Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
पुनश्च धन्यवाद, सगुण आणि
पुनश्च धन्यवाद,
सगुण आणि निर्गुण यातला फरक समजला.
प्रश्न असा आहे.
१) निर्गुण उपासना का करायची ?
माझ्या मते आपले उत्तर आहे की त्याचे साधन मन आहे. ते जर चंचल असेल तर साधना चांगली कशी होणार ? या करता पुढे गेले पाहीजे आणि निर्गुणाची उपासना साधली पाहिजे.
हे बरोबर अथवा चुक ते लिहावे.
या उत्तराने निर्माण झालेले उपप्रश्न
तर मग निर्गुण उपासनेचे साधन कोणते ?
माझ्या मते आपले उत्तर असे आहे घ्यानाच्या दिर्घ ( योग्य ) अभ्यासातुन साधणारे उच्च कोटिचे घ्यान.
हे बरोबर आहे का ?
मुळचा प्रश्न दुसरा
ओमकार साधना हा निर्गुण साधनेचा प्रकार आहे का ? योग शास्त्राचे असे म्हणणे आहे का?
आपले उत्तर येणे आहे.
क्रुपया नेमके मार्गदर्शन व्हावे.
मास्तुरे _/\_ ही सहामाही
मास्तुरे _/\_
ही सहामाही परीक्षा आहे का? प्रश्ण खूप कठीण घातलेत परिक्षेला
'अविद्या' नाहीशी झालीकी 'ब्रह्मज्ञान' होते, 'विद्येची' प्राप्ती होते.. हे बरोबर आहे का? >>
निव्वळ परोक्ष ज्ञानाने उत्तर देऊ शकेन याचे. अविद्या / माया / प्रकृती नाहीशी कशी होणार? ती तर त्या ब्रह्माची शक्ती आहे. जेवढे ते ब्रह्म खरे तेवढीच ती माया पण खरी आहे, अनादि अनंत आहे. सोने आणि त्याची लकाकी ह्यातले काय खोटे? दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू नाहीत का?
पण मग विद्या कशी मिळणार? जेंव्हा त्या मायेच्या अंमलाखालून मी बाहेर पडेन तेंव्हा मला माझी ओळख पटेल - ती विद्या! म्हणजे मी पण खरा आणि जादूगारही खरा खोटी आहे ती जादूगाराची नजरबंदी. ती जेंव्हा ओसरते तेंव्हा माझ्या डोळ्यांवर बांधलेली झापडे गळून पडतात.
पण याही पुढे काही प्रश्ण आहेत ते अपरोक्ष ज्ञानानेच सुटू शकतील --
* माझा आणि जादूगाराचा नक्की संबंध काय?
* जादूगाराने खेळ का मांडलाय?
* मी जादूगाराकडून नजरबंदी करून घ्यायला का तयार झालो?
तेंव्हा मास्तुरे आता तुमची पाळी - उत्तर तपासायची
बाकीचे प्रश्ण नंतर घेतो सोडवायला.
माधवा.. धन्यवाद! आता अजून
माधवा.. धन्यवाद!
आता अजून थोडेसे पाहू...
माधवा... परमार्थात... 'सुरुवात ते शेवट' हा क्रम फार महत्त्वाचा आहे. सुरुवात जर योग्य नसेल तर शेवटही चुकलेलाच असेल.
>>>मार्ग म्हटला की मार्गक्रमणा आली आणि त्याकरता लागणारा वेळही आला. कबीरांनी म्हटल्याप्रमाणे माळ्याने कितीही पाणी घातले तरी झाडाला ऋतू आल्याशिवाय फळ धरत नाही. पण म्हणजे पाणी घालणे निरर्थक आहे का? अजीबातच नाही.
'मार्ग' म्हटला की ''मार्गक्रमणा' होतेच असे नाही. नुसता 'भाव' असेल..पण 'बळ(शक्ती)' नसेल तर मार्गक्रमणा होणारच नाही....किंवा नुसता आभासच होईल. म्हणूनच श्रीसंत कायम 'भावबळे' असा शब्द प्रयोग करतात. .. आणि ही 'शक्ती' श्रीसद्गुरूच देऊ शकतात.:)
>>>'अविद्या' नाहीशी झालीकी 'ब्रह्मज्ञान' होते, 'विद्येची' प्राप्ती होते.. हे बरोबर आहे का? >>
पण मग विद्या कशी मिळणार? जेंव्हा त्या मायेच्या अंमलाखालून मी बाहेर पडेन तेंव्हा मला माझी ओळख पटेल - ती विद्या! म्हणजे मी पण खरा आणि जादूगारही खरा खोटी आहे ती जादूगाराची नजरबंदी. ती जेंव्हा ओसरते तेंव्हा माझ्या डोळ्यांवर बांधलेली झापडे गळून पडतात.
'क्रम' का महत्त्वाचा हे आता अजून लक्षात येईल....
'अविद्या, विद्या आणि आत्मविद्या', याचा क्रम जर लक्षात यायचा असेल तर खालील उदाहरण पाहू...
'सुर्य' म्हणजे 'आत्मविद्या(अखंड प्रकाश)' समजला आणि आपल्याला जो प्रकाश आणि अंधार याचा अनुभव येतो तो अनुक्रमे विद्या आणि अविद्या असे समजले तर काय दिसते.
'अंधार' आपणहून गेलाय आणि मग 'अखंड' प्रकाशाचा अनुभव आलाय असे कधी होईल का? शक्य आहे का? तर अर्थात नाही. म्हणजेच सुर्याच्या प्रकाशामूळे... आत्मज्ञान मिळाल्यामूळे.. अंधकार-अज्ञान गेले...असा क्रमच योग्य आहे... नाही काय?
आता बोला..
>>जेंव्हा त्या मायेच्या अंमलाखालून मी बाहेर पडेन तेंव्हा मला माझी ओळख पटेल - ती विद्या!
आणि अश्विनी..
>>>ज्ञान/शुद्धविद्या/परमेश्वरी माया असतंच. फक्त ते अविद्येच्या धुळीने झाकले गेलेले असते. अज्ञान्/अविद्या/माया दूर झाली की ते झळकते.
हा क्रम बरोबर आहे काय?
आणि एक महत्वाची गोष्ट...
ज्या ढगामुळे 'सुर्य' झाकला जातो आणि 'अंधार' पडतो.. सुर्य दिसायचा बंद होतो.. तो 'ढग' ही सुर्याच्या प्रकाशामूळेच दिसतो .. नाही काय?
धन्यवाद!
सावट, मला वाटतं बरोबर आहे.
सावट, मला वाटतं बरोबर आहे. गीतेत "तद्विद्धीप्रणिपातेन् परिप्रश्नेन सेवया.." ओवी नुसार सद्गुरुंच्या कृपेनेच / आज्ञापालनानेच आपल्यावर असलेलं मायेचं (ही श्रद्धाहीनांसाठी निव्वळ मोहमायाच / अविद्याच असते) आवरण दूर होतं आणि शुद्धविद्येने बनलेलं ज्ञान आपल्याला दिसू लागतं. ते कुठून नविन उत्पन्न होत नाही. ज्ञान हे परमेश्वरीच आहे व त्याच्यासारखंच अनादि अनंत आहे. आपल्या अधिकारानुसार ते झाकलेलं/अप्रगट्/प्रगट रहातं. हा अधिकार देखिल परमात्म्याच्या अकारण कारुण्यामुळेच मिळतो. इतकुस्सं काही चांगलं केलं तर त्याचा दश, सहस्रगुणे मोबदला तोच देतो, डोंगराएवढं वाईट कर्म केलं तरी ते अत्यल्प अंशाने भोगायला परत पाठवलं जातं.
सावट, विद्या आणि आत्मविद्या
सावट, विद्या आणि आत्मविद्या यात फरक काय?
आत्मविद्या, आत्मज्ञान ! बापरे
आत्मविद्या, आत्मज्ञान !
बापरे मला कठोपनिषदातल्या नचिकेताची आठवण झाली !
महेश, त्याचबरोबर यममहाराजांची
महेश, त्याचबरोबर यममहाराजांची पण आठवण आली की नाही ?
माधव,
श्रीविष्णुपुराणात... श्रीइंद्रानी केलेल्या श्रीलक्ष्मी स्तुतित, आत्मविद्येचे वर्णन खालील प्रमाणे आले आहे..
यज्ञविद्या महाविद्या गुह्यविद्या च शोभते ।
आत्मविद्या च देवि त्वं विमुक्तिफलदायिनी ।।
'मुक्ति' हे फल ज्या विद्येपासून मिळते..तीच फक्त 'आत्मविद्या'...पराविद्या!
इतर सगळ्या 'विद्या' या अपराविद्या... 'अविद्ये'मुळे जो भ्रम होतो, त्यावर ह्या इतर 'विद्या' आधारलेल्या असतात.
धन्यवाद!
सावट मोक्ष (स्वतःची ओळख)
सावट मोक्ष (स्वतःची ओळख) देणारी ती एकच विद्या (तिलाच ब्रह्मविद्या, आत्मविद्या अशी नावेआहेत). बाकी सगळे अविद्या! आत्मविद्या आणि विद्या ह्या वेगळ्या नाहीत (फ्क्त दोन वेगळी नावे आहेत).
आपण विद्या (रोजच्या वापरातला शब्द विद्या) का मिळवतो? तर आपल्याला आनंद मिळावा म्हणून. पण आपण जे विद्या म्हणून मिळवतो त्यातून मिळणारा आनंद हा क्षणभंगूर असतो. म्हणजेच ती खरी विद्या नव्हे. खरी विद्या मिळाल्यावर मिळणारा आनंद कायम स्वरुपाचा असतो.
माधव..व्वा! 'पराविद्या आणि
माधव..व्वा!
'पराविद्या आणि अपराविद्या' अशा दोन भागातच 'विद्या' विभागली जाते...
>>>पण आपण जे विद्या म्हणून मिळवतो त्यातून मिळणारा आनंद हा क्षणभंगूर असतो. म्हणजेच ती खरी विद्या नव्हे
का खरी नाही? किंवा त्यातून मिळणारा आनंद का क्षणभंगूर असतो...याचे कारण अविद्येने दर्शविले जाते...तेच वर सांगितल गेलय.:)
धन्यवाद!
श्रीसमर्थ श्रीदासबोधात
श्रीसमर्थ श्रीदासबोधात विद्येचे 'सद्विद्या आणि कुविद्या' असे भाग करतात.
कुविद्याग्रस्त प्राण्याचे वर्णन करताना ते म्हणतात..
कुविद्येचा प्राणी असे| तो कठिण निरूपणें त्रासे |
अवगुणाची समृद्धि असे| म्हणौनियां ||श्री दा.२.३.३||
श्लोक ||दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च |
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ||
काम क्रोध मद मत्सर| लोभ दंभ तिरस्कार |
गर्व ताठा अहंकार| द्वेष विषाद विकल्पी ||४||
आशा ममता तृष्णा कल्पना| चिंता अहंता कामना भावना |
असूय अविज्ञा ईषणा वासना| अतृप्ती लोलंगता ||५||
इछ्या वांछ्या चिकिछ्या निंदा| आनित्य ग्रामणी मस्ती सदा |
जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा| दुर्वृत्ती दुर्वासना ||६||
स्पर्धा खटपट आणि चटचट| तर्हे झटपट आणी वटवट |
सदा खटपट आणी लटपट| परम वेथा कुविद्या ||७||
आणि सद्विद्येने सुशोभित पुरुषाचे वर्णन करताना ते म्हणतात..
सद्विद्येचा जो पुरुष| तो उत्तमलक्षणी विशेष |
त्याचे गुण ऐकतां संतोष| परम वाटे ||श्री दा.२.८.२||
भाविक सात्विक प्रेमळ| शांति क्ष्मा दयासीळ |
लीन तत्पर केवळ| अमृतवचनी ||३||
परम सुंदर आणी चतुर| परम सबळ आणी धीर |
परम संपन्न आणी उदार| आतिशयेंसीं ||४||
परम ज्ञाता आणी भक्त| माहा पंडीत आणी विरक्त |
माहा तपस्वी आणी शांत| आतिशयेंसीं ||५||
वक्ता आणी नैराशता| सर्वज्ञ आणी सादरता |
श्रेष्ठ आणी नम्रता| सर्वत्रांसी ||६||
ही सगळी लक्षणे अभ्यासण्यासारखी आहेत.
धन्यवाद!
नितीनजी, प.पू.श्रीमाऊली
नितीनजी,
प.पू.श्रीमाऊली म्हणतात... ध्यानचि ध्यानातें प्रसवे|
प.पू.श्रीसमर्थ म्हणतात...सगुणाचेनि आधारे | निर्गुण पाविजे निर्धारे ||
आणि
प.पू.श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात ...ध्यानात स्वतःचा विसर पडु लागला तर निर्गुण आणखी कोणते राहिले?
हे सगळ सांगण एकच आहे, असे तुम्हाला जाणवले काय?
धन्यवाद!
गौरी, >>>थोडक्यात,
गौरी,
>>>थोडक्यात, लिखित-बुध्दी-कर्म ह्या तीन गोष्टींनी गोंधळात आणखी भर टाकलीये. जेव्हा वरच्या प्रश्नाची उकल कराल तेव्हा ह्या तीन गोष्टींची सांगड स्पष्ट कराल का? आणि जर ह्यांचा परस्पर संबध आहे, तर ह्या तीन गोष्टी भेदुन भक्ती, उपासना कशी घडावी जी परमात्मा आणि आपल्यातले अंतर कमी करेल?
'उपासना' कशी घडावी?... हे पहाताना ... 'त्या' उपासनेने काय व्हायला पाहिजे किंवा 'परमात्मा आणि जिवात्मा' यात अंतर का भासते? हे आपल्या लक्षात आले असेलच.
धन्यवाद!
सावट्जी, नितीनजी, प.पू.श्रीमा
सावट्जी,
नितीनजी,
प.पू.श्रीमाऊली म्हणतात... ध्यानचि ध्यानातें प्रसवे|
प.पू.श्रीसमर्थ म्हणतात...सगुणाचेनि आधारे | निर्गुण पाविजे निर्धारे ||
आणि
प.पू.श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात ...ध्यानात स्वतःचा विसर पडु लागला तर निर्गुण आणखी कोणते राहिले?
हो हे सर्व सांगणे एकच आहे हे जाणवले नव्हे पटले. हे "तर मग निर्गुण उपासनेचे साधन कोणते ?" याप्रश्नाचे उत्तर आहे
नेमक्या प्रश्नाला धरुन विवेचन केलेत तर जिज्ञासा लवकर संपेल. प्रश्न चुकिचे असतील तर नका उत्तर देऊ.
१) निर्गुण उपासना का करायची ?
२) ओमकार साधना हा निर्गुण साधनेचा प्रकार आहे का ? योग शास्त्राचे असे म्हणणे आहे का?
नितीनजी, >>> हो हे सर्व
नितीनजी,
>>>
हो हे सर्व सांगणे एकच आहे हे जाणवले नव्हे पटले. हे "तर मग निर्गुण उपासनेचे साधन कोणते ?" याप्रश्नाचे उत्तर आहे
नेमक्या प्रश्नाला धरुन विवेचन केलेत तर जिज्ञासा लवकर संपेल. प्रश्न चुकिचे असतील तर नका उत्तर देऊ.
नेमक्या उत्तरासाठीच... अगोदर प्रश्न पडणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपल्याला अजून एक प्रश्न विचारणे भाग आहे...कृपया राग मानु नये.
>>>हो हे सर्व सांगणे एकच आहे हे जाणवले नव्हे पटले!
आपल्याला जे जाणवले-पटले ते कृपया सांगाल का? किंवा वरील संदर्भातून जाणवलेला-पटलेला... 'सुरुवात(उपासना) आणि शेवट(साध्य)' काय आहे?
धन्यवाद!
माधव, अगोदरचा प्रश्न परत
माधव,
अगोदरचा प्रश्न परत एकदा...
>>>>>>त्यामुळे उपासना सगुणाचीच होते. पण श्रीमहाराजांनी म्हटल्याप्रमाणॅ निर्गुणाची ओळख करून घेऊन ती केली पाहिजे म्हणजे साध्य काय ते हळू हळू समजू लागते.
साध्य काय आहे?:)
धन्यवाद!
साध्य - मी म्हणजे कोण ते
साध्य - मी म्हणजे कोण ते समजणे / माझी ओळख पटणे!
माधव, मग 'निर्गुणाची' ओळख
माधव,
मग 'निर्गुणाची' ओळख करुन घेऊन..मगच.. नंतरच... श्रीमहाराज सगुणाची उपासना करण्यास का बरे सांगत असतील?:)
धन्यवाद!
नितीनजी, >>>या जन्मातली
नितीनजी,
>>>या जन्मातली बुध्दी हा आधीच्या अनेक जन्मांच्या कर्माचा परिपाक होय. पुर्वजन्मकर्मनुसारेण हा जन्म लाभलेला आहे आणि कोणाचा तिरस्कार न करता, राग न धरता जे प्राप्त आहे त्यात आनंद मानुन जीवन आनंदाने जगावे हे म्हणणे सोपे असते पण असे कर्म हातुन घडणे अत्यंत कठीण.
अगदी खरे आहे...
>>>काही प्रसंगी विवेक हा बुध्दीच्याही वरचा स्तर हरवतो आणि या जन्मात माणसाच्या हातुन अतिशय चुकीची कर्मे घडतात. मन बुध्दी आणि विवेक स्थिर झाल्यावर हे समजत.
हे कसे स्थिर होणार? आणि या जन्मात स्थिर नाहीच झाले तर मग काय?
>>>प्रार्थना अश्यासाठी करावी की गतजन्माची प्रेरणा बुध्दीला चुकीचे वागण्याची प्रेरणा देईल अश्या वेळी विवेक जागृत रहावा.
प्रार्थना या साठी करावी की किमान या जन्मीतरी हातुन चांगले कर्म घडावे
चांगले कर्म हातून घडले तरमग... त्यामुळे काय होईल?
माफ करा, पण प्रश्न पडणे जरूरी आहे... जिज्ञासा ती हीच.
'परमार्थ' हा समजून-उमजूनच केला पाहीजे... 'प्रारब्धाची' सत्ता ही फक्त 'देहावरच' असते... पण 'मी' स्वतःला 'देह' समजुन बसलोय... आणि म्हणूनच देहाची सुख-दु:ख म्हणजे माझीच... अशी विपरीत भावना होते.
बस मग करायचे काय? अस वाटण्यामागचे 'कारण' समजावून घ्यायचे.. आणि ते 'तादात्म्य' दूर होईल अशी 'उपासना' करायची. पण हीच 'उपासना' जर 'सकाम' असेल.. तर हे 'तादात्म्य' अजून खोल होत जाते... !
म्हणूनच उपासनेचे 'साध्य' काय हे जाणलेच पाहीजे. कोठे जायचे आहे.. हे आपण अगोदर ठरवितो आणि मग मार्ग निवडतो...मार्गस्थ होतो-मार्ग क्रमणा होते...आणि मगच इच्छीत स्थळी पोहचतो.. अगदी तसेच हेही आहे. पण जर कोठे जायचे आहे हेच जर ठरले नाही तर मग.. पुढचे कसे होणार? म्हणूनच हे प्रश्न...!
धन्यवाद!
धन्यवाद सावटजी, माझे सर्व
धन्यवाद सावटजी,
माझे सर्व प्रश्न संपले. परमेश्वर फार दयाळु आहे. माझी अडचण त्यालाच समजेल.
नितीन, माफ करा पण तुमच्या
नितीन, माफ करा पण तुमच्या वाक्यावरून तुमचे प्रश्न संपले आहेत असे वाटले नाही.
प्रश्न संपतील जेव्हा उत्तरे
प्रश्न संपतील जेव्हा उत्तरे मिळतील. माझी तक्रार अजिबात नाही. मी मागावी आणि सहजपणे मिळावी इतका हा विषय सोपा नाही याची जाणिव आहे.
नितीनचंद्र, बरोबर आहे. हा
नितीनचंद्र, बरोबर आहे. हा विषय हळू हळूच मन बुद्धीमधे उतरतो. कधी कधी एक गोष्ट शोधताना, कित्येक न मागितलेल्या गोष्टीही मिळून जातात. अनेक सुप्त प्रश्नांची उकल होते. इथे पी हळद हो गोरी हा सिद्धांत लागू होत नाहीच
नितीनजी, >>>माझे सर्व प्रश्न
नितीनजी,
>>>माझे सर्व प्रश्न संपले. परमेश्वर फार दयाळु आहे.
अर्थातच 'तो' परमदयाळु-करुणासागर आहे... म्हणूनच अश्विनी म्हणतात त्याप्रमाणे.."इतकुस्सं काही चांगलं केलं तर त्याचा दश, सहस्रगुणे मोबदला तोच देतो, डोंगराएवढं वाईट कर्म केलं तरी ते अत्यल्प अंशाने भोगायला परत पाठवलं जातं."
तसेच काही सकाम-चांगल केल तरिही ते भोगाव लागत... त्याकरिताही परत पाठवल जात.
>>>माझी अडचण त्यालाच समजेल.
परमेश्वर परमदयाळु असतानाही... नियमांनी बांधला गेलाय...त्याचे म्हणणे असे आहे की सगळी बरी-वाईट कर्मे आणि त्याची फळे भोगायची वासना संपली असेल तरच मी तुला जवळ करतो.. अन्यथा नाही. ही परमेश्वराची 'अडचण' या मनुष्य धर्मातच जाणता येते आणि नुसते जाणुन चालत नाही.. तर 'वासना' हे जे 'मूळ' आहे... त्याच्या मूळाशीही पोहचायला पाहीजे. म्हणूनच...
असो..!
आपण श्रीसद्गुरुकृपांकित आहात काय? आपण 'ओंकार' साधनेविषयी विचारत आहात म्हणून हा प्रश्न!
धन्यवाद!
महेश,
यमधर्ममहाराजांची आठवण आहे का?
सावट, अहो नक्कीच आहे. रोजच
सावट, अहो नक्कीच आहे. रोजच आहे. मी जेव्हा नचिकेताचा उल्लेख केला तेव्हा ही आठवण असणारच.
सावटजी, कर्म आपण करतो कि
सावटजी,
कर्म आपण करतो कि परमेश्वर आपल्याकडुन करुन घेतो?
हसरीजी नमस्कार! >>>कर्म आपण
हसरीजी नमस्कार!
>>>कर्म आपण करतो कि परमेश्वर आपल्याकडुन करुन घेतो?
कर्म 'मी' करतो असा 'अहं' असताना जे 'कर्म' केले जाते... त्याचे कर्तृत्व त्या 'मी' कडेच जाते. आणि हा 'मी' नसताना जे 'सहजकर्म' होते.... त्यावेळी कर्म होताना दिसतय.. म्हणजे त्याचे कारण-कर्ता असायलाच हवा...या न्यायाने.. कार्यकारण भावाने त्याचे कर्तृत्व परमेश्वराकडे जाते.
याचाच अर्थ... कर्म, करणे आणि होणे यातील पडदा-अडसर जो आहे..तो या 'मी' चाच आहे. म्हणूनच हा 'मी' ज्याच्यावर आरूढ होतो..त्या गोष्टीकडे पहाणे गरजेचे आहे.
खरे सांगायचे तर.. आपल्याकडून काही कर्म झाले आहे... ही भावना मनात येणे.... आणि त्याचा 'कर्ता' कोण? असा भाव मनात येणे... हेच 'मी' जागृत असल्याचे लक्षण आहे.
'सहजकर्मा' मध्ये.. काही 'कर्म' झाले आहे याचाच पत्ता नसतो... इतके ते सहजपणे होते...मग ते कोण करतो? किंवा कोण करवून घेतो? हे प्रश्नच उद्भवत नाहीत.
असो...!
असे असले तरिही तुम्ही 'जे' करत आहात ते 'उत्तम' आहे!
धन्यवाद!
___/\___ धन्यवाद.
___/\___
धन्यवाद.
हसरी,___/\___
हसरी,___/\___ !
गौरी!
>>>थोडक्यात, लिखित(प्रारब्ध)-बुध्दी-कर्म ह्या तीन गोष्टींनी गोंधळात आणखी भर टाकलीये. जेव्हा वरच्या प्रश्नाची उकल कराल तेव्हा ह्या तीन गोष्टींची सांगड स्पष्ट कराल का? आणि जर ह्यांचा परस्पर संबध आहे, तर ह्या तीन गोष्टी भेदुन भक्ती, उपासना कशी घडावी जी परमात्मा आणि आपल्यातले अंतर कमी करेल?
आपल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून..प.पू.श्री महाराजांच्या प्रवचनातील काही भाग ...
आपले ध्येय काय असावे हे ठरविण्याची बुद्धी माणसाला आहे, ती खालच्या प्राण्यांना नाही. हाच माणसांत आणि त्या प्राण्यांत फरक आहे. प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, त्याचप्रमाणे माणसालादेखील आलेले भोग भोगावे लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागेपुढे सोयीने भोग भोगू शकतो. जगातल्या घडामोडी जशा चालतात, तशाच आपल्याही सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात. आपण जे मिळविले आहे ते स्वतःच्या प्रयत्नाने मिळाले, ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही.
एक मनुष्य रस्त्याने चालला असताना वाटेत एक दहा रुपयांची नोट पडलेली आढळली. पूर्वसंस्काराप्रमाणे ती उचलून घेण्याची वासना त्याला होईल, पण ती प्रत्यक्ष उचलून घ्यावी किंवा न घ्यावी हे ठरविण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य त्याला आहे. म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य आपल्याला आहे. ते प्रारब्धावर अवलंबून नाही. भगवंत सगुणात आला की त्यालादेखील प्रारब्धाचा नियम लागू झाला.
आपला जन्मजात स्वभाव जरी वाईट असला तरे अभ्यासाने तो खात्रीने सुधारता येईल. जोपर्यंत आपल्या अंतःकरणात अवगुण आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणे कठीण आहे. शेत पेरण्याकरिता ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करायला पाहिजे, त्याप्रमाणे भगवंताचे प्रेम येण्यासाठी आपले अंतःकरण दुर्गुणांपासून स्वच्छ केले पाहिजे. एकदा असे अंतःकरण शुद्ध झाले म्हणजे भगवंतावाचून दुसरा कोणी नाही ही भावना टिकविणे, म्हणजेच अनुसंधान ठेवणे, फारसे जड नाही. अनुसंधान हे आपले 'ध्येय' ठरवून, त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी कराव्या.
धन्यवाद!
ही चर्चा अशीच पुढे चालु
ही चर्चा अशीच पुढे चालु रहावी. दररोज काही नविन वाचयला मिळावे.
नितीनजी, धन्यवाद! प.पू.
नितीनजी,
धन्यवाद!
प.पू. श्रीमहाराज म्हणतात..
"आपण जे मिळविले आहे ते स्वतःच्या प्रयत्नाने मिळाले, ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही....!"
म्हणजेच आपल्याला 'जे' मिळाले त्यात... 'ते', आपण 'स्व' प्रयत्नाने मिळविले आहे,असे आपल्याला वाटले तर...ती निव्वळ कल्पना आहे. पण ही 'कल्पना' जाण्यासाठी 'विशेष' प्रयत्नांची गरज नक्कीच असते...कारण श्रीमहाराज पुढे लगेच म्हणतात...
"आपला जन्मजात स्वभाव जरी वाईट असला तरी अभ्यासाने तो खात्रीने सुधारता येईल".
इथे 'अभ्यास' म्हणजे प्रयत्न आलाच.
म्हणूनच श्रीमहाराज ज्यावेळी म्हणतात की 'माझे प्रयत्न' ही कल्पना आहे आणि परत 'प्रयत्न-अभ्यासाशिवाय' पर्याय नाही असेही सांगतात.. त्यावेळीच आपल्या लक्षात येते हे 'पहीले' प्रयत्न... आणि 'दुसरे' प्रयत्न(अभ्यास) यात मूलभूत फरक आहे...!
आपल चुकत काय? जे 'आपोआप'- प्रारब्धानुसार होते.. ते ते आपण मी करतो (प्रयत्न).. असे समजून बसतो आणि जे करायला सांगितले आहे ( अभ्यास) त्याकडे डोळेझाक करतो....!
जे होते ...ते 'मी' करतो-'माझे' प्रयत्न, अशा अहंकाराने 'क्रियमाणात' भर घालते...आणि ज्यामूळे 'संचित' आणि 'क्रियमाण' संपायची शक्यता आहे असा 'अभ्यास' आपल्याकडून जन्मात होत नाही.. मग आपल्याला परमेश्वर दिसणार कधी- भेटणार कधी?
'देव' कृपा करो आपल्या सगळ्यांचा असा 'अभ्यास' लवकर सुरू होवो!:)
गौरी!
हळू-हळू आपण उत्तराच्या दिशेने जात आहोत!:)
धन्यवाद!
Pages