मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवा मी नवीन फ्रीज घेतला ...
(आता उनाड व एकटे राहणारा अविवाहित मुलगा फ्रीज कशासाठी घेईल बरे ?? Happy ... हुशार आहात हो .. सग्गळे समजते तुम्हाला ! Proud )
मग मला सकाळी एकदम उमजले कि फ्रीज मध्ये भरपूर रिकामी जागा आहे ... फळे वैगेरे घ्यावीत असा विचार केला ...
आई शप्पथ सांगतो मी " फळे कुठे मिळतात " ह्या प्रश्नांवर पंधरा मिनिटे विचार केलाय मी काल !
माझ्या ऑफिसच्या खालच्या मजल्यावर भले मोठ्ठे रीलाय्नास फ्रेश आहे !

विश्ल्या, स्वतःची गाडी समजुन दुसर्‍यची गाडी नेन्याचे उपद्व्यात मी २-३ वेळा तरी केलंय.. >>>
मल्ल्या मास्टर की असते काय तुझ्याकडे? कि काही पुर्वानुभव... कशाचा ते विचारू नका रे कोणी! Proud

अमा, केवळ मुलुंडमधेच नाही तर हैदराबादमध्येही असाच पराक्रम केलाय मी बंजारा हिल्सच्या परिसरात. फक्त हैदराबादमध्ये मित्राची सँट्रो होती बाईकच्या ऐवजी. Wink

अमा, केवळ मुलुंडमधेच नाही तर हैदराबादमध्येही असाच पराक्रम केलाय मी बंजारा हिल्सच्या परिसरात. फक्त हैदराबादमध्ये मित्राची सँट्रो होती बाईकच्या ऐवजी>>
अरे तेव्हा तरी फोन केला असतास मै बंजारा हिल्स का भी चप्पा चप्पा जानती हू. उधरीच रहती हू.
आता निळू भाव वराड्तील. फ्रिजमधून डोके बाहेर काढून. दिवे दिवे .

अमा Lol

अमा..:हाहा: थोड्या वेळाने निळु भाव फ्रिज मधुन डोकं कढुन म्हणतील की काहितरी सापडत नाही, तेव्हा त्याला म्हणु नका की अरे तेव्हा तरी फोन केरायचार... मै फ्रिजकाभि चप्पा चप्पा जानती हु.. अभी मै उधरीच रहती हू... Light 1

मल्ल्या Rofl

मै फ्रिजकाभि चप्पा चप्पा जानती हु.. अभी मै उधरीच रहती हू... >> मल्ल्या तुस्सी ग्रेट हो Proud

मल्ल्या तुस्सी ग्रेट हो>>>>

मल्ल्या अभिनंदन... नवीन पदवी मिळाली तुला.
(बादवे बावळटच आहेस ऐकुन घ्यायची सवय असल्याने हे वाचायला / ऐकायला कसेसेच वाटत असेल ना? Wink )

आता उनाड व एकटे राहणारा अविवाहित मुलगा फ्रीज कशासाठी घेईल बरे ?? >>>>

काय असतं निळुभाऊ, अहो त्या वयात, अविवाहित अवस्थेत कपडे ठेवण्यासाठी कपाट पण वापरता येत हे माहीत नसतं ना? Wink

मल्लीभाऊ! Lol

क्या खाला ... तुमे बंजारा हिल्स मी रेहेते क्या ! ?
मेरेकू बतानेका नही क्या ?
मई पंजागुट्टा में रेहेता ना यारो ... !
कभ्भी भी आओ ... बस पूछो की अख्तर हैद्राबादी किदर मिलेगा करके !
बच्चा बच्चा बोल दिंगा ..
क्या कते ? Happy

इथे आमच्या स्वयंपाकाच्या बाईंचा वें.पणा लिहू का?

शनिवारी संध्याकाळी सोलकढी करण्यास सांगितले. तर बाईसाहेबांनी उकळले नारळाचे दूध आणि घातले त्यात कोकमाचे आगळ. :कप्पाळ बडवणारी बाहुली:
सगळे दूध फाटले. Sad

ऐ ... विशाल खरचं रे ...
माझ्या कपाटात फक्त मी वापरत नसलेल्या कपड्यांची bag आहे ...
आयला ... हुशार आहात कि हो राजे तुम्ही ! Happy

"स्वतःची गाडी समजुन दुसर्‍यची गाडी नेन्याचे उपद्व्यात मी २-३ वेळा तरी केलंय"
मल्लिनाथ, असा उपद्व्याप सई परांजपेंनी पण केला होता...तेव्हा तुम्हाला नाटके, चित्रपट, दूरदर्शन मालिका यांचे दिग्दर्शन करायला हरकत नाही.

हह्पुवा Happy

हुशार आहात कि हो राजे तुम्ही !
विसल्रास का... (बॅचलरच्या) घरो घरी फ्रीजच्याच कपाट...
आणि एके काली आम्हीही बॅचलर होतो बर्का...

त.टी: हे मातिच्या चुली सारखं वाचावं

अरे अश्विनिमामी, चराचरात सामावलिये.......... वोह तो पुरे ईंडिया मे वर्ल्ड फेमस है...... Biggrin
मामी धन्य आहात......

आणि एके काली आम्हीही बॅचलर होतो बर्का...>>>

मल्ल्या, एवढं काही नको बरंका हळहळायला Wink

परवा मी नवीन फ्रीज घेतला ...
(आता उनाड व एकटे राहणारा अविवाहित मुलगा फ्रीज कशासाठी घेईल बरे ?? स्मित ... हुशार आहात हो .. सग्गळे समजते तुम्हाला ! फिदीफिदी )
मग मला सकाळी एकदम उमजले कि फ्रीज मध्ये भरपूर रिकामी जागा आहे ... फळे वैगेरे घ्यावीत असा विचार केला ...
आई शप्पथ सांगतो मी " फळे कुठे मिळतात " ह्या प्रश्नांवर पंधरा मिनिटे विचार केलाय मी काल !
माझ्या ऑफिसच्या खालच्या मजल्यावर भले मोठ्ठे रीलाय्नास फ्रेश आहे !

निळूभाऊ
तसा तर तुमच्या घरात झाडू पण आहेच की... कधीतरी हे पण आठवु द्याकी....

हौर क्या मियां...
इधर भी तिन टेम देरे ना तुम
जैन्याभाई कु मिल्के आरे क्या..

काल बाळाचे फोटो काढण्यासाठी म्हणुन कॅमेरा नि त्याची बॅटरी कॅमेरा केस मधुन काढले. सगळे आवरुन बाळाचे फोटो काढताना कॅमेरा चालु केला, पण चालुच होईना.. Sad २ -३ वेळा प्रयत्न केला, पण कॅमेरा मला ईज्जतच देईना. मग वैतागुन विचार केला की काल बॅटरी चर्जींग ला लावलेली, ती निट झाली नसेल. रागा रागाने, मग बॅटरी काढन्यासाठी कॅमेरा उजव्या हातातुन डाव्या हातात घेतलं..... अन तेव्हा डोक्यात प्रकाश पडला. कारण डाव्या हातात बॅटरी मी तशीच धरलेली, कॅमेरात घालन्याऐवजी. Sad

कॅमेरा मला ईज्जतच देईना. >> Lol Lol Lol
=====================
त्याला जे हवं ते तुम्ही दिलं नाहीत,
म्हणून तुम्हाला जे हवं ते त्यानी दिलं नाही ...

हिसाब बराबर ... Happy

अरे, मला फोन का नाही केला ? मी रोजच कॅमेराच्या बॅट्रीज चार्ज करून माउस मध्ये घालून वापरते. Happy

>>अरे, मला फोन का नाही केला ?>><<

मला वाटले आता अमा म्हणणार की 'मै कॅमेराका चप्पा चप्पा जानती हू' Happy

अमि नाही असले खरोखर कामाचे वाक्य टाकायचे नाही चोरी पकडी जायेगी. फोटो निघाले कि नाय पण? नाहीतर बाळ झोपून जाईल ना.

.

Pages