Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चिमणया ती केश्वीनी असेल.
चिमणया ती केश्वीनी असेल.
हो बहुदा...... अजुन काय मामी
हो बहुदा...... अजुन काय मामी एखादा नविन सिनेमा पहीलात का...
तुम्ही तो "अप" पाहिलात का हो
घरी सत्यनारायण होता. नातवाईक
घरी सत्यनारायण होता. नातवाईक आलेले, हास्यविनोद गप्पा चाललेल्या. जेवणं झाल्यावर आई मला म्हणाली "मंदार, सुपारी दे रे फ्रीज मध्ये ठेवली आहे". आता बेडेकर यांच्या सगळ्या उत्पादनांचे पॅकिंग पिवळ्या खोक्यावर लाल पट्ट्या असे असते (अर्थात तेव्हा तसे होते). मी एकीकडे गप्पांमध्ये लक्ष ठेऊन फ्रीज उघडला आणि एक पॅक काढून माझ्या मामाला दिला. त्यानेही न बघता चमच्याने आतला ऐवज तोंडात टाकला..............
..........आणि बोंबलत बोंबलत "पाणी, पाणी" करू लागला.
मग लक्षात आलं. सुपारी ऐवजी गरम मसाल्याचा पॅक होता तो....
तुझ तर "नॉर्मल" आहे रे
तुझ तर "नॉर्मल" आहे रे मंद्या
गरम मसाल्याचा पॅक फ्रिज मध्ये ठेवण्याचा वे.पणा कोणी केला .....
चिमणराव गरम मसाल्याचा पॅक
चिमणराव गरम मसाल्याचा पॅक फ्रिज मध्ये ठेवण्याचा वे.पणा कोणी केला .....
म्हणजे काय? माझ्या फ्रिजमधे काय नाही ते विचारा. माझा लेक म्हणतो आईचा फ्रिज ग्रोसरी स्टोअर्स आहे.
आमच्या कडे नाही ब्वा ठेवत गरम
आमच्या कडे नाही ब्वा ठेवत गरम मसाला फ्रिज मध्ये.....
तस आमच्या आइची पर्स मात्र मेडीकल आहे अस मी ही म्हणत असतो.. त्यामुळे अनुमोदन
तुमच्या मुलाला हो... :स्मितः
म्हणजे काय? माझ्या फ्रिजमधे
म्हणजे काय? माझ्या फ्रिजमधे काय नाही ते विचारा. माझा लेक म्हणतो आईचा फ्रिज ग्रोसरी स्टोअर्स आहे.
(चुकुन) लेक सुद्धा फ्रिज मध्ये ?
मी तर फ्रीजमध्ये साबण पण
मी तर फ्रीजमध्ये साबण पण ठेवतो
मंदार साबणच काय....रबर बँड
मंदार साबणच काय....रबर बँड बाहेर( एस्पेश्यली उन्हाळ्यात) खराब/चिकट होतात आणि तुटतात ना..म्हणून तेही फ्रिजमधेच ठेवावेत!!
मसाले फ्रीजमधे ताजे राहतात..
मसाले फ्रीजमधे ताजे राहतात.. म्हणून तिथे ठेवायचे असतात (म्हणे).
अरे हा धागा काय फ्रिजचे
अरे हा धागा काय फ्रिजचे "फ्री" उपयोग असा होतोय का.....

मानुषी, धन्य आहेस्..........रबर फ्रिज्मध्ये.......
मन्द्या, साबण पण?? काय सकाळी सकाळी साबणाचा थन्ड स्पर्श अनुभवायला का??? मग शँपु, बॉडीवॉश या बिचार्यानी काय घोडे मारलय...
अरे तुमच्याकडे फ्रीज नाही, तर
अरे तुमच्याकडे फ्रीज नाही, तर डिफ्रीजर ठेवायला पाहिजेत दुकानातले.....
मंदार_जोशी आणि मानुषी >>>>
मंदार_जोशी आणि मानुषी >>>>
अवांतर : मुरब्बी माबोकर जे shortforms वापरतात त्यांचं संकलन कुठे केले आहे किंवा कसे? आम्हा पामरांना जामच tangent जातं हो!
आधी एका कंपनीत काम करताना मला
आधी एका कंपनीत काम करताना मला शिफ्ट ड्युटी करावी लागे. रात्रीची शिफ्ट १० ते ७ अशी असे. एकदा दिवसा नीट झोप झाली नव्हती व रात्री ड्युटी असल्याने ७ वाजेपर्यंत माझी हालत वाईट झाली होती. घर कार्यालयापासुन जवळ असल्याने चालत येत-जात असे.
अर्धवट झोपेत कसा बसा चालत घरी पोहोचलो आणि गळ्यातले स्वाईप/अॅक्सेस कार्ड स्वाईप केलं. बराच वेळ कळेना दरवाजा का उघडत नाहीये. तेवढ्यात बाहेर खाडखुड चाललेलं ऐकून आईनेच दरवाजा उघडला आणि मला गदागदा हलवलं तेव्हा समजलं काय झालं ते
नव्या मामी. सध्या मुलीला
नव्या मामी.
... लगेच मुलीने झोप उडवली, 'गोष्टीत हॉटेल कुठुन आल आई?' ... मग सावरले, गोष्टीत शेवटी, 'मग आजी भोपळ्याला घेउन घरी पोचली' असे आहे. तर तिथवर पोचता पोचता पुन्हा झोप लागली व बोलुन गेले, 'मग आजी भोपळ्याला घेउन घरी पोचली आणि तिथे सिंड्रेला चे दोस्त पण येउन बसले होते (????)', बाप रे पुन्हा झोप उडवली पोरीने, 'गोष्टीत सिंड्रेला कुठुन आली आई? '
... शेवटी दम देउन 'झोप ग' बोलुन मी पांघरुणात गडप्प झाले.
सध्या मुलीला रात्री झोपताना 'चल रे भोपळ्या टुणुक' ही गोष्ट रोज सांगावी लागते. सांगताना मला प्रचंड झोप येउ लागते (हो, रोज तीच गोष्ट म्हणजे जाम त्रास), आणि शप्पत मी काय सांगतीये ते मला कळत नाही... माझ्या गोष्टीत आजीबाईला कोल्हा पण भेटतो व आज्जीबाई त्याला सांगते 'लेकीकडे जाईन, तुपरोटी खाईन' वगैरे.. काल तो भाग आला तेव्हा मी गुंगीत गेले व झोपेत लेकीकडे जायच्या ऐवजी माझी आज्जीबाई बोलली 'कोल्हेदादाच्या हॉटेलात जाईन, भरपुर खाईन'.
सुनिधी, बाकी तुमचं गोष्टींचं
सुनिधी, बाकी तुमचं गोष्टींचं hybrid जबरदस्तचं!
<<हो, रोज तीच गोष्ट म्हणजे जाम त्रास>>>> अगदी अगदी.
>> बाप रे पुन्हा झोप उडवली
>> बाप रे पुन्हा झोप उडवली पोरीने, 'गोष्टीत सिंड्रेला कुठुन आली आ>><<
पोरीचा उत्साह दांडगा आहे...तीच तीच गोष्ट ऐकण्याचा (कुठल्याही बदलाशिवाय)
हो माझ्या लेकीला रोज
हो माझ्या लेकीला रोज कावळेदादा आणि चिउताईची गोष्ट ऐकायची असते..
आता ही लोक फ्रिज मधन निघुन
आता ही लोक फ्रिज मधन निघुन झोपायच्या खोलीत घुसलीयेत.... देवा रे देवा...
वेंधळेपणाच्या नावा खाली काय चाल्लय....
पोरीचा उत्साह दांडगा
पोरीचा उत्साह दांडगा आहे...तीच तीच गोष्ट ऐकण्याचा (कुठल्याही बदलाशिवाय) >>>
अमि : कुठल्याही बदलाशिवाय?? अहो रोज 'सुनिधी मिक्स ' करतात ना
सद्ध्या कार्यालयाच्या जवळ्च
सद्ध्या कार्यालयाच्या जवळ्च असलेल्या एका क्लायंट कडे काम चालु आहे..... जेवाण्यासाठी जवळ्च्याच एका हॉटेलात जात अस्तो...
आज जेवण झाले. आणी फोन वर बोलता बोलता क्लायंट ऑफीसच्या एवजी स्वत:च्याच ऑफिसमध्ये चाल्या गेलो.
सगळ्यांच्या चेहर्यावरचे आश्चर्य बघुन लक्षात आल की काय केलय ते....
आत्ता परत आलोय... क्लायंट पण बिचारा विचारत पडलाय की हा आजच्या जेवणाच बील किती लावेल..
सुनिधी आमच्याकडे पण रोज
सुनिधी
आमच्याकडे पण रोज काऊ-चिऊची गोष्ट सांगाविच लागते. पण सुदैवाने त्यात काहीही मिक्स केलेले चालते. आमच्या चिऊताईचे बाळ बाटलीतून दुदु पिते, ओव्हनमध्ये गरम केलेला भात खाते आणि शॉवरखाली अंघोळपण करते आणि आज्जीची मऊ साडी घेऊन गागा करते.
चिमणराव __/\__
चिमणराव __/\__
<<<<<आमच्या चिऊताईचे बाळ
<<<<<आमच्या चिऊताईचे बाळ बाटलीतून दुदु पिते, ओव्हनमध्ये गरम केलेला भात खाते आणि शॉवरखाली अंघोळपण करते आणि आज्जीची मऊ साडी घेऊन गागा करते. >>>>>>
अशु, अगदी champ आहेस
आशु.... कैच्याकै
आशु.... कैच्याकै रे....आतापासुनच भेसळ शिकव्तोस कारे लेकराला
आणी सुनिधीची मुलगी अगदी आमीर
आणी सुनिधीची मुलगी अगदी आमीर खानसारखी पर्फेक्शनीश्ट दिसतेय
चिमणराव - काय करू, जन्मापासून
चिमणराव - काय करू, जन्मापासून ज्या गोष्टी ते पाहत आले आहेत त्यांच्याशी ते जास्त रिलेट करतात. मग आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी दिसतात त्या सगळ्या आमच्या चिऊ-काऊच्या गोष्टीत घुसतात. म्हणजे घरी पाहुणे आले असतील तर लगेच रात्री आमच्या चिऊच्या घरी पण पाहुणे येऊन चहा पितात.

नाविन्याची हौस, दुसरं काय
चिमणराव तुमचे प्रतिसाद भारी
चिमणराव तुमचे प्रतिसाद भारी असतात भाऊ.
..
... चिऊ चे बाळ शॉवर
..
..
आशु ,
आमच्या गोष्टीत हळुहळु आज्जीबाईला इतके प्राणी भेटतायत की गोष्ट संपतासंपत नाही , आणि प्राण्यांचा क्रम पण तोच रहायला हवा.. आली असेलच माझ्या दु:खाची कल्पना आता
सुनिधी, आशू मतुभाक! (मला
सुनिधी, आशू मतुभाक! (मला तुमच्या भावना कळल्या!)
तुमच्या मुली लहान आहेत वाटतं. कारण जरा मोठ्या झाल्या ना की त्या रोज नविन गोष्टीकरता हट्ट करतील. माझ्या मुलीला रोज नवी गोष्ट लागायची.मी मध्यंतरी एक रघू नावाचं पात्र तयार केले होतं आणि त्याचे येडपट, बावळट किंवा कधी हुशारीचे किस्से (आधारः विविध जोक्स आणि कल्पनाशक्ती) यावर आधारित एकेका गोष्टीचे घाणे काढायचे. तर ते फारच hit झालं. शेवटी जवळ जवळ ३०-३५ episodes झाल्यावर माझी कल्पनाशक्ती आटली. वर आधीच्या गोष्टीहि आठवेनात. बर्याच प्रयत्नानंतर तिला समजावण्यात यश आलं की स्वतःच पुस्तक वाचण्यात आणखी मजा असते!
मामी तुमची पोष्ट वाचून अगदी
मामी तुमची पोष्ट वाचून अगदी 'एकता कपुर' डोळ्यांसमोर आली हो
Pages