" भंकस सिनेमा "

Submitted by रुपाली अलबुर on 9 July, 2010 - 07:37

"आय हेट लव्ह स्टोरी " सिनेमा पाहताना मला सहज सुचले कि असे किती तरी " भंकस " वाटणारे सिनेमे आपण पाहतो आणि कुठून बुद्धी झाली आणि हा सिनेमा पहिला असे वाटते . असे सिनेमे थेटरात जाऊन पाहण्याची दुर्बुद्धी प्रत्येकाला एकदा तरी झाली असेलच . तुम्हाला असे होते का ?? कोणी कोणी भंकस सिनेमे चक्क थेटरात जाऊनपाहिलेत ??

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ते "बदले की आग" या १९८२ सालच्या चित्रपटाबद्दल लिहले.
पण त्याच सालचा "Fire of Vengeance" असा इंग्रजी चित्रपट सुद्धा आहे.

यात पठाण चे नाव कुणीच टाकले नाही, आश्चर्य आहे. कुणाला तरी घाबरून तर नाही ना टाकले?

तसेच ब्रम्हास्त्र चे ही नाव नाही. हे चित्रपट "भंकस" म्हणायच्या लायकीचे पण नाही म्हणून बहुतेक यांची नावे इथे नाहीत.

पान १ वर कुणीतरी राजू बन गया जंटलमॅन लिहिलेय. खरं तर इतकी वर्ष लक्षातच आले नाही की ह्या चित्रपटाची कथा टीपिकल & भंगार च होती. पण जुही न शाहरूख जे काय गोड दिसलेत त्याला तोड च नाही.
सिने में दिल है, दिल मे है धडकन! अहाहा मस्तं..

जोवर १ तरी क्वलिटी असेल चित्रपटात तोवर पैसे वसूल असं मला वाटतं.
मी रूप की रानी चोरो का राजा कॉलेज दिवसांत पाहिला & आवडला ही होता Lol
राजा हिंदुस्तानी- किस्स पाहुन हबकले होते. तद्दन घटिया चित्रपट.
असोका..डोंबलाचा इतिहास! भंकस

मराठी सिनेमा mitva, पु. ल. देशपांडे यांच्या म्हैस kathevar आधारित त्याच नावाचा एक सिनेमा आला होता. इतका बकवास होता की interval मधून निघून आलो सगळे. Mitva ला पण interval मधून निघून आलोय आम्ही दोघे.
हिंदी आदिपुरुष, ब्रह्मास्त्र हे थिएटर मध्ये जाऊन बघितले आहेत.
अजून आठवले की लिहिते.

1.दिल्लीत गोंधळ गल्लीत मुजरा हा अतिभंकस सिनेमा थेटरात पाहिलेला
2.अगडबम पण असाच एक
3.शक्ती नावाचा तेलुगू सिनेमा ज्यु.एन टि आरचा सुपरफ्लॉप सिनेमा..
4.राज 3 आणि चांदनी चौक टु चायना असे दोन्ही भंगार सिनेमे सीटीप्राईड ला लागलेले..राज 3 पाहिला.
5.Delhi-6
हे भंकस सिनेमे थेटरात पाहिलेले

१९४२ अ लव स्टोरी
परिंदा
गर्दीश
कुछ कुछ होता है
कभी हा कभी ना
मै हू ना
कभी अलविदा ना कहना
लगान
सरफरोश
चेन्नई एक्सप्रेस
बाजीगर
बडे बडे शहरो मे छोटी छोटी बाते वाला काजोलचा पिक्चर
परदेस
स्वदेस
चक दे इंडीया
संजू
थ्री इडीयटस
अतरंगी भाईजान
मैने प्यार किया
कयामत से कयामत तक
जो जिता वही सिकंदर
मुन्नाभाई १,२
बाहुबली १,२,३
आर आर आर
पुष्पा १,२
मुघल ए आझम
शोले
जंजीर
गोलमाल (नवे, जुने सगळेच)
हेराफेरी (नवे, जुने सगळेच)
आंखे ( जुने, नवे सगळेच)
अजून आहेत.

दौड,
नो स्मोकिंग,
दिल से,
काबील, मै आझाद हुं, रामन राघव 2.0, ऑक्टोबर, मर्द को दर्द नाही होता, मुक्काबाज, सोनचिडीया

Pages