पीपली लाइव्ह आणि सिंपली सुसाईड.

Submitted by अभय आर्वीकर on 16 August, 2010 - 02:02

पीपली लाइव्ह आणि सिंपली सुसाईड.

मी नाही पाहीला हा चित्रपट. पण बातम्यावरून लक्षात येतंय की शेतकरी अनुदानाच्या लोभापायी आत्महत्या करतो, असा आभास त्या चित्रपटात निर्माण करण्यात आलेला आहे.
तसेही शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात, वेडसर असतात म्हणुन आत्महत्या करतात, आळशी असतात म्हणुन आत्महत्या करतात आणि अशिक्षित असतात म्हणुन आत्महत्या करतात वगैरे-वगैरे अक्कलेचे तारे यापुर्वीच विचारवंतानी तोडलेच आहे,(संदर्भ; 'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे') त्यात पुन्हा एका नव्या विचारवंताची भर पडली म्हणायची.
शेतकर्‍याच्या आत्महत्यांची कारणे शोधली जात नाहीत, उपाययोजना केल्या जात नाहीत आणि प्रामाणिक प्रयत्नही केले जात नाहीत.
याउट त्यांच्या जखमांवर मीठ चोळून विकृत चित्र उभे केले जाते. आणि त्याचा निषेध व्यक्त करण्याची साधी गरजही सामान्य माणसाला भासत नाही, काय म्हणावे याला?
ज्या सुसंस्कृत समाजाकडून त्याने न्यायाची अपेक्षा करावी तोच समाज जर असा विकृतीने पिडलेला आहे, हे जर त्याच्या लक्षात आले आणि तशी खात्री झाली तर मग तो न्यायासाठी स्वत:चे मार्ग स्वत:च शोधेल आणि अशा सुशिक्षित-सुसंस्कृत समाजाच्या विकृत विचारांपेक्षा असभ्य रानटी मावो/नक्षलवांद्यासारख्यांची सहानुभुती त्याला जवळची वाटली तर.......????????
तर त्याचे काही चुकते हे मी तरी त्याला कसे समजावणार.....?????????????????????
शेतकर्‍याला मुख्य प्रवाहापासून दुर फ़ेकून द्यायचे नसेल तर....
हे भारतियांनो त्या पीपली लाइव्हचा निषेध करा.
अगदी जमेल त्या मार्गाने... जमेल तसा....जमेल त्या पद्धतीने.......!!

गंगाधर मुटे
..................................................................................
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?
..................................................................................
.
.
ता.क- मी चित्रपट पाहीलेला नाही आणि पहावे असे वाटतही नाही. कारण शेतकर्‍यांच्या आत्महत्या विनोदाचा विषय होणे किंवा विनोदी चित्रपटात शेतकर्‍यांच्या आत्महत्येसारखा गंभिर विषय हाताळणे हेच मुळी विकृतीचे लक्षण आहे. हा विषय तीन तासाच्या एका चित्रपटातच काय दहा चित्रपटात सुद्धा आवाक्यात येणार नाही असा विषय एखाद्या चित्रपटात तोंडी लावून चघळण्याइतका किरकोळ वाटावा, ही विचारशैलीच शेतकर्‍यांकडे पाहण्याचा दृष्टीकोण स्पष्ट करून जाते. ’पीपली’ च्या जाहिरातीचा टीव्हीवरील छोटासा संवादच ऐकणे जेथे जड गेले तेथे माझ्यासारख्याला पुर्ण सिनेमा शांतपणे बसून पाहणे शक्य होईल?
.............................................................................................
दुपारी २.२४ वाजता

esakal.com - वरिल http://72.78.249.107/esakal/20100814/5039280691352829503.htm
या लिंकवरील पीपली (लाइव्ह) > आपल्या कोडगेपणाच्या कानाखाली काढलेला आवाज - हा त्या चित्रपटाबद्दल भाष्य करणार्‍या लेखातील काही भाग पहा.....

.
दिग्दर्शिकेनं इथं मुख्य प्रदेश नावाच्या भारताच्या काल्पनिक राज्यातला एक गरीब शेतकरी नथ्था (ओंकारदास माणिकपुरी) कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याची घोषणा करतो, या "थीम'भोवती सगळी कथा मांडली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खरोखर गेल्या काही वर्षांत या देशाला लागलेला कलंक आहे. मात्र, याच विषयाकडं खेळकरपणानं पाहत, उपहासाच्या माध्यमातून दिग्दर्शिकेनं आपल्या बोथट झालेल्या संवेदनेला गदगदून हलविण्याचं काम केलं आहे. नथ्था आणि त्याचा मोठा भाऊ बुधिया (रघुवीर यादव) कर्जमाफीसाठी त्यांच्या भागातल्या पुढाऱ्याकडं जातात. तेव्हा तो त्यांची थट्टा करून आत्महत्या करण्याचा सल्ला देतो. मात्र, त्याच्या या तिरकस सल्ल्यानंतर नथ्था व बुधिया खरोखर आत्महत्या करण्याचा विचार करू लागतात.
.

१) असा घोषणा करून शेतकरी आत्महत्या करीत असतो? हे विकृत विचार नाही?
२) शेतकरी आत्महत्येकडे खेळकरपणाने पाहात? या वाक्यात आणी "बलात्कार होत असतांना मी खेळकरपणाने पाहत होतो" या वाक्यात मला फ़ारसा फ़रक आढळत नाही.
काय करावे या खेळकरपणाचे?
३) शेतकरी कर्जमाफ़ीसाठी कुणापुढे हात पसरतात? या उलट १० रुपये मुद्दल रक्कमेचे व्याजासहित ५०० रू फ़ेडता-फ़ेडता पिढ्या बरबाद झाल्या.
यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की हा समाज शेतकरी वर्गाकडे किती गांभिर्याने पाहतो.

त्याच्या आत्महत्येवर निट अभ्यास करता येत नसेल तर नका करू पण असा विकृतीपुर्ण विपर्यास का करता?
..
याला विकृत विचार म्हणणे पटत नसेल तर नेमके विकृत विचार कशाला म्हणायचे, हे जरा मला समजून सांगावे. माझ्या मनाचे दरवाजे सताड उघडे आहे.
............................................................
सायं ६,०० वाजता वाढवलेली पोष्ट.

काल आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवांनी आमीरच्या पोष्टरची "होळी केली"

बातमी....

स्वतंत्रता दिवस के दिन रविवार को जहां एक ओर पूरा देश आजादी का पर्व मनाने में व्यस्त था तो दूसरी ओर महाराष्ट्र में पांच हजार विधवाएं आमिर खान की पीपली लाइव के पोस्टर जला रही थीं। विदर्भ जन आंदोलन समिति के बैनर के तले नागपुर से 150 किलोमीटर दूर यवतमाल जिले में जुटीं इन विधवाओं की बस एक ही मांग थी कि आमिर खान उनसे माफी मांगे और सरकार फिल्म पर प्रतिबंध लगाए।

कहते हैं कि आमिर की नई फिल्म के कारण विदर्भ के किसान और और हजारों विधवाएं गुस्से में हैं। क्योंकि इस फिल्म में दिखाया गया है कि किसान मुआवजे के लालच में आत्महत्या करते हैं। तिवारी कहते हैं कि आमिर खान को किसानों के मुद्दे से कोई मतलब नहीं है। वे बस अवार्ड जीतने के लिए फिल्म बनाते हैं।

आमिर खान की पीपली लाइव रिलीज होने से पहले से ही विवादों में रही है। महाराष्ट्र के किसानों ने इस फिल्म को प्रतिबंध लगाने के साथ सेंसर बोर्ड से सर्टिफिकेट वापस लेने की मांग की है।

दस साल में मर चुके हैं दो लाख किसान

एक दशक में देश में दो लाख किसानों ने आत्महत्या की है। इसमें विदर्भ क्षेत्र में चालीस हजार किसान शामिल है। लेकिन आज तक विधवाओं को अपने पति की मौत का मुआवजा नहीं मिला है। इलाके के किसानों का कहना है कि पीपली लाइव के कारण उन 1.60 लाख विधवाओं के सामने मुआवजे का संकट आ खड़ा हो गया है जिनके पतियों ने सरकार की गलत नीतियों के कारण आत्महत्या की थी। यह फिल्म राजनेता, अधिकारियों की सोच का समर्थन करती है। (दै.भास्कर मधिल संपादित बातमी)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निधपाजी,

शहरातला माणूस हा कायमच वाईट असतो. असे मी कधिही म्हटले नाही.
गरज पडली तर बिगरशेतकरी असे म्हटले असेल.

शहरातला माणूस आणि खेड्यातला माणुस असा फरक मी करीत नाही.

शेतकरी कसा जगतो यापेक्षा शेतकर्‍याला समाजात काय दर्जा आहे हे महत्वाचे. >>> आता हे काय नविन झेंगट???

शेतकरी आत्महत्या करतात ते काय समाजात दर्जा नाही म्हणून? Uhoh
त्याला जगणं कठीण जातं म्हणून तो आत्महत्या करतो असं मी समजत होते आतापर्यंत व अजूनही तेच समजेन. माझ्या दृष्टीने शेतकरी किंवा कुणीही माणूस कसा जगतो हेच महत्वाचे. समाजात दर्जा असणं म्हणजे तो सुसंस्कृत असणं असं अज्जिबात नाहिये. एखादं फाटकी वस्त्रे ल्यायलेलं, १वेळचंच अन्न मिळू शकणारं कुटुंबपण सुसंस्कृत असतं.

जाऊद्या हो ! तुम्ही भंजाळला आहात आणि बाकिच्यांना पण भंजाळवताय.

थेटरातली पोस्टरं मनसे ने जाळ्ळी ना?

>> त्याची कारणे वेगळी आहेत, मराठी सिनेमे मल्तिप्लेक्स मधे लावा म्हणुन जाळली, आमीरच्या सिनेमाशी काही संबंध असेल असे वाटत नाही.

शेतकरी समाज पण सुसंस्कृत समाजाचा भाग आहे ....!

अख्या आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला/वाचला मी हा शब्द.

दर्जा दिल्याबद्दल आभारी आहे.

मुटेजी,
शेतकरी सुसंस्कृत समाजाचा भाग नाही असे म्हणणारे लोकही आहेत हे मला आज कळते आहे. माझ्या माहिती प्रमाणे देशाच्या भुकेची काळजी करणार्‍या शेतकर्‍याला आपण म्हणत असलेल्या लोकांनी/राज्यकर्त्यानी खिशातले पैसे दिले नाहीत हे जरी सत्य असले तरी मनातून धन्यवाद नक्कीच दिले असतील असे मला वाटते.

दर्जा देणे हा काय प्रकार आहे?
शेतकर्‍याला खालच्या दर्जाचा म्हणलेले तुम्ही वाचले/एकले असताना तुम्ही गप्प कसे बसलात? कानफाड फोडायचं ना साल्याचं. तुम्हाला जमत नसेल तर तसा उल्लेख असणारे साहित्य मला सांगा. जाऊन धोपटले नाहीत तर आयुष्याभर लेखनी हातात घेणार नाही.

कुणी आहे का रे शेतकर्‍याला खालच्या दर्जाचा म्हणणारा? किंवा त्याचा दर्जा ठरवण्याचा दिडशहाणपणा करणारा?

तुम्ही भंजाळला आहात आणि बाकिच्यांना पण भंजाळवताय.<<
केश्वीला सुद्धा इतकं सडेतोड बोलायची गरज पडली तेव्हा तुम्ही किती हास्यास्पद झालायत ते समजून जा!!

शेतकरी कसा जगतो यापेक्षा शेतकर्‍याला समाजात काय दर्जा आहे हे महत्वाचे.
>> दुसर्‍याच्या विचारांवरून तुम्ही स्वतःची किम्मत ठरवता? Uhoh

जाऊद्या हो ! तुम्ही भंजाळला आहात आणि बाकिच्यांना पण भंजाळवताय.

>> खरय, धान्यापासुन मद्यनिर्मितीचा कारखाना त्यांच्या गावात सुरु झालेला असावा. तसाही त्यांचा मद्यनिर्मितीला पाठिंबा होताच.

त्याची कारणे वेगळी आहेत, मराठी सिनेमे मल्तिप्लेक्स मधे लावा म्हणुन जाळली, आमीरच्या सिनेमाशी काही संबंध असेल असे वाटत नाही. >> absolutely हेच कारण आहे, पण मुटेंचा काहीतरी गैरसमज झालाय, त्यांना वाटतंय की चित्रपटाच्या विषयासाठी पोस्टरं जाळ्ळी... तुमची पोस्ट वाचून आशा आहे की त्यांचा गैरसमज दूर होईल.

थेटरातली पोस्टरं मनसे ने जाळ्ळी ना?

यवतमाळ जिल्ह्यात काल शेतकर्‍यांनी आंदोलन करून आमीरच्या पोष्टरची होळी केली, त्याबद्दल बोललो मी.
काल टीव्ही न्युज चॅनलवर बातम्या पण होत्या.

५ तासाच्या आत १०० पूर्ण . कोणी नाही तर आमिर खान तर नक्कि खुश होइल या चर्चेने . कमीत कमी ५-१० लोक (Including me) तरी न बघणारे बघतील सिनेमा यामुळे . Happy

यवतमाळ जिल्ह्यात काल शेतकर्‍यांनी आंदोलन करून आमीरच्या पोष्टरची होळी केली, त्याबद्दल बोललो मी. >> त्यावर एखादा लेख किंवा आलेली बातमी त्याचा दुवा देऊ शकाल का इथे? मला तर उगिचंच 'अनुकरणाची' शंका येते आहे.

मुटेसाहेब, तुम्ही जो सगळ्यांवर सरसकट आरोप करताय की शेतकर्‍यांबद्दल कुणालाच काहीही फिकिर नाहिये त्याने खरंतर सगळे हर्ट झालेत. आणि हा निष्कर्श तुम्ही फक्त कुणीही त्या सिनेमाचा निषेध केला नाही यावरुन काढलाय, हे तर फारच बेजबाबदार आहे.

अहो शेतकर्‍याने पिकवलं नाही तर आम्ही खाणार काय?

तुम्हाला शेतकर्‍यांसाठी इथल्या लोकांकडून काही करुन हवंच असेल तर वांझोटा निषेध करवून घेण्यापेक्षा प्रॅक्टीकली काहीतरी करा की. इथल्या लोकांना काहीतरी त्यांच्यापरीने शेतकर्‍यांकरता आलं तर मी गॅरेंटी देते की मायबोलीकर जेवढं शक्य असेल तेवढं, योग्य असेल तेवढं आणि योग्य असेल तिथे नक्कीच योगदान देतील.

सिनेमाचा नाद सोडा प्लिज.

बरोबर आहे मुटे साहेब तुमचं.
काल यवतमाळात आंदोलन झालं व आंदोलन करणारे शेतकरी होते.
त्यानी सिनेमा बघुनच आंदोलन केलय.

त्या आंदोलनाचा मुख्य मुद्दा हाच होता कि या सिनेम्यात शेतक-याची बाजु चुकिच्या पद्दतिने मांडण्यात आली.

आधी हा नत्था पैशासाठी आत्महत्या करणार असल्याचा आव आणल्या जातो.
नंतर नत्था आत्महत्या करित नाही, तो पळून जातो व दिल्लीला काम करु लागतो.

शेवटी गावात आग लागते व तो रेपोर्टर मरतो.

एकंदरित काय दाखवायचं होतं.

ईथे शेतक-याला काय उगीच कशाला पुढे करण्यात आलं.

एक तुच्छ सिनेमा.

शेतक-यांचा अपमान करणारा सिनेमा.

निषेध.

अश्विनी के,

मी असे काय म्हटले की एवढा गदारोळ व्हावा?

त्या सिनेमामुळे जर आम्हाला आमच्या भावना दुखावल्या असे वाटत असेल तर काय आम्ही काय निषेधही नोंदवू नये?

आमच्या भावना दुखावल्या की नाही हेही इतरांनीच ठरवायचे काय?

माझ्यावर एवढं तुटून पडावं एवढा मोठा अपराध केलाय का मी?

शेतकर्‍यांनाही काही भावना असतात हे समजून घेणे एवढे जड जावे?

येथे बघा काल आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवांनी आमीरच्या पोष्टरची "होळी केली"

http://thatshindi.oneindia.in/movies/bollywood/news/2010/08/1281738571.html
http://www.bhaskar.com/article/pipali-live-amir-khan-film-1262723.html?HF=

मी असे काय म्हटले की एवढा गदारोळ व्हावा?<<
>>>>ता.क- मी चित्रपट पाहीलेला नाही आणि पहावे असे वाटतही नाही.<<

हे पुरेसं आहे गोंधळ होण्यासाठी

मधूकर तु पाहिला आहेस का रे हा सिनेमा.

असं असेल तर उलट एका अर्थी आमिरखान ने मग चांगलंच काम केलं म्हणायचं. निदान त्याने जनजागृती तरी होईल मग, करा आंदोलनं... पण सिनेमे बंद पाडण्यासाठी नको फक्त, आपले हक्क मिळवण्यासाठी आणि सेल्फ एस्टिमसाठी..

त्या सिनेमामुळे जर आम्हाला आमच्या भावना दुखावल्या असे वाटत असेल तर काय आम्ही काय निषेधही नोंदवू नये? >>> नक्कीच नोंदवा Happy

मी असे काय म्हटले की एवढा गदारोळ व्हावा? >>> तुम्ही आम्हाला शेतकर्‍यांची काहीच फिकिर नाही या अर्थाचं बोलून आमच्या भावना दुखावला.

येथे बघा काल आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवांनी आमीरच्या पोष्टरची "होळी केली">>> खरंतर या शेतकर्‍यांच्या प्रॉब्लेमवर सरकारशीच बोलणी व्हायला हवीत. कुठलाही सिनेमा त्या विधवांचं भवितव्य उद्ध्वस्त किंवा उज्ज्वल करु शकत नाही त्यामुळे हे होळी वगैरे करणं हे निरर्थक वाटतं मला. अर्थात हे माझं मत Happy होळी करुन आत्महत्या थांबणार आहेत का?

शेतकर्‍यांनाही काही भावना असतात हे समजून घेणे एवढे जड जावे? >>> अज्जिबात जड नाहिये समजून घेणं. वर्तमानपत्रात या घटना वाचून इथे दूर रहाणार्‍या आम्हालाही दु:खच होतं (किती होतं ते तुम्हाला मी सांगायची गरज नाही.) पण सिनेमाचा निषेध करणे म्हणजेच शेतकर्‍यांच्या भावना समजून घेणे हे समिकरण मला मान्य नाही.

माझ्या घरात ४ कुंड्यांमधे मी मक्याचा चारा लावला आहे तो काय मी स्वतः खाते? त्याचं मी काय करते हा या बाफचा विषय नाहिये. माझ्या कित्येक मैत्रिणी/सहकारी घरात गांडूळ खत बनवताहेत ते काही घरातली १ तुळस डवरण्यासाठी नाही. त्याचं ते काय करतात हा या बाफचा विषय नाही. परंतु ह्या दोन्ही गोष्टी शेतकर्‍यांशीच निगडीत आहेत हे नक्की.

असो....

मधुकरराव
कालच विदर्भात आंदोलन झालं व आंदोलन करणारे शेतकरी होते.आमिर खानचे पोस्टर्स जाळण्यात आले, अशा आशयाची पोष्ट याच बाफच्या पहिल्या पानावर (नं -७ ) आली आहे.

पण
किती जणांनी हा चित्रपट पाहिलाय व पाहिलेल्यातील कितींना हा कळला असावा अशी त्यांना शंका वाटते..

खरंतर या शेतकर्‍यांच्या प्रॉब्लेमवर सरकारशीच बोलणी व्हायला हवीत. कुठलाही सिनेमा त्या विधवांचं भवितव्य उद्ध्वस्त किंवा उज्ज्वल करु शकत नाही त्यामुळे हे होळी वगैरे करणं हे निरर्थक वाटतं मला. अर्थात हे माझं मत होळी करुन आत्महत्या थांबणार आहेत का? >> अश्वे अनुमोदन १००% अतिशय बॅलन्स्ड लिहिलं आहेस. सिनेमे काढुन ना कल्याण होणार ना नुकसान.

मी चित्रपट पाहीलेला नाही आणि पहावे असे वाटतही नाही.
हे पुरेसं आहे गोंधळ होण्यासाठी

सच्चा शेतकरी निष्कारण कधीही कोणतेही आंदोलन करीत नाही. माझा त्यावर विश्वास आहे.
त्यामुळे कालचे शेतकरी आणि विधवा शेतकरी महिलांचा आंदोलनातील सहभाग हा महत्वाचा आहे.

आता मधुकरराव यांनीही पुष्टी केली.

आता तुमचा गोंधळ दुर व्हायला हरकत नाही. Happy

Pages