पीपली लाइव्ह आणि सिंपली सुसाईड.

Submitted by अभय आर्वीकर on 16 August, 2010 - 02:02

पीपली लाइव्ह आणि सिंपली सुसाईड.

मी नाही पाहीला हा चित्रपट. पण बातम्यावरून लक्षात येतंय की शेतकरी अनुदानाच्या लोभापायी आत्महत्या करतो, असा आभास त्या चित्रपटात निर्माण करण्यात आलेला आहे.
तसेही शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात, वेडसर असतात म्हणुन आत्महत्या करतात, आळशी असतात म्हणुन आत्महत्या करतात आणि अशिक्षित असतात म्हणुन आत्महत्या करतात वगैरे-वगैरे अक्कलेचे तारे यापुर्वीच विचारवंतानी तोडलेच आहे,(संदर्भ; 'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे') त्यात पुन्हा एका नव्या विचारवंताची भर पडली म्हणायची.
शेतकर्‍याच्या आत्महत्यांची कारणे शोधली जात नाहीत, उपाययोजना केल्या जात नाहीत आणि प्रामाणिक प्रयत्नही केले जात नाहीत.
याउट त्यांच्या जखमांवर मीठ चोळून विकृत चित्र उभे केले जाते. आणि त्याचा निषेध व्यक्त करण्याची साधी गरजही सामान्य माणसाला भासत नाही, काय म्हणावे याला?
ज्या सुसंस्कृत समाजाकडून त्याने न्यायाची अपेक्षा करावी तोच समाज जर असा विकृतीने पिडलेला आहे, हे जर त्याच्या लक्षात आले आणि तशी खात्री झाली तर मग तो न्यायासाठी स्वत:चे मार्ग स्वत:च शोधेल आणि अशा सुशिक्षित-सुसंस्कृत समाजाच्या विकृत विचारांपेक्षा असभ्य रानटी मावो/नक्षलवांद्यासारख्यांची सहानुभुती त्याला जवळची वाटली तर.......????????
तर त्याचे काही चुकते हे मी तरी त्याला कसे समजावणार.....?????????????????????
शेतकर्‍याला मुख्य प्रवाहापासून दुर फ़ेकून द्यायचे नसेल तर....
हे भारतियांनो त्या पीपली लाइव्हचा निषेध करा.
अगदी जमेल त्या मार्गाने... जमेल तसा....जमेल त्या पद्धतीने.......!!

गंगाधर मुटे
..................................................................................
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?
..................................................................................
.
.
ता.क- मी चित्रपट पाहीलेला नाही आणि पहावे असे वाटतही नाही. कारण शेतकर्‍यांच्या आत्महत्या विनोदाचा विषय होणे किंवा विनोदी चित्रपटात शेतकर्‍यांच्या आत्महत्येसारखा गंभिर विषय हाताळणे हेच मुळी विकृतीचे लक्षण आहे. हा विषय तीन तासाच्या एका चित्रपटातच काय दहा चित्रपटात सुद्धा आवाक्यात येणार नाही असा विषय एखाद्या चित्रपटात तोंडी लावून चघळण्याइतका किरकोळ वाटावा, ही विचारशैलीच शेतकर्‍यांकडे पाहण्याचा दृष्टीकोण स्पष्ट करून जाते. ’पीपली’ च्या जाहिरातीचा टीव्हीवरील छोटासा संवादच ऐकणे जेथे जड गेले तेथे माझ्यासारख्याला पुर्ण सिनेमा शांतपणे बसून पाहणे शक्य होईल?
.............................................................................................
दुपारी २.२४ वाजता

esakal.com - वरिल http://72.78.249.107/esakal/20100814/5039280691352829503.htm
या लिंकवरील पीपली (लाइव्ह) > आपल्या कोडगेपणाच्या कानाखाली काढलेला आवाज - हा त्या चित्रपटाबद्दल भाष्य करणार्‍या लेखातील काही भाग पहा.....

.
दिग्दर्शिकेनं इथं मुख्य प्रदेश नावाच्या भारताच्या काल्पनिक राज्यातला एक गरीब शेतकरी नथ्था (ओंकारदास माणिकपुरी) कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याची घोषणा करतो, या "थीम'भोवती सगळी कथा मांडली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खरोखर गेल्या काही वर्षांत या देशाला लागलेला कलंक आहे. मात्र, याच विषयाकडं खेळकरपणानं पाहत, उपहासाच्या माध्यमातून दिग्दर्शिकेनं आपल्या बोथट झालेल्या संवेदनेला गदगदून हलविण्याचं काम केलं आहे. नथ्था आणि त्याचा मोठा भाऊ बुधिया (रघुवीर यादव) कर्जमाफीसाठी त्यांच्या भागातल्या पुढाऱ्याकडं जातात. तेव्हा तो त्यांची थट्टा करून आत्महत्या करण्याचा सल्ला देतो. मात्र, त्याच्या या तिरकस सल्ल्यानंतर नथ्था व बुधिया खरोखर आत्महत्या करण्याचा विचार करू लागतात.
.

१) असा घोषणा करून शेतकरी आत्महत्या करीत असतो? हे विकृत विचार नाही?
२) शेतकरी आत्महत्येकडे खेळकरपणाने पाहात? या वाक्यात आणी "बलात्कार होत असतांना मी खेळकरपणाने पाहत होतो" या वाक्यात मला फ़ारसा फ़रक आढळत नाही.
काय करावे या खेळकरपणाचे?
३) शेतकरी कर्जमाफ़ीसाठी कुणापुढे हात पसरतात? या उलट १० रुपये मुद्दल रक्कमेचे व्याजासहित ५०० रू फ़ेडता-फ़ेडता पिढ्या बरबाद झाल्या.
यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की हा समाज शेतकरी वर्गाकडे किती गांभिर्याने पाहतो.

त्याच्या आत्महत्येवर निट अभ्यास करता येत नसेल तर नका करू पण असा विकृतीपुर्ण विपर्यास का करता?
..
याला विकृत विचार म्हणणे पटत नसेल तर नेमके विकृत विचार कशाला म्हणायचे, हे जरा मला समजून सांगावे. माझ्या मनाचे दरवाजे सताड उघडे आहे.
............................................................
सायं ६,०० वाजता वाढवलेली पोष्ट.

काल आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवांनी आमीरच्या पोष्टरची "होळी केली"

बातमी....

स्वतंत्रता दिवस के दिन रविवार को जहां एक ओर पूरा देश आजादी का पर्व मनाने में व्यस्त था तो दूसरी ओर महाराष्ट्र में पांच हजार विधवाएं आमिर खान की पीपली लाइव के पोस्टर जला रही थीं। विदर्भ जन आंदोलन समिति के बैनर के तले नागपुर से 150 किलोमीटर दूर यवतमाल जिले में जुटीं इन विधवाओं की बस एक ही मांग थी कि आमिर खान उनसे माफी मांगे और सरकार फिल्म पर प्रतिबंध लगाए।

कहते हैं कि आमिर की नई फिल्म के कारण विदर्भ के किसान और और हजारों विधवाएं गुस्से में हैं। क्योंकि इस फिल्म में दिखाया गया है कि किसान मुआवजे के लालच में आत्महत्या करते हैं। तिवारी कहते हैं कि आमिर खान को किसानों के मुद्दे से कोई मतलब नहीं है। वे बस अवार्ड जीतने के लिए फिल्म बनाते हैं।

आमिर खान की पीपली लाइव रिलीज होने से पहले से ही विवादों में रही है। महाराष्ट्र के किसानों ने इस फिल्म को प्रतिबंध लगाने के साथ सेंसर बोर्ड से सर्टिफिकेट वापस लेने की मांग की है।

दस साल में मर चुके हैं दो लाख किसान

एक दशक में देश में दो लाख किसानों ने आत्महत्या की है। इसमें विदर्भ क्षेत्र में चालीस हजार किसान शामिल है। लेकिन आज तक विधवाओं को अपने पति की मौत का मुआवजा नहीं मिला है। इलाके के किसानों का कहना है कि पीपली लाइव के कारण उन 1.60 लाख विधवाओं के सामने मुआवजे का संकट आ खड़ा हो गया है जिनके पतियों ने सरकार की गलत नीतियों के कारण आत्महत्या की थी। यह फिल्म राजनेता, अधिकारियों की सोच का समर्थन करती है। (दै.भास्कर मधिल संपादित बातमी)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुटेसाहेब फक्त त्यांना सोयीस्कर वाटतील अशा प्रश्नांना उत्तर देताहेत

हे खरे आहे. आणि याचे कारणही सरळसोपे आहे. माझा आक्षेप फक्त " शेतकरी आत्महत्येच्या" विकृत सादरीकरणाबद्दल आहे. चित्रपटाच्या अवांतर बाबीबद्दल मी काहीएक बोललेलो नाही.

चित्रपट चांगला की वाईट, याबद्दल बोललेलो नाही.

मी फक्त सुरुवातीपासून या क्षणापर्यंत "एकच मुद्दा" घेवून बसलेलो आहे.
आणि प्रतिसादक नेमका एवढा मुद्दा सोडून बरेच काही लिहित आहे. Happy

माझा आक्षेप फक्त " शेतकरी आत्महत्येच्या" विकृत सादरीकरणाबद्दल आहे. त्यामुळे त्या चित्रपटात अवांतर काही चांगले-वाईट असेल/नसेल हा मुद्दा नाहीये. मी काही चित्रपट समिक्षक नाही.
हा मुद्दा या क्षणापर्यंत कोणिही समजूनच घेतलेला नाही. नेमका हाच मुद्दा वगळून प्रतिसादकांनी अवांतर मुद्दे मला समजावून सांगणे, सूरू केले आहे किंवा माझ्याविषयी "रिकामटेकडा" यासारखी विशेषने वापरून माझी मारबत काढणे सूरू केली आहे.
असो.
मी मात्र आता चित्रपटाविषयी चित्रपट पाहिल्यानंतरच बोलेन. Happy
.

मुटेसाहेब, शिर्षक पाहून याकडे वळलो. सिनेमा मीही पाहीला नाही पण प्रोमोज पाहून ती एक ब्लॅक कॉमेडी आहे हा अंदाज येतो. आत्महत्या हा थट्टेचा विषय नाही हे मान्य. माझ्या एका कवितेवर तुमची अशाच प्रकारची प्रतिक्रिया आली होती आणि तेथे मला शेतकर्‍यांची आत्महत्या अभिप्रेत नव्हती हे तुम्हाला नंतर कळलच. सगळ्या प्रतिसादानंतर एक गोष्ट सांगाविशी वाटते की चिनुक्स व इतरांनी दिलेला सल्ला योग्यच आहे. चित्रपट पाहील्याशिवाय भाष्य करण्यात अर्थ नाही.
कडू औषधाची गोळी साखरेचं लेपन लावून देतात तेव्हा हेतू हा असतो की गोळी घेतली जावी आणि रोगाचा इलाज व्हावा. ब्लॅक कॉमेडी हेच करते. विनोदाच्या माध्यमातून जेव्हा विषय मांडला जातो तेव्हा तो प्रत्येकाला अंतर्मुख करतोच. इथे वावरणारा प्रत्येक जण सजग आहे, सजाण आहे. तुमच्या इतकीच शेतकर्‍यांची आत्महत्या त्यांनाही भेडसावतेय. तस नसतं तर इतके प्रतिसाद यावर आले नसते. शेतकर्‍यांना न्याय मिळावा ही त्यांचीही भावना आहे. शेवटी तो पिकवतो म्हणून आम्ही आहोत हे कळण्याइतके सगळे सुज्ञ आहेतच.
विदर्भातील प्रतिक्रियांचा प्रणेता कोण आहे ते मला माहीत नाही. त्यांना चित्रपट कितपत कळला वा कळला नाही हे बोलण्याचाही मला अधिकार नाही. त्यांना निषेध नोंदवायचा होता तो त्यांनी चित्रपट पाहून नोंदवला. मग तुम्हीही तेच करायला हवं. अस असेल, तस असेल... हे तर्क बिनबुडाचे ठरतात.
एका जागी तुम्ही तुमच्या शब्दाबद्दल क्षमा मागितली आहे. तोच नियम त्या व्यक्तीला लागू होतो ज्याने इतर शब्दांबरोबर चुकून खेळकरपणे हा शब्द वापरलाय. त्याचा बाऊ करण्यात खरचं अर्थ नाही.
सिनेमा हे एक सशक्त माध्यम आहे आणि आपली व्यथा लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्याचा योग्य वापर करता येतो. टिंग्या हा देखील शेतकर्‍यांच्या जीवनावर आधारित सिनेमा होता. चुकीचा अर्थ काढणार्‍याला तो बालचित्रपट वाटू शकतो किंवा अजूनही काही. पण इथला सुसंस्कृत आणि सुशिक्षित वर्ग फक्त सिनेमे पाहून आपलं मत बनवत नाही. त्यांचं वाचन, मनन आणि चिंतन चौफेर आहे. शेतकर्‍यांबद्दल कितीही खोटे प्रवाद शासन वा सरकारी माध्यमातून जनमानसांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न झाला तरी जे सत्य आहे ते कितीही केलं तरी झाकता येत नाही. तुमची व्यथा आम्हाला कळते, भिडते आणि त्यासाठी काय करता येईल यावर भर द्यायला हवा. मायबोलीच्या माध्यमातून बहिष्कारासारखे आवाहन करण्याएवजी जर सहकाराचे आवाहन केलत तर माबोकर नक्कीच बळीराजाच्या सहकार्यासाठी खारीचा वाटा उचलायला तयार होईल.
ही माझी पहिली आणि या विषयावरची शेवटची प्रतिक्रिया. बाकी तुमची मतं तुम्ही माझ्या विपूत किंवा फोनवर मांडू शकता. धन्यवाद !

या सगळ्यापेक्षा, आपण चित्रपट ,जमल्यास तटस्थपणे, पहा आणि मगच लिहा.
पुन्हा एकदा :शेतकर्‍याची आत्महत्या हा मुद्दा घेऊन व्यवस्थेवर केलेली कमेंट म्हणजे हा चित्रपट. जमल्यास 'जाने भी दो यारो' ही पहा : यात शासन, राजकारणी, पत्रकार यांच्यावर हसत खेळत कोरडे ओढले आहेत्..मुद्दा शहरांतील बिल्डर धंद्यातील भ्रष्टाचार.

माझा आक्षेप फक्त " शेतकरी आत्महत्येच्या" विकृत सादरीकरणाबद्दल आहे. <<<
चित्रपटात विकृत सादरीकरण आहे हे तुम्हाला चित्रपट न बघताच कसं कळलं? किंवा हे तुम्ही न बघताच कसं ठरवलं? या प्रश्नाचे उत्तर द्यायचे तुम्ही टाळलेत त्यातच सगळं आलं.

माबोवर लिहिणे म्हणजे निव्वळ माबोकरांना उद्देशून लिहिणे, असे माझ्या ध्यानीमनीही नव्हते.
माझा असा समज होता की,
एखाद्या लोकल पेपर मध्ये लिहून प्रकाशित केले तरी ते समस्त देशाला/देशबांधवांना संबोधल्यासारखे असते, त्याच न्यायाने माझा असा गैरसमज होता की माबोवर लिहिणे म्हणजे तमाम भारतीय जनतेला उद्देशून लिहीने.
त्यामुळे माझे आवाहन माबोकरांना उद्देशून नव्हतेच. त्याचप्रमाणे माबोवर मी जे लिहितो आहे, आजवर जेवढे लिहिले आहे ते माबोकरांना म्हणुन उद्देशून लिहिलेले नाही. मी जे लीहितो ते देशाचा नकाशा डोळ्यासमोर ठेवूनच लिहितो.

कदाचित मायबोली म्हणजे भारताचे प्रतिबिंब असा जो माझ्या मनात नकळत ठसा उमटलेला आहे, त्यामुळे असे घडले असावे.

कारण माबोवरच्या एकाही व्यक्तीशी माझा व्यक्तिगत थेट परीचय नाही. ज्या आयड्यांची मला नावे माहीत आहे, ही संख्याही दहाच्या वर नाही. त्यामुळे मी माबोकरांनाच उद्देशून लिहिण्याचे कहीही प्रयोजन नाही.

(कौतूकजी, हे तुमच्या पोष्टला उद्देशून नाही, कारण तुमच्या पोष्टच्या आधीच या स्वरूपाची मते व्यक्त झाली आहेत.)

<< चित्रपटात विकृत सादरीकरण आहे हे तुम्हाला चित्रपट न बघताच कसं कळलं? किंवा हे तुम्ही न बघताच कसं ठरवलं? >>

सीबीआय,रॉ,सिआयडी,सीआयए याण्च्याकडून.

अशा अविर्भावात वारंवार एकच प्रश्न विचारतात की जणू या प्रश्नाच्या उत्तरातच विश्वाचे कल्याण सामवले आहे.

एकीकडे हास्यास्पद म्हणायचे, दुसरीकडे सिनेमा पहा त्यानंतरच बोला म्हणायचे, तिसरीकडे प्रश्नाचे उत्तर द्यायचे तुम्ही टाळलेत त्यातच सगळं आलं म्हणायचे. तर मग मी नेमके काय करायचे?

मी मात्र आता चित्रपटाविषयी चित्रपट पाहिल्यानंतरच बोलेन. Happy

जे आपल्याला माहितच नाही ते तसंच आहे असं म्हणून वारंवार आदळआपट करताय तुम्ही.
आणि ते बोलून दाखवलं तर लगेच बोलणार्‍यांना शेतकर्‍यांच्या प्रश्नाची चाड नाही आणि इतर काय काय बडबड.

'मीच किती बिचारा!' या नशेत अडकल्यावर असंच होत असावं.

>>अशा अविर्भावात वारंवार एकच प्रश्न विचारतात की जणू या प्रश्नाच्या उत्तरातच विश्वाचे कल्याण सामवले आहे.<<
परत एक सोयीस्कर कलाटणी.
तुमच्या सगळ्या निषेधाच्या आणि चित्रपटाबद्दलच्या विधानांना तुम्ही सिनेमा पाह्यलेलाच नसल्यामुळे अर्थ नाहीये. हे इतकं साधं का शिरत नाही तुमच्या डोक्यात?

>>मी मात्र आता चित्रपटाविषयी चित्रपट पाहिल्यानंतरच बोलेन.<<
फारच लवकर बुद्धी सुचली. आधी सुचलं असतं तर तुमचाच आक्रस्ताळेपणा लपून राह्यला असता जगापासून.

बाळपणात मी ज्या आजीपासून बुद्धीच्या चार गोष्टी शिकलो, तीला जसा समज होता तसे तिने मला शिकवले.

तुम्ही मला आता शिकवायला लागल्यात, त्यामुळे तुम्हाला हवे असलेले शहाणपण/बुद्धी माझ्यात यायला जरा वेळ लागेल.

मात्र निरजा पटवर्धन सारखी आजी तेंव्हा लाभली असती तर बरे झाले, असे वाटते.

मी मात्र आता चित्रपटाविषयी चित्रपट पाहिल्यानंतरच बोलेन. >>> अहो अजून चार-पाच पानं तरी घ्यायचीत हे लिहायला.

आधी सिनेमा बघा आणि मग लिहा हे कित्येक जणांनी साध्या सोप्या मराठीत लिहूनही तुम्हाला ते कळून उपरती व्हायला आठ पानं लागली तर पीपलीची ब्लॅक कॉमेडी झेपणार म्हणताय? बघा बुवा आपलं काही म्हणणं नाही.

हे भारतियांनो त्या पीपली लाइव्हचा निषेध करा. >>> Biggrin अगदी जीवनमरणाच्या प्रश्नावर नवक्रांतीसाठी हाकच दिली की हो तुम्ही Biggrin
आणि तुम्हाला परोपरीने समजावणार्‍यांना म्हणताय >>>अशा अविर्भावात वारंवार एकच प्रश्न विचारतात की जणू या प्रश्नाच्या उत्तरातच विश्वाचे कल्याण सामवले आहे.

आनंद आहे.

मायबोली काय घरचीच आहे काहीही छापा...

एखाद्या लोकल पेपर मध्ये लिहून प्रकाशित केले तरी ते समस्त देशाला/देशबांधवांना संबोधल्यासारखे असते, त्याच न्यायाने माझा असा गैरसमज होता की माबोवर लिहिणे म्हणजे तमाम भारतीय जनतेला उद्देशून लिहीने.
त्यामुळे माझे आवाहन माबोकरांना उद्देशून नव्हतेच. त्याचप्रमाणे माबोवर मी जे लिहितो आहे, आजवर जेवढे लिहिले आहे ते माबोकरांना म्हणुन उद्देशून लिहिलेले नाही. मी जे लीहितो ते देशाचा नकाशा डोळ्यासमोर ठेवूनच लिहितो. >>>> जरा जमिनीवर या हो. सामान्य रहा, सामान्य जगा आणि मुख्य म्हणजे सामान्य लिहा.

बाकी काही म्हणणे नाही. कळावे. लोभ असावा.

दोन Genuine शंका -

१. बाफ चा full form काय?
२. वर 'रच्याकने' की असं काहीतरी मी ३-४ वेळा वाचलं. म्ह़णजे काय?

मीही सगळ्या पोस्ट वाचल्या नाहीत तसएच चित्रपट तर मुळीच पाहीला नाही तरीपण..

चित्रपट्चा निषेध आणि या बाफ सुरू करणार्‍याचा आणि बा फ चा पण निषेध!
(कहने मे क्या हर्ज है!)

इथे थेटरात हा पिक्चर आलाय का बघायला हवं नाहीतर डिव्हीडी करता वाट बघायला हवी. आमिरचा पिक्चर म्हटल्यावर चुकवून चालायचा नाहीच आणि इथले वाद हे ही सबळ कारण आहेच.

एव्हढ्या पोस्टी आल्या म्हणुन बघायला आले की , बघितला का पिक्चर मुटेसाहेबांनी शेवटी? ??????तर नाहीच!!!!!

मी सिनेमा पहावा म्हणुन काय हूरहूर लागलीय बघा. Happy

धनुडीजी, दोन कारणामुळे उशिर होत आहे, त्याबद्दल क्षमस्व.

१) १७ ऑगष्टला मी नागपुरला गेलो होतो.सिनेमा पाहण्यासाठी म्हणुन नव्हे तर खाजगी कामासाठी. पण वेळ उरलाच आणि नागपुरला प्रदर्शित झाला असेल तर बघावा असा उद्देश होता. पण नियतीला ते मंजूर नसावे.
भयानक अपघात होता होता राहीला,आणि अशा अपघातातून मी जिवंत वाचलो यावर माझा विश्वास नसला तरी ते वास्तव असल्याने नाकारताही येत नाही. Happy फक्त पायाला एक मामुली जखम झाली, डॉक्टरच्या निदानानुसार फार तर दोन चार महिण्यात दुरूस्त होवून जाईल. Happy बाकी मी पीटी उषाच्या वेगाने धावू शकतो, असा मला विश्वास आहे.
त्यामुळे १७ ऑगष्ट कोरडाच गेला.

२) आता पुन्हा जाण्यात काही अडचन नाही,पण दिड हजार खर्च करून केवळ "सिनेमा" पाहायला जायची माझी मानसिक तयारी नाही. आशा आहे की लवकरच म्हणजे आठवडाभरात तसा योग जुळून येईलच.

ही पोष्ट वाचल्यावर "पळवाट शोधली" अशी काही आयड्यांची समजूत होऊ शकते, अशी आता माझी खात्री झाली आहे.
त्यामुळे अशा तर्‍हेचा प्रतिसाद आल्यास मला अजिबात वाईट वाटणार नाही.

माझे आवाहन माबोकरांना उद्देशून नव्हतेच. त्याचप्रमाणे माबोवर मी जे लिहितो आहे, आजवर जेवढे लिहिले आहे ते माबोकरांना म्हणुन उद्देशून लिहिलेले नाही. मी जे लीहितो ते देशाचा नकाशा डोळ्यासमोर ठेवूनच लिहितो. >>> तुम्ही ना सूर्याची पिल्ले पहा. राष्ट्रासाठी एवढं तरी कराच तुम्ही.

दोन Genuine शंका -
१. बाफ चा full form काय?
२. वर 'रच्याकने' की असं काहीतरी मी ३-४ वेळा वाचलं. म्ह़णजे काय?
>>>>>

मला अर्थ कळलाय... सर्वांचे धन्यवाद!!!

Rofl
सगळा तमाशा वाचल्यावर हसावे की रडावे ते कळेना, पण हसणे तब्बेतीला चांगले असते म्हणतात म्हणून Rofl
हे देखील 'ब्लॅक' हसणे आहे असे समजायला हरकत नाही Rofl

मी चित्रपट पाहीलेला नाही आणि पहावे असे वाटतही नाही. कारण शेतकर्‍यांच्या आत्महत्या विनोदाचा विषय होणे किंवा विनोदी चित्रपटात शेतकर्‍यांच्या आत्महत्येसारखा गंभिर विषय हाताळणे हेच मुळी विकृतीचे लक्षण आहे................सहमत मुटेसाहेब! एक आस्सल शेतकरी

मुटेसायबांच्या लॉजिकपरमाने 'तेरे बीन लादेन' हा देखील अत्यंत बकवास सिनेमा आहे, 'अल कायदा' आणि दहशतवाद हे काय विनोदाचे विषय आहेत काय? संबंधितांनी इकडे लक्ष द्यावे, तसेच कुठल्याही ज्वलंत सामाजिक विषयावर ब्लॅक, व्हाईट कसलीच कॉमेडी करायची नाही असा कायदा करावा.

आगाऊजी, तुमच्या पोष्टवरून शेतकर्‍यांच्या आत्महत्या विनोदाचा विषय असू शकतात, एवढे मात्र नक्कीच ध्वनीत होते.

असे मी ध्वनित करतो आहे, ह्याची तुम्हाला खात्री पटली ना, मग झाले तर;
कुणाला काय म्हणायचे आहे त्याला तुमच्या दृष्टीने तशीहि काय किंमत आहे? आणि ते कितीही समजाउन सांगितले तरी तुमचा हेका तुम्ही सोडणार नाहीत त्यामुळे, जाउद्या!

Pages