लहानपणीचे नसते उद्योग

Submitted by योडी on 3 June, 2009 - 06:28

'लहानपणीचे खेळ' ह्या बीबीवरुन खुप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्यामुळे हा बीबी ओपन केला. खुप गोष्टी अश्या असतात त्या लहानपणातच केल्या जातात. अश्याच काही गोष्टी, गमती इथे शेअर करु.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या बहिणीची मुलं लहान असताना एकदा मी त्यांच्याकडे गेले असतानाचा किस्सा:
मोठी मुलगी (त्यावेळी वय वर्षं ७) जिजामाता झाली होती आणि छोटा मुलगा (त्यावेळी ४ वर्षं) झाला होता शिवाजी. आणि situation अशी होती की शिवाजी कोणातरी मेजर मोगल सरदाराला मारायला निघालाय आणि जिजामातेचा अशिर्वाद घ्यायला आलाय. तर जिजामाता शिवाजी ला सांगत्या झाल्या की "शिवाजी तुम्हि येथून बाहेर पडा. रस्ता cross करा आणि कोपर्‍यावर जा. तिथून right ला वळून थोडं पुढे गेलात के तुम्हाला एक घर दिसेल, त्यात माणूस असेल तो तुम्हाला पुढच्या instructions देईल."
मला एकदम शिवाजी च्या जागी James Bond दिसायला लागला.

हा माझ्या बहिणीचा मुलगा म्हणजे केवळ अशक्य आहे.

एकदा तो, त्याची बहीण, तिची मैत्रीण आणि माझी मुलगी सगळे मिळून घर घर खेळत होते. सगळे आपापले role ठरवत होते. एकजण ऑफिसला जाणार, एकजण घर सांभाळणार आणि माझी मुलगी शाळेत जाणारी असणार असं ठरलं. याला बाकिच्यांनी विचारलं की तुला काय व्हायचयं? तर त्यानं सांगितलं की, 'मी तुमच्या घरचा कचरेवाला असणार !'. आणि मग खेळत असताना तो ईमानेइतबारे दर दहा मिनिटांनी कचरा घ्यायला जात होता.

असचं एकदा घर घर खेळताना तो कुत्रा झाला होता.

गीतरामायणची गाणी लागायची रेडीओवर त्यात भरताचे 'माता न तु वैरिणी' हे गाणे लागायचे.. ते वाक्य मी आईने मला मारले म्हणून म्हणाले आणि जास्त मार खाल्ला... Sad

माझा भाऊ ४ वर्षाचा होता तेव्हा आम्ही आई-बाबांबरोबर फिरायला गेलो होतो तिथे १ पोलीस हवालदार उभा होता त्याला बघुन माझा भाऊ त्याच्या समोर जाउन म्हणाला पोलीस मामा नमस्ते, तुम्हाला काय समजते. Sad त्या पोलीसाचाच चेहरा बघण्यासारखा झाला होता.

आणि त्याला ४ थी ला तोंडी परीक्षेत बाईंनी विचारले की आपल्या शाळेचे चेअरमन कोण आहेत?
ह्याने मारुती अस सांगीतल ( त्यांच्या शिपायाच नाव मारुती होत ह्याला वाटल की शाळेत कायम खुर्चीत बसतो तो चेअरमन. Happy

आम्ही पण शाळेत म्हणायचो असं!
वर्गात सर आले की "एकसाथ नमस्ते" आणि मग हळुच "तुम्हाला काही समस्ते" ! Proud

मामी माझ्या धाकट्या बहिणीनेही भाषण करताना असेच केले होते लोकमान्य टिळकांची जयंती होती . ती माझ्या बाबांच्याच(ते तिथे शिक्षक होते) शाळेत होती हिने सुरु केले, "अध्यक्ष महोदय, आज टिळक चौक जयंती(आमच्या सोलापूरात टिळक चौक लै फेमस आहे) त्यानिमित्त मी चार शब्द बोलणार आहे तरी...पुढं काय हो पप्पा?" सगळे खी खी..पप्पांची अवस्थाही बघण्यासारखी कारण भाषण आईने लिहून दिले होते त्यामुळे पुढं काय ते कुणालाच माहित नाही...शेवटी पुढच्या वर्षी तिची शाळाच बदलली

<<<शिवाजी कोणातरी मेजर मोगल सरदाराला मारायला निघालाय >>>

मामी, मोगल सैन्यात पण "मेजर" अशी पदवी होती का सरदाराना......... Rofl

'मी तुमच्या घरचा कचरेवाला असणार !'. आणि मग खेळत असताना तो ईमानेइतबारे दर दहा मिनिटांनी कचरा घ्यायला जात होता.

असचं एकदा घर घर खेळताना तो कुत्रा झाला होता.
<<<< केवळ कहर! Rofl

माझी एक मैत्रिण लहान असताना जिला काँस्टेबल म्हणजे काय माहित नव्हते, तिच्या भावाने बाल्कनीत जाऊन 'काँस्टेबल, काँस्टेबल' असे जोरात ओरडायला सांगितले. ती बिचारी एकदोनदा ओरडली. इमारतीच्या समोरच्या कोपर्‍यावर दोन हवालदार उभे होते, ते तिला काय झाले म्हणून विचारू लागले. ती घाबरून घरात आली आणि भावाला सांगू लागली की, 'दोन पोलिस मला 'काय झाले' असे जोराजोरात विचारतायत'.

भाऊ मात्र 'कशी गंम्मत केली' म्हणून हसून हसून वेडा झाला. Happy

ठकु : गीतरामायणची गाणी लागायची रेडीओवर त्यात भरताचे 'माता न तु वैरिणी' हे गाणे लागायचे.. ते वाक्य मी आईने मला मारले म्हणून म्हणाले आणि जास्त मार खाल्ला... >>>>> Proud Proud Proud हो हो. मी पण आई वर रागावले की हे गाणे (मनातल्या मनात) म्हणायचे. तु पण असं तारतम्य बाळगलं असतसं तर additional मार खावा लागला नसता. Proud Proud Proud

हाच माझ्या बहीणीचा मुलगा अडिच-तीन वर्षांचा असताना शिवाजीच्या गोष्टींनी भारून गेलेला होता. शिवाजी त्याचा एकदम हिरोच होता. जेवताना तो अळंटळं करायला लागला की मग माझी बहिण त्याला रसभरीत वर्णन करून सांगायची कि शिवाजीला कसा हा पदार्थ खूप आवडायचा आणि तो कसा नेहेमी जिजामातेच्या मागे लागायचा की हा हा पदार्थ बनव वगैरे वगैरे. मग तो आनंदाने जे काहि बनवलं असेल ते खायचा. अशा तर्‍हेने माझ्या बहिणीने शिवाजीला इडली-डोसे, पाव-भाजी, छोले-भटुरे, पाणी-पुरी पासून चायनीज वगैरे सुध्दा खाऊ घातलयं.

मायबोली वर नवी आहे पण नसते उद्योग केलेले असल्यमुळे राहावले नाही. मी दोन वर्षान्ची असताना शेजारच्यान्चा thermometer पारा बघायची इच्छा झाली म्हणून खाली पाडला...पारा खरच कसा असतो हे कळल नाहीच पण मी केलेल्याची शिक्षा माझ्या बाबाना म्हणून 'आता आमचा पारा गोळा करायला या' असा निरोप पाठवला..! Sad

मु, काळजी करु नको, मी असे दोन थर्मोमीटर फोडलेत!
मला अजून एक उद्योग आठवला....

बाबांच्या मित्राचे रेडियो, टेपरेकॉर्डर रिपेअरिंगचे दुकान होते तिथे एक सेकन्डहॅन्ड रेडियोचा लाकडी खोका (जुन्या स्टाईलचा, पिरगळायची बटणे असणारा), अनेक अवयवांविना तसाच पडून होता. असा काहीसा.

बाबांच्या मित्राने उदार अंतःकरणाने आईबाबांचे लग्न होऊन ते नव्या जागेत रहायला गेल्यावर त्यांना तो घरी नेण्याची परवानगी दिली. त्या रेडियोचे स्वतःचे असे मन होते. त्याला लहर असेल तेव्हा त्यातून आवाज यायचे, बातम्या-गाणी-कार्यक्रम ऐकता यायचे, नाहीतर नुसती स्टॅटिक!

तर मी चार-पाच वर्षांची होईपर्यंत त्या रेडियोत बरीच झुरळे झाली होती. रेडियोच्या काचेतून ती झुरळे मिश्या फेंदारून इकडे तिकडे तुरुतुरु जाताना दिसायची. मग मी रेडियोच्या काचेवर टकटक करून तासन् तास त्या झुरळांशी खेळत बसायचे. कोणतेही गाणे किंवा बातम्या जोरात लावल्या की सार्‍या झुरळांची पलटण इकडून तिकडे सैरावैरा पळत सुटे. मग मी अजूनच जोरात त्याची बटणे पिरगळत बसे!! खूप छान वेळ जायचा माझा त्यांच्याशी खेळण्यात! Biggrin

माझ्या बायोग्राफी मधले काही पॉईंटसः
बालवाडीत असताना खाऊ आणायला दुकानात जायचो, आणि तो घेऊन परत येताना एका झाडावर बसलेला कावळा बरोबर लक्ष ठेऊन असायचा, मी येताना हातावर झडप घालून खाऊ घेऊन पसार. घरातल्यानां सांगितले तर त्यांनी खाऊ खिशात ठेवण्याचा सल्ला दिला, पण खाऊ पेक्षा खिसा लहान असल्याने USELESS. तीन चार वेळा अस झाल्यानंतर मला त्या कावळ्याची भीतीच वाटायला लागली होती. मग एक दिवस खाऊ घेऊन येताना दिसला हा फांदीवर. त्याला बघताच मी पळत पळत रस्त्याला असलेली विहरीचा काठ गाठला आणि दिला खाऊ विहरीत टाकून.
मला नाही-तुला नाही तर घाल विहरीला! आणि घरी आल्यावर सगळानां कॉलर ताठ करून सांगितले कावळ्याचा कसा~ पोपट केला.
29336-Clipart-Illustration-Of-A-Set-Of-Crow-And-Parrot-Bird-Backgrounds-With-Pastel-Colors.jpg

कोणाला भातुकलीचा खेळ माहिती आहे का, आम्ही त्याची लेव्हल-२ गाठली होती. पहिलीला असताना मी, माझी ताई, काही शेजारच्या मुल-मुलीनीं माझ्या छोट्या भावाचं लग्न घरमालकांच्या मुलीशी लाऊन दिलं. चाफ्याच्या फुलांची मुंडवळी वैगेरेने त्यानां सजवून आम्ही त्यांची पुर्ण घरप्रदक्षणा करत वरात काढली होती. वाद्य-वाजत्र्यांची जबाबदारी माझ्यावर असल्याने दुपारच्या मुहूर्तावर मी पत्र्याच्या डब्याला कान(इतरांचा) दुखे पर्यंत बडव-बडव बडवत होतोdrumming.gif

कावळ्याचा कसा~ पोपट केला. >>>> Biggrin
मग कावळ्याचे काव काव ऐवजी विठू विठू म्हणायला सुरुवात केली असेल नै?? Uhoh

अकुच्या रेडीओ च्या किश्श्यावरून आठवलं. ज्यांच्याकडे कॉर्डलेस फोन आहे त्यांनी कुणी हा अनुभव घेतला आहे का? घरात कुणी कॉर्डलेस फोन वर बोलत असेल तर घरात लावलेल्या रेडीओ ला ट्यून करताना कधी कधी फोनच्या फ्रीक्वेन्सी ला ट्यून झाल्यास फोनवरचे सगळे बोलणे अगदी क्लीअरकट ऐकू येते. आम्ही (मी व माझी बहीण) घरी टाईमपास म्हणून असे उयोग करायचो. एकदा घरातला कॉर्डलेस फोन चालू नव्हता तरी रेडीओ मधून कुणा स्त्रीच्या बोलण्याचा आवाज येऊ लागला. नीट लक्ष देऊन ऐकले तर कळले की बाजुच्या फ्लॅटमधली तरुणी तिच्या मित्राशी बोलत होती लाडीक लाडीक. Wink अर्थात जास्त काही ऐकावयास संकोच वाटल्याने रेडीओ बंद केला, पण आपले पर्सनल बोलणे असे आजुबाजूच्या घरात ऐकले जाऊ शकते हा शोध लागल्याने तेव्हापासून रेग्युलर फोनवरून कटाक्षाने पर्सनल फोन केले मी.

निंबुडे, खरं सांग...... >>>
मामी, सुंबडीत भेटा एकदा. मग सांगेन Happy

बादवे कुणी हल्ली चक्रमपणा (अर्थात मोठेपणीचे उद्योग) करत नाही का? Uhoh तो बाफ थंडावलेला दिसतोय. Proud

<<<आपले पर्सनल बोलणे असे आजुबाजूच्या घरात ऐकले जाऊ शकते हा शोध लागल्याने तेव्हापासून रेग्युलर फोनवरून कटाक्षाने पर्सनल फोन केले मी.>>>

निंबुडे, हे नक्की लहानपणीचे उद्योग आहेत का????? Rofl

फ्रीक्वेन्सी ला ट्यून झाल्यास.. असे सिग्नल आमची टिव्ही पकडायची ते सुध्धा पोलिस व्हॅन मधल्या वॉकी-टॉकीची. एकदा कुठेतरी अ‍ॅक्सिडंट झाल्याची बातमी ऐकली होती.... यावरून एक आठवले, माझ्या मामेभावाने उल्हासनगरवरून FM-Radio microphone आणला होता. अशा instrument वर बोललेले संभाषण ५०-१०० मिटरच्या सर्कलमधे असलेल्या सर्व रेडीओवर प्रसारण करता येते. मग काय दररोज संध्याकाळी सुरू झाला गावातील ईस्पेशल बातम्या प्रसारणचा काय्रक्रम.
david-cook-american-idol-tv-tv-show-smiley-emoticon-000438-large.gif
आजच्या ठळक बातम्या:
गण्याला आज १२ चिंबोरी गावली
विष्णु म्हात्रे चिखलात पडला
देवळात पिंकाच्या चपला चोरी गेल्या
किस्ना बायला पोरगा झाला.... etc etc

मी १ ली ला असताना(खरेतर घरी मस्ती करतो म्हणुन, ५ वय असताना कानाल हात पोहचतो या निकषावर शाळेत पाठवलेला )
उन्ची लहाण असल्यामुळे लाईन मधे पहीला बसुन दुपारि गाढ झोपनारे माझे आवडते मोहिते गुरुजीचे पायाचे अन्गठे सुतळिने बान्धुन टाकायचो अनि ते उठ्ल्यावर मार खायचो.

मी १ ली ला असताना(खरेतर घरी मस्ती करतो म्हणुन, ५ वय असताना कानाल हात पोहचतो या निकषावर शाळेत पाठवलेला )
उन्ची लहाण असल्यामुळे लाईन मधे पहीला बसुन दुपारि गाढ झोपनारे माझे आवडते मोहिते गुरुजीचे पायाचे अन्गठे सुतळिने बान्धुन टाकायचो अनि ते उठ्ल्यावर मार खायचो.

Pages