पीपली लाइव्ह आणि सिंपली सुसाईड.
मी नाही पाहीला हा चित्रपट. पण बातम्यावरून लक्षात येतंय की शेतकरी अनुदानाच्या लोभापायी आत्महत्या करतो, असा आभास त्या चित्रपटात निर्माण करण्यात आलेला आहे.
तसेही शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात, वेडसर असतात म्हणुन आत्महत्या करतात, आळशी असतात म्हणुन आत्महत्या करतात आणि अशिक्षित असतात म्हणुन आत्महत्या करतात वगैरे-वगैरे अक्कलेचे तारे यापुर्वीच विचारवंतानी तोडलेच आहे,(संदर्भ; 'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे') त्यात पुन्हा एका नव्या विचारवंताची भर पडली म्हणायची.
शेतकर्याच्या आत्महत्यांची कारणे शोधली जात नाहीत, उपाययोजना केल्या जात नाहीत आणि प्रामाणिक प्रयत्नही केले जात नाहीत.
याउट त्यांच्या जखमांवर मीठ चोळून विकृत चित्र उभे केले जाते. आणि त्याचा निषेध व्यक्त करण्याची साधी गरजही सामान्य माणसाला भासत नाही, काय म्हणावे याला?
ज्या सुसंस्कृत समाजाकडून त्याने न्यायाची अपेक्षा करावी तोच समाज जर असा विकृतीने पिडलेला आहे, हे जर त्याच्या लक्षात आले आणि तशी खात्री झाली तर मग तो न्यायासाठी स्वत:चे मार्ग स्वत:च शोधेल आणि अशा सुशिक्षित-सुसंस्कृत समाजाच्या विकृत विचारांपेक्षा असभ्य रानटी मावो/नक्षलवांद्यासारख्यांची सहानुभुती त्याला जवळची वाटली तर.......????????
तर त्याचे काही चुकते हे मी तरी त्याला कसे समजावणार.....?????????????????????
शेतकर्याला मुख्य प्रवाहापासून दुर फ़ेकून द्यायचे नसेल तर....
हे भारतियांनो त्या पीपली लाइव्हचा निषेध करा.
अगदी जमेल त्या मार्गाने... जमेल तसा....जमेल त्या पद्धतीने.......!!
गंगाधर मुटे
..................................................................................
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?
..................................................................................
.
.
ता.क- मी चित्रपट पाहीलेला नाही आणि पहावे असे वाटतही नाही. कारण शेतकर्यांच्या आत्महत्या विनोदाचा विषय होणे किंवा विनोदी चित्रपटात शेतकर्यांच्या आत्महत्येसारखा गंभिर विषय हाताळणे हेच मुळी विकृतीचे लक्षण आहे. हा विषय तीन तासाच्या एका चित्रपटातच काय दहा चित्रपटात सुद्धा आवाक्यात येणार नाही असा विषय एखाद्या चित्रपटात तोंडी लावून चघळण्याइतका किरकोळ वाटावा, ही विचारशैलीच शेतकर्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोण स्पष्ट करून जाते. ’पीपली’ च्या जाहिरातीचा टीव्हीवरील छोटासा संवादच ऐकणे जेथे जड गेले तेथे माझ्यासारख्याला पुर्ण सिनेमा शांतपणे बसून पाहणे शक्य होईल?
.............................................................................................
दुपारी २.२४ वाजता
esakal.com - वरिल http://72.78.249.107/esakal/20100814/5039280691352829503.htm
या लिंकवरील पीपली (लाइव्ह) > आपल्या कोडगेपणाच्या कानाखाली काढलेला आवाज - हा त्या चित्रपटाबद्दल भाष्य करणार्या लेखातील काही भाग पहा.....
.
दिग्दर्शिकेनं इथं मुख्य प्रदेश नावाच्या भारताच्या काल्पनिक राज्यातला एक गरीब शेतकरी नथ्था (ओंकारदास माणिकपुरी) कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याची घोषणा करतो, या "थीम'भोवती सगळी कथा मांडली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खरोखर गेल्या काही वर्षांत या देशाला लागलेला कलंक आहे. मात्र, याच विषयाकडं खेळकरपणानं पाहत, उपहासाच्या माध्यमातून दिग्दर्शिकेनं आपल्या बोथट झालेल्या संवेदनेला गदगदून हलविण्याचं काम केलं आहे. नथ्था आणि त्याचा मोठा भाऊ बुधिया (रघुवीर यादव) कर्जमाफीसाठी त्यांच्या भागातल्या पुढाऱ्याकडं जातात. तेव्हा तो त्यांची थट्टा करून आत्महत्या करण्याचा सल्ला देतो. मात्र, त्याच्या या तिरकस सल्ल्यानंतर नथ्था व बुधिया खरोखर आत्महत्या करण्याचा विचार करू लागतात.
.
१) असा घोषणा करून शेतकरी आत्महत्या करीत असतो? हे विकृत विचार नाही?
२) शेतकरी आत्महत्येकडे खेळकरपणाने पाहात? या वाक्यात आणी "बलात्कार होत असतांना मी खेळकरपणाने पाहत होतो" या वाक्यात मला फ़ारसा फ़रक आढळत नाही.
काय करावे या खेळकरपणाचे?
३) शेतकरी कर्जमाफ़ीसाठी कुणापुढे हात पसरतात? या उलट १० रुपये मुद्दल रक्कमेचे व्याजासहित ५०० रू फ़ेडता-फ़ेडता पिढ्या बरबाद झाल्या.
यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की हा समाज शेतकरी वर्गाकडे किती गांभिर्याने पाहतो.
त्याच्या आत्महत्येवर निट अभ्यास करता येत नसेल तर नका करू पण असा विकृतीपुर्ण विपर्यास का करता?
..
याला विकृत विचार म्हणणे पटत नसेल तर नेमके विकृत विचार कशाला म्हणायचे, हे जरा मला समजून सांगावे. माझ्या मनाचे दरवाजे सताड उघडे आहे.
............................................................
सायं ६,०० वाजता वाढवलेली पोष्ट.
काल आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या विधवांनी आमीरच्या पोष्टरची "होळी केली"
बातमी....
स्वतंत्रता दिवस के दिन रविवार को जहां एक ओर पूरा देश आजादी का पर्व मनाने में व्यस्त था तो दूसरी ओर महाराष्ट्र में पांच हजार विधवाएं आमिर खान की पीपली लाइव के पोस्टर जला रही थीं। विदर्भ जन आंदोलन समिति के बैनर के तले नागपुर से 150 किलोमीटर दूर यवतमाल जिले में जुटीं इन विधवाओं की बस एक ही मांग थी कि आमिर खान उनसे माफी मांगे और सरकार फिल्म पर प्रतिबंध लगाए।
कहते हैं कि आमिर की नई फिल्म के कारण विदर्भ के किसान और और हजारों विधवाएं गुस्से में हैं। क्योंकि इस फिल्म में दिखाया गया है कि किसान मुआवजे के लालच में आत्महत्या करते हैं। तिवारी कहते हैं कि आमिर खान को किसानों के मुद्दे से कोई मतलब नहीं है। वे बस अवार्ड जीतने के लिए फिल्म बनाते हैं।
आमिर खान की पीपली लाइव रिलीज होने से पहले से ही विवादों में रही है। महाराष्ट्र के किसानों ने इस फिल्म को प्रतिबंध लगाने के साथ सेंसर बोर्ड से सर्टिफिकेट वापस लेने की मांग की है।
दस साल में मर चुके हैं दो लाख किसान
एक दशक में देश में दो लाख किसानों ने आत्महत्या की है। इसमें विदर्भ क्षेत्र में चालीस हजार किसान शामिल है। लेकिन आज तक विधवाओं को अपने पति की मौत का मुआवजा नहीं मिला है। इलाके के किसानों का कहना है कि पीपली लाइव के कारण उन 1.60 लाख विधवाओं के सामने मुआवजे का संकट आ खड़ा हो गया है जिनके पतियों ने सरकार की गलत नीतियों के कारण आत्महत्या की थी। यह फिल्म राजनेता, अधिकारियों की सोच का समर्थन करती है। (दै.भास्कर मधिल संपादित बातमी)
from esakal.com - पीपली
from esakal.com -
पीपली (लाइव्ह) > आपल्या कोडगेपणाच्या कानाखाली काढलेला आवाज -
http://72.78.249.107/esakal/20100814/5039280691352829503.htm
ज्याने चित्रपट पाहिला नाही
ज्याने चित्रपट पाहिला नाही त्याला चित्रपट पहा म्हणुन सांगणार..
ज्याने पाहिला त्याला डोळे शाबुत आहे का? चश्म्याचे नंबर बदलून घ्यायला सांगणार....
ज्याचे डोळे आणि चष्मा शाबुत आहे, त्याला तुला तो कळला तरी का म्हणुन विचारणार...
कळला असे म्हटले तर मेंदू तपासा, डॉक्टरचा सल्ला घ्या म्हणणार.....
त्यामुळे मी चित्रपट पाहून नंतर लिहिल्याने कुणाची मते बदलतील, हे तितकेसे खरे नाही.
चर्चेच्या परिभाषा अशाच असतात.
शेतकर्यांच्या आत्महत्यांपेक्षा आमीरवरचे प्रेम अधिक महत्वाचे ठरू नये असे मला वाटते.
संपुर्ण चित्रपट जाऊ द्या, टीव्हीवरचे जाहीरातीचे संवाद सुद्धा मला अपमानीत करून गेल्यासारखे वाटले.
प्रसारमाध्यमंही या बातमीकडे
प्रसारमाध्यमंही या बातमीकडे trpसाठी बघतात. चिनुक्स, एक्झ्याक्टली!!! आणि कशावरून हा विरोधसुद्धा trp साठीच नसेल? पोस्टर्स जाळणारे खरंच शेतकरी होते का? हेही पाहायला हवे...
reverse psychology च्या तत्वानुसार 'हे पाहू नका' म्हटले की सगळे मुद्दाम 'ते' पाहतात. बंद दरवाजाकडे बोट दाखवून 'हा दरवाजा कधीच उघडू नका' म्हटले की त्या दरवाजाआड काय आहे, हे पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचते. असंच काहीसं ह्या चित्रपटाच्या बाबतीतही घडवून आणलं जात असावं.
" माय नेम इज खान" च्या वेळी शाहरुख खान ला अमेरिकेतील विमानतळावर चौकाशीसाठी थोपवून होते. तो केवळ "खान" आहे, म्हणून त्याला दहशतवादी समजून त्याला असा त्रास देण्यात आला असा त्याचा आरोप होता. नंतर समजलं, असाच डिट्टो सीन त्याच्या चित्रपटातही आहे...पब्लिसिटीसाठी लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात ह्याची अनेक उदाहरणे आहेत.
असो, लोकांनी केलेला विरोध हा असाच एक स्टंट आहे की चुकीचा संदेश पोहोचलेल्या लोकांचा चुकीचा प्रतिसाद आहे की खरेच ह्या चित्रपटात शेतकर्यांच्या आत्महत्येची टर उडवली आहे हे पाहण्याची मला तरी आता जाम उत्सुकता लागली आहे.
पण तरीही आतले मन मला हेच सांगते आहे, की हा चित्रपट आमीर खानचा असल्यामुळे आणि त्याने आजपर्यंत बनवलेल्या चित्रपटांमध्ये कायम चांगलाच संदेश दिलेला असल्यामुळे हाही चित्रपट त्याला अपवाद असणार नाही...
मी चित्रपट पाहिला
मी चित्रपट पाहिला आहे.
मुटेसाहेब, तुम्हाला मी अगदी परिपक्व आणि संयत विचारांची व्यक्ती समजतो. त्यामुळे मी तुम्हाला मनापासुन सांगतो की तुम्ही हा चित्रपट पहाच.
माझ्या बुद्धीला जितका चित्रपट समजला त्यातून हा चित्रपट शेतकर्यांच्या बाजूनेच बनवलेला आहे अशी माझी खात्री पटली आहे. चित्रपट संपल्यावर चित्रपटातल्या ब्लॅक हुमरने कितीही हसवले असले तरी एकंदरितच शेतकर्याची परवड पाहून मन सुन्न होते. हे या चित्रपटाचे यशच म्हणावे लागेल.
ता.क. - मी आमीर खान नामक अभिनेत्याचा पंखा नाही त्यामूळे माझे मत पूर्वग्रहदूशीत नसावे..बहुतेक!
सुशिक्षित-सुसंस्कृत समाजाच्या
सुशिक्षित-सुसंस्कृत समाजाच्या विकृत विचारांपेक्षा असभ्य रानटी मावो/नक्षलवांद्यासारख्यांची सहानुभुती त्याला जवळची वाटली तर.......????????
मुटेजी,
अहो,चित्रपट कोणत्याही विषयावरचा असो, या मिडीयावाल्यांना आणि सिनेमावाल्यांना त्यातुन मिळणार्या टीआरपी आणि कलेक्शन याशिवाय बाकी गोष्टींचा ते गंभीरपणे किती विचार करतात हे आता वेळोवेळी सिद्ध झालंच आहे ....
या सारख्या आणि सरकारकडुन इतर वेळी झालेल्या शेतकर्यांप्रती अक्षम्य दुर्लक्षामुळे यापुढे तर मावो/ नक्षलवांद्यासारख्या अनेक इतर संघटना आता निर्माण व्हायला वेळ लागणार नाही ...त्याची सुरुवात तर कधीच झाली आहे, कारण देशात इतर प्रत्येक घटक/वर्ग हा आज संकुचित होत चाललाय.
मुटे सर, तुमची तगमग आणि
मुटे सर, तुमची तगमग आणि चिडचिड मी नक्की समजू शकतो.
इथे आम्ही सगळे शेतकर्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या वाचून तुमच्यापेक्षा जास्त नसलो तरी तुमच्या इतके नक्की व्यथित होतो, दु:खी होतो. या बाबतीत माझ्याही भावना तीव्र आहेत. पण चित्रपट पाहून आलेल्यांच्या प्रतिक्रिया वाचून असे वाटते की काही मत बनवण्याअगोदर तो चित्रपट पहावा, आणि मग मत बनवावे.
वर अश्विनी के यांची पोस्ट विचारप्रवृत्त करणारी ठरावी. त्या म्हणतात "आपल्याकडे सगळ्याच ठिकाणी भरकटवणारे खूप लोक असतात आणि त्यांचे अंधानुकरण करणारेही खूप असतात. आधीच भयानक परिस्थितीने हळवे झालेले मन, अशावेळेस जाळपोळीला उद्युक्त करणे सोपे असते. त्यांच्या मनस्थितीचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो वैयक्तिक स्वार्थासाठी."
तेव्हा मुटे सर, तुम्ही नक्की चित्रपट बघावा आणि मग लिहावे अशी पुन्हा एकदा कळकळीची विनंती.
विदर्भात आमीरखानचे पोस्टर्स
विदर्भात आमीरखानचे पोस्टर्स ज्या शेतकर्यांनी जाळलेत, त्यांचे अभिनंदन.
चित्रपट न पाहताच पोस्टर्स जाळण्याएवढा शेतकरी रिकामटेकडा असावा, असे मला वाटत नाही.
>> मान्य . अहो पण , गंगाधरजी , ते शेतकरी होते का नक्की ?
आणि चित्रपटाला विरोध करायच म्हणाला तर आमच्या सान्गलीत "जोधा अकबर " विरुद्ध ते झाल होत , ९९.९९ % सांगलीकराना जोधा कोण आणि अकबर कोण माहीत नसताना (आणि त्याची पर्वाही नसताना) !!!
त्याचे कर्ते - करवते आणि त्यामागचे हेतू फार वेगळे असतात हो !
शेतकर्यांच्या
शेतकर्यांच्या आत्महत्यांपेक्षा आमीरवरचे प्रेम अधिक महत्वाचे ठरू नये
>>>
याचा काय संबंध इथे? त्यात आमीर खानाने अभिनय केलेला नसून त्याची फक्त निर्मिती आहे. तुमच्या सार्याच लिखाणाला काहीही शेंडाबुड्खा नाही. साप समजून भुई धोपटत आहात. या अशा बाफांनी चांगल्या सिनेमाबद्दल चूकीचा संदेश जनतेत जाऊ नये आणि हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहून त्यामागची तळमळ आणि समस्येचं गांभीर्य समजावून घ्यायला हवं खरं तर. पण इतक्या लोकांनी सांगूनही तुमचे टुमणे तुम्ही लावूनच धरले आहे.
त्या मुटेंच्या शेवटच्या पोस्टमध्ये मुदा नसलेली व्यर्थ आणि अस्थानीची आदळआपट दिसतेच आहे आणि त्यावरून त्यांना यापुढे कितीही लोकांनी कितीही समजावून सांगितले तरी फायदा नाही- असेही दिसते आहे. तेव्हा लोकहो, आता सोडा त्यांना.
esakal.com - वरिल
esakal.com - वरिल http://72.78.249.107/esakal/20100814/5039280691352829503.htm
या लिंकवरील पीपली (लाइव्ह) > आपल्या कोडगेपणाच्या कानाखाली काढलेला आवाज - या लेखातील काही भाग पहा.....
.
दिग्दर्शिकेनं इथं मुख्य प्रदेश नावाच्या भारताच्या काल्पनिक राज्यातला एक गरीब शेतकरी नथ्था (ओंकारदास माणिकपुरी) कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याची घोषणा करतो, या "थीम'भोवती सगळी कथा मांडली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खरोखर गेल्या काही वर्षांत या देशाला लागलेला कलंक आहे. मात्र, याच विषयाकडं खेळकरपणानं पाहत, उपहासाच्या माध्यमातून दिग्दर्शिकेनं आपल्या बोथट झालेल्या संवेदनेला गदगदून हलविण्याचं काम केलं आहे. नथ्था आणि त्याचा मोठा भाऊ बुधिया (रघुवीर यादव) कर्जमाफीसाठी त्यांच्या भागातल्या पुढाऱ्याकडं जातात. तेव्हा तो त्यांची थट्टा करून आत्महत्या करण्याचा सल्ला देतो. मात्र, त्याच्या या तिरकस सल्ल्यानंतर नथ्था व बुधिया खरोखर आत्महत्या करण्याचा विचार करू लागतात.
.
१) असा घोषणा करून शेतकरी आत्महत्या करीत असतो? हे विकृत विचार नाही?
२) शेतकरी आत्महत्येकडे खेळकरपणाने पाहात? या वाक्यात आणी "बलात्कार होत असतांना मी खेळकरपणाने पाहत होतो" या वाक्यात मला फ़ारसा फ़रक आढळत नाही.
काय करावे या खेळकरपणाचे?
३) शेतकरी कर्जमाफ़ीसाठी कुणापुढे हात पसरतात? या उलट १० रुपये मुद्दल रक्कमेचे व्याजासहित ५०० रू फ़ेडता-फ़ेडता पिढ्या बरबाद झाल्या.
यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की सुसंस्कृत समाज शेतकरी वर्गाकडे किती गांभिर्याने पाहतो.
त्याच्या आत्महत्येवर निट अभ्यास करता येत नसेल तर नका करू पण असा विकृतीपुर्ण विपर्यास का करता?
..
याला विकृत विचार म्हणणे पटत नसेल तर नेमके विकृत विचार कशाला म्हणायचे, हे जरा मला समजून सांगावे. माझ्या मनाचे दरवाजे सताड उघडे आहे.
डोंबल मनाचे दरवाजे सताड
डोंबल मनाचे दरवाजे सताड उघडे.
झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही हेच खरं.
>>त्या मुटेंच्या शेवटच्या पोस्टमध्ये मुदा नसलेली व्यर्थ आणि अस्थानीची आदळआपट दिसतेच आहे आणि त्यावरून त्यांना यापुढे कितीही लोकांनी कितीही समजावून सांगितले तरी फायदा नाही- असेही दिसते आहे. तेव्हा लोकहो, आता सोडा त्यांना.<<
साजिराने म्हणलेलं हेच खरं.
बाकी अशी अॅन्टी पब्लिसिटी पण चित्रपटाच्या व्यावसायिक यशासाठी चांगली मानली जाते. तेव्हा न बघताच एखाद्या सिनेमात काय आहे ते ठरवून झोडत सुटायचे याबद्दलची कंत्राटे पण निघालेली असू शकतात.
मुटेजी लिंक ऐवजी तो लेख किती
मुटेजी लिंक ऐवजी तो लेख किती बोलका आहे असे वाटत नाही का ??
आपल्या कोडगेपणाच्या कानाखाली काढलेला आवाज
अनुषा रिझवी दिग्दर्शित आणि आमीर खान निर्मित "पीपली (लाइव्ह)' हा नवा हिंदी चित्रपट म्हणजे आपल्या सगळ्यांच्या कोडगेपणाच्या कानाखाली काढलेला एक सणसणीत आवाज आहे. या "आपल्या'मध्ये सगळा देश आला. या देशातलं केंद्र सरकार आलं, राज्य सरकारं आली, प्रसारमाध्यमं आली, नोकरशाही आली, पोलिस दल आलं... सगळेच! गेल्या वीस वर्षांत, विशेषतः आपली अर्थव्यवस्था खुली झाल्यानंतर हा देश कमालीचा बदलला. इथं भौतिक सुखांची गंगा अवतरली. वर्षानुवर्षं दुष्काळी असलेल्या गावात अचानक हापशाला पाणी लागावं आणि त्यातले चार थेंब मुखी घालण्यासाठी त्या गावातल्या लोकांमध्ये मारामाऱ्या व्हाव्यात, तशी ही सुखं आपण आपसांतच भांडून ओरबाडू लागलो. मात्र, हा बदल देशातल्या सगळ्याच लोकांबाबत झाला नाही. फक्त महानगरांपुरता, बड्या शहरांपुरता झाला. देशातला एक मोठा वर्ग अद्याप तुटपुंज्या कमाईवर, शेतीच्या बेभरवशी उत्पन्नावर जगतो आहे याचा जणू सगळ्यांना सोयीस्कर विसरच पडला. खुल्या अर्थव्यवस्थेत सगळ्याच गोष्टी "बाजार' ठरवत असल्यानं आपण आपलं जगणं, आपली जीवनशैली, आपले आयुष्याचे प्राधान्यक्रम हे सगळं सगळं बाजाराच्या हवाली केलं. आपण विचार करेनासे झालो. आपल्याच काही देशबांधवांविषयी आपण आपल्या संवेदना विसरून गेलो. सुखलोलुपतेची परिसीमा गाठली आणि त्यातून अंगी एक कोडगेपणा आला. या कोडगेपणाच्या कानाखाली "खण्ण' आवाज काढणारा "पीपली लाइव्ह' हा चित्रपट आहे. तो प्रत्येक सच्च्या भारतीयाने पाहायलाच हवा.
साजीरा, या अशा बाफांनी
साजीरा,
या अशा बाफांनी चांगल्या सिनेमाबद्दल चूकीचा संदेश जनतेत जाऊ नये
मात्र असे सिनेमे बघुन प्रेक्षकाच्या मनात चुकीचे संदेश गेलेले चालतील, असेच ना?
.
हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहून त्यामागची तळमळ आणि समस्येचं गांभीर्य समजावून घ्यायला हवं खरं तर
शेतकरी आत्महत्येमागची तळमळ आणि समस्येचं गांभीर्य समजावून घ्यायला इथे कुणाला वेळ आहे, असेच ना?
माझ्या मनाचे दरवाजे सताड उघडे
माझ्या मनाचे दरवाजे सताड उघडे आहे.
खरंच???
>>>
तुम्हीच एक सांगा, तुम्ही चित्रपट बघणार आहात की नाही. मगच पुढचं बोलता येईल.
डोंबल मनाचे दरवाजे सताड
डोंबल मनाचे दरवाजे सताड उघडे.
झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही हेच खरं.
हेच वाक्य तुम्ही स्वतःबद्दलही वापरून पहा, कदाचित जास्त फिट्ट बसेल.
दुसर्याला म्हणायला काय लागतं?
मुटे साहेब, तुमची
मुटे साहेब, तुमची शेतकर्यांविषयीची तळमळ आम्हाला नक्किच कळते आहे, परंतु हा सिनेमा एक ब्लॅक कॉमेडी आहे. त्याला आपल्याला त्या द्रुष्टीकोनातुनच पहावे लागेल. त्याला आपण नेहेमीच्या सिनेमाचे निकष लावू शकत नाही. ब्लॅक कॉमेडी मधे आपल्याला आशय समजून न घेता त्यावर टिपणी करता येणार नाही. सर्वच ब्लॅक कॉमेडी सिनेमा/नाटक इ. मधे हे लागू पडते.
बारिशकर, त्यासाठी त्यांनी तो
बारिशकर, त्यासाठी त्यांनी तो सिनेमा बघावा लागेल. इथे सगळे तेच सांगतायत त्यांना की सिनेमामधे काय आहे याच्या नुसत्या कल्पना करून घेत आदळआपट करण्यापेक्षा सिनेमा बघा आणि मग बोला.
पण पालथ्या घड्यावरून पाणी.
मुटे, वरती तुम्ही
मुटे, वरती तुम्ही 'खेळकरपणानं' हा शब्द बोल्ड केला आहे. त्याचसोबत, त्याच्याचपुढल्या 'उपहासाच्या माध्यमातून दिग्दर्शिकेनं आपल्या बोथट झालेल्या संवेदनेला गदगदून हलविण्याचं काम केलं आहे' या शब्दांना पण बोल्ड करून बघा. शिवाय त्या वाक्यावर जरा विचारही करा.
माणूस गंभीर आणि जड चर्चा आणि लिखाणातून होतो, त्यापेक्षा जास्त उपहासाचे फटके बसून 'विचार करायला' प्रवृत्त होतो- हे तुम्हाला समजत नसेल, तर तुम्हाला __/\__.
खरंय साजीरा, त्यांच्या
खरंय साजीरा, त्यांच्या पुढच्याच पोस्ट वरुन ते स्पष्ट झालंय. ना त्यांना चित्रपट बघायचाय, ना त्यांचा विचार बदलायचाय, ना कोणाच म्हणणं समजुन घ्यायचय. इसकाळ मधल्या लेखातले कुठ्चेतरी दोन शब्द ठळक करुन काय होणार आहे? तेव्हा लोकहो सोडा त्यांना जाउ द्या.
तुम्ही चित्रपट पहा आणी मग
तुम्ही चित्रपट पहा आणी मग त्या बद्दल बोला.
डोंबल मनाचे दरवाजे सताड उघडे
डोंबल मनाचे दरवाजे सताड उघडे >> चला, आता मी म्हणतो हे. पुढे बोला. आणि आता तर सिनेमा बघूच नका..!
>>हेच वाक्य तुम्ही
>>हेच वाक्य तुम्ही स्वतःबद्दलही वापरून पहा, कदाचित जास्त फिट्ट बसेल.<<
अजिबातच नाही. मी सिनेमा बघितलेला नाही तेव्हा त्यात काय आहे आणि काय नाही याबद्दल मी काही बोललेलीच नाही. माझ्या जाणिवा किती जागृत बिगृत याच्या उठाठेवी तुम्ही करू नका. शेतकर्यांच्या बाजूने गळा काढणे म्हणजेच केवळ जाणिवा जागृत नसतात.
>>दुसर्याला म्हणायला काय लागतं?<<<<
एक्झॅक्टली, शहरातल्या माणसांच्या नावाने बोंब मारायला जातंय काय?
इतरांना शिव्या घातल्याचं तुम्हाला समाधान केवळ.
बाकी सिनेमा न बघता त्यावर अधिकारवाणीने भाष्य करणे याला आमच्या जगतात बरीच शेलकी विशेषणे दिली जातात. यादी देऊ?
नसती आदळआपट!!
तुम्हीच एक सांगा, तुम्ही
तुम्हीच एक सांगा, तुम्ही चित्रपट बघणार आहात की नाही. मगच पुढचं बोलता येईल.
बघेल ना. पण त्याला वेळ लागेल. आणि मी जे म्हणतो ते खोटे निघाले तर कान पकडून माफीही मागेल.
मी एकंदरीत चित्रपट चांगला की वाईट असे म्हटलेच नाही. आमीरचा चित्रपट म्हणजे चांगला आणि नाविन्यपुर्ण असणारच.
प्रश्न तो नाहीच.
प्रश्न हा की शेतकर्यांच्या आत्महत्येचा विषय इतक्या हलकेपणाणे का मांडावा.
हे खरे आहे की मला जसे वाटते तसे ते इतरांना वाटत नाही.
माणूस गंभीर आणि जड चर्चा आणि
माणूस गंभीर आणि जड चर्चा आणि लिखाणातून होतो, त्यापेक्षा जास्त उपहासाचे फटके बसून 'विचार करायला' प्रवृत्त होतो- हे तुम्हाला समजत नसेल, तर तुम्हाला __/\__ <<<
अगदी अगदी.
संतकाव्यामधे पण हे उपहास, उपरोधाचे फटके जागोजागी दिसतील. अगदी ब्लॅक कॉमेडीच्या अंगाने सुद्धा.
बतावण्यांमधे तर सर्रास हा फॉर्म वापरला जातो.
नी ... आता देच तु यादी....
नी ... आता देच तु यादी....
प्रश्न हा की शेतकर्यांच्या
प्रश्न हा की शेतकर्यांच्या आत्महत्येचा विषय इतक्या हलकेपणाणे का मांडावा.<<
चित्रपट न बघता हे कसं ठरवलं?
पर्या याला दुसर्याच्या
पर्या याला दुसर्याच्या गडावरून तोफा डागणे म्हणतात. तेव्हा गप पड...
प्रश्न हा की शेतकर्यांच्या
प्रश्न हा की शेतकर्यांच्या आत्महत्येचा विषय इतक्या हलकेपणाणे का मांडावा.
<<< पुन्हा तेच. ज्याला तुम्ही हलकेपणा म्हणताय तो ब्लॅक ह्युमर. तो चित्रपट तयार करण्याचा एक प्रकार असतो, त्याला अविष्कारस्वातंत्र्य म्हणतात. शेतकरी ह्या प्रशनाला इतरांनी हातच घालायचा नाही का?
कस्ल्या तोफा न कसला गड..
कस्ल्या तोफा न कसला गड.. येव्हडं उर बडवताय तुम्ही त्याचा काही उपेग आहे का ? म्हणुन म्हटल निदान जरा शब्दसंग्रहात तरी भर पडॅल..
रच्याकने, मुटेसाहेब एरवी एव्हड छान लिहिता आजा का असे डोक्यावर पडल्यासारखे करताय? रागावु नका आणी शब्दशः घेउ नका..
मी एकंदरीत चित्रपट चांगला की
मी एकंदरीत चित्रपट चांगला की वाईट असे म्हटलेच नाही. >>> अहो ते म्हटलं असतं तरी चाललं असतं. पण तुम्ही स्वतः सिनेमा न बघता, दुसर्यांना जबरदस्तीने निषेध करा असं म्हणताय ! असं कसं लोकं डोकं गहाण ठेऊन, केवळ तुम्ही म्हणताय म्हणून निषेधासाठी निषेध करतील?
बरं, तुम्हाला निषेध करायचाय तर करा ना ! कोण नाही म्हणालंय? पण आम्ही असं करायला नकार दिला तर आम्हाला काही जाणिवाच नाहीत हे सिद्ध होतं का?
---
तुमच्या वरच्या एका पोस्ट मधे तुम्ही...
<<<यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की सुसंस्कृत समाज शेतकरी वर्गाकडे किती गांभिर्याने पाहतो.>>> हे वाक्य लिहिलंय. मला वाचता वाचता ते खरंच खटकलं. यात तुम्ही सरळ सरळ इम्प्लाय केलंय की सुसंस्कृत समाज हा शेतकरी वर्गापेक्षा वेगळा आहे. सगळा सुसंस्कृत समाज हा शेतकरी नाही पण शेतकरी वर्ग हा सुसंस्कृत नसतो का? हे असं म्हटल्याबद्दल तुमचा तीव्र निषेध.
साजीरा, मुटे, वरती तुम्ही
साजीरा,
मुटे, वरती तुम्ही 'खेळकरपणानं' हा शब्द बोल्ड केला आहे. त्याचसोबत, त्याच्याचपुढल्या 'उपहासाच्या माध्यमातून दिग्दर्शिकेनं आपल्या बोथट झालेल्या संवेदनेला गदगदून हलविण्याचं काम केलं आहे' या शब्दांना पण बोल्ड करून बघा. शिवाय त्या वाक्यावर जरा विचारही करा.
मी वारंवार शेतकर्यांच्या आत्महत्येची खिल्ली उडाली असे म्हणतोय. इतर अंगाने तो चित्रपट चांगला की वाईट असे कुठेही म्हटलेले नाही.
आणि तुम्ही नेमकी शेतकर्यांच्या आत्महत्येची बाजू सोडून अवांतर बाबीवरच बोलता आहात.
शेतकर्यांच्या आत्महत्येची कितीही खील्ली उडवली तरी उर्वरीत भाग चांगला म्हणुन विषयाचे गांभिर्य कमी होत नाही.
Pages