पीपली लाइव्ह आणि सिंपली सुसाईड.
मी नाही पाहीला हा चित्रपट. पण बातम्यावरून लक्षात येतंय की शेतकरी अनुदानाच्या लोभापायी आत्महत्या करतो, असा आभास त्या चित्रपटात निर्माण करण्यात आलेला आहे.
तसेही शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात, वेडसर असतात म्हणुन आत्महत्या करतात, आळशी असतात म्हणुन आत्महत्या करतात आणि अशिक्षित असतात म्हणुन आत्महत्या करतात वगैरे-वगैरे अक्कलेचे तारे यापुर्वीच विचारवंतानी तोडलेच आहे,(संदर्भ; 'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे') त्यात पुन्हा एका नव्या विचारवंताची भर पडली म्हणायची.
शेतकर्याच्या आत्महत्यांची कारणे शोधली जात नाहीत, उपाययोजना केल्या जात नाहीत आणि प्रामाणिक प्रयत्नही केले जात नाहीत.
याउट त्यांच्या जखमांवर मीठ चोळून विकृत चित्र उभे केले जाते. आणि त्याचा निषेध व्यक्त करण्याची साधी गरजही सामान्य माणसाला भासत नाही, काय म्हणावे याला?
ज्या सुसंस्कृत समाजाकडून त्याने न्यायाची अपेक्षा करावी तोच समाज जर असा विकृतीने पिडलेला आहे, हे जर त्याच्या लक्षात आले आणि तशी खात्री झाली तर मग तो न्यायासाठी स्वत:चे मार्ग स्वत:च शोधेल आणि अशा सुशिक्षित-सुसंस्कृत समाजाच्या विकृत विचारांपेक्षा असभ्य रानटी मावो/नक्षलवांद्यासारख्यांची सहानुभुती त्याला जवळची वाटली तर.......????????
तर त्याचे काही चुकते हे मी तरी त्याला कसे समजावणार.....?????????????????????
शेतकर्याला मुख्य प्रवाहापासून दुर फ़ेकून द्यायचे नसेल तर....
हे भारतियांनो त्या पीपली लाइव्हचा निषेध करा.
अगदी जमेल त्या मार्गाने... जमेल तसा....जमेल त्या पद्धतीने.......!!
गंगाधर मुटे
..................................................................................
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?
..................................................................................
.
.
ता.क- मी चित्रपट पाहीलेला नाही आणि पहावे असे वाटतही नाही. कारण शेतकर्यांच्या आत्महत्या विनोदाचा विषय होणे किंवा विनोदी चित्रपटात शेतकर्यांच्या आत्महत्येसारखा गंभिर विषय हाताळणे हेच मुळी विकृतीचे लक्षण आहे. हा विषय तीन तासाच्या एका चित्रपटातच काय दहा चित्रपटात सुद्धा आवाक्यात येणार नाही असा विषय एखाद्या चित्रपटात तोंडी लावून चघळण्याइतका किरकोळ वाटावा, ही विचारशैलीच शेतकर्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोण स्पष्ट करून जाते. ’पीपली’ च्या जाहिरातीचा टीव्हीवरील छोटासा संवादच ऐकणे जेथे जड गेले तेथे माझ्यासारख्याला पुर्ण सिनेमा शांतपणे बसून पाहणे शक्य होईल?
.............................................................................................
दुपारी २.२४ वाजता
esakal.com - वरिल http://72.78.249.107/esakal/20100814/5039280691352829503.htm
या लिंकवरील पीपली (लाइव्ह) > आपल्या कोडगेपणाच्या कानाखाली काढलेला आवाज - हा त्या चित्रपटाबद्दल भाष्य करणार्या लेखातील काही भाग पहा.....
.
दिग्दर्शिकेनं इथं मुख्य प्रदेश नावाच्या भारताच्या काल्पनिक राज्यातला एक गरीब शेतकरी नथ्था (ओंकारदास माणिकपुरी) कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याची घोषणा करतो, या "थीम'भोवती सगळी कथा मांडली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खरोखर गेल्या काही वर्षांत या देशाला लागलेला कलंक आहे. मात्र, याच विषयाकडं खेळकरपणानं पाहत, उपहासाच्या माध्यमातून दिग्दर्शिकेनं आपल्या बोथट झालेल्या संवेदनेला गदगदून हलविण्याचं काम केलं आहे. नथ्था आणि त्याचा मोठा भाऊ बुधिया (रघुवीर यादव) कर्जमाफीसाठी त्यांच्या भागातल्या पुढाऱ्याकडं जातात. तेव्हा तो त्यांची थट्टा करून आत्महत्या करण्याचा सल्ला देतो. मात्र, त्याच्या या तिरकस सल्ल्यानंतर नथ्था व बुधिया खरोखर आत्महत्या करण्याचा विचार करू लागतात.
.
१) असा घोषणा करून शेतकरी आत्महत्या करीत असतो? हे विकृत विचार नाही?
२) शेतकरी आत्महत्येकडे खेळकरपणाने पाहात? या वाक्यात आणी "बलात्कार होत असतांना मी खेळकरपणाने पाहत होतो" या वाक्यात मला फ़ारसा फ़रक आढळत नाही.
काय करावे या खेळकरपणाचे?
३) शेतकरी कर्जमाफ़ीसाठी कुणापुढे हात पसरतात? या उलट १० रुपये मुद्दल रक्कमेचे व्याजासहित ५०० रू फ़ेडता-फ़ेडता पिढ्या बरबाद झाल्या.
यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की हा समाज शेतकरी वर्गाकडे किती गांभिर्याने पाहतो.
त्याच्या आत्महत्येवर निट अभ्यास करता येत नसेल तर नका करू पण असा विकृतीपुर्ण विपर्यास का करता?
..
याला विकृत विचार म्हणणे पटत नसेल तर नेमके विकृत विचार कशाला म्हणायचे, हे जरा मला समजून सांगावे. माझ्या मनाचे दरवाजे सताड उघडे आहे.
............................................................
सायं ६,०० वाजता वाढवलेली पोष्ट.
काल आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या विधवांनी आमीरच्या पोष्टरची "होळी केली"
बातमी....
स्वतंत्रता दिवस के दिन रविवार को जहां एक ओर पूरा देश आजादी का पर्व मनाने में व्यस्त था तो दूसरी ओर महाराष्ट्र में पांच हजार विधवाएं आमिर खान की पीपली लाइव के पोस्टर जला रही थीं। विदर्भ जन आंदोलन समिति के बैनर के तले नागपुर से 150 किलोमीटर दूर यवतमाल जिले में जुटीं इन विधवाओं की बस एक ही मांग थी कि आमिर खान उनसे माफी मांगे और सरकार फिल्म पर प्रतिबंध लगाए।
कहते हैं कि आमिर की नई फिल्म के कारण विदर्भ के किसान और और हजारों विधवाएं गुस्से में हैं। क्योंकि इस फिल्म में दिखाया गया है कि किसान मुआवजे के लालच में आत्महत्या करते हैं। तिवारी कहते हैं कि आमिर खान को किसानों के मुद्दे से कोई मतलब नहीं है। वे बस अवार्ड जीतने के लिए फिल्म बनाते हैं।
आमिर खान की पीपली लाइव रिलीज होने से पहले से ही विवादों में रही है। महाराष्ट्र के किसानों ने इस फिल्म को प्रतिबंध लगाने के साथ सेंसर बोर्ड से सर्टिफिकेट वापस लेने की मांग की है।
दस साल में मर चुके हैं दो लाख किसान
एक दशक में देश में दो लाख किसानों ने आत्महत्या की है। इसमें विदर्भ क्षेत्र में चालीस हजार किसान शामिल है। लेकिन आज तक विधवाओं को अपने पति की मौत का मुआवजा नहीं मिला है। इलाके के किसानों का कहना है कि पीपली लाइव के कारण उन 1.60 लाख विधवाओं के सामने मुआवजे का संकट आ खड़ा हो गया है जिनके पतियों ने सरकार की गलत नीतियों के कारण आत्महत्या की थी। यह फिल्म राजनेता, अधिकारियों की सोच का समर्थन करती है। (दै.भास्कर मधिल संपादित बातमी)
अर्थात सिनेमा परफेक्ट आहे असा
अर्थात सिनेमा परफेक्ट आहे असा याचा अर्थ नाही . काही काही ठिकाणी तुमची वरची भूमिका पटतेही . पण त्यामागचा हेतू शुद्ध आहे हे नक्की
धन्यवाद केदारजी जाधव..
म्हणजे मी हवेला लाथा मारल्या असे अजिबात नाही. काहीतरी तथ्य आहेच.
कुणासाठी कमी,कुणासाठी जास्त.
धन्यवाद केदारजी जाधव.. म्हणजे
धन्यवाद केदारजी जाधव..
म्हणजे मी हवेला लाथा मारल्या असे अजिबात नाही. काहीतरी तथ्य आहेच.
कुणासाठी कमी,कुणासाठी जास्त. >> बास की किती फसवाल स्वत:ला ? तेवढी एकच ओळ दिसली का त्याने लिहीलेली. बाकीच्या ओळींच काय झालं? झोपेचं सोंग बास हं आता. उठा जागे व्हा..
पण त्यामागचा हेतू शुद्ध आहे हे नक्की >>> हेही तोच म्हणलाय बरं का. त्यालाही हेतु शुद्धच दिसला तर .. अरेरे अरेरे
गंगाधरजी तुम्ही चित्रपट
गंगाधरजी तुम्ही चित्रपट पहाणार आहात वा नाही? आमच्या साठी नाही त्या शेतकर्यांसाठी तर बघा. तुम्हाला एक नवीन दिशा मिळेल..
उदयजी, नक्की पाहाणार आहे मी. आणि नंतर पुन्हा लिहिणार आहेच.
पण मला काय म्हणायचे आहे हे समजून न घेता माझी मुस्कटदाबी करण्याचे काही व्यक्तीकडून जे प्रयत्न होत आहे, त्यामुळे हा बाफ थांबत नाहीये.
थोडासा वेगळा मुद्दा. चार
थोडासा वेगळा मुद्दा.
चार वर्षापूर्वि विदर्भातल्या दुर्गम भागात काम करणार्या समाजसेवी दांपत्याच यजमानत्व करायचा योग आला होता. जन्मापासून (अक्षरशा: खर पतीच्या बाबतीत) आपल आयुष्य समाजसेवेला वाह्यलेल्या या दांपत्याच्या मनात शेतकर्यांच्या वेदने बद्द्ल संवेदना नाही अशी तिळमात्र शंका यायच कारण नाही.
मात्र शेतकर्यांच्या आत्महत्या (खरी, खोटी, दाखवलेली, आभास केलेली) याचा त्यांनी एक जबरदस्त तपशिल दिला. सरकारची भूमिका, सरकारी मदत, त्याचा दुरुपयोग, सो कॉल्ड सेवाभावी संस्था याबद्दल तर त्यांनी आमचे डोळेच उघडले.आम्हा चार्-पाच कुटुंबाना पैशाची मदत करायची होती जी आम्ही eventually केली पण गुपचूप आवाज न करता मनापासून या कामाला वाहून घेतलेल्या कार्यकर्ती मार्फत!
तेव्हापासून शेतकर्यांच्या आत्महत्याच्या बातमीबद्दल मी खूप सावधता बाळगते. आणी बेंबीच्या देठापासून बोंबलणार्या सो कॉल्ड कार्यकर्ते आणि संस्था यापासून तर चार हात लांबच. हा सिनेमाच्या बाबतीत होत असलेला प्रकार सगळा मला फालतू पब्लिसिटी स्टंट वाटतो. मी तर मायबोलीकरांना विनंती करते की जरूर जाउन हा सिनेमा बघा. एका चांगल्या विषयाला ऐरणीवर आणल्या बद्दल अनुषा रिझवीला सपोर्ट केलाच पाहीजे.
मैत्रियीस
मैत्रियीस अनुमोदन!!
शेतकर्यांची प्रतिमा बिघडवण्याचे कामच मुटे करत आहेत. प्लीज असं नका करू मुटेजी.. इतका उथळ विचार करू नका.
आणि करणारच असाल तर त्याचा अगदी उलट फायदा होतोय हे दिसतेच आहे. तुमच्या या धाग्यामुळे लोकं चित्रपट पाहायला उत्सुक होत आहेत जास्त! ते नकोय ना तुम्हाला? मग प्लीज सारासार विचार करून विरोध करा.
(संयमाने लिहायचा प्रयत्न केला आहे,तरीही तुमचं मत व विचार बदलतील असं मुळीच वाटत नाहीये!! :अओ:)
मिन्वा, पुढील पोष्ट
मिन्वा,
पुढील पोष्ट लिहिण्यापुर्वी कृपया या आधिच्या सर्व पोष्ट वाचून काढा, ही विनंती
त्यामुळे एकच गोष्ट वारंवार लिहिण्याची पाळी माझ्यावर आणि वाचण्याची तुमच्यावर येणार नाही.
ही विनंती आहे बरका नाहीतर लगेच तुम्ही मला उपदेश देणारे कोण म्हणुन प्रश्न विचारायच्या.
तुमच्या या धाग्यामुळे लोकं
तुमच्या या धाग्यामुळे लोकं चित्रपट पाहायला उत्सुक होत आहेत जास्त! ते नकोय ना तुम्हाला?
का नकोय? लोकांनी पाहावे की पाहू नये याच्याशी मला काय घेणे-देणे?
कदाचीत आता अधिक बारकाईने पाहतील. त्यातल्या एकाला जरी माझी भूमिका पटली तरी पुरेसे आहे.
इतरांना पटली काय, नाही पटली काय. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
मला एक मुद्दा मांडायचा तो मी मांडतोय. तो इतरांनी पटवूनच घ्यावा असे माझे म्हणने नाही.
.............................
चार वर्षापूर्वि विदर्भातल्या दुर्गम भागात काम करणार्या समाजसेवी दांपत्याच यजमानत्व करायचा योग आला होता. जन्मापासून (अक्षरशा: खर पतीच्या बाबतीत) आपल आयुष्य समाजसेवेला वाह्यलेल्या या दांपत्याच्या मनात शेतकर्यांच्या वेदने बद्द्ल संवेदना नाही अशी तिळमात्र शंका यायच कारण नाही.
मात्र शेतकर्यांच्या आत्महत्या (खरी, खोटी, दाखवलेली, आभास केलेली) याचा त्यांनी एक जबरदस्त तपशिल दिला. सरकारची भूमिका, सरकारी मदत, त्याचा दुरुपयोग, सो कॉल्ड सेवाभावी संस्था याबद्दल तर त्यांनी आमचे डोळेच उघडले.आम्हा चार्-पाच कुटुंबाना पैशाची मदत करायची होती जी आम्ही eventually केली पण गुपचूप आवाज न करता मनापासून या कामाला वाहून घेतलेल्या कार्यकर्ती मार्फत!
असे भोंदूबाबा सर्वत्र आढळतात.
कामाला वाहून घेतलेल्या कार्यकर्ती मार्फत
ती तरी योग्य कामी आली असेल का मला शंका आहे.
अशी मदत कोणी अजिबात करू नये, असे मला वाटते. कारण ती सत्कार्यी लागत नाही असा माझा अनुभव आहे.
सर्वत्र दलालच द्लाल आहे.
अरे आवरा.... काय चालले आहे
अरे आवरा.... काय चालले आहे माबोवर?
आम्ही वाचक इथे दर्जेदार लेखन वाचायला येतो, पण गेल्या काही आठवड्यांपासून जो गदारोळ सुरू आहे तो अशक्य आहे.
आधी ती 'आई आता मम्मी झाली' ही महाभयंकर कविता, मग मधुकर यांच्या लेखमाला आणि आता हे...
बिनबुडाच्या लिखाणाला इतके महत्व का देताय लोक्स...?
गंगाधरजी तुमच्याकडून ही
गंगाधरजी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. चित्रपट न पाहताच त्याबद्दलची मते बनवणे, पोस्टर जाळण्याच्या कृतीचे समर्थन नव्हे अभिनंदन......
"मात्र, याच विषयाकडं खेळकरपणानं पाहत, उपहासाच्या माध्यमातून दिग्दर्शिकेनं आपल्या बोथट झालेल्या संवेदनेला गदगदून हलविण्याचं काम केलं आहे."
दिग्दर्शिकेने हा चित्रपट खेळकर दृष्टिकोनातून मांडलाय असे मत त्या समीक्षकाचे आहे. तिचा दृष्टिकोन खेळकर आहे का गंभीर हे तिलाच विचारावे. भारतातल्या नोकरशाही /राजकारणावरचा एक जुना चित्रपट 'जाने भी दो यारो' आठवतोय का?
तो बघताना हसून पोट दुखायचे, पण संदेश हवा तो पोचायचा ना?
"त्यामुळे मी चित्रपट पाहून नंतर लिहिल्याने कुणाची मते बदलतील, हे तितकेसे खरे नाही."
ही एका आंदोलनासाठी आंदोलन करणार्याची भूमिका वाटते, की तीत माघारीला वाव नाही.
"प्रश्न हा की शेतकर्यांच्या आत्महत्येचा विषय इतक्या हलकेपणाणे का मांडावा.<<
चित्रपट न बघता हे कसं ठरवलं?
चित्रपट न बघता हे कसं नाकारता?"
हीच वाक्ये तुम्ही ४ दिवसांनी वाचा आणि तुम्हालाच पटतात का सांगा. पन आंदोलकाच्या भूमिकेतून बाहेर येऊन. तुमच्या कविता न वाचताच त्यावर मत ठरवले तर चालेल का?
"माणसांच्या अंगात जो विचार अंगवळणी पडलेला असतो, त्याचे प्रतिसाद त्याच्या कृतीमध्ये आपोआप उतरतात. त्यासाठी जाणुनबुजून काहीही करण्याची आवश्यकताच नसते. ज्या गोष्टी आपोआप घडतात त्याच्यामागे संस्कृती,प्रकृती किंवा विकृती असते."
ही विधाने पूर्वग्रहाचे उत्तम उदाहरण ठरावीत. परिस्थिती, ज्ञान, वय, अनुभव इ. गोष्टीनुरूप माणसाच्या विचारात आणि विचारक्षमतेत (ज्यावर इथे प्रश्नचिन्ह नाही तर फुली आहे) बदल घडत नाही का?
"शेतकरी समाज पण सुसंस्कृत समाजाचा भाग आहे ....!
अख्या आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला/वाचला मी हा शब्द."
रच्याकने यावरून आठवले की साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार गिरिजा कीर यांनी 'तळागाळातील, झोपडपट्टीतील रहिवासी आणि निर्रक्षरांपैकी बहुतेकांना प्रतिभेचा स्पर्श नसतो , त्यामुळे त्यांना साहित्य संमेलनात स्माविष्ट करून घेतले तर त्याचा काय उपयोग होईल" असे म्हटले आहे, तेव्हा हा चित्रपट सोडा आणि त्यांच्या मागे लागा.
असे भोंदूबाबा सर्वत्र आढळतात.
असे भोंदूबाबा सर्वत्र आढळतात.
मग भोंदूच्या आवाहानावरून एका चांगल्या चित्रपटाबद्दल वाट्टेल ते काय लिहता आहात? आणि ते पण सिनेमा न बघता? कमालच करता बाई!!
मायबोलीकरांने, ह्या बाफचा टीआरपी वाढवूया नको. मी नाही आता वाचणार आणि लिहणार. मी सिनेमाला जातेय. कुठल्या??
काल पाहिला हा चित्रपट. हा एक
काल पाहिला हा चित्रपट.
हा एक पॉलिटिकल सटायर आहे असा वाटला.
१) गरजू, हतबल शेतकरी २) संधीसाधु,धुर्त,ह.खोर राजकारणी ३) बेजबाबदार व संवेदनशुन्य मिडीया या मुख्य त्रिकुटाचा हा चित्रपट आहे. जोडीला कर्तव्य-शुन्य प्र. अधिकारी वर्ग आहेच.
तरी, नथावर (शेतकर्यावर ) केलेली ब्लॅक कॉमेडी अंतर्मुख करते तर दुसर्या ठिकाणी राजकारणी आणि मीडिया वर केलेली कॉमेडी नक्कीच मनात त्यांच्या विषयी जळफळाट, निषेध व्यक्त करते.
चित्रपट जरी पर्फेक्ट नसला तरी, नक्किच शेतकर्यांची बाजु घेऊन शासनाला एक जबरदस्त चपराक लावतो.
मिन्वा, पुढील पोष्ट
मिन्वा,
पुढील पोष्ट लिहिण्यापुर्वी कृपया या आधिच्या सर्व पोष्ट वाचून काढा, ही विनंती >> मान्य केली आणि सगळ्या पोस्ट वाचल्या. आता तुम्हीही शांतपणे पुन्हा वाचा.
त्यामुळे एकच गोष्ट वारंवार लिहिण्याची पाळी माझ्यावर आणि वाचण्याची तुमच्यावर येणार नाही. >> तुम्ही जसं वारंवार तेच तेच लिहीताय. तसं इतर अनेक जे एकमेकांना ओळखतही नाहीत असे लोक तुमचं म्हणणं चुकीचं आहे हे तुम्हाला कळकळीने सांगत आहेत. परोपरीने समजावत आहेत. ते तुम्हाला कळतंय का हो? तुम्ही आता इरेला पेटला आहात की माझंच कसं बरोबर आहे. लोकांनी लिहीलेल्या परीच्छेदातलं तुमच्या बाजूचं (असं तुम्हाला वाटतंय..) वाक्य तेवढं तुम्ही धरुन बसताय. अहो, आपलं चुकलं तर "हो, माझं चुकलं" असं म्हणण्यात काहीही कमीपणा नाहीये. फक्त त्यासाठी धैर्य हवं. ते देव तुम्हाला देवो हीच ईशचरणी प्रार्थना!
साहित्य संमेलनच्या
साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार गिरिजा कीर यांनी 'तळागाळातील, झोपडपट्टीतील रहिवासी आणि निर्रक्षरांपैकी बहुतेकांना प्रतिभेचा स्पर्श नसतो , त्यामुळे त्यांना साहित्य संमेलनात स्माविष्ट करून घेतले तर त्याचा काय उपयोग होईल" असे म्हटले आहे,
भरतजी, यात विषेश काही नाही. बोलणारा गुन्हेगार असेल तर निमुटपणे ऐकणारा समकक्ष व्यक्ती ही तेवढाच गुन्हेगार ठरतो,कारण एकप्रकारे ती मुकसंमतीच असते. या तर्हेची प्रवृती फार पुर्वापार चालत आलेली आहे, आणि विशिष्ट समाजाने ती जाणिवपुर्वक जोपासल्याने ती अंगवळणी पडली आहे.
मग भोंदूच्या आवाहानावरून एका चांगल्या चित्रपटाबद्दल वाट्टेल ते काय लिहता आहात?
मी लिहितो आहे ते चूक की बरोबर, असा प्रश्न असू शकतो, पण मी कोणाच्या तरी आवाहनावरून लिहितो, हे वाक्य मला आणि माझ्या अस्तित्वालाच आवाहन देते त्यासोबतच शेतकर्याला स्वत:ची अक्कल नसते, हेही अधोरेखित करून जाते.कारण पुढार्याला,भोंदुला अक्कल असते असे तुमच्या वाक्यातून जाणवते. आणि मी जर पुढारी किंवा भोंदू नसून फक्त शेतकरी असेल तर स्वअक्कलेने लिहिण्याची माझी पात्रता नसावी, असे काहीसे तुमचे मत दिसते.
आणि नेमका हाच मुद्दा मी या बाफवर मांडायचा प्रयत्न करतो आहे, की शेतकर्यालाही स्वतःची अक्कल असते, तो कुणाच्या हातचे बाहूले असतेच असे नाही,इतरांच्या मतापेक्षा त्याची मते वेगळी असू शकतात.
आणि नेमके याच मुद्द्याकडे दुर्लक्ष करून अवांतर मुद्द्यावरच जास्त भर दिले जाते.
...............................
सटायर आणि ब्लॅक कॉमेडी हा विनोदाचा प्रकार मी नव्यानेच ऐकतो आहे.कुणी अधिक माहिती दिल्यास आभारी राहिन.
कालपासून हा बाफ अधूनमधून
कालपासून हा बाफ अधूनमधून वाचतेय. लोकांच्या इथे लिहिण्याच्या चिकाटीचीही कमाल आहे. मानलं!
सिनेमा न पाहतादेखील त्यावर आत्यंतिक टोकाची आगपाखड करणारं लेखन हा अतिशय राजकारणी छापाचा निर्बुद्धपणा वाटतो. एकदा आपण 'शेतकरी आणि त्यांचे प्रश्न' हे हाताळायला मक्ता घेतल्यावर दुसरा कोणी त्यावर काही काम करू लागल्यास किंवा वेगळ्या दृष्टिकोनातून/माध्यमातून त्या प्रश्नाकडे बघू लागल्यास त्या विषयातली आपली एकाधिकारशाही संपुष्टात येणार नाही ना, अशी भीती असल्या राजकारणी / राजकारणी मनोवृत्तीच्या लोकांना वाटणे साहजिकच आहे. आणि त्यातून वर सतत दिसतेय तशीच प्रतिक्रिया प्रकट होणार. बरं हे करण्याआधी सिनेमा स्वतः पाहून मत बनवले आहे म्हणावे, तर तेही नाही. अनेक प्रतिक्रियांमधून, नेटांवरच्या लेखांमधून आपल्याला सोयीस्कर वाक्ये तेवढी उचलायची आणि इतर गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करायचे यातून या बाफाच्या निर्मात्याची स्वतःला 'शेतकर्यांचा एकमेव तारणहार' सिद्ध करायची धडपड दिसून येतेय केवळ.
>>>>>>
कामाला वाहून घेतलेल्या कार्यकर्ती मार्फत
ती तरी योग्य कामी आली असेल का मला शंका आहे.
अशी मदत कोणी अजिबात करू नये, असे मला वाटते. कारण ती सत्कार्यी लागत नाही असा माझा अनुभव आहे.
सर्वत्र दलालच द्लाल आहे.
>>>>>>
आता कल्पू यांनी स्वतः नीट विचारपूस करून, चार-पाच कुटुंबांना मदत केल्याचे लिहिले तर लगेच त्यावरही यांची टीका! बरोबर आहे, कल्पू व इतरेजन यांच्या चष्म्यातून शेतकर्यांकडे बघत नाहीयेत ना! जो मार्ग मी सांगितलेल्या मार्गापेक्षा वेगळा तो चूकच, अशा पद्धतीने वागणार्यांची वाटचाल केवळ राजकीय हेतूंनी प्रेरित असते, तेच इथे असावे हे उघड आहे.
फक्त त्यासाठी धैर्य हवं. ते
फक्त त्यासाठी धैर्य हवं. ते देव तुम्हाला देवो हीच ईशचरणी प्रार्थना!
मला देवाने धैर्य दिले काय नाही काय, त्याने जगावर संकट कोसळ्ण्याची सुतराम शक्यता नाही.
पण शेतकर्याच्या आत्महत्यांकडे डोळसपणे आणि आत्मियतेने पाहण्याची शक्ती जर देवाने समाजाला दिली नाही तर मात्र मोठे संकट कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे
देवाने शेतकर्याच्या आत्महत्यांकडे डोळसपणे आणि आत्मियतेने पाहण्याची शक्ती समाजाला द्यावी, हीच ईशचरणी प्रार्थना!
.पुढील १० तासासाठी मी विश्रांती घेतो.
डोळसपणे<<< हे नवीनच आहे.
डोळसपणे<<<
हे नवीनच आहे. तुमचा चष्मा नसेल तरी त्याला डोळसपणा म्हणण्याचा मोकळेपणा दिसला नाहीये आजवर तुमच्याकडे.
सटायर आणि ब्लॅक कॉमेडी हा
सटायर आणि ब्लॅक कॉमेडी हा विनोदाचा प्रकार मी नव्यानेच ऐकतो आहे.कुणी अधिक माहिती दिल्यास आभारी राहिन.
>.. हे जरा बरे वाटले वाचुन. माझे भाषाप्रभुत्व व सिनेमा ह्या माध्यमाचा अभ्यास फारसे चांगले नाही, त्यामुळे मला जमेल तसे सांगते,इतर लोक जास्त चांगले साम्गु शकतील. वर वर बघता सिनेमामधे मजा,विनोद ,सुरु असतो.आपण हसुन हसुन बेजार झालेले असतो, पण त्याच वेळेस अरे बापरे आपल्या आयुष्यातल्या / समाजातल्या उणीवेवर,दांभिकतेवर, चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवले जातय हेही लक्षात आल्याशिवाय रहात नाही.अर्थात सिनेमाचा हा form प्रत्येकाच्या लक्षात येइलच असे नाही, काहीजण फक्त विनोदाचाच भाग घेउन घरी जातील. गंभीर लिखाणापेक्षा विनोदी लिखाण करणे जसे अवघड असते, तसेच गंभीर सिनेमा बनविण्यापेक्षा असा सिनेमा बणविणे हे कधीही जास्त आव्हानात्मक असते. कारण प्रयोग पुर्णपणे फसायची शक्यता असते.
पण ही विनोदाची आणि कुठल्याही गंभीर विषयाची भट्टी चांगली जमली तर मात्र तुम्ही अशा audiance पर्यंत पोहचु शकता की ज्यांनी otherwise ह्या विषयांवर कधीच विचारच केलाच नसताच. त्ते लोकही सिनेमाच्या निमित्ताने काही वेळासाठी अंतर्मुख होतात. आणि हेच ह्या ब्लॅक कॉमेडीचे फार मोठे यश असते.
<<साहित्य संमेलनच्या
<<साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार गिरिजा कीर यांनी 'तळागाळातील, झोपडपट्टीतील रहिवासी आणि निर्रक्षरांपैकी बहुतेकांना प्रतिभेचा स्पर्श नसतो , त्यामुळे त्यांना साहित्य संमेलनात स्माविष्ट करून घेतले तर त्याचा काय उपयोग होईल" असे म्हटले आहे >>
इथे गल्लत होतेय. गिरीजा कीर यांच्या शब्दांची फेरफार करुन चुकीचा अर्थ घेतला जातोय. IBN lokmat चा तो कार्यक्रम मी स्वतः पाहिला आहे. नेहमीप्रमाणे त्यां शब्दांना धरुन कार्यक्रमात वाद झालाच. वागळ्यांनी देखिल त्यावर प्रतिकुल मत प्रकट केले होते. तेव्हा त्यांनी शेवटी परत त्यांचा मुद्दा clear केला होता की जे ' निरक्षर आणि साहित्याची जाण नाही असे लोक '
असो हा या बीबीचा विषय नाही , परंतु वरती या ओळी दिसल्या म्हणुन लिहिले.
मुटेजी, तुम्ही चित्रपट पाहून
मुटेजी, तुम्ही चित्रपट पाहून मग तुमचे मत लिहा. आम्हाला ते वाचायला आवडेल.
देवाने शेतकर्याच्या
देवाने शेतकर्याच्या आत्महत्यांकडे डोळसपणे आणि आत्मियतेने पाहण्याची शक्ती समाजाला द्यावी, हीच ईशचरणी प्रार्थना!
--- या बद्दल कुणाचेही दुमत असायचे कारण नाही. मार्ग भिन्न असु शकतील, मार्ग तुमच्याच चष्म्या मधुन जाणारा कदाचित नसेलही.
पुढील १० तासासाठी मी विश्रांती घेतो.
--- म्हणजे तुम्ही १० तासात ३ वेळा चित्रपट पहाणार ?
आणि मी जर पुढारी किंवा भोंदू
आणि मी जर पुढारी किंवा भोंदू नसून फक्त शेतकरी असेल तर स्वअक्कलेने लिहिण्याची माझी पात्रता नसावी, >> असं कुणीही म्हणलं नाही आणि तुम्ही शेतकरी असतात तर तुमच्याकडे इतका रिकामटेकडा वेळही नसता
मला देवाने धैर्य दिले काय नाही काय, त्याने जगावर संकट कोसळ्ण्याची सुतराम शक्यता नाही. >> जगावर नाही हो पण मायबोलीवर आणि इथल्या वाचकांवर नक्कीच कोसळलंय. हां आता तुमची मत तुम्ही तुमच्याच जवळ ठेवली असतीत तर काहीच प्रश्न नव्हता.
पण शेतकर्याच्या आत्महत्यांकडे डोळसपणे आणि आत्मियतेने पाहण्याची शक्ती जर देवाने समाजाला दिली नाही तर मात्र मोठे संकट कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे >> तुम्हाला असं वाटतंय की शेतकर्याच्या आत्महत्यांकडे डोळसपणे आणि आत्मियतेने पाहण्याची शक्ती समाजाकडे नाही. इतरांना असं वाटत नाहीये. आणि ती शक्ती फक्त तुमच्याच कडे आहे असाही एक तुमचा गैरसमज झालाय. यावर कुसुमाग्रजांची एक सुरेख कविता आठवतीये त्यातल्या चिमणीसारखी तुमची गत झालीये. सगळ्या शेतकरी वर्गाची जबाबदारी तुमच्या खांद्यावरच पडलीये असा तुम्हाला भास होतोय.
आणि नेमका हाच मुद्दा मी या बाफवर मांडायचा प्रयत्न करतो आहे, की शेतकर्यालाही स्वतःची अक्कल असते, तो कुणाच्या हातचे बाहूले असतेच असे नाही,इतरांच्या मतापेक्षा त्याची मते वेगळी असू शकतात. >> तुम्ही हा मुद्दा मांडताय? इथे कोण असं म्हणतंय की शेतकर्याला स्वत:ची अक्कल नसते. तो कुणाच्या तरी हातचं बाहुलंच असतो. आणि त्याची मतं वेगळी असूच शकत नाहीत वगैरे.
गंगाधरजी तुम्ही चित्रपट
गंगाधरजी तुम्ही चित्रपट पहाणार आहात वा नाही? आमच्या साठी नाही त्या शेतकर्यांसाठी तर बघा. तुम्हाला एक नवीन दिशा मिळेल..
उदयजी, नक्की पाहाणार आहे मी. आणि नंतर पुन्हा लिहिणार आहेच. >> म्हणजे अजून ५-६ पानी चर्चा रंगणार की काय?
मुटेजी, तुम्ही चित्रपट पाहून मग तुमचे मत लिहा. आम्हाला ते वाचायला आवडेल. >> चित्रपट पाहून यांचं मत बदललं तरिही ते इथे कितपत मोकळेपणी मान्य करतील याचीच मला शंका वाटतेय.
चित्रपट पाहून यांचं मत बदललं
चित्रपट पाहून यांचं मत बदललं तरिही ते इथे कितपत मोकळेपणी मान्य करतील याचीच मला शंका वाटतेय. >> अगदी अगदी दक्षिणा. बघण्याआधीच त्यांनी मनात इतका आकस धरलाय.
मीन्वाला सांगताय
मीन्वाला सांगताय >>>>
मिन्वा,
पुढील पोष्ट लिहिण्यापुर्वी कृपया या आधिच्या सर्व पोष्ट वाचून काढा, ही विनंती
त्यामुळे एकच गोष्ट वारंवार लिहिण्याची पाळी माझ्यावर आणि वाचण्याची तुमच्यावर येणार नाही.
>>>> अहो लोक बेंबीच्या देठापसुन तुम्हाला ओरडुन एकच सांगतायत कि सिनेमा बघा आणि मगच बोला. तुम्ही लोकांवर परत परत तेच तेच सांगायची पाळी आणताय.
सिनेमा बघा .......
सिनेमा बघा .......
आजकालच्या चित्रपटाने क्रांती
आजकालच्या चित्रपटाने क्रांती होते किंवा प्रगती होते, करमणुक होते हे दुर्मीळच, त्यामुळे संताप करु नये
असे मला वाटते.
आजकालच्या चित्रपटाने क्रांती
आजकालच्या चित्रपटाने क्रांती होते किंवा प्रगती होते, करमणुक होते >>> तो न बघता केलेल्या शंखामुळे होते की!
पिपली मुळे मुट्यांचा (फुकटात)
पिपली मुळे मुट्यांचा (फुकटात) भाव वधारला की, आमिर ने फायनांसर, वितरक, थेटर मालकांची केली नसेल इतकी मनधरणी माबोकरांनी मुट्यांची केलिये.
मुटे, मबोकरांच्या आग्रहास्तव तरी अता बघूनच घ्या हा सिनेमा.
मी हे सर्व होत नाही या मताचा
मी हे सर्व होत नाही या मताचा आहे.
आणि मी जर पुढारी किंवा भोंदू
आणि मी जर पुढारी किंवा भोंदू नसून फक्त शेतकरी असेल तर स्वअक्कलेने लिहिण्याची माझी पात्रता नसावी, >> असं कुणीही म्हणलं नाही आणि तुम्ही शेतकरी असतात तर तुमच्याकडे इतका रिकामटेकडा वेळही नसता >>> अगदि अगदि........
मलाही हाच प्रश्न पडला होता....
Pages