" भंकस सिनेमा "

Submitted by रुपाली अलबुर on 9 July, 2010 - 07:37

"आय हेट लव्ह स्टोरी " सिनेमा पाहताना मला सहज सुचले कि असे किती तरी " भंकस " वाटणारे सिनेमे आपण पाहतो आणि कुठून बुद्धी झाली आणि हा सिनेमा पहिला असे वाटते . असे सिनेमे थेटरात जाऊन पाहण्याची दुर्बुद्धी प्रत्येकाला एकदा तरी झाली असेलच . तुम्हाला असे होते का ?? कोणी कोणी भंकस सिनेमे चक्क थेटरात जाऊनपाहिलेत ??

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव, ते गाणं म्हणजे
'भला है बुरा है जैसाभी है, मेरा पती मेरा देवता है'... या शब्दांमुळे तुम्हांला सिनेम्याच्या नावात कन्फ्यूजन झाले असणार. Happy

येस्स. तेच गाणे.
मानलं तुला. एकतर तुझी मेमरी भन्नाट आहे किंवा असल्या तिनपाट गाण्याकरता गुगल करायचा दुर्दम्य उत्साह तुझ्याकडे आहे __/\__

तुषार कपूरचा आणि करीनाचा "जीना सिर्फ मेरे लिये" यामधे रीना लांबा नावाची नविन अभिनेत्री आहे. नंतर फारशी कुठे दिसली नाही या नावाची अभिनेत्री>>>...
नंदिनी हा चित्रपट आपण बहुतेक कॉलेज बंक करुन पाहीला होता... Happy

मी पाहीलेले...
ऑल दि बेस्ट (संजय दत्त, अजय, फरदीन, बिप्स)
गोलमाल तिसरा...
डेली बेली (हिंदी वर्जन... अनेकांना वास्तववादी वाटला... आजकालचे जनरेशन असेच आहे अशी कमेंट ऐकुन मला उगाचच ७०-८० वर्षांची झाल्यासारखे वाटले... पण हे वाक्य माझ्यापुढे टाकणारी व्यक्ती चाळीशीच्या घरातली होती... अर्थातच माझ्यापेक्षा बरीच मोठी... म्हणुन मी अजुनही स्वीट सिक्सिटीनमधेच आहे असे स्वतःला बजावले आणि खुश झाले... पण असं वास्तव चित्रपटांमधे दाखवणं योग्य आहे का नाही याबद्दल माझे मत काही केल्या तयार होत नाही...)

नंदिनी हा चित्रपट आपण बहुतेक कॉलेज बंक करुन पाहीला होता>>> होय.
काय लोकाचे फेवरेट हीरो असतात रे बाबा. तुशार कपूर काय रितेश देशमुख काय!!!!! Wink आणि तुला के३डी आठवत असेलच!!! Happy

मी संधर्ष (प्रीटी झिंटा आणि अक्षय कुमार) चक्क लतामधे पाह्यला होता. लतामधेच रागोवचा भूत (नावाचा सिनेमा) आणि शारूखचा दिलसे बघितलेला.
आजवर अर्धावर उठून आलेला सिनेमा कुठलाच नाही. अगदी रूबरू किंवा रागोवकी आग सुद्धा पूर्णच बघितलेत.

'भला है बुरा है जैसाभी है, मेरा पती मेरा देवता है'...

हे गाणेवाला चित्रपट मी टिवीवर पाहिलेला. Sad

स्टार परिक्षणे लिहिणा-या मंडळींनी जमले तर त्याचे परिक्षण इथे लिहावे ही विनंती.

एकशेऐंशी रुपये खर्चुन मी पाहिलेला ताजा ताजा भंकस चित्रपट - रॉकस्टार. हा इतका भयाण भंगार आहे हे आधी माहित नव्हते, सुरू झाल्यावरच तो भंगार असल्याचा साक्षात्कार झाला आणि त्या धक्क्यामुळे माझे त्यातल्या गाण्यांकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. ती नीट पाहिली असती तर कमीतकमी अर्धे पैसे तरी वसुन झाले असते.

विनोदाच्या नावाखाली (विनोदी चित्रपट म्हणून) काढलेले खालील सर्व चित्रपट,

मराठी:
लक्ष्मिकांत बेर्डे, मॅक अनासपुरे (डोक्यात गेलेत हे चित्रपट, टीवीवर लागलेले म्हणून बघलेन नी अस्सा जल्ला डोक्यात गेलय...)

हिंदी:

श्रीदेवीचे नागाचा चित्रपट व इतर

नवीन सिनेमे मी थेटरात पहात नाही. सोडलाय.. पण जे टीवीवर बघलेत त्यातले:
विवाह (मधुमेहाने माणूस मेलाय असे वाचलेय) Happy
एक ऐसा भी विवाह...
सगळे बडजात्याचे नवीन चित्रपट.
एक तो नदिया के पार बरा होता.

सावरिया- खरे नाव असे हवे होते.. सावरिया ... द ब्लू ...आमवस्यचा चित्रपट म्हणून शोभेल.
धुंद(अमर उपाध्याय वाला) - वेड लागेल हा पुर्ण चित्रपट बघून.. मी पाव सुद्धा नाही पाहिला. Proud

बाकी बरेच आहेत... आठवेल तसे लिहिन.

एकशेऐंशी रुपये खर्चुन मी पाहिलेला ताजा ताजा भंकस चित्रपट - रॉकस्टार. हा इतका भयाण भंगार आहे हे आधी माहित नव्हते, सुरू झाल्यावरच तो भंगार असल्याचा साक्षात्कार झाला>>>>> Rofl

===================

विनोदाच्या नावाखाली (विनोदी चित्रपट म्हणून) काढलेले खालील सर्व चित्रपट,

मराठी:
लक्ष्मिकांत बेर्डे, मॅक अनासपुरे (डोक्यात गेलेत हे चित्रपट, टीवीवर लागलेले म्हणून बघलेन नी अस्सा जल्ला डोक्यात गेलय...)>>>>> वाईट्ट सहमत! Sad

एक तो नवरी मिळे नवर्‍याला काय जरा हिट्ट गेला तरः

धूमधडाका ( हा जरा बरा तरी होता)

गंमतजंमत

चलरे लक्ष्या म्हमईला

प्रेम - प्रेम हा शब्द शीर्षकात असलेले तर पोत्याने पिक्चर आले त्या काळात!

नको ती आठवण!

Angry

सगळ्यात कहर.............मी थेटर मधे जाउन.....मे प्रेम की दिवानी हु पाहीला.............

त्यानंतर आता पर्यंत या चित्रपटाचे नाव तरी कुठे वाचले तर...एक भयानक दृश्य डोळ्यासमोरुन तराळते..आणि दिवस असा काय तो जातो..की सांगताही येत नाही.............

लाउड अभिनय ......हा शब्द देखील फिका पडावा रितीक आणि करिना समोर.....
च्या बाराखडीतल्या सगळ्या शिव्या थेटरात सर्वांसमोर देउन बाहेर पडलो...........

भगवानदादा किंवा शंकरदादा यातील एक चित्रपट मी मिनर्व्हाला पाहिला. पाहिला म्हणजे 'पाहायला गेलो' आणी मध्यंतरात थेटरच्या गेटच्या वरून चढून बाहेर पडून आपली सायकल घेऊन व्यथित मनाने घरी परतलो. शत्रूघ्न सिन्हा आणि रजनीकांत की असे काहीतरी कॉम्बिनेशन त्या वयात सोसले नाही.

गेट वरून उतरत असताना वडापाव वाले 'हेवड्डाप्पाओ' असे ओरडत होते. खूप वेळा ऐकूनही मला नक्की काय ओरडत आहेत हे समजले नव्हते. मला जे ऐकू येत होते ए 'भेंडीअप्पा' असे होते.

ही माझी लिश्ट:

टशन
यमला पगला दीवाना (खरच बघीतला मी हा पिच्चर??)
झूठा ही सही (जॉन इब्राहीम आणी नटी महीत नही)
ऑल द बेस्ट
वो लम्हे

अजूनही आहेत बरेच. जसे जसे धक्के आठवतील तसे टाकते.

बागबान

एकदम फालतू

कोलेज मध्ये असताना पै पै गोळा करून बघितलेला picture खर्च भंकस होता

पैसे सुधा गेले फुकट

त्या नन्तर कधी हिम्मत नाही झाली picture बघायची ते सुधा थेटर मध्ये जाऊन

ही माझी लिश्ट:

टशन
यमला पगला दीवाना (खरच बघीतला मी हा पिच्चर??)
झूठा ही सही (जॉन इब्राहीम आणी नटी महीत नही)
ऑल द बेस्ट
वो लम्हे

अजूनही आहेत बरेच. जसे जसे धक्के आठवतील तसे टाकते.>>>>>>>>>>>>
मी_सोनल, तुम्ही हे चित्रपट थेटरात जाउन पहिलेत????????????:अगो:

तुम्ही हे चित्रपट थेटरात जाउन पहिलेत???????????>>>>> थेटरात पाहीलेल्या पिच्चरचीच नावं टाकायची आहेत ना इथे...
सगळे थेटरात जाउन, पैसा, वेळ खर्च करुन पाहीलेत (चिडचिड)

नंदिनी आहे लक्षात... आणि अजुनही आवडीनिवडी फारशा बदलल्या नाहीयेत... Proud

दबंग दोनदा पाहीला थिएटरमधे...
४ वर्षांच्या दबंग फॅन भाच्याबरोबर तीस मार खान पाहीला... दर ५ मिनिटांनी सलमान खान कुठे आहेला ब्रश करायला गेलाय... ऑफीसात गेलाय... झोपलाय अशी अनेकोनेक उत्तरे देता देता अचानक टुकारश्या गाण्यात खरच सलमान आलाही... अगदीच भंगार मुव्ही... पण तिकीटाचे २०च रुपये मोजले होते त्यामुळे तेवढे दु:ख नाही झाले...

आणि अजुनही आवडीनिवडी फारशा बदलल्या नाहीयेत... >>>> खुदा बचाये तेरेको. Proud

मी तुष्कीचा गायब आणि ढोल पण थेटरात पाह्यले आहेत. गायबचा शेवट सत्यात उतरला तर किती बरं होइल असं राहून राहून वाटत होतं.

बर्‍याच जणांना पटणार नाही किंवा वाद होतील, पण मी भारी भक्कम पैसे देवुन पुढच्या रांगेतली टिकेट्स काढली आणि 'सही रे सही..' पाहिलं तो एक भयंकर भंकस प्रकार वाटला. टुकार स्टोरी, कैच्याकै लाउड अ‍ॅक्टिंग करणारे, अत्याचार दिसणारे नट/नट्या आणि एकदम बेक्कार नाटक होतं ते. भरत जाधव मला अजिबात आवडत नव्हते, इथे फक्त असं वाटलं कि बिचारा चांगला कलाकार वाया गेला. त्यांचे वेगवेगळ्या भुमिका, सटासट बेअरिंग बदलणे, प्रचंड पाठांतर हे सगळं फार स्ट्रेसफुल असणार आहे त्यांच्यासाठी. मग ते असं का वाया घालवलं त्यांनी? आमच्यासाठी पण ते बाकीचे कलाकार बघणं प्रचंड वैतागवाणं होतं. चक्क डुलक्या काढत होतो आम्ही. जाधव स्टेजवर असताना फक्त बघवत होतं नाटक. म्हणजे स्टोरी/संवाद बंडलच, पण ते काम चांगलं करत होते.

दिवाळीत जो संच आणि नाटक आला ते काही तरी ' पुन्हा... सही रे सही' असं होतं. हे ओरिजनल नाही का? ओरिजिनल नाटक चांगलं होतं का? त्याबद्दल चांगलं ऐकलं होतं.

निद्रानाशावर जालीम उपचार म्हणजे पिळगावकरांचे सिनेमे थेट थेटरात जाऊन प्रेक्षकांनी पाहावेत.अति झोपाण्याची सवय असल्यास दादा कोंडकेंचे सिनेमे कुठेही पहावेत.

सही रे सही त्याच्या हक्कावरुन कोर्टात गेलं आणि बंद पडलं. त्यामुळे तीच थीम ठेऊन ( म्हणजे नेमकं काय) पुन्हा सही रे सही आणलं.. मला तरी पुन्हा सही आवडलं. मी दोनदा पाहिलं.

कॉलेज मध्ये असताना चार-पाच वर्षे मैत्रिणीमुळे मला द्रोणा , दबंग , कम्बक्त इश्क , लोव्हस्टोरी २०५०, गॉड तुस्सी ग्रेट हो , हॅलो , तीस मार खान यासारखे डझनभर तद्दन भिकार सिनेमे मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन पाहावे लागायचे. लिमिटेड पॉकेटमनी तर उडायचाच पण डोक्याला शॉट व्हायचा तो वेगळा. Happy
यातले काही सिनेमे मी अधूनमधून उपहासात्मक विनोदासाठी पाहत असतो

Pages