Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल संध्याकाळी मी, सेल स्पीकर
काल संध्याकाळी मी, सेल स्पीकर मोड वर असतांना कानात ईअर फोन लाऊन गाणी एकत होते
(बस मध्ये सेल वरुन FM एकायच म्हणुन हेड फोन कानाला लावले आणी FM ऑन केला, गाणी एकु येत होती पण हेड फोन मधुन आवाज येत नाही जाणवत होत नंतर ऊमगल दुपारी मी सेल चा स्पीकर मोड ऑन केला होता :फिदी:)
तुझ्या अख्ख्या वर्षभराच्या
तुझ्या अख्ख्या वर्षभराच्या पासचे पैसे मी भरते पन तु रोजच्या रोज एक तरी वेंपणा करायचास...बोल आहे कबुल?>>>>> कबुल, कबुल कबुल!!!! पण हे जर काल सांगीतल असत (पास काढुन देण्याच) तर आज सकाळी नवा पास घेण्याचे माझे पैसे वाचले असते
हा पास संपला कि मी कॉन्टॅकते हो मी_आर्या, तुम्हाला 
पास वरुन आठवल सकाळी पास
पास वरुन आठवल सकाळी पास काढायचा म्हणुन पास केंद्र असलेल्या स्टॉप वर ऊतरणार होते जो माझ्या रोजच्या स्टॉप नंतर १-२ स्टॉप गेले कि येतो, पण तो स्टॉप येण्या अगोदरच मध्येच टर्नवर बस थांबली आणी बस मधले ऊरलेले सगळे जण ऊतरले म्हणुन
( तरी मनात मला वाटत होत "ईथे तर स्टॉप नाही बस टर्न झाल्यावर खाली गेली कि आहे
, अश्या वेळी मला शाहरुखचा डायलॉग आवर्जुन आठवतो "अपने दिल कि सुनो")
समु, या दिल की सुनो
समु,
या दिल की सुनो दुनियावालों...... या हमको "बस" मे रेहेने दो.....
समे
समे
समु, या दिल की सुनो
समु,
या दिल की सुनो दुनियावालों...... या हमको "बस" मे रेहेने दो.....
भुंग्या...........(तीच स्माईली)
समू आणि तिची बस!
कालचा आमचा एकत्रित वेंधळेपणा
कालचा आमचा एकत्रित वेंधळेपणा ....

काल संध्याकाळी ई टीव्ही मराठी (बहुतेक) वर श्रींची आरती ऐकली,खुप आवडली ...ही आरती मराठीतल्या गाजलेल्या काही मोजक्या जुन्या,नव्या अभिनेत्रींच्या वर चित्रीत केली आहे, त्यात जयश्री गडकर ही होत्या ...
मी म्हंटल अग जयश्री गडकर वारल्या ना ...!
बायको म्हणते ...अहो काहीतरीच काय,नाही अजुन ,गाण्यात कशा आहेत अजुन !
मी पण स्वत:च्या स्मरण शक्तीला दोष देत त्या अजुन जिवंत आहेत अशी समजुत करुन घेतली !
खरं तर यावर हसु नाही येणार ..जयश्री गडकर अजुन ही त्यांच्या अभिनयाच्या रुपात जिवंतच आहेत हेच खरं !
आज बाहेर जायच्या गडबडीत
आज बाहेर जायच्या गडबडीत बर्याच दिवसांनी चष्मा हरवला माझा.... (पूर्वी सारखा हरवायचा...) सगळीकडे डोळे सूक्ष्मातिसूक्ष्म करुन, मान वाकुडी वाकुडी करून शोधत होते.... अख्ख्या खोलीची, कपाटाची (होय, खात्री नव्हती तो कोठे ठेवलाय) उलथापालथ झाल्यावर महाशय माझ्याच नाकासमोर, बेडवर एका ओढणीच्या खाली असल्याचे दिसले!! तोवर मी चष्म्यांना बीपर का नसतो ह्यावर सार्या जगाला उद्देशून खूप उद्बोधक मुक्ताफळे उधळून झाली होती!!
अनिल, अकु हा आत्ता झालेला
अनिल, अकु
हा आत्ता झालेला वेपणा: माबो वर 'ग्रुपमधे नवीन' ब वर क्लीकाडल पण फक्त विपु चाच ग्रुपलीस्ट मध्ये आला म्हणुन पुन्हा १-२ वेळा ट्राय केल मग वाटल माबो मध्ये काही प्रॉब्लेम असेल म्हणुन आपल्या सगळ्या ग्रुपस ची लीस्ट येत नसेल. कस तरी इथे आले आणी मंग जेव्हा मले प्रतिसाद देता येईना तेव्हा ध्यानी आल म्ह्या लॉग्-ईनच केलेल न्हाय
म्हणुन मले माझे गरुप दिसत नव्हते बघा :हे हे हे:
काल मॉल मध्ये लीफ्ट वर यावी म्हणुन मी डाऊन बटनावर कळ मारुन बराच वेळ लीफ्ट अजुन कशी वर येत नाही
असा ईचार करत होते. "नेहमीच ह्या मॉल मध्ये लीफ्ट वर येत नाही" (असे ३-४ वेळेस घडले आमचे कडुन :() असा मनस्ताप पण केला कि म्ह्या 
अरे बशीच राहिलच कि त्याच झाल
अरे बशीच राहिलच कि त्याच झाल अस: शनवारला मले "दबंग" पहाण्याची लई विच्छा झाली, टायमावर पोहचाव म्हणुन लवकर निघालो नि गेलो बस स्थानकावर, तीथ "कात्रज" उभीच व्हती, लगबगीने आत चढलो पण बसायला शीटच नव्हत, ह्या "कात्रज" च्या अंगाले लागुनच आणी एक बस आली कि पुढे मले तीच पण नाव "कात्रज" दिसल आणी बस मंदि बरीच शीट पण खली दिसली
म्ह्या लगेच ह्या बशीतुन ऊतरुन त्या बशीत गेलो नि आरामात बसलो. पुढ अस झाल कि बस सुरु झाली नि भलत्याच दिशेकडे वाट घेतली कि बशीन
मंग मागे बसलेल्या काकांना ईचारल तर ते म्हणाले हि "कात्रज नाही हिंजेवाडी ची बस आहे" (तरी बशीत घुसता घुसता एका मावशींना ईचरल होत हि "कात्रज" च ना त्या म्हणाल्या व्हत्या "हो हो कात्रजच", त्या पण माझ्या वानि वेंधळ्याच की नाही :फिदी:, पण मले "हिंजेवाडी" हे नाव "कात्रज" कस नि का दिसल कळत न्हाय बघा)
तोवर मी चष्म्यांना बीपर का
तोवर मी चष्म्यांना बीपर का नसतो ह्यावर सार्या जगाला उद्देशून खूप उद्बोधक मुक्ताफळे उधळून झाली होती!! >>>>>>>>>>>>
अकू तुला मोदक(नाही तरी गणेशोत्सव आहेच!) माझा काँपचा वेगळा, वाचायचा वेगळा आणि गॉगल वेगळा.....असे तीन चष्मे मी सतत शोधत असते. (शोधण्याच्या लिस्टमधे मोबाईल ही आहे.पण त्याला रिंग दिली की शोध प्रक्रीया थांबतेच.)
आज ३ दिसाच्या सुट्टी नंतर
आज ३ दिसाच्या सुट्टी नंतर कामावर आले, आल्या आल्या माबो वर येण्यासाठी लगबगीने काम्पुटरचा स्वीच ऑन करण्या साठी टेबला खाली डोक घातल, पण स्वीच दावेच ना!!! परत खाली वाकुन टेबला खाली संमदि कड नजत टाकली पण स्वीच चा पत्ता न्हाय, डोक वर काढल; खुर्चीच्या बाजुल ठेवलेल्या CPU कडे बघितल्यावर लक्षात आल स्वीच टेबला खाली नाही खुर्चीच्या मागे हाये
गुड समु! किप इट अप! तु असेच
गुड समु! किप इट अप!

तु असेच वेंपणाचे किस्से सांगुन आमचं मनोरंजन करत जावं हीच श्रींच्या चरणी प्रार्थना!!!
काल जोरात गाणी ऐकत घर साफ करत
काल जोरात गाणी ऐकत घर साफ करत होते. मधेच आवाज कमी करायला उठले व फॅनचा रेगुलेटरच डावीकडे फिरवला. मग आवाज कमी होत नाही कळल्यावर खाली बघितले व जीभ चावून सिस्टिमचा व्हॉल्युम कमी केला.
समु, गणराया पावला
समु, गणराया पावला म्हणायचा......
गेले दोन दिवस पुण्यात असताना हीच प्रार्थना करत होतो की तुझा वेंक्यु दिवसेंदिवस असाच बहरत जावा..........
आर्या, भुंगा आता लगेच मला
आर्या, भुंगा आता लगेच मला मोदक पाठवा मी वेपणा चे इतके कष्ट घेते त्या बद्दल

मामी, तुम्ही पण
समु, तु अलिकडे एकटी वेप करु
समु,

तु अलिकडे एकटी वेप करु लागली आहे ..
दुसर्यांना ही संधी दे आता ....
बाकीचे आर्या,भुंग्या यांनी आता वेंप करायच थांबवल आहे ....
शनिवारी अंधेरिला थोड काम होत
शनिवारी अंधेरिला थोड काम होत म्हणुन ऑफिस मधुन लवकर निघले. चर्चगेट वरुन स्लो ट्रेन मध्ये बसले. कधि डोळा लागला कळलच नाही. एकदम जाग आली. अरे अंधेरी स्टेशन आल. ट्रेन मधुन उतरले आणि धुंदकीमध्ये चालत चालत स्टेशन बाहेर आले. मनात म्हणते आरे एवढ कधी बदलल अंधेरी!! एवढी कमी गर्दी कशिकाय स्टेशनवर?? सगळ तोडुन टाकल वाटत. बाहेर आले म्हटल हे तर अंधेरी नाही, काहीतरी वेगळ दिसत आहे. अरे हे तर वान्द्रे आहे. मागे फिरुन परत स्तेशनवर आले. चालता चालता मझी मीच हसत होते आणी लोक वेड्यासारखी माझ्याकडे बघत होति.
आज केस धुपवायचे म्हणून हातात
आज केस धुपवायचे म्हणून हातात धुपाटणं घेतलं होतं. केसातून धुपाचा धूर फिरवताना त्या अवस्थेत माबोवर फिरून यावं म्हणून कॉम्प्युटरसमोर बसले. तेवढ्यात समोर गरमागरम चहाचा कपही अवतरला!
माबोवरचे लिखाण वाचायच्या नादात एका क्षणी चहाचा कप समजून हातातले धुपाटणेच तोंडाला लावणार एवढ्यात धुपाचा धूर डोळ्यात गेला आणि भानावर आले! नाहीतर आज माझे ''होठ धुपवले प्रकरण'' झाले असते!!!
येथे दात विचकलेल्या जागी फक्त काळी रेष ओढावी लागली असती!! 
आज केस धुवायचे म्हणून हातात
आज केस धुवायचे म्हणून हातात धोपाटणं घेतलं होतं. >>> मी असे वाचले.
विचार केला कपडे धोपटतो तसे ही केस धोपटते की कॉय
<<<आज केस धुपवायचे म्हणून
<<<आज केस धुपवायचे म्हणून हातात धुपाटणं घेतलं होतं. केसातून धुपाचा धूर फिरवताना त्या अवस्थेत माबोवर फिरून यावं म्हणून कॉम्प्युटरसमोर बसले. तेवढ्यात समोर गरमागरम चहाचा कपही अवतरला! माबोवरचे लिखाण वाचायच्या नादात एका क्षणी चहाचा कप समजून हातातले धुपाटणेच तोंडाला लावणार एवढ्यात धुपाचा धूर डोळ्यात गेला आणि भानावर आले! नाहीतर आज माझे ''होठ धुपवले प्रकरण'' झाले असते!!! येथे दात विचकलेल्या जागी फक्त काळी रेष ओढावी लागली असती!>>>>
"धुपाने तोंड पोळल्यावर चहाही फुंकुन प्यावा" अशी नवी म्हणच दिलीत आज तुम्ही माबोकरांना....

.
.
समु, तुला टफ फाईट
समु, तुला टफ फाईट आहे.........
समु.. अशी कशी ग तु? बरं,
समु.. अशी कशी ग तु?
बरं, मला ८ -१० दिवसापुर्वी (शनिवारी) लक्षात आले की गेले २ महिने मी संपलेल्या लायसंसवर गाडी चालवत आहे. मग काय २ दिवस कपाळाला हात लावुन बसले व सोमवारी मैत्रीणीबरोबर नविन करायला गेले. ती तिथे सोडुन गेली. माझा नं. आला. संपलेले license देउन मी नवे मागितले तेव्हा त्यांनी मला विचारले, 'देऊ ना नविन, पण ते देण्यासाठी लागणारे document कुठय? '. मी निर्बुध्धपणे पहात म्हणाले, अजुन काय हवे? तर ती म्हणाली, तुझा विसा, greencard, US passport काहीतरी दे ना. मग पुन्हा रांगेतुन आमची वरात बाहेर :(. मैत्रीणीला स्वयंपाकातुन बाहेर काढले व घरी पाठवले. घरुन ती GC घेउन आली. तोवर अजुन ५० माणसे लायनीत आलेली. पण त्या चांगल्या बाईने मला पाहुन लेगेच बोलावले व नंतर ५ मिनिटात काम झाले.
बाप्पा वाचवलेत तुम्ही मला. काही accident वगैरे झाला असता माझ्याकडुन तर थेट तुरुंगात गेले असते.
बरं, हा वेंधळेपणा झाला का माझ्या हातुन? तर नवर्याचे २०११ ला संपते म्हणुन माझेपण तेव्हाच संपणार असा अतीअयोग्य विचार करुन बसले होते. भारतात जायचे आहे म्हणुन passport वगैरे सर्व चेक करताना , 'खरे तर गरज नाही पण करु चेक' असा विचार करुन license पाहिले आणि ततपप करत बसले.
वर पुन्हा त्या आधीच काही दिवस defense च्या एका जागी गेलो तेव्हा त्यांनी GC मागितले. ते पण बरोबर नव्हते. तेव्हा त्यांनी license घेतले आणि रेकॉर्ड्स पाहिले व आमचे US status पाहुन मग जाऊ दिले. त्यांनी पण नाही पकडले नशीब. गाडी मीच चालवत होते.
मघाशी स्मितहास्यने माझ्या
मघाशी स्मितहास्यने माझ्या प्रकाशचित्राच्या धाग्यावर शिर्षक बद्दल कमेंट दिलि, मि तिला स्मि समजुन स्मितागद्रेला शिर्षक बद्दल बोलत होतो... खुप वेळाने हि गोष्ट लक्शात आली.
पाच सहा किलो
पाच सहा किलो बटाटे!!!!!!!!!!!!!!!
बटाटा झिंदाबाद! मधुरिमा!
समु,अकु .. चालू द्या.. आणी
समु,अकु .. चालू द्या.. आणी आपला वेंक्यू वाढवत राहा
शुकरवारी मेडीकल समजुन मी वाईन
शुकरवारी मेडीकल समजुन मी वाईन च्या दुकानात घुसणार होते
(वाईनच्या दुकानातल्या बाटल्या मला टॉनिकच्या/औषधांच्या बाटल्या अहेत अस वाटलेल पण मग निट बघितल तर सगळी कडेच बाटल्याच बाटल्या होत्या, मेडिकल मध्ये बाटल्या असतात पण ईतक्या कश्या म्हणुन निट बघितल तर दुकाण वाईनच
)
अर्रे देवा.. इस समु का कुछ
अर्रे देवा.. इस समु का कुछ करो..

समे तू तुझ्या एरियात फेम्यस असशील ना???????????
म्हणजे काय वर्षू, असणारच.
म्हणजे काय वर्षू, असणारच. गब्बर नंतर समुच...
घे समु
Pages