मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी अचाट कल्पनाशक्ती. ३०-३५ एपिसोड झाले व्व्वा.... च्यामारी इथे मला दुसरी कोणतीच गोष्ट आठवत नाही. सध्या मी बालगीते सुरु केली आहेत, तेवढच चेंज तिलापण आणि मलापण.. Happy

मामी आणि "रघु" म्हणजे एक्दम मला "विक्रम और वेताल" आठवला.......... Rofl
रोज एक गोष्ट आणि मग पुन्हा झाडावर जाऊन लटकायचे........ Lol

Lol Lol Lol

ए कोणीतरी लवकर वेंधळेपणा करुन इथे लिहा रे मला बोर होतय आज काही विशेष काम नाही......अरेवा मी एकही चुक न करता ही पोष्ट लिहली.... हे हे

अरे चिमण, नशिबाने ती जबाबदारी आमच्याकडे आजोबा पार पाडतात.......... महाभारत, रामायण मला नसतील तेव्ढी नावे सध्या मुलिला पाठ आहेत......... आमच्याकडे २ गोष्टी, आणि आबांच्या मोबाईल्वर नात्यसंगीत ऐकत (आणि म्हणत) मुलगी झोपते.......... Happy

अरे वा नाट्यसंगीत.... छान रे एकदम जाम आवडल आपल्याला....

माझी एक बहीण तीच्या मुलाला नेहमी गायत्रीमंत्र एकवायची झोपत असताना.... त्या मुलाची वाचा एवढी शुद्ध आहे की आपल्याला पण लाज वाटावी आणी ह्या गोष्टीचा त्याचाशी कितपत संबध आहे हे मला नाही माहीत पण त्याची बुद्धी खरच तल्लख आहे, आकलन आणी स्मरणशक्ती सुद्धा.....

जर खरच ह्याचा फरक पडत असेल ना तर मी पण बाळ झाल्यावर त्याला असलेच "धडे" देइल...

च्यायला इथ अजुन बाल्यावस्थेतुन बाहेर पडून साध "तरुण" व्हायची अडचण झालीये राव.. तुम्ही पालक कायच करु लागले

अरे हा वेंधळेपणावरचा बीबी आहे. किती भरकटवताय. का हाही एक प्रकारचा वेंधळेपणाच म्हणायचा. Happy

अरे वेंधळ्यांची येजा कमी झाली कि इथे शिळोप्याच्या गप्पाही चालतात..... Happy

ती सम्राज्ञी "समु" फिरकली नाही बर्‍याच दिवसात........

<<<जर खरच ह्याचा फरक पडत असेल ना तर मी पण बाळ झाल्यावर त्याला असलेच "धडे" देइल...>>>

चिमण राव इथुन पुढे आयुष्यात तुम्ही बाळ होण्याची शक्यता फार कमी आहे...

चिमण राव इथुन पुढे आयुष्यात तुम्ही बाळ होण्याची शक्यता फार कमी आहे...
मी चुकुन 'तुम्हाला' वाचलं... Uhoh

हो ग सुनिधी, असचं वाटलं मला नंतर.... आता जर सांगायची वेळ आली ना तर दुसर्‍या दिवशी लगेच लिहूनच काढीन. अर्थात गोष्टी सांगतानाचा मूड, अभिनय, अ‍ॅडिशन्स महत्वाचे! जर कधी कधी छान भट्टी जमली ना तर माझी लेक हसून हसून गडबडा लोळायची. नंतर झोपेतही कधी कधी हसायची.

मात्र कधी कधी अगदिच पुचाट पडायच्या गोष्टी. माझी लेक लगेच निषेध नोंदवायची. नंतर मला विषय सुचेनासे झाल्यावर ती मला थीम द्यायला लागली .... पण नाहीच जमलं नंतर!

बरेचदा मी स्वतः सुध्दा चकित व्हायचे कारण गोष्ट सुरू करताना मी अगदि blank असायचे. काय सांगणार ते माहित नसायचे. पहिली ७-८ वाक्य झाली की गाडी जोरात सुरू व्हायची. आणि हे असं पहिल्यांदाच केलं होतं मी.

(प्लीज इथे अजिबात आत्मस्तुती करण्याचा हेतू नहिये. फक्त process सांगतिये. In fact, तुम्हिही try मारा. नक्किच जमेल. )

<<<जर खरच ह्याचा फरक पडत असेल ना तर मी पण बाळ झाल्यावर त्याला असलेच "धडे" देइल...>>>

<<<चिमण राव इथुन पुढे आयुष्यात तुम्ही बाळ होण्याची शक्यता फार कमी आहे...>>>

विनायकभो.... अहो मी माझ्या जेव्हा केव्हा होईल तेव्हा होणार्‍या बाळा साठी आयड्या केलीये ती

रच्याकने... काहीतरी वेंधळेपणा कराना कोणी...

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
वेधळ्यांची मी वाट पहात आहे.
कितीही सिरियस असलो तरीही
मी ही वेंधळेपणा करु पहात आहे....

हे काय? सगळ्यांचा वेंक्यू तात्पुरता खूपच कमी झालेला दिसतो. क्काय झालंय तरी क्काय?
समू SSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS...............

मानुषी, अगदी बरोबर्............्या सिच्युएशन्मधुन सगळ्याना समुच बाहेर काढु शकते...... Lol
समू SSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS............... Rofl

>>मी बाळ झाल्यावर त्याला धडे देईन म्हटलेय ना, उगाच काय द क्युरियस केस ऑफ चिमणराव करताय.

त्याचा प्रोफाईल फोटो बघून तशी समजूत झाली असेल Proud

घ्ररातुन कामाला निगताना वाटॅवर मन्दिर लागतात सवई नुसार हात जोडायचि सवय आहे क्रमाने विडल्ड्ल गनपति याना हात जोड्ल्या नतर मि सरळ मराट। ब्॑केला नमस्कार के ला होता smiley_laughing_01.gifsmiley_laughing_01.gif

आर्या Rofl

त्या पेक्षा लिखाणात केलेल्या चुकांमुळे जास्त मजा आली.... सगळ्यातभारी म्हणजे "वाटॅवर"... हलेक घ्या बरका...
पण अस वाटत होत की तुम्ही हाता खायच काहीतरी कोंबुन टाईपत आहात

Pages