पीपली लाइव्ह आणि सिंपली सुसाईड.
मी नाही पाहीला हा चित्रपट. पण बातम्यावरून लक्षात येतंय की शेतकरी अनुदानाच्या लोभापायी आत्महत्या करतो, असा आभास त्या चित्रपटात निर्माण करण्यात आलेला आहे.
तसेही शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात, वेडसर असतात म्हणुन आत्महत्या करतात, आळशी असतात म्हणुन आत्महत्या करतात आणि अशिक्षित असतात म्हणुन आत्महत्या करतात वगैरे-वगैरे अक्कलेचे तारे यापुर्वीच विचारवंतानी तोडलेच आहे,(संदर्भ; 'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे') त्यात पुन्हा एका नव्या विचारवंताची भर पडली म्हणायची.
शेतकर्याच्या आत्महत्यांची कारणे शोधली जात नाहीत, उपाययोजना केल्या जात नाहीत आणि प्रामाणिक प्रयत्नही केले जात नाहीत.
याउट त्यांच्या जखमांवर मीठ चोळून विकृत चित्र उभे केले जाते. आणि त्याचा निषेध व्यक्त करण्याची साधी गरजही सामान्य माणसाला भासत नाही, काय म्हणावे याला?
ज्या सुसंस्कृत समाजाकडून त्याने न्यायाची अपेक्षा करावी तोच समाज जर असा विकृतीने पिडलेला आहे, हे जर त्याच्या लक्षात आले आणि तशी खात्री झाली तर मग तो न्यायासाठी स्वत:चे मार्ग स्वत:च शोधेल आणि अशा सुशिक्षित-सुसंस्कृत समाजाच्या विकृत विचारांपेक्षा असभ्य रानटी मावो/नक्षलवांद्यासारख्यांची सहानुभुती त्याला जवळची वाटली तर.......????????
तर त्याचे काही चुकते हे मी तरी त्याला कसे समजावणार.....?????????????????????
शेतकर्याला मुख्य प्रवाहापासून दुर फ़ेकून द्यायचे नसेल तर....
हे भारतियांनो त्या पीपली लाइव्हचा निषेध करा.
अगदी जमेल त्या मार्गाने... जमेल तसा....जमेल त्या पद्धतीने.......!!
गंगाधर मुटे
..................................................................................
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?
..................................................................................
.
.
ता.क- मी चित्रपट पाहीलेला नाही आणि पहावे असे वाटतही नाही. कारण शेतकर्यांच्या आत्महत्या विनोदाचा विषय होणे किंवा विनोदी चित्रपटात शेतकर्यांच्या आत्महत्येसारखा गंभिर विषय हाताळणे हेच मुळी विकृतीचे लक्षण आहे. हा विषय तीन तासाच्या एका चित्रपटातच काय दहा चित्रपटात सुद्धा आवाक्यात येणार नाही असा विषय एखाद्या चित्रपटात तोंडी लावून चघळण्याइतका किरकोळ वाटावा, ही विचारशैलीच शेतकर्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोण स्पष्ट करून जाते. ’पीपली’ च्या जाहिरातीचा टीव्हीवरील छोटासा संवादच ऐकणे जेथे जड गेले तेथे माझ्यासारख्याला पुर्ण सिनेमा शांतपणे बसून पाहणे शक्य होईल?
.............................................................................................
दुपारी २.२४ वाजता
esakal.com - वरिल http://72.78.249.107/esakal/20100814/5039280691352829503.htm
या लिंकवरील पीपली (लाइव्ह) > आपल्या कोडगेपणाच्या कानाखाली काढलेला आवाज - हा त्या चित्रपटाबद्दल भाष्य करणार्या लेखातील काही भाग पहा.....
.
दिग्दर्शिकेनं इथं मुख्य प्रदेश नावाच्या भारताच्या काल्पनिक राज्यातला एक गरीब शेतकरी नथ्था (ओंकारदास माणिकपुरी) कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याची घोषणा करतो, या "थीम'भोवती सगळी कथा मांडली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खरोखर गेल्या काही वर्षांत या देशाला लागलेला कलंक आहे. मात्र, याच विषयाकडं खेळकरपणानं पाहत, उपहासाच्या माध्यमातून दिग्दर्शिकेनं आपल्या बोथट झालेल्या संवेदनेला गदगदून हलविण्याचं काम केलं आहे. नथ्था आणि त्याचा मोठा भाऊ बुधिया (रघुवीर यादव) कर्जमाफीसाठी त्यांच्या भागातल्या पुढाऱ्याकडं जातात. तेव्हा तो त्यांची थट्टा करून आत्महत्या करण्याचा सल्ला देतो. मात्र, त्याच्या या तिरकस सल्ल्यानंतर नथ्था व बुधिया खरोखर आत्महत्या करण्याचा विचार करू लागतात.
.
१) असा घोषणा करून शेतकरी आत्महत्या करीत असतो? हे विकृत विचार नाही?
२) शेतकरी आत्महत्येकडे खेळकरपणाने पाहात? या वाक्यात आणी "बलात्कार होत असतांना मी खेळकरपणाने पाहत होतो" या वाक्यात मला फ़ारसा फ़रक आढळत नाही.
काय करावे या खेळकरपणाचे?
३) शेतकरी कर्जमाफ़ीसाठी कुणापुढे हात पसरतात? या उलट १० रुपये मुद्दल रक्कमेचे व्याजासहित ५०० रू फ़ेडता-फ़ेडता पिढ्या बरबाद झाल्या.
यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की हा समाज शेतकरी वर्गाकडे किती गांभिर्याने पाहतो.
त्याच्या आत्महत्येवर निट अभ्यास करता येत नसेल तर नका करू पण असा विकृतीपुर्ण विपर्यास का करता?
..
याला विकृत विचार म्हणणे पटत नसेल तर नेमके विकृत विचार कशाला म्हणायचे, हे जरा मला समजून सांगावे. माझ्या मनाचे दरवाजे सताड उघडे आहे.
............................................................
सायं ६,०० वाजता वाढवलेली पोष्ट.
काल आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या विधवांनी आमीरच्या पोष्टरची "होळी केली"
बातमी....
स्वतंत्रता दिवस के दिन रविवार को जहां एक ओर पूरा देश आजादी का पर्व मनाने में व्यस्त था तो दूसरी ओर महाराष्ट्र में पांच हजार विधवाएं आमिर खान की पीपली लाइव के पोस्टर जला रही थीं। विदर्भ जन आंदोलन समिति के बैनर के तले नागपुर से 150 किलोमीटर दूर यवतमाल जिले में जुटीं इन विधवाओं की बस एक ही मांग थी कि आमिर खान उनसे माफी मांगे और सरकार फिल्म पर प्रतिबंध लगाए।
कहते हैं कि आमिर की नई फिल्म के कारण विदर्भ के किसान और और हजारों विधवाएं गुस्से में हैं। क्योंकि इस फिल्म में दिखाया गया है कि किसान मुआवजे के लालच में आत्महत्या करते हैं। तिवारी कहते हैं कि आमिर खान को किसानों के मुद्दे से कोई मतलब नहीं है। वे बस अवार्ड जीतने के लिए फिल्म बनाते हैं।
आमिर खान की पीपली लाइव रिलीज होने से पहले से ही विवादों में रही है। महाराष्ट्र के किसानों ने इस फिल्म को प्रतिबंध लगाने के साथ सेंसर बोर्ड से सर्टिफिकेट वापस लेने की मांग की है।
दस साल में मर चुके हैं दो लाख किसान
एक दशक में देश में दो लाख किसानों ने आत्महत्या की है। इसमें विदर्भ क्षेत्र में चालीस हजार किसान शामिल है। लेकिन आज तक विधवाओं को अपने पति की मौत का मुआवजा नहीं मिला है। इलाके के किसानों का कहना है कि पीपली लाइव के कारण उन 1.60 लाख विधवाओं के सामने मुआवजे का संकट आ खड़ा हो गया है जिनके पतियों ने सरकार की गलत नीतियों के कारण आत्महत्या की थी। यह फिल्म राजनेता, अधिकारियों की सोच का समर्थन करती है। (दै.भास्कर मधिल संपादित बातमी)
प्रश्न हा की शेतकर्यांच्या
प्रश्न हा की शेतकर्यांच्या आत्महत्येचा विषय इतक्या हलकेपणाणे का मांडावा.<<
चित्रपट न बघता हे कसं ठरवलं?
चित्रपट न बघता हे कसं नाकारता?
चित्रपट न बघताच
चित्रपट न बघताच शेतकर्यांच्या आत्महत्येची खिल्ली उडवलीये हे कसं कळलं तुम्हाला श्रीयुत अंतर्ज्ञानी?
शेतकरी आत्महत्येमागची तळमळ
शेतकरी आत्महत्येमागची तळमळ आणि समस्येचं गांभीर्य समजावून घ्यायला इथे कुणाला वेळ आहे, असेच ना?
>> चिनूक्स आणि चित्रपट पाहिलेल्या इतर लोकांच्या प्रतिक्रियांवरून आमिर खाननं तेच करण्याचा प्रयत्न केला आहे असं वाटतय.. नुसतं समजून घेणं नाही, स्वतःचा वेळ आणि शक्ती घालवून ते आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे - असं ह्या लोकांच्या प्रतिक्रियांमधून मला वाटतय
आणि म्हणूनच चित्रपट नक्की पहाणार आहे!
तुमच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित नसलेलं चित्रपटविषयक मत तुमचं स्वतःच कसं असू शकेल?
जसं वरचे सगळे म्हणताहेत म्हणून हा चित्रपट 'चांगलाच असेल' हे आपण गृहीत धरू शकत नाही, तसच न पाहता 'तो वाईटच असेल' हे ही ठरवू शकत नाही - ठरवू नयेही!
चित्रपट न बघता हे कसं
चित्रपट न बघता हे कसं नाकारता? स्मित
आहो पण न बघता केलेल मतप्रदर्शन स्विकारावं तरी कसं आणी ग्राह्य तरी कस मानावं ? आणी फक्त जाहिराती बघुन सुद्धा तुमचं म्हणण पटतच नाहिये... असो. मी का माझे डोक्यावरचे केस उपटुन घेतोय उगाच... श्याआआआआअ
<<< पुन्हा तेच. ज्याला तुम्ही
<<< पुन्हा तेच. ज्याला तुम्ही हलकेपणा म्हणताय तो ब्लॅक ह्युमर. तो चित्रपट तयार करण्याचा एक प्रकार असतो, त्याला अविष्कारस्वातंत्र्य म्हणतात. शेतकरी ह्या प्रशनाला इतरांनी हातच घालायचा नाही का?
मग माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मेलयं का?
मी काय नाकारलं? मी
मी काय नाकारलं?
मी चित्रपटाबद्दल कुठलंच विधान केलेलं नाही. चित्रपट न बघता तुम्ही केलेल्या भोंगळ विधानांना आणि आदळआपटीला माझा विरोध आहे.
आता मला बोर झालं. तुमच्या एकांगी आणि झापडबंद मुद्द्यांवर वेळ घालवायला मी रिकामटेकडी नाही.
मी वारंवार शेतकर्यांच्या
मी वारंवार शेतकर्यांच्या आत्महत्येची खिल्ली उडाली असे म्हणतोय.>> वाट्टेल ते बोलु नका. शेतकर्यांच्या आत्मह्त्येची खिल्ली कुणीही उडवलेली नाहीये, media,राजकारणी अशा इतर लोकांची खिल्ली उडवली आहे.
रच्याकने, मुटेसाहेब एरवी एव्हड छान लिहिता आजा का असे डोक्यावर पडल्यासारखे करताय?>> हे इतरवेळेस छान लिहितात? मला तर बुवा फक्त अतार्किक/impractical आरडाओरडाच दिसतो त्यांच्या पोष्टमधे.
<<<यातून एक गोष्ट स्पष्ट
<<<यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की सुसंस्कृत समाज शेतकरी वर्गाकडे किती गांभिर्याने पाहतो.>>> हे वाक्य लिहिलंय. मला वाचता वाचता ते खरंच खटकलं. यात तुम्ही सरळ सरळ इम्प्लाय केलंय की सुसंस्कृत समाज हा शेतकरी वर्गापेक्षा वेगळा आहे. सगळा सुसंस्कृत समाज हा शेतकरी नाही पण शेतकरी वर्ग हा सुसंस्कृत नसतो का? हे असं म्हटल्याबद्दल तुमचा तीव्र निषेध.
तुमचा निषेध मी स्विकारतो.
(एखादा मोघम शब्द व्यक्तिगत पातळीवर भावना दुखवू शकतो म्हणुन, यापुढे काळजी घेईन)
<< शेतकर्यांच्या
<< शेतकर्यांच्या आत्मह्त्येची खिल्ली कुणीही उडवलेली नाहीये>>.
arc,
तुमच्या मतापेक्षा माझे मत वेगळे असू शकते. तो जोपासण्याचा अधिकार मला आहे.
मग माझं अभिव्यक्ती
मग माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मेलयं का? >>
नाही, नाही. असं कसं मरेल? पुरणपोळीला कोल्हापुरी मटण रस्सा म्हणण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे तुम्हाला. आणि तुमच्या अभिव्यक्तीला माझा पुन्हा एकदा __/\__
नीरजा, तूला मात्र बोर होण्याचं स्वातंत्र्य नाही हां.

arc..
१) असा घोषणा करून शेतकरी
१) असा घोषणा करून शेतकरी आत्महत्या करीत असतो? हे विकृत विचार नाही? >> मी तरी खुपदा वाचले आहे पेपरात " ... योग्य भाव मिळाला नाही तर आत्मदहनाचा ईशारा दिला आहे "
याला विकृत विचार म्हणणे पटत नसेल तर नेमके विकृत विचार कशाला म्हणायचे, हे जरा मला समजून सांगावे >> लिंक मधिल लेखाचे र्शिषक आपल्या कोडगेपणाच्या कानाखाली काढलेला आवाज 'मुद्दामुहुन' नजरेआड करुन आपल्या फायदयाच्या शंब्दांनाच बोल्ड करणे ...
यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की सुसंस्कृत समाज शेतकरी वर्गाकडे किती गांभिर्याने पाहतो. >> पोरकट पणा आहे हा ... अहो तुमचा काही गैरसमज झाला आहे ... शेतकरी समाज पण सुसंस्कृत समाजाचा भाग आहे ... शेतकरी vs सुसंस्कृत समाज असा विकृत सामना करण्याचा तुम्ही चंग बाधला आहे...
गंगाधरजी, तुमच्या
गंगाधरजी, तुमच्या शेतकर्यांविषयीच्या भावना मी समजू शकतो अन मला त्याचा आदरही आहे अन तो राहणारच. पण कोणाच्यातरी घाणीवर नेहमीच ओरडण्यापेक्षा ती अस्वच्छतचे मूळ कारण अन त्यावर योग्य त्या उपाययोजना शोधण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असं मला वाटतं. बोट दाखवून प्रश्न सुटत नसतात त्यासाठी मदतीचा हात पुढे करावा लागतो.
चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढवली आहे तुम्ही.
नक्कीच बघावा असाच आहे पिक्चर. जर काही आक्षेपार्ह असेल तर त्याचा निषेध हा नोंदवलाच जाईल ते काही सांगायला नको आहे. पण न बघता आक्षेप नोंदवणे, हा एकतर्फी विचार वाटतो.
तरीही माझ्या वाचनात आलेल्या पैकी हे एक पान ...
http://www.hindustantimes.com/Vidarbha-farmers-condemn-Peepli-Live-burn-...
पुरणपोळीला कोल्हापुरी मटण
पुरणपोळीला कोल्हापुरी मटण रस्सा असे सांगून तसेच आमच्यामुखातून वदवून घ्यायचे दिवस संपलेत.
ती आशा आता यापुढे बाळ्गुही नका.
आता त्या शेतकर्यालाही नेमके अर्थ समजून घ्यायची समज आली असावी. म्हणुन तर त्यांनी काल "होळी" केली.
माझ्या तुमच्या अडवण्याने हे थांबणार नाही.
........................
आमचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हटले की पुरणपोळीला कोल्हापुरी मटण रस्सा
आणि
तुमचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे बावनकशी सोने.
व्वा व्वा..
क्या बात है....!!
जियो मेरे यार.
चित्रपट पाहिल्यावर ७
चित्रपट पाहिल्यावर ७ प्रतिसाद, आणि न पाहिल्याचे ७७. अरे काय चाललय काय?
एनीवे मुटेजी- आता किमान १० लोकं अजून पाहतील, हेच मला समाधान आहे. धन्यवाद. अजून २ आठवडे अशीच पब्लिसिटी करा.
शेतकरी समाज पण सुसंस्कृत
शेतकरी समाज पण सुसंस्कृत समाजाचा भाग आहे ....!
अख्या आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला/वाचला मी हा शब्द.
दर्जा दिल्याबद्दल आभारी आहे.
अहो मुटे इतर लोकांनी चित्रपट
अहो मुटे इतर लोकांनी चित्रपट पाहिला नसला तरिही पेपरात आलेल्या लेखाला आणि ज्यांनी सिनेमा पाहिलाय त्यांच्या मताला या लोकांचा दुजोरा असु शकतो. पण चित्रपटात शेतकर्यांच्या आत्महत्येची खिल्ली उडवली आहे असं म्हणणारे तुम्ही एकमेव आहात. तेव्हा चित्रपट पहा आणि मग बोला... ते बरं नाही का?
पण चित्रपटात शेतकर्यांच्या
पण चित्रपटात शेतकर्यांच्या आत्महत्येची खिल्ली उडवली आहे असं म्हणणारे तुम्ही एकमेव आहात. <<
ते ही चित्रपट न बघताच.
रैना अगदी अगदी... आता जे
रैना अगदी अगदी...
आता जे पहाणार नव्हते ते हि पाहतील सिनेमा
नी तु करेक्ट बोली, ये झापडबंद
नी तु करेक्ट बोली, ये झापडबंद निषेध(च) है..
इतका झापडबंद विरोध पाहून मला
इतका झापडबंद विरोध पाहून मला हेतूबद्दल शंका येतेच आहे.
तीच जी मी वरती बोलून दाखवली ती...
निगेटिव्ह पब्लिसिटी.... कंत्राट इत्यादी...
दक्षिणा, मी पाहिला नसला तरी
दक्षिणा,
मी पाहिला नसला तरी जे काही खात्रीलायक कळले त्यावरून मी जे म्हणतोय त्यावर ठाम आहे.
इतरांना काय वाटते, हा त्यांचा दृष्टीकोण आहे.
मला काय वाटते हा माझा दृष्टीकोण आहे.
शेतकर्यांच्या आत्महत्येबाबत इतरांचा दृष्टीकोण काय आहे ते मला माहीत आहेच. तोच दृष्टीकोण या सिनेमा बद्दल असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मी तो स्विकारला पाहीजे हे आवश्यक नाही.
नाही का?
तोच दृष्टीकोण या सिनेमा बद्दल
तोच दृष्टीकोण या सिनेमा बद्दल असण्याची शक्यता आहे >> काय डेंजर माणूस आहे! नुसत्या शक्यता असल्याच्या संशयावरून इतका गदारोळ, तर सिनेमा बघितल्यावर किती?
बाप रे! नकाच हो बघू प्लीज.
गंगाधरजी.. तुमचा दृष्टीकोण हा
गंगाधरजी.. तुमचा दृष्टीकोण हा फक्त निषेधापुरताच मर्यादित असल्यासारखा वाटतोय.
इतका झापडबंद विरोध पाहून मला
इतका झापडबंद विरोध पाहून मला हेतूबद्दल शंका येतेच आहे.
तीच जी मी वरती बोलून दाखवली ती...
निगेटिव्ह पब्लिसिटी.... कंत्राट इत्यादी...
निधपा, सगळच काही तुम्हाला वाटेल.
फक्त काल ज्यांनी "होळी" केली त्या शेतकर्यांनाही काही भावना असतात, एवढच तुम्हाला नाही वाटणार.
इतरांना काय वाटते, हा त्यांचा
इतरांना काय वाटते, हा त्यांचा दृष्टीकोण आहे.
मला काय वाटते हा माझा दृष्टीकोण आहे. >>>>>> न बघताच चुकीचा दृष्टिकोन बनवला असण्याची शक्यता डावलताय, त्याचं काय?
"दिखावोंपे मत जाओ, अपनी अकल लगाओ"
शेतकरी समाज पण सुसंस्कृत
शेतकरी समाज पण सुसंस्कृत समाजाचा भाग आहे ....!
अख्या आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला/वाचला मी हा शब्द.
दर्जा दिल्याबद्दल आभारी आहे.<<
मुटे सर तुमच्याकडून ह्या प्रकारची पोस्ट आली याचे जास्त अस्चर्य वाटले.
हे म्हणजे आपणच आपल्याला हिन लेखण्यासारखे आहे. खरचं इतकं संस्कृतीहीन जगणे जगतो का हो प्रत्तेक शेतकरी.
मी माझ्या शंका बोलून
मी माझ्या शंका बोलून दाखवल्या. तुम्ही तर सरळ सरळ आरोप केलेत नुसत्या शक्यतांवरून.
पण काय करणार शेतकरी हा कायमच गरीब बिचाराच असतो. त्याची कधीच काहीच चूक नसते. त्याच्या दुर्दशेला तो सोडून सगळे जबाबदार असतात. आणि शहरातला माणूस हा कायमच वाईट असतो. अश्या चष्म्यानेच तुमचा सगळा विचार घडत असतो... जाउ द्या....
शेतकर्याच्या आत्महत्येची नक्कीच नाही पण तुमची खिल्ली उडवण्याइतके हास्यास्पद नक्कीच झाले आहात तुम्ही.
अहो आम्ही सक्ती नाही करत
अहो आम्ही सक्ती नाही करत तुम्हाला की आम्ही जे म्हणतोय ते तुम्ही अॅक्सेप्ट करा म्हणून. पण सिनेमा न पाहता निरर्थक बोलू नका किंवा मत मांडू नका... मी ही सिनेमा पाहिलेला नाही, मी मांडलंय का चित्रपटाबद्दल काही मत? चित्रपटाविषयी खात्रीलायक अशी 'पॉझिटिव्ह' माहीती आम्हाला ही कळली आहे, पण आम्ही कुठे बीबी उघडून जाहीरात मांडलीये त्याची?
सचिन, शेतकरी कसा जगतो
सचिन,
शेतकरी कसा जगतो यापेक्षा शेतकर्याला समाजात काय दर्जा आहे हे महत्वाचे.
दक्षिणा, पण आपल्याला मत
दक्षिणा, पण आपल्याला मत मांडायचा अधिकारच नाहीये. आपण शहरातले संवेदनाशून्य लोक आहोत. जी काय संवेदना आहे ती फक्त शेतकर्यांच्याच ठायी आहे. तेव्हा त्यांची बाजू घेणारा ज्याला सिनेमा न बघताही खात्रीलायक माहिती म्हणतो त्याला खात्रीलायक म्हणायलाच हवे.
Pages