" भंकस सिनेमा "

Submitted by रुपाली अलबुर on 9 July, 2010 - 07:37

"आय हेट लव्ह स्टोरी " सिनेमा पाहताना मला सहज सुचले कि असे किती तरी " भंकस " वाटणारे सिनेमे आपण पाहतो आणि कुठून बुद्धी झाली आणि हा सिनेमा पहिला असे वाटते . असे सिनेमे थेटरात जाऊन पाहण्याची दुर्बुद्धी प्रत्येकाला एकदा तरी झाली असेलच . तुम्हाला असे होते का ?? कोणी कोणी भंकस सिनेमे चक्क थेटरात जाऊनपाहिलेत ??

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"मला वाटलं सिनेमाच नावचं " भंकस" आहे"

श्री....:हाहा:

मिल्या..."तहजीब (फर्स्ट डे लास्ट शो... आज एक तरी सिनेमा पहायचाच असे म्हणत सर पे कफन बांधून निघालेलो... येताना त्यातच गुंडाळून आणावे लागले नाही हेच नशीब)" Lol पण तु जे म्हणालास की श्रद्धा व फारेंडने या सगळ्यांची परिक्षणे त्यांच्या शैलीत लिहावीत.. त्याला अनुमोदन!

खर म्हणजे तुम्हा सगळ्यांनी थिएटर मधे जाउन पाहिलेल्या या "भंकस" सिनेमांची जी नावे दिली आहेत त्यातल्या ९०% सिनेमांची नावेच इतकी " भंकस" आहेत की ती नावे वाचुनच वाटते की ते सिनेमे "भंकसच" असणार.. Lol पण नावावरुनच सिनेमा भंकस आहे असे मला वाटणारी काही खास नावे..

टशन
दिल बोले हडिप्पा
किसना
नाच
रावण
द्रोण (पत्रावळीच्या पण लायकीचा नव्हता... मी भ्रमर....:हाहा: )
गुंडा (हे नाव वाचुन चित्रपट पहायला जाणार्‍याच्या हिमतीला दाद!)
लोहा
फुंक
तारारमपम
मेरा नाम है अँथनी
ढोल
रन
किस्मत कनेक्शन
टॉम डिक अँड हॅरी
भुतनाथ
जय विरु...
(नशीबाने यातला एकही सिनेमा मी पाहीला नाही..)

नंदिनी व आगाउ.. त्या लिंक्स इथे एका ठिकाणी देउन बरे केलेत! धन्यवाद!

यामधे रीना लांबा नावाची नविन अभिनेत्री आहे. नंतर फारशी कुठे दिसली नाही या नावाची अभिनेत्री
>>

ही आता बारशानंतरच्या नावानी काम करते... Wink

बॉबी देओल अन्द नटी कोण होती बर ?? आठवत नाही.....
>>
नेहा
उर्फ शबाना रझा...

(मिसेस मनोज बाजपेयी)

"बाबा, आता जाहीरात लागेल ना???" Rofl

मलाही मंगल पांडे पिच्चर बघुन खुप राग आला होता....

का विचारु नका -
....मी परवा "उमर पचपन की दिल बचपन की"
प्र. भु. कादर खान. कादर खान. (हो डबल रोल. ), त्याच्या मागे अरुणा इरानी, शक्ति कपुर च्या बरोबर . अजुन बरेच आयटम.

....आणि "होटल" बघितला.
प्र भु : राकेश रोशन. इतर लोक आणि भुतापैकी कोणीही ओळखिचे नाहीत. हिरवीण बहुतेक बघ्तल्यासारखी वाट्टे...

आणि अजुन जिवंत आहे.

अमित जी तुम्ही फरदीनचे एवढे सर्व सिनेमे थेटरमध्ये पाहिलेत Uhoh

अरे बापरे कठीण आहात तुम्ही....

ही आता बारशानंतरच्या नावानी काम करते.. >>> आणि बारशाच्या वेळच्याच कपड्यात काम करते Lol

मी मुळात फार कमी चित्रपट बघते. जे बघते ते शक्यतो रिव्ह्यू वाचूनच बघते. पण एकदा इथे अमेरिकेत नवर्‍याच्या ऑफिसतर्फे 'एकलव्य' चित्रपट दाखवला होता तो मात्र चित्रपटाबद्दल काहीही माहीत नसताना बघायला गेले होते. कसला टुकार चित्रपट ! फुकटात दाखवला तरी बघू नये. त्या नंतर इंडियन बुफेही होता म्हणून तो चित्रपट सहन केला नाहीतर केव्हाच पळालो असतो तिथून Proud

जान तेरे नाम ( रोनित रॉय आणि नाव लक्षात न राहणारी नटी)
लाडला - Lol कसा काय हा सिनेमा मी पाहिला ठेटर्‍आत? Uhoh
हे बेबी - भंगारेस्ट सिनेमा... Angry पैशे वाया

तुम्ही सर्वानी भंकस सिनेमे लिहिले की मला आठवतं "अरेच्चा. मी हापण पाहिलाय की!!!तोपण थेटरात."
आम्ही कॉलेजला असताना वाढदिवसाची पार्टी म्हणजे थेटरात नेऊन पिक्चर दाखवणे. Happy त्यामुळे जो कुठला लागला असेल तोच पिक्चर बघणे!!! कॉलेज संपलं तवर "फालतू पिक्चर बघितलेच पाहिजेत" असा नियम घालून घेतला होता बहुतेक. हल्ली हल्ली प्रमाण जरा कमी झालय माझं पिक्चर बघण्याचं.

माझी अजून एक लिस्ट. Proud

बॉबी देओलचा करीब. (याचं नाव गरीब ठेवायला हवं होतं, )
फरदीनचा हम हो गये आपके.
टॉम डिक अँड हॅरी. (यातल्या तीन प्रमुख पात्रामधे एकजण माझा मित्र आहे. अनुज साहनी. त्यामुळे कंपल्सरी याला छान छान म्हणावं लागलं होतं Happy )
त्रिदेव (एक मित्र अंजली जठारचा जबरदस्त फॅन होता.)
अ‍ॅश बॉबीचा और प्यार हो गया. (यामध्ये चालते धावते विमान बॉबी देओल हाताने थांबवतो. टीव्हीवर बर्‍याचदा पिक्चर लागतो पण मोठ्या पडद्यावर या सीनची मजा औरच!!)
सुश्मिता सेन मनिषा कोइरालाचा पैसावसूल (खरं याचं नाव पैसा गायब असं हवं होतं. )

पण एकदा इथे अमेरिकेत नवर्‍याच्या ऑफिसतर्फे 'एकलव्य' चित्रपट दाखवला होता तो मात्र चित्रपटाबद्दल काहीही माहीत नसताना बघायला गेले होते.>>> हा पिक्चर भारताची ऑस्कर नामांकन होता. वशिल्याने काय काय कामं होतात बघा!!!

अरे ह्यात राहुल रॉय आणि पूजा भट्टचा महान पिक्चर कसा नाही टाकला अजून... ज्यात राहुल रॉय रात्री वाघ वगैरे होत असतो....

माझ्या लिस्ट मधले काही...
कभी खुशी कभी गम... मित्रांच्या वेडेपणा मुळे फर्स्ट डे फर्स्ट शो.. बाहेर पडल्यावर डोकं पार जाम झालं होतं..
आजा नच ले... हा पिक्चर मी का पाहिला...
अन्यन.. तामिळ मध्ये... हा तामिळ मित्रांच्या बरोबर त्रिवेंद्रम मध्ये बघितला होता...
परिणिता... हा तसा बरा आहे पण शेवटी जो काही भंगार पणा केला आहे त्यामुळे ह्याला भंकस मध्ये टाकयला हरकत नाही...

आमिर आवडता, पण त्याने दोन तीन वेळा मला गंडवले.
एक दिवाना मुझसा नही, यात माधुरी होती, आणि दिल च्या आसपासच आला होता.
मेला, त्या तो, भैया फ़ैजल खान, ट्विंकल आणि ऐश्वर्या पण होती.
आणखी एक, ज्याचे नाव इथे घेणे म्हणजे मला त्या थोर क्रांतिकारकाचा अपमान केल्यासारखे वाटते.

सनी, बॉबी आणि उर्मिला चा पण एक सिनेमा होता. त्यात तर सात संगीतकारांची गाणी होती.
उर्मिला आणि आफ़ताब शिवदासानीचा पहिला सिनेमा पण मी बघितलाय.
अगदी अलिकडचा धक्का म्हणजे, हाउसफ़ुल्ल (अजून विसरता येत नाही, कारण मिकाचे हिडीस
गाणे, रोज गाडीत एफ़ेम वर ऐकावे लागते. रागाने मी त्या रेडीओचे बटणच मोडले. )

>>राहुल रॉय आणि पूजा भट्टचा महान पिक्चर कसा नाही टाकला अजून... ज्यात राहुल रॉय रात्री वाघ वगैरे होत असतो....
जुनुन

>>उर्मिला आणि आफ़ताब शिवदासानीचा पहिला सिनेमा
मस्त

२-३ आठवड्यांपूर्वी जेम्स (James) नावाचा एक अत्याचारपट पाहीला. साउथ मधला कोणतरी नायक आणि बॉलिवुड मधली कुठलीतरी टवळी. अधिक लिहिवत नाही. जिज्ञासूंनी पहावा व त्रास करून घ्यावा Wink Proud

>>>>राहुल रॉय आणि पूजा भट्टचा महान पिक्चर कसा नाही टाकला अजून... ज्यात राहुल रॉय रात्री वाघ वगैरे होत असतो....
जुनुन

हो थोडासा(च) बघितला होता एकदा. खांबातून नरसिंह बाहेर आला होता यावर विश्वास बसला ते पाहिल्यावर. Proud

(स्वगत: वाघ आणि राहुल रॉय. . . . राहुल रॉय आणि वाघ. . . . वाघ आणि राहुल रॉय. . . . ) (मोठ्याने: नहीSSSSSSS) Proud

[सॉरी, थेटरात जाऊन बघितलेले सिनेमे असं अपेक्षित आहे पण मी टिव्ही वर बघितलेले लिहिलंय. वाटल्यास पोस्ट काढून टाकतो]

आणखी एक, ज्याचे नाव इथे घेणे म्हणजे मला त्या थोर क्रांतिकारकाचा अपमान केल्यासारखे वाटते.<< दिनेशदा अहो तुम्ही अमीरचा आणि जुहीचा "दौलत की जंग " विसरलात का? तो खजिन्याचा नकाशा अमीर खातो आणि त्याला त्याचा रस्ता पाठ होतो काय महान सिनेमा आहे तो !!

>>तो खजिन्याचा नकाशा अमीर खातो आणि त्याला त्याचा रस्ता पाठ होतो काय महान सिनेमा आहे तो !!

तो खातो म्हणून नै पाठ होत.
त्याला एकदा बघून लक्षात राहतं आणि नकाशा खाऊन तो नष्ट करतो दुसर्‍या कुणाला मिळू नये.
आणि फक्त त्यालाच रस्ता लक्षात राहिला तर त्याला ते खलनायक मारू शकत नाहीत म्हणून

मंदार, मी पण पाहिला होता जेम्स. निशा कोठारी ती. (अंतरा माळीची झेरॉक्स.)
मेकॉनोज गोल्ड ची नक्कल, झलझला नावाने आली हो्ती, शत्रुघ्न सिन्हा, किमी काटकर,
मंदाकिनी, राजीव कपूर वगैरे होते. तो पाहिल्यावर मी परत कॅसेट आणून, मूळ सिनेमाची
हिंदी डब्ड आवृत्ती, मस्ताना का सोना, बघितली होती.

५ रायफल्स नामक एक अत्यंत भंकस सिनेमा पाहिला. केवळ त्यातील अझीज नाजाच्या "झूम बराबर झूम शराबी" ह्या कव्वालीकरता. अर्थात त्या आवडत्या कव्वालीचे चित्रणही भंकस आहे. अत्यंत कमी खर्चात बनवला आहे, सुचेल तशी श्टोरी बनवत गेले आहेत.
त्याकाळच्या प्रसिद्ध नटांसारखे दिसणारे डमी लोक घेतले आहेत. राकेश खन्ना, शाही कपूर वगैरे.
त्यात का कोण जाणे पण स्किईंगची काही दृश्ये आहेत ती चक्क दुसर्‍या सिनेमातून कट अ‍ॅंड पेस्ट केलेली आहेत!
एका दृश्यात तर चक्क शॉन कॉनरी स्किईंग करताना दिसतो! म्हणजे बहुधा कुठल्याशा जेम्स बाँडच्या चित्रपटातून उचलेगिरी असावी.

हा चित्रपट नामशेष झाला असावा त्यामुळे कुणी तो बघण्याची शक्यताही नाही. हे एक बरे झाले!

दुसरा एक नमुना म्हणजे जुन्या काळातला शतरंज. राजेंद्रकुमार, वहिदा रेहमान, मेहमूद वगैरे. जेम्स बाँडला मद्रासी चित्रपटात आयात केले आणि तो सिनेमा हिट झाला म्हणून त्याचा हिंदी सिनेमा बनला असावा.
बराचसा सिनेमा चीनमधे घडतो. नायिकेला आणि तिच्या आईला चिनी सरकार पळवून नेते आणि ब्लॅकमेल करते. तमाम खलनायक आणि मॉब चिनी. नावे चुंग, मिंग टाईपची पण सगळे लोक अस्खलित हिंदीत बोलतात. त्यातला शिरोमणी खलनायक जेव्हा प्रवेशतो तेव्हा तमाम प्रजेला मुंडके खाली करायला सांगितले जाते आणि हा हुकुमही हिंदीत. "जनरल के सामने सर उठाने की सजा है मौत!"
एकदा एक चिनी भिकारी "खुदा के लिये झोली भर दे" अशी भीक मागताना दाखवलाय. एकदा नायक चिनी म्हातार्‍या टांगेवाल्याच्या वेषात पण पुन्हा अस्खलित हिंदी. आणि कुणालाही संशय येत नाही.
ह्या सिनेमाचा सूड म्हणून चिन्यांनी तमाम भारतीयांना चिनी बोलताना दाखवले तर बरे.
एकंदर नायकाचे पराक्रम, मेहमूदचा आचरटपणा हेही भंकसच.

देव आनंदचे तमाम नवीन (?)शिनेमे: मी पाहिलेले हम नौजवान, अव्वल नंबर, कलाबाज. प्रचंड विनोदी....

SRK: बादशाहा, डुप्लिकेट, राम जाने, गुड्डु (नौशदचे म्युझिक होते म्हणुन झेलला)

करन जोहरचे सर्व सिनेमा.

म्हनजे मी एकटी नाही असे भंकस सिनेमा बघनारी.
माझ्या लिस्ट मधले काही.....
कमल हसनचा "दशावतारम"
मान गये मुगले आझम
शब्द
दुल्हा मिल गया
ना तुम जानो ना हम
आप मुझे अछे लगने लगे.
शाहरुखचा " मुहाब्बते "
एकदम बकवास

Pages