न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजु कडुन विमान पकडल तर दोन तासात डॅलस येत . Uhoh तसच न्यु जर्सी हुन पण विमानाने चार तासात इकडे पोचता येईल. सगळेजण मावण्याइतपत माझं घर आणि मन दोन्ही मोठी आहेत. Wink

सगळेजण मावण्याइतपत माझं घर आणि मन दोन्ही मोठी आहेत. >>

सीमा, माझ्या लेकिचं लग्न तुझ्या इथेच करायला पाहिजे मग. Happy

मस्त धमाल आली सगळ्यांना भेटून. बाईंचं गाणं रेकॉर्ड करायला हवं होतं ( अन त्यावर्ची किरणची कॉमेंट ). मसाले भात, बिर्याणी, कटलेट , डिप्स, राजमा, लाडु, चिवडा, लोणचं, चिकन करी, फिश, कोलंबी, कुर्ल्या , मोदक, विडे सगळे प्रकार एकदम भारी !
टण्याला करोना आवडली बहुतेक ! .

स्ट्रॉ शॉ के अन ब्राउनीज पण लाजवाब.

काल संध्याकाळी लेकीने विचारलं ' हे सगळे तुझे मुंबईतल्या कॉलेजमधले फ्रेंड्स का ' ? Proud

आमच्याकडे मायबोली जीटीजीचा विषय निघाला(च) तर दाजी फक्त 'तुम्ही सगळे किती बोलता!' इतकंच म्हणतात. Proud
(इतकं बोललं की त्यांचा महिन्याभराचा कोटा संपतो. तोवर इतर विषयही सुचतात. :P)

बुवा, मैत्रेयी, मस्त. मजा आली वाचून. विकुंची कॉमेडी मी मिस केली म्हणायची. कारण परतीच्या प्रवासातही मी आणि विकु गंभीरच बोलत होतो. Happy

लालू, सिंडे, फोटो मिळाले. छान आले आहेत. धन्यवाद! Happy

मी माझा वृत्तांत लिहितो संध्याकाळी.

लालू, सिंडे मला फोटो पाठवा. मजा केलेली दिसतेय तुम्ही सगळ्यांनी. मी मेनु पाहुन गार झाले Uhoh
मेनुचे फोटो कोणी काढले असतील तर मला पाठवा.

ह्यावेळची उसगाव वारी तशी बर्‍यापैकी गडबडीत ठरली. त्यात त्या आधीचे २-३ आठवडे मी प्रवासाला गेलेलो. निघताना ज्यानी कुणी सांगितले आहे त्यांची पुस्तके न्यायची व तिकडून टपालाने पाठवायची असा बेत होता. तो बेत फारच लवकर एवेएठीमध्ये बदलला. भाईंनी अत्यंत तत्परतेने बाफ उघडला. मी तिकीटं काढली आणि फिलीला जायचा बेत ठरला अशी एकुणात पार्श्वभुमी.

तर शुक्रवारी दुपारी डॅलसमध्ये राहणार्‍या इथल्या प्लांटमधील कामगाराने मला अगदी थेट विमानतळावर गेट पर्यंत सोडले. विमान १ तास उशीरा. Sad पण त्यामुळे जरीला वाचून झाले. पाच-सहा दिवसात बिढार-हूल-जरीला अशी तीन पुस्तके लागोपाठ वाचून काढल्याने डोक्यावर बर्‍यापैकी परिणाम झाला होता. (इकडे टेक्सासमध्ये माझ्यापेक्षाही खूप जाड-जूड प्रचंड लोकं असल्याने गुरुत्वाकर्षणाचा परिणामदेखील झाला असावा). माझ्याकडे मोबाईल नाही आणि बरेचसे पब्लिक फोन नादुरुस्त असतात अश्या दोन कारणांमुळे मी माबोचा काना-सदरा घालून उभे रहावे, मी आणि मृ तुला घ्यायला येउ असे शोनूने सांगितले. मी विमानतळातून बाहेर पडून दिव्याच्या खाली छाती फुगवून उभा राहिलो जेणे करुन माबोचा काना-सदरा दिसेल. पण शोनू सर्दीने हैराण झाल्याने श्रीच मला न्यायला आले होते. माझ्यामुळे त्यांना फार उशीरपर्यंत थांबायला लागले पण त्यांनी मलाच 'खूप वेळ वाट नाही ना बघत थांबायला लागलं' म्हणुन खजील केलं. विमानतळ ते त्यांचे घर हे अंतरही तसे बरेच आहे. पण फॉल कलर्स, ते उत्तर अमेरिकेतच का दिसतात इथपासून हैद्राबादचे इन्फ्रास्ट्रक्चर असे प्रचंड बोलून मी त्यांना लै बोअर केले असणार.
जंगल पार करून घरी पोचलो तर दारात शोनू. तिचा फोटो मागच्या एखाद्या गटगच्या फोटोत बघितला असल्याने सधारण अंदाज होता. पण तिच्याच मागे साधारण २६-२७ वर्षांची दिसणार्‍या एका मुलीने 'आलास..' असं विचारल्यावर मी एकदम उडालोच. ती मृण्मयी होती. Proud
लगेच एक बीअर मिळाल्याने माझा घसापण मोकळा झाला. मग बराच वेळ गप्पा सुरु होत्या. तीत दिवाळी, गणपती, फळी, गुलमोहर, झक्की, नळ असे सर्व विषय एकदातरी येउन गेलेच. इतर कुणीही नसले तरी दोघींनी नळाला बिलकूल नावे ठेवली नाहीत, उलट डिफेंडच केले. त्यामुळे मौल्यवान गॉसिप मिळण्याच्या माझ्या आशेला हादरा बसला.
झूल वाचायची शिल्लक असल्याने रात्री कधीतरी मी वाचता वाचता झोपलो. सकाळी एकदा उठलो तेव्हा भिंतीवरच्या घड्याळात ६:३० वाजले होते. म्हणुन पुन्हा झोपलो. पुन्हा थोड्या वेळाने उठलो तर पुन्हा ६:३०च दिसले. पण ते ७:३० असावेत अशी समजूत करून पुन्हा झोपलो. मग अनन्याला बहुतेक माझा हा गोंधळ समजला असावा कारण तिने मला उठल्या उठल्या पहिली गोष्ट दाखवली ती म्हणजे एक छोटेसे घड्याळ व त्यात ८:३० वाजले होते. चहा/इडली वगैरे हाणत कुणाचे लक्ष फारसे नसले की हळू आवाजात 'मी काही मदत करू का' असे मी अधूनमधून विचारुन घेतले. ते बहुतेक शोनूच्या लक्षात आले कारण मग आम्ही बाहेरच फिरायला निघालो. शोनूची ही घरकूल वसाहत म्हणजे लैच भारी आहे. एव्हड्या मोठ्या शहराच्या उपनगरात एव्हडं शांत आवार. लैच भारी. गराज सेल लागला होता. अपेक्षेनुसार शोनूने पटापट पुस्तकेच घेतली. हे म्हणजे महानच. Happy

मग परतलो तर दहा मिनिटात सिंडी धडकली. ती सात्विक संतापाने क्रोधित झाली होती. मला वाटले की सँटी आला की मार खाणार. पण त्याच्या सुदैवाने व सिंडीच्या दुर्दैवाने सँटी येइतो बरेच लोक आले होते व त्याने आल्याआल्या गंआवि (ग च्या पुढे आ आला की लगेच पुढे आ वाचू नये) चर्चा विकुंबरोबर सुरू केली. शबनम, सदरा, उंच-शिडशिडीत, नुकत्याच प्यायलेल्या विडीचा अजूबाजूस दळवणारा वास, पांढरे राठ जेमतेम भांग पाडलेले केस असं अर्धकम्युनिस्ट, सार्कॅस्टिक मनुष्य व्हायचं त्या ऐवजी चुकून अमेरिकेत गेलेला मनुष्य अशी माझी विकुंबद्दल कल्पना होती. तीस त्यांनी समूळ हादरा दिला. असो.
सिंडीचा राग शांत होइपर्यंत कांदा चिरण्यास सुरुवात झाली. मी जेव्हडी शक्य आहे तेव्हडी बारीक कोथिंबीर चिरली तर त्याकडे सिंडिने जणु काही मी कोथिंबिरीच्या दोन-चार इंच काड्याकाड्याच कापल्या आहेत अश्या तर्‍हेने बघितले. मग मी कांदा चिरायला घेतला आणि थोडा थोडा बारीक व त्यात लपवून जाड जाड कांदा चिरला. तेव्हड्यात लाल्वाक्का, रॉणी, नितीन आले. लाल्वाक्कांचं बोलणं आणि आवाज दोन्ही कोल्हापूरची शान राखणारे आहे. लाल्वाक्कांनी, रॉणीने आल्याआल्या पोतडीतून खाण्याच्या नानाविध वस्तू बाहेर काढल्या. सिंडी, रॉनी, नितीन अशी तीन तीन माणसं असल्याने मी श्वास रोखून, पोट खूप आत ओढून थोडा वेळ काढला. तितक्यात सर्प्राइज पाहुणे किरण, अमृता आणि असामी आले. जायची गडबड असूनदेखील हे आले ते भारीच. किरण आणि असामी दोघेही प्रचंड शांत लोकं आहेत. मला लहानपणापासून असे शांत आवाजात बोलणारे लोक लै भारी वाटतात कारण मला शीरा ताणून ताणूनच बोलता येतं. असाम्यानं तर मी 'असामी' हे इतके हळू सांगितले की मी अ ऐकलाच नाही. त्यामुळे चुकीच्या किनार्‍यावरून समीर आला असेच मला वाटले. पण पर्व पर्व असं एकदोनदा सिंडी-शोनू-असामी ह्या व्यक्तिसमुच्चयातून ऐकू आलं त्यावरुन मी हाच असामी हे ताडले. रॉणी/नितीन/सिंडी कमी होते की काय म्हणुन किरण/अमृता/असाम्या ह्या तश्या सडपातळ लोकांची तीत भर पडली व मला श्वासोच्छ्वासास अत्यंत अडचण होउ लागली. पण 'किरमिजीपेयप्राशकल्लामाभक्षकमाचुशिखरीस्थितविश्शेबारा' देवाने माझी हाक ऐकली आणि बाराकरांची गाडी येउन धडकली.

टण्या, विकु आमच्याबरोबर गाडीत होते. ते कुठे सँटीबरोबर चर्चा करतायत. बिचारे जीव मुठीत घेऊन पोचलेत शोनूच्या घरापर्यंत.

Lol अरे कोणाला विकु म्हणतोय हा? ट्ण्या अरे कशाचा बाबा हा परिणाम? विकु बरोबर आहे पण वेळ मागे पुढे झालेली दिसते. Happy

मी पण पान नं २६ वर माझा वृत्तांत अपडेट केलाय. Happy एका दमात पुर्ण करणे अशक्य आहे.

भारीये Biggrin

काड्याकाड्याच कापल्या आहेत अश्या तर्‍हेने बघितले >>> त्याला तुच्छ कटाक्ष म्हणतात.

टण्या मला बारीक म्हणतोय ह्यावरुन त्याने कांदा आणि कोथिंबीर कितीक बारीक चिरला असणार हे चाणाक्ष (उर्फ भोचक) वाचकांच्या लक्षात आले असेलच Proud

वृत्तांत नवीन पोस्टमध्येच लिहावेत ~हुक्मावर्नं Proud

अरे सँटी आल्यावर थोडा लांब-लांब थांबला आणि तुम्ही लोक आल्याबरोबर विकुंशी चर्चा करू लागला ना.

मस्त रे टण्या!! Lol

सँटीने विकुंना की विकुंनी सँटीला पकडले ते त्यांनाच माहिती.. आम्हाला आपलं वाटलं विकु स्थळं घेऊन आलेत म्हणून कोपर्‍यात बसून चर्चा करतायत! त्यातून झक्कींनी हा विषय (आणि पण एक दोन Proud ) काढायचा नाही म्हणून तंबी दिली होती Wink

>>>पण तिच्याच मागे साधारण २६-२७ वर्षांची दिसणार्‍या एका मुलीने 'आलास..' असं विचारल्यावर मी एकदम उडालोच. ती मृण्मयी होती. Biggrin मग दुसर्‍याच क्षणी आम्ही सगळे लख्ख उजेडात आलो आणि टण्याने स्वतःचा फॉगी झालेला चष्मा पुसला. Proud

>>'किरमिजीपेयप्राशकल्लामाभक्षकमाचुशिखरीस्थितविश्शेबारा' Lol

बुवा, धमाल लिहिताय हो.

झक्कींच्या बागेतल्या मिरच्यांचा उल्लेख राहिलाच. बशीतून उतरून घरात आल्यावर झक्कींनी खिसे (स्वतःच्या झब्ब्याचे) धुंडाळायला सुरुवात केली. 'इतकं महत्त्वाचं काय शोधताहात' हे विचारणारच होते, तेवढ्यात त्यांनी दोन बारक्या मिरच्या जादुगाराने टोपीतून ससा काढावा त्या स्टाइलीत काढल्या. "आमच्या बागेतल्या आहेत. बाकीच्या मिरच्या खिशातून गळल्या वाटतं" असं पण सांगितलं. मग सिंडीने त्या दोन मिरच्यांचे, नव्या बाळांचे फोटो काढावेत त्या उत्साहात फोटो काढले.

mirachyaa-zakki-GTG.JPG

खिश्यातून गळलेल्या मिरच्या गाडीत पडल्या, घरात पडल्या, की आणखी कुठे ते परमेश्वर जाणे. अद्याप कुणी त्या कुठेही झोंबल्याची तक्रार केलेली नाही.

हो रे टण्या, मी विकुंबरोबर गं आणि वि चर्चा केली ते बरोबर आहे. पण 'सॅन्टी विकुंशी चर्चा करु लागला' हे तू 'बाराची गाडी येऊन धडकली' च्या आधी लिहिले आहेस. विकु बाराच्या गाडीतून आले ना... Proud

बाकी झक्कींना सदर्‍या-लेंग्याचे फार प्रेम आहे. त्या लेंगे चोरणार्‍या महाठक नैनाचे गाणे बाईंनी गायला सुरु केली तर झक्कींनी लेंगा (स्वतःचा) घट्ट पकडून ठेवला अगदी.

>> हो रे टण्या, मी विकुंबरोबर गं आणि वि चर्चा केली ते बरोबर आहे. पण 'सॅन्टी विकुंशी चर्चा करु लागला' हे तू 'बाराची गाडी येऊन धडकली' च्या आधी लिहिले आहेस. विकु बाराच्या गाडीतून आले ना... >>> अरे ते non-chronological ऑर्डरमध्ये आहे. समजून घ्या बघू.

कंफेशन मोड ऑन

१. मृसाठी म्हणून आणलेली विड्याची पानं इथेच राहिली. म्हणुन आज परत जेवणानंतर विडा !
२. तळघरातल्या पसार्‍यातून फोटो शोधून काढायचे जिवावर आल्याने मायबोलीकर माचूपिच्चूचे फोटो पाहण्याला मुकले.
३. तिथूनच आणलेले एक लामाच्या शेपचे लॉकेट पण आहे. ते सुद्धा मंगळसुत्र, जोडवी इत्यादी जा ख वस्तूंबरोबर ब्यांकेच्या तळघरात सुखरूप असल्याने ते प्रत्येक मायबोलीकराच्या डोक्याला लावण्याचा चांस मिळाला नाही
४. रुनी व फचिन यांनी पुस्तके आवरण्याचे कबूल केले होते. पण ते दिसतात तितके तरूण नसल्याने ( वयोमानपरत्वे ) त्यांना त्याचे विस्मरण झाले आहे.
५. माझ्या मुलांना जुई मधला ज म्हणता येत नाही . ती दोघं झूई म्हणत होती. जुई अन जुईच्या आई बाबांना बहुतेक त्याची सवय असावी
६. २ व ३ चे प्रायश्चित्त म्हणून पुढच्या गटग ला पिस्को सावर (Pisco Sour) हे पेरुव्हियन पेय आणेन असे मी त्या देवाला वचन दिले आहे .

बुवा, अहो क्रमशः वृत्तांत नवीन पोष्टीत लिहा. नाहीतर कळतच नाही कधी अपडेट झाला ते.. आणि मागे जाऊन वाचत बसावे लागते.

Pages