>>> अमेरिकन लोकशाही>> हा एक वदतो व्याघात आहे. <<<
वेल, इव्हन इट इज सो, मला अजूनही तेथील लेखन स्वातंत्र्य आणि अमेरिकन नागरिकात असलेला मत प्रदर्शनातील थेटपणा/धीटपणा भावतोच. "राजकारण" ही विषय घेऊन निर्मिती झालेल्या सर्वच (हॉलिवूड) चित्रपटात ही बाब प्रकर्षाने जाणवते.
>>> उत्तम पोस्ट प्रतीक. <<<
थॅन्क्स, पण प्लीज "अंडर फायर" हा चित्रपट तुम्ही पहाच (म्हणजे अद्यापि पाहिला नसेल तर...)
प्रतीक
Submitted by प्रतीक देसाई on 20 July, 2010 - 04:43
मी गेले ३ दिवस, हप्त्याहप्त्याने आऊट ऑफ़ अफ़्रिका, हा चित्रपट बघतोय. हा १९८५ मधे रिलिझ झाला
होता. त्या वर्षीची ७ ऑस्कर Awards (उत्कृष्ठ चित्रपटासकट ) या चित्रपटाला मिळाली होती.
हा खूप प्रदिर्घ सिनेमा आहे, आणि घरी बघताना, सलग बघणे शक्य झाले नाही.
डेन्मार्कच्या राज घराण्यातील एका स्त्रीने त्या काळातल्या केनिया मधे जी वर्षे काढली, त्यावर
हा चित्रपट बेतलेला आहे. यातला काळ १९१३ पासून सुरू होतो. कथानकात, तो असा का वागला
आणि ती अशी का वागली, याची उत्तरे मिळतातच असे नाही. (तशी प्रत्यक्ष आयूष्यात तरी कूठे
मिळतात ? ) पण तरिही हा चित्रपट पकड घेतो.
मुख्य भुमिकेतील मेरिल स्ट्रीपचा अभिनय लाजबाब आहे (तिचे ऑस्करसाठी नॉमिनेशन झाले होते
पण ते हुकले) पण चित्रीकरण आणि कलादिग्दर्शन डोळ्याचे पारणे फ़ेडते. केनियाचा, रिफ़्ट व्हॅली भाग,
मारा नदीचे खोरे हा भाग अप्रतिम रित्या चित्रीत झालाय. तो भाग आजही तसाच आहे.
तिचे घर आणि घरातील प्रत्येक वस्तू देखणी आहे. अगदी काहि क्षणासाठी पडद्यावर दिसणाऱ्या वस्तू
जमवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे जाणवते. त्या काळातली मोंबासा आणि नैरोबी हि शहरे
दाखवणे शक्यच नव्हते, पण बाकीच्या जागा खासच. त्या काळातल्या ब्रिटीश तसेच स्थानिक केनयन
आणि भारतीय वंशाच्या लोकांचे चित्रीकरण पण यथायोग्य असे आहे. कपडेपट पण उतम (त्यासाठी
पण नॉमिनेशन झाले होते. पण ते हुकले.)
निवांत वेळ काढून, अवश्य बघण्याजोगा.
दिनेशदा, मी हा चित्रपट पुण्यात अलका टॉकिजला पाहिला होता खूप वर्षांपूर्वी.... तेव्हा कॉलेजात होते.... सगळा चित्रपट तेव्हा खूप काही कळला नव्हता! पण मेरिल स्ट्रीपसाठी तो पाहिला होता, आणि तिचा अभिनय अफलातून होता त्यात! माझ्या एका भावाला पिक्चर बघायला घेऊन गेले होते, आणि जरी तेव्हा त्यातील कथानक तेवढे झेपले नाही तरी तो पिक्चर बघून आम्ही बरेच गंभीर झाल्याचं आठवतंय. त्या चित्रपटात दाखवलेली आफ्रिकेची निसर्गचित्रेही अप्रतिम आहेत. वेगळाच फील आहे..... खरंच, आता पुन्हा बघायला हवा!
Submitted by अरुंधती कुलकर्णी on 24 July, 2010 - 05:29
हो अरुंधती, तसे कथानक गंभीर (दुर्दैवी) आहे. केनियात स्थिरस्थावर होण्याचे तिचे
प्रयत्न यशस्वी होत नाहीत. प्रेमातही ती अपयशी ठरते. (प्रत्यक्ष कादंबरीत यापेक्षा
दुर्दैवी घटना आहेत. त्या चित्रपटात टाळल्या आहेत.) पण तरिही नायिका निराश
होत नाही.
चित्रीकरण, केवळ अप्रतिम आहे. आजकाल तंत्र सुधारल्याने, अनेक चित्रपटात
असे चित्रीकरण असते, पण त्या काळात त्याचे अप्रूप होते.
केनयाच्या मध्यभागी, लेक नाकुरू नावाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. तिथे
रोहीत पक्षी (फ्लेमिंगोज) खुप संख्येने येतात. त्यावरुन छोटे विमान उडवण्याचे
अप्रतिम दृष्य आहे यात. त्या विमानामुळे रोहित पक्ष्यांचे विचलीत होणे, अतीव
सुंदर.
आउट ऑफ आफ्रिका हा एका सत्य कथेवर (आत्मचरीत्रावर) आधारीत चित्रपट आहे.. हे पुस्तक देखील सुरेख आहे.. रच्याकने, ती राजघराण्यातली नव्हती पण अमीर-उमरावांपैकी असते (दुसर्या फळीतले राजे-सरदार लोक वगैरे)
खट्टा मीठा पहिला का कोणी? >>> हो मी पाहिला , ठीक आहे, विशेष म्हणजे , नेहमीचे कुंवर घराणे न दाखवता , फलटणचं टिचकुले घराणं दाखवलयं , त्यामुळे जरा आपलेपणा वाटतो , अक्षय कुमारच काम मस्त झालय , बरीचशी मराठी मंडळी आहेत . असरानीने छोट्याशा रोलमध्ये पण झकास काम केलयं.
>>खट्टा मीठा पहिला का कोणी?
बकवास आहे.. फुकट पाहीला म्हणुन त्रास कमी झाला...प्रियदर्शन सटकला आहे..तेच सेट्च..तोच तो पणा खुप येतोय..त्याने रिटायरमेण्ट घ्यावी आता
परवा "सॉल्ट" पाहीला. अॅक्शनपट आहे. पण कथानक वेगवान असल्याने प्रेक्षकांना विचार करण्याची संधीच मिळत नाही. अँजेलिना जोलीच्या कामाचं कौतुक करावं तेवढं थोडचं...
>>खट्टा मीठा पहिला का कोणी?
बकवास आहे.. फुकट पाहीला म्हणुन त्रास कमी झाला...प्रियदर्शन सटकला आहे..तेच सेट्च..तोच तो पणा खुप येतोय..त्याने रिटायरमेण्ट घ्यावी आता>>
अगदी अगदी. अगदी १ किंवा दोन प्रसंग सोडले तर बकी एकदम बकवस. या वेळी अक्षय कुमार - ओव्हर अक्टींग. त्याच्या वडलांच काम मस्त्च झाल आहे. बकी सगळ म्हणजे सगळ ओढुन ताणून केल्यासारख.
उडाणटप्पू चा उड्डाण (आय मीन उडान) पाहिला काल आणि हा पोट्टा त्याची उडान नक्की कधी भरणार आहे याचा विचार करत करत सबंध मूव्ही बघितला (२ तास ). पठ्ठ्याने शेवटच्या ५ मिनिटात त्याची ती तथाकथित उडान घेतलीये.
थोडक्यात उडान सिनेमा बघायचा असल्यास टीव्ही वर यायची वाट बघा. अॅडलॅब्स वै. ला जाऊन वेळ आणि पैसा दोन्ही फुकट जाईल. आणि पैसा आहे पण वेळ नाही अशी स्थिती असल्यास उडानचे तिकिट काढा पण शेवटच्या १० मिनिटांसाठीच फक्त थेटर मध्ये शिरा. बाकीचा मूव्ही बघितला नाही तर शेवटच्या १० मिनिटांत कळेल.
जळ्तोय मी .... सगळे बोलतायत इन्सेप्शन बद्द्ल..... मला अगदी म्हणजे अगदीच वेळ भेटत नाहीये............................... :रागाने लाल होऊन फुटायला आलेली बाहुली: :नंतर रडूपण लागलीये:
बराय हॅरी पॉटरच्या शेवट्च्या भागासाठी आत्ताच सुट्ट्या काढुन ठेवल्यात....
मी असे सिनेमे थियेटरातच पाहतो.... डार्क नाईट मिस्ला तो दिवस आणी आजचा दिवस.... रोज एकदा तरी "व्हाय सो सिरियस" एकुन स्वतःच्या मुर्खपणाचा जप करतो मी... अता मला ती चुक सुधारायचीये मामी....
कालच डेंझेल वॉशिंग्टनचा 'मांचुरिअन कँडीडेट' पाहिला. मस्त सपेन्स आहे एकदम इंटेलि़जंट.
गेल्या काही वर्षात, डेंझेल वॉशिंग्टन, मॉर्गन फ्रिमन आणि विल स्मिथ या तिन्ही अफ्रिकन-अमेरिकन कलाकारांचे सिनेमा विदाउट फेल उत्तम मनोरंजन करणारे येत आहेत.
आज अचानक यूटीव्ही वर चॅप्लिनचा 'ए किंग इन न्यू यॉर्क' पाहिला. अमेरिकन कल्चरवर खास चॅप्लिन शैलीत मस्त शेरेबाजी केली आहे. मी चित्रपटाची सुरुवात मिस् केली त्यामुळे काम करणारा प्रमुख नट खूप ओळखीचा वाटत होता, परंतु तो चार्ली चॅप्लीन आहे हे बर्याच नंतर कळाले. त्याची भूमिका इगॉर शॅडोव्ह ह्या हद्दपार झालेल्या व अमेरिकेत, न्यूयॉर्क शहरात तात्पुरता आसरा घेतलेल्या राजाची आहे. अमेरिकेत हा राजा जवळ पैसा नसतानाही कसा टिकायचा प्रयत्न करतो, त्याच्या ''टायटल''मुळे त्याला त्या स्थितीतही कशी प्रसिध्दी मिळते वगैरेचे मार्मिक चित्रण. त्यातच कम्यूनिझमवरची अमेरिकेची भूमिकाही या चित्रपटात उपहासगर्भतेने दाखवण्यात आली आहे. चॅप्लीनचा अप्रतिम अभिनय/ टायमिंग! नेहमीसारखीच ह्या चित्रपटालाही कारुण्याची झालर आहे. खास करून रुपर्ट ह्या स्कॉटिश मुलाचे प्रसंग. त्याचे आईवडील कम्यूनिस्ट असण्याच्या आरोपावरून अटकेत आहेत. त्या मुलाशी संबंध आल्यामुळे अमेरिकेत आश्रय घेतलेल्या इगॉर राजालाही कोर्टाच्या चौकशीस कसे सामोरे जावे लागते ते दाखवले आहे. चित्रपटात खास चॅप्लिन छाप विनोद ठिकठिकाणी बघायला मिळतो. काही प्रसंगांमध्ये तर अक्षरशः हसून हसून गडाबडा लोळायची वेळ येते. खास करून चॅप्लिन द किंग लिफ्टमध्ये आपले बोट अग्निशामकाच्या पाण्याच्या पाईपमध्ये अडकवून घेतो आणि ते तसेच अडकलेले बोट व पाईपचा वेगळा झालेला भाग घेऊन शेवटी कोर्टात दाखल होतो तो प्रसंग अतिशय सुरेख व विनोदी झाला आहे. चित्रपटाचा शेवटही करुणामय सुखान्त होतो.
चॅप्लिनच्या चाहत्यांनी जरूर पहावा असा चित्रपट!
Submitted by अरुंधती कुलकर्णी on 31 July, 2010 - 11:23
खट्टा मीठा शेवट पर्यंत पाहु शकले इतकेच
प्रियदर्शन ला काय झालय, अगदी मालामाल वीकली पर्यंत त्याचे मुव्हिज आवडले होते , अता सगळी जादु गेलीये .
अक्की सुपर्ब अॅज ऑलवेज, ती नवीन अॅक्ट्र्स तृषा का कोण आहे ती पण चांगलीये, थोडी रिमा सेन सारखी वाटली, प्रियदर्शन मुव्हिज ना फिट्ट आहे , ग्लॅमरस पण गर्ल नेक्स्ट डोअर इमेज वाली !
मला तर तो "हिदालगो" (Viggo Mortensen) चा खुप जोशपुर्ण,स्फुर्तीदायी ,प्रेरणादायी वाटतो .
माझ्यासाठी आता तो (जगातला) सगळ्यात आवडता चित्रपट आहे,
मी तो तसा खुप उशीरा काही महिन्यांपुर्वी पाहिला
पण, मला वाटतं की माणसान जगावं तर त्यातल्या हिरोसारखं,
त्यातले मला तो नट (घोड्याबरोबर) तर आवडतोच ,तसेच वाळवंटातल चित्रण ही खूप सुरेख झाले आहे, कथानक तर कुणालाही भावेल असचं जबरदस्त !
मला सांगा आपण का जगु नये ? प्रयत्न तरी का करु नये का ?
अस वाटण्यांच कारण काय असेल अस तुम्हाला वाटतं ?
अमेरिकन लोकशाही>> हा एक वदतो
अमेरिकन लोकशाही>> हा एक वदतो व्याघात आहे. ऑक्सीमोरॉन.
उत्तम पोस्ट प्रतीक.
नी वेलकम बॅक. कहां गायब हो गयी थी?
>>> अमेरिकन लोकशाही>> हा एक
>>> अमेरिकन लोकशाही>> हा एक वदतो व्याघात आहे. <<<
वेल, इव्हन इट इज सो, मला अजूनही तेथील लेखन स्वातंत्र्य आणि अमेरिकन नागरिकात असलेला मत प्रदर्शनातील थेटपणा/धीटपणा भावतोच. "राजकारण" ही विषय घेऊन निर्मिती झालेल्या सर्वच (हॉलिवूड) चित्रपटात ही बाब प्रकर्षाने जाणवते.
>>> उत्तम पोस्ट प्रतीक. <<<
थॅन्क्स, पण प्लीज "अंडर फायर" हा चित्रपट तुम्ही पहाच (म्हणजे अद्यापि पाहिला नसेल तर...)
प्रतीक
मी गेले ३ दिवस,
मी गेले ३ दिवस, हप्त्याहप्त्याने आऊट ऑफ़ अफ़्रिका, हा चित्रपट बघतोय. हा १९८५ मधे रिलिझ झाला
होता. त्या वर्षीची ७ ऑस्कर Awards (उत्कृष्ठ चित्रपटासकट ) या चित्रपटाला मिळाली होती.
हा खूप प्रदिर्घ सिनेमा आहे, आणि घरी बघताना, सलग बघणे शक्य झाले नाही.
डेन्मार्कच्या राज घराण्यातील एका स्त्रीने त्या काळातल्या केनिया मधे जी वर्षे काढली, त्यावर
हा चित्रपट बेतलेला आहे. यातला काळ १९१३ पासून सुरू होतो. कथानकात, तो असा का वागला
आणि ती अशी का वागली, याची उत्तरे मिळतातच असे नाही. (तशी प्रत्यक्ष आयूष्यात तरी कूठे
मिळतात ? ) पण तरिही हा चित्रपट पकड घेतो.
मुख्य भुमिकेतील मेरिल स्ट्रीपचा अभिनय लाजबाब आहे (तिचे ऑस्करसाठी नॉमिनेशन झाले होते
पण ते हुकले) पण चित्रीकरण आणि कलादिग्दर्शन डोळ्याचे पारणे फ़ेडते. केनियाचा, रिफ़्ट व्हॅली भाग,
मारा नदीचे खोरे हा भाग अप्रतिम रित्या चित्रीत झालाय. तो भाग आजही तसाच आहे.
तिचे घर आणि घरातील प्रत्येक वस्तू देखणी आहे. अगदी काहि क्षणासाठी पडद्यावर दिसणाऱ्या वस्तू
जमवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे जाणवते. त्या काळातली मोंबासा आणि नैरोबी हि शहरे
दाखवणे शक्यच नव्हते, पण बाकीच्या जागा खासच. त्या काळातल्या ब्रिटीश तसेच स्थानिक केनयन
आणि भारतीय वंशाच्या लोकांचे चित्रीकरण पण यथायोग्य असे आहे. कपडेपट पण उतम (त्यासाठी
पण नॉमिनेशन झाले होते. पण ते हुकले.)
निवांत वेळ काढून, अवश्य बघण्याजोगा.
दिनेशदा, मी हा चित्रपट
दिनेशदा, मी हा चित्रपट पुण्यात अलका टॉकिजला पाहिला होता खूप वर्षांपूर्वी.... तेव्हा कॉलेजात होते.... सगळा चित्रपट तेव्हा खूप काही कळला नव्हता! पण मेरिल स्ट्रीपसाठी तो पाहिला होता, आणि तिचा अभिनय अफलातून होता त्यात! माझ्या एका भावाला पिक्चर बघायला घेऊन गेले होते, आणि जरी तेव्हा त्यातील कथानक तेवढे झेपले नाही तरी तो पिक्चर बघून आम्ही बरेच गंभीर झाल्याचं आठवतंय. त्या चित्रपटात दाखवलेली आफ्रिकेची निसर्गचित्रेही अप्रतिम आहेत. वेगळाच फील आहे..... खरंच, आता पुन्हा बघायला हवा!
हो अरुंधती, तसे कथानक गंभीर
हो अरुंधती, तसे कथानक गंभीर (दुर्दैवी) आहे. केनियात स्थिरस्थावर होण्याचे तिचे
प्रयत्न यशस्वी होत नाहीत. प्रेमातही ती अपयशी ठरते. (प्रत्यक्ष कादंबरीत यापेक्षा
दुर्दैवी घटना आहेत. त्या चित्रपटात टाळल्या आहेत.) पण तरिही नायिका निराश
होत नाही.
चित्रीकरण, केवळ अप्रतिम आहे. आजकाल तंत्र सुधारल्याने, अनेक चित्रपटात
असे चित्रीकरण असते, पण त्या काळात त्याचे अप्रूप होते.
केनयाच्या मध्यभागी, लेक नाकुरू नावाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. तिथे
रोहीत पक्षी (फ्लेमिंगोज) खुप संख्येने येतात. त्यावरुन छोटे विमान उडवण्याचे
अप्रतिम दृष्य आहे यात. त्या विमानामुळे रोहित पक्ष्यांचे विचलीत होणे, अतीव
सुंदर.
आउट ऑफ आफ्रिका हा एका सत्य
आउट ऑफ आफ्रिका हा एका सत्य कथेवर (आत्मचरीत्रावर) आधारीत चित्रपट आहे.. हे पुस्तक देखील सुरेख आहे.. रच्याकने, ती राजघराण्यातली नव्हती पण अमीर-उमरावांपैकी असते (दुसर्या फळीतले राजे-सरदार लोक वगैरे)
खट्टा मीठा पहिला का कोणी?
खट्टा मीठा पहिला का कोणी?
खट्टा मीठा पहिला का कोणी? >>>
खट्टा मीठा पहिला का कोणी? >>> हो मी पाहिला , ठीक आहे, विशेष म्हणजे , नेहमीचे कुंवर घराणे न दाखवता , फलटणचं टिचकुले घराणं दाखवलयं , त्यामुळे जरा आपलेपणा वाटतो , अक्षय कुमारच काम मस्त झालय , बरीचशी मराठी मंडळी आहेत . असरानीने छोट्याशा रोलमध्ये पण झकास काम केलयं.
>>खट्टा मीठा पहिला का
>>खट्टा मीठा पहिला का कोणी?
फुकट पाहीला म्हणुन त्रास कमी झाला...प्रियदर्शन सटकला आहे..तेच सेट्च..तोच तो पणा खुप येतोय..त्याने रिटायरमेण्ट घ्यावी आता
बकवास आहे..
खट्टा मीठा>>> काही प्रसंग
खट्टा मीठा>>> काही प्रसंग मात्र जबर्दस्त घेतले आहेत. उदा. रोडरोलार हत्तीने ओढुन नेतात तो...
परवा "सॉल्ट" पाहीला.
परवा "सॉल्ट" पाहीला. अॅक्शनपट आहे. पण कथानक वेगवान असल्याने प्रेक्षकांना विचार करण्याची संधीच मिळत नाही. अँजेलिना जोलीच्या कामाचं कौतुक करावं तेवढं थोडचं...
>>खट्टा मीठा पहिला का
>>खट्टा मीठा पहिला का कोणी?
बकवास आहे.. फुकट पाहीला म्हणुन त्रास कमी झाला...प्रियदर्शन सटकला आहे..तेच सेट्च..तोच तो पणा खुप येतोय..त्याने रिटायरमेण्ट घ्यावी आता>>
अगदी अगदी. अगदी १ किंवा दोन प्रसंग सोडले तर बकी एकदम बकवस. या वेळी अक्षय कुमार - ओव्हर अक्टींग. त्याच्या वडलांच काम मस्त्च झाल आहे. बकी सगळ म्हणजे सगळ ओढुन ताणून केल्यासारख.
उडाणटप्पू चा उड्डाण (आय मीन
उडाणटप्पू चा उड्डाण (आय मीन उडान) पाहिला काल आणि हा पोट्टा त्याची उडान नक्की कधी भरणार आहे याचा विचार करत करत सबंध मूव्ही बघितला (२ तास
). पठ्ठ्याने शेवटच्या ५ मिनिटात त्याची ती तथाकथित उडान घेतलीये.
थोडक्यात उडान सिनेमा बघायचा असल्यास टीव्ही वर यायची वाट बघा. अॅडलॅब्स वै. ला जाऊन वेळ आणि पैसा दोन्ही फुकट जाईल. आणि पैसा आहे पण वेळ नाही अशी स्थिती असल्यास उडानचे तिकिट काढा पण शेवटच्या १० मिनिटांसाठीच फक्त थेटर मध्ये शिरा. बाकीचा मूव्ही बघितला नाही तर शेवटच्या १० मिनिटांत कळेल.
'इन्सेप्शन' पाहिला.
'इन्सेप्शन' पाहिला. ख्रिस्तोफर नोलानला दंडवतच घातला पाहिजे. अफलातून आहे चित्रपट.
जास्त काय लिहिणार.. प्रत्यक्ष अनुभवाच
जळ्तोय मी .... सगळे बोलतायत
जळ्तोय मी .... सगळे बोलतायत इन्सेप्शन बद्द्ल..... मला अगदी म्हणजे अगदीच वेळ भेटत नाहीये............................... :रागाने लाल होऊन फुटायला आलेली बाहुली: :नंतर रडूपण लागलीये:
बराय हॅरी पॉटरच्या शेवट्च्या भागासाठी आत्ताच सुट्ट्या काढुन ठेवल्यात....
ललायचं नाय चिमन. सीडी पाठ्वू
ललायचं नाय चिमन. सीडी पाठ्वू का?
सिद्धार्थ- जोरदार अनुमोदन.
सिद्धार्थ- जोरदार अनुमोदन. प्रियदर्शनला चळ लागला आहे. (खमी पाहिला नाही आणि पाहणारही नाही)
नी, चिनूक्स- धन्यवाद. उडान पाहणारच.
मी असे सिनेमे थियेटरातच
मी असे सिनेमे थियेटरातच पाहतो.... डार्क नाईट मिस्ला तो दिवस आणी आजचा दिवस.... रोज एकदा तरी "व्हाय सो सिरियस" एकुन स्वतःच्या मुर्खपणाचा जप करतो मी... अता मला ती चुक सुधारायचीये मामी....
खट्टामीठा... अतिवाईट सिनेमा
खट्टामीठा... अतिवाईट सिनेमा आहे. ना विनोदी... ना गंभिर .... ना सामाजिक
खटट मिठा एकदम बकवास आहे
खटट मिठा एकदम बकवास आहे
माझ्या कडून **
तेरे बिन लादेन कुणी पाहीला का ? एकदम धम्माल आहे
एकदम शॉर्ट अँड स्वीट 
माझ्या कडून ****
'तेरे बिन लादेन' छान आहे.
'तेरे बिन लादेन' छान आहे. हलका फुलका आणि वेगळा
'तेरे बिन लादेन' छान आहे.
'तेरे बिन लादेन' छान आहे. हलका फुलका आणि वेगळा ..>>>>>>>>> अगदी बरोबर
कालच डेंझेल वॉशिंग्टनचा
कालच डेंझेल वॉशिंग्टनचा 'मांचुरिअन कँडीडेट' पाहिला. मस्त सपेन्स आहे एकदम इंटेलि़जंट.
गेल्या काही वर्षात, डेंझेल वॉशिंग्टन, मॉर्गन फ्रिमन आणि विल स्मिथ या तिन्ही अफ्रिकन-अमेरिकन कलाकारांचे सिनेमा विदाउट फेल उत्तम मनोरंजन करणारे येत आहेत.
आज अचानक यूटीव्ही वर
आज अचानक यूटीव्ही वर चॅप्लिनचा 'ए किंग इन न्यू यॉर्क' पाहिला. अमेरिकन कल्चरवर खास चॅप्लिन शैलीत मस्त शेरेबाजी केली आहे. मी चित्रपटाची सुरुवात मिस् केली त्यामुळे काम करणारा प्रमुख नट खूप ओळखीचा वाटत होता, परंतु तो चार्ली चॅप्लीन आहे हे बर्याच नंतर कळाले. त्याची भूमिका इगॉर शॅडोव्ह ह्या हद्दपार झालेल्या व अमेरिकेत, न्यूयॉर्क शहरात तात्पुरता आसरा घेतलेल्या राजाची आहे. अमेरिकेत हा राजा जवळ पैसा नसतानाही कसा टिकायचा प्रयत्न करतो, त्याच्या ''टायटल''मुळे त्याला त्या स्थितीतही कशी प्रसिध्दी मिळते वगैरेचे मार्मिक चित्रण. त्यातच कम्यूनिझमवरची अमेरिकेची भूमिकाही या चित्रपटात उपहासगर्भतेने दाखवण्यात आली आहे. चॅप्लीनचा अप्रतिम अभिनय/ टायमिंग! नेहमीसारखीच ह्या चित्रपटालाही कारुण्याची झालर आहे. खास करून रुपर्ट ह्या स्कॉटिश मुलाचे प्रसंग. त्याचे आईवडील कम्यूनिस्ट असण्याच्या आरोपावरून अटकेत आहेत. त्या मुलाशी संबंध आल्यामुळे अमेरिकेत आश्रय घेतलेल्या इगॉर राजालाही कोर्टाच्या चौकशीस कसे सामोरे जावे लागते ते दाखवले आहे. चित्रपटात खास चॅप्लिन छाप विनोद ठिकठिकाणी बघायला मिळतो. काही प्रसंगांमध्ये तर अक्षरशः हसून हसून गडाबडा लोळायची वेळ येते. खास करून चॅप्लिन द किंग लिफ्टमध्ये आपले बोट अग्निशामकाच्या पाण्याच्या पाईपमध्ये अडकवून घेतो आणि ते तसेच अडकलेले बोट व पाईपचा वेगळा झालेला भाग घेऊन शेवटी कोर्टात दाखल होतो तो प्रसंग अतिशय सुरेख व विनोदी झाला आहे. चित्रपटाचा शेवटही करुणामय सुखान्त होतो.
चॅप्लिनच्या चाहत्यांनी जरूर पहावा असा चित्रपट!
खट्टा मीठा शेवट पर्यंत पाहु
खट्टा मीठा शेवट पर्यंत पाहु शकले इतकेच
.
!
प्रियदर्शन ला काय झालय, अगदी मालामाल वीकली पर्यंत त्याचे मुव्हिज आवडले होते , अता सगळी जादु गेलीये
अक्की सुपर्ब अॅज ऑलवेज, ती नवीन अॅक्ट्र्स तृषा का कोण आहे ती पण चांगलीये, थोडी रिमा सेन सारखी वाटली, प्रियदर्शन मुव्हिज ना फिट्ट आहे , ग्लॅमरस पण गर्ल नेक्स्ट डोअर इमेज वाली
इन्सेप्शन???
इन्सेप्शन???
'वन्स अपॉन ....' ओके आहे.
'वन्स अपॉन ....' ओके आहे. सत्याच्या तोडीचा नाही. शेवटपर्यंत गुंतवतो इतकेच.
मला तर तो "हिदालगो" (Viggo
मला तर तो "हिदालगो" (Viggo Mortensen) चा खुप जोशपुर्ण,स्फुर्तीदायी ,प्रेरणादायी वाटतो .

माझ्यासाठी आता तो (जगातला) सगळ्यात आवडता चित्रपट आहे,
मी तो तसा खुप उशीरा काही महिन्यांपुर्वी पाहिला
पण, मला वाटतं की माणसान जगावं तर त्यातल्या हिरोसारखं,
त्यातले मला तो नट (घोड्याबरोबर) तर आवडतोच ,तसेच वाळवंटातल चित्रण ही खूप सुरेख झाले आहे, कथानक तर कुणालाही भावेल असचं जबरदस्त !
मला सांगा आपण का जगु नये ? प्रयत्न तरी का करु नये का ?
अस वाटण्यांच कारण काय असेल अस तुम्हाला वाटतं ?
डीजे , तृषा साऊथची लोकप्रिय
डीजे , तृषा साऊथची लोकप्रिय नटी आहे म्हणे . साऊथ ईंडियन्स फार कौतुक करत असतात .
वन्स अपऑन पाहिला , ठीक आहे . अजय देवगण अॅज युज्वल अँग्री " यंग " मॅन म्हणून ठीक , इमरान हाश्मीला बराच महत्वाचा रोल मिळालाय
, रणदीप हुडा आवडला .
त्यानंतर उतारा म्हणून कंपनी पुन्हा पाहिला .
मग जरा कुठे जीवात जीव आला . अजय देवगण , विवेक ओबेरॉय आणि रामू , किलींग कॉम्बो .
उद्या " सरकार " पाहावा म्हणते .
रणदीप हुडा मला पण आवडतो, एकदम
रणदीप हुडा मला पण आवडतो, एकदम किलिंग
Pages