चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद श्री.मंदार. खरंच, किती भरभरून दिलं आहे शॉन कॉनेरीने जगभरातल्या चित्ररसिकांना. निव्वळ बॉक्स ऑफिसवर हिट झालेले ७ बॉण्डपटच नव्हे तर जवळपास ५० वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वच चित्रपटातून त्याने (खरं तर आज शॉनचे वय ८० च्या घरात आहे, शिवाय "सर" ही झाला आहे, तेव्हा त्याचा आदराने उल्लेख करावा लागेल, पण इकडे जसे "आपल्या लतादिदी" पेक्षा "आपली लता" म्हणणे मनाला बरे वाटते, तसेच शॉनचे आहे) ज्या ज्या भूमिका केल्या आहेत त्या अक्षरशः जगल्या आहेत. "इंडियाना जोन्स" च्या वडिलाची भूमिका असो वा "अनटचेबल" मधील निधडा हवालदार असो, त्यामध्ये तो इतका रममाण झाला की रसिकांना याने कधीतरी दिलफेक बॉण्डच्याही भूमिका केल्या होत्या हे विसरायला लावले.

शॉन कॉनरीचा katharine zeta jones बरोबरचा लेटेस्ट मूव्ही कुठला ? काही करुन नाव आठवत नाहिये .

Entrapment

शॉन कॉनरीचा "द रॉक" मधला "मेसन" आणि "अनटचेबल्स" मधला हवालदार माझे फेवरेट..

"डु यु नो व्हॉट अ ब्लड ओथ इज मिस्टर नेस, यु जस्ट टुक वन!"

शॉन कॉनेरीचा द नेम ऑफ द रोझ अप्र ति म!
मला तो एक नट म्हणून फार आवडतो आणि त्याचा आवाज, संवादफेकही जबरदस्त आहे!
म्हातारपणचा (?) शॉन कॉनेरी मला जास्त भावतो. त्या नेम ऑफ रोझ पिक्चरमध्ये त्याचं डिटेक्टिव्ह मॉन्कचे काम खूप सुरेख झाले आहे. तो डार्क पीरियड, अ‍ॅबीमधील वातावरण अतिशय जिवंत उभे केले आहे. पिक्चर थोडा संथ आहे, आणि विचार करायला लावणारा. पण ज्यांना थ्रिलर्स आवडतात त्यांना हा पिक्चर नक्की आवडेल.

अवतार (इंग्रजी) पाहिला. मस्त आहे, कल्पना अन चित्रीकरण सुंदरच. मसालेदार आहे पण शेवट्पर्यंत पक्कड ठेवतो.

मी पण पाह्यला काल गोल्डफिंगर. जेम्स बाँडचे सर्वच पिक्चर पाहतेय रोज.... टिमोथी डाल्टन आतापर्यंत पाह्यलेला सर्वात फालतू बाँड.

माझे आवडते बाँड असे; (उतरत्या क्रमाने)

१. शॉन कॉनेरी
२. रॉजर मूर
३. पीअर्स ब्रॉस्नन
४.डॅनियल क्रेग

Proud

@ अरुंधती कुलकर्णी ~~ शॉन कॉनेरीचा द नेम ऑफ द रोझ अप्र ति म!

~~ केवळ शॉन कॉनेरीचा म्हणून नव्हे तर एकूणच एका अप्रतिम चित्रपटाचा तुम्ही इथे केलेला उल्लेख पाहून मनस्वी आनंद झाला. गूढरित्या होत चाललेले मृत्यु आणि त्या रहस्याचा शोध ही तर एक 'सिधीसाधी' रहस्यकथा, पण तिला १३ व्या/१४व्या शतकातील मॉनेस्टरी/अ‍ॅबे ची धार्मिक पार्श्वभूमी दिली की दिग्दर्शक अशा कथेचे कसे सोने करतो हे पाहण्यासाठी इथल्या हॉलीवूड प्रेमी सदस्यांनी जरूर या चित्रपटाची डिव्हीडी मिळवावी आणि शक्यतो रात्रीच्या वेळी - कोणत्याही व्यत्ययाशिवाय - हा चित्रपट अनुभवावा.

आपल्या शॉनच्या मुख्य भूमिकेबद्दल काय बोलावे? दिग्दर्शकाच्या मनात प्रमुख 'मॉन्क'च्या भूमिकेत शॉन होता पण 'कोलंबिया' ने त्याची 'बॉण्ड' ची इमेज चित्रपटाच्या धंद्याला बाधा आणेल म्हणून निर्मितीतून अंग काढून घेतले होते, तरीही दिग्दर्शकाने आपला हट्ट सोडला नाही आणि शॉन कॉनेरीने त्याच्यावरील विश्वासाचा पुरेपूर मोबदला दिला. जगभर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर झेंडा फडकविलाच शिवाय शॉन कॉनेरी म्हणजे "जेम्स बॉण्ड"हा समजही खोडून काढला.

या गूढरम्य चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे कथानकात ९९% पुरुष पात्रे आहेत व एक तरूणी. असे असूनही या "तरूणी" ला कथानकात नाव नाही, म्हणजे ज्या ज्या वेळी ती कथेत प्रवेशिते त्या त्या वेळी तिचा उल्लेख "दॅट गर्ल" असा केला जातो.

"रेबेका" नावाचा हिचकॉकचा असाच एक गाजलेला रहस्यपट होता, संपूर्ण चित्रपटात [आणि डॅफनेच्या कादंबरीत] त्यातील नायिकेलादेखील "नाव" नाही. ~~ असा प्रकार हॉलीवूडमध्येच घडू शकतो.

प्रतीक,
नायिकेला नाव नसणे, हा प्रकार मराठी कादंबरी, रथचक्र मधे आहे, त्यात एकाच स्त्री व्यक्तीरेखेला नाव आहे. या कथानकावर नाटक आणि मालिका, दोन्ही येऊन गेले.
मला वाटते, राजेश खन्ना, झीनत अमान आणि योगिता बालीच्या, अजनबी चित्रपटात पण, योगिता ला नाव नाही.

'द नेम ऑफ द रोज' साठी जोरदार अनुमोदन!
तरिही शाँ कॉनरीला जॅक निकोल्सन, अल पचीनो यांच्या दर्जाचे रोल मिळाले नाहीत असं नक्कीच वाटते, तो ब्रिटीश असल्याचा हा परिणाम असावा काय?

@दिनेशदा >> "रथचक्र" बाबत....

होय. "रेबेका" प्रमाणेच शिरूभाऊंनी नायिकेस "ती" असे रथचक्रात गुंतविले आहे, पण त्यांनी तसे करण्याचे कारण म्हणजे ते कथानक आणि त्यातील व्यक्ती त्या सगळ्या त्यांच्या नात्यातल्या व्यक्तींच्या तोंडावळ्यासारख्या होत्या. संबंधिताना त्या सहज ओळखू येण्यासारख्या होत्या. नायिका मुलग्याला घेऊन तालुक्याला जाईपर्यंतच्या भागातील अनेक घटना त्यांच्या स्वत:च्या घरात घडलेल्या. नंतरच्या भागातीलही काही घटना अशाच आहेत. समस्त पेंडशे घराणे हे त्या काळातील शिक्षित घराणे म्हणून हर्णे परिसरात ओळखले जात त्यामुळे नायिकेच्या नावावरून कुणी अंदाजाचे पतंग उडवू नये म्हणून श्री.ना.पेंडसे यांनी जाणीवपूर्वक नायिकेला "निनावी" ठेवले. असे असूनही कादंबरी प्रकाशनानंतर, तिच्या गाजावाज्यानंतर त्यांचे अनेक आप्त दुखावले गेले. पेंडसे घराण्यातील काही व्यक्तींची (त्यातही एक पूज्य) श्रीपादने विडंबन केले असा अनेकांचा ग्रह झाला, इतका की, "रथचक्र" ला ज्यावेळी "साहित्य अकादमी"चे पारितोषिक मिळाले तेंव्हा त्यांच्यावर सार्‍या महाराष्ट्रातून अभिनंदनाचा पाऊस पडला, पण "पेंडसे" कुटुंबातील एकाही व्यक्तीने त्यांचे अभिनंदन केले नाही, हा कटु असला तरी इतिहास आहे. असो. ("नाव" महात्म्य काय असते यावरून या निमित्ताने साहित्यातील एक इतिहास चर्चेला आला.)

"अजनबी" चित्रपट मी पाहिलेला नाही, त्यामुळे योगिताच्या नावाबद्दल मला काही माहिती नाही.

आभार प्रतीक, हे मला माहित नव्हतं. पण नाटक आणि मालिका दोन्ही मस्त होत्या.
अमी. आभार, खूप वर्ष झाले तो सिनेमा बघून. योगिता अगदी थोड्या वेळासाठी आहे त्यात.
मी आताच कराटे किड बघितला. तो छोकरा तर गोड आहेच, आणि शेवटपर्यंत तो त्याच्या वयाला साजेसा असाच वागतो. चित्रीकरण आणि कथानक दोन्ही छान आहेत. जॅकी चॅन माझ्या आवडत्या कलाकारापैकी एक आहे. त्याचे बहुतेक चित्रपट मी बघितले आहेत. (हो अगदी मल्लिका शेरावत वाला पण ) त्याची कराटे किड मधली, भुमिका लाजबाब आहे. त्याचे कौशल्य कुठेही कमी झालेले नाही, तरीपण त्याने जो दुय्यम रोल केलाय, त्याबद्दल खरेच कौतूक करायला हवे. (आपल्याकडच्या ज्येष्ठ अभिनेत्यांनी धडा घ्यावा.)

>>(आपल्याकडच्या ज्येष्ठ अभिनेत्यांनी धडा घ्यावा.)

वन अन्ड ओन्ली आमीर खान! Happy तारे जमीन पर.

आताच inception पाहीला...मस्त आहे (अजुन एकदा पाहीला पाहीजे)....."{{{}}}" मस्त आहेत..

काल 'तेरे बिन लादेन' पाहिला. अफलातून आहे. अवश्य बघा. Happy
१:३० तासाचाच आहे आणि कंटाळा अजिबात येत नाही. अली जफरचे काम मस्त झालेय, लादेनचा रोल केलेल्या प्रद्युम्ननेही धमाल आणलीय. सहकलाकारांनी पण मस्त साथ दिलीय. भेजा फ्राय नंतर एक वेगळ्या प्रकारचा विनोदी चित्रपट पहायला मिळाला.
स्टोरी सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहणे चांगले. 'उडाण' बघायचाय, त्याचेपण चांगले रिव्युज आहेत.
inception तर Must Watch कॅटॅगरीतला आहे.

जुन्या हॉलिवुड चित्रपटांपैकी हल्का-फुल्का, नर्म विनोदी बेडरूम ड्रामा म्हणजे ''वुमन इन रेड''. ह्यात काम करणारा प्रमुख कलाकार जीन वाईल्डर हाच त्या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. लग्नानंतर काही वर्षे लोटल्यावर मिड लाईफ क्रायसिस म्हणा किंवा अजून काही, पण अ‍ॅड एजन्सीमध्ये काम करणार्‍या हिरो (जीन)ला एक लाल ड्रेस घातलेली सुंदर मॉडेल लुब्ध करते. दिवसरात्र त्याला तिचीच स्वप्ने पडू लागतात. तिला भेटण्यासाठी त्याची धडपड सुरु होते. त्याचे मित्र त्याला ह्यात साथ देत असतात. आणि त्या सर्व प्रयत्नांतून जे काही नाट्य घडते, जो सावळा गोंधळ उडतो तो विनोदी आणि प्रत्यक्षात पडद्यावर पाहण्यासारखा आहे. जीन वाईल्डर हा अतिशय गुणी अभिनेता. त्याचे कुरळे केस, गट्टाणे डोळे व बोलका चेहरा ह्यांचा तो फार मस्त उपयोग करतो.
त्यातील ''आय जस्ट कॉल्ड टू से आय लव्ह यू'' हे स्टीव्ही वंडरने गायलेले गाणे अतिशय लोकप्रिय झाले होते तेव्हा! त्याला त्या गाण्याबद्दल अ‍ॅकॅडमी पुरस्कारही मिळालेला.
सहज, अतिशय हल्का-फुल्का असा हा चित्रपट आहे. जरुर पहावा.

आपण लहान असताना, कॉमिक्स वाचून, आपणही सुपरमॅन असल्यासारखे आपल्याला वाटत असे, सुदैवाने जरा वय वाढल्यावर, हे सगळे विरुन जाते, पण एखाद्याच्या बाबतीत ते झाले नाही तर काय होते, याचा सिनेमा म्हणजे डिफेन्डॉर. तो जरासा चक्रम तरिही प्रामाणिक असणारा माणूस, खरेच काहि करु शकतो का, यासाठी हा सिनेमा अवश्य बघा.
तो माणूस, त्याच्यावर प्रेम करणारा त्याचा मित्र, त्याची मैत्रिण, वकील, न्यायाधिश या सगळ्याच व्यक्तिरेखा, अस्सल वठल्यात. खेळायच्या गोट्या, बेचकी, मधमाश्या असल्या आयुधानी लढणारा डिफेन्डॉर आपल्याला चक्रम वाटतो, पण तो आपल्याला खोटे ठरवतो.

त्यानंतर चॉकलेट हा (इंग्रजी, या नावाचा हिंदी सिनेमा पण आला होता असे वाटते ) बघितला.
अतिशय साधा तरिही सुंदर सिनेमा. ऑस्कर साठी नॉमिनेट झाला होता.
एका गावात एक बाई आपल्या मुलीसोबत येते आणि एक चॉकलेट चे दुकान सुरु करते, आणि त्यामूळे त्या गावात काय घडते, याचीच कथा.
ज्यूडी डेंच आणि जॉनी डेप छोट्या भुमिकेत आहेत.
कॅरी अ‍ॅन मॉस, हेलन कार्डोना आणि लेना ओलिन, तिघींच्या सुंदर भुमिका.
अनुक झालेली छोटी मुलगी पण खुप गोड आहे.

इनसेप्शन पाहिला..
ग्रेट !!! मुव्ही आहे... "नोलन साहेब आपण महान आहात" असं म्हणावसं वाटलं नंतर.. Happy
भारी प्लॉट, उत्तम दिग्दर्शन आणि अभिनय, उत्कृष्ठ स्क्रीन प्ले.. रविवार वसुल.. !!

उडान पाह्यला.
आवडला.
बापाच्या कॅरेक्टर्सची काही लॉजिक्स जुळत नाहीत. आणि बाकी सगळी कॅरेक्टर्स लॉजिकसकट खूप छान येतात त्यामुळे ते अजून जाणवतं.
सगळ्यांचे अभिनय उत्तम, व्हिज्युअली पण आवडला. उगाच तडकभडक, ग्लॅम करायचा प्रयत्न नाही.
छोटा अर्जुन खास गोंडस आहे.

इंग्रजी चॉकोलात सुरेख चित्रपट आहे. जरा संथ आहे, पण खिळवून ठेवतो. त्या गावातलं वातावरण, त्या बाईच्या दुकानाच्या शोकेस विंडोतील डिस्प्ले बद्दल त्या प्रीस्टचं ऑब्सेशन..... डार्क ओव्हरटोन्स! मस्त दाखवलं आहे सगळं!

तो 'शोकोलात' Happy

'तेरे बिन लादेन' धमाल आहे.. अगदी 'जाने दो भी यारो'च्या तोडीचा. सर्वांनी जरूर बघा.

नीधप, उडानशी सहमत.. बापाचे पात्र फारच डार्क (मध्येच गोंधळलेले) असे राहते.. त्यामुळे सिनेमाचा कणाच थोडा हलला आहे.. पण सगळ्यांची कामं भारीच झालीयेत.. तो चाचु तर लै भारी.. आणि लहान मुलगापण.. एकुणात बघाच असा शिणुमा..

चिनूक्स, आपल्या मित्र देशाला इतका राग येण्यासारखे काय आहे, तेरे बिन लादेन मधे ? आमच्याकडे रिलीज होणे कठीण आहे.
बाकी त्या फ्रेंचाना, चे भारीच वावडे, चेरी चे शेरी करतात ते ठिक, पण चीची (नायजेरियातील मुलींचे कॉमन नाव ) ला, शीशी करुन टाकतात,

अमेरिकन प्रशासनाची लॅटिन खंडातील सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे "क्युबा". डझनभर राष्ट्रपती होऊन गेले तरी ज्या ठामपणे क्युबाच्या कॅस्ट्रोने (कम्युनिस्टांच्या सक्रीय मदतीने) छोट्याश्या देशाची स्वतंत्र प्रतिमा जपली आहे तीपासून सेन्ट्रल अमेरिकेतील अनेक छोटेमोठे देश स्फूर्ती घेतील व खंडातील आपल्या वर्चस्वाला शह बसेल असे अमेरिकन प्रशासनाला नेहमीच वाटत असते. त्यामुळे निकारगुआ, छाड, कोस्टारिका, बेलिझ, एल साल्वाडोर, व्होन्डुरास आदी देश सातत्याने अस्वस्थ राहतील, तसेच कोणत्याही परिस्थितीत त्या भागात कम्युनिझम वाढू नये आणि तिथले राष्ट्रप्रमुख व्हाईट हाऊसच्या तालावर नाचतील, असंतुष्टांची बंडाळी मोडण्यासाठी लागेल ते मिलिटरी सहाय पुरविण्यात येईल याची दक्षता अमेरिकन प्रशासन घेत असते. असे असले तरी अमेरिकन लोकशाही तत्वावर विश्वास असलेल्या अनेकांना शासनाचे अशा प्रकारचे हस्तक्षेपाचे धोरण पसंत नाही आणि "अभिव्यक्ती स्वातंत्र्या" चा अधिकार बजावत अशी मंडळी (प्रामुख्याने पत्रकार) आपला मोलाचा जीव धोक्यात घालून या छोट्या राष्ट्रात मुक्काम करतात आणि परिस्थितीचा खराखुरा लेखाजोखा त्यांच्याकडे असलेल्या माध्यमाद्वारे सगळ्या जगापुढे आणण्याचे महत्वाचे कार्य करीत आहेत.

याच विषयावरील निक नोल्टे, जीन हॅकमन ('फ्रेंच कनेक्शन'वाला), जोअ‍ॅन कॅसिडी यांनी अनुक्रमे प्रेस फोटोग्राफर, टीव्ही अँकरमन आणि रेडिओ निवेदिका अशा साकारलेल्या भूमिकेने अक्षरशः जिवंत केलेला; छाड, निकारगुआ येथील राजकिय उलथापालथ, रक्तरंजित उठाव, अमेरिकन सैन्याचा निर्दयीपणा, तेथील सामान्य जनतेची होरपळ, क्रांतिकारकांचा कडवा प्रतिसाद व सत्तेच्या पडद्यामागील हालचाली यथार्थपणे दाखविणारा "अंडर फायर" हा चित्रपट ! ९० टक्के चित्रपट रस्त्यावरील घटनेत उलगडतो आणि ज्या पद्धतीने या घडामोडींचे चित्रीकरण करण्यात आले आहे, ते पाहता आपल्याला सातत्याने वाटत राहते की, जणू काय आपण 'फॉक्स हिस्ट्री चॅनेल डॉक्युमेंटरी"च पाहत आहोत.

"अंडर फायर" चे कथानक सांगण्याचा मोह होत आहे, पण या धाग्यावर प्रतिसाद देणार्‍यांनी जाणीवपूर्वक या चित्रपटाची डिव्हीडी मिळवावी म्हणजे उमजून येईल की, हॉलीवूड जेव्हा अशा प्रकारची सत्यकथा हाताळते तीत "जिवंतपणा" आणते म्हणजे नेमके काय करत असते. ("मेट्रो" चॅनेल आपल्या डिश केबलवर असेल तर तिथे हा चित्रपट उपलब्ध आहे, पण त्यासाठी प्रक्षेपणाचा त्यांचा मासिक तक्ता पाहणे गरजेचे आहे.)

Pages