मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे "समु" ने पुणे सोडलेये का?????
"समु आणि पी.एम्.टी." ची नविन सिरिज आली नाही बर्‍याच दिवसात बाजारात..... Lol

माझी एक मैत्रीण पुण्याच्या गाडीत जाऊन बसली. रिझर्वेशन वगैरे केलेले होते. पण दुसरा माणूस येऊन त्याच सीटवर क्लेम करायला लागला. ती ही सांगायला लागली की माझंपण रिझर्वेशन आहे इ. मग त्याने हिचे तिकिट बघायला मागितले तर ते आदल्या दिवशीचे होते.

याच मैत्रिणीचा अजून एक किस्सा. एकदा तिच्या डोक्यात आले की आपण आता रोजचा खर्च लिहून काढायचा. लिहायला पण लागली. एकदा तिच्या नवर्‍याच्या हातात ती डायरी पडली आणि बायको systematically एवढा जमाखर्च वगैरे लिहितेय बघितल्यावर तो त्याला भरूनच आलं. पण त्याला कळेना ती रोज या कोणत्या गोष्टिची खरेदि करते? म्हणून त्याने खुलासा विचारला. तर हिने सांगितले की, रोज सकाळी पर्स मध्ये किती पैसे आहेत हे ती 'जमा' मध्ये टाकायची आणि रात्री आठवून आठवून खर्च लिहायची. पण जर ताळा जमत नसेतर (जे तिच्या विसरभोळेपणा cum वेंधळेपणामुळे रोज व्हायचेच व्हायचे) तर तो आकडा खर्चात 'दे.जा.(देव जाणे)' या नावाखाली घालायची.

काल रात्री औरंगाबादहुन मुंबईला परत आलो. अराईवल्स मध्ये लगेज बेल्ट जवळ जाऊन बॅगची वाट पहात बसलो.
एक एक बॅग येत होती आणी कोणी ना कोणी त्या उचलत होते. सगळ्या बॅगा संपल्या तरी माझी बॅग काही आलीच नाही.... विचार केला की जावुन चौकशी करावी..... कांऊटर जवळ गेलो..... ती गोड आवाजात म्हणाली हाऊ मे आय हेल्प वगैरे..... तेवढ्यात लक्षात आल च्यामारी आपण ह्यावेळेस फक्त लॅपटॉप घेवुन गेलेलो... चेक-ईन लगेज काही नव्हतच..... रात्रीच्या साडेदहा वाजता असा जाम वैताग आला स्वत:चा... वरुन त्या बाईला फक्त तोंड दाखवल आणी परत निघु लागलो..... तिचा काय समज झाला असेल देव जाणे.....(तशी छानच होती दिसायला... बर झाल म्हणाव... तेवढीच आय कँडी)

लईच भारी!!!!

मी बोरिवलीहून दादरला ट्रेन ने जाण्यासाठी. तिकिटाच्या खिडकीपशी बोरिवलीचेच तिकिट मागितले आहे.

एका हातात चहा आणि टी. व्ही. चा रिमोट असताना चुकुन रिमोटच तोंडाला लावला आहे.

Happy

चिमण्या वेंक्यू २०
मामी ची मैत्रीण वेंक्यू: १४ देजा?
आद्या : वेंक्यू ५ ओपनिंग ला इतकेच.

माझ्या कलीगचा ईब्लीसपणा.
आज 'व्हाईट डे' आहे हापीसात. ग्रूप फोटो सेशन चालू होते. हा मधेच म्हणे, अरे मडके कुठाय? Proud

@ चिमण Rofl

काही वर्षापुर्वीचा वेंधळेपणा ....
पूण्यात एका कंपनीत काम करत होतो,नागपुरच्या एका बैंकेचे नविन काम कंपनीला मिळाल होतं,बॉसनी पुढील २-३ दिवसात तिकडे जायला लागेल याची कल्पना दिली होती, जाण्याच्या दिवशी ४ वाजता सांगीतलं की मला ८ च्या बसनी नागपुरला जायच आहे, रुम वर येऊन आवरायला सात वाजले,त्यात नविन शुज घ्यायला लक्ष्मी रोडला गेलो, १५ मिनिटात घाईने खरेदी केली आणि एकदाची बस पकडली.
पहाटे झोपेतुन उठल्यावर सीट खालुन मागे पुढे पळत गेलेले शुज शोधले आणि लक्षात आलं की दोन्ही शुजच्या डिजाईन/शिलाई मध्ये थोडा "फरक" आहे .....
(कलर आणि नंबर मात्र एकच होता...)
Angry

चिमणराव ....
Lol
तरी बरं ....दुसर्‍या कुणाची बैग तुम्हाला दिली गेली नाही ...!

नमस्कार नमस्कार नमस्कार!!!! सगळे कशे हायेत? आज लई दिसान इथ यायचा योग आला, लई बर वाटल, मी पुण्यातच हाए पण आज काल PMT तच जास्त वेळ जातो Happy PMT लई बिजी ठेवते बघा Wink हं!!!!! सध्या तरी मी वेपणा केल्याच आठवत नाही आता इथले वेपणे वाचुन काढते पटकन काही काम यायच्या आत. Happy

पान ९२, ९३ : भुंगा अनिल, अकु, वर्षु, चिमणराव आणी सगळेच लै भारी!!! काय काय व्हरायटी वेपणा आहेत सगळ्यांचे Rofl मला कॉम्पेक्स आ रहा है Sad

वर्षूला मोदक.
म्हणजे....समू तुझ्या आगमनाची वाट पहात आहोत. सगळं कसं सुनं सुनं झालं होतं बघ.
हं..........चल शुरू हो जा!

वर्षु , मानुषी (भानुषी नाही ) तुमची मी वेपणा करावा हि ईच्छा प्रबळ होती वाटत Happy हे घ्या माझा आत्ताचा ताजा वेपणा:
आत्ता १५-२० मी. पुर्वी एकजण त्याचा लॅपी घेऊन माझ्या डेस्क वर आला, त्याच्या लॅपी वरच्या डॉक्युमेंट मध्ये मी चुका आणी चेंजेस सांगत होते, त्या डॉक्युमेंट मध्ये मला काही टायपायच होत म्हणुन मी टायपु लागले तर अक्षरे टायपलीच जात नव्हती मग मी माऊस फीरवुन पाहिला तरी काहीच होईना, मग तोच बोलला तेव्हा लक्षात आल मी त्याच्या लॅपी वर टाईप करण्या साठी माझ्या डेस्कटॉप चा कि-बोर्ड आणी माऊस वापरत होते" Uhoh

अनिल.. म्हणजे तूच तसे विकत घेतले होतेस कि काय??
वर्षु,
तुझी शंका अगदी रास्त आहे ....
अगं, मीच घाईने वेगवेगळे शुज घेतलेले ...!
Angry

वर्षु , भानुषी तुमची मी वेपणा करावा हि ईच्छा प्रबळ होती
समु,
भानुषी नाही ...मानुषी !
निदान या माबोकरांची नाव लिहिताना तरी वेंधळेपणा करु नको ...!
Lol

अनिल, भुंगा तुम्ही मेन वेपणा कडे लक्ष न देता विषयांतरीत मुद्या कडे बघु नका मग मेन वेपणा तसाच दुर्लक्षीत रहातो Proud चुक सुधारली आहे Happy

लिहायचे "भा"न आणि या माबोकरांचा "मा"न ठेव..........
भुंग्या,
तुझा हात कुणी पकडणार नाही ...... अशा भन्नाट,मस्त कोट्या करण्यात बरं का !
Lol

सकाळी एकीने ट्रेनमध्ये चणे खायला दिले हातात मी हात जोडुन वैगरे खाल्ले. ती म्हणते," अगं असे काय खातेस? तो प्रसाद थोडीच आहे? मी असेच दिले आहेत खायला?"
मग स्वताचा वेंपणा लपवायला उगाचच हसत म्हंटले," ओह प्रसाद नाहीय?" आणि परत नमस्कार करुनच खाल्ला. Sad
आत्ता १० मिनिटांपुर्वी केलेला वेंपणा अ‍ॅक्सेस कार्ड ऐवजी फ्लोअर डोअरला हातातले घड्याळ लावत होते मी.. Sad खुप कामाचा परिणाम झालाय.. Sad

<<लिहायचे "भा"न आणि या माबोकरांचा "मा"न ठेव..........
भुंग्या,
तुझा हात कुणी पकडणार नाही ...... अशा भन्नाट,मस्त कोट्या करण्यात बरं का !>>>

हरकत नाही, मी पकडत जाईन हात........ Rofl

आत्ता १० मिनिटांपुर्वी केलेला वेंपणा अ‍ॅक्सेस कार्ड ऐवजी फ्लोअर डोअरला हातातले घड्याळ लावत होते मी.. खुप कामाचा परिणाम झालाय..
रुपाली,
कामाचा परिणाम एक वेळ खुप चांगला, पण बिनकामाचा परिणाम वाईट असतो हे नक्की !
Happy

मगाचा वेपणा...
आमच्या कॉन्फरन्स रुमला मधोमध उघडनारा मोठ्ठं काचेचा दरवाजा आहे. आज मिटींगसाठी कॉन्फरन्स रुमध्ये जाताना काचेचा दरवाजा ढकलुन आत गेलो, आत गेल्यावर लक्षात आलं की, दरवाज्याची दुसरी बाजु उघडीच होती... Uhoh

निदान या माबोकरांची नाव लिहिताना तरी वेंधळेपणा करु नको ...!
>>>>>>>>>>>>>>>>
म्हणजे काय ..म्हणायचंय काय तुला अनील? आँ? (दिवे घे बरं का)

समु.. Lol बरं झालं आलीस परत..
मल्ली.. Rofl तुला पाहून लोकं (मनात) म्हणत असतील्..याला आत यायला इतकी मोठी जागा का लागत्येय बरं?? हा तर फटीतूनही सहज जाईल आरपार Light 1 Light 1

आज सकाळी बशीत बसायला लई ऐसपैस जागा मीळाली, शीटावर म्या एकटच बसलो व्हतो :), एकाबाजुला पर्स आणी एका बाजुला सेल ठेऊन आणी कानाला वायरींचे ईस्पीकर जोडुन मस्त FM चा आनंद घेत होते, मध्येच माझ्या डोक्यात बस पास च काहीस गणीत घुमु लागल म्हणुन मी सेल वरचा कॅल्सी वापरण्यासाठी पर्स मध्ये सेल शोधु लागले, सेल काही दिसेना म्हणुन जाम टेंशन आल Sad पर्स चांगली शोधुन काढली सगळे सगळे कप्पे :रागः पण!!!!!!!! सेल पर्स मध्ये दिसलाच नाही शेवटी थकुन शोध थांबवला आणी कानात वाजत असलेल गाण एकु लागले तेव्हा टुयब पेटली अरे सेल पर्स मध्ये नाही शीटावरच आपल्या दुसर्‍या बाजुला ठेवलाय Happy

रुपाली, समु!!! Rofl
समु, तात्पर्य काय , तुझ नि बशिच गणित काय जमत नै ब्वॉ!!! तु आपली गाडीच घेउन टाक!
छ्छॅ! पण मग इथे वेपणाचे किस्से टाकुन आम्हाला कोण हसवणार? Happy
असं करुया...तुझ्या अख्ख्या वर्षभराच्या पासचे पैसे मी भरते पन तु रोजच्या रोज एक तरी वेंपणा करायचास...बोल आहे कबुल? Proud

एवढच नाही तर रोज इथे तो किस्सा लिहुन्...इतरांना वेंपणा करायला प्रवृत्त करायचस (एन्करेज)

Pages