पीपली लाइव्ह आणि सिंपली सुसाईड.
मी नाही पाहीला हा चित्रपट. पण बातम्यावरून लक्षात येतंय की शेतकरी अनुदानाच्या लोभापायी आत्महत्या करतो, असा आभास त्या चित्रपटात निर्माण करण्यात आलेला आहे.
तसेही शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात, वेडसर असतात म्हणुन आत्महत्या करतात, आळशी असतात म्हणुन आत्महत्या करतात आणि अशिक्षित असतात म्हणुन आत्महत्या करतात वगैरे-वगैरे अक्कलेचे तारे यापुर्वीच विचारवंतानी तोडलेच आहे,(संदर्भ; 'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे') त्यात पुन्हा एका नव्या विचारवंताची भर पडली म्हणायची.
शेतकर्याच्या आत्महत्यांची कारणे शोधली जात नाहीत, उपाययोजना केल्या जात नाहीत आणि प्रामाणिक प्रयत्नही केले जात नाहीत.
याउट त्यांच्या जखमांवर मीठ चोळून विकृत चित्र उभे केले जाते. आणि त्याचा निषेध व्यक्त करण्याची साधी गरजही सामान्य माणसाला भासत नाही, काय म्हणावे याला?
ज्या सुसंस्कृत समाजाकडून त्याने न्यायाची अपेक्षा करावी तोच समाज जर असा विकृतीने पिडलेला आहे, हे जर त्याच्या लक्षात आले आणि तशी खात्री झाली तर मग तो न्यायासाठी स्वत:चे मार्ग स्वत:च शोधेल आणि अशा सुशिक्षित-सुसंस्कृत समाजाच्या विकृत विचारांपेक्षा असभ्य रानटी मावो/नक्षलवांद्यासारख्यांची सहानुभुती त्याला जवळची वाटली तर.......????????
तर त्याचे काही चुकते हे मी तरी त्याला कसे समजावणार.....?????????????????????
शेतकर्याला मुख्य प्रवाहापासून दुर फ़ेकून द्यायचे नसेल तर....
हे भारतियांनो त्या पीपली लाइव्हचा निषेध करा.
अगदी जमेल त्या मार्गाने... जमेल तसा....जमेल त्या पद्धतीने.......!!
गंगाधर मुटे
..................................................................................
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?
..................................................................................
.
.
ता.क- मी चित्रपट पाहीलेला नाही आणि पहावे असे वाटतही नाही. कारण शेतकर्यांच्या आत्महत्या विनोदाचा विषय होणे किंवा विनोदी चित्रपटात शेतकर्यांच्या आत्महत्येसारखा गंभिर विषय हाताळणे हेच मुळी विकृतीचे लक्षण आहे. हा विषय तीन तासाच्या एका चित्रपटातच काय दहा चित्रपटात सुद्धा आवाक्यात येणार नाही असा विषय एखाद्या चित्रपटात तोंडी लावून चघळण्याइतका किरकोळ वाटावा, ही विचारशैलीच शेतकर्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोण स्पष्ट करून जाते. ’पीपली’ च्या जाहिरातीचा टीव्हीवरील छोटासा संवादच ऐकणे जेथे जड गेले तेथे माझ्यासारख्याला पुर्ण सिनेमा शांतपणे बसून पाहणे शक्य होईल?
.............................................................................................
दुपारी २.२४ वाजता
esakal.com - वरिल http://72.78.249.107/esakal/20100814/5039280691352829503.htm
या लिंकवरील पीपली (लाइव्ह) > आपल्या कोडगेपणाच्या कानाखाली काढलेला आवाज - हा त्या चित्रपटाबद्दल भाष्य करणार्या लेखातील काही भाग पहा.....
.
दिग्दर्शिकेनं इथं मुख्य प्रदेश नावाच्या भारताच्या काल्पनिक राज्यातला एक गरीब शेतकरी नथ्था (ओंकारदास माणिकपुरी) कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याची घोषणा करतो, या "थीम'भोवती सगळी कथा मांडली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खरोखर गेल्या काही वर्षांत या देशाला लागलेला कलंक आहे. मात्र, याच विषयाकडं खेळकरपणानं पाहत, उपहासाच्या माध्यमातून दिग्दर्शिकेनं आपल्या बोथट झालेल्या संवेदनेला गदगदून हलविण्याचं काम केलं आहे. नथ्था आणि त्याचा मोठा भाऊ बुधिया (रघुवीर यादव) कर्जमाफीसाठी त्यांच्या भागातल्या पुढाऱ्याकडं जातात. तेव्हा तो त्यांची थट्टा करून आत्महत्या करण्याचा सल्ला देतो. मात्र, त्याच्या या तिरकस सल्ल्यानंतर नथ्था व बुधिया खरोखर आत्महत्या करण्याचा विचार करू लागतात.
.
१) असा घोषणा करून शेतकरी आत्महत्या करीत असतो? हे विकृत विचार नाही?
२) शेतकरी आत्महत्येकडे खेळकरपणाने पाहात? या वाक्यात आणी "बलात्कार होत असतांना मी खेळकरपणाने पाहत होतो" या वाक्यात मला फ़ारसा फ़रक आढळत नाही.
काय करावे या खेळकरपणाचे?
३) शेतकरी कर्जमाफ़ीसाठी कुणापुढे हात पसरतात? या उलट १० रुपये मुद्दल रक्कमेचे व्याजासहित ५०० रू फ़ेडता-फ़ेडता पिढ्या बरबाद झाल्या.
यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की हा समाज शेतकरी वर्गाकडे किती गांभिर्याने पाहतो.
त्याच्या आत्महत्येवर निट अभ्यास करता येत नसेल तर नका करू पण असा विकृतीपुर्ण विपर्यास का करता?
..
याला विकृत विचार म्हणणे पटत नसेल तर नेमके विकृत विचार कशाला म्हणायचे, हे जरा मला समजून सांगावे. माझ्या मनाचे दरवाजे सताड उघडे आहे.
............................................................
सायं ६,०० वाजता वाढवलेली पोष्ट.
काल आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या विधवांनी आमीरच्या पोष्टरची "होळी केली"
बातमी....
स्वतंत्रता दिवस के दिन रविवार को जहां एक ओर पूरा देश आजादी का पर्व मनाने में व्यस्त था तो दूसरी ओर महाराष्ट्र में पांच हजार विधवाएं आमिर खान की पीपली लाइव के पोस्टर जला रही थीं। विदर्भ जन आंदोलन समिति के बैनर के तले नागपुर से 150 किलोमीटर दूर यवतमाल जिले में जुटीं इन विधवाओं की बस एक ही मांग थी कि आमिर खान उनसे माफी मांगे और सरकार फिल्म पर प्रतिबंध लगाए।
कहते हैं कि आमिर की नई फिल्म के कारण विदर्भ के किसान और और हजारों विधवाएं गुस्से में हैं। क्योंकि इस फिल्म में दिखाया गया है कि किसान मुआवजे के लालच में आत्महत्या करते हैं। तिवारी कहते हैं कि आमिर खान को किसानों के मुद्दे से कोई मतलब नहीं है। वे बस अवार्ड जीतने के लिए फिल्म बनाते हैं।
आमिर खान की पीपली लाइव रिलीज होने से पहले से ही विवादों में रही है। महाराष्ट्र के किसानों ने इस फिल्म को प्रतिबंध लगाने के साथ सेंसर बोर्ड से सर्टिफिकेट वापस लेने की मांग की है।
दस साल में मर चुके हैं दो लाख किसान
एक दशक में देश में दो लाख किसानों ने आत्महत्या की है। इसमें विदर्भ क्षेत्र में चालीस हजार किसान शामिल है। लेकिन आज तक विधवाओं को अपने पति की मौत का मुआवजा नहीं मिला है। इलाके के किसानों का कहना है कि पीपली लाइव के कारण उन 1.60 लाख विधवाओं के सामने मुआवजे का संकट आ खड़ा हो गया है जिनके पतियों ने सरकार की गलत नीतियों के कारण आत्महत्या की थी। यह फिल्म राजनेता, अधिकारियों की सोच का समर्थन करती है। (दै.भास्कर मधिल संपादित बातमी)
मुटेसाहेब , फार अपेक्षाभंग
मुटेसाहेब , फार अपेक्षाभंग करताय हो तुम्ही.
तुम्ही तर शेतकरीवर्गाचे थेट प्रतिनिधित्व करता, शिवाय सुशिक्षित आणि इन्टरनेट सॅव्ही. इथल्या ऑनलाइन समाजापुरते बोलायचे तर तुम्हीच इथले शेतकरी. त्या सिनेमात काही चुकीचं मांडलं असं गृहित धरलं तरी ते दाखवून द्यायचं ना तुम्ही. तसं केलं असतं तर तुमच्या मताचा आदर करणारे खूप लोक असते इथे. पण तुमच्या इथल्या पोस्टस मुळे इथल्या पांढरपेशा लोकांची जर अशी समजून झाली की 'शेतकरी म्हणजे कुणाच्या तरी सांगण्यावरून आंधळेपणाने दंगा करणारे, परिस्थितीची माहिती करून घ्यायची इच्छाही नसलेले अडाणी लोक' - तर याला जबाबदार कोण ? तुम्हीच की !! त्या आमीर - अनुषाला सोडा, ते निदान स्वतः शेतकरी नाहीत पण स्वतः शेतकरी असून त्यांची अशी प्रतिमा तुम्ही करून देताय तर आमीरपेक्षा तुमचा गुन्हा जास्त मोठा आहे ना मग!
बघा विचार करून !
विधवांचं भवितव्य उद्ध्वस्त
विधवांचं भवितव्य उद्ध्वस्त किंवा उज्ज्वल करु शकत नाही त्यामुळे हे होळी वगैरे करणं हे निरर्थक वाटतं मला.
तुम्हाला,मला काय महत्वाचे वाटते हे महत्वाचे आहेच, दुमत नाही.
पण त्या महिलांना काय वाटते, याला काहीच महत्व नाही का?
दरवेळेस आपण आपले विचार त्यांच्यावर लादण्यापेक्षा एखादीवेळ त्यांचे ऐकायला/समजून घ्यायला काय हरकत आहे?
आधी हा नत्था पैशासाठी
आधी हा नत्था पैशासाठी आत्महत्या करणार असल्याचा आव आणल्या जातो.
नंतर नत्था आत्महत्या करित नाही, तो पळून जातो व दिल्लीला काम करु लागतो.
>> मधुकर इथेच तर कथेचे गमक आहे ना. असे कुंभांड रचण्याची वेळ शेतकर्यावर येते हे भयानक वास्तव सिनेमात समोर येते हेच सिनेमाचे यश नाही का?
ईथे शेतक-याला काय उगीच कशाला पुढे करण्यात आलं.>. कारण कथा शेतकर्याचीच आहे, कुणा इलेक्ट्रिशिअयनची नाही.
मुद्दा काय आणि बोंब
मुद्दा काय आणि बोंब काय?
आम्ही कोणी चित्रपट पाह्यल्याशिवाय निषेध अथवा सत्कार काहीच करणार नाही एखाद्या सिनेमाचा केवळ ऐकीव माहितीवरून.
आणि चित्रपट पाह्यल्याशिवाय मांडलेल्या अश्या मताला आम्ही किंमत देणार नाही. म्हणूनच मधुकरने मांडलेलं मत कदाचित चित्रपट पाह्यल्यानंतर पटलं नाही तरी ग्राह्य धरू कारण तो चित्रपट बघून बोलतोय.
यावर निषेध न करणे = शेतकर्यांची खिल्ली उडवणे, झोपेत असणे इत्यादी बिन्डोक गृहिते का केली जातायत?
एवढं साधं समजायला इतका त्रास का होतोय?
निधपा, तुमच्या नजरेत एका
निधपा,
तुमच्या नजरेत एका हास्यास्पद झालेल्या माणसाचे कशाला एवढे मनाला लावून घेता?
यावर निषेध न करणे = शेतकर्यांची खिल्ली उडवणे, झोपेत असणे इत्यादी बिन्डोक गृहिते का केली जातायत?
१) निषेध नोंदवला नाही म्हणुन निषेध न नोंदणारे शेतकर्यांची खिल्ली उडवतात, झोपेत असतात अशा आशयाची माझी कोणती पोष्ट आहे ते जरा सांगता का? तपासून पाहतो.
२) शेतकरी खेड्यात राहतात आणि बिगरशेतकरी शहरात हे मला तुमचे मत मान्य नाही.
शेतकरी खेड्यात राहतात तसेच शहरातही राहतात आणि बिगरशेतकरी शहरात राहतात तसेच खेड्यातही राहतात. त्यामुळे शहरी विरुद्ध खेडी असे चित्र उभे करण्यात काहीही अर्थ नाही.
मुटेजी, यातुन तुमची
मुटेजी,
यातुन तुमची शेतकर्यांच्या प्रती असलेली तळमळ,व्यथा,जाण ही नक्कीच दिसुन येते ..
पण काही लोक मात्र मुळ विषय सोडुन आपलच कस खरं म्हणणारे ही असतातच !
आत्महत्या करणारा शेतकरी हे
आत्महत्या करणारा शेतकरी हे निमित्त (हा शब्द गंभीर वजनदार अर्थाने घ्यावा, फक्त निमित्त असा घेऊ नये) घेऊन आपल्या सिस्टमवर उपहासात्मक कमेंट असा या चित्रपटाचा उद्देश आहे.
अमिर खान शेतकर्याच्या आत्महत्येचा उपहास करील असे मला वाटत नाही.
मुटेसाहेब, मी काही आमिर खानचा
मुटेसाहेब,
मी काही आमिर खानचा चाहता नाही पण आतापर्यंत त्याच्या ट्रॅक रेकॉर्ड पाहता तो या गंभीर विषयावर शेतकर्यांची खिल्ली उडवेल असे मला वाटत नाही. जर पैसे/प्रसिद्धी कमवण्यासाठी त्याने हे केले असे म्हणावे तर तो काही पैशाला मोहताज नाही किंवा प्रसिद्धीलाही नाही. जर तो त्याच्या प्रसिद्धीचा उपयोग एका संवेदनाशील मुद्दा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तो काय म्हणतोय हे एकदा ऐकुन घेणे तुम्हाला योग्य वाटत नाही का? आणि त्याने काय बनवले आहे हे न पाहताच त्याला आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे कितपत योग्य आहे? इथे विरोध होत आहे तो तुम्ही चित्रपट न पाहताच ऐकीव माहितीवर त्याला दोष देताय त्याचा. तुम्हाला चित्रपट पटला नाही आणि त्यात तुम्हाला तृटी आढळल्या त्यावर तुम्ही इथे लिहिलेत तर त्याचे स्वागतच आहे. मी हा चित्रपट पाहिला नाही त्यामुळे त्याबद्दल अनुकुल किंवा प्रतिकुल कोणतेही मत देणे मला स्वतःला तरी अयोग्य वाटते.
तुमचे शेतकरी आणि शेतकर्यांविषयीचे लेख मी वाचले आहेत. तुमचे लेखन संयमित आणि माहितीपुर्ण असते. याही बाबतीत तुम्ही जरा समजुतीने घ्यावे ही विनंती.
बाप रे! येवढ्या पोष्टी! आता
बाप रे! येवढ्या पोष्टी! आता हा सिनुमा बघावाच लागते! आमीर खान ईथे - मेलबर्न आला होता १५ दिवसापुर्वी या सिनेमाच्या प्रिमीयरसाठी तेव्हाही वाटले नाही की हा सिनेमा बघावा पण आता येवढी चर्चा होतेय या बाफवर तर बघितलाच पाहीजे!
बाकी मैत्रेयीला अनुमोदन!
मुटे साहेब, वर मानसने
मुटे साहेब,
वर मानसने लिहिलेले अगदी माझ्या मनातले विचार आहेत.
तुमचे आतापर्यंतचे (ललित आणी वैचारीक दोन्हीही) लिखाण मला खूपच आवडले आहे.
कृपया तुम्ही एकदा हा चित्रपट पहाच आणी मग त्यातल्या तुम्हाला जाणवलेल्या उणीवांवर लिहा.
मी ही एकदा हा चित्रपट पाहूनच माझे मत नोंदवेन.
<< अमिर खान शेतकर्याच्या
<< अमिर खान शेतकर्याच्या आत्महत्येचा उपहास करील असे मला वाटत नाही. >>
भरतजी सहमत. कारण आमीर असे जाणुन बुजून कशाला करेल.
माणसांच्या अंगात जो विचार अंगवळणी पडलेला असतो, त्याचे प्रतिसाद त्याच्या कृतीमध्ये आपोआप उतरतात. त्यासाठी जाणुनबुजून काहीही करण्याची आवश्यकताच नसते.
ज्या गोष्टी आपोआप घडतात त्याच्यामागे संस्कृती,प्रकृती किंवा विकृती असते.
मला यात संस्कृती,प्रकृती ऐवजी विकृती वाटली म्हणुन तर मी विकृती असा शब्द वापरला आहे.
मी चित्रपट पहिल्या दिवशी
मी चित्रपट पहिल्या दिवशी पाहिला. हा चित्रपट शेतकर्याच्या बाजूने आहे, त्यांची खिल्ली उडवली नाही. माणसाला विनोदातून अतर्मुख केले आहे.
देस मेरा रंगरेजी ये बाबू हे गाणं आहे, त्यात एक कडवं आहे.
ढाई पहाड है कंकंर शंकर
बात है छोटी बडा बतंगड
इंडिया सर है चिज धुरंधर
रंगरंगीला परजातंतर
ह्या गाण्यातनं आपल्या आख्या देशाची मानसिकता कळावी. ( ते ताशेरे ओढले असे क्लिशे काही लिहावं वाटत नाही!)
मुटे तुम्ही पिक्चर पाहा, कुठल्याही चष्म्यातून पाहिला तरी तुम्हाला पक्का शेतकरी पिक्चर दिसेल. गाभ्री सारखे अंगावर न येता सटायर मधून माणसाला विचार करायला हा पिक्चर भाग पडतो. विदर्भ कृती समितीच्या भडकाव्यात येऊ नका. :० आणि शेवटच्या क्षणा पर्यंत उठू नका.
बाकी आपली मर्जी.
गंगाधर मुटेजी तुमच्याकडुन
गंगाधर मुटेजी तुमच्याकडुन अश्याप्रकारच्या चर्चेची अपेक्षा नव्हती. मी हा चित्रपट पहिल्या दिवशीच जाऊन पाहुन आले. मला अजिबात वाटलं नाही कि शेतकर्याचीं किंवा शेतकरी आत्महात्या ह्या विषयांची खिल्ली उडवली गेली आहे. उलट आपल्या कडचा मिडीया, राजकारणी लोक ह्या लोकांची खिल्ली उडवली गेली आहे आणि तीही उपहासात्मक पध्दतीने.
मला वाटतं ह्या चित्रपटात शेतकर्यांचीच बाजू घेतली गेली आहे. तूम्ही हा चित्रपट पाहिला तर समजेल, नत्था गेल्यावर ३ महिन्यांनी सुद्धा त्याच्या घरची परिस्थितीत काहिच फरक पडलेला नसतो आणि कदाचित ही सत्य परिस्थिती आहे. स्वःता नत्थाची परिस्थिती अशी असते कि तो जिवंत असुन जगासाठी मेलेला असतो.
हा चित्रपट शेतकर्याच्या
हा चित्रपट शेतकर्याच्या बाजूने आहे, त्यांची खिल्ली उडवली नाही. माणसाला विनोदातून अतर्मुख केले आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचा त्यात उपमर्द होतोय हे मी वारंवार मांडतो आहे.
विदर्भ कृती समितीच्या भडकाव्यात येऊ नका.
निंश्चिंत रहा. विदर्भ कृती समितीच्या कार्याची अधून मधून माहीती मिळत असते. बाकी काहीच न करणार्यापेक्षा काहीतरी करणे, कधीही चांगले या न्यायाने संबधित बातम्या आवर्जून वाचत असतो. एवढाच माझा संबध.
<आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचा
<आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचा त्यात उपमर्द होतोय हे मी वारंवार मांडतो आहे. >
आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचा उपमर्द होतो, असं आपल्याला का वाटतं?
आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचा
आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचा उपमर्द होतो, असं आपल्याला का वाटतं?
१) आत्महत्येची घोषणा करून शेतकरी आत्महत्या करीत नसतो.
आतापर्यंत शेतकर्यांनी आत्महत्या केल्या त्या अशा गाजावाजा करून केलेल्या नाहीत.
घरच्यांना जराही लक्षात येणार नाही याची पुरेपुर काळजी घेऊन केल्यात. नाहीतर घरच्यांनी करू दिल्या असत्या काय? मी आत्महत्या करणार आहे असे सांगत, डंका पिटत शेतकरी आत्महत्या करीत नाही.
२) अनुदान मिळण्याच्या मोहापायी शेतकरी आत्महत्या करतात, हा देखावा निर्माण करणे चक्क वैचारीक विकृती आहे. कारण...
फारच कमी आत्महत्याग्रस्त कुटूंबाना अनुदानराशी मिळत असते, मोठ्या प्रमाणावर आत्महत्याग्रस्त कुटूंबाना काही ना काही निकष लावून मदत नाकारली जाते. ज्यांना मिळते त्यातही दलाली असते.... अजून बरेच काही.
३) शेतकरी आत्महत्येकडे खेळकरपणाने पाहाणे हा प्रकार आणी "बलात्कार होत असतांना मी खेळकरपणाने पाहत होतो" हा प्रकार यात मला फ़ारसा फ़रक आढळत नाही.
एवढाच मुद्दा सुद्धा मला निषेध व्यक्त करण्याइतपत प्रवृत्त करतो.
.......................
मी सिनेमा नक्की पाहणार आहे. पुर्वाग्रह बाजुला ठेवून शक्य तेवढ्या निरपेक्ष नजरेतून पाहण्याचा प्रयत्न करणार आहे.
आणि नंतर नक्कीच लिहिणार.
मी सिनेमा नक्की पाहणार आहे.
मी सिनेमा नक्की पाहणार आहे. पुर्वाग्रह बाजुला ठेवून शक्य तेवढ्या निरपेक्ष नजरेतून पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि नंतर नक्कीच लिहिणार. >>> नंतरच लिहा उगीच वाट्टेल ते धागे काढून लोकांचा मोलाचा वेळ नासवू नका. मी आमिरखानची चाहती आहे. मी सिनेमाचे काही भाग पाहीलेत आणि हा उत्कृष्ट सिनेमा असणार याची मला खात्रीच आहे.
खेळकरपणा हा समिक्षकाने वापरलेला शब्द आहे त्याच्याबद्दल काय इतकं बोलायचं. तो तुम्ही म्हणता त्या अर्थाने आला नाहीये. मी परीक्षण वाचलं होतं मला नाही तसा वाटला. तुम्ही तर सिनेमा न पाहता इथे वाट्टेल ते लिहीताय त्यापेक्षा ते परीक्षण किती तरी विश्वासार्ह आहे.
इतर अनेक महत्त्वाची वाक्यं त्या परीक्षणात आहेत उदा : 'उपहासाच्या माध्यमातून दिग्दर्शिकेनं आपल्या बोथट झालेल्या संवेदनेला गदगदून हलविण्याचं काम केलं आहे.' ती सोडून तुम्ही खेळकरपणा या शब्दाला का धरुन बसला आहात? 'घोषणेची' पार्श्वभूमी मला माहीतीये आणि मला त्यात काहीच चुकीचं वाटलं नाही. आमिरखान कुणाला आवडतो की नाही यापेक्षा तो एक सिनीअर आणि परिपक्व कलाकार आहे. अशा व्यक्तीने बनवलेल्या सिनेमावर टीका करताना जबाबदार असावी इतकीच अपेक्षा आहे. मायबोलीसारख्या प्रसिद्ध संकेत स्थळावर लिहीताना याचं भान ठेवायला हवं.
मला तर वाटतंय की चित्रपटाची
मला तर वाटतंय की चित्रपटाची वाईट प्रसिद्धी करुन शेतकर्यांचा प्रश्न लोकांपर्यंत पोहोचू नये आणि आमिरचा चित्रपट चालू नये यासाठी मुटे साहेबांनाच कुणी तरी मोठी रक्कम दिली नसेल कशावरुन. मुटेसाहेब तुम्ही कुणासाठी काम करताय?
मी अजून तरी पिक्चर बघायचं
मी अजून तरी पिक्चर बघायचं ठरवलं नव्हतं पण आता नक्की बघणार. पब्लिसिटी झिंदाबाद
मला तर वाटतंय की चित्रपटाची
मला तर वाटतंय की चित्रपटाची वाईट प्रसिद्धी करुन शेतकर्यांचा प्रश्न लोकांपर्यंत पोहोचू नये आणि आमिरचा चित्रपट चालू नये यासाठी मुटे साहेबांनाच कुणी तरी मोठी रक्कम दिली नसेल कशावरुन. मुटेसाहेब तुम्ही कुणासाठी काम करताय?
सगळी माणसे विकाऊ असतात, असे वाटतेय तुम्हाला. जर वाटत असेल तर मला तुम्ही किती देणार रक्कम? म्हणजे तुमच्या बाजूने लिहायला?
तुम्ही मात्र कुणाकडूनही एकही पैसा न घेता लिहीले आहे, याची खात्री आहे मला.
मात्र आमीरची चाहती असल्याने त्याची थोडी बाजू जास्त घेता एवढेच.
तसा मी आमीरच्या कलेचा दिवाना आहे.
फक्त आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचा प्रश्न त्याने जबाबदारीने नाही हाताळला, त्यामुळे वैयक्तिक प्रेम बाजुला ठेवून निषेध नोंदवतो आहे.
आमिरचा सिनेमा न पाहताच तुम्ही
आमिरचा सिनेमा न पाहताच तुम्ही मात्र शेतकरी प्रेमी आहात म्हणून वाट्टेल ते म्हणाल ते मात्र खरं मानायचं लोकांनी
शेतकर्यांची आणि त्यांच्या प्रश्नांची काळजी असलेले तुम्हीच एक आहात आणि तुम्हीच एक खरे आहात असं का समजता. आमिर खानचं फक्त प्रॉडक्शन आहे तरीही माझा त्याच्या परीपक्वतेवर पुरेसा विश्वास आहेच.
तुमची परिपक्वता किती आहे ते सिनेमा न पाहता घाईघाईने त्यावर त्याबद्दल वाट्टेल ते लिहायचा जो प्रकार तुम्ही केलात त्यावरुन कळतेच आहे.
सगळी माणसे विकाऊ असतात, असे
सगळी माणसे विकाऊ असतात, असे वाटतेय तुम्हाला. जर वाटत असेल तर मला तुम्ही किती देणार रक्कम? म्हणजे तुमच्या बाजूने लिहायला? >> हे हे माझ्याबद्दलचं मतही झालं की तुमचं तयार घाईघाईने. भारीच आहात तुम्ही शॉल्लेट हं एकदम.
तुम्ही मात्र कुणाकडूनही एकही पैसा न घेता लिहीले आहे, याची खात्री आहे मला. >> तितकीच खात्री मला आमीर खान आणि अनुषा रिजवी मुर्ख नाहीयेत याची आहे.
मात्र आमीरची चाहती असल्याने त्याची थोडी बाजू जास्त घेता एवढेच. तसा मी आमीरच्या कलेचा दिवाना आहे. >> त्याची चाहती असो किंवा नसो. मी इतका बेजबाबदारपणा नक्कीच केला नसता. टीकाच करायची तर जरा अभ्यास करुन करा की.
फक्त आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचा प्रश्न त्याने जबाबदारीने नाही हाताळला, त्यामुळे वैयक्तिक प्रेम बाजुला ठेवून निषेध नोंदवतो आहे. >> हे तुमचं मत आहे बाकी जरा नेटवर आणि इतरत्र फिरुन पहा IMDB वर ८.५ इतकं रेटींग म्हणजे विनोद नव्हे. तुमच्यापेक्षा जास्त जाणकार असे अनेक चित्रपट तज्ञ असणार याचा तरी विचार करावा.
<आत्महत्येची घोषणा करून
<आत्महत्येची घोषणा करून शेतकरी आत्महत्या करीत नसतो.>
चित्रपटात शेतकरी आत्महत्येची घोषणा करतच नाही.
चित्रपट बघा.
<शेतकरी आत्महत्येकडे खेळकरपणाने पाहाणे हा प्रकार आणी "बलात्कार होत असतांना मी खेळकरपणाने पाहत होतो" हा प्रकार यात मला फारसा फ़रक आढळत नाही.>
श्रीपाद ब्रम्ह्यांना एवढं गांभीर्याने घेऊ नका हो.. त्यांना 'गलगले निघाले' आणि 'बायको चुकली स्टॅण्डवर' हे चित्रपटही आवडतात. मुद्दा हा की ही ब्लॅक कॉमेडी आहे. 'खेळकरपणे' या चित्रपटात काही नाही, आणि प्रेक्षकही 'खेळकरपणे' हा चित्रपट बघत नाहीत.
असो.
चित्रपट बघा.
हो ना आणि काही बोलायचं असेल
हो ना आणि काही बोलायचं असेल तर श्रीपाद ब्रह्म्यांनी खेळकरपणा शब्द वापरला हे चुकीचं आहे म्हणा. उगीच आमीर खानचा निषेध वगैरे. तुमच्या निषेधाने त्याला आणि सिनेमाला काही फरक पडेल असं वाटत नाही. पडू नये अशी सदिच्छा. मी जे सीन पाहीले ते उत्कृष्टच होते. इंडीयन आयडॉलमधे पीपली लाइव ची संपूर्ण टीम आली तो भाग मी आवर्जून पाहीला. त्यात अनेक सीन दाखवले ते अतिशय उत्कृष्ट होते.
बघितला . ऑफिसमधून लवकर निघून
बघितला . ऑफिसमधून लवकर निघून ५:१५ च्या शो ला बघितला . (मला वाटल थिएटर रिकाम असेल पण जवळपास ८० % भरल होत )
या बीबी ला फॉलो केल्यामुळे फार लक्ष देऊन पाहिला .
गंगाधरजी , आत्महत्याग्रस्त शेतकर्याचा अजिबात उपमर्द केलेला नाहिये ओ . उलट त्याला तस करायला प्रव्रुत्त करणार्या सगळ्यावर ( राजकारणी , मिडिया वगैरे ) ताशेरे ओढलेत . तेही अगदी असे की हसता हसता छातीत कळ यावी .
अर्थात सिनेमा परफेक्ट आहे असा याचा अर्थ नाही . काही काही ठिकाणी तुमची वरची भूमिका पटतेही . पण त्यामागचा हेतू शुद्ध आहे हे नक्की .
आणि शेवटी निर्मात्याला ही पैसे कमवायचे आहेत हो . नाहितर हा समांतर सिनेमा झाला असता आणि कदाचित एवढा लोकप्रिय ही झाला नसता .
पण आपण Positive Side पाहूया ना . बंगलोर सारख्या शहरात (जिथे Max % लोक IT अथवा इतर नोकर्यात आहेत) एवढे लोक या सिनेमाला येतात , कुठे ना कुठे तरी अंतर्मुख होतात , आणि बाहेर पडताना
(तेवढ्यापुरता का होईना ) नत्थाचा आणि त्याच्या परिस्थितीचा विचार करतात . नॉट बॅड
आणि समजा एखाद्या शेतकर्याने
आणि समजा एखाद्या शेतकर्याने केली आत्महत्येची घोषणा तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हो. कुठलाही प्रश्न हाताळायचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकतो. हेच खरं तेच खोटं हे कसं ठरवता. आजवर आत्महत्या केलेल्या किती शेतकर्यांना तुम्ही ओळखत होतात. किती जणांच्या कुटुंबांना जाऊन भेटलात आणि समजून घेतलंत की काय झालं ते..?
केदार अगदी बरोबर. शेतकर्यांचा आत्महत्यांचा प्रश्न सर्वसामान्यांपर्यंत तळागाळातल्या सामान्य माणसापर्यंत या सिनेमामुळे पोचेल. तुम्हाला कुठल्या सिनेमातून काय घ्यायचंय ते तुम्हीच ठरवता. आमीर सिनेमाचं तात्पर्य तुमच्याबरोबर छापून कुठल्या तरी लेखी परीक्षेत ते तसच्या तसं तुमच्याकडून लिहून घेतो का?
मिन्वा तुम्ही माझ्यावर
मिन्वा तुम्ही माझ्यावर वैयक्तिक टिकाटिप्पनी करता आहात. हरकत नाही.
पण मी माझ्या निषेधाच कारण तुमच्या पोष्टच्या वरच्या पोष्टमध्ये विषद केले आहे.
त्याकडे पाहण्याचा तुमचा आणि माझा दृष्टीकोण वेगवेगळा आहे.
आणि मी परिपक्व आहे असा माझा अजिबात दावा नाही.
आमीरच्या परीपक्वतेवर मी शंका उपस्थित केली नाही.
मी फक्त त्या सिनेमातल्या "शेतकरी आत्महत्या" या विषयाच्या हाताळणी बद्दल बोलतो आहे.
तुम्ही माझ्यावर कितीही बेछुट आरोप केले तरी मी शक्यतो तुमच्यावर व्यक्तिगत टिका करण्याचे टाळेन कारण माझा लढा हा कोणत्या व्यक्तीविरूद्ध नसून "प्रवृत्ती"बद्दल आहे.
मिन्वा तुम्ही माझ्यावर
मिन्वा तुम्ही माझ्यावर वैयक्तिक टिकाटिप्पनी करता आहात. हरकत नाही. >> आणि तुम्ही आमीरखानवर वैयक्तीक टिका टिपण्णी करता ते चालतं. कारण तो सेलेब्रिटी आहे म्हणून का? हेच सगळं तुम्ही जास्त अभ्यास करुन आणि मुख्य म्हणजे सिनेमा पाहून लिहीलं असतंत तर काहीतरी अर्थ असता या धाग्याला. त्याशिवाय लिहीलंत म्हणजे हा धागा तुमचा वैयक्तीक आकसच झाला की? तुम्ही काय असा अभ्यास करुन लिहीताय?
मी फक्त त्या सिनेमातल्या
मी फक्त त्या सिनेमातल्या "शेतकरी आत्महत्या" या विषयाच्या हाताळणी बद्दल बोलतो आहे. >> आणि हे मी सिनेमा न पाहताच बोलतो आहे. हे वाक्य पुढे जोडून वाचा.
अरे अजुन संवाद सुरुच आहे?
अरे अजुन संवाद सुरुच आहे?
गंगाधरजी तुम्ही चित्रपट पहाणार आहात वा नाही? आमच्या साठी नाही त्या शेतकर्यांसाठी तर बघा. तुम्हाला एक नवीन दिशा मिळेल...
Pages