पीपली लाइव्ह आणि सिंपली सुसाईड.

Submitted by अभय आर्वीकर on 16 August, 2010 - 02:02

पीपली लाइव्ह आणि सिंपली सुसाईड.

मी नाही पाहीला हा चित्रपट. पण बातम्यावरून लक्षात येतंय की शेतकरी अनुदानाच्या लोभापायी आत्महत्या करतो, असा आभास त्या चित्रपटात निर्माण करण्यात आलेला आहे.
तसेही शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात, वेडसर असतात म्हणुन आत्महत्या करतात, आळशी असतात म्हणुन आत्महत्या करतात आणि अशिक्षित असतात म्हणुन आत्महत्या करतात वगैरे-वगैरे अक्कलेचे तारे यापुर्वीच विचारवंतानी तोडलेच आहे,(संदर्भ; 'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे') त्यात पुन्हा एका नव्या विचारवंताची भर पडली म्हणायची.
शेतकर्‍याच्या आत्महत्यांची कारणे शोधली जात नाहीत, उपाययोजना केल्या जात नाहीत आणि प्रामाणिक प्रयत्नही केले जात नाहीत.
याउट त्यांच्या जखमांवर मीठ चोळून विकृत चित्र उभे केले जाते. आणि त्याचा निषेध व्यक्त करण्याची साधी गरजही सामान्य माणसाला भासत नाही, काय म्हणावे याला?
ज्या सुसंस्कृत समाजाकडून त्याने न्यायाची अपेक्षा करावी तोच समाज जर असा विकृतीने पिडलेला आहे, हे जर त्याच्या लक्षात आले आणि तशी खात्री झाली तर मग तो न्यायासाठी स्वत:चे मार्ग स्वत:च शोधेल आणि अशा सुशिक्षित-सुसंस्कृत समाजाच्या विकृत विचारांपेक्षा असभ्य रानटी मावो/नक्षलवांद्यासारख्यांची सहानुभुती त्याला जवळची वाटली तर.......????????
तर त्याचे काही चुकते हे मी तरी त्याला कसे समजावणार.....?????????????????????
शेतकर्‍याला मुख्य प्रवाहापासून दुर फ़ेकून द्यायचे नसेल तर....
हे भारतियांनो त्या पीपली लाइव्हचा निषेध करा.
अगदी जमेल त्या मार्गाने... जमेल तसा....जमेल त्या पद्धतीने.......!!

गंगाधर मुटे
..................................................................................
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?
..................................................................................
.
.
ता.क- मी चित्रपट पाहीलेला नाही आणि पहावे असे वाटतही नाही. कारण शेतकर्‍यांच्या आत्महत्या विनोदाचा विषय होणे किंवा विनोदी चित्रपटात शेतकर्‍यांच्या आत्महत्येसारखा गंभिर विषय हाताळणे हेच मुळी विकृतीचे लक्षण आहे. हा विषय तीन तासाच्या एका चित्रपटातच काय दहा चित्रपटात सुद्धा आवाक्यात येणार नाही असा विषय एखाद्या चित्रपटात तोंडी लावून चघळण्याइतका किरकोळ वाटावा, ही विचारशैलीच शेतकर्‍यांकडे पाहण्याचा दृष्टीकोण स्पष्ट करून जाते. ’पीपली’ च्या जाहिरातीचा टीव्हीवरील छोटासा संवादच ऐकणे जेथे जड गेले तेथे माझ्यासारख्याला पुर्ण सिनेमा शांतपणे बसून पाहणे शक्य होईल?
.............................................................................................
दुपारी २.२४ वाजता

esakal.com - वरिल http://72.78.249.107/esakal/20100814/5039280691352829503.htm
या लिंकवरील पीपली (लाइव्ह) > आपल्या कोडगेपणाच्या कानाखाली काढलेला आवाज - हा त्या चित्रपटाबद्दल भाष्य करणार्‍या लेखातील काही भाग पहा.....

.
दिग्दर्शिकेनं इथं मुख्य प्रदेश नावाच्या भारताच्या काल्पनिक राज्यातला एक गरीब शेतकरी नथ्था (ओंकारदास माणिकपुरी) कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याची घोषणा करतो, या "थीम'भोवती सगळी कथा मांडली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खरोखर गेल्या काही वर्षांत या देशाला लागलेला कलंक आहे. मात्र, याच विषयाकडं खेळकरपणानं पाहत, उपहासाच्या माध्यमातून दिग्दर्शिकेनं आपल्या बोथट झालेल्या संवेदनेला गदगदून हलविण्याचं काम केलं आहे. नथ्था आणि त्याचा मोठा भाऊ बुधिया (रघुवीर यादव) कर्जमाफीसाठी त्यांच्या भागातल्या पुढाऱ्याकडं जातात. तेव्हा तो त्यांची थट्टा करून आत्महत्या करण्याचा सल्ला देतो. मात्र, त्याच्या या तिरकस सल्ल्यानंतर नथ्था व बुधिया खरोखर आत्महत्या करण्याचा विचार करू लागतात.
.

१) असा घोषणा करून शेतकरी आत्महत्या करीत असतो? हे विकृत विचार नाही?
२) शेतकरी आत्महत्येकडे खेळकरपणाने पाहात? या वाक्यात आणी "बलात्कार होत असतांना मी खेळकरपणाने पाहत होतो" या वाक्यात मला फ़ारसा फ़रक आढळत नाही.
काय करावे या खेळकरपणाचे?
३) शेतकरी कर्जमाफ़ीसाठी कुणापुढे हात पसरतात? या उलट १० रुपये मुद्दल रक्कमेचे व्याजासहित ५०० रू फ़ेडता-फ़ेडता पिढ्या बरबाद झाल्या.
यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की हा समाज शेतकरी वर्गाकडे किती गांभिर्याने पाहतो.

त्याच्या आत्महत्येवर निट अभ्यास करता येत नसेल तर नका करू पण असा विकृतीपुर्ण विपर्यास का करता?
..
याला विकृत विचार म्हणणे पटत नसेल तर नेमके विकृत विचार कशाला म्हणायचे, हे जरा मला समजून सांगावे. माझ्या मनाचे दरवाजे सताड उघडे आहे.
............................................................
सायं ६,०० वाजता वाढवलेली पोष्ट.

काल आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवांनी आमीरच्या पोष्टरची "होळी केली"

बातमी....

स्वतंत्रता दिवस के दिन रविवार को जहां एक ओर पूरा देश आजादी का पर्व मनाने में व्यस्त था तो दूसरी ओर महाराष्ट्र में पांच हजार विधवाएं आमिर खान की पीपली लाइव के पोस्टर जला रही थीं। विदर्भ जन आंदोलन समिति के बैनर के तले नागपुर से 150 किलोमीटर दूर यवतमाल जिले में जुटीं इन विधवाओं की बस एक ही मांग थी कि आमिर खान उनसे माफी मांगे और सरकार फिल्म पर प्रतिबंध लगाए।

कहते हैं कि आमिर की नई फिल्म के कारण विदर्भ के किसान और और हजारों विधवाएं गुस्से में हैं। क्योंकि इस फिल्म में दिखाया गया है कि किसान मुआवजे के लालच में आत्महत्या करते हैं। तिवारी कहते हैं कि आमिर खान को किसानों के मुद्दे से कोई मतलब नहीं है। वे बस अवार्ड जीतने के लिए फिल्म बनाते हैं।

आमिर खान की पीपली लाइव रिलीज होने से पहले से ही विवादों में रही है। महाराष्ट्र के किसानों ने इस फिल्म को प्रतिबंध लगाने के साथ सेंसर बोर्ड से सर्टिफिकेट वापस लेने की मांग की है।

दस साल में मर चुके हैं दो लाख किसान

एक दशक में देश में दो लाख किसानों ने आत्महत्या की है। इसमें विदर्भ क्षेत्र में चालीस हजार किसान शामिल है। लेकिन आज तक विधवाओं को अपने पति की मौत का मुआवजा नहीं मिला है। इलाके के किसानों का कहना है कि पीपली लाइव के कारण उन 1.60 लाख विधवाओं के सामने मुआवजे का संकट आ खड़ा हो गया है जिनके पतियों ने सरकार की गलत नीतियों के कारण आत्महत्या की थी। यह फिल्म राजनेता, अधिकारियों की सोच का समर्थन करती है। (दै.भास्कर मधिल संपादित बातमी)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पीपली या शब्दाचा अर्थ काय आहे? मला फक्त पीपल म्हणज लोक आणि पिपल म्हणजे पिंपळ असे दोनच अर्थ माहिती आहेत.

काल हा सिनेमा पहायला जाणार होतो पण जाऊ शकलो नाही म्हणून हा बाफ वाचला.

मुटेंच्या चिकाटीचे (अनावश्यक) प्रचंड कवतिक वाटले.

मुटे यांनी स्वतःबद्दल असे लिहीले आहे. (गरजूंनी त्यांचे "अवलोकन'' करावे)

"पोरकटपणा आवडतो.सभ्य व्हायची भीती वाटते.
सदगृहस्थ व्हायची इच्छा आहे."

तेंव्हा त्यांचे हे सर्व लेखन त्यांचा पोरकटपणा समजून सोडून द्यावे ही विनंति Wink Wink

मित्रहो, मुटे हे आपल्या आधीच्या पिढीतले आहे. त्यांचे विचार वेगळे असू शकतात. इथे झक्कींचे विचार अमेरिकेत राहुनही कधीकधी किती वेगळे वाटतातचं ना! उदा. द्यायचे झाले तर पुल विनोदी लिहितात हे आपण कितीही म्हणालो तरी हल्लीच्या मुलांना पुलंचा विनोद फार उच्च कोटोचा किंवा तो विनोदचं आहे असे वाटतं नाही.

आणि मला असेही वाटतं नाही की हल्ली चित्रपटावर प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्हाला तो चित्रपट बघायलाचं हवा. अन्य माध्यमांद्वारे पट कळू शकतो! मी तरी झीवरच्या मालिकांचे आजची उद्याचे भाग कुठल्या तरी एका संकेतस्थळावर जाऊन वाचायचो. वाचू आनंदेच्या बाफवर एखादे पुस्तकं न वाचताचं त्यावर प्रतिक्रिया देणारे आहेत.. पार्ल्यावर पण आहे.. ते बरं चालतं Sad

बी असं कसं ? Uhoh
इतरांच्या मतांवर आपलं मत बेतवणार्‍यांना काय म्हणतात ते मला नाही माहीत पण
सिनेमा किंवा पुस्तक हे स्वत: पाहिल्या/वाचल्याशिवाय मतप्रदर्शन म्हणजे निव्वळ मुर्खपणा वाटतो मला. पुस्तक न वाचता त्यावर प्रतिक्रिया देणारे (अति)शहाणे लोक अस्तित्वात असतीलंही. पण म्हणून ते समर्थनिय ठरतात का? Uhoh
ऐतेन... Sad

बी पीपली हे गावाचं नाव आहे. त्याचा people शी काहीही संबंध नाही. गावात पिंपळ जास्त असतील म्हणून पीपली नाव ठेवलं असेल तर पिंपळाशी संबंध आहे.

आणि मला असेही वाटतं नाही की हल्ली चित्रपटावर प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्हाला तो चित्रपट बघायलाचं हवा. अन्य माध्यमांद्वारे पट कळू शकतो! >> पण असे निष्कर्ष काढायचे असतील तर पहायलाच हवा बाबा.

मुटे हे आपल्या आधीच्या पिढीतले आहे. त्यांचे विचार वेगळे असू शकतात. >> यावर कुणाचंच दुमत नाही.

एबाबा Lol तुम्ही अगदी खरं बोल्लात.

अरे पाहिला का मुटे साहेबांनी सिनेमा?
आता पिपली लाईव आणि सिंपली सुसाईड असा फार्सं काढू शकतो इतकं मटरेल झालय इथे. कोणी तरी लावा रे त्या आमिर खान ला फोन. डायरेक्टर्स कट डि वि डि मध्ये टाकता येइल हा फार्सं. Proud

मुटे,

ब्लॅक कॉमेडी बद्दल थोडे इथे सापडेल.
http://en.wikipedia.org/wiki/Black_comedy

जाने भी दो यारो (पाहिला असेल तर) या जॉनर मधला चित्रपट आहे.

मी पुन्हा एकदा लिहितोय की आमिर खान सारखा व्यक्ती त्याच्या प्रसिद्धीचा उपयोग एक तुमच्या/आमच्यासाठी संवेदनाशील असा विषय लोकांसमोर आणण्यासाठी करतोय. (मी आधीही एकदा लिहिल्याप्रमाणे पैसा/प्रसिद्धी साठी करायचे असेल तर त्याला दुसरे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, हा विषय घ्यायची त्याला काहीही गरज नाही.) त्याला या प्रयत्नात सहाय्य करण्याऐवजी जर असे निषेध / जाळपोळ होणार असेल तर उद्या असे लोक सामाजिक प्रश्नाला हात घालायला कचरतील. ज्यांच्यासाठी काही करायला जावे तेच उद्या असे विरोधात जाणार असतील तर कोणी कशाला वेगळे विषय निवडतील?

मायबोलीवरील एका विशिष्ट व्यक्तीने जर हा बाफ बनवला असता तर मला त्याचे विशेष आश्चर्य वाटले नसते कारण त्याची प्रवृत्तीच आततायी/विध्वंसक आहे. पण तुमच्या सारख्या विधायक/संयमित विचाराच्या व्यक्तीने असे लिहावे याचे मला राहुन राहुन आश्चर्य वाटते.
असो.

सहा पाने भरभरून झाल्यावर black comedy काय असते हा प्रश्न विचारायचे सुचले हे वाचून बरे वाटले. अजून सहा पाने झाली कि मुव्ही बघून मत मांडायला हवे होते हे ही लक्षात येईल कदाचित. Happy

मायबोलीवरील एका विशिष्ट व्यक्तीने जर हा बाफ बनवला असता तर मला त्याचे विशेष आश्चर्य वाटले नसते कारण त्याची प्रवृत्तीच आततायी/विध्वंसक आहे

@मानस,
तुमच्या पोस्ट्ला १००% अनुमोदन. पण वरील वाक्य मात्र उगीचच विषयांतराला चालना देइल.

अरे बास कि आता
मुटे झालेत आड्मुठे
तेव्हा ते १० तासाच्या विश्रान्तीनन्तर परत यायच्या आधिच या बाफ ला निरोप द्या बघु
ते सिनेमा बघुन आल्यावरच परत नव्या दमानी सुरु करा हव तर
पण आता तरी बाफ ला विश्रान्ती द्या.

कोणी तरी लावा रे त्या आमिर खान ला फोन. डायरेक्टर्स कट डि वि डि मध्ये टाकता येइल हा फार्सं. फिदीफिदी
<<
हो, आमिर सध्या तसेही मराठीचे धडे घेतोय !!
इथे येऊन वाचायला सांगायलाच हवं त्याला, एवढी मोठी चर्चा पाहून झटपट मराठी शिक्षण पूर्ण होईल यात काही शंका नाही Proud

मित्रहो, मुटे हे आपल्या आधीच्या पिढीतले आहे. त्यांचे विचार वेगळे असू शकतात
<<< आमिर पण तसा आधीच्या पिढीतलाच म्हणावा लागेल , पन्नाशी पूर्ण करायला ५ वर्षं राहिली फक्त Proud

मुटे ह्या चर्चेमुळे मी पीपली लाईव्ह आवर्जुन पाहिला. खरोखर चांगला सिनेमा आहे , मिडिया आणि राजकिय पुढार्‍यांची विकृत विचारसरणी आणि गरिब शेतकरी / मजुरांची अवस्था अतिशय परिणामकारक पद्धतीने दाखवलिय .
तुम्ही पण बघा आणि आंधळा निषेध करणार्‍या निदर्शनकर्त्यांनाही दाखवा हा सिनेमा.

१) सटायर आणि ब्लॅक कॉमेडी हा विनोदाचा प्रकार मी नव्यानेच ऐकतो आहे.कुणी अधिक माहिती दिल्यास आभारी राहिन.

कृपया कुणाला माहीती असल्यास अवश्य सांगावे.

२) मी १० तास नव्हतो म्हणजे सिनेमा पहायला गेलो होतो, दुर्दवाने हे खरे नाही.
पण मी नक्की पाहाणार आहे आणि त्यानंतर "सिनेमा" या विषयावर बोलेन. पण बोलेल नक्की.

३) मी जुन्या पिढीचाच नव्हे तर अनेक लोकांपेक्षा संपत्ती, संस्कृती आणि शिक्षण या विषयात क्रित्येक पिढ्या मागे आहे. हे एकदम मान्य. आता कुठे बोलायला लागलोत, अन्यायाचा निषेध नोंदवायला लागलोत तर काही मंडळी मुद्दे सोडून चक्क व्यक्तिगत चेष्टा, शेलके,विषेशने लावून बर्‍यापैकी पाणउतारा होईल, या भाषेत बोलायला लागलीत. स्वत:ला सभ्य समजणारी मंडळी सुद्धा अशी पातळी गाठू शकतात हे मला फ़ार आधीपासून माहीत आहे, म्हणुन मी स्वत:ला सभ्य म्हणवून घेणे कमीपणाचे समजतो.

४) स्वत:ला सभ्य न समजताही सुसंस्कृतपणा,प्रामाणिकपणा जोपासता येतो यावर माझा विश्वास आहे.

५) "शेतकरी आत्महत्या" हा विषय लोक चिल्लरपणे घेतात, हा अनुभवही माझ्यासाठी नविन नाही.
पहा ;- 'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'
तरीही मी व्यक्तिगत चेष्टा, शेलके,विषेशने लावून बर्‍यापैकी कुणी कितीही पाणउतारा केला तरीही लिहितच राहणार आहे.

अहो मुटे साहेब तुम्ही जास्त मनाला लावू नका. तुम्हाला कुठे तरी शेतकर्‍यांबद्दल कळकळ आहे हे तुमच्या लेखणीतुन डोकावते म्हणुन तुमच्या बद्दल मला आदर आहे.

माझ्याकडुन तसेच इतरांकडुन आलेल्या गमतीच्या शब्दांनी तुम्ही दुखावले असल्यास क्षमस्व.

मुटेसाहेब, अहो काय हे ! Sad

मी जुन्या पिढीचाच नव्हे तर अनेक लोकांपेक्षा संपत्ती, संस्कृती आणि शिक्षण या विषयात क्रित्येक पिढ्या मागे आहे. हे एकदम मान्य.>>>> अहो तुम्हाला असं कुणीच म्हटलं नाहिये आणि कुणाचा तो अधिकारही नाहिये. वर कुणी तुम्हाला जुन्या पिढीचा म्हटलं हे नकारात्मक दृष्टीने घेऊ नका. जुनी पिढी आणि नवी पिढी, एवढेच काय, या दोन पिढ्यांच्या अधली मधली पिढी ही स्वतःचा एक दृष्टीकोन बाळगते जो त्यांच्या अनुभवावरुन बनत असतो. जुन्या पिढीचा अनुभव नक्कीच जास्त असतो एखाद्या बाबतीत. तुम्हाला जुन्या पिढीचं म्हणणं म्हणजे शिवी दिल्यासारखं वाटतंय का? Sad असं असेल तर आमचे आईवडिल, सासुसासरे जे जुन्या पिढीतील आहेत त्यांचाही आम्ही अपमान केल्यासारखंच नाही का? तसेच आम्हीही कुठल्यातरी एज ग्रुपसाठी जुन्या पिढीतीलच आहोत. तेव्हा गैरसमज करुन घेऊ नका.

आता कुठे बोलायला लागलोत, अन्यायाचा निषेध नोंदवायला लागलोत >>> Uhoh समाजात अजून एखादं पार्टीशन होऊ घातलंय का? एकीकडे जातींच्या भिंती तुटून पडताहेत (उत्तर प्रदेश, बिहार सोडून) तरीही जसा जातीभेदाच्या नावाने अजून ऊर बडवला जातो, तोही जे खरंच जातीपातीचा विचार आपल्या वागण्यात करत नाहीत त्यांच्यापाशी. तसेच आता शेतकरी व बिगरशेतकरी अशी जात जन्माला येतेय का? केलाच असेल अन्याय तर तो निसर्गाने केलाय ओला/सुका दुष्काळ पाडून, सरकारने केलाय अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी ठोस उपाय न योजून, शिक्षण सर्व पातळीवर न पोहोचवून (तरी आता सगळीकडे शिक्षण कंपल्सरी केलं जातंय, त्यामुळे पुढची पिढी आपापल्या व्यवसायात हुशारीने वागेल, मागच्यांच्या अनुभवावरुन आत्महत्या करण्याची स्वतःवर वेळ येऊ देणार नाही अशी आशा आहे).

त्यामुळे नैसर्गिक आपत्तींशी वैयक्तिक पातळीवर/ सरकारी पातळीवर लढा देणं हे अपरिहार्य आहे. अन्यायाविरुद्ध दाद मागायची, निषेध नोंदवायचा तर तो योग्य ठिकाणी असायला हवा ना? साप समजून भुई धोपटण्यात काय अर्थ आहे? तुम्ही सुशिक्षित आहात व शेतकरीही आहात, तुम्हाला तळमळ आहे असे वाटते तरी आहे. मग तुम्ही स्वतः त्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांशी बोललात का? त्यांना डॉक्युमेंट्सच्या बाबतीत, सल्ल्याच्या बाबतीत, कायद्याच्या बाबतीत, सरकारने देऊ केलेली मदत मिळण्याच्या बाबतीत, मानसिक आधाराच्या बाबतीत काही मदत केली आहे का? तुमच्यासारखे सुशिक्षित लोक जर या सर्व बाबतीत त्यांच्या पाठिशी असतील तर त्यांना न्याय मिळणं जरा सोपं जाईल.

तुम्ही सुशिक्षित असल्याने फक्त भावनेच्या आहारी न जाता, सर्व दृष्टीने विचार करुन लिहिणं अपेक्षित होतं आणि आहे. कारण भावनेचा निचरा झाला की माणसाला आतून बरं वाटतं पण त्याचा परिस्थितीवर मात करण्यासाठी उपयोग होईलच असं नाही. विवेकाने वागणारी व्यक्तीच सर्वांना आपल्याबरोबर घेऊन पुढे जात असते आणि भावनेच्या भरात घेतलेले बरेचसे निर्णय हे व्यावहारिक दृष्ट्या चुकीचे ठरतात हे नेहमी लक्षात ठेवा.

या बाफवर आता काहिही लिहायचं नाही असं ठरवलं होतं पण तुमची वरची पोस्ट वाचून लहान तोंडी मोठा घास घ्यावा लागलाय अनिच्छेने. हे सर्व फक्त मतभिन्नतेमुळेच लिहिलंय, व्यक्तिगत काहीही नाही. तरिही कुठे दुखावलं असेल तर मनापासून क्षमस्व.

<<तुम्ही सुशिक्षित आहात व शेतकरीही आहात, तुम्हाला तळमळ आहे असे वाटते तरी आहे. मग तुम्ही स्वतः त्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांशी बोललात का? त्यांना डॉक्युमेंट्सच्या बाबतीत, सल्ल्याच्या बाबतीत, कायद्याच्या बाबतीत, सरकारने देऊ केलेली मदत मिळण्याच्या बाबतीत, मानसिक आधाराच्या बाबतीत काही मदत केली आहे का?>>

हम्म. म्हणजे मी शेतकर्‍यांसाठी काय केले, याचा इतिहास लीहून तुमच्यासमोर सादर करायला हवा.आत्मस्तुतीचे दोन चार पोवाडे लिहायला हवेत.
मी शेतकर्‍यांसाठी काही केले नसेल, उंटावर बसून पांडित्य पाजळतो आहे,असे तुम्हाला वाटू नये म्हणून मी स्वतःचेच गुणगान करायला हवे काय?

विवेकाने वागणारी व्यक्तीच सर्वांना आपल्याबरोबर घेऊन पुढे जात असते आणि भावनेच्या भरात घेतलेले बरेचसे निर्णय हे व्यावहारिक दृष्ट्या चुकीचे ठरतात हे नेहमी लक्षात ठेवा.

एवढे मला कळत नाही, असे तुमचे प्रामाणिक मत असावे. चला उजळणी झाली.

मुटेजी, मी आत्ताच हा चित्रपट पाहिला आणि मला तरी यात असे काही वाटले नाही की शेतकर्‍यांवर काही कॉमेंट आहे. सगळा भर बाकी जगाच्या प्रतिक्रियेवर आहे. तुम्ही पाहाच.

ईती *****???? शुभम भंवतु!

विचार कधी मरत नसतो, हे मी सांगायला हवे?

तुम्हाला हा चित्रपट का पहायचा नाही याचं ऊत्तर देवू शकाल का ?

मी पाहणार आहे, हे मी याआधिच्या पोष्टीमध्ये लिहिले आहे.

(संपादित पोष्ट)

मुटेसाहेब फक्त त्यांना सोयीस्कर वाटतील अशा प्रश्नांना उत्तर देताहेत

हे खरे आहे. आणि याचे कारणही सरळसोपे आहे. माझा आक्षेप फक्त " शेतकरी आत्महत्येच्या" विकृत सादरीकरणाबद्दल आहे. चित्रपटाच्या अवांतर बाबीबद्दल मी काहीएक बोललेलो नाही.

चित्रपट चांगला की वाईट, याबद्दल बोललेलो नाही.

मी फक्त सुरुवातीपासून या क्षणापर्यंत "एकच मुद्दा" घेवून बसलेलो आहे.
आणि प्रतिसादक नेमका एवढा मुद्दा सोडून बरेच काही लिहित आहे. Happy

Pages