मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विशाल >>>>> Lol Lol Lol

एकदा, सासूबाईंच्या हाताखाली पनीर बनवायला शिकत होते. उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे हाताशी एक पाण्याची बाटली होती. पनीर बनवण्याकरता विनेगार ची बाटली सुध्दा शेजारीच होती......

काय झालं असेल ते सांगायला नकोच!

पण सगळ्यात गंमतीची गोष्ट म्हणजे तो दिवस १ एप्रिल चा होता ... आता बोला! कोणी स्वतःलाच कधी एप्रिल-फूल केलेलं पाहिलयं?

<<<एकदा, सासूबाईंच्या हाताखाली पनीर बनवायला शिकत होते. उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे हाताशी एक पाण्याची बाटली होती. पनीर बनवण्याकरता विनेगार ची बाटली सुध्दा शेजारीच होती......>>

म्हणजे थोडक्यात, सासुबाईंच्या हाताखाली "मामी","पाण्याची बाटली" आणि "विनेगारची बाटली" असे तिघेही होते तर......... Rofl

सासुबाईं के हाथ बहौत लंबे है............. Lol Biggrin

आज किचन आवरायला घेतलं . आणि हो....आवरायला घेतलं की आधी खूप पसारा घालायचा असतो. मग तो आवरायचा. एकदम नुस्तंच आवरण्यात काहीच मजा नाही. नॉट अलाउड.
कपाटातून सफोला राईसच्या पिशवीची रबर बँड लावलेली गुंडाळी काढली. त्यात अर्थातच उरलेले तांदूळ असणार असं समजून त्याचं रबरबँड काढलं. भराभरा तांदळाचा डबा घेतला. पटकन झाकण काढून पिशवीतले उरलेले तांदूळ(?) रिकामे केले. अर्रर्र्......काही तरी गडबड.....! पाहिलं तर त्या पिशवीत अस्मादिकांनीच कधी तरी पोह्यांचा आणि मुरमुर्‍यांचा चाळ ठेवला होता. इडली/उत्तप्यात वापरता येईल म्हणून. मग आठवलं...इतकी चांगली पिशवी कशाला फेका म्हणून पिशवी ठेवलेली. वर पोहे आणि मुर्मर्‍याचा चाळ ..तोही कशाला फेका वापरता येईल म्हणून तो चाळ त्या पिशवीत घालून त्या पिशवीची छानपैकी गुंडाळी करून त्याला रबरबँड(तेही छानपैकी) लावून ही गुंडाळी कपाटात ठेवलेली.......!

मी मध्यंतरी एक रघू नावाचं पात्र तयार केले होतं आणि त्याचे येडपट, बावळट किंवा कधी हुशारीचे किस्से (आधारः विविध जोक्स आणि कल्पनाशक्ती) यावर आधारित एकेका गोष्टीचे घाणे काढायचे. तर ते फारच hit झालं. >>>>

मामी, तुमच्या या रघू च्या गोष्टींची सीरीज गुलमोहरात बालसाहित्यात काढा की Happy

कोलज मधे असताना मि सलवार उल्ता घात ला होता आनि कहर म्हणजे एका पायात एक चप्पल आनि एक पायात एक च प्प ल होति G :

>>>
आर्या, एका पायात एक चप्पल आनि एक पायात एक च प्प ल >>> रीपीटेशन व्हाय व्हाय??? हा पण वेंधळेपणाच झाला की. Uhoh आणि एका पायात आम्ही ही एकच चप्पल घालतो बरं का. २-२ नाही हो घालत. Light 1

पुण्यात COEP ला असतानाची गोष्ट ! आम्ही दहा बारा जणांनी मिळून गोखलेनगरला (बारामती हॉस्टेलच्या मागे) एक रुम भाड्याने घेतली होती. वापरायच्या वस्तू सगळ्या कॉमन अगदी साबणासहीत ! कारण त्या सर्वांनी मिळून पैसे खर्च करून घेतलेल्या असायच्या. तेवढीच पैशांची बचत. (वाचवलेले पैसे प्यार्टीला उपयोगी पडायचे Wink )
तेव्हा "निम" म्हणून एक नवीन साबण आला होता. काळ्या रंगाचा साबण असायचा तो. मी नुकताच सोलापूराहून परत आलो होतो काही दिवसाच्या सुट्टीहून. उत्त्याला (उत्तम पुंडे...हा खरोखर कोल्हापूरचा पुंड होता) विचारले..."साबण आहे का रे अंगाचा?"
त्यावेळी या लोकांनी निम आणला होता, स्वस्त होता ना! उत्त्याने सांगीतले...
तिथे आहे बघ कोनाड्यात, काळ्या रंगाचा!"
मी साबण उचलला, चांगला अंगाला घासुन , घासुन आंघोळ केली. घासल्यावर बघतो तर साबण निळा झालेला. उत्त्याला म्हणालो..साबण भारीय बे, घासल्यावर निळा होतोय.
उत्त्या पळतच बाथरुममध्ये शिरला.... बाहेर आला तो खदखदा हासतच...
थोड्या वेळा पुर्वी त्याने त्याची नुकतीच डाय केलेली काळ्या रंगाची जिन्स धुतली होती, रीन साबणाने !
नंतर ३-४ दिवस माझं अंग खाजत होतं ! Proud

विशाल, लै च! Lol

विशाल Rofl Rofl

माझा कार्टेपणा...
घरातल्या पीसीचा डेस्क्टोप प्रिन्ट स्क्रीन मारून JPEG म्हणून सेव्ह केला आणी केला सेट डेस्क्टोप वोलपेपर म्हणून... वर त्यात डेस्क्टोप आयकोन हाईड केले, आणी तो तसाच ठेवून गेलो ऑफिसला.... घरी येऊन बघतो तर पीसी गुल. बाबा म्हणाले की, अरे तो चालतच नव्हता, कीती क्लिका केल्या तरी म्हणून काही (My Computer) ऊघडेना, मग दिला पाठ्वून servicing साठी.
पैसे गेले. पण बाबाना अजूनही हे काही माहीत नाही..... Happy
टिपः करून बघा हव तर......

टिपः करून बघा हव तर...... >>>> उल्लू लोकांना फसविण्यासाठी खूप लहानपणी केलेत हो आम्ही हे उद्योग Proud

उल्लू लोकांना फसविण्यासाठी खूप लहानपणी केलेत हो आम्ही हे उद्योग>>>> अरे बापरे...... पण खूप मजा आली असेल ना???

सकाळी झोपेत /चहा टाकला. व मायबोलीवर दिवसभर पडीक होण्यासाठी आले..
थोड्या वेळाने चहाचा वास आला.. (इलेक्ट्रिक शेगडी असल्याने आरामात असतं काम एकदम.. )
चहा उतू जाऊ नये म्हणून मी जमेल तितकी पटकन उठले व चुकून जोरात ओरडले.. "आले.. आले.. " Uhoh

नवरा जेव्हा चमत्कारिकरित्या बघू लागला तेव्हा कळलं काय गाढवपणा केलाय! Lol

विशाल Rofl

वा छान बस्के..........मग काय तू आले आले म्हणल्यावर चहा गेला का परत भांड्यात उलटा स्लो मोशनमधे.........!अ‍ॅनिमेशन फिल्ममधल्यासारखा!

अरे वा ९१ पोस्टी वाचायच्या होत्या त्याहून अगदी मजा आली.

वेंक्यू काउंटर

सायलीचे अहो: १५

रघुची मामी : १४

पर्सनल बडडे कुमार चिमणराव : ६

आशू चॅम्पः ४ हो एवढेच.

बस्कूबाय : ५ प्रथम पदार्पण

आजचे माझे वेंपणः नणंदेला सिकंद्राबादेस जायचे होते. डायवराला पेट्रोल भरायला पैसे द्यायचे होते. खाली उतरून आलो. दारात एक पांढ्री स्कॉरपिओ व मागे आमची गाडी उभी. नणंदेस मागे बसायला सांगितले व पैसे द्यायला बॅग उघड्ली. दार उघडेना. वैतागून पाहिले. आत सीटांना प्लास्टिकची कवरे ( मनात म्हण्ले ही तर आपण काढून टाकलेली परत कशी आली?) मग डायवर कडे पाहिले तर त्याला चष्मा - ह्याने चष्मा का लावलाय बरे? असे डोकयात आले मग परत नीट पाहिले तर ते समोर राहणारे माथूर होते. व हसत होते.
ती होती आमच्या गाडी सारखीच दिसणारी पोलो. त्यांनी नवीनच घेतली आहे. मग नणंद, वाचम्यान सर्वच खो खो हसले. तोपरेन्त आमची गाडी बाहेर आलेली. माथूर खिदळत निघून गेले व नणंद खुदू खूदू हसत सिकंद्रा बादला गेली. वेंक्यू: १० तरी नक्कीच.

विशाल, स्मितहास्य आणि मामी,
Lol
मामी, माझा दुसर्‍याची गाडी चुकुन चालु करुन नेलेला वेंधळेपणा माहीत असेलच ...

अनिल त्यासाठी तुला वेंक्यू एक्सलन्स सर्टिफिकेट प्रदान करण्यात येइल. लक्षात राहिले तर.

टिपः करून बघा हव तर...... >>>>

मी सुद्धा हे केले होते, आणि ते पण ऑफिस मधे.

काँप्य. इंजिनियर जाम वैतागला होता त्याल सुद्धा हे सुधरले नाही. सकाळ पासनं बसला होता पीसी समोर, तिन चार वेळा रिस्टार्ट केला तरी पण नाय समजले त्याला. तो चहा प्यायला गेला तेव्हा मी गपचुप काढुन टाकले.

आजचा ताजा ताजा वेंधळेपणा...
कलीगबरोबर संध्याकाळी हॉटेलमध्ये गेलो. इडली खाऊन झाल्यावर अजून भूक लागली म्हणून पुन्हा मेनूकार्ड मागवले. अजून च्याऊ माऊ व नंतर चहा झाल्यानंतर बील आले. ते घाईघाईने मी ताब्यात घेतले आणि वट्ट रक्कम मेनूकार्डमध्ये घालून वेटरच्या हातात दिली.
तो पण वेंधळाच, तसाच घेऊन गेला आणि वाटेत त्याच्या लक्षात आले. इथे माझा कलीग हहगलो होता.

मामी, गाडीवरून तर माझा नेहमीच गोंधळ होतो. तुझा हा वेंधळेपणा काहीच नाही....

मी एकदा मुलुंडला गेलो होतो एका मिटींगसाठी. मुलुंड वेस्टला पार्किंगची खुप समस्या असते. तिथे कुठल्यातरी एका गल्लीत बाईक पार्क केली आणि कस्टमरच्या भेटीला गेलो. थोड्या वेळाने परत आलो तर गाडी गायब ! जाम तंतरली, तेव्हा नवीनच घेतली होती गाडी. गल्लीच्या या टोकापासुन त्या टोकापर्यंत घिरट्या घातल्या. गाडी सापडत नाही म्हणल्यावर आजुबाजुला चौकशी केली तर लोकांनी सांगितली की कदाचीत टो करणार्‍यांनी नेली असेल गाडी. म्हणून मग थेट पोलीस स्टेशन गाठले तर गाडी तिथेही नाही. आमची हवा टाईट !

मी परत त्या गल्लीकडे परतलो. तिथे उभे असलेल्या एका काकांनी हाक मारली...

"मी मघापासुन पाहतोय, तुम्ही हेलपाटे घालताय इकडुन तिकडे. तुम्हाला खात्री आहे की गाडी इथेच पार्क केली होती नक्की?"

" असे का विचारताय काका? मी इथे गल्लीतच पार्क केली होती गाडी." मी थोडा वैतागलो.

"बाळा, तुला माहिती आहे का? पाच रस्ता चौकापासुन ते क्रॉस लिंक रोडपर्यंत अशा किमान १४-१५ एकमेकांना समांतर गल्ल्या आहेत."
ही माहिती मला नवीन होती. त्यांचे आभार मानून मी गडबडीत पुढच्या गल्लीकडे पळालो. माझी गाडी तिथे आरामात हवा खात उभी होती. Proud

विशाल तू मला फोन का नाही केलास? मै मुलुंड वेस्ट का चप्पा चप्पा जानती हूं . दो साल उधरही फिरी हू.
आमचे घर पाच रस्त्यातच होते रे. Happy

अच्छा ? !! आणि विशालने काय विचारले असते फोन करून ?
की मामी माझी गाडी कुठे लावलीये सांग पाहू म्हणून ? Happy
कैच्याकै !! Proud

Pages