" भंकस सिनेमा "

Submitted by रुपाली अलबुर on 9 July, 2010 - 07:37

"आय हेट लव्ह स्टोरी " सिनेमा पाहताना मला सहज सुचले कि असे किती तरी " भंकस " वाटणारे सिनेमे आपण पाहतो आणि कुठून बुद्धी झाली आणि हा सिनेमा पहिला असे वाटते . असे सिनेमे थेटरात जाऊन पाहण्याची दुर्बुद्धी प्रत्येकाला एकदा तरी झाली असेलच . तुम्हाला असे होते का ?? कोणी कोणी भंकस सिनेमे चक्क थेटरात जाऊनपाहिलेत ??

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपय्या (२००१) हा सिनेमा कुणी पाहिलाय का [चंद्रचूड सिंग , जॉनी लिव्हर, गोविंदा, शक्ती कपूर वगैरे लोक्स होते त्यात]

माझ्या मित्राने त्याच्या वाढदिवसाला दाखवला होता आम्हाला.
धरून जवळ जवळ मारला होता त्याला मी.

फूंक बद्दल च्यालेंज होतं ना 'न घाबरता जो बघेल त्याला अमुकअमुक लाख बक्षीस'?

मी सगळ्यांना च्यालेंज देतो, उपरोल्लेखित सिनेमा संपूर्ण पाहून दाखवा आणि माझ्याकडून पार्टी मिळवा (शेवटपर्यंत टिकलात तर) Proud

तो अमिताभ आणि झिया खान चा कुठला पिक्चर, त्यात तो साठीचा थेरडा १६वर्षांच्या (वाटत नसली तरी) झिया च्या प्रेमात पडतो??? Uhoh .......... एकदम भंकस सिनेमा Sad

हे माझे टॉप टेन (खरेतर सर्वे एकाच नंबरावर आहेत. त्यामुळे १० नंबरवाला कमी भंकस आहे असे काही नाही.)
१. रखवाला
२. सौदागर
३. आर्मी
४. तूफान
५. खुशी
६. पेइंग गेस्ट ('अशी ही बनवाबनवी'चा हिंदी "अवतार")
७. टॉम, डिक अँड हॅरी (हा मी का पाहिला याचे कारण विचार करूनही सापडत नाही!)
८. आय हेट लव्ह स्टोरीज
९. शब्द
१०. जानशीन

मिल्यादा, जागीर नुकताच पाहिलाय मी. "मस्त" आहे. Proud (लिहिते अ नि अ लौकरच.)

दोस्ताना.. (देवा मीच का? :रागः)
गजिनी आणि ३ इडियट्स (आमिर बद्दलचा आदर गजिनी नी कमी झाला आणि ३ इडियटस नी संपला)
देव डी ('देवडी' ह्या मराठी चित्रपटाची अपेक्षा ठेवून गेले आणि आतला प्रकार पाहून १/२ तासात जीव मुठीत घेऊन पळत सुटले)
चिनी कम (अ‍ॅनिव्हर्सरीच्या दिवशी... अरे देवा!)
भूतनाथ (खरं भूत पाहिल्यावरही कदाचित अशी अवस्था झाली नसती)
देवदास (शाहरूखच्या मरणाची वाट पहाताना "चिडचिड, संताप, कमालीचा संताप, असहायतेचं दु:ख, हताशा आणि शेवटी (एकदाचा) शाहरूख मेल्याचा (आणि पर्यायानं चित्रपट संपल्याचा) आनंद" ह्या सर्व भावना टप्प्या टप्प्यानं अनुभवायला मिळाल्या

मी सगळ्यांना च्यालेंज देतो, उपरोल्लेखित सिनेमा संपूर्ण पाहून दाखवा आणि माझ्याकडून पार्टी मिळवा (शेवटपर्यंत टिकलात तर)
>>
मला दे...
मी अनेकदा पाहिलाय तो सिनेमा...
सोनी मॅक्स रतीब घालतं त्याचा...

आणि जिमी शेरगिल नाही, चंद्रचूड सिंग आहे त्यात (हे दोघं माचिस मधे होते आणि फारसे चालले नाहीत हे वगळता यांच्यात काय साम्य आहे...???)

>>मला दे...

दिली

>> आणि जिमी शेरगिल नाही, चंद्रचूड सिंग आहे त्यात

अरे हो बरोबर.

>>(हे दोघं माचिस मधे होते आणि फारसे चालले नाहीत हे वगळता यांच्यात काय साम्य आहे...???)

Proud मी हिंदी चित्रपटांचा नाद सोडला तेच बरं झालं.

'मंगल पांडे......'

मी पाहिलेल्या भन्कसेस्ट सिनेमामधला सर्वोच्च सिनेमा... कारण माझं ऐकून पिताश्रीनी समस्त कुटुंबियांना कसलीतरी ट्रीट म्हणून दाखवला होता हा!!!! (हर हर... त्यामुळे ते आता माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीत..त्यासाठी आमीरला माफी नाहि मिळू शकत....)

घरातल्या समस्त लहान पोरसोरांसकट १७ जणांनी हा सिनेमा थेटरात पाहिला... लहानग्या जीवांना देशभक्तीचे धडे मिळतील म्हणुन हा घाट घातला होता.... Sad

रच्याकने, त्यावेळची एक ह्रुदयद्रावक आठवण सांगते.... ती आमिशा आणि तो फिरंगी ऑफिसर जेव्हा एकमेकांच्या "खुप" "जवळ जवळ" येऊ लागतात तेव्हा माझा मामे भाऊ (वय वर्षे ८ त्यावेळी) जोरात ओरडला, "बाबा, आता जाहीरात लागेल ना???" तेव्हा आख्खं थेटर हसलं होतं!!! (आणि पब्लिक जागं आहे अजुन याचा अम्हाला शोध लागला होता....!!!!)

तरीच ती फारएण्ड ची जबरी परीक्षणे टणाटणा उड्या मारून वरती आलीत.

मी पहिलेला थेटरात मकरंद अनासपुरे चा "बाप रे बाप डोक्याला ताप"... साबा आणि साबुंना सिनेमाला न्यायचे तर त्यांना पसंत पडेल असा मराठी पिक्चर असावा असे वाटून गेलो आणि डोक्याला नसता ताप करून घेऊन बाहेर पडलो Angry

<<एकमेकांच्या "खुप" "जवळ जवळ" येऊ लागतात तेव्हा माझा मामे भाऊ (वय वर्षे ८ त्यावेळी) जोरात ओरडला, "बाबा, आता जाहीरात लागेल ना???" तेव्हा आख्खं थेटर हसलं होतं<<<
Lol
स्वाती, माझं पोरगं तर अजुनही टीवीवर बघतांना पाऊस पडायला लागला नि हिरो-हिरवीन असेच 'जवळ जवळ' यायला लागले की म्हणतं "मम्मी आता त्यान्ना बाळ होईल ना?"

२-३ पिक्चर बघुनच माझी फर्स्ट डे फर्स्ट शो ची हौस फिटली
रन (अभी-कोणतरी चावला... टाईटल बहुदा थेटर मधिल लोकानाच उद्देशुन असाव... :()
रेनकोट (मिसेस अभी-अजय देवगण)
धुम -२ (फर्स्ट डे फर्स्ट शो - फर्स्ट सीट - त्यामुळे एकावेळी एकच नट्/नटी दिसायची)
इतक कमी कि काय म्हणुन फर्स्ट डे फर्स्ट शो पाहीला काईटस चा (अरे देवा !!!)

मिल्या तुझा आवडता "हम आपके" राहिला का रे ? .. >>> असाम्या तुला काय काय आठवत असते रे... मग तसे सोनालीचे सगळे पिक्चर ह्या यादीत घालायला हवेत Happy

मूळव्याध होवो त्याला Lol

श्र तुझ्या लिस्ट मधला आर्मी माझ्या लिस्ट मध्ये राहिला होता Happy .... रखवाला त्यावेळी बरा वाटला होता Happy

अजून काही आठवले

पृथ्वी (शेट्टीकुलोत्पन्न शिल्पा आणि सुनिल द्वयी)
सात रंग के सपने
गुदगुदी (बसुदांचा मूव्ही म्हणून मोठ्या अपेक्षेने गेलो होतो)
दुल्हन हम ले जायेंगे (सल्लू, करिस्मा)
गोपीकिशन (डबल सुनिल शेट्टी)
सपूत (अक्की, सुनिल)

कमल हसनचा "दशावतारम"
मान गये मुगले आझम
रिंगा रिंगा
किस्मत कनेक्शन
राम गोपाल वर्मा की आग (मल्टीप्लेक्स मध्ये)

सध्या तरी एवढेच आठवले...

जानवर - राजेश खन्ना झीनत अमान (हेच नाव होते बहुतेक चित्रपटाचे).
आवारा बाप - ( राजेश खन्ना , कोणतरी सिप्पी )
अग्निपथ
शहेनशहा
महान (३ अमिताभ)
कादरखानभाईंचे बहुतेक चित्रपट..

मिल्या, माझी पण लिस्ट वाढली तुझ्या लिस्टमुळे.... काय आठवणी भडभडून आल्या!!

१.दुल्हन हम ले जायेंगे.(फक्त सलमानसाठी पाह्यला.)
२.शादी नं.१ (फारच हृदयद्रावक आठवणीनी नटलेला चित्रपट)
३. सात रंग के सपने. (यातल्या एका गाण्यावर नाच बसवायचा होता. त्यामुळे तीनदा पाह्यला)
४. वीर (फक्त सलमान!)
५. रन (मैत्रीणीला अभिषेक बच्चन फार आवडायचा.. मला त्यातली फक्त कव्वा बिर्यानी आठवते)

ये सिलसिला है प्यार का( अजून एका कार्टीला चंद्रचूड सिंग फार आवडायचा. तिच्या वा.दि,ला तिने हा पिक्चर दाख्वला. म्हणजे, जेव्हापिक्चर रत्नागिरीत लागला तेव्हा तिने वाढदिवस साजरा केला. तिनेच एकदा टीव्हीवर देव आनंदचं गाणं दाखवत होत्ते तेव्हा, "अय्या, हा "माझ्या" चंद्रचूडसिंगसारखा दिसतो" असे जगजाहीर उद्गार काढले होते.)

अजून एक आठवला. तुषार कपूरचा आणि करीनाचा "जीना सिर्फ मेरे लिये" यामधे रीना लांबा नावाची नविन अभिनेत्री आहे. नंतर फारशी कुठे दिसली नाही या नावाची अभिनेत्री Proud

आम्ही 'डरना मना है' पाहीला होता.बरोबर रा गो व चा...
टायटलप्रमाणे घाबरवणारा सिनेमा...पण प्रत्येक सीन मध्ये हसायला येत होत.त्यानंतर रा गो व चा कुठलाही सिनेमा थिएटर मध्ये पाहिला नाही.

अरे देवा.. हे सगळे पिक्चर तुम्हा लोकांनी थिएटरमध्ये जाउन पाहीलेत.. यासाठी एजोटाझापा! Proud

मी अशोका पाहीला होता .. first day, first show! मनावर असला जबरी आघात झालाय की अजुनही रिव्हु कळल्याशिवाय मुव्ही बघायचा विचारही मनात येत नाही!

अरे..... तो फार्फार पूर्वी एक अब्दुल्ला नावाचा डेंजर पिक्चर आला होता. संजय खान, झीनत अमान वगैरे.... वाळवंट, खून, आरदाओरडा - किंकाळ्या.... मी ल्हान होते, निम्मा पिक्चर डोळे किंवा कानावर हात! Proud

जजंतरम ममंतरम

सतरंज के खिलाडी (अज्जूनही मला त्या पिक्चरचा काय पण अर्थ लागला नाही!)

हेय बेबी (अक्षय कुमार, फरदीन वगैरे.....)

हेय बेबी (अक्षय कुमार, फरदीन वगैरे.....) - हा एका जुन्या विंग्रजी सिनेमाची नक्क्ल आहे.
Three men and a baby असं काहीसं मूळ सिनेमाचं नाव.

फरदीनचे सगळेच....

खुशी
जानशीन
एक खिलाडी एक हसीना
कितने दूर कितने पास
डार्लिंग
दुल्हा मिल गया
प्यारे मोहन
जस्ट मॅरीड
जय वीरू

Pages