेले आहे.. ते परत एकदा पाहू...!
>>>म्हणूनच मानसपुजा ही सुरुवातीला 'सगुणाचे-श्रीभगवंताचे' ध्यान झाल्याने( यात मी वेगळा आणि श्रीभगवंत वेगळे असा भाव असतो) सुरु होते आणि 'मी' चे स्वतंत्र असणारे आस्तित्व संपल्यामूळे.. या जून्या ध्यानातून... नवीन ध्यानाचा जन्म होतो.... हे 'मी-गुण' विरहीत असते.. म्हणूनच निर्गुण.
श्रीमाउलींच्या भाषेत बोलायचे झाल्यास...
घटाचिया खापरिया| घटभंगीं फेडिलिया| महदाकाश अपैसया| जालेंचि असे ||श्री ज्ञा.१४.३१६||
तैसी देहबुद्धी जाये| जैं आपणपां आठौ होय| तैं आन कांहीं आहे| तेंवांचुनी ? ||३१७||
येणें थोर बोधलेपणें| तयासि गा देहीं असणें| म्हणूनि तो मी म्हणें| गुणातीत ||३१८||
'मी म्हणजे देह' ही विपरित भावना जाऊन...'मी म्हणजे ब्रम्ह' असा थोर बोध सशरीर ज्याला झाला त्यालाच श्रीभगवंत, 'गुणातीत'(निर्गुण) म्हणतात.
जे मूळातच 'निर्गुण' आहे.. म्हणजेच 'सत्व-रज-तम' या त्रिगुणांच्या पलीकडले आहे...म्हणजेच जे 'बहुगुणी' आहे... ते स्वतः 'मी देह आहे' या त्रिगुणांत्मक भावनेने स्वतःस सिमीत करते-बांधून घेते.... जसे आकाश(महद्-आकाश) हे 'निर्गुण' समजले तर, मातीच्या घटात असलेल्या आकाशाने स्वतःस घट समजून... आपण खापराच्या घटाच्या आकाराचे आहोत असे समजणे होय.. आपले 'निर्गुणत्व' हे त्रिगुणात सिमित केल्यासारखेच आहे.
असे विपरीत वाटणे कसे घालवता येईल?
घटाचिया खापरिया| घटभंगीं फेडिलिया| महदाकाश अपैसया| जालेंचि असे ||श्री ज्ञा.१४.३१६||
जर घटातल्या सिमीत असणार्या आकाशाचा, 'घटाकार' जायचा असेल तर एकच उपाय आहे तो म्हणजे... तो खापराचा घट 'भंगायला' पाहीजेल...म्हणजे काय होईल... घटाकाश बाहेरच्या अनंत महद्-आकाशात मिसळेल...त्याचा आकार नाहीसा होईल.. ते निराकार होईल.. तसेच निर्गुणही होईल.
याचाच स्पष्ट अर्थ असा आहे की.... महद- आकाशासम असणारा परमात्मा हा 'मी शरीर आहे' असे समजून.. घटाकार्..म्हणजेच शरीराकार धारण केल्यामूळे स्वतःच्या मूळ 'बहुगुणत्वास' मुकतो...या नवीन आकार भ्रमाने धारण केलेल्या परमात्म्यास-महदाकाशासच ... जिवात्मा-अंतरात्मा-घटाकाश अशी संज्ञा आहे.
आता महत्त्वाची गोष्ट... आपण मागे पाहील्या प्रंमाणे... आपण 'जिवात्मा' आहोत.. आपले शरीर म्हणजे वरील प्रमाणे मातीचा 'घट' आहे... आपल निर्गुणत्व जर आपल्याला परत पाहीजे असेल तर, हे शरीर भंगायला पाहीजे..म्हणजेच 'मी म्हणजे शरीर नाही', हे मला मी शरीरात असतानाच कळावयास पाहीजे...तर आणि तरच हे शक्य आहे. ( अन्यथा कदापि नाही )
म्हणूनच एक महत्त्वाचा प्रश्न उभा रहातो... तो म्हणजे... 'मी म्हणजे सुख-दु:ख रहीत आत्मा', असताना.. मला, 'मी म्हणजे शरीर' अशी विपरीत भावना होण्यास जबाबदार कोण... याचे कारण काय.. 'तो म्हणजे मीच' ..असे 'देह तादात्म्य' कशा मुळे येते? याच्या मूळ कारणांचा शोध जर लागला.. तर आपली 'उपासना' काय हवी ... याचाही शोध लागेल.
धन्यवाद!
श्रीसद्गुरूसमर्थ
श्रीसद्गुरूसमर्थ 'उपासनेविषयी' आपल्या श्री दासबोधात खूप छान सांगतात..
पृथ्वीमधें लोक नाना| त्यास नाना उपासना |
भावार्थें प्रवर्तले भजना| ठाईं ठाईं ||श्री दा.१६.९.१||
अपुल्या देवास भजती| नाना स्तुती स्तवनें करिती |
जे जे निर्गुण म्हणिती| उपासनेसी ||२||
याचा कैसा आहे भाव| मज सांगिजे अभिप्राव |
अरे हा स्तुतीचा स्वभाव| ऐसा आहे ||३||
निर्गुण म्हणिजे बहुगुण| बहुगुणी अंतरात्मा जाण |
सकळ त्याचे अंश हें प्रमाण| प्रचित पाहा ||४||
सकळ जनासी मानावें तें| येका अंतरात्म्यास पावतें |
अधिकारपरत्वें तें| मान्य कीजे ||५||
पृथ्वीवर नाना प्रकारचे लोक... नाना प्रकारच्या उपासना करतात... भावाने आपापल्या देवास भजतात... ना ना प्रकाराने त्या देवाची स्तुती करतात... आणि महत्त्वाचे म्हणजे आपापल्या 'उपासनेस' .... निर्गुण म्हणतात... असे कशा मुळे? श्रीसमर्थ म्हणतात..अरे हे आपापल्या स्तुती करण्याच्या भावाप्रमाणे ते म्हणतात.. आपल ते चांगल, असे म्हणायची जगाची रितच आहे.
सगळ्या लोकास जे मान्य आहे ते एका 'बहुगुणी-अंतरात्म्यासच' पावते कारण सकळ जीव त्याचाच अंश आहेत'.... पण हे सांगणे, आपापल्या पारमार्थिक अधिकाराप्रमाणे मान्य होते...सगळ्यासच हे कळते-वळते.. मान्य होते असे नाही.
श्रीसमर्थ पुढे म्हणतात...
आतां गुणास निर्गुण| कैसें म्हणती ||श्री दा.१६.९.१२||
चंचळपणें विकारलें| सगुण ऐसें बोलिलें |
येर तें निर्गुण उरलें| गुणातीत ||१३||
वक्ता म्हणे हा विचार| शोधून पाहावें सारासार |
अरे जे सगुणात रात्रंदिवस डुबंत आहे... त्याला 'निर्गुण' कसे काय म्हणता येईल? किंवा त्याने केलेली उपासना ही 'निर्गुण' कशी म्हणता येईल? किंवा जे मुळातच चंचल आहे..ज्याचे मन मुळातच स्थिर नाही.. चंचळपणे विकारवश आहे...त्याला निर्गुणाची उपासना कशी करता येईल? जे चंचळ आहे..ते ते सर्व 'सगुण' आहे.. मग त्याने केलेली 'उपासना' कशी काय 'निर्गुण' असू शकते? जे चंचळ आहे.. ते सोडून बाकी राहीलेले 'निर्गुण' आहे... म्हणजेच 'त्रिगुणातीत' आहे.
आता हे एकदा पटल्यानंतर... विवेकाने याचा सारासार विचार केल्यावर असे लक्षात येते..."निर्गुणाची उपासना स्वतः निर्गुण होऊनच शक्य आहे!" मासा पाण्यातच(सगुण) जगतो, हे एकदा लक्षात आल्यावर ... माशाची उपासना ही पाण्यातच होणारी पाहीजे नाही काय? जर एखाद्या माशाने.. 'मी जमिनीवर(निर्गुण) उपासना करतो', असे म्हटले तर ते कोणता शहाणा-ज्ञानी मान्य करेल?
म्हणूनच प.पू. श्री गोंदवलेकर महाराजांनी वर सांगितल्यानुसार ...'सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो', म्हणतो, त्याला त्याचे मर्मच नाही कळले. खरी तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याला नाही ते कळत.
धन्यवाद!
Pages