पीपली लाइव्ह आणि सिंपली सुसाईड.

Submitted by अभय आर्वीकर on 16 August, 2010 - 02:02

पीपली लाइव्ह आणि सिंपली सुसाईड.

मी नाही पाहीला हा चित्रपट. पण बातम्यावरून लक्षात येतंय की शेतकरी अनुदानाच्या लोभापायी आत्महत्या करतो, असा आभास त्या चित्रपटात निर्माण करण्यात आलेला आहे.
तसेही शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात, वेडसर असतात म्हणुन आत्महत्या करतात, आळशी असतात म्हणुन आत्महत्या करतात आणि अशिक्षित असतात म्हणुन आत्महत्या करतात वगैरे-वगैरे अक्कलेचे तारे यापुर्वीच विचारवंतानी तोडलेच आहे,(संदर्भ; 'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे') त्यात पुन्हा एका नव्या विचारवंताची भर पडली म्हणायची.
शेतकर्‍याच्या आत्महत्यांची कारणे शोधली जात नाहीत, उपाययोजना केल्या जात नाहीत आणि प्रामाणिक प्रयत्नही केले जात नाहीत.
याउट त्यांच्या जखमांवर मीठ चोळून विकृत चित्र उभे केले जाते. आणि त्याचा निषेध व्यक्त करण्याची साधी गरजही सामान्य माणसाला भासत नाही, काय म्हणावे याला?
ज्या सुसंस्कृत समाजाकडून त्याने न्यायाची अपेक्षा करावी तोच समाज जर असा विकृतीने पिडलेला आहे, हे जर त्याच्या लक्षात आले आणि तशी खात्री झाली तर मग तो न्यायासाठी स्वत:चे मार्ग स्वत:च शोधेल आणि अशा सुशिक्षित-सुसंस्कृत समाजाच्या विकृत विचारांपेक्षा असभ्य रानटी मावो/नक्षलवांद्यासारख्यांची सहानुभुती त्याला जवळची वाटली तर.......????????
तर त्याचे काही चुकते हे मी तरी त्याला कसे समजावणार.....?????????????????????
शेतकर्‍याला मुख्य प्रवाहापासून दुर फ़ेकून द्यायचे नसेल तर....
हे भारतियांनो त्या पीपली लाइव्हचा निषेध करा.
अगदी जमेल त्या मार्गाने... जमेल तसा....जमेल त्या पद्धतीने.......!!

गंगाधर मुटे
..................................................................................
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?
..................................................................................
.
.
ता.क- मी चित्रपट पाहीलेला नाही आणि पहावे असे वाटतही नाही. कारण शेतकर्‍यांच्या आत्महत्या विनोदाचा विषय होणे किंवा विनोदी चित्रपटात शेतकर्‍यांच्या आत्महत्येसारखा गंभिर विषय हाताळणे हेच मुळी विकृतीचे लक्षण आहे. हा विषय तीन तासाच्या एका चित्रपटातच काय दहा चित्रपटात सुद्धा आवाक्यात येणार नाही असा विषय एखाद्या चित्रपटात तोंडी लावून चघळण्याइतका किरकोळ वाटावा, ही विचारशैलीच शेतकर्‍यांकडे पाहण्याचा दृष्टीकोण स्पष्ट करून जाते. ’पीपली’ च्या जाहिरातीचा टीव्हीवरील छोटासा संवादच ऐकणे जेथे जड गेले तेथे माझ्यासारख्याला पुर्ण सिनेमा शांतपणे बसून पाहणे शक्य होईल?
.............................................................................................
दुपारी २.२४ वाजता

esakal.com - वरिल http://72.78.249.107/esakal/20100814/5039280691352829503.htm
या लिंकवरील पीपली (लाइव्ह) > आपल्या कोडगेपणाच्या कानाखाली काढलेला आवाज - हा त्या चित्रपटाबद्दल भाष्य करणार्‍या लेखातील काही भाग पहा.....

.
दिग्दर्शिकेनं इथं मुख्य प्रदेश नावाच्या भारताच्या काल्पनिक राज्यातला एक गरीब शेतकरी नथ्था (ओंकारदास माणिकपुरी) कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याची घोषणा करतो, या "थीम'भोवती सगळी कथा मांडली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खरोखर गेल्या काही वर्षांत या देशाला लागलेला कलंक आहे. मात्र, याच विषयाकडं खेळकरपणानं पाहत, उपहासाच्या माध्यमातून दिग्दर्शिकेनं आपल्या बोथट झालेल्या संवेदनेला गदगदून हलविण्याचं काम केलं आहे. नथ्था आणि त्याचा मोठा भाऊ बुधिया (रघुवीर यादव) कर्जमाफीसाठी त्यांच्या भागातल्या पुढाऱ्याकडं जातात. तेव्हा तो त्यांची थट्टा करून आत्महत्या करण्याचा सल्ला देतो. मात्र, त्याच्या या तिरकस सल्ल्यानंतर नथ्था व बुधिया खरोखर आत्महत्या करण्याचा विचार करू लागतात.
.

१) असा घोषणा करून शेतकरी आत्महत्या करीत असतो? हे विकृत विचार नाही?
२) शेतकरी आत्महत्येकडे खेळकरपणाने पाहात? या वाक्यात आणी "बलात्कार होत असतांना मी खेळकरपणाने पाहत होतो" या वाक्यात मला फ़ारसा फ़रक आढळत नाही.
काय करावे या खेळकरपणाचे?
३) शेतकरी कर्जमाफ़ीसाठी कुणापुढे हात पसरतात? या उलट १० रुपये मुद्दल रक्कमेचे व्याजासहित ५०० रू फ़ेडता-फ़ेडता पिढ्या बरबाद झाल्या.
यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की हा समाज शेतकरी वर्गाकडे किती गांभिर्याने पाहतो.

त्याच्या आत्महत्येवर निट अभ्यास करता येत नसेल तर नका करू पण असा विकृतीपुर्ण विपर्यास का करता?
..
याला विकृत विचार म्हणणे पटत नसेल तर नेमके विकृत विचार कशाला म्हणायचे, हे जरा मला समजून सांगावे. माझ्या मनाचे दरवाजे सताड उघडे आहे.
............................................................
सायं ६,०० वाजता वाढवलेली पोष्ट.

काल आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवांनी आमीरच्या पोष्टरची "होळी केली"

बातमी....

स्वतंत्रता दिवस के दिन रविवार को जहां एक ओर पूरा देश आजादी का पर्व मनाने में व्यस्त था तो दूसरी ओर महाराष्ट्र में पांच हजार विधवाएं आमिर खान की पीपली लाइव के पोस्टर जला रही थीं। विदर्भ जन आंदोलन समिति के बैनर के तले नागपुर से 150 किलोमीटर दूर यवतमाल जिले में जुटीं इन विधवाओं की बस एक ही मांग थी कि आमिर खान उनसे माफी मांगे और सरकार फिल्म पर प्रतिबंध लगाए।

कहते हैं कि आमिर की नई फिल्म के कारण विदर्भ के किसान और और हजारों विधवाएं गुस्से में हैं। क्योंकि इस फिल्म में दिखाया गया है कि किसान मुआवजे के लालच में आत्महत्या करते हैं। तिवारी कहते हैं कि आमिर खान को किसानों के मुद्दे से कोई मतलब नहीं है। वे बस अवार्ड जीतने के लिए फिल्म बनाते हैं।

आमिर खान की पीपली लाइव रिलीज होने से पहले से ही विवादों में रही है। महाराष्ट्र के किसानों ने इस फिल्म को प्रतिबंध लगाने के साथ सेंसर बोर्ड से सर्टिफिकेट वापस लेने की मांग की है।

दस साल में मर चुके हैं दो लाख किसान

एक दशक में देश में दो लाख किसानों ने आत्महत्या की है। इसमें विदर्भ क्षेत्र में चालीस हजार किसान शामिल है। लेकिन आज तक विधवाओं को अपने पति की मौत का मुआवजा नहीं मिला है। इलाके के किसानों का कहना है कि पीपली लाइव के कारण उन 1.60 लाख विधवाओं के सामने मुआवजे का संकट आ खड़ा हो गया है जिनके पतियों ने सरकार की गलत नीतियों के कारण आत्महत्या की थी। यह फिल्म राजनेता, अधिकारियों की सोच का समर्थन करती है। (दै.भास्कर मधिल संपादित बातमी)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरनेटचे आभारच मानयला हवेत.
निदान यामुळे जनमानस समजायला सोपे चालले.
................................................................

<< तुम्ही ना सूर्याची पिल्ले पहा. राष्ट्रासाठी एवढं तरी कराच तुम्ही >>

सुर्याची पिल्ले? सुर्याला पिल्ले असतात?
जयसुर्याची पिल्ले किंवा सुर्याजीची पिल्ले, असे तर तुम्हाला म्हणायचे नाही ना?

असो.
तसे पिल्ले माझ्यासाठी नविन नाहीत.
कुत्र्यामांजराची पिल्ले भाकरीच्या तुकड्यासाठी दरदर भटकतांना मी पाहीलेली आहेत.
पुराच्या पाण्यात वाहत जाणारी उंदराची पिल्लेही पाहीले आहेत.
कुपोषणाने तडफडून मरणारी माणसांची पिल्लेही मी जवळून पाहीली आहेत.

पण हे पाहून काय उपयोग?
समोरच्या खुर्चीवर तंगडी ठेवून, वातानुकुलीत थेटरात बसून भाजलेले शेंगदाने चघळत "सुर्याची पिल्ले" पाहील्याखेरीज राष्ट्रप्रेम जागृत होत नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे, असे मलाही वाटत नाही. पण....
माझ्यासारख्या पामराचे नसीब एवढे बलवत्तर असायला हवे ना?
मी पडलोय ८०० किमी अंतरावर.
कसे घडावे पाप्याला पंढरपूर?

पण एक मार्ग आहे.
आमच्याकडे असे म्हटले जाते की, जे लोक पापी असतात त्यांना काशी-प्रयाग ची तिर्थयात्रा घडत नाही. त्यांनी जे लोक काशीयात्रा करून आले, त्यांचे पाय धूवून तिर्थ प्यावे. असे केले तर त्यांनाही तेवढेच पुण्यप्राप्त होत असते.

हाच प्रयोग आपण येथेही करायला काय हरकत आहे?

मिन्वा, तुम्ही "सुर्याची पिल्ले" पाहीलाच असणार.
मग तुम्ही तुमच्या पदकमलांचे फोटो येथे अपलोड करता काय?
अनंत उपकार होतील माझ्यावर.

हा बीबी बन्द कसा नाही झाला अजुन ?
मुट्यांनी 'पीपली' बघे पर्यंत चालु ठेवणार का हा विषयाशी संबंध नसणार्‍या निरर्थक पोस्ट्स चा बीबी ? Uhoh

परवाच IBN-लोकमतवर याच विषयावर चर्चा झाली. चर्चेत चित्रपट समिक्षक हेमंत देसाई ('बाबूमोशाय' या नावाने लेख लिहतात), चित्रपट निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते गिरिश कुलकर्णी, किशोर कदम व 'विदर्भ जन-आंदोलन समितीचे प्रणेता किशोर तिवारी यांचा सहभाग होता.

या बाफ वर झालेल्या चर्चेप्रमाणेच तिकडे पण चर्चा झाली. हेमंत देसाईंनी चित्रपटाचे समर्थन करित यात शेतकर्‍यांची थट्टा उडविली नाही हा मुद्दा मांडला. किशोर तिवारींनी सांगितले की त्यांचा या चित्रपटाला विरोध नाही तर चित्रपटातील सूत्राला विरोध आहे (अनुदान मिळवण्यासाठी शेतकरी आत्महत्या करण्याचे ठरवतो इ.) व जर यात शेतकरी आत्महत्या इतर कारणांमुळे करतोय असं दाखवलं असतं तर त्यांचा विरोध नसता. गिरिश कुलकर्णींनी चित्रपटाचा हेतू हा शेतकर्‍यांची खिल्ली उडवण्याचा नसून त्याला आत्महत्या करण्यास अथवा त्या विचारापर्यंत जाण्यास कारणीभूत असणार्‍या परिस्थितीची, शासकीय योजनांची, निबर राजकारण्यांची व परिस्थितीचे भान न राखता वखवखल्यासारखं वार्तांकन करणार्‍या पत्रकारांची खिल्ली उडवलीयं. हा ब्लॅक कॉमेडी/सटायर प्रकारातील चित्रपट आहे. त्यांनी ही 'जाने भी दो यारो' या चित्रपटाचे उदाहरण दिलं.

यात वागळेंनी 'आपण पत्रकारांवरील टिका मान्य करतो' असे सांगितले व किशोर तिवारींचे शांततामय पदध्दतीने आंदोलन केल्याबद्दल (दगड न मारता वगैरे) अभिनंदन करून त्यांना चित्रपट परत पाहण्याची विनंती केली.

विरोध करणारे पुन्हा पुन्हा "अनुदान मिळवण्यासाठी शेतकरी आत्महत्या करण्याचे ठरवतो " असे दाखवणे चूक आहे म्हणताहेत, पण शेतकरी आत्महत्या करतो हे जितके विदारक आहे तितकेच, किंबहुना त्यापेक्षा जास्त 'एखाद्या शेतकर्‍याला अनुदानादासाठी आत्महत्या करावीशी वाटली असे दाखवणे' आहे, असे नाही का वाटत? का नाही वाटत?

उद्योजकास वेळोवेळी नाड्ले जाते. फॅक्ट्री इन्स्पेक्टर, लेबर, पीएफ ईसाय वाले, एक्साइज वाले सेल्स्टॅक्स वाले, व्हॅट वाले, इतर सर्व टॅक्स जसे सर्विस, प्रोफेशनल व इन्कम टॅक्स. त्यात काही पैसा गाठीस लागला तर राजकीय पार्ट्या इलेक्षन च्या वेळेस पैसे मागून नेतात. उद्योजक कामातील ताणाने जाड झाला किंवा मेला तरीही कोणी त्यास साहानुभूती दाखवत नाही व त्यांची तशी अपेक्षा ही नसते. कोठूनही अनुदान मिळत नाही. सेटॉफ किंवा क्रेडिट घेण्याची प्रोसीजर इतकी किचकट करून ठेवली आहे कि ज्याचे नाव ते. तरीही ते धडपड्त राहतात कारण सकारात्मक मानसिकता. मी दिलखुलासपणे धड्पड्णारे इतके लोक पाहिलेत कि ते एक स्फूर्तीचा स्त्रोतच आहेत.

शेतकर्‍यांचे प्रश्न मला माहीत आहेत. माझी आजी एकटी पालक व शेतकरीणच होती. आपलेच शेत कसून तिने माझ्या वडिलांना व त्यांच्या भावांना पुण्यात सेट्ल होण्यात मदत केली. ( आजोबा औदुंबर येथे पुरात वाहून गेल्यावर) माझी आई पण शेतीच्या घरातलीच आहे.

ब्लॅक ह्युमर आत्मसात केल्यास जगातील कोणतेच आव्हान, आव्हान वाट्त नाही.

<< किंबहुना त्यापेक्षा जास्त 'एखाद्या शेतकर्‍याला अनुदानादासाठी आत्महत्या करावीशी वाटली असे दाखवणे' आहे, असे नाही का वाटत? का नाही वाटत?>>

अगदीच सोपे उत्तर आहे. ज्या कारणाने तो आत्महत्या करतो, तेच नेमके दाखवायचे नाही.
याउलट अनुदानादासाठी आत्महत्या करत नसूनही नेमके तसे दाखवायचे,
हा प्रकार " आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी" असा प्रकार झाला.

विरोध करणारे पुन्हा पुन्हा "अनुदान मिळवण्यासाठी शेतकरी आत्महत्या करण्याचे ठरवतो " असे दाखवणे चूक आहे म्हणताहेत, पण शेतकरी आत्महत्या करतो हे जितके विदारक आहे तितकेच, किंबहुना त्यापेक्षा जास्त 'एखाद्या शेतकर्‍याला अनुदानादासाठी आत्महत्या करावीशी वाटली असे दाखवणे' आहे, असे नाही का वाटत? का नाही वाटत?

>>> भरतजी , मला ही हा चित्रपट आवडला . पण वरचा मुद्दा नाही पटला .
'एखाद्या शेतकर्‍याला अनुदानादासाठी आत्महत्या करावीशी वाटली असे दाखवणे'हे चूकच आहे अस माझ मत .
जर बाहेर पडणार्या १% लोकानाही तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे वाटत असेल तर तो या चित्रपटाचा पराभव आहे .

कारण हा शेतकर्याच्या लढाऊ व्रुत्तीचा अपमान आहे . जोवर परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जात नाही तोवर तो अस करणे शक्य नाही .
प्रत्यक्षात कुणी शेतकरी अनुदानासाठी आत्महत्या करेल असे वाटत नाही .ज्याने सरकारच्या एवढ्या योजनाचे १२ वाजलेले जिवंतपणी पाहिलेत तो आपण मेल्यावर सरकार आपल्या पोराबाळांना मदत करेल यावर विश्वास कसा ठेवेल ?
वर बाकीचे आत्महत्या का करत नाहित , त्यानेच का केली , तोच भित्रा , कमकुवत (लोभी सुद्धा)असे म्हणणारे ही पुढे येतील .

परत , चित्रपट चांगलाच आहे पण wrong context मधे घेतला जाऊ नये एवढच ...

सुर्याची पिल्ले? सुर्याला पिल्ले असतात? >>>
मिन्वा, तुम्ही "सुर्याची पिल्ले" पाहीलाच असणार.
मग तुम्ही तुमच्या पदकमलांचे फोटो येथे अपलोड करता काय? >>>
Rofl अति झाले, नि हसू आले!

<< बाकीचे आत्महत्या का करत नाहित , त्यानेच का केली , तोच भित्रा , कमकुवत (लोभी सुद्धा)असे म्हणणारे ही पुढे येतील. >>

केदारजी,
पुढे येतील...??? . अहो ते केव्हाच पुढे आलेले आहेत.
आणि अत्यंत दुर्दैवाची बाब अशी की असे मुद्दे उपस्थित करणारे ते सर्व सुसंस्कारीत,उच्चविद्याविभुषित,नामवंत आणि तज्ज्ञ आहेत.

(- 'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे')

त्यामुळे माझा तर सुसंस्कारीत,उच्चविद्याविभुषित,नामवंत आणि तज्ज्ञ या लोकांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला आहे. (हे चुकीचे आहे,असे मला वाटत असूनही)

केदार जाधव्,कौतुकजी,अश्विनिमामी,रंगासेठ .......आणि मुटेजी यांना अनुमोदन !

या सिनेमा बनवणार्‍यांनी शेतकर्‍यासाठी,या बळीराजाच जीवनमान सुधारण्यासाठी ,लाखात झालेल्या,होत असलेल्या आत्महत्या थांबण्यासाठी काही चांगल करता येत नसेल तरी निदान (स्वतःच्या फायद्यासाठी) त्यांचा अपमान किंवा थट्टा (विनोद) तरी करु नये हिच अपेक्षा.

कुठेतरी उल्लेख झाल्याने हा बाफ वाचला.
प्रत्येक गोष्ट अनुभव घेऊन ठरवली जावी असं सहसा होत नाही. विषाची परिक्षा कुणी घेत नाही. भारतात इतक्या भिन्न सामाजिक परिस्थितीत लोक राहतात कि एक दुस-याच्या परिस्थितीबद्दलची संवेदनशीलता दुस-या घटकास असण्याची शक्यता नाही. सेतकरी सहसा आंदोलन करत नाही. तो संघटीतही नाही. सर्वांकडून नाडवला जाणारा तो एक घटक आहे.
सरकारी नोकर संघटीत आहे. व्यापारी संघटीत आहेत ते ही बंद वगैरे करतातच. शेतक-याच्या हाती काहीही नाही. आपल्या मालाचा भाव ठरवण्याचंही स्वातंत्र्य त्याला नाही. अशा परिस्थितीत शेतक-यांच्या आत्महत्येवर विनोद करणारा एखादा सिनेमा येतोय या भावनेनं कुणी अस्वस्थ होत असेल तर मी ते समजू शकतो. त्यात काय आहे हे पाहण्याचं धारिष्ट्य अशा वेळी संबंधितांमधे येईलच असं नाही. पण सिनेमा हे माध्यम ज्यांच्या हाती आहे त्यांनी खरंच अशी चेष्टा केली असेल तर आपल्याला उत्तर देण्यासाठी आपल्या हाती असे प्रभावी माध्यम नाही हा त्रागा त्या प्रतिक्रियांमागे असू शकतो हे लक्षात घ्यायला हवं गंगाधर मुटे यांची प्रतिक्रिया अशा समाजघटकाची प्रतिक्रिया म्हणून पाहीली जायला हवी.

पीपली लाईव्ह मी पाहिलाय. उत्तम सिनेमा आहे. त्यात अशा प्रकारची टिंगल केलेली नाही असं माझं मत आहे. पीपली लाईव्ह मधे सरकारी यंत्रणेची अनास्था आणि ती हलण्याचं सिक्रेट यावर प्रकाशझोत टाकला आहे. या सिनेमाचं कथानक फिक्क वाटावं असा खराखरा सिनेमा टेंभळि या गावात घडल्याचं आठवत असेलच. टेंभली लाईव्ह अशी वार्तांकनेही त्या काळी लोकप्रिय झाली होती. खूप दिवस नाही झाले.

Pages