Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
आपल चुकत काय? जे 'आपोआप'-
आपल चुकत काय? जे 'आपोआप'- प्रारब्धानुसार होते.. ते ते आपण मी करतो (प्रयत्न).. असे समजून बसतो आणि जे करायला सांगितले आहे ( अभ्यास) त्याकडे डोळेझाक करतो....!
जे होते ...ते 'मी' करतो-'माझे' प्रयत्न, अशा अहंकाराने 'क्रियमाणात' भर घालते...आणि ज्यामूळे 'संचित' आणि 'क्रियमाण' संपायची शक्यता आहे असा 'अभ्यास' आपल्याकडून जन्मात होत नाही.. मग आपल्याला परमेश्वर दिसणार कधी- भेटणार कधी?
>>>> झक्कास !
धन्यवाद अश्विनी! जर
धन्यवाद अश्विनी!
जर श्रीउपनिषदांचा 'अर्थ' आपल्याला कळावा असे वाटत असेल..तर 'श्रीसंत चरित्राचा- त्यांच्या 'अमोल' श्रीवचनांचा 'अभ्यास' केल्याशिवाय...श्रीसत्संगतीशिवाय दुसरा 'सहज' उपाय, शास्त्रात सांगितला नाही!
म्हणूनच परत-परत आपण श्रीमहाराज काय म्हणतात, याचे अतिआदराने 'श्रवण-मनन- चिंतन' करुयात.
ही 'श्रीवचने' म्हणजेच 'ओंकार-रुपी' 'अव्यक्त' अक्षरब्रह्माचा 'व्यक्त' पसारा आहे. त्याला पकडूनच आपल्याला 'व्यक्त ते अव्यक्त' असा प्रवास करायचा आहे. याकरताच आपल्याला श्रीसद्गुरुतत्वाला शरण जाणे जरूरी आहे. कारण यातच आपला 'मार्ग' आपल्याला सापडेल... असे शास्त्रवचन आहे.
श्रीमहाराज म्हणतात...
"जोपर्यंत आपल्या अंतःकरणात अवगुण आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणे कठीण आहे. शेत पेरण्याकरिता ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करायला पाहिजे, त्याप्रमाणे भगवंताचे प्रेम येण्यासाठी आपले अंतःकरण दुर्गुणांपासून स्वच्छ केले पाहिजे."
म्हणजेच..
१)आपल्यातच 'अवगुण-दोष' आहेत हे आपल्याला अगोदर कळले पाहीजे...
२) त्यामूळेच.. अवगुणामूळेच आपली पारमार्थिक प्रगती होत नाही हेही कळले पाहीजे..
३)आणि हे अवगुण आपल्याच अंतःकरणात असतात हेही कळले पाहीजे..मग हे अंतःकरण म्हणजे नक्की काय हे आपण समजावून घेतले पाहीजे.. ते स्वच्छ कसे करायचे? हे कळले पाहीजे!
४) आणि महत्त्वाचे म्हणजे असे हे अंतःकरण रुपी मशागत केलेल्या शेतात जर 'श्रीभगवंत-प्रेमाचे' भरघोस पिक यायचे असेल तर..तसे बियाणे अगोदर मिळाले पाहीजे. जसे आपण शेतात 'गहू' पेरले की पिकही निसर्गताच... गव्हाचेच येणार! त्याचप्रमाणे निसर्गताच जर 'श्रीभगवंताचे प्रेम' हे पिक यायचे असेल तर 'बी' ही श्रीभगवत-प्रेमाचेच लागेल.. नाही काय? मग असे अप्राप्य 'श्रीप्रेमबी' दानात देणारे महादानशूर्..श्रीसद्गुरूही भेटले पाहीजेत. (ते 'बी' अन्य कोठे मिळायचे तसूभरही शक्यता नाही.. मग भलतेच काहीतरी पेरून, जर आपण भलतेच पिक यायची जन्मभर-जन्मोजन्मी वाट पाहू तर ते कसे शक्य होणार?)
५)'बी' मिळाले...ते पेरले..म्हणजे काम संपले असे नाही, तर त्याचा 'विनियोग-क्षेम' ही व्हायला हवा.. तितिक्षा हवी..सबूरी हवी!
म्हणूनच 'अभ्यासाशिवाय' पर्याय नाही. आणि समजून्-उमजून केलेला 'परमार्थ'हा 'सहज-सोपा..सहज-साध्य' आहे... 'प्रपंचच' महाकठीण आहे.
बोला, श्रीपंढरीनाथमहाराजकी जय! अवधूत चिंतन श्रीगुरूदेवदत्त!!
धन्यवाद!:)
महेश, श्रीकठोपनिषदाच्या प्रथम
महेश,
श्रीकठोपनिषदाच्या प्रथम अध्यायात द्वितीय वल्ली मध्ये श्रीयमधर्मराज आणि श्रीनचिकेत यांच्यात 'श्रेय आणि प्रेय' यासंबंधी झालेला संवादाची पुनराठवण...
या उपदेशात श्रीयमधर्म म्हणतात....
१)मनुष्य जन्माचे 'कल्याण' साधणारे,नित्य सौख्य देणारे जे साधन आहे...त्याला 'श्रेय' म्हणतात.तर 'भोग' वाढवणारे,दु:खाचा व्यापार वाढवणारे जे साधन आहे त्यालाच 'प्रेय' म्हणतात.
२)ही दोन्ही साधने मुळातच वेगवेगळी आहेत. हा फरक जाणून अति धीरवान, ज्ञानी पुरुष प्रथम साधनाचा अवलंब करतो..तर मंदबुद्धि मनुष्य दुसर्या साधनाचा अवलंब करुन भौतिक योगक्षेमात दंग रहातो.
३)या विख्यात दोन साधनांनाच अनुक्रमे 'विद्या आणि अविद्या' म्हणतात... एक 'आत्मज्ञानाने' प्रेरित असते तर दुसरे 'भोगाशी' सलग्न असते.
४) 'आत्मविद्येचे-पराविद्येचे' साधन लाभलेला साधक... साध्याविषयी(आत्मज्ञान) अविचल, तितिक्षा असलेला, विवेकी असतो,
अविद्यायामन्तरे वर्तमानः स्वयं धीराः पण्डितम्मन्यमानाः।
दन्द्रम्यमाणाः परियन्ति मूढा अन्धेनैव नीयमाना यथान्धाः ॥श्री कठोपनिषद १.२.५॥
तर.. 'अविद्येने' ग्रस्त असणारा... अविद्येत वास करणारा मनुष्य हा अविद्येत वास करत असतो, तरिही स्वतःस 'ज्ञानी' .. 'विद्यावान'समजतो.
अशा मूढ ज्ञात्याने केलेल्या उपदेशामुळे जर एखादा वागू लागला, तर एका आंधळ्याने, दुसर्या आंधळ्यास मार्गदर्शन केल्याप्रमाणे...दोघांचीही अंतिम गति अति दु:खदायक असते... 'पुनरपि जनन-मरण' या दुष्टचक्रात ते अनंतकाल फिरत रहातात.
म्हणजेच जो अविद्येने ग्रस्त- परलोकाची चिंता न करता.. भौतिकसाधने जमा करण्यातच जो मदमस्त आहे आणिवर स्वतःस ज्ञानी समजतो, अशी आत्मघातकी'विद्या' असलेला आणि जो अविद्येने ग्रस्तही आहे आणि ज्याच्याजवळ पोकळ 'शब्दज्ञान' ही नाही, अशी 'अविद्या' असणारा मनुष्य..जो क्षणिक सुखालाच शाश्वत मानतो आणि आत्मघातकी 'विद्या' असणार्या आंधळ्याचे ...स्वतःस 'प्रिय' असलेल्या विषयांचे भाषण ऐकून भ्रमित झाल्यामूळे.. तसेच पालन करतो.. त्या दोघांचीही दुर्गती होते.
५) अधिकांश मनुष्य 'तिसर्या' प्रकारात येतात... यांना 'आत्मतत्व' हा विषयच श्रवण साध्य नसतो. बुद्धी मंद असल्यामूळे त्याचे श्रवणच होत नाही.
जे राहीले त्यांना जरी श्रवण झाले तरी..त्यातले मुख्य 'तत्व' ग्रहण करता येत नाही.
ऋत अशा आत्मतत्वाचे यथार्थ ज्ञान असणारा ज्ञाता.. आत्मविद्यावान हा परम दुर्लभ आहे.
म्हणजेच 'आत्मविद्या' आणि 'अविद्या' याच्या मधला जो 'विद्येचा' भाग आहे तो.. कोणाचा 'संग' मिळतो त्याच्यानुसार होतो.
म्हणूनच आपण 'आत्मविद्या' असणार्या 'आत्मज्ञानी' श्रीसंताचा संग धरावा... तरच आपणही या 'श्रेय' आत्म तत्वाचे श्रवण आणि ग्रहण घडल्यामुळे त्या 'तत्वाचे' अधिकारी होऊ आणि परमगति मिळवू शकू.
म्हणूनच म्हणतात..
श्री यजुर्वेद(शुक्ल).. अध्याय ४० वा...श्री ईश्यावास उपनिषद... सूत्र नववे...
अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते |
ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाँ रताः || ९ ||
धन्यवाद!:)
वाह सावट धन्यवाद ! वाचताना
वाह सावट धन्यवाद ! वाचताना अगदी एकतानता साधली गेली होती, अगदी अंतर्यामी जाणवत होते जे लिहिले आहे त्याचा अर्थ. पण काही लोकांना सत्संग नसुनसुद्धा आत्मविद्येकडे ओढा असतो तो कसा काय ?
धन्यवाद सावट!!! खरच खुप
धन्यवाद सावट!!!
खरच खुप तल्लीन व्हायला झाले वाचताना, किती छान समजावता तुम्ही!
महेश,गौरी धन्यवाद! >>>पण काही
महेश,गौरी धन्यवाद!
>>>पण काही लोकांना सत्संग नसुनसुद्धा आत्मविद्येकडे ओढा असतो तो कसा काय ?
छान विचारल आहे! धन्यवाद!
आत्मविद्येकडे 'ओढा' असणे म्हणजे त्याला 'आत्मज्ञान' मिळाले आहे असा अर्थ होत नाही...तर 'ते' आत्मज्ञान मिळण्यास 'तो' 'पात्र' आहे.. असा होतो.
व्यवहारातील उदाहरण घ्यायचे झाल्यास.. जर एखाद्या शाखेची 'पदवी' पाहीजे असेल तर... आणि तसा 'ओढा' असेल तर.. ती 'पदवी' मिळण्यासाठी अगोदर 'पात्रता' अटीपुर्ण करून त्या-त्या शाळेत प्रवेश घेता येतो...घ्यावा लागतो! शेवट म्हणजे ती 'पदवी' मिळणे.
तो 'पात्र' आहे किंवा ती 'पदवी' त्याला मिळाली आहे की नाही, हे त्याच्या अंगी दिसणार्या-असणार्या लक्षणावरून त्या त्या शाखेच्या.. जाणत्यालाच 'जाणता' येते. (दुसर्यास नाही!)
श्रीकठोपनिषदातीलच उदाहरण घेऊयात म्हणजे अजून कळेल...
अजीर्यताममृतानामुपेत्य जीर्यन् मर्त्यः व्कधःस्थः प्रजानन्।
अभिध्यायन् वर्णरतिप्रमोदानदीर्घे जीविते को रमेत ॥श्री कठोपनिषद १.१.२८॥
श्रीयमधर्मराजांना-मृत्यूदेवतेला शरण गेलेल्या श्रीनचिकेतांची सुरूवातीची स्थिती आपण लक्षात घेऊयात.
सौंदर्य-धन इ. भोगात रमणारा मनुष्य 'मूढ' मतीचा आहे... आणि प्रत्येकाच्या पुढे साक्षात 'आ' वासून उभा असणारा 'मृत्यू' हेच 'सत्य' आहे..गूढ आहे, हे अंतर्यामी पटलेला बालक नचिकेत, प्रत्यक्ष त्या देवतेलाच शरण होऊन काही मागत आहे... ! काय मागत आहे?...
यस्मिन्निदं विचिकित्सन्ति मृत्यो यत्साम्पराये महति ब्रूहि नस्तत्।
योऽयं वरो गूढमनुप्रविष्टो नान्यं तस्मान्नचिकेता वृणीते ॥श्री कठोपनिषद १.१.२९॥
काय मागत आहे,विचारत आहे ते पाहूयात...
बालकाचा प्रश्न पहा... मृत्यू पश्चात 'आत्मा' आस्तित्वात असतो का नाही? याचे 'ज्ञान' (आत्मज्ञान) मला .. आपल्या कृपेने व्हावे.
म्हणजेच अजून त्या 'बालकास' आत्मज्ञान झालेले नाही.. आणि त्याच्याकडे प्रत्यक्ष मृत्यूदेवतेला- श्रीसंत्सद्गुरूंना 'शरण' जाण्याची दुर्लभ बुद्धी-इच्छा- सद्वासना ही अगोदरच आहे. ( गौरी लक्षात घ्यायचा मुद्दा!:))... कारण बालकास माहिती आहे की त्यांच्याशिवाय.. प्रत्यक्ष श्रीमृत्यूदेवतेशिवाय महान 'दाता' अजून कसा-कोण असणार..अजून 'हे' चांगल्या प्रकारे कोणास माहित असणार?
यावर श्रीधर्मराज म्हणतात..
नैषा तर्केण मतिरापनेया प्रोक्तान्येनैव सुज्ञानाय प्रेष्ठ ।
यां त्वमापः सत्यधृतिर्बतासि त्वादृङ्नो भूयान्नचिकेतः प्रष्टा ॥श्री कठोपनिषद १.२.९॥
हे नचिकेता! ... तूझी 'हे' विचारण्याच 'प्रज्ञा' पाहून मी आनंदीत झालो आहे.. या तूझ्या प्रश्नातूनच जाणवते आहे की तूझी 'बुद्धी' नुसतेच पोकळ 'तर्क' चालवत नाही आहे ..तर ती बुद्धी.. श्रीप्रभु कृपेने 'प्रज्ञा' झालेली आहे. ( गौरी परत आपले 'अवधान' असावे ही नम्र विनंती!:))सगळ्या भौतिक प्रलोभनाना बाजूला सरकवून.. आलेली ही तूझी बुद्धी-प्रज्ञा-सद्सद्विवेक, हा तूझ्यातील प्रगाढ ...दृढ 'श्रद्धाच' दर्शवित आहे....! ज्याला 'आत्मज्ञान' व्हायलाच पाहीजे असा 'जिज्ञासू- पात्र- अधिकारी' तूझ्याशिवाय दुसरा कोण असणार?
एतद्ध्येवाक्षरं ब्रह्म एतद्ध्येवाक्षरं परम् ।
एतद्ध्येवाक्षरं ज्ञात्वा यो यदिच्छति तस्य तत् ॥श्री कठोपनिषद १.२.१६॥
अशा अधिकारी पुरुषाचा... श्रीनचिकेताचा हा दुर्लभ अधिकार पाहून... आत्मज्ञानसंपन्न.. श्रोत्रिय( शास्त्र जाणणारे) आणि ब्रह्मनिष्ठ( स्वतः शास्त्रात सांगितलेल्या 'ब्रह्मवस्तूचा' अनुभव घेतलेले) महान श्रीयमधर्मराज श्रीगुरुरुपाने..विधिवत्..म्हणजेच विधीला मान्य असणार्या प्रकारे.. "ॐ " या अक्षर प्रणवाचा.. जे स्वतः ब्रह्मस्वरूप आहे..अशा 'ओंकाराचा' उपदेश करत आहेत. ( अति दुर्लभ दृश्य आहे..प्रसंग आहे... जणू आपल्या समोरच घडत आहे... धन्यवाद महेशा! तुमच्या मूळेच आज हे शक्य झाले! परत-परत, पुन्हा-पुन्हा धन्यवाद! आणि नितीनजी-गौरी आपल्याही प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळाले..आपले ही धन्यवाद!:))
एतदालम्बनँ श्रेष्ठमेतदालम्बनं परम्।
एतदालम्बनं ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते ॥श्री कठोपनिषद १.२.१७॥
'ॐ' काराचे आलंबन श्रेष्ठ आहे.. परम आहे... अमोघ आहे! याचे 'मर्म' जाणणारा 'साधक' स्वतः 'ब्रह्मलोक' निवासी होतो.
(हे 'साधन' वरील प्रमाणे 'अधिकारी' व्यक्तिकडूनच मिळाले पाहीजे.. स्वतःच्या मनाने किंवा एखाद्या अनाधिकार्याने सांगितले म्हणून.. तसे ऐकले-पाहीले म्हणून... करून त्याचा 'ज्ञान' प्राप्तीकरता काहीही फायदा होणार नाही... म्हणूनच प.पू.श्रीसद्गुरु श्रीसंत शेगावकर गजानन महाराजासारख्या महानविभूतीनी सांगितलेल्या मार्गानेच सुरुवात होणे गरजेचे आहे. परमार्थात एक महत्त्वाचा नियम आहे.. तो म्हणजे आपण आपली रोजची 'उपासना' ही... आताच आपली सुरुवात झाली आहे अशाच भावनेनेच कायम करावी.. दुसर्या शब्दात सांगायचे तर.. भक्तीची सुरुवात.. ही 'दास्य(शरण)' भावनेतूनच व्हायला पाहीजे.. म्हणजे शेवटही 'दास्य' म्हणूनच होतो...अनन्यशरणागतेतच होतो, हे शेवटी लक्षात येते... त्याचे ज्ञान होते.. आणि तेही हे 'ज्ञान' म्हणजे 'उपाधी-ओझे' आहे हे जाणून होते... असो! )
(काही चुकल्यास आपण सर्वानी उदार अंतःकरणाने क्षमा करावी.. ही विनम्र विनंती. 'देव' आपल्या सगळ्यांचे भले करो.)
श्रीयमधर्मासारख्या श्रीसंताचा 'संग' अमोघ आहे हेच खरे!
बोला, अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त.
धन्यवाद!
सावट, अहो माझे कसले आभार
सावट, अहो माझे कसले आभार मानताय, मी फार यःकश्चित आहे तुमच्या अगाध ज्ञानापुढे.
लहानपणापासुन चांगल्या गोष्टी वाचायला ऐकायला मिळाल्या हे आमचे पुर्वसंचितच म्हणायचे,
पण पुढचा प्रवास कसा होणार आहे देव जाणे. त्याने या मार्गाची गोडी लावली आहे, ती अशीच वृद्धिंगत होवो.
सत्संगाबद्दल नारदांची एक गोष्ट माहिती आहे, सवडीने लिहिन.
शिणलो शिणलो शोधुन गुरुदेवा
शिणलो शिणलो शोधुन गुरुदेवा |
अनंत अपराधी मी तरी कृपा ठेवा |
तुझिया कृपेने तरीन हा सागर |
निष्ठेने भजीन अर्पीन माझी सेवा |
गौरी, >>>>>>थोडक्यात,
गौरी,
>>>>>>थोडक्यात, लिखित-बुध्दी-कर्म ह्या तीन गोष्टींनी गोंधळात आणखी भर टाकलीये. जेव्हा वरच्या प्रश्नाची उकल कराल तेव्हा ह्या तीन गोष्टींची सांगड स्पष्ट कराल का? आणि जर ह्यांचा परस्पर संबध आहे, तर ह्या तीन गोष्टी भेदुन भक्ती, उपासना कशी घडावी जी परमात्मा आणि आपल्यातले अंतर कमी करेल?
आपण विचारलेल्या प्रश्नाकडे परत एकदा पाहूयात...
लिखित,बुध्दी आणि कर्म याचे आपण आपल्या सोयीकरता तीन 'संधी' भाग करूयात. म्हणजेच 'लिखित' म्हणजे 'भविष्य-वर्तमान'...'बुध्दी' म्हणजे 'वर्तमान-भूत' आणि 'कर्म 'म्हणजे 'भूत-भविष्य'! हे समजावून घेताना आपण खालील प्रमाणे पाहीले...
१)प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, त्याचप्रमाणे माणसालादेखील आलेले भोग भोगावे लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागेपुढे सोयीने भोग भोगू शकतो. जगातल्या घडामोडी जशा चालतात, तशाच आपल्याही सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात. ( हे म्हणजे 'लिखित' )
२)आपले ध्येय काय असावे हे ठरविण्याची 'बुद्धी' माणसाला आहे, आणि आपला जन्मजात स्वभाव(लिखित) जरी वाईट असला तरे अभ्यासाने(कर्म) तो खात्रीने सुधारता येईल.
यामध्ये आपण विचारल्याप्रमाणे...श्रीशनिमहात्म्यात सांगितल्याप्रमाणे.."जैसे असेल लिखिताक्षर बुध्दी सुचे तदनुसार". म्हणजेच सामान्यतः ज्याला 'भोग' भोगायचा आहे त्याची बुध्दीही..त्या भोगाला-लिखिताला अनुसरूनच चालते... चालायलाच हवी. कारण त्याशिवाय तो 'भोग' घ्यावा असे त्याच्या मनातच येणार नाही.
श्रीसंत एकनाथमहाराज आपल्या श्रीहरिपाठात म्हणतात...
जन्म घेणें लागे वासनेच्या संगे | ...
जर अंतःकरणात 'वासना' असतील तर... त्या वासनांचा 'संग' पकडल्यामूळे परत नवीन जन्म घ्यायला लागतो. याचाच अर्थ आताचा 'स्थूल' देह जरी पडला..तरिही 'वासना' आहे तशाच रहातात...मग त्या कुठे रहातात? का प्रश्न उभा रहातो.
केलें कर्म झालें तेंचि भोगा आलें| उपजले मेले ऐसे किती || ३.४ ||...
'देहाने जे 'कर्म' केले... त्याचीच 'फळे झाली'..त्यातूनच 'बीज'(अनंत बीजे ) झाले आणि तेच 'बीज' परत नवीन देहरुपाने अंकुरले. असे आजपर्यंत किती वेळा उपजणे-मरणे झाले याची गणती नाही.
बहुतां सुकृतें नरदेह लाधला | भक्तीविण गेला अधोगती || ७.१ ||
पाप भाग्य कैसे न सरेचि कर्म | न कळेचि वर्म अरे मूढा || ७.२ ||
अनंत जन्मींचें सुकृत पदरीं | त्याच्या मुखीं हरि पैठा होय || ७.३ ||
बर्याच पूर्वसुकृताने हा 'नर' देह लाभतो... अशा अनंत नर जन्मी झालेले, अनंत सुकृत जर पाठी असेल तर हरिभेटीची 'ओढ' लागते. नुसत्या सकाम पाप-पुण्याने, संचित-साठलेले कसे काय सरणार? याचे वर्म न जाणणारे 'मूढ' आहे.
याचाच अर्थ.. ज्या गोष्टी दुर्लभ आहेत म्हणून शास्त्रांनी सांगितले आहे, त्यातली एक म्हणजे.. 'नर' जन्म ...पण असे असताना पुढची 'दुर्लभ' गोष्ट म्हणजे.. अशा नरदेहात असताना 'मुमुक्षत्व' अंगी असणे... ज्याला 'मोक्षाची' तीव्र इच्छा आहे ..तोच 'मुमुक्षू'! ( म्हणजे या विना नुसता 'नर'देह हा 'वानरा' सारखाच असतो.)
अशी तीव्र-इच्छा असताना त्यापुढची दुर्लभ गोष्ट म्हणजे...
स्वहिताकारणें संगती साधूची | भावें भक्ति हरीची भेटी तेणें || १०.१ ||
अशा सगळ्या वातावरणात जर स्वहित साधायचे असेल तर ...साधूचा 'संग' पाहीजे... त्यामूळे श्रीहरीची 'भेट' होईल!
ही 'संगती' ही फारच महत्त्वाची भूमिका पार पाडते.
जसे स्मरण...तशी वासना(संग)!
...जशी वासना तशी 'संगती'!
जशी संगती... तसे कर्म(भोग-प्रारब्ध)!
...जसे कर्म(नवीन-क्रियमाण)... तसे फळ!
जसे फळ... तसा भोग!
जसा भोग...तसा देह! आणि जसा देह तशी बुध्दी..असा क्रम आहे!
या चक्रातून बाहेर पडायचे असेलतर आपल्याला आपल्या 'स्मरणावर' जोर द्यावा लागेल!म्हणजेच तसाच 'संग' ही लाभेल.
जर तंबाकु खाण्याचे 'स्मरण' झाले...तर ती खाण्याची इच्छा-वासना जागा पकडेल...मग ती प्रबळ इच्छा तसाच 'संग' शोधेल... त्याच्याकडून 'भोग' घेतला जाईल. ही वासना इथेच संपत नाही हे विशेष!)
म्हणूनच आपणही.. आपल्याच बुध्दीचा 'पूर्वकर्मानुसार' चालणारा 'स्वभाव' लक्षात घेऊन..त्याच बुध्दीच्या 'निश्चयात्मिका(श्रीनारद भक्तिसूत्रात सांगितल्यानुसार)' या गुणाचा उपयोग करुन आपले 'स्मरण' योग्य होईल याची तरतूद केली पाहीजे..म्हणजेच आपण आपले 'ध्येय' ठरविले पाहीजे.
( आपल्याला चोवीस तास 'स्मरण' कशाचे असते..तर संसाराचे...मग आपल्याला 'संग' ही तसाच लाभतो. संसार म्हणजेच 'वासना'! म्हणूनच या 'चोवीस' तासातले काही 'निमिष' जर योग्य 'स्मरण' करण्यात नित्य्-नियमित घालवले.. तसे करण्याचा अभ्यास सुरू केला...तर खात्रीने आपल्याला 'संग' ही तसाच लाभेल आणि आपला स्वभाव बदलेल.. अंतःकरण शुद्ध होईल... तसे शास्त्रवचन आहे. )
म्हणूनच श्रीमहाराज म्हणतात.."आपले ध्येय काय असावे हे ठरविण्याची 'बुद्धी' माणसाला आहे, आणि आपला जन्मजात स्वभाव(लिखित) जरी वाईट असला तरे अभ्यासाने(कर्म) तो खात्रीने सुधारता येईल".
धन्यवाद!
नमस्कार सावट, आपले कोटी
नमस्कार सावट,
आपले कोटी धन्यवाद! आपल्याला आजच सांगणार होते की आणखीन खुलासा कराल काय आणि आज आपले पोस्ट पाहुन खुप आनंद झाला. जसे काही तुम्ही ओळखलेत की आत्ता हाच प्रश्न येणार आहे.
आपले खुप धन्यवाद!!
मनाचे खुप समाधान झाले. खुलाश्याचे आणखी मनन,चिंतन सुरु आहे.
माननीय सावटजी, मागे मी
माननीय सावटजी,
मागे मी परमेश्वर दयाळु आहे अस म्हणल होत त्याचा प्रत्यय आज आला.
१४ जानेवारी २०१० रोजी मी भारतीय मानसशात्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन हे योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर यांचा ग्रंथ विकत घेतला. यातल्या काही सुत्रांवर विवरण वाचल्यानंतर हा ग्रंथ माझ्या संग्रही आहे हे मी विसरलो.
आज हा ग्रंथ पुन्हा हाती घेतला. यात मला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे समाधानकारक रित्या मिळाली. हे विवरण जसे च्या तसे छापणे गैर वाटत असल्याने तसेच येथे सगुण आणि निर्गुण तसेच ईश्वरप्रणिधान यावर अन्य कोणी काहीही न विचारल्यामुळे टाळतो आहे.
परमेश्वर खरच दयाळु आहे. मला पुढे पडणारे प्रश्न व त्याची उत्तरे याची सोय आधिच करुन ठेवणे ही कृपा फक्त परमेश्वर करु जाणे.
हा ग्रंथ सहसा उपलब्ध नसतो.
सदगुरु श्री गजानन महाराज आपल्या सर्वांच्या मनोकामना पुर्ण करोत. दिपावलीच्या मुहुर्तावर जसा माझ्या मनात ज्ञानदिप पुन्हा पेटला तसा सर्व भक्त जनांना त्याचा लाभ होवो.
गौरी, आपलेही कोटी
गौरी,
आपलेही कोटी धन्यवाद!
मा. नितीनजी,
>>>दिपावलीच्या मुहुर्तावर जसा माझ्या मनात ज्ञानदिप पुन्हा पेटला
याचा अर्थ 'ज्ञानदिप' अगोदर कधितरी पेटला होता..तो शांत का झाला? तसाच परत होऊ नये याकरिता काय काळजी घ्यायला पाहीजे?
>>>परमेश्वर खरच दयाळु आहे. मला पुढे पडणारे प्रश्न व त्याची उत्तरे याची सोय आधिच करुन ठेवणे ही कृपा फक्त परमेश्वर करु जाणे.
अगदी खरे आहे!
>>>तसेच येथे सगुण आणि निर्गुण तसेच ईश्वरप्रणिधान यावर अन्य कोणी काहीही न विचारल्यामुळे टाळतो आहे.
ज्याला 'भूक' लागली आहे त्यानेच जेवावयास हवे... इतर जेवले म्हणजे आपले 'पोट' कसे भरेल?
तसेच.. ज्याने 'उप-वास' केला त्यालाच त्याचे फळ मिळेल... इतरास नाही!...
धन्यवाद!
अश्विनी, 'प्रेम' असावें
अश्विनी,
'प्रेम' असावें अकृत्रिम | जाणिलें पाहिजे भक्तिवर्म |
सहज लाधेल परमार्थ | नासेल विषम अविद्या || श्री साईच्चरित ३.१८३ ||
नलगे इतर साधनीं शीण | करुं हें साईचरित्र श्रवण |
संचित आणि क्रियमाण | अल्पप्रमाणही नुरवूं || १८४ ||
काय सुंदर सांगितल आहे ना!
सावट, तुम्हीसुद्धा
सावट,
तुम्हीसुद्धा श्रीसाईसच्चरित वाचता/अभ्यासता?
गौरी, श्रवण...मनन... चिंतन
गौरी,
श्रवण...मनन... चिंतन आणि पुढची महत्वाची पायरी आहे.. निदिध्यासन चिंतनात सापडलेल्या गोष्टीचा 'ध्यास' लागला पाहीजे!
श्रीसाईच्चरित सांगते...
कथा करा सादर श्रवण | त्यावरी करा पूर्ण मनन |
मननावरी निदिध्यासन | समाधान पावाल || ३.१८ ||
का व कसे ?
कारण...
'अहं सोहं' जाईल विरोन | उन्मन होईल श्रोतियांचे मन |
चित्त होईल चैतन्यघन | अनन्य परिपूर्ण श्रद्धेनें ||३.१९ ||
खर सांगायच तर ... या वरिल सागंण्यात 'सगळा' परमार्थ संपतो.. अजून काही सांगायचे शिल्लकच रहात नाही.. अशी हि परिपूर्ण 'श्रीसंत' वचने किति वाचू..किती नको असे होते...! बस्स.. 'अनन्य आणि परिपूर्ण' अशा विशेषणांनी युक्त असणारी श्रद्धा पाहीजे(यात खरी गोम आहे)...ती आपल्याकडे नसते. म्हणूनच 'ती कशी मिळवता येईल हे पहायला पाहीजे!
म्हणूनच श्रीसमर्थही म्हणतात..
सद्गुरुवचन हृदयी धरी | तोचि मोक्षाचा अधिकारी | श्रवण्-मनन केलेचि करी | अत्यादरे ||
'अत्यादरे' हा शब्द महत्त्वाचा... कोणत्यातरी 'रहस्यकथा' आपण कसे 'लोळत' वाचतो... असा 'आदर' नाही चालणार! 'आदराने' जसे आपण 'स्मरण' करतो... तसाच आपल्यास झालेल्या 'स्मरणाचा' ही 'आदर' करता आला पाहीजे.
साधे जेवायचे असेल तर अगोदर आपण हात धूतो.. अगदि आजारी असलो तरी.. इतरांना त्याचे महत्त्व पटवून देतो.. इथतर प्रत्यक्ष श्रीसद्गुरुस्मरण-श्रीचरित्रवाचन आहे... 'आदर' हा असलाच पाहीजे. प.पू.श्रीटेंब्येस्वामींचे('श्रीचरणी'साष्टांग नमस्कार) हे 'स्मरण' असे होते की अगदि पाच-पाच मिनीटांनी त्याचे हात जोडलेले असायचे.
शास्त्रांनी सांगितलेले फळ पाहिजे असेल त्याप्रमाणेच झाले पाहीजे.. आपल्या मनास आवडते म्हणून ...मनोमार्गे गेला तो बुडाला! जे 'मन' स्थिर करायचे आहे...मनाचे 'उन्मन' करायचे आहे... त्याच मनाचे ऐकून.. कसेही शास्त्रविरोधी वागले तर हे कसे साधनार? अगदी साध 'खुळ पिठल', 'झुणका' आणि पिठल्याच्या वड्या ( तोंडाला पाणी सुटले...स्मरणाचा परिणाम.. :))करायच्या असतील तर करायची पद्धत बदलते..मनाने कसेही केले तर चालत नाही..! पाणी म्हटले की 'H2O' असे समीकरण.. दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन असेच भाग पाहीजेत.... दोन्हीही वातावरणात असतात म्हणून लगेच त्याचे पाणी होत नाही....!
असो,
'श्रद्धा' असेल तर हा 'आदर' ही आपोआप येतो...असे शास्त्र सांगते.
धन्यवाद!( हे सहज ...विषय समजावा म्हणून..अजून काही नाही!):)
अगदी साध 'खुळ पिठल', 'झुणका'
अगदी साध 'खुळ पिठल', 'झुणका' आणि पिठल्याच्या वड्या ( तोंडाला पाणी सुटले...स्मरणाचा परिणाम.. >>>
माझ्यापण तोंडाला पाणी सुटले.
सावट, श्रीसाईसच्चरिताचा ३२वा अध्याय श्रीसद्गुरु कसे असतात याबद्दल खूप काही सांगतो. माझा सगळ्यात आवडता अध्याय आहे हा.
मध्यंतरी ( ९ मे २०१० )
मध्यंतरी ( ९ मे २०१० ) पुण्यात श्री गजानन विजय या ग्रंथच्या सामुहिक पारायणाचा सोहळा झाला. या प्रसंगी काशीचे शंकराचार्य म्हणाले. श्री गजानन विजय हा श्री गजानान महाराज शेगाव याच्या अद्भुत लिलां असलेला ग्रंथ जो वाचतो त्याला श्री गजानन महाराजांनी जी पुण्यप्रद कर्म केल त्याच फळ मिळत. ( स्वतः महाराज पाप पुण्य याच्या पलिकडचे असल्यामुळे त्यांनी अपेक्षारहित कर्म केलेली आहेत. ) पण कर्माच फळ हे असतच आणि ते भक्तांना त्यांच्या चरित्रवाचनाने मिळत.
मा. सावटजी,
तो दिप संपुर्ण विझु नये म्हणुन मी रोज एक अध्याय वाचन करतो त्याच सोबत महाराजांचे दर्शन आणि काही नित्य उपासना मात्र नित्य करतो.
अरे बापरे, मा.
अरे बापरे,
मा. नितीनजी,
>>>परमेश्वर खरच दयाळु आहे. मला पुढे पडणारे प्रश्न व त्याची उत्तरे याची सोय आधिच करुन ठेवणे ही कृपा फक्त परमेश्वर करु जाणे.
याचा प्रत्ययही कसा लगेच आला बघा...
>>>या प्रसंगी काशीचे श्रीशंकराचार्य म्हणाले. श्री गजानन विजय हा श्री गजानान महाराज शेगाव याच्या अद्भुत लिलां असलेला ग्रंथ जो वाचतो त्याला श्री गजानन महाराजांनी जी पुण्यप्रद कर्म केल त्याच फळ मिळत. ( स्वतः महाराज पाप पुण्य याच्या पलिकडचे असल्यामुळे त्यांनी अपेक्षारहित कर्म केलेली आहेत. ) पण कर्माच फळ हे असतच आणि ते भक्तांना त्यांच्या चरित्रवाचनाने मिळत.
यातच आपले 'सगुण-निर्गुणाचे' उत्तर आले आहे ...
आपण सगळे पाप-पुण्याच्या अलिकडचे.... वासनाधारी..सकामधारी..सगुण..म्हणूनच आपली 'उपासना'(श्रीचरित्र वाचन) सगुण, म्हणजेच.. म्हणूनच ..त्याचे फळ ही असतेच्...म्हणूनच प.पू.श्रीब्रह्मचैतन्यमहाराजही म्हणतात..'सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो', म्हणतो, त्याला त्याचे मर्मच नाही कळले. खरी तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याला नाही ते कळत.
तर 'निर्गुण' म्हणजे जसे प.पू.श्रीगजानन महाराज...पाप-पुण्याच्या पलिकडचे.... पुण्यकर्मच...पण निष्कामपणे..अपेक्षारहित करणारे- होणारे! जशी नदी..आपल्या पाण्याने अधिकार-अनाधिकार न पहाता, तहान भागवणारी..संतोष-समाधान देणारी अशी असते...!
पण होत काय.. पाणी 'निर्गुण' आहे, पण आपण पडलो 'सगुण'..मग पाणी-पाणी तेरा रंग कैसा..जिसमे मिलाया वैसा...किंवा पाणीएकच पण मिरचीच्या झाडाने शोषलेले पाणी... तिखटच होते..., चिकुच्या झाडातले पाणी चिकुत गोड लागते..दोष पाण्याचा नाही..तर झाडात जन्मतःच असणार्या गुणाचा आहे.
जर आपल्या सत्व-रज-तम या त्रिगुणांचा(सगुण) रंग पाण्यास(निर्गुण) चढावयास नको असेल तर अगोदर आपण पाण्याच्या गुणाचे(बहुगुणी) झाले पाहिजे अन्यथा हे कदापि शक्य नाही.... हेच आपले 'साध्य' आहे.
म्हणजेच,
प.पू.श्रीमाऊली म्हणतात... ध्यानचि ध्यानातें प्रसवे|
हे पहील ध्यान म्हणजे 'सगुण'..मनाने करायचे ..या ध्यानातून दुसरे ध्यान म्हणजे..उन्मनी ध्यान..अमनस्क ध्यान प्रसवते..जन्मास येते ... हे आपोआप होते..म्हणूनच ते 'निर्गुण' होय.
प.पू.श्रीसमर्थ म्हणतात...सगुणाचेनि आधारे | निर्गुण पाविजे निर्धारे ||
निर्गुण होणे हे 'साध्य' असले तरीही... आपण 'सगुणात' असल्यामूळे आपल्या उपासनेची-आलंबनाची सुरुवात ही त्या 'सगुणाचा' आधार असलेलीच असते..मग आपण त्याला अज्ञानाने 'निर्गुण' म्हटले तरी.. ती उपासना आपणच करतोय म्हटल्यावर ...मिरचीतल्या पाण्याप्रमाणे ती तिखटच असणार...'सगुणच' असणार...असायलाच हवी!
म्हणूनच
प.पू.श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात ...ध्यानात स्वतःचा विसर पडु लागला तर निर्गुण आणखी कोणते राहिले?
हे जे विसरणे आहे... विस्मरण ते त्रिगुणांनी-सगुणांनी बांधलेल्या देहाचे आहे... असे झाले तर मग रहाते ते अर्थात 'निर्गुण-परमात्मा'.
पण असे होणे सोपे नाही!आपल्या अखंड स्मरण असते ते संसाराचे..आणि संसार म्हणजे वासना... जशा वासना तसा देह.. तसा स्वभाव(मिरचीसारखा तिखट)! म्हणजे आपण 'मी' म्हणजे 'देह' आणि या देहाला जे आवडते.. ते मला आवडते..या आपल्या स्वभावात अतिशय बेमालूम रित्या गुंडाळले गेलोय. 'मी' आणि 'माझे' असे आपले अखंड स्मरण चालले असते..! असे असताना आपण केलेली उपासना कशी काय 'निर्गुण' असू शकते?
धन्यवाद!:)
धन्य्वाद सावटजी, आपापल्या
धन्य्वाद सावटजी,
आपापल्या परीने प्रत्येक गुरुवर्यांनी सगुण आणि निर्गुण चे जे वर्णन केले आहे ते तात्विक दृष्ट्या एकसारखेच आहे. पाणी आणि जल हे शब्द भेद आहेत याने पाण्याच्या गुणात बदल होत नाही.
माधवा, कोठे हरवलात? माझे काही
माधवा,
कोठे हरवलात? माझे काही चुकल तर नाही ना?
'श्रीगजानन विजय' हा विषय निघालाय... बोला काहीतरी, मागे राहून कसे चालेल?
सुरुवात करून देतो... श्रीदासगणू महाराजांचे 'श्रीवचन'.. आपणच सांगितलेले..
धर्म बापा ज्याचा त्यानी | प्रिय मानावा प्राणाहूनी |
परी विधर्म्याच्या ठिकाणी | अलोट प्रेम धरावे ||
धन्यवाद!
मा. सावट्जी, श्री गजानान विजय
मा. सावट्जी,
श्री गजानान विजय बद्दल मी लिहले होते. ज्याच्या मनात भक्तीचा उदय होतो त्याच्या मनात प्रेम हे उत्पन्न होतेच. तो परधर्मीय असो वा अन्य कोणी.
नुसतेच माणसाविषयी नाही तर अवघ्या चराचरावर प्रेम उत्पन्न होतो.
गाढवाला गंगा पाजणारे एकनाथ महाराज असोत की विंचवाला बुडताना वाचवणारे कुणी साधु असोत. हा प्रेमाचा झरा सर्व साधु संताकडे सतत दिसतो.
जे कृत्य प्रेमावीण
ते ते अवघे हीन
अशी भक्तीमार्गाची माहिती या ग्रंथात आहे.
धन्यवाद..मा.
धन्यवाद..मा. नितीनजी,
'श्रीगजानन विजय' या श्रीचरित्रात.. सहाव्या अध्यायात प.पू. श्रीसद्गुरु गजाननमहाराज आणि श्री नरसिंगजी यांच्या अकोट येथे झालेले भेटीचे वर्णन करताना 'श्रीवचन' म्हणते...
सारखा भेटे सारख्यासी | पाणीच मिळे पाण्याशी |
विजातीय द्रव्यासी | समरसता होणें नसे || ५३ ||
याविषयी अजून काहीतरी सांगा ना!
धन्यवाद!
हा ग्रंथ लिहताना
हा ग्रंथ लिहताना दासगणुमहाराजांनी अनेक देवतांचे स्म्हरण केले आहे, संतांची स्तुती केली आहे. सर्व संतांना विनंती करुन दासगणु महाराज म्हणतात मी निमीत्त आहे. मी लेखणी आहे. तुम्ही सर्व संत दासगणु नावाची लेखणी धारण करुन हा ग्रंथ लिहावा.
मला असाच भास होतो आहे. सावटजी, तुम्ही या अवगुणदासा हाती धरुन तुम्हाला हव ते वदवुन घेत आहात.
असो अध्यात्मात कोणाचीही इच्छा प्रत्यक्ष परमेश्वराची आज्ञा गृहीत धरावी. शिक्षक जेव्हा आपल्याला कविता म्हणायला सांगतात तेव्हा त्यांना ती माहित नसते अस नाही. आपला अभ्यास ते पहात असतात.
सावटजी तुमची आणि माझी आवड किंवा ओढ सारखी आहे. अर्थातच या आवडीमुळे विचार जुळतात. आपल्याशी माझा जेव्हडा संवाद आहे तेव्हडा मी नास्तीकाशी करणार नाही. किंबहुना मी त्याला ईश्वराचे अस्तित्व आहे हे सुध्दा सांगण्याचा प्रयत्न करणार नाही.
हेच सांगणे या ओवीतुन असावे.
मा. नितीनजी, >>>ज्याच्या मनात
मा. नितीनजी,
>>>ज्याच्या मनात भक्तीचा उदय होतो त्याच्या मनात प्रेम हे उत्पन्न होतेच.
'प्रेम' कशाने-कसे उत्पन्न होते? कारण...
"जे कृत्य प्रेमावीण
ते ते अवघे हीन"
मग जर 'प्रेमच' नसेल तर सगळे 'कर्म'( ते कसेही असो ) हीनच... अधोगतीस 'कारण' स्वरुप होणार.. होय ना! मग अशा कर्मात 'भक्ती' कशी असेल...किंवा भक्तीचा उदयही कसा असेल?:)
धन्यवाद!
मा. नितीनजी, प्रश्न
मा. नितीनजी,
प्रश्न विचारतोय... कारण आपण जे करतोय..म्हणतोय, याच्यावर आपलेच...स्वतःचेच चिंतन होणे गरजेचे आहे. 'मी' अस्तिक आहे...याच्यातून पुढे जाऊन मी 'ब्रम्ह' आहे, याचा, याची देही अनुभव घ्यायचा असेल तर 'चिंतन' हवेच... !
>>>तो दिप संपुर्ण विझु नये म्हणुन मी रोज एक अध्याय वाचन करतो त्याच सोबत महाराजांचे दर्शन आणि काही नित्य उपासना मात्र नित्य करतो.
श्रीचरित्र वाचन...श्रीचरणदर्शन आणि श्रीनित्योपासना यातून आपल्याला काय साध्य व्हावे असे वाटते?
>>>माझा जेव्हडा संवाद आहे तेव्हडा मी नास्तीकाशी करणार नाही. किंबहुना मी त्याला ईश्वराचे अस्तित्व आहे हे सुध्दा सांगण्याचा प्रयत्न करणार नाही.
आपण ईश्वराचे आस्तित्व मानतो.... असे म्हणणे, ही 'श्रद्धा' म्हणजे 'अंधश्रद्धाच' नाही काय.. किंबहूना अशा न पाहीलेल्या-ऐकीव गोष्टीवर असणारी-बसणारी आपली श्रद्धा, ही स्वभावत:च 'आंधळी' असते... नाही काय? त्या श्रद्धेला परत आंधळी असे 'विशेषण' लावणे म्हणजे ...पितांबर 'पिवळा' आहे, असे म्हणने होणार नाही काय?
'परमार्थ' समजून-उमजून केल्यास लवकर फळतो... म्हणूनच...
आपण सांगितलेल्या गोष्टीतच आपल्याला अडकवतो...
>>>असो अध्यात्मात कोणाचीही इच्छा प्रत्यक्ष परमेश्वराची आज्ञा गृहीत धरावी.
धन्यवाद!
मा. नितीनजी, >>>तसेच
मा. नितीनजी,
>>>तसेच ईश्वरप्रणिधान यावर अन्य कोणी काहीही न विचारल्यामुळे टाळतो आहे.
श्रीपतंजली महामुनींनी जो 'योग'(श्रीभगवंताशी जोडणे) सांगितला आहे.. त्याला आठ अंगाचा 'क्रम' आहे.. ... त्यातील द्वितीय अंग म्हणजे 'नियम'.
हे नियम पाच आहेत.. शौच्,संतोष, तप, स्वाध्याय आणि आपण विचारलेले .. ईश्वरप्रणिधान...याचा अर्थ आहे .. स्मरण... श्रीसद्गुरू-श्रीभगवतांचे स्मरण सतत ठेवणे.
यातील 'सतत' हा शब्द महत्वाचा... आणि स्मरणाला उपयोगी काय पडते.. हे माहीत असणे महत्वाचे.
धन्यवाद!
सावट, नमस्कार! सावट तुम्ही हे
सावट, नमस्कार!
सावट तुम्ही हे इतके सगळे कसे आणि कधी वाचता? आणि इतके संदर्भ अचूक कसे काढता? मला नेहमीच कोडे पडते.
'श्रीगजानन विजय' हा विषय निघालाय... बोला काहीतरी, मागे राहून कसे चालेल? >>
काय बोलणार? दासगणूंच्या भाषेतच सांगायचे तर प्रत्यक्ष सूर्याला काजवा काय प्रकाश देऊ शकणार?
सावट, तुम्हीच या बाफच्या अकराव्या पानावर विचारले होते "दिशाहीन का म्हणून?"
आतापर्यंत खूप काही वाचले - कधी गरज म्हणून तर कधी मनोरंजन म्हणून. पण आज विचार केला तर जाणवते की 'श्रीगजानन विजय' वाचायला लागण्या आधीचे वाचन म्हणजे दिशाहीन वाटचालच होती. पण वाचत राहिलो म्हणून तर तो ग्रंथ हाती लागला.
माधवा नमस्कार.. तुम्ही आलात
माधवा नमस्कार..
तुम्ही आलात आणि भरून पावलो.. मला वाटले रागावलात की काय!:)
खर सांगू... माणसाचे 'मन' त्याला कायम उन्नतीच्या मार्गानेच नेत असते.. पटायला अवघड आहे.. पण हेच 'अध्यात्मिक-सत्य' आहे... असो!
श्रीगजानन-बाबाचे श्रीचरण मिळाले.. यातच 'सर्व' काही मिळाले.. बस तेच घट्ट धरून ठेवायचे.. हाच संदर्भ महत्त्वाचा... बाकी सगळे संदर्भहीन ! ... पुर्वदिशेच्या मार्गाला लागले की ती.. पाठीमागची पश्चिंम आणि तो पश्चिममार्ग आपोआप मागे पडू लागतो..!
असो ..असाच लोभ असावा!
धन्यवाद!
श्रीगजानन-बाबाचे श्रीचरण
श्रीगजानन-बाबाचे श्रीचरण मिळाले.. यातच 'सर्व' काही मिळाले.. बस तेच घट्ट धरून ठेवायचे.. हाच संदर्भ महत्त्वाचा... बाकी सगळे संदर्भहीन ! ... पुर्वदिशेच्या मार्गाला लागले की ती.. पाठीमागची पश्चिंम आणि तो पश्चिममार्ग आपोआप मागे पडू लागतो..!
पावलो पावलो गुरुराया |
अंतरी सतत असु द्यावी दया |
मा. नितीनजी, आपण," 'स्पष्ट'
मा. नितीनजी,
आपण," 'स्पष्ट' कळावे", असे लिहलेत... म्हणूनच.. त्याच्याच आधाराने लिहीतोय... काही चुकल्यास क्षमा असावी!
आपल्याला चोवीस तास 'स्मरण' कशाचे असते..तर संसाराचे...मग आपल्याला 'संग' ही तसाच लाभतो. संसार म्हणजेच 'वासना'! म्हणूनच या 'चोवीस' तासातले काही 'निमिष' जर योग्य 'स्मरण' करण्यात नित्य्-नियमित घालवले.. तसे करण्याचा अभ्यास सुरू केला...तर खात्रीने आपल्याला 'संग' ही तसाच लाभेल आणि आपला स्वभाव बदलेल.. अंतःकरण शुद्ध होईल... तसे शास्त्रवचन आहे. )
अशी स्मरणाविषयी 'पोस्ट'( 30 Oct, 2010) लिहल्यानंतरही.. आपली पुढची 'पोस्ट' ( 5 Nov, 2010)अशी आली...
>>>येथे सगुण आणि निर्गुण तसेच ईश्वरप्रणिधान(स्मरण) यावर अन्य कोणी काहीही न विचारल्यामुळे टाळतो आहे.
आणि त्याच 'पोस्ट' मध्ये आपण असेही लिहलेत...
>>>परमेश्वर खरच दयाळु आहे. मला पुढे पडणारे प्रश्न व त्याची उत्तरे याची सोय आधिच करुन ठेवणे ही कृपा फक्त परमेश्वर करु जाणे.
परत 11 Nov, 2010 च्या पोस्ट मध्येही...
'आदराने' जसे आपण 'स्मरण' करतो... तसाच आपल्यास झालेल्या 'स्मरणाचा' ही 'आदर' करता आला पाहीजे.
असे स्मरणा( ईश्वरप्रणिधान)बद्द्लच लिहले गेले.
'अगोदर' (आणि नंतरही)... 'उत्तर' मिळूनही... आपल्याला 'पुढे'(मध्ये) परत तोच 'प्रश्न' पडावा... असे कशामूळे होत असेल?:)
धन्यवाद!
Pages