न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है पन्ना. ४ च महिन्यात तुझा बाराकरांबद्द्लचा अभिमान उफाळून आला.:)

आसाम्या जरी तुला म्हणाला असला तरी बाराकरांपर्यंत तूच पोहचवलंस नं, मग उत्तर तूलाच नको का द्यायला? तू उलटं आसाम्या पर्यंत पोचवशीलच.

रच्याकने, बाईंनी कितीही आवाज बसला होता असं लिहीलं तरी माबोकरांखेरीज अजून एक लहान श्रोता बाईंना लाभला Happy खेळता खेळता थांबून शांतपणे बाईंचं गाणं ऐकलं त्याने!

टण्या, बुवा व्रुत्तांत लवकर पुरे करा बघू. हि अम्रुता स्वतः पळून चालली उथे काड्या टाकून Lol

हो. तो अ‍ॅलेक भारीच ऐकत होता हं गाणं.>> हे बाकी खरच. बाई गात असताना त्याचा फोटो नाहि का काढला कोणी ?

त्याचं नाव अ‍ॅलेक का? अच्छा, तो बहुतेक बुवा ,फचिन, भाई गाताना थांबला असावा. बाई गाताना तिथे थांबला नसावा कारण ह्या बर्‍याच गातील असा विश्वास वाटला असावा त्याला. Proud

कारण ह्या बर्‍याच गातील असा विश्वास वाटला असावा त्याला>>नाहि ग. बाई गात असताना आलेला तो. जिन्यावर चढता चढता थांबला आणि खाली वाकून बाई काय करताहेय ते बघू लागला. मग उतरून श्रीच्या पाठून (बहुतेक) ऐकत होता.

अरे तो जाम विनोदी आहे अ‍ॅलेक. हो, जिन्यावर थबकला आणि नंतर श्री आणि माझ्या मागे येऊन गाणं ऐकत होता.
थोड्यावेळानी पळत आला आणि श्री ला विचारतो " हाऊ ओल्ड आर यु" मी आणि श्री दोघंही एकदम बुच व कळ्यात पडलो.
ह्या आधी मी जेवण करत असताना इकडे तिकडे दंगा करत होता आणि एकदम माझ्या पाशी आला आणि "मला माझ्या बुटाच्या लेस बांधून दे" म्हंटला. श्री पण घाबरून एकदम अरे ह्याला काय झालय आणि तू ह्याला का सांगितलस असं म्हणत आला. Lol

बाई गात असताना आलेला तो. जिन्यावर चढता चढता थांबला आणि खाली वाकून बाई काय करताहेय ते बघू लागला. मग उतरून श्रीच्या पाठून (बहुतेक) ऐकत होता.>> करेSSटं!
अजून एक म्हणजे बाई गाताना सगळे जागे होते, इतर गायला लागले तसे बरेच नागोबा डुलायला लागले Proud

सिंडीने आणलेली बाईकवरचं बिर्‍हाड अन मास्तरांची सावली ही पुस्तके कोणी नेली आहेत का ? ती माझ्यासाठी ठेवणार होती. पण इथे सापडत नाहीयेत.

(सर्वांचे वृत्तांत लिहून झाले आहेत असे गृहित धरुन) बारा गटगबद्दल काही (fictitious) फॅक्ट्स:
१. कणिक, पाणी, तेल, मीठ ह्यांचे योग्य प्रमाण दिल्यास टण्या आणि फूड प्रोसेसर दोघे व्यवस्थित कणिक मळु शकतात. फूड प्रोसेसर त्यातल्या त्यात बरा कारण तो नेमाडे वाचत नाही आणि त्याचा आवाज बंद करण्यासाठी स्विच असतो.
२. बारा गटगमध्ये सगळ्यात जास्त फोटो झक्कींचे काढले जातात.
२अ. (म्हणून) बाई नेहमी झक्कींच्या आस-पास उभ्या असतात.
३. झक्की केवळ नैना नावाच्या महाठग बाईला घाबरतात. (कारण विचारु नये ~हुक्मावर्नं)
४. पुण्यात गाडगीळांकडे बाकरवड्या घेण्यापेक्षा बॉस्टनला एक्स्पोर्ट क्वालिटीच्या घ्याव्यात.
५. कांदा चिरुन झाल्यावर टण्या सुरी न धुताच खोचून ठेवतो.
६. असामी हळु बोलतो(च) पण त्याला ऐकू सुद्धा कमी येतो. त्यामुळे अर्ध्यांहुन अधिक गोष्टींसाठी तो विपू करा सांगतो.
७. पार्ल्याक्का सुंदर आहेत(च) सुगरण सुद्धा आहेत.
७अ. (त्यामुळेच) (कदाचित) खादाड सुद्धा आहेत.
८. पचेआले हे टचे(सुद्धा)आले आहेत.
९. टण्याचे लग्नापूर्वीचे नाव जमाल आहे.
१०. दिल तो बच्चा है जी गाण्यात केवळ दुसर्‍या कडव्याच्या आधी दोनदा कोरस वापरलय.

पुण्यात गाडगीळांकडे बाकरवड्या घेण्यापेक्षा >>> तुला चितळ्यांकडं म्हणायचं आहे का? गाडगीळ सोनं, चांदी, हिरे वगैरे विकतात.

Lol

Pages