मी पण पाहिला 'गॉडफादर' झी-स्टुडिओवर अप्रतिम, गॉडफादरचा प्लॅशबॅक पण सहीच आणि डिटेलींग पण मस्तच. या दरम्यान दाखवले गेलेले प्रश्न पण भारीच वाटले. 'के' ज्यावेळी न झालेल्या बाळाबाबत मायकलला सांगते त्यावेळचा पचिनोने दाखवलेला राग अंगावर येतो.
'रोमन हॉलिडे' पाहिला. मस्त आहे, या चित्रपटाबद्दल आधी पण लिहिलं गेलयं. बाकी काही काही प्रसंग मजा आणतात, ग्रेगचा फोटोग्राफर मित्र, त्याच्या लायटर कॅमेराने राजकन्येचे फोटो काढतो अथवा तिचे स्कूटर चालवणे, केस कापताना न्हाव्याचे 'ऑफ्फ!!' असे म्हणने, पार्टीच्या वेळची हाणामारी, तिच्या फोटोंना कॅप्शन्स देण्याचा प्रसंग इ.
नाहीतर आमच्याकडे मोगल काळ असो नाहीतर स्वातंत्र्यपूर्व काळ असो. ढळढळीत दिसणारं सिंथेटिक वापरायचं आम्ही सोडत नाही. आणि दिग्दर्शकाला त्याची काही पडलेलीही नसते.
नीधप
मस्त टिपण्णी. आणी अनुमोदन.
कैरी सिनेमातल्या तानी मावशीच्या ब्लाउझची ईस्त्रीची रेष पण मला अशीच खटकली होती. असो.
पीपली-लाइव्ह बघितला. बघून खिन्न झालो... इथे Santa Clara, CA मध्ये तरी लोक हसत नव्हते, त्यामुळे त्यांच्यपर्यन्त गोष्ट पोचली असावी असे म्हणायला हरकत नाही. TV मिडीया त्यात जे काही करते त्यात अतिशयोक्ती आजिबात वाटली नाही. (बघा "सबसे तेज", स्टार आणि तत्सम""न्यूज" channels!). Print media त्या मानाने जबाबदार दाखवली आहे. (जे काही अंशी अजून खरे आहे.) एकूणच सत्ता आणि पैसे नसलेल्यांना आजकाल कोणी वाली नाही हेच खरे..
"टिंग्या" आणि "गाभ्रीचा पाऊस" अजून पाहिलेले नाहीत, पण बघायचे आहेत..
ढळढळीत दिसणारं सिंथेटिक वापरायचं आम्ही सोडत नाही. आणि दिग्दर्शकाला त्याची काही पडलेलीही नसते.
दिग्दर्शकालाच काय प्रेक्षकानाही काहीच पडलेली नसते. प्रेक्षकानी जर दिग्द. ला जर अशा बाबीवरून जोड्याने मारायला सुरवात केली तर झकत बारकावे जपतील...
Submitted by बाळू जोशी. on 23 August, 2010 - 23:13
मला तर आवडला बाबा लफंगे परिंदे ! of course भरपूर त्रुटी आहेत त्यात . आणि पिसं काढायची म्हटली तर खूप काढता येतील. अजून खूप छान करता आला असता पण शेवटी तो यशराजचा पिच्चरे !
थीम चांगली आहे आणि नील सह्हीssssssssssssss दिसलाय !
भुलभुलैय्याचा ओरिजनल 'चन्द्रमुखी' पाहिला, (डब केलेला), चक्क प्रियदर्शन हिन्दी व्हर्जन जास्तं चांगलय आणि चांगलं एडिट केलेलय !
ओरिजनल मधे अक्की चा रोल रजनीकान्त ला !
त्यामुळे त्याला अवाजवी महत्व.. इतकं कि मुळ हवेलीतली स्टोरी सुरु होण्या आधीच त्याची एंट्री आहे , मग याची गाव कि छोरीयोंके साथ ३-४ गाणी, गॉगल उडवत फाइट्स , मग कधीतरी दीड तासानी त्या हवेली मधली स्टोरी सुरु होते !
शिवाय रजनी आहे म्हंटल्यावर मग त्या हिरॉइन च्या स्प्लिट पर्सनॅलिटीचा व्हिलन पण रजनीकान्त च ,
तिचा नवरा नाही ( तरीही ती नवर्याला मारायचा प्रयत्न करते सारखा!)!
हिन्दी मधे अक्कीची एंट्री बरोब्बर वेळी घेतलीये !
इथे नुसता रजनी !!
शायनीच्या जागी एक पन्नाशीचा मिशाळ गृहस्थ आहे आणि विद्या बालन ऐवजी ज्योतिका (नग्मा ची बहिण.)
प्रीतम चक्रवर्तीची गाणी पण जास्त सरस होती (कुठुन कॉपी केली असोत तरीही ).
क्लायमॅक्स च्या ' मेरे ढोलना' ची सर मुळे चित्रपटातल्या गाण्याला आजिबात नाही !
दिपाली, भुलभुलैय्याचा ओरिजनल तामिळ नाही तर मल्याळम आहे. http://en.wikipedia.org/wiki/Manichithrathazhu मोहनलाल आणि शोभना आहेत. (प्रियदर्शन याचा सह-दिग्दर्शक होता.) या सिनेमाला ४ notational awards मिळाली आहेत, incl. best actress for शोभना. मी हा पूर्वी TV वर पाहिला होता. हा खरा psycho-thriller आहे. नंतर तो तामिळ, तेलुगु, बंगाली, हिंदी मध्ये remake केला गेला आणि सगळ्यांनी त्यात वेगवेगळे पाणी मिसळून त्याला comedy वगैरे बनवले. (Including प्रियदर्शन!) या सगळ्या versions चे climax youtube वर आहेत. तामिळमध्ये अर्थातच सगळा फोकस रजनीकांतवर आहे.
कल्पना करा. एक कोणी "टोनी" आहे. आता तो नावावरूनच व्हिलन वाटतो ते सोडून द्या. पण तो एका मुलीच्या प्रेमात पडतो. तर ती केवळ पैशासाठी लग्नाला तयार होते. पण तेवढ्यात ती याच्या बहिणीच्या होणार्या नवर्याबरोबर पळून जाते. वर याचे १ मिलीयन पळवतात. मग तो यांचा बदला घ्यायच्या मागे लागतो.
पूर्वी अशा चित्रपटात टोनी हीरो असायचा. काईट्स मधे तोच व्हिलन आहे आणि त्याच्या बहिणीचा होणारा नवरा हृतिक हीरो :). हॉलीवूड मधे तर हीरो ला दाखवायला चांगले फ्लॉज सापडले म्हणून टोनीलाच केला असता.
बाकी अत्यंत रडक्या आवाजातील गाणी घेतली आहेत. ते इंतजार कब करेंगे फक्त लक्षात राहते. शेवट फारच अगम्य आहे.
बॉलीवूडच्या सर्व दिग्दर्शकांना एकदा सांगायला पाहिजे की लास वेगास मधे भर स्ट्रीप वर ओपन कन्व्हर्टिबल गाडी चालवताना हातात दारूच्या बाटल्या, सीट बेल्ट न लावलेला असे सहसा चालत नाही काईट्स, परदेस, आगामी अन्जाना अन्जानी सगळीकडे तेच दिसते.
नेवाडा च्या कोणत्या भागातून मेक्सिकोत पळून जाताना रेनफॉरेस्ट सारखे जंगल लागते त्याचाही शोध घ्यायला हवा. तो भाग उजाड आहे असा अमेरिकन लोकांचा समज तरी दूर होईल.
नेवाडा च्या कोणत्या भागातून मेक्सिकोत पळून जाताना रेनफॉरेस्ट सारखे जंगल लागते त्याचाही शोध घ्यायला हवा. तो भाग उजाड आहे असा अमेरिकन लोकांचा समज तरी दूर होईल>>>>>>
'चंद्रमुखी' म्हणजे सबकुछ रजनीकांत... त्याला शक्य झाले असते तर ज्योतिकाचा रोलही त्यानेच केला असता... रजनीकांतच्या जागी कमल हासन असता तर चित्रपटातील सर्व रोल्स त्याने मेकप बदलून बदलून केले असते.
रच्याकने, तो दशावतार कोणी पाहिलाय का? कळला का तो सिनेमा? मी अर्धा पाहिला पण मला काही कळलेच नाही काय चाललय.... त्या सुरूवातीच्या मुर्तीचा आणि त्या वैज्ञानिकाचा काय संबंध असतो?
ती चंद्रमुखी आहे ना जिचा आत्मा त्या सिनेमांमध्ये आहे तिचा काहीतरी शाप आहे असे इथे प्रचलित आहे.
तेलुगुत काम केलेली सौंदर्या विमान अपघातात मेली, त्या सिनेमाचा कन्नडा मधील दिग्दर्शक मेला, शायनी ला पण त्रास झाला इत्यादी. म्हणून रजनीने म्रुत्युंजय यज्ञ करून घेतला स्वतःला वाचविण्यासाठी. मग
रोबॉट नामक भयानक सिनेमात काम केले आहे. प्रोमो मध्येच डोके भंजाळते.
फारएन्ड: चाची ४२० मधील पापा पचडी कचडी खिचडी असे मुलीने म्हण्ल्यावर तो नक्की काय म्हणतो?
जरा सांग.
Submitted by अश्विनीमामी on 25 August, 2010 - 01:06
अरे धन्स अर्थ नाहीचे पण ते मस्त फिट होते. यू मेड माय डे, बबडिटी.:)
आयेशा पाहिलास का अंकू? त्यातील गल मिठी मीठी बोल रीमिक्स मी एका लग्नात नाचायला फिक्स केले आहे.
Submitted by अश्विनीमामी on 25 August, 2010 - 01:51
रजनीकांतच्या जागी कमल हासन असता तर चित्रपटातील सर्व रोल्स त्याने मेकप बदलून बदलून केले असते.
<<
ती चंद्रमुखी आहे ना जिचा आत्मा त्या सिनेमांमध्ये आहे तिचा काहीतरी शाप आहे असे इथे प्रचलित आहे.
तेलुगुत काम केलेली सौंदर्या विमान अपघातात मेली, त्या सिनेमाचा कन्नडा मधील दिग्दर्शक मेला, शायनी ला पण त्रास झाला इत्यादी. म्हणून रजनीने म्रुत्युंजय यज्ञ करून घेतला स्वतःला वाचविण्यासाठी
<<<<कठिण आहे !!!
आयेशा पाहिलास का अंकू?
>>
नाही ना..
बंगलोरल्यापासून माझं चित्रपटीय कुपोषण चाललंय...
थेटरात तो रावण पाहिला फक्त...
आणि घरी बदमाश कंपनी, राजनीती आणि एल्.एस्.डी.
रजनीचा चंद्रमुखी मीही पाहिला थोडासा मला तर कळेचना हिरो कोण आणि व्हिलन कोण ते. आणि जेव्हा जेव्हा व्हिलन रजनी अवतरतो तेव्हा त्याचे ते घोड्यांसारखे लगाम बांधलेले ८-१० कुत्रे आणि बॅकग्राऊंडला ८-१० हडळी एकदम हसल्यासारखे आवाज ऐकुन मी चंद्रमुखीपेक्षा जास्त घाबरले आणि टीवीच बंद केला..
रच्याकने, ह्या साउदींडियनांना आचरटपणाचे एवढे वेड का?? त्यांच्या सगळ्या चित्रपटातले हिरोंना गुरुत्वाकर्षणाचे नियम लागु होत नाहीत, हिरोइनी कायम सेड्युसिंग आवाजात बोलतात, अगदी हिरोशी पहिल्या भेटीतही... माझ्या एका मित्राचे बाबा-भाऊ कायम हेच चित्रपट पाहतात. त्यांच्या सोयीसाठी हे सगळॅ चित्रपट हिंदीत ड्ब केलेले आहेत आणि गावी त्यांच्या सिड्याही उपलब्ध असतात...
साधना, हे सिनेमे पहाण्यासाठी आणि आवडण्यासाठी एका वेगळ्या प्रतीच्या अभिरुचीची गरज असते,दुर्दैवानी असे लोक कमी होत आहेत
कालच माझ्या तामिळ कलिगने आणलेला 'सिंगम' पायला, अतार्किक शब्दही अतार्किक वाटेल असा प्रकार होता!
हिरोइनी कायम सेड्युसिंग आवाजात बोलतात, अगदी हिरोशी पहिल्या भेटीतही>> अचूक निरिक्षण!
या रोबोटमधे रोबोचा रोल ऐश्वर्यानेच केला असेल ना?
>>> नाही ना.. रजनीच्या अभिनयाच्या छटा (?) दिसाव्यात म्हणून तोच संशोधक आणि तोच रोबो. अॅश त्याची मैत्रिण. तिच्याकडे बघूनच त्याला रोबो बनवायच्या आयडियेची कल्पना सुचली असावी संशोधकाचे तिच्यावर प्रेम असतेच, पण नंतर रोबोचेही बसते. त्यामुळे मॅन व्हर्सेस मशीन अशी एक थरारक बाजूही(?) आहे ह्या चित्रपटाला!
आणि माहित्ये का- फक्त रजनीच्या फक्त मेकपसाठीच फक्त ३ कोटी लागलेत फक्त!
मी पण पाहिला 'गॉडफादर'
मी पण पाहिला 'गॉडफादर' झी-स्टुडिओवर
अप्रतिम, गॉडफादरचा प्लॅशबॅक पण सहीच आणि डिटेलींग पण मस्तच. या दरम्यान दाखवले गेलेले प्रश्न पण भारीच वाटले. 'के' ज्यावेळी न झालेल्या बाळाबाबत मायकलला सांगते त्यावेळचा पचिनोने दाखवलेला राग अंगावर येतो.
'रोमन हॉलिडे' पाहिला. मस्त आहे, या चित्रपटाबद्दल आधी पण लिहिलं गेलयं. बाकी काही काही प्रसंग मजा आणतात, ग्रेगचा फोटोग्राफर मित्र, त्याच्या लायटर कॅमेराने राजकन्येचे फोटो काढतो अथवा तिचे स्कूटर चालवणे, केस कापताना न्हाव्याचे 'ऑफ्फ!!' असे म्हणने, पार्टीच्या वेळची हाणामारी, तिच्या फोटोंना कॅप्शन्स देण्याचा प्रसंग इ.
'रोमन हॉलिडे' पाहिला. मस्त
'रोमन हॉलिडे' पाहिला. मस्त आहे,
>>
मोदक...
माझ्या लॅपटॉपच्या हार्डडिस्क वर कायस्वरूपी असणार्या काही शिनेमांपैकी एक...
नाहीतर आमच्याकडे मोगल काळ असो
नाहीतर आमच्याकडे मोगल काळ असो नाहीतर स्वातंत्र्यपूर्व काळ असो. ढळढळीत दिसणारं सिंथेटिक वापरायचं आम्ही सोडत नाही. आणि दिग्दर्शकाला त्याची काही पडलेलीही नसते.
नीधप
मस्त टिपण्णी. आणी अनुमोदन.
कैरी सिनेमातल्या तानी मावशीच्या ब्लाउझची ईस्त्रीची रेष पण मला अशीच खटकली होती. असो.
लफंगे परिंदे अर्धवट पाहिला ,
लफंगे परिंदे अर्धवट पाहिला , एकदम बकवास वाटला.
पीपली-लाइव्ह बघितला. बघून
पीपली-लाइव्ह बघितला. बघून खिन्न झालो... इथे Santa Clara, CA मध्ये तरी लोक हसत नव्हते, त्यामुळे त्यांच्यपर्यन्त गोष्ट पोचली असावी असे म्हणायला हरकत नाही. TV मिडीया त्यात जे काही करते त्यात अतिशयोक्ती आजिबात वाटली नाही. (बघा "सबसे तेज", स्टार आणि तत्सम""न्यूज" channels!). Print media त्या मानाने जबाबदार दाखवली आहे. (जे काही अंशी अजून खरे आहे.) एकूणच सत्ता आणि पैसे नसलेल्यांना आजकाल कोणी वाली नाही हेच खरे..
"टिंग्या" आणि "गाभ्रीचा पाऊस" अजून पाहिलेले नाहीत, पण बघायचे आहेत..
ढळढळीत दिसणारं सिंथेटिक
ढळढळीत दिसणारं सिंथेटिक वापरायचं आम्ही सोडत नाही. आणि दिग्दर्शकाला त्याची काही पडलेलीही नसते.
दिग्दर्शकालाच काय प्रेक्षकानाही काहीच पडलेली नसते. प्रेक्षकानी जर दिग्द. ला जर अशा बाबीवरून जोड्याने मारायला सुरवात केली तर झकत बारकावे जपतील...
मला तर आवडला बाबा लफंगे
मला तर आवडला बाबा लफंगे परिंदे ! of course भरपूर त्रुटी आहेत त्यात . आणि पिसं काढायची म्हटली तर खूप काढता येतील. अजून खूप छान करता आला असता पण शेवटी तो यशराजचा पिच्चरे !
थीम चांगली आहे आणि नील सह्हीssssssssssssss दिसलाय !
भुलभुलैय्याचा ओरिजनल
भुलभुलैय्याचा ओरिजनल 'चन्द्रमुखी' पाहिला, (डब केलेला), चक्क प्रियदर्शन हिन्दी व्हर्जन जास्तं चांगलय आणि चांगलं एडिट केलेलय !
).
ओरिजनल मधे अक्की चा रोल रजनीकान्त ला !
त्यामुळे त्याला अवाजवी महत्व.. इतकं कि मुळ हवेलीतली स्टोरी सुरु होण्या आधीच त्याची एंट्री आहे , मग याची गाव कि छोरीयोंके साथ ३-४ गाणी, गॉगल उडवत फाइट्स , मग कधीतरी दीड तासानी त्या हवेली मधली स्टोरी सुरु होते !
शिवाय रजनी आहे म्हंटल्यावर मग त्या हिरॉइन च्या स्प्लिट पर्सनॅलिटीचा व्हिलन पण रजनीकान्त च ,
तिचा नवरा नाही ( तरीही ती नवर्याला मारायचा प्रयत्न करते सारखा!)!
हिन्दी मधे अक्कीची एंट्री बरोब्बर वेळी घेतलीये !
इथे नुसता रजनी !!
शायनीच्या जागी एक पन्नाशीचा मिशाळ गृहस्थ आहे आणि विद्या बालन ऐवजी ज्योतिका (नग्मा ची बहिण.)
प्रीतम चक्रवर्तीची गाणी पण जास्त सरस होती (कुठुन कॉपी केली असोत तरीही
क्लायमॅक्स च्या ' मेरे ढोलना' ची सर मुळे चित्रपटातल्या गाण्याला आजिबात नाही !
दिपाली, भुलभुलैय्याचा ओरिजनल
दिपाली, भुलभुलैय्याचा ओरिजनल तामिळ नाही तर मल्याळम आहे. http://en.wikipedia.org/wiki/Manichithrathazhu मोहनलाल आणि शोभना आहेत. (प्रियदर्शन याचा सह-दिग्दर्शक होता.) या सिनेमाला ४ notational awards मिळाली आहेत, incl. best actress for शोभना. मी हा पूर्वी TV वर पाहिला होता. हा खरा psycho-thriller आहे. नंतर तो तामिळ, तेलुगु, बंगाली, हिंदी मध्ये remake केला गेला आणि सगळ्यांनी त्यात वेगवेगळे पाणी मिसळून त्याला comedy वगैरे बनवले. (Including प्रियदर्शन!) या सगळ्या versions चे climax youtube वर आहेत. तामिळमध्ये अर्थातच सगळा फोकस रजनीकांतवर आहे.
काईटस.... कल्पना करा. एक कोणी
काईटस....
कल्पना करा. एक कोणी "टोनी" आहे. आता तो नावावरूनच व्हिलन वाटतो ते सोडून द्या. पण तो एका मुलीच्या प्रेमात पडतो. तर ती केवळ पैशासाठी लग्नाला तयार होते. पण तेवढ्यात ती याच्या बहिणीच्या होणार्या नवर्याबरोबर पळून जाते. वर याचे १ मिलीयन पळवतात. मग तो यांचा बदला घ्यायच्या मागे लागतो.
पूर्वी अशा चित्रपटात टोनी हीरो असायचा. काईट्स मधे तोच व्हिलन आहे आणि त्याच्या बहिणीचा होणारा नवरा हृतिक हीरो :). हॉलीवूड मधे तर हीरो ला दाखवायला चांगले फ्लॉज सापडले म्हणून टोनीलाच केला असता.
बाकी अत्यंत रडक्या आवाजातील गाणी घेतली आहेत. ते इंतजार कब करेंगे फक्त लक्षात राहते. शेवट फारच अगम्य आहे.
बॉलीवूडच्या सर्व दिग्दर्शकांना एकदा सांगायला पाहिजे की लास वेगास मधे भर स्ट्रीप वर ओपन कन्व्हर्टिबल गाडी चालवताना हातात दारूच्या बाटल्या, सीट बेल्ट न लावलेला असे सहसा चालत नाही
काईट्स, परदेस, आगामी अन्जाना अन्जानी सगळीकडे तेच दिसते.
नेवाडा च्या कोणत्या भागातून मेक्सिकोत पळून जाताना रेनफॉरेस्ट सारखे जंगल लागते त्याचाही शोध घ्यायला हवा. तो भाग उजाड आहे असा अमेरिकन लोकांचा समज तरी दूर होईल.
नेवाडा च्या कोणत्या भागातून
नेवाडा च्या कोणत्या भागातून मेक्सिकोत पळून जाताना रेनफॉरेस्ट सारखे जंगल लागते त्याचाही शोध घ्यायला हवा. तो भाग उजाड आहे असा अमेरिकन लोकांचा समज तरी दूर होईल>>>>>>
अगदी अगदी !! आणि सतत मुसळधार पाऊस !!
'चंद्रमुखी' म्हणजे सबकुछ
'चंद्रमुखी' म्हणजे सबकुछ रजनीकांत... त्याला शक्य झाले असते तर ज्योतिकाचा रोलही त्यानेच केला असता... रजनीकांतच्या जागी कमल हासन असता तर चित्रपटातील सर्व रोल्स त्याने मेकप बदलून बदलून केले असते.
रजनीकांतच्या जागी कमल हासन
रजनीकांतच्या जागी कमल हासन असता तर चित्रपटातील सर्व रोल्स त्याने मेकप बदलून बदलून केले असते.

>>
{ही कमल हासनची १० अवतारांची १० मुंडकी आहेत}
रच्याकने, तो दशावतार कोणी
रच्याकने, तो दशावतार कोणी पाहिलाय का? कळला का तो सिनेमा? मी अर्धा पाहिला पण मला काही कळलेच नाही काय चाललय.... त्या सुरूवातीच्या मुर्तीचा आणि त्या वैज्ञानिकाचा काय संबंध असतो?
ती चंद्रमुखी आहे ना जिचा
ती चंद्रमुखी आहे ना जिचा आत्मा त्या सिनेमांमध्ये आहे तिचा काहीतरी शाप आहे असे इथे प्रचलित आहे.
तेलुगुत काम केलेली सौंदर्या विमान अपघातात मेली, त्या सिनेमाचा कन्नडा मधील दिग्दर्शक मेला, शायनी ला पण त्रास झाला इत्यादी. म्हणून रजनीने म्रुत्युंजय यज्ञ करून घेतला स्वतःला वाचविण्यासाठी. मग
रोबॉट नामक भयानक सिनेमात काम केले आहे. प्रोमो मध्येच डोके भंजाळते.
फारएन्ड: चाची ४२० मधील पापा पचडी कचडी खिचडी असे मुलीने म्हण्ल्यावर तो नक्की काय म्हणतो?
जरा सांग.
बच्चू बछडी डिबरी
बच्चू बछडी डिबरी टिबरी...
{अर्थ मला विचारू नका...}
अरे धन्स अर्थ नाहीचे पण ते
अरे धन्स अर्थ नाहीचे पण ते मस्त फिट होते. यू मेड माय डे, बबडिटी.:)
आयेशा पाहिलास का अंकू? त्यातील गल मिठी मीठी बोल रीमिक्स मी एका लग्नात नाचायला फिक्स केले आहे.
ओह ओरिजनल मल्याळम आहे का
ओह ओरिजनल मल्याळम आहे का :)?
रजनीकांतच्या जागी कमल हासन असता तर चित्रपटातील सर्व रोल्स त्याने मेकप बदलून बदलून केले असते.
<<
ती चंद्रमुखी आहे ना जिचा आत्मा त्या सिनेमांमध्ये आहे तिचा काहीतरी शाप आहे असे इथे प्रचलित आहे.
तेलुगुत काम केलेली सौंदर्या विमान अपघातात मेली, त्या सिनेमाचा कन्नडा मधील दिग्दर्शक मेला, शायनी ला पण त्रास झाला इत्यादी. म्हणून रजनीने म्रुत्युंजय यज्ञ करून घेतला स्वतःला वाचविण्यासाठी
<<<<कठिण आहे !!!
चंद्रमुखी : "आत्मा" वगैरे ठिक
चंद्रमुखी : "आत्मा" वगैरे ठिक आहे. पण त्या खोलीत भला मोठा "नाग" सुध्दा दाखवलाय... तो कशासाठी??????
तो, चन्द्रमुखीच्या
तो, चन्द्रमुखीच्या दागिन्यांचं रक्षण करायला
पण तो इतरांना का दिसत नाही म्हणे ?
.
.
म्हणजे त्या नागाचाही "आत्मा"
म्हणजे त्या नागाचाही "आत्मा" असतो का?????:)
'चंद्रमुखी'च्या मराठी रिमेक
'चंद्रमुखी'च्या मराठी रिमेक मध्ये राखी सावंत ला लीड रोल द्या रे कोणीतरी
या रोबोटमधे रोबोचा रोल
या रोबोटमधे रोबोचा रोल ऐश्वर्यानेच केला असेल ना?
>>'चंद्रमुखी'च्या मराठी रिमेक
>>'चंद्रमुखी'च्या मराठी रिमेक मध्ये राखी सावंत ला लीड रोल द्या रे कोणीतरी <
राहुल महाजनलाही घ्या बरे त्यात....
नको, नको ! राहुल चं भयाण हसु
नको, नको !
राहुल चं भयाण हसु ऐकून खुद्द चन्द्रमुखी सुध्दा घाबरेल त्याला शाप द्यायला !
आयेशा पाहिलास का
आयेशा पाहिलास का अंकू?
>>
नाही ना..
बंगलोरल्यापासून माझं चित्रपटीय कुपोषण चाललंय...
थेटरात तो रावण पाहिला फक्त...
आणि घरी बदमाश कंपनी, राजनीती आणि एल्.एस्.डी.
रजनीचा चंद्रमुखी मीही पाहिला
रजनीचा चंद्रमुखी मीही पाहिला थोडासा
मला तर कळेचना हिरो कोण आणि व्हिलन कोण ते. आणि जेव्हा जेव्हा व्हिलन रजनी अवतरतो तेव्हा त्याचे ते घोड्यांसारखे लगाम बांधलेले ८-१० कुत्रे आणि बॅकग्राऊंडला ८-१० हडळी एकदम हसल्यासारखे आवाज ऐकुन मी चंद्रमुखीपेक्षा जास्त घाबरले आणि टीवीच बंद केला..
रच्याकने, ह्या साउदींडियनांना आचरटपणाचे एवढे वेड का?? त्यांच्या सगळ्या चित्रपटातले हिरोंना गुरुत्वाकर्षणाचे नियम लागु होत नाहीत, हिरोइनी कायम सेड्युसिंग आवाजात बोलतात, अगदी हिरोशी पहिल्या भेटीतही... माझ्या एका मित्राचे बाबा-भाऊ कायम हेच चित्रपट पाहतात. त्यांच्या सोयीसाठी हे सगळॅ चित्रपट हिंदीत ड्ब केलेले आहेत आणि गावी त्यांच्या सिड्याही उपलब्ध असतात...
साधना, हे सिनेमे पहाण्यासाठी
साधना, हे सिनेमे पहाण्यासाठी आणि आवडण्यासाठी एका वेगळ्या प्रतीच्या अभिरुचीची गरज असते,दुर्दैवानी असे लोक कमी होत आहेत
कालच माझ्या तामिळ कलिगने आणलेला 'सिंगम' पायला, अतार्किक शब्दही अतार्किक वाटेल असा प्रकार होता!
हिरोइनी कायम सेड्युसिंग आवाजात बोलतात, अगदी हिरोशी पहिल्या भेटीतही>> अचूक निरिक्षण!
या रोबोटमधे रोबोचा रोल
या रोबोटमधे रोबोचा रोल ऐश्वर्यानेच केला असेल ना?
संशोधकाचे तिच्यावर प्रेम असतेच, पण नंतर रोबोचेही बसते. त्यामुळे मॅन व्हर्सेस मशीन अशी एक थरारक बाजूही(?) आहे ह्या चित्रपटाला! 
>>> नाही ना.. रजनीच्या अभिनयाच्या छटा (?) दिसाव्यात म्हणून तोच संशोधक आणि तोच रोबो. अॅश त्याची मैत्रिण. तिच्याकडे बघूनच त्याला रोबो बनवायच्या आयडियेची कल्पना सुचली असावी

Pages